Satva Pariksha - 12 books and stories free download online pdf in Marathi

सत्व परीक्षा - भाग १२

दोघेही एका हॉटेल मध्ये गेले. संध्याकाळी ची वेळ होती. म्हणून हॉटेल मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. दोघे कॉर्नर चा
टेबल बघून बसले. आशुतोष ने कॉफी आणि वडा सांबार मागवले.
अनिकेत, " बोल रे काय बोलायचं आहे. "

आशुतोष, " अनिकेत तुला माझा स्वभाव माहिती च आहे. जे आहे ते स्पष्ट च बोलतो. मला तुझ्या मामची मुलगी आवडली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. "

अनिकेत, " ते तर माझ्या कालच लक्षात आलं होतं. "

आशुतोष, " मी माझ्या घरच्यांशी बोलून घेतलं आहे. ते मुलगी बघायचा कार्यक्रम करु म्हणत आहेत. तु माझं प्रपोजल तिच्या घरी सांगशील का? ते हो म्हणाले तर पुढच्या कार्यक्रम करु या. तुला काय वाटतं?

अनिकेत, " चालेल मामा शी बोलून घेतो. "

आशुतोष, " ओके".

अनिकेत, " बाय, मी कळवतो तुला."

आशुतोष, " बाय"
दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन निघाले. घरी आल्यावर त्याने ही गोष्ट मावशी, काकांना सांगितले. काकांनी मग मामा मामीला बोलावून घेतले. थोड्यावेळाने मामा मामी आले. काकांनी त्याला आशुतोष बद्दल सांगितले.

काका, " अनिकेत चा मित्र आहे आशुतोष पाटील त्याला आपली मिनाक्षी फार आवडली आहे. काल साखरपुड्यात त्याने तिला बघितले. तर लग्नासाठी त्याने तिला मागणी घातली आहे. तुमची परवानगी असेल तर त्याला बघण्याचा कार्यक्रम करायचा होता. तुमचं काय म्हणणं आहे. ".

मामा नी मामी ला विचारले. " काय करायचे तुला काय वाटतं? "

मामी, " मला वाटतं आपण मुलगा बघुया. म्हणजे च बघण्याचा कार्यक्रम करु. "

मामा, " पुढच्या गुरुवारी बघण्याचा कार्यक्रम करु. "

सगळे जण म्हणाले, " ठिक आहे. "

अनिकेत ने आशुतोष ला फोन केला.
"पुढच्या गुरुवारी बघण्याचा कार्यक्रम करायचे ठरले आहे. ते सांगितले. "

आशुतोष, " ठिक आहे. संध्याकाळी ७ वाजता भेटू. "

आता पुढच्या गुरुवारी बघण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिनाक्षी ला पण आशुतोष आवडला होता.
मिनाक्षी अनिकेत च्या मावशी ला म्हणजे च तिच्या आत्याला भेटायला आली.

मावशी, " अगं मीना तू कशी काय वाट चुकलीस. "
मावशी मिनाक्षी ची मस्करी करत म्हणाली.

मिनाक्षी, " काय गं आतू, तू पण ना. मी अशी च आली होते. . "

मावशी, " हो का? "

मिनाक्षी, " अगं खर तर मी तुलाच भेटायला आले होते.

मावशी,"काय ग आज माझ्या कडे काय काम काढलस ? "

मिनाक्षी, " काही नाही गं. ते पप्पा मम्मी बोलत होते की अनिकेत च्या मित्राचं मागणं आलं आहे माझ्या साठी.

मावशी," हो अगं अनिकेत म्हणत होता तसं .‌पण तुझा नकार असेल तर नाही सांगू त्याला."

मिनाक्षी," अगं पण मी कुठे नाही म्हणाले ." असं बोलून मिनाक्षी ने जीभ चावली.

मावशी," काय गं तू पण बघितलेस वाटते त्याला साखरपुड्यात "

मिनाक्षी," नाही,असं काही ‌नाही बघितलं होतं ओझरतं . अनिकेत ने सांगितले का त्याच्या मित्राला?"

मावशी," कशाबद्दल बोलते आहेस तू? " मावशीने काही कळलेच नाही असा आव‌‌ आणत विचारले.

मिनाक्षी," अगं दाखवण्याच्या कार्यक्रमाबद्दल. "

मावशी," अच्छा अगं ते होय, गुरुवारी ते येणार आहेत तुला बघायला .‌तसं मुलाला तू पसंत आहेस. पण त्यांच्या घरच्यांना तुला बघायचं आहे म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे."

मिनाक्षी,"ओके."

मावशी," खरं सांग ,तुला पण तो आवडला आहे ना.

मिनाक्षी," हो गं आत्या . मला आवडला आहे तो."

मावशी," मिनाक्षी तिकडे गेल्यावर शाहण्यासारख वाग हा. सगळ्याच गोष्टी तुझ्या त्यांना आवडणार नाहीत, आणि तुला पण त्यांच्या काही गोष्टी आवडणार नाहीत. पण आता ते तुझे होणार आहेत. ते घर ती माणसं त्यांचे नातेवाईक सारे काही आता तुझे होणार आहे. त्यांच्या काही चुका होतील.त्या नजरेआड करायला शीक.
मौनम सर्वार्थ साधनम.‌शक्यतो शांत राहायचा प्रयत्न कर.‌शांतीने बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. समोरची व्यक्ती जेव्हा रागात असते ना तेव्हा तिला किती ही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी ते समजून घेत नाहीत.‌कारण त्याच्या डोक्यात राग असतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की‌ आपलं म्हणणं मांडायचा नाही.‌आपलं म्हणणं आपण तेव्हा शांत असतील तेव्हा सांगायचे.
रागात असताना आपण किती ही सांगितले तरी त्याला पटत नाही आणि पटले तरी ते तसं दाखवत नाहीत. त्यामुळे डोकं जेवढं शांत ठेवता येईल तेवढं ठेवायचं"

मिनाक्षी,"ओके आतू मी नक्की प्रयत्न करेन."




आत्या भाची चं नातं तुम्हाला कसं वाटलं ? ते तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा.
हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED