निर्णय भाग १८
मागील भागावरून पुढे…
मेघना साठी वरसंशोधन सुरू होतं.इंदिरा आवडलेल्या मुलांची माहिती आणि फोटो मेघनाला पाठवत असे.या सगळ्या गोष्टी करता करता सहा महिने उलटले.
इंदिरेला शंका आली की एवढी मुलं बघून मेघनाला एकही कसा पसंत पडत नाही. तिने सरळ मेघनाला फोन लावला.
" हॅलो.बोल ग."
"मेघना तुझ्या मनात काय आहे एकदा सांग मला."
"माझ्या मनात कुठे काय आहे असं का विचारते आहेस तू "
"मी इतक्या चांगल्या चांगल्या मुलांची माहिती आणि फोटो पाठवते.तुला एकही पसंत पडत नाही.मी तुझ्यावर जबरदस्ती केली म्हणून तू तयार झालीस का? आणि प्रत्येक स्थळाला नकार देते आहेस का? मुलांचे फोटो तरी बघीतलेस का?"
"अगं आई मी तू पाठवलेल्या सगळ्या मुलांचे फोटो बघीतले.पण एकही क्लिक नाही झाला."
"म्हणजे नेमकं काय झालं?"
"अगं फोटो बघताच क्षणी हाच तो मुलगा असं वाटायला हवं तसं नाही वाटलं म्हणून मी नकार दिला."
"असं फोटो वरून कसं कळेल !तो दिसायला चांगला आहे की नाही एवढंच फक्त कळेल."
"कळतं. आई फोटो बघून सुध्दा मुलांबद्दल अंदाज बांधू शकतो."
"मी जवळपास वीस मुलांचे फोटो तुला पाठवले त्यातला एकही तुला क्लिक झाला नाही याचा अर्थ काय?"
"आई तू कशाला टेन्शन घेतेस मला हवा तसा मुलगा क्लिक झाला की तुला सांगते.मी मुद्दाम असं करतेय असं मनात नको आणूस."
"ठीक आहे. मला तुमच्या पिढीचे विचार कधी कधी कळत नाही त्यातलाच हा एक विचार. क्लिक होतं म्हणजे काय हे मला तू सांग जेव्हा तुला एखादा मुलगा क्लिक होईल तेव्हा."
"नक्की सांगीन.माझी ममा किती काळजी करशील.चिल मार."
"हे काय आता? हा शब्द कशाला वापरला?"
"आई आमच्या पिढीत हा शब्द पाॅप्युलर आहे.कोणी टेन्शनमध्ये आलं की आम्ही असं म्हणतो."
"जाऊ दे.तुमची डिक्शनरी मी चाळायला लागले तर मला वाटतं मीच वेडी होईन."
"ममा असं नको बोलू. तू जगातली बेस्ट ममा आहेस."
"बरं पूरे आता मस्का लावणं.चल ठेवते."
"तुला खरं नाही वाटत का मग शुभांगीला विचार."
"तिला काय विचारू?"
"ती पण म्हणते मेघना आपल्या आई जगातील बेस्ट आई आहे."
"अजून संपलं नाही का मस्का लावणं."
"नाही ग आई मी खरच सांगतेय शुभांगीलापण खूप कौतुक आहे तुझं."
"बरं ."
हसतच इंदिरा म्हणाली आणि फोन ठेवला.फोन ठेवल्यावर तिला तिथे मंगेश असणं अपेक्षित होतं कारण नेहमीच तो तसा असायचा.पण आज नव्हता इंदिरेला आश्चर्य वाटलं.
तिने कम्प्युटर उघडला आणि विवाह संस्थेची साईट उघडली.काही मुलांचे फोटो बघून ते मेघनाला पाठवायचे होते.
***
इंदीरा स्थळं बघत असतानाच प्रज्ञाचा फोन येतो.
"बोल ग प्रज्ञा इतक्या सकाळी सकाळी फोन केला."
"वहिनी कामात आहात का?"
"अगं कामात म्हणजे विवाह संस्थेची साईट उघडून बसली आहे.सध्या मेघनाचं लग्नं हेच महत्वाचं काम आहे."
"मला एक स्थळ सुचलायचं होतं."
"अगं मग सांग नं."
"मी ज्या महिला म़डळात जाते तिथल्या मैत्रीणीने हे स्थळ सुचवलं आहे."
"काय करतो मुलगा?"
"मुलगा इंजीनियर आहे.त्याला एक भाऊ आणि एक बहिण आहे. वडील बॅंकेत होते. मागच्या वर्षी रिटायर्ड झाले."
"अच्छा. तू मला मुलाची सगळी माहिती आणि फोटो पाठव मी बघते आणि मेघनाला पाठवते."
"चालेल मी तुम्हाला लगेच पाठवते."
प्रज्ञा ने फोन ठेवला.इंदिरा पुन्हा स्थळं बघू लागली.तेवढ्यात तिच्या फोनमध्ये मेसेज टोन वाजला.
इंदिरेने मोबाईल बघीतला तर प्रज्ञा ने मेसेज पाठवला होता.मेसेज उघडून इंदिरेने मुलांची माहिती आणि फोटो बघून नंतर मेघनाला पाठवला आणि स्वतःशीच म्हणाली,
' बघू हा मुलगा मेघनाला क्लिक होतो का?' आणि हसली.
__________________________
प्रज्ञा ने सुचवलेलं स्थळ इंदिरेला चांगलं वाटलं पण मेघनाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. इंदिरा मेघनाच्या फोनची वाट बघत असतानाच मेघनाचा फोन येतो.
" हॅलो.बोल."
" आई आत्ता तू जे स्थळ पाठवला ते मला क्लिक झालं."
"अरे वा मलाच खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय."
"काय ग आई!"
"अगं खरंच. तुला त्या मुलाची प्रोफाइल फोटो आवडला आहे?"
"हो."
"मग मी त्याच्या घरी फोन करते."
"आई पहिले चॅट करू दे.एकदम भेटायला नको."
"बरं ठीक आहे.त्यांना आधी तुझा फोटो माहिती पाठवावी लागेल.त्यांच्या मुलाला तुझी प्रोफाईल फोटो पसंत पडला तर गोष्ट पुढे सरकेल.कळलं."
"हो. पण आधी चॅटींग.आम्ही दोघं एकमेकां बरोबर कम्फर्टेबल आहोत की नाही हे दोघांनाही कळू दे.मग भेटू."
"ठीक आहे.मी ऊद्या फोन करीन."
"आई त्यांच्याकडून होकार नकार येईपर्यंत दुसरी स्थळं बघू नको."
"अगं बाई एवढं आवडलं हे स्थळ!"
"अं…आई तू फारच करते बाॅ."
"काय करते.?" असं म्हणून इंदीरा हसायला लागली तशी मेघनाला ही हसू यायला लागलं
"मेघना ठेवते फोन आणि काकूला सांगते."
"हो."
इंदिरा फोन ठेवते.लगेच ती प्रज्ञाला फोन लावते.
"हॅलो बोला वहिनी"
"अगं आत्ताच मेघनाचा फोन होता.तिला ते स्थळ आवडलं आहे.आता ऊद्या सकाळी त्यांना फोन करते.त्यांचा नंबर माहिती मध्ये आहे."
"हो दिला आहे नंबर. तुमचं काय बोलणं होईल ते सांगा."
"हो तुला लगेच सांगीन.एक मुलगा मेघनाला क्लिक झाला हे ऐकून मलाच बरं वाटलं. सुरवात झाली पुढे बघू. बाकी ठीक नं सगळं?"
"हो वहिनी ठीक.मीच ऊद्या सज्जनगडावर चालले आहे."
"हो का?"
"शिबीर आहे.आठ दिवसांचं"
"भावजींचं जेवण वगैरे?"
"ते खानावळीत जेवतील."
"इकडे या असं म्हणू शकत नाही."
"मी यांना म्हणाले आधी वहिनींकडे जा.तर म्हणाले नको त्या मंगेशचं कधी काय बिनसेल सांगता येत नाही त्यापेक्षा मी खानावळीत जेवीनं."
"भावजींचही बरोबर आहे.म्हणून मी आग्रह करत नाही."
"तुम्ही काही वाटून घेऊ नका वहिनी हे जेवतील खानावळीत."
"ठीक आहे. ऊद्या कधी चाललीस?"
"ऊद्या सकाळीच निघू म्हणजे रात्रीपर्यंत पोहचू."
"येणार कधी आहेस?"
"आठ दिवस शिबीर आहे.समारोप झाला की लगेच निघू."
"ठीक आहे आलीस की कळव."
"हो कळवते.ठेवते फोन"
"हो."
आठ दिवस छान घरी जेवायला सोय असताना मंगेशच्या स्वभावामुळे शरद येणार नाही याचं इंदिरेला वाईट वाटलं.
***
मंगेशचं जसं वय वाढलं तसा त्याचा स्वभाव मवाळ व्हायच्या ऐवजी आणखीनच तिरसट झाला आहे असं इंदिरेच्या लक्षात आलं.
मंगेशचा स्वभाव बदलेल अशी आशा करणं चुकीचं आहे.आता त्यांच्या स्वभावाकडे फार लक्ष द्यायचं नाही असं इंदिरेने ठरवलं.
मेघनाचं लग्नं इथे ठरून जावं असं इंदिरेला वाटलं. मेघनाला मुलगा आवडलेला दिसतोय. मुलालाही मेघनाच्या फोटो आणि माहिती आवडू दे अशी तिने देवाजवळ प्रार्थना केली.
मिहीरचं सगळं व्यवस्थित चालू आहे. बाळाची चाहूल कधी येते बघायचं. त्यांना मुलासाठी सारखं म्हणायचं नाही हे इंदिरेने ठरवलं होतं.
मंगेशला कशातच इंटरेस्ट नव्हता.त्याचं घरातील अधिपत्य कमी होत चाललेलं असल्याने तो अस्वस्थ होता.घरात आपलं स्थान पूर्वीसारखं निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल याचा तो विचार करत होता.
इंदिरेला मंगेशच्या मनातील खळबळ कळली नाही. त्यांच्या घरात सध्या शीतयुद्ध सुरू होतं.
हे कोण थांबवेल हे कोणीच सांगू शकणार नाही.
इंदिरा आता ठाम उभी हैती.मंगेशच्या कोणत्याही आत्ताच वागण्याला ती बळी पडणार नव्हती.
आपण मंगेशच्जेया तिरसट स्वभावामुळे जे घाव सोसले त्यांचे परीणाम मुलांवर होऊ द्यायचे नाहीत असा ठाम निर्धार इंदिरेने केला असल्याने ती मंगेशच्या विचीत्र वागणूकीकडे साफ दुर्लक्ष करत होती.पण...मंगेशच्या वागण्याने लक्ष्मी ठेऊन होती तेही मंगेशच्या नकळत.
इंदिरा एवढी शक्तीवान कशी झाली याचं मंगेशला कोडं पडलं होतं.त्यावर विचार करून त्याचं डोकं फिरायची वेळ आली होती पण त्याला उत्तर काही सापडलं नाही.
___________________________
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात
निर्णय
लेखिका…मीनाक्षी वैद्य.
क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात
निर्णय
लेखिका…मीनाक्षी वैद्य