Garbha - 8 books and stories free download online pdf in Marathi

हिरवे नाते - 8 - गर्भ

                                                                             

                                                                                                      गर्भ - 8

 सृजनाची ओढ पियूला नेहमीच आतून जाणवत असायची. ती लहानपणापासून आपल्या अबोध मोठ्या डोलयानी सृष्टी न्याहाळत असायची. वयोमानाप्रमाणे दृष्टी बदलत गेली पण सृष्टी तिच राहिली.वयानुसार वेगवेगळ्या तऱ्हेने त्या सृष्टीचे आकलन होत गेले. अगदी चांदोबा आपल्या बरोबर का फिरतो, इथपासून चंद्राच्या कृष्णविवरचा शोध, अभ्यास, पोर्णिमेच्या विरह रात्री अशा सगळ्या अवष्टण मधून जात आता ती स्वतच सृजनाचा भाग बनली होती. पोटावरून हळुवारतेने हात फिरवताना तिच्या मनावर, देहावर किती मोरपिसे उलगडून गेली. देहाच्या अंतराळात तेजाच्या एका शलाकेने तिचे पुर्ण जीवनच बदलून गेले. एका अनोख्या ओढीने ती भारली होती. निसर्गाच्या विविध रूपांचे जग तिला साद घालत होते. मानवी जगतापासून दूर एकांतासाठी तिचा जीव व्याकूळ होत  होता. तिच्या या अजब डोहळ्याचे संगळ्यानाच कौतुक वाटत होते.

   पियू, हा डोहाळा पुरवावा या अपेक्षेने सगळ्यांकडे बघत होती. पण ते पुरवण्याचे मात्र कोणी नाव घेईना. हे पाहून तिने साहिलला विश्वासात घेऊन यावर मार्ग काढायला सांगितला. प्रथम त्यालाही ती गमत म्हणून म्हणतीये असेच वाटले होते. पण जेव्हा तिची त्यातली व्याकुळता लक्षात आली, तेव्हा काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे हे त्याने ओळखले. थोडे दिवस सुट्टी घेऊन आपण फिरायला जाऊ असेही त्याने सुचवले. पण तिला गजबजलेल्या ठिकाणी जायचे नव्हते. शांत, निवांत सुंदर सृष्टीत एकरूप व्हायचे होते. लगेच वापस यायची तिची तयारी नव्हती. संहिल चक्रावला. इतके दिवस रजा कशी घेणार ? पियू एकटी इकडे तिकडे कशी रहाणार ? हे असे किती दिवस चालणार ? शेवटी रात्री त्याने घरतल्यानशी चर्चा करण्याचे पियूला आश्वासन दिले. काहीतरी मार्ग निघेल या विचारानी पियू सुखावली.

   रात्री सगळे एकत्र जेवायला बसले असताना साहिलने हा विषय काढला. विषयाची गंभीरता सांगितली. तसे सगळे आश्चर्यचकित झाले. प्रत्येकाची प्रतिक्रिया त्यांच्या स्वभावानुरूप बाहेर पडली. सासुबाईनी मायेने, काळजीने पहिले. सासऱ्यांच्या भुवया उंचावल्या. समीहनने लाडकी वहिनी दूर जाईल म्हणून नाराजी व्यक्त केली, पण पियू आता माणसांच्या विश्वाबाहेर पाऊल ठेऊ बघतीये म्हंटल्यावर थोडे दिवस तिच्या मनासारखं करायचं ठरलं. सासुबाईनी आपलं कुलदेवत व्यदेशवर, गुहागरला जाऊन रहाता येईल असे सुचवले. ते सगळ्यांच्याच परिचयाचे असल्याने या विचारावर आनंदाने सिककमोर्तब झाले. तिथले गुरुजी म्हणजे घरचं कुटुंब असल्यासारखच होतं. मनाला वाटेल तितके दिवस पियू तिथे राहू शकणार होती. दोन तासांच्या अंतरावर गुहागर असल्यामुळे काळजी करण्याचं कारण नव्हतं. प्रश्न सुटलेला पाहून सगळ्यानाच आनंद झाला. पियू तर आनंदाने हरखून गेली. शांतता, सुरक्षितता, सृष्टी सोंदर्य, एकांत असे कितीतरी पेलू तिला एकाच ओंजळीत मिळणार होते. रात्री साहिलच्या कुशीत शिरताना एका अमर्याद प्रेमाच्या अंतराळात ती तरंगत होती. शब्दविना त्या अंतराळचा हलकेपणा तिच्या जाणिवेच्या बाहेर होता.

      लवकरच सगळी ठरवाठरवी झाली. गुरुजीना फोन करून सगळी कल्पना दिली गेली. गुरुजींच्या कुळगारात एका टोकाला शांत निवांत दोन खोल्या होत्या. तिथे पियूची सोय करायचे ठरले. जेवणाचा, नष्टयचा डबा गुरुजीच्या घरून येणार होता. पियूच्या खोलीत इंडक्शन ठेवून दूध, चहा तिला पाहिजे तेव्हा तिचा तिला करून घेता येणार होता. पियूची इछा असेल तर रात्री सोबत झोपायला गुरुजींची आई किवा बायको येऊ शकणार होती. एकांत सुखाचं माप पियूच्या पुढ्यात अलगद येऊन ठेपलं.

    शनिवार रविवार साहिलाला सुट्टी असायची. त्याला जोडून एक दिवस त्याने सुट्टी घेतली. पियूची सगळी सोय लावून तो वापस येणार होता. तिने सध्यातरी आठ दहा दिवसच राहीन असे सांगितले असल्यामुळे कुणाला काळजी लागली नाही. जगावेगळ्या डोहळ्याचे संगळ्यानाच कौतुक वाटले.

   गावाला जायच्या बॅगा तिने व सासुबाईनी रात्रीच नीट भरून ठेवल्या होत्या. सासरे शंभर सूचना देत होते. समीहन वहिनी भोवती घोटाळत आतबाहेर करत होता. पियूला त्या ममतेच्या सागरात गटांगळ्या खात असल्यासारखं जाणवू लागलं. तिची तगमग झाली. या आसक्ती शिवायचं जग तिला का हवं होतं ? ते तिलाही कळत नव्हतं. उदरातली तेजाची शलाका, तिला विस्तारीत होण्यासाठी वेराग्य मागत होती. ते पुरवायला भाग पाडत होती. अशा प्रकारचं जीवन तिनी कधी कलपिलेल सुद्धा नव्हतं. लहानपणापासून आई, आजी, ताईचा पदर धरून तिने तारुण्यात प्रवेश केला होता आणि नंतर सर्वानी अलगद साहिल आणि सासूबाईंच्या सुपूर्द तिला केली होती. एकांतच्या विचारनी पियूला मधेच दडपण येत होतं. पण ठीक आहे. थोडे दिवस राहून बघू, नाहीतर वापस येऊ. इथेच तर आहे घर. अशी स्वतची समजूत घालून या दिव्याला ती तयार झाली होती. एका वेगळ्या मानव विरहित विश्वाची तिला ओढ लागली.

    शनिवारी सकाळी सगळं आवरून, सासू सासऱ्यांचा आशिर्वाद घेऊन पियू निघाली. कारच्या काचा अर्धवट खाली करून सकाळच्या ताज्या हवेचा तिनी मनभरून दीर्घ श्वास घेतला. चेतन्याची लहर हळुवारतेने तेजाच्या शलकेला स्पर्शून गेली. ती हलली, डुलली, आनंदली. आत्म्याच्या गाभ्यापर्यन्त सुखावली. साहिल ते दृश्य अनोख्या नजरेने पहात होता. निसर्ग धर्माप्रमाणे त्याचे काम करून तो  झाला  होता. पण पियू तर आता क्षण न क्षण त्या तेजामधे जगणार होती. अनंतकाळपर्यंत. तो क्षणभर उद्विग्न झाला. पियूच्या नात्याचे बंध अजूनतरी त्याच्या पुरतेच होते. पण ती मात्र एका वेगळ्याच विश्वात विहरत होती. त्याला त्या विश्वात प्रवेश नव्हता का ? होता. साहिल मनाशीच म्हणाला. ती अव्यक्त जगात आहे. मी व्यक्त जगात आहे. आम्ही दोघही एकमेकानशिवाय अधुरे आहोत. तिला ते सुख कुणाला तरी वाटावं वाटणारच ना? त्या वाट्यामध्ये फक्त मी समरस होऊ शकतो. आमच्या दोघांच ते जग आहे. व्यक्त अव्यक्त दोन्हीही. पियू साहिलकडे गंधावल्या नजरेने पहात हसली. ज्यात अव्यक्तताची व्यक्तता होती. साहिलने ते अव्यक्त आपल्या नजरेत झेलून त्याच नजरेने आपलं हास्य पाठवलं. तसा परत एक तेजाचा हुंकार उमटला. तो केवळ दोघनमध्ये निनादत होता.

     तरलतेतच गाडी गुहागरला पोहोचली. व्ययदेशवरचं दर्शन घेऊन गाडी देवीच्या मंदिराच्या दिशेने वळली. रस्तयानलगत डुलणाऱ्या माडांमधून जात गुरुजींच्या घरापाशी थांबली. उत्साहाने त्यांच सगळं कुटुंब स्वागताला बाहेर आलं. पियू आधी देवीच्या दर्शनाला येऊन गेली होती. पण गुरुजींच्या घरी यायचा योग आला नव्हता. अंगणातच फुललेल्या फुलझाडानी तिच्याशी लगेच नातं जोडलं. जाई जुई, सोनटक्कयांच्या पांढऱ्या रंगावर अबोली, जास्वंद, गुलाब, तुळशी वृंदवनापाशी काढलेल्या रेखीव रांगोळीने एक मांगल्य साकारले होते. टुमदार कौलारू घराभोवती आंबे, केळी, पपया, चिक्कू, अननस, माड, पोफळीनची झाडं जणू कुंपण घालून उभे होते.

    “ अग चल घरात इथेच किती वेळ उभी रहाणार आहेस ?” असं म्हणत आजीनी तिचा हात धरून आत नेलं. हव्यअशया वातावरणाने सुखावलेली तेजाची शलाका पोटामध्ये गोड हसत होती. ते हास्य पियूच्या चेहेऱ्यावर उमटत होतं. सुनीताकाकूनी पुढे केलेली पोह्याची बशी हातात घेऊन ती त्यांच्याकडे बघून छान हसली. त्यानीही हसून म्हंटले “ आरामात खा हो बाळा. अजून लागले तर मागून घे. मी चहा घेऊन येते.” पोहयानवरची रंगसगती तिला सुखाऊन गेली. पिवळ्या धमक पोहयानवर हिरवी कोथिंबीर पेरून त्यावर शुभ्र नारळाचा खव, खमंग वासाने खुणावत होता. रसरशीत लिंबाच्या फोडीने क्षुधा अजूनच ललचावली. पोह्याच्या चवीत तृप्ततेने ती बुडून गेली. आपण कुणाशी फारसं बोलत नाहीये हे एकदम तिच्या लक्षात आलं. मग जरा वरमून तिने बोलायला सुरवात केली. थोडे दिवस हेच तिचे सखे सोबती असणार होते.

    खाणे पिणे झाल्यावर जिथे रहायची सोय केळी होती तिथे जाण्यासाठी सगळे निघाले. दुरवरून नजरेच्या टप्प्यात त्या खोल्या दिसत होत्या. गुरुजी सांगत होते “ खरं तर फार्म हाऊस बांधायचं होतं पण जरा अडचण आल्याने सध्या दोनच खोल्या बांधल्या.” पांढऱ्या रंगावर झळाळती केशरी रेखा त्या घराला उठाव देत होती. कुलूप काढून सगळे आत आले. सर्व सोईनी युक्त अशा त्या खोल्या पाहून साहिल सुखावला. पियू मात्र आपल्यातच दंग होती. भिंती बाहेरचं जग तिला खुणावत होतं. पण इतक्यात असा उतावळेपणा न करता धीर धरत गुरुजीं जवळ खोल्याचं कौतुक केलं. साहिलाल पसंतीची पावती दिली गुरुजींच्या मुलानी तिला इंटरकोम दाखवला. कशचीही गरज पडली तर पटकन त्यांच्या घरी संपर्क साधता येणार होता. गाडीतले सामान आत ठेऊन सगळ्या सोई समजावून गुरुजी व मुलं निघून गेली.

    साहिल आणि पियूने सामान लावण्याचे काम सुरू केले. आतल्या रूमला लागून एक छोटेखानी सवेपाकघर होतं. तिथे एक कपाट व फ्रीजची सोय केली होती. ओट्यावर इंडक्शन ठेऊन बरोबर आणलेले खाद्यपदार्थ, चहा कॉफी कोको साखरेचे डबे तिने कपाटात ठेवून दिले. फळं फ्रिजमध्ये ठेवली. बाहेरच्या खोलीत साहिल बॅग मधले कपडे कपाटात रचून ठेवत होता. डबलबेडवर घरची चादर अंथरल्यावर स्वतच्या घरचा फील आलेला पाहून दोघनाही छान वाटले. गिजर ऑन करून दोघनीही आंघोळी केल्या व प्रवासाचा शीण घालवला. तोपर्यंत गुरुजींच जेवायचं बोलवणं आलं. हवं नको असलेल्या सुनेच कौतुक सगळेच करत होते. जेवण झाल्यावर दोघयाणी रूमवर येऊन आराम केला. साडेपाच वाजता निरंजन त्यांना समुद्रावर घेऊन जायला आला.

     तिघही लगतच्या वाडीमधून लाल, वळणावळणाच्या पायवाटेने समुद्राच्या दिशेने चालू लागले. साहिल निरंजन काहीतरी बोलत पुढे चालत होते. पियू रांगेने लावलेल्या माडांच्या आणि पोफळीनच्या झाडाकडे बघत जात होती. कातरलेल्या पानांच्या जाळीतून उतरणीचं ऊन पडून कालिपीवळी हलती नक्षी झुलत होती. कातरलेल्या पानांच्या खाली कितीतरी पोपटी हिरवी शहाळी व शेंदरी पोफळी लटकवलेली पाहून त्यांच्या गर्भाच्या श्रीमंतीचं तेज ती आसुसलेल्या नजरेने पाहू लागली. किती सहजतेने इतके पिंड पोसत ती झाडं आनंदाने विहरत होती . त्या जडपणातही अंगाखांद्यावर बसलेल्या पक्षांवरही तेव्हढीच माया ती झाडं करत होती. जीवनरस निर्मितीचे अखंड कार्य अव्याहतपणे चालू होते. पियूचे हात नकळत माडना स्पर्श करू लागले. खोडाच्या आत त्या माडचं पुर्ण नांदत घर उभं होतं. उत्पती स्थिति लयीची तलबद्धता तिला जणू आरपार दिसू लागली.

    पियूला अशी उभी पाहून दोघं तिच्याकडे धावत आले. त्या बहयास्पर्शाने तिची अंतरदृष्टी लुप्त झाली. खोडाच्या बाह्य भिंती परत समोर उभ्या ठकल्या. मग त्यांच्या बरोबर ती चालू लागली. काही मिनिटातच समुद्राची गाज कानी पडू लागली. हळूहळू आवाज वाढत त्याचा कल्लोळ झाला आणि समोर समुद्राच खेळतं पाणी आधी दृष्टीला मग पायाला स्पर्शू लागलं. झाडावरची गूढता, अथांग लाटांचं खळाळतं जीवन यांची सांगड घालत पियू वाळूवर बसली. तिला जाणवू लागलं आपल्याही उदरातल्या समुद्रात एका शिंपल्यामध्ये मोती तयार होत आहे. सृष्टीचं एकत्व तिला सर्वत्र भासू लागलं. आकाशतला रंगाचा खेळ सगळ्या सृष्टीवर खेळून गेला तसे तिघेही घरी जाण्यासाठी निघाले. पियूला अजूनही आपल्यातल्या बदलाचं कोडं वाटत होतं. सृष्टीचक्रातल्या सुक्ष्म जाणिवानी ती चकित होत होती. आतापर्यंत आपल्याला हे लक्षात कसं नाही आलं ? या विचारानी मजा वाटत होती.

    रात्रीचं सावट त्या कुळगराला शांततेत बुडवून गंभीरता देऊन गेलं. रात्रीच्या काळ्या आकाशामध्ये चमकणाऱ्या चांदण्या, कातरलेल्या पानांच्या जाळीतून मधूनच चमकून जात होता. रात्रीच्या गडदपणा बरोबर साहिलला चिंता वाटू लागली. ही कशी इथे एकटी रहाणार ? पण पियू अवघ्या सृष्टीशी एकरूप होऊन तदात्म पावत होती. त्यामुळे मानवी भावभवनांचा वारा तिच्या मनापर्यंत पोहोचत नव्हता. आपल्या बरोबर साहिल आहे हे ही कधी कधी तिच्या लक्षात  अलगद येत नव्हते. थकलेले जीव अलगद झोपेच्या स्वाधीन झाले.

    पहाटे पियूच्या पापण्यांवरून झोप हळुवारतेने बाजूला झाली आणि रोज उगवणारा पण नित्य नूतनता घेऊन येणारा दिवस उजाडला. भल्या पहाटेचा अर्ध काळोखभरा आकाशाचा स्पर्श डोळ्याला स्पर्शून सुखसवेदन देऊन गेला. हलकेच जाणिवा स्पष्ट होत होत नवीन धागा विणला गेला. आपण जेव्हा उठतो, तेव्हा क्षणभर रोज नव्या जगाशी तदात्म पावलेलं, नव्याने भेटलेलं जग किती सुंदर भासतं. त्यात कुठलेही भाव नसतात. असते ती फक्त निर्मम शांतता. जणू पृथ्वीच्या उत्पतीपासून लयापर्यंत पसरलेली असते, आणि आपण त्यात डुबकी मारून त्याचाच भाग होऊन जातो. शांततेचा. हे सगळे मनाचे खेळ की सत्य ? जे आपण अनुभवलेलं असते ते स्विकारत नाही. मनाच्या कल्पना म्हणून सोडून देतो. पण खरं तर त्याच सत्य असतात. काय असतं त्या हवेत ? जे आपलं तनमन वेगळ्या विश्वात घेऊन जायला कारणीभूत होतात. माणसांच्या दुसऱ्या प्रकारच्या उरजांचा रात्रीतउन सृष्टीने नाश केलेला असतो आणि पहाटवाऱ्याबरोबर उरतो केवळ सात्विक उर्जेचा प्रवाह. जो चांगल्या विचाराना गती देतो. आरोग्याला गती देतो. सुखद गार वाऱ्याच्या झुळकनी भारावून जाऊन आपले डोळेही नकळत मिटतात. जणू ती शुद्ध ऊर्जा नसानसातून खेळवली जाऊन ते अंगभर खेळलेलं सुख मनाला विश्वाच्या चोथ्या कप्प्यात पोहोचवतं. तिथे कुठलेही तरंग नसतात. जडत्वाचा आभास नसतो. विकारहीन शुद्धतवाचा तो क्षण देऊन जणू तिथे ईश्वरीय अस्तित्व कवेत घेते आणि मग चालू होतं सृष्टीचक्र. एका क्षणात आपण हे सगळं समजून घेतलेलं असतं.

     मनाचा पुढचा टप्पा सुरू होतो. दृष्टीला दिसणारा सौदऱ्याचा टप्पा. काळसर आकाश निळ्याशार रंगात परिवर्तीत होताना कितीतरी गोष्टी घडत जातात. दिशा हळूहळू उजळायला लागतात. पक्षांचा थवा उडताना दिसू लागतो. पूर्वाणचलवर सूर्य येत चालल्याच्या रंगखुणा ढगावरून विखरून चमकत असतात. सूर्यकिरण हळूहळू पसरून जणू सृष्टीला चालना देतात. कोवळ्या पिवळसर उन्हाच्या शिडकाव्याने सारी सृष्टी आनंदते. फुलांच्या उमलणाऱ्या पाकळ्यांमधून सुगंधाची लयलूट उधळली जाते. झाडांच्या पानावर चमकणारी किरणे किवा फांद्यावरून तिरप्या रेषेत पसरलेल्या सूर्यकिरणांकडे पाहून एका तेजोमय दुनियेचे आपण साक्षी होतो. त्या तेजात नहातो. वहातो. दृशाचा प्रवास सगुणतेकडे तर त्यातील सुगंधाचा प्रवास निर्गुणतेकडे घेऊन जातो.

     हे सगळं अनुभवत असताना अचानक एक ओळखीचा सुगंध येऊन भेटतो. आधी कळत नाही पण नंतर लक्षात येतं हा तर वर्षानुवर्षांचा सोबती आहे. वसंताच्या आगमनाची नवीन सुरवात करून देणारा रुतू चहू अंगानी फुललेला असतो. झाडं जणू दोन रंगात डोलत असतात. नवीन फुटलेली पोपटी पालवी आणि परोधावस्थेतली गर्द हिरवी पानं. निसर्गाच्या या कुंचल्यावर कडुळीमबचा, शिशिरची फुलं, आंब्याचा मोहर या सर्वांचा परिमल दाटलेला असतो, आणि मग जाणवून येतं सृष्टी पण या नूतन्याचे स्वागत करत आहे.

     कसं आहे हे चक्र ? हे चक्र घडून आल्यावर फळं, धान्य या रुपातून ते आपल्यात उतरतं. तिथे ते फळणार फुलणार. काहींचा काळ क्षणांचा, काहींचा वर्षांचा. मग ते मातीशी समरस होऊन परत सृष्टी चक्राचा भाग बनणार. प्रत्येकाला आपापले कार्य नियतीने आखून दिलेले आहे त्याप्रमाणे होणार. घडणार. अगदी आताच्या वानव्यातही पुढील सृजनाची तयारी असते. तुम्ही त्या चक्राचा फक्त एक अंश असता. पण त्या अंशाला मिळालेल्या भवभवनांच्या देणगीमुळे अंश हा एक मुख्य वाटायला लागतो, आणि त्याचा स्व मोठा होऊन पुर्ण सृष्टीभर मी उरतो. त्याच्यापुढे सर्व जग फिके पडते.

    पियूला जाणवत होते, ती तेजाची शलाका आपल्या फक्त उदरापूरती मर्यादित राहिलेली नसून साऱ्या सृष्टीभर अंकुरत, बहरत चालली आहे. तिचे स्फुल्लिंग सूर्य ताऱ्यामधून चमकत आहे. तिच्या स्पर्शाने फलफुलयांमधून जीवनरस वहातो आहे. सर्वत्र चेतन्य. चेतन्य. आदी काळापासून अनंतपर्यंत. हळूहळू सृष्टी त्यात विलीन झाली, आणि उरलं फक्त एक स्पंदन. जे तिच्या उदरातून विहरत होतं. ती भानावर आली. ज्या तेज शलाकेने एव्हढं गूढ ज्ञान तिला दिलं त्या जीवाचं संगोपनाचं कार्य तिच्या हाती सोपवलं त्या तेजाला कवटाळून ती चालू लागली जीवनाकडे. तिला नेमून दिलेल्या कामाकडे. नक्कीच आपल्या पुढील आयुष्याचा या क्षणांशी संबध असणार. नियती तिच्या ठरलेल्या वेळी ते गूढ उलगडणार. तोपर्यंत जी समोर वाट उलगडत जाईल तसे जायचे. जीवनाशी समरस व्हायचे. सृष्टी चक्र उलगडत असताना तिला जाणवलं आता आपली एकांताची ओढ एकदम कमी झाली आहे. त्या तेजाच्या शलाकेला जे सांगायचं होतं ते सांगून झालं आहे. आता ते ज्ञान जागृत ठेऊन परत संसाऱ्यातल्या भोगा उपभोगांकडे तिने परतण्याची इछा दर्शवली आहे.

   साहिल बरोबर चार दिवस राहून पियूही परत येत आहे हे कळाल्यावर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. अव्यक्तींच्या लेणीयणी भरलेली पियू मात्र फक्त समोर उलगडलेली वाट चालणार होती.

                                                                    ...................................................

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED