रात्र खेळीते खेळ - भाग 1 prajakta panari द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रात्र खेळीते खेळ - भाग 1

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी....




आई ग...... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला. समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट जंगलच जंगल होत त्याला काहीच आठवेना कि आपण नेमक कोठे आलो आहोत. तो याचा विचार करतच होता कि जंगलातून अनेक श्वापदांचे आवाज येवू लागले. ते ऐकून तर त्याच्या अंगावर सर्रकन काटाच आला.त्याला वाटल आता आपल काही खर नाही आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.
त्याला आज एक एक क्षण घालवण सुद्धा कठीण झाल होत. आणि मुळात त्याला आपण इथे कस आलो हेच आठवत नव्हत.
तोपर्यंत त्याला अस जाणवू लागल कि आपल्या बाजूला कोणीतरी येवून बसल आहे. त्याला समजेना की काय कराव डोळे उघडून पाहाव का कि आपल्या जवळ कोण बसल आहे त्यांच्याकडून मदत तर घेता येईल आणि इथून बाहेर पडता येईल पण दुसऱ्याच क्षणी अस वाटायच की नको नको आपण डोळे उघडायलाच नको काय माहित काय भयानक दिसेल. या विचारात असतानाच त्याला जाणवल कि आता आपल्या मागे कोणीतरी उभ आहे या अशाच जाणीवाच इतक्या भयानक अनुभूती देत होत्या कि त्याच्या मनात भितीच साम्राज्यच उभ राहिल होत. आता त्याच्या आसपास जे कोण होत ते दूर गेलय अस त्याला वाटल पण तरीही त्याला डोळे उघडायची हिंमतच होईना. त्याच विचारचक्र परत चालू होत.
अरे काय हे एक तर काय झाल आणि आपण इथे आलो कस आलो आपण स्वतः हाच आलो कि कोणी आपल्याला इथ घेवून आल आणि जर आपण स्वतः हाच इथ आलो तर आपल्याला ही जागा कोणती आहे हेच का समजत नाही आहे आणि जर कोणी घेवून आलय तर नेमक कोणी आणल ते का आठवत नाही. असा अधिराज स्वतः हाच्याच मनाशी संवाद साधत असतोच कि त्याला नदीच्या पाण्याचा आवाज येवू लागतो‌. त्याला आश्चर्यच वाटू लागत कि हे कस शक्य आहे एक तर रात्रीचा किर्र अंधार आहे आणि वाहण्याचा आवाज येतोय खर तर रात्री नदी पण संथ झालेली असते‌. तिथ जावून पाहायलाच हव कि नदी कशी वाहत आहे.
अधिराज तसाच उठून नदीचा वेध घेत घेत पुढे जावू लागला तोच त्याला मागून कोणीतरी खेचत घेवून गेल आणि परत तो तसाच बेशुद्ध झाला.
.......

अधि ये अधि अरे कुठे आहेस तुझ्यावर डाव आला ना आणि तुच लपून बसलास अरे खूप वेळ होत आहे ये कि आता आम्हाला घरी पण जायच आहे तु शोधेनास म्हणून आम्हीच तुला शोधू लागलोय पण आहेस कुठे तू अस म्हणत म्हणत राज, कावेरी, अनुश्री आणि वीर तिघेही अधिराजला शोधत होते. तेवढ्यात कावेरीच्या हातावर रक्ताचे काही थेंब पडले तस ती वरती बघू लागली आणि जोरात ओरडू लागली तिचा तो आवाज ऐकून तिघही तिच्याकडे वळले. ते सगळे कावेरीकडे आले तस ति ने बोट वर करून वरती बघायला सांगितले तस ते ही वरती बघू लागले आणि ओरडू लागले . वरच दृष्य फारच अघटीत होत. एका माणसाला मारून त्या झाडावर कोणीतरी ठेवल होत ते दृश्य खूपच भयावह होत त्याच्या डोळ्यात काहितरी घुसवल होत त्यातून रक्त गळत होत आणि एक हात छाटला गेला होता ते दृश्य पाहून तर त्या चौघांच्याही पायाखालची जमीनच सरकली ते शक्य तेवढे बळ एकवटून घरी जावू लागले.
ते घरी जावू लागले तोच तो माणूसही पळत त्यांच्या मागे मागे येवू लागला त्यांना कळेना की अस काय होतय हे तो माणूस तर मेलेला आहे मग कस काय पळत येत आहे. मगाशी तर त्याच पाय देखील दुसऱ्या झाडावर दिसले मग ते आता कसे काय परत जोडले गेले. तो माणूस मागून गुरगुरण्याचा आवाज काढत त्यांच्या मागे येवू लागला तसे ते आणखीनच घाबरुन पळू लागले. आता दोन पावलावर येण्याचा आवाज येवू लागला तस ते जीवाच्या आकांताने पळू लागले. थोड्या वेळात तो वीरच्या अगदी जवळ गेला त्याला वाटल तो त्याच्या शेजारीच आला आहे तस वीरही शक्य तितक बळ एकवटून पळू लागला. आणि राजचा तर शर्ट त्याच्या हातात आलेला त्याने त्याचे तसेच बट्णस काढले आणि शक्य होईल तितक्या वेगाने पळू लागले. तितक्यात त्यांना समोर एक पडक घर दिसल ते त्या घराजवळ जावू लागले तस तो माणूस दूर होवू लागला ते तिघेही पटकन त्या घरात शिरले. त्यांना वाटल आपण इथे नक्कीच सुरक्षित राहू तोपर्यंत त्यांच्या कानावर एक आवाज आला. काय र कोण हाय तिकडे आणि एक म्हातारा काठी टेकत टेकत त्यांच्या जवळ आला. त्याने डोक्यावर फेटा बांधला होता एका हातात तंबाखूची डब्बी पकडली होती आणि धोतर नेसल होत असा त्याने पारंपरिक पेहराव केला होता. तो या सर्वांना प्रश्न विचारु लागला पण यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेनात .
आर पोरांनो अस का घाबरालसा काय भूत बित पायलसा का?
तस येताना वाटेत जे काय घडल ते त्या आजोबांना सांगू लागले आजोबा हसत म्हणले तर अस हाय व्हय आर घाबरू नगस आता आज रहावा इथ आणि सकाळच्याला जा तुमच्या घरला.. तसही ते चौघ खूप घाबरले होते ते लगेच तयार झाले ‌
आजोबा मनोमन खूप खूष झाले आयती तावडीत गावलीत माझ्या. मागच्या येळस वाचली होती आता नाय वाचणार.