injury books and stories free download online pdf in Marathi

जखम

मनोगत

जखम नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. या कादंबरीत एकूणच विद्यार्थ्यांच्या जीवनावर केलेलं चिंतन आहे. यात विद्यार्थ्यांच्याच हिताचे काही लेख नाही तर इतरही लेख आहेत. परंतू ते जरी असले तरी केंद्रस्थानी विद्यार्थी ठेवूनच लिहिलेली कादंबरी आहे.
ही कादंबरी लिहिण्याचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे. त्यासाठी सरकारच्या काही ध्येय धोरणावरही मी ताशेरे ओढलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की मी सरकारी ध्येय धोरणाच्या विरोधात आहे. परंतू शिक्षणाचं उद्दीष्ट राबवितांना सरकारचं काय चूकतं यावर मी या कादंबरी रुपानं प्रकाश टाकलेला आहे. व्यतिरीक्त काही उपायही सूचवले आहेत. या कादंबरीतून विद्यार्थ्यांना कसे शिकवावे? मुलांना शाळेत का पाठवावे? शाळेनं काय करायला हवं? मुख्याध्यापकाला कसं वागवावं? बालसुरक्षा म्हणजे काय? याशिवाय इतरही काही गोष्टी आहेत. जसे. पुरुषांना स्वतंत्र्यता आहे काय? पती पत्नीनं एकमेकांवर प्रेम करावं. शिक्षणाची उलटी गंगा इत्यादी. आपण ती वाचावी, बोध घ्यावा व त्यातून मुलांना शिकवावे. एवढेच यातून सांगणे आहे. कारण निरक्षरता ही रक्ताळलेल्या जखमेसारखी असते आणि ही वस्तूस्थिती आहे.
मुख्य म्हणजे हे लेख लिहून एक कादंबरी हातात देणे हा माझा उद्देश होता. माझ्यावर या काळात कामाचा ताण व अपूरा वेळ होता. तरीही मुळ उद्देश होतं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. यामुळं ते साध्य करण्यासाठी मी लेखाच्या स्वरुपात कादंबरी लिहिली व माझा हेतू साध्य केला. आपण माझे हे लेख कादंबरी स्वरुपात वाचावी. समजून घ्यावे. बोध घेता येईल तर घ्यावा. नाहीतर सोडून द्यावा. एवढंच माझं मागणंं आहे. कादंबरी थोडी कंटाळवाणी झाली आहे हे विशेष. तरीही वाचून प्रतिक्रिया कळवावी ही विनंती.
आपला
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०




जखम कादंबरी
अंकुश शिंगाडे



महेश ग्रामीण भागात राहणारा मुलगा. तो बरेच शिकला होता. परंतू तो अत्यंत गरीब होता. तसं पाहता एका एका घरी कमी शिकलेले बरेच तरुण होते त्याच्या सोबतचे. ज्यांना मोठी नोकरी होती. कारण त्यांच्याजवळ नोकरीला देणगी म्हणून भरायला भरपूर पैसे होते. ते देणगीच्या भरवशावर नोकरीला लागले होते. परंतू महेश अद्यापही नोकरीला लागला नव्हता. अशातच एक नोकरी त्याला चालून आली व तो नोकरीला लागला. तो आता शिक्षक बनला होता.
संगीता त्याची मैत्रीण होती शाळकरी जीवनातील. त्याचं संगीतावर निरतीशय प्रेम होतं. शाळेपासूनच तो तिच्यावर प्रेम करीत होता आणि तिही त्याचेवरील प्रेम करीत होती निरतीशयच. ती काही जास्त शिकली नव्हती. परंतू तिनंच सांभाळून नेलं होतं त्याला. वेळोवेळी तो जेव्हा जेव्हा चिंताग्रस्त असायचा शाळेच्या कामानंतर. तेव्हा तीच संगीता त्याला उत्साहीत करायची व कोणतेही कार्य करायला प्रेरणा द्यायची. आज ती जगात नव्हती. परंतू तिचं प्रेम आजही समाप्त झालं नव्हतं. ते वसंताच्या पालवीगत मरणानंतरही नित्यनेमानं उफाळून येत होतं.
संगीता काही त्याच्या जातीची नव्हती. परंतू तिचा प्रेमविवाह होता तो. त्या विवाहाला पारिवारीक विरोधही होता. परंतू त्याची पर्वा न करता त्यानं विवाह केला होता तिच्याशी अन् तिही त्याच्या परिक्षेत खरी उतरली होती.
तसं ते मुख्याध्यापक पदाचं शेवटचं वर्ष होतं. त्याच वर्षी तिचा कोरोनानं मृत्यू झाला होता. तो मात्र वाचला होता. तिच्या आठवणी उराशी घेवून. त्या आठवणीच काढत काढत तो जगत होता.
त्यानं बरेच स्वप्न पाहिले होते तिच्यासोबत फिरण्याचे. वाटत होतं की आपणही निवृत्त झाल्यावर तिला फिरवू. परंतू स्वप्न ते स्वप्नच उरले होते. आज ती गेल्यानंतर त्याला तो मुख्याध्यापक पद प्राप्तीनंतरचा व शिक्षक बनल्यानंतरचा खडतर प्रवास आठवत होता. त्याला आता राहावलं जात नव्हतं.
माय मरो अन् मावशी जगो अशी एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा की आईला काहीच किंमत द्यायची नाही, जरी तिनं जन्म दिला तरी. कारण मावशीला किंमत द्यायची असते. त्याचं कारणंही तसंच आहे. सरकारी नोक-यातील माणसाला सरकार मावशीसारखं वागवत असतं. त्यांना आवश्यकता नसतांनाही त्यांना वेतन व भत्ते देत असतं. याउलट ज्यांना सरकारी नोकरी नाही, त्यांना सरकार आईसारखं वागवत असतं. जिला जास्त घरादारात सन्मान नसतो. अशीच अवस्था आज सरकारी नोकरीची दिसून येत आहे.
कंसाच्या अत्याचारापासून जनतेला वाचविण्यासाठी क्रिष्णानं जन्म तर घेतला देवकीच्या पोटी. परंतू त्याला त्याची मावशी यशोदेनं पालवलं अगदी आपल्या स्वलेकरासारखं. त्याला कोणत्याही स्वरुपाचं दुःखं होवू दिलं नाही. परंतू त्यावेळी अशी म्हण नव्हती 'माय मरो अन् मावशी जगो'. परंतू ज्यावेळी कलिकाळ आला आणि माणसामाणसात साहजीकच स्वार्थ शिरला. तेव्हाच ही म्हण आली असावी आणि ही म्हण प्रतिष्ठीत नवरोबांनी आणली असावी असे वाटते, असो. तो गंमतीचा भाग आहे. मुख्य म्हणजे सरकारी नोक-यांचीही स्थिती अशीच आहे.
आजच्या सरकारी नोक-या जर पाहिल्या तर ज्याला खरंच नोकरीची नितांत गरज आहे. त्याला मिळत नाहीत. ज्याच्या घरी शिकलेले भरपूर आहेत. परंतू साधं चांगलंसं घर नाही. ज्याच्याकडे पैसा नव्हताच शिक्षणासाठी. तरीही तो शिकला. त्याच्या शिक्षणासाठी मायबापानं राब राब राबून कष्ट घेतले. जो खरंच हुशार आहे व ज्याच्या गुणांची त्याच्या देशाला खरंच गरज आहे. ज्यांच्याकडे शिक्षण आहे, परंतू पैसा अजिबात नाही. अशांना नोक-या मिळत नाही. कारण आजच्या काळात नोक-या गुणानं नाही तर वशीलतेबाजीनं व पैशानं मिळतात.
नोक-या कुणाला मिळतात? याचा जर विचार केला तर असे आढळून येईल की नोक-या ज्यांची चांगली ओळख आहे एखाद्या संस्थेशी किंवा सरकारी माणसाशी. ज्याला नियुक्तीचे अधिकार आहेत व जो नोकरदारांची निवड करु शकतो. जो नातेवाईक आहे एखाद्या सरकारी माणसांचा किंवा संस्थेचा. जो नियुक्ती करु शकतो. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे.
म्हणतात ना की पैसे वाल्यांच्या घरी पैसा जातो. अगदी तसंच आहे नोकरीचं. नोक-याही अलिकडे नोकरीवाल्यांच्याच घरी जातात.
डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. परंतू त्यापुर्वीच सांगीतलं की जुने कामधंदे सोडा. त्यात काही तथ्य नाही. मग काही लोकांनी खरंच परंपरागत कामधंदे सोडले व ते नवीन कामधंदे करु लागले. काहींनी सोडले नाही. कारण त्या धंद्यात पैसे दिसत होते. आजही तिच परिस्थिती आहे. लोकं सरकारी नोक-याच सोडायला तयार नाहीत. कारण त्यात भरपूर पैसा आहे. उलट ते म्हणतात की शेती करणा-यांनी शेती करावी. म्हणजे त्यांचं चांगलं पावेल की नाही. जर शेतक-यांचा मुलगा शिकलाच नाही आणि शेतीच करायला लागला तर नोकरीवाल्यांच्या रांगेत स्पर्धकच राहणार नाही. त्यांना साहजीकच सरकारी नोक-या मिळतील. हेच गणित जुळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न. म्हणूनच सरकारही खाजगीकरणाकडं वळलंय. त्यात त्यांचं काय चुकते. ज्यांच्यात दम असेल, त्यांनी मिळवा पैसा. कोणी इंजिनीयर बना, कोणी डॉक्टर. परंतू याही ठिकाणी समस्या आहेत. ज्यांच्याकडे अतोनात पैसा. तोच आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनीयर बनवणार. कारण त्यासारखे अभ्यासक्रम शिकवितांना भरपूर पैसा लागतो. जो पैसा गरिबांजवळ नसतो.
आज सरकारी नोकरी कोणाकडे आहे? याची जर तपासणी केली तर सत्तर प्रतिशत लोकं हे त्यांच्या मागील काळात सरकारी नोकरी असलेले आढळतील वा त्यांच्याजवळ भरपूर शेतजमीन वा मोठमोठ्या इमारती व भरपूर प्रमाणात त्यांच्याजवळ पैसा असलेला आढळेल. गरीब, लाचार वव दारिद्ररेषेखालील ब-याच लोकांना कालही नोक-या नव्हत्या. आजही नोक-या नाहीत. त्यांचीच अवस्था माय मरो अन् मावशी जगो अशा स्वरुपाची झालेली आहे.
विशेष सांगायचं म्हणजे त्यांना कशाला हव्या सरकारी नोक-या. ज्यांच्या घरी खायला प्यायला भरपूर आहे. अर्थात भरपूर पैसा आहे. भरपूर शेतजमीन आहे व मोठ्या टोलेजंग इमारती आहेत. जे लाखो रुपये डोनेशन देत असतात. सरकारी नोक-याच द्यायच्या असेल तर सर्वेक्षण करावं. सर्वेक्षणात आवेदनपत्र मागवू नये. कारण आवेदनपत्रात लोकं खोटेनाटे कागदपत्रे सादर करुन ते गरीब असल्याचे सिद्ध करतात. जसे राशनचं धान्य मिळवीत असतांना होते. राशनचं धान्य ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत, मोठमोठ्या इमारती आहेत. त्यांना मिळतं. कारण ते स्वतः अधिका-यांना मैनेज करुन एपीएल व बीपीएल मध्ये नाव दाखल करतात. घरोघरी जावून सर्वेक्षण होत नाही. आज ते राशनचं धान्य ज्यांना घर नाही. ज्यांच्याजवळ मोठमोठ्या इमारती नाहीत. त्यांना प्रसंगी मिळत नाही. कारण त्यांच्याजवळ राशनचं कार्डच नाही व ते कसं बनवावं तेही समजत नाही. खरं तर धान्य त्यांनाच द्यायला हवं. परंतू तसं होत नाही.
सरकारी नोक-या द्यायचेही नियम ठरवावे. सर्वेक्षण करुन सरकारी नोक-या द्याव्यात. ज्यांच्या घरी खरंच शिकलेले आहेत, परंतू ज्यांना खरंच बरोबर घर नाही. अशांना सरकारी नोकरी हमखास द्याव्यात. ज्यांच्या घरी एकही नोकरीला नाही, अशांना सरकारी नोक-या द्याव्यात. ज्यांच्या घरी कोणत्याच गाड्या नाही. अशांना सरकारी नोक-या द्याव्यात. ज्यांच्या घरी दोनच अपत्य आहे. अशांनाच सरकारी नोक-या द्याव्यात.
वरील प्रकारचे निकष ज्याही घरी पूर्ण होत असतील, त्या घरच्या एका व्यक्तीला सरकारी नोक-या हमखास द्याव्यात.
अलिकडे आरक्षण व नोक-या यासाठी बरेच लोक ओरडत आहेत.काही घरात एका एका घरी दोन दोन, चार चार लोकं नोकरीला आहेत. काही ठिकाणी एकही व्यक्ती नोकरीला नाही. समजा हा सरकारी नोकरीचा मुद्दा जर काढला तर ते नेहमी ओरडत असतात की यांच्या काय बापाचं जातं आमच्या घरी दोनचार नोकरीला आहेत तर. नोक-या असतात काही जणांना. परंतू तरीही कोणी अनुकंपाच्या नावावर ओरडतं. कोणी आरक्षणानं वोकरी मिळवू पाहातं तर कोणी धरणग्रस्तही असतो नोकरी मिळविण्यात. नोकरी मिळवीत असतांना सा-यांची ओरड व आंदोलनही. काही लोक नोक-या मिळवून मजा मारतात. अतिरिक्त बराच पैसा नोकरी संबंधानं मिळत असल्यानं माज आल्यासारखे गरीबांची कामं करीत नाही. साध्या सातबा-यासाठी वणवण भटकावं लागतं. ते मात्र पंढरपूर गोव्याच्या यात्रा करीत असतात. यासाठीच ती मंडळी सरकारी नोक-या मिळविण्यासाठी पन्नास पन्नास लाखाच्या वरुन पैसा मोजतात.
सरकारी नोक-यांची अलिकडं वाणवा झाली आहे. कारण सरकारी नोक-या एकाच घरात चारचार लोकांना आहेत. जणू काही या देशातील या सरकारी नोक-या हिसकून घेतल्या जातात. त्या जागेवर योग्य व्यक्तीही बसत नाही. सगळी कामंही रेंगाळत असतात.
सरकारी नोक-या जर वरील निकष विचारात घेवून दिल्या गेल्या तर कोणीच ओरडणार नाहीत. जो नियुक्तीधारक असं सर्वेक्षण बरोबर न कपता त्यानं नियुक्ती केलीच तर त्याचंही पुनर्सर्वेक्षण व्हावं. जेणेकरुन चूकीचं पाऊल कोणी उचलणार नाही. त्यातूनच देशाची चांगली सेवाही होईल व प्रशासनाची कामंही चांगल्याप्रकारे नक्कीच पार पडतील.
आज वरील निकष विचारात न घेता नोक-या मिळत असल्याचे दुष्पपरिणामही दिसत आहेत. सरकारी नोकरदार वेळेवर कार्यालयात हजर मिळत नाही. ते सारखे बाहेरच फिरत असतात. नोक-यांसाठी सतत आंदोलन व ओरड सुरु असते. नोक-यांसाठी वाणवा दिसते. अयोग्य उमेदवार हा त्या जागेवर नियुक्त होवू शकतो. महत्वाचा पैलू म्हणजे गरीब व होतकरु जनतेवर अन्याय होत असतो.
वरील प्रकारचे दुष्परिणाम पाहता सरकारी नोक-या सर्वेक्षणातूनच द्याव्यात. त्यासाठी वरील प्रकारचे निकष पाळावेत. जेणेकरुन कोणावर अन्याय होणार नाही व कोणीही आरडाओरड करणार नाही. व्यक्तिरीक्त एक घर एक नोकरी हे मुल्य राबवावे. तेही त्या घराच्या व वरील निकषाच्या आधीन राहून. तेव्हाच सर्वांना (योग्य व्यक्तींना) नोक-या मिळतील. कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच त्याचा परिणाम म्हणजे देशाचा विकास होईल व निदान सरकारी नोकरीत तरी माय मरो व मावशी जगो अशी अवस्था होणार नाही.

**********************************************

चौदावी झाली होती. महेशला घरी करमत नव्हतं. उदास वाटत होतं तिच्याविणा. आज त्याला ती आठवत होती आणि आठवत होतं त्याला तिनं दिलेलं मार्गदर्शन. ती जर त्याच्या आयुष्यात बालपणात नसती आली तर तो केव्हाचाच शाळाबाह्य झाला असता.
नवीन शैक्षणिक धोरण. विद्यार्थ्यांना मारता येत नव्हतं. रागवताही येत नव्हतं. कारण विद्यार्थ्यांना रागवणे म्हणजे त्यांचा अपमान होत होता. तो खुप परेशान होता. सारखी तिचीच आठवण येत होती त्याला. तो तिच्याशिवाय एक क्षण ही राहू शकत नव्हता. त्याला काय वाटत होतं कुणास ठाऊक. ती आता जगात नव्हती. परंतू तिची आठवण त्याच्या ह्रृदयात घर करुन होती. कालच तिची चौदावीही पार पडली होती.
चौदावी........ त्यानं ती चौदावी अगदी थाटामाटात पार पाडली. कारण तो तिचा घरवाला होता. त्यानं चौदावी पार पाडली कारण तो तिचा नातेवाईक होता. तो तिचा आधारस्तंभ नसला तरी एक प्रेमाचा व्यक्ती होता की ज्याच्या ह्रृदयात ती घर करुन होती. तिनं त्याच्या मनावर राज्य केलं होतं. तिचं नाव होतं संगीता.
संगीता लहानपणापासूनच हुशार स्वभावाची होती. पाहायलाही सुंदर होती. अगदी बारीक बारीक हातापायाची होती. त्यातच सडपातळ. ती सडपातळ असल्यानं सर्वांना खुप आवडायची.
लहानपणी मुलांसोबत अल्लड खेळणं अल्लड बोलणं. त्यातच मुलांसोबत खेळतांना काही अमंगल गोष्टी घडल्याच तर त्याची जाणीव त्या वयात नसायची. परंतू जसजसं तिचं वय वाढत गेलं. तसतसे तिचे संदर्भ बदलले.
महेश नाव होतं त्याचं. महेश वसतीगृहात राहणारा एक मुलगा होता. त्याचे वडील शेतकरी होते. शेतात राबता राबता त्यांची जिंदगी निघून गेली होती. तसं पाहता महेशही अगदी लहानपणापासून शेतात जात असे व शेतात राबत असे. लहानशा त्या वयातच महेश वखरण व नांगरण करण्याचं कसब शिकला होता. त्यातच जर शेतात वखरण नांगरणाचं काम नसेल तर तो रानात जनावरंही चारायचं काम करीत असे.
ती जनावरं रानात चारतांना छान मजा येत असे. परंतू या रानवळ व खेडवळ जीवनात जगण्यात कोणतंच सारस्य नाही असा विचार करुन महेशच्या बाबानं त्याला शहरात वसतीगृहात टाकलं होतं. महेश आता वसतीगृहात शिकत होता त्या बाल्यावस्थेपासूनच.
ती बाल्यावस्था. महेशचे दुधाचे ओठंही नीट सुकले नव्हते असं ते वय. महेश सुखीरामचा एकुलता एक मुलगा. परंतू शिक्षणाचं महत्व समजून सुखीरामनं महेशला शहरात टाकलं. त्याचं कारण होतं शहरातील शिक्षण. सुखीरामला वाटत होतं की गावच्या शाळेत महेशचं मन लागणार नाही. तो अनाडीच राहिल. यामुळं की काय, महेशला सुखीरामनं वसतीगृहात टाकलं.
ते वसतीगृह म्हणजे महेशसाठी एक कैदच होती. त्याला सतत त्याच्या मायबापाची आठवण येत होती. तशीच त्याच्या मायबापालाही त्याची आठवण यायची. त्यातच या वसतीगृहात विद्यार्थी हे अगदी लहानच असल्यानं कोणीही वार्डनच्या विरोधात जात नसत. त्यामुळं फारसं जेवन खावण पोटभर मिळत नव्हतं. त्यातच महेश कमालीचा उपाशी राहायचा व त्याला गाव आठवायचं. त्याचबरोबर गावाला आईनं बनविलेला सुग्रास स्वयंपाक.
आईच्या हाताला विशेष चव होती. ती चव अजुनही महेशच्या जीभेवर रेंगाळत राहायची. त्याचं कारणही तसंच होतं. सर्व जगानं आधुनीक तंत्रज्ञानाचा स्विकार केला होता. परंतू महेशच्या मायबापानं ते तंत्रज्ञान अजुनही स्विकारले नव्हते. ते स्वयंपाक अल्युमिनीअमच्या भांड्यात वा कल्हईच्या भांड्यात करीत नव्हते तर मातीच्या भांड्यात करीत असत.,आज बाकी लोकांजवळ अल्युनिनीअम भांडी असली तरी मातीचे तावे व मातग्या महेशच्या घरी होत्या. त्यामुळं त्यात शिजविलेलं अन्न अगदी छान वाटत असे.
महेश वसतीगृहात राहता राहता शाळेतही जात होता. त्याची शाळा वसतीगृहापाासून काही अंतरावर होती. ती शाळा वसतीगृहाच्या लागून नव्हती. तसा महेश जरी शाळेत जात असला तरी तो कुठे राहतोय? काय खातोय? हे सर्व शाळेतील मुलांना माहित होतं. त्यातच एक दिवस त्याची संगीताची ओळख झाली.
महेशला शाळेत रमत नव्हतं. कारण गावच्या शाळेत त्याची काही काही मित्र शाळाबाह्य ठरली होती. त्याची काही कारणंही होती. त्यांना शिकायचे होते. परंतू परिस्थिती तशी नव्हती. तसा महेश त्याबद्दल विचार करायचा. त्यानं पुढं तिच्याशी विवाह केला आणि तिनं त्याला जीवनभर मदतही केली.

****************************************

आम्हालाही शाळेत घ्याहो अशी आर्त हाक त्या विद्यार्थ्यांची असते. जी मुले शाळेच्या परीसरात फिरत असतात. त्यांना शाळाबाह्य विद्यार्थी म्हणतात. कारण ते शाळेतच येत नाहीत.
शाळाबाह्य विद्यार्थी प्रत्येक शाळेच्या परीसरातच असतात. सरकार असे विद्यार्थी शोधायलाही लावतात. परंतू शिक्षक हे कानाडोळा करुन अशा विद्यार्थ्यांना शोधत नाहीत. हीच वास्तविकता आहे.
नेमके विद्यार्थी शाळाबाह्य का ठरतात? असा विचार केल्यास पुढील कारणं नक्कीच पुढं येत असतात.
ज्या विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई, यापैकी एकजण मरण पावतो. त्यानंतर आई किंवा वडील........जे जीवंत असतात ते दुसरा विवाह करुन मोकळे होतात. ते आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचारच करीत नाहीत. अशा मुलांच्या मानसिकतेवर जबरदस्त धक्का बसतो. त्यांचं शिक्षणात मन रमत नाही. अशी मुलं घरातून तर शाळेत निघतात. परंतू ते शाळेत पोहोचत नाहीत. ती मुलं शाळेच्या परीसरात फिरत असतात. कोणाला भीकही मागत असतात वा कचरा वेचत असतात. कारण अशी मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली असतात.
मुलांना शाळाबाह्य ठरविण्यात दुसरं कारण म्हणजे गरीबी. काही काही पालक हे गरीब असतात. अशावेळी ते पती पत्नी दोघंही कामाला जातात." मात्र त्यांची मुलं ही गावभर फिरत असतात. ते शाळेत जात नाहीत.
पालकाची मानसिकताच बनलेली आहे की मुलगी आणि मुलगा भेद करणे. आजही काही ठिकाणी मुलगा झाल्यानं पेढे वाटले जातात आणि मुलगी झाल्यास अश्रू गाळले जातात. काही ठिकाणी आजही मुलाला वंशाचा दिवा समजत जोपर्यंत मुलगा होत नाही, तोपर्यंत मुली जन्माला घातल्या जातात. काही ठिकाणी यावर पर्याय म्हणून गर्भलिंगनिदान चाचणी आजही केली जाते व मुलगी निघाल्यास तिच्या भ्रृणाची हत्या केली जाते. तसेच मुली असल्यास त्यांना शिकवले जात नाही. तर त्यांना घरी बसवलं जातं. अशावेळी ती मुलगी शाळाबाह्य ठरते.
काही ठिकाणी लोकं अति श्रीमंत असतात. मायबाप त्या घरी दोघंही पैसे कमविण्यासाठी कामाला जातात. मात्र त्यांची मुलं ही शाळेत जात नाही तर ती गावभर फिरत असतात. ही देखील मुलं शाळाबाह्य असतात. हे चौकशी केल्यावर समजतं. हा प्रकार वेळीच लक्षात येतो.
काही काही ठिकाणी पती पत्नींचं पटत नाही. मुलींना पती तिचा ऐकणारा हवा असतो. ती काही दिवस मन मारुन आपल्या पतीच्या घरी तर राहते. त्यातून तिला मुलंही होतात. परंतू समस्या अशी की ती मुलं जसजशी मोठी होतात. तसतशी सज्ञान होतात. ती पतीपत्नीची (मायबापाची) अशी भांडणं पाहून शाळेत जात नाहीत. कारण त्यांचं मनच शाळेत रमत नाही. काही ठिकाणी ही भांडणं विकृत स्वरुप धारण करतात. पती पत्नीला सोडून जातो. कधी पत्नी पतीला. त्यातच त्या विद्यार्थ्यांची माहिती कधी बापाजवळ असते तर कधी आईजवळ. मग दुस-या शाळेत नाव टाकायला दाखला नसतो. शेवटी पर्याय नसल्याने ते मायबाप जर कमी शिकलेले असतील तर ते आपल्या मुलाला शाळेत पाठवीत नाहीत. शाळाबाह्य करतात. घटस्फोटाची भांडणं.
जास्त मुलांची पैदावार ही देखील कधीकधी शाळाबाह्य ला कारणीभूत ठरत असते. कारण परीस्थीती नाजूक असते. मायबाप कोणाकोणाला शिकविणार हा प्रश्न असतो. अशी मुलं साहजीकच शाळाबाह्य ठरतात.
दरवर्षी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढतच आहे. यावर काही उपायही नक्कीच करता येतात. परंतू कोण करेल, आपल्या मागं खरुज नको, कटकट नको. ही पालकांची मानसिकता. मुलं लहान असतात. त्यावेळी त्यांना ना शाळाबाह्यतेचा अर्थ कळत नाही. ना शाळाबाह्यतेचे नुकसान. ते अगदी बिनधास्तपणे वागत असतात. यावर काही उपायही करता येतील.
शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्या पालकाची वारंवार भेट घ्यावी. तो विद्यार्थी शाळेत येतो की नाही त्याची माहिती त्यांना सांगावी. तसेच तो हुशार नसेलही कदाचित तरी तो हुशार आहे, त्याचं नुकसान करु नका असे रास्तपणे सांगावे. यावर महेशनं एक प्रयोग केलेला होता.
ती एक मुलगी की तिच्या घरी विश्वकोटीचं दारिद्रय होतं. मुलांच्या हव्यासापोटी मायबापानं पाच पोरी जन्मास घातल्या. सहावा मुलगा. मुलाला शिकविण्याची मानसिकती. मात्र मुलगी थोडी हुशार होती. ती महेशकडे येत असे व म्हणत असे की सर तुम्ही माझ्या वडीलांना समजवा. ते शिकवीत नाही म्हणतात.
महेश ते ऐकत असे. त्याला पश्चाताप होत असे की कशाला त्यानं एवढी मुलं जन्माला घातली असावी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नाही तर मानसिकतेचं नुकसान होतं.
महेश त्या मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्या घरी जात असे व तिच्या वडीलांना समजावून सांगत असे की हिला शिकवा. ही फार हुशार आहे. हीच मुलगी तुम्हाला पोसेल. तशी मुलगी दहावी झाली. त्यानं तिला घराजवळ ट्युशन घ्यायला लावली. ती लहान विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायची. तिचा खर्च निघायचा. त्यातच असं करता करता ती घरखर्चही काढू लागली नव्हे तर वडीलांना आज तिला शिकविल्याचा अभिमान वाटत होता.
महत्वाची गोष्ट अशी की ऐपत असेल शिकवायची तरच मायबापानं मुलाचा हव्यास करीत मुलींना जन्म द्यावा. विनाकारण त्यांना मुलाच्या हव्यासापोटी जन्माला घालू नये. यामुळे मुलींच्या मानसिकतेचा बळी जात असतो. ही विचार करणारी बाब आहे. याचा मायबापानं तरी विचार करावा. महत्वाचा उपाय आहे तो घटस्फोटाचा. मायबापानं कोणत्याही समयी, काही का असेना, घटस्फोटाचा विचारच करु नये आणि करायचा असेल तर निदान मुलं जन्मालाच घालू नये.
मृत्यू काही कुणाच्या हातात नसतो. काही स्रीया वा काही माणसं अकाली मरण पावतात. त्यावेळी पती पत्नींपैकी जो जीवंत असेल, तो घटक तरुण असतो. असा घटक हा आपल्या मुलाबाळांचा विचार न करता दुसरा विवाह करतो. तो विवाह मुलांना खपत नाही. अशावेळी पालकानं आपल्या मुलांचा विचार करुनच दुसरा विवाह करावा. निव्वळ आपलं लैंगीक सुख पाहू नये. कारण लैंगीक सुख हे क्षणीक असतं. ते सार्वकालिक नसतं, याचा प्रत्येक अशा जोडप्यांनी विचार करावा.
शिक्षकांनी आपली भुमिका बदलवावी. त्यांनी आळस न बाळगता इमानदारीनं सर्वेक्षण करावं. सरकार सांगते म्हणून नाही. त्यांना शाळेच्या कक्षेत आणावं. त्यांना उत्स्फुर्तपणे वेळोवेळी मार्गदर्शन करावं. जेणेकरुन त्यांच्यात अभ्यासाची रुची निर्माण होईल व ते शाळेत येईल. तसेच त्यांचे नुकसान होणार नाही. विशेष म्हणजे पालक गरीब असो की श्रीमंत........त्यांनी दर महिण्यातून आपला पाल्य कसा प्रगती करीत आहे याची विचारणा शाळेला करावी. तसेच शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांची हालचाल आपल्या पालकांशी संपर्क साधून सांगावे. हे कार्य दर आठवड्यात वा पंधरवाड्यात केले केले तरी चालेल. तसेच त्याची विळेषतः नोंद ठेवावी. त्यांच्या प्रगतीचीही नोंद ठेवावी.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आज मुलं गरीबाची असो की श्रीमंताची. भरपूर प्रमाणात शाळाबाह्य ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात व आदिवासी बहूल क्षेत्रात याची संख्या जास्त आहे. तसेच अशा शाळाबाह्यतेचे प्रमाण जातीनुसार मोजल्यास छत्तीसगडी समाज, मुस्लीम समाज व अनुसूचीत जातीमधील महार जात सोडून इतर जाती तसेच आदिवासी जाती. यांचं प्रमाण जास्त आहे. सरकार शाळाबाह्यतेचं सर्वेक्षण करतं. परंतू शिक्षक किंवा तत्सम घटक त्याचं रितसर सर्वेक्षण करेल तेव्हा ना. फालतूची कटकट नको म्हणून चालढकलपणा असतो आपला. परंतू यातून त्या मुलांचं किती नुकसान होतं हे आपल्याला माहित नाही. तो आपल्याचमुळं शिक्षणापासून वंचित राहतो व जेव्हा मोठा होतो, तेव्हा पश्चाताप करतो. त्या पश्चातापाचे पाप आपल्यालाच लागत असते. कारण आपल्यामुळंच त्याचं नुकसान झालेलं असतं.
आज त्याही विद्यार्थ्यांना वाटत असतं की त्यांनी शिकावं. ते म्हणतही असतात की आम्हालाही शाळेत घ्याहो. परंतू त्यांचं वय लहान व न समजणारं असतं. ते त्यांना तेव्हा कळतं, जेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून एकच सांगावेसे वाटते की सर्वेक्षण चांगले करा. असे करा की कोणतेही मुल शाळाबाह्य राहू नये. ठरु नये. तसेच त्यांचे नुकसान होवू नये. असे सर्वेक्षण करा की ते तुमचंच मुल आहे. तुमचाच पोटचा गोळा आहे व तुम्ही त्याचेवर निरतिशय प्रेम करीत आहात.

*****************************************

महेश ज्यावेळी शिकत होता, तेव्हा बरीचशी मुलं शाळाबाह्य होत होती. महेशला वाटायचं की ह्या आपल्या मित्राच्या शाळाबाह्य होण्याचं कारण म्हणजे शिक्षक असावेत. हे शिक्षकच वस्तीत फिरत नसल्यानं मुलं शाळाबाह्य ठरत आहेत असं त्याला वाटायचं. परंतू यात त्या शिक्षकांचा दोष नव्हता. ते तर खुप प्रयत्न करीत होते.
महेश आज शिकला होता. तो शिक्षक झाला होता. त्याचबरोबर तो विचारवंतही बनला होता. त्याचे दररोज वर्तमानपत्रातून लेख छापून येत होते. एका संस्थेच्या शाळेत त्याला नोकरी लागली होती. त्याला सर्व आठवत होतं. त्या बालपणीच्या आठवणी आठवत होत्या. त्याला वाटायचं की शाळेतही बालसुरक्षा व्हावी. त्याबद्दल त्याने विचार मांडले होते. तो त्यावर अध्ययन करीत असे.
महेशला वाटत होते की प्रत्येक मुल शिकावं व त्यानं पुढं जावं. मग ते गरिबाचं का असेना. तसेच त्याला वाटत होते की मुलं शाळेतही सुरक्षीत राहावीत. त्याच्या शाळेत येणारी मुलं ही लहान असल्यानं ती पडायची व त्यांना लागायचं, कधीकधी खरचटायचं. काही मुलींना काही तरुण फुसलवायचे. त्यातून मुली बिघडायच्या. ह्या सर्व गोष्टी महेशला आवडत नव्हत्या. त्याला वाटत असे की संस्थाचालकानं शाळा निव्वळ पैसे कमविण्यासाठी बांधू नये. त्यासोबत त्यानं मुलांचं संरक्षण करायला हवं.
महेशनं पाहिलं होतं की अलीकडे संस्थाचालकांनी शाळा उघडल्या. परंतू विद्यार्थी दृष्टीने सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. काही शाळेत मुलांसाठी शौचालयही नाहीत. बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. या सर्व गोष्टींचा महेशला राग यायचा. परंतू तो त्यावर काहीही करू शकत नव्हता. कारण त्याच्याजवळ ना तशी योग्यता होती. ना कोणता अधिकार. तो तसा विचार करीत करीत आपल्या आयुष्यातील क्षण काढत होता.
महेशला जेव्हा वाटायला लागलं की आपण विद्यार्थी वर्गासाठी काहीतरी करायला हवं. तेव्हा त्यानं विचार केला की आपण शिकावं. पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा. परंतू शिकणार कसं? संस्थाचालक आपल्याला शिक्षणासाठी परवानगी देईल काय? तरीही संस्थाचालकांनी विचारलेलं बरं. असा विचार करुन त्यानं एक दिवस संधी पाहून विचारलंच.
सुरवातीला संस्थाचालकांनी आढेवेढे घेतले. परंतू नंतर संस्थाचालकांनी काय वाटलं कुणास ठाऊक. त्यांनी महेशला पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली व महेशनं आता महाविद्यालयात खाली वेळेत प्रवेश घेवून तो पुढचं शिक्षण घेवू लागला. कारण त्याला या लहान इवल्या इवल्या मुलांसाठी काहीतरी करायचं होतं. ते ध्येय अगदी त्याच्या मनात होतं.

********************************************

बालसुरक्षा.......विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय चांगली गोष्ट. पालक आपल्या मुलांची एक पालक म्हणून सुरक्षा करीत असतातच. परंतू शिक्षकही त्यांच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा करीत असतातच. कारण शाळेत येणारी मुलं ही अगदी लहान असतात. त्यामुुळं त्यांची शाळेत सुरक्षा होणे पालकांना अपेक्षीत असते.
सुरक्षा दृष्टिकोणातून विचार केल्यास शाळेत आज नर्सरी पासून मुले प्रवेश करीत आहेत. त्यामुुळं आता विद्यार्थी हे तीन वर्षाचे शाळेत राहात असून या विद्यार्थी दृष्टीनं अगदी तीन वर्षाच्या बालकापासून तर त्याला तरुण होतपर्यंत विद्यार्थ्यांची सुरक्षा होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनं शिक्षकांना सतर्क व जाणीवपुर्वक सावधान राहणेही गरजेचे आहे.
अलिकडे कलीकाळ आहे. या काळात कोण कुणाला केव्हा कधी क्षती पोहोचवेल याची शाश्वती देता येत नाही. अलिकडे तर लोकांना बलत्कारासाठी तीन वर्षाच्या बालिकाही कमी पडतात. काही घटना अशाच असतात. याबाबतीत एक प्रसंग सांगतो. या प्रकरणी एका स्रीनं प्रेम करुन विवाह केला. त्या विवाहाला कोणीही घरच्या लोकांनी मंजूरी दिली नव्हती. अशातच दोन वर्ष निघून गेले.
दोन वर्ष झाल्यानंतर तिच्या मोठ्या बहिणीला वाटलं की आपण आपल्या बहिणीला मिळवावं. म्हणून तिनं आपल्या बहिणीशी संपर्क साधून तिला मिळवलं. मग काय त्या बहिणी एकमेकींच्या घरी जावू लागल्या. अशातच मोठ्या बहिणीची मुलगी बारा वर्षाची झाली.
मुलगी....... मुलीला आजच्या काळात फार जपावं लागतं. तरीही हा समाज तिला भक्ष करीत असतं. ती मोठ्या बहिणीची मुलगी...... तिला लहान बहिणीनं तिच्या मोठ्या बहिणीची इच्छा नसतांनाही तिच्या मुलीला पाहूणी म्हणून आपल्या घरी नेलं. त्यातच त्या मुलीला दिवसभर सांभाळण्याऐवजी ती कामावर जात होती. तसा तिचा पतीही कामाला जात होता. परंतू वासनाच ती......... एक दिवस तो कामाला जायच्या निमित्यानं घरुन निघाला. परंतू तो काही कामाला गेला नाही. त्यानं कामाला जाण्याचं नाटक केलं. त्यानं तिला कामाला जावू दिलं. तसा तो दुपारी परत आला. त्यातच त्यानं त्या मुलीवर बलत्कार केला. त्यानं एवढंच केलं नाही तर तिच्या शरीरावर सपासप वार करुन तिला मारुन टाकलं. तसंच तिला फाशीवरही लटकवून दिलं. त्यानंतर तो पळून गेला.
सायंकाळी तो नेहमीप्रमाणे घरी आला. त्यानं तसा बनाव केला. परंतू अपघाती ते कृत्य. अपघात काही ना काही पुरावे सोडतच असे. तिथंही तेच घडलं. शेवटी शवाची तपासणी केली गेली व हे कृत्य तिच्या पतीनच केलं हे सिद्ध झालं.
मुली जळी, स्थळी, पाताळातही सुरक्षीत नाहीत. त्या शाळेतही सुरक्षीत नाहीत. शाळेतही काही शिक्षक सुरक्षा करण्याऐवजी वरीलप्रकारचं कृत्य करतात. तसेच काही विद्यार्थीही. यादृष्टीनं त्यांना अतिशय डोळ्यात काजळ लावून जपणे गरजेचे असते. यावर उपाय म्हणजे प्रत्येक शाळेत मुलींच्या दृष्टीकोणातून महिला सुरक्षा यंत्रणा म्हणून कक्ष स्थापन करणं आवश्यक आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बालकांचे पडणे व त्याला खरचटणे. ही लहान बालकं. त्यांना व्यवस्थीत चालताही येत नाही. ती सतत पडत असतात. त्यातच ती अशी पडत असतांना त्यांना खरचटत असतं. यादृष्टीनं त्यांची सुरक्षा करणे गरजेचे असते. यावर उपाय म्हणून शाळेत प्रथमोपचार पेटी असायला हवी. तसेच त्यांच्या आजाराची वार्षीक तपासणी करुन आजार गंभीर स्वरुपाचे आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यांना शाळेतून अपघात योजनेतून विशेष सहाय्य मिळवता यावे. तसेच शासनानं यावर तरतूद करावी. तसेच शाळेत मुलं पडणार नाही यासाठी शिक्षकाने वारंवार अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यावे.
काही काही शाळा या रस्त्यावर असतात. तिथे रस्ते अपघात होत असतात. काही काही शाळा ह्या रस्त्यावरच आहेत. अशा शाळेत बालकांचे अपघात होत असतात. तेव्हा असे अपघात होवू नये म्हणून शाळेची परवानगी देतांना त्या शाळा ह्या सुरक्षीत ठिकाणी असायला हव्यात. याची खात्री करुनच परवानगी द्यावी. तसेच ज्या शाळा आज रस्त्यावर आहेत. त्यांना ती शाळा हलविण्याचे निर्देश द्यावेत. तसेच जर उपाय नसेल तर त्या शाळेसमोरुन जाणा-या रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावावेत. म्हणजे अपघात होणार नाही आणि झालेच तर त्यांची तत्काळ रुग्णालयात उपचाराची व्यवस्था व्हावी. तसेच रस्ता सुरक्षेचे चर्चासत्र घेवून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन शालेय स्तरावर उपलब्ध करुन द्यावे.
जसजशी मुलं तरुण होत असतात. तसतशी मुलांमध्ये लैंगीकता वाढीस लागते. त्यासाठी शालेय स्तरावर उद्बोधन वर्ग घ्यावे. जेणेकरुन मुलं बिघडणार नाहीत. तसेच शाळेत काही मुलं ही भित्री स्वभावाची असतात. अशा मुलांचा भित्रेपणा दूर व्हावा यासाठी त्यांना गटात रमायला लावावे. त्यातून त्यांचा भित्रेपणा सहजपणे दूर होवून जाईल.
महत्वाचं म्हणजे शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची सुरक्षा व्हावी म्हणून शालेय स्तरावर विशेष लक्ष द्यावे. कारण मुल असो की मुलगी..........ते उद्या देशाचे नागरीक असतात. ते आदर्श असतील तर देश आदर्श बनतो. तसेच ते त्या देशाचे भविष्य असतात. जो देश उज्ज्वल असतो. नवीन शैक्षणिक धोरणातून त्यांनास्वयंअध्ययनाने घडवता येवू शकते. परंतू ते तेव्हाच घडतील जेव्हा ते सुरक्षीत राहतील हे तेवढंच खरं आहे.

***********************************************

नवीन शैक्षणिक धोरण आलं होतं. त्यातच ते धोरण महेशला बेकारच वाटत होतं. यात शाळा सिद्धी नावाचा उपक्रम. आपलं स्वतःचं आपणच मुल्यांकन करणे. तसं महेशला वाटायचं की आपलं स्वतःचं आपण स्वतःच मुल्यांकण कसे काय करु शकतो? हा प्रश्न जेव्हा त्याला पडायचा. तेव्हा त्याला तो उपक्रम बकवास उपक्रम वाटायचा. त्याचं कारण तसंच होतं. काही काही शाळा ह्या स्वयंमुल्यांकन करीत असतांना आपल्या शाळेला वाईट म्हणू नये म्हणून आपल्या शाळेची माहिती ही चांगली भरत असत. ती चांगली भरलेली माहितीही कोणीही पाहायला येत नसत. मात्र त्या माहिती नुसार तिचं प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता त्या माहिती आधारावर त्या शाळेला चांगला दर्जा मीळत असे.
आज जगाला स्वतःचं प्रदर्शन मांडण्याची सवय होती. हे जग स्वतःची प्रसंशा स्वतःच करीत असे. मात्र महेश त्याबाबतीतील नव्हता. त्याला असली पोपटपंची आवडत नसे. त्याला आवडत होतं चांगली माणसे व खरी बोलणारी माणसे. मग ते स्वतःचे मुल्यांकन देखील का असेना, जर शाळेत विद्यार्थी दृष्टीने चांगल्या सोयी असतील तर चांगलं म्हणावं. नाहीतर नाही असं त्याला वाटत होतं. परंतू या शाळा सिद्धी उपक्रमातंर्गत लोकं सर्रास खोटं बोलत व म्हणत की आमच्या शाळेत रॅमच्या सोयी आहेत. शौचालयही व्यवस्थीत आहे. परंतू ते व्यवस्थीत नसायचं.
आज आपण पाहतो की जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. देशात सर्व क्षेत्रात क्रांती होत आहे. त्याचबरोबर शाळेतही. परंतू आजही शाळा सुधारलेल्या नाहीत. कारण शाळेत आजही सर्वसमावेशकता नाही. ना स्वच्छतागृहे पुरेशी आहेत, ना प्यायला पाणी, ना रँम्पच्या सोयी आहेत, ना क्रिडांगणं........आजही बरीचशी मुलं शाळाबाह्य आहेत. सरकार फक्त कागदावरची आकडेवारी पाहात आहे. प्रत्यक्षातील नाही. सरकारनं अनुदान दिलं. परंतू त्यातून संस्थाचालक गब्बर झाले. शाळा नाही. शाळेत तर रोजच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्या घडत असतात. याला जबाबदार कोण? याबाबतचा शाळास्तरावरचा शाळासिद्धी उपक्रम असाच आहे. बकवास आकडेवारी व बकवास उपक्रम. असे बरेच उपक्रम आहेत शाळा स्तरावर. जे उपक्रम बंद व्हायला हवेत.
शाळा खरंच आपल्या स्वतःचे मुल्यांकन करु शकते काय? असा जर प्रश्न कोणी प्रश्न कर्त्यानं विचारला तर त्याचे उत्तर नाही असंच येईल. का नाही येईल याबाबत सांगतो.
माणसाच्या अंगी सा-याच प्रकारचे गुणदोष भरलेले असतात. माणूस फक्त आपल्या गुणांकडे पाहतो. आपल्या दोषाकडे पाहात नाही. याबाबत एक म्हण अशीही आहे की एक बोट दाखविण्यापुर्वी आपल्या चार बोटाचा विचार करावा. याचाच अर्थ असा की आपण दुस-यावर जेव्हा ताशेरे ओढतो अर्थात बोट दाखवतो. त्यावेळी आपण किती पाक अर्थात पवित्र आहो याचा विचार करावा. यामधून सांगायचं हेच की आपण एक बोट दाखवून लोकांचा एक दोष दाखवतो. परंतू पर्यायानं विचार केल्यास आपल्याकडे जी चार बोटं असतात ते आपल्यात चार दोष विद्यमान आहेत याची सुचना देतात.
शाळा सिद्धी असाच उपक्रम. आज शिक्षणक्षेत्रात मोठ्या दिमाखानं आला. मोठ्या दिमाखानं वावरत होता. सरकारही मोठ्या प्रमाणात यावर विश्वास ठेवत होते. म्हणत होते की शाळा आपल्या स्वतःचे मुल्यांकन करीत आहे.
शाळा सिद्धीनुसार प्रोफार्ममध्ये माहिती भरीत असतांना खरंच शाळा आपल्या स्वतःची परीपुर्ण तर माहिती भरते. परंतू खरी माहिती भरत असेल का? याबद्दल शंका न केलेली बरी. कारण शाळा आपल्या स्वतःची खरी माहिती प्रोफार्ममध्ये भरत असेल तर ती शाळा...... शाळा म्हणून अस्तित्वात राहणार नाही. याबाबत शौचालयाचंच उदाहरण आहे.
शौचालयाच्याच उदाहरणानुसार किती शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शौचालये आहेत? याबाबत प्रोफार्ममध्ये माहिती भरल्यावर त्या संख्येनुसार किती शाळेची चौकशी झाली? एकही नाही. आज मुलींना वेगळं व मुलांना वेगळं शौचालय हवं. त्या व्यवस्था करायला सरकार अनुदानही देतं. परंतू ब-याचशा शाळेनं ते अनुदान शाळेत लावण्याऐवजी आपल्या घरचा विकास करण्यासाठी खर्च केला. आज शाळेत विहित नमुन्यात दाखविलेल्या संख्येएवढी शौचालये नाहीत आणि ज्याही शाळेत काही शौचालये दिसतात. त्याला शौचालये म्हणणे कठीण. अशी अवस्था शौचालयाची आहे. हीच वास्तविकता आहे. परंतू याला जाब विचारणार कोण? कोणीच जाब विचारायला तयार नाही. कारण सरकारी अधिकारीही दबेल असतात. ते एखाद्यानं ताशेरे ओढल्यास त्याला गप्प करण्यासाठी त्याचेच शाळेत जातात व काहीबाही ताशेरे लिहून त्या शाळेला बदनाम करतात किंवा चांगला शेरा लिहून देण्यासाठी लाच म्हणून पैसा घेतात.
महत्वाचं म्हणजे ज्या शाळेच्या वर्गखोल्यातून स्वच्छतेचे मुल्य शिकवले जाते. त्याच शाळेत विद्यार्थ्यांना पुरेसं शौचालय पुरवलं जात नाही. अशा शाळांना अनुदान का द्यावं? हा प्रश्न आहे. आजही ब-याच शाळेमध्ये मुलांना खेळायला क्रिडांगण नाही. तसेच ब-याच शाळेत विद्यार्थ्यांना बसायला पुरेशा वर्गखोल्या नाहीत. एवढंच नाही तर साध्या चटया सुद्धा नाहीत. तरीही आजचे शिक्षण संस्थाचालक स्वतःला शिक्षणाचे सम्राट समजतात. ते परस्पर शिक्षणाची हत्या करतात.
आज बरीचशी अशी मंडळी शिक्षणक्षेत्रात पाहतो की इकडे मराठी शाळा ओस पडल्याची ओरड करतात आणि आपली मुलं काँन्व्हेंटला नेवून टाकतात. आज बरीचशी संस्थाचालक मंडळी माझ्या निदर्शनास आली की या शाळांच्या भरवशावर त्यांनी आपल्या मुलाबाळांनाही शिकवलं नव्हे तर देशाची सेवा करण्याऐवजी विदेशात पाठवलं. त्यावेळी विचार असा येतो की जर या शिक्षणसम्राटांजवळ शाळा नसत्या तर खरंच त्यांची मुलं विदेशात गेली असती का? याचं उत्तर नाही असंच आहे.
आज प्रशासकीय कारभार करतांना शाळा संस्थाचालकांना मुख्याध्यापक म्हणून सेवाजेष्ठता चालत नाही तर नातेवाईक चालतो. कारण शाळेतील हे दोष लपवता येतात. पैसाही कमविता येतो. आजही काही काही काही शाळा ह्या कागदावरच आहेत. प्रत्यक्षात नाहीत. तसेच कालही कागदावर होत्या. हे पटपडताळणीच्या माध्यमातून दिसलं. कारवाई झाली. परंतू किती कारवाया तुर्तास तडीस गेल्या? याचाही आकडा शंका घेणाराच आहे.
आज शाळा संस्थाचालकाची मक्तेदारी वाढते आहे नव्हे तर गुंडेगीरी. ज्याला त्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकच नाही तर अधिकारी वर्गही घाबरतो. संस्थाचालक हा घटक काही प्रशासकीय नाही. परंतू मुख्याध्यापक नियुक्त करणे व त्याला पदच्यूत करणे तसेच मुख्याध्यापकीय प्रस्ताव टाकणे हा भाग त्याच्याच हातात असल्यानं त्याचेच वर्चस्व शिक्षणक्षेत्रात जास्त असते. म्हणून त्याला शिक्षक मुख्याध्यापकच नाही तर अधिकारी वर्गही घाबरतो.
शाळासिद्धी......... यात आपली शाळा कोणत्या स्तरावर आहे यासाठी तीन स्तर पाडले आहेत. त्याला नाव दिले आहे अ स्तर, ब स्तर व क स्तर. त्यात यथायोग्य माहिती भरायची आहे. मुख्याध्यापकाने आपली शाळा कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार त्या स्तरावर राईट चिन्ह मारायचं आहे.
शाळासिद्धी माहिती यापुर्वीही भरण्यात आली. त्यानुसार सरकारनं त्याची आकडेवारी घोषीतही केली. परंतू प्रत्यक्ष पडताळणी पटपडताळणीसाठी कोणीही केलेली नव्हती. स्वयंमुल्यमापन यथायोग्य समजून त्याची आकडेवारी प्रदर्शीत झाली. याचाच अर्थ असा की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी सर्व पेपर मार्गदर्शिकेतून पाहूनच लिहायला लावला. मग पूर्ण गुण मिळणार नाही तर काय? शाळासिद्धी बाबत असंच झालं. काही काही शाळेनं खरी खरी माहिती भरली. काहींनी मात्र बिनधास्त खोटीच माहिती भरली. माहिती प्रशासकीय घटक असलेल्या मुख्याध्यापकानं भरली तिही संस्थाचालकांच्या दबावात येवून. मरेल तर कोण? मुख्याध्यापक मरेल. संस्थाचालक मरणार नाही. त्याला साधं सोयरसुतकंही नाही. मुख्याध्यापकानं हे सर्व केलं. कारण नियुक्ती संस्थाचालकाच्या हातात. परंतू यात हे प्रकरण शेकेल कोणावर. साहजीकच मुख्याध्यापक असलेल्या माणसावर नाही का?
आज शाळासिद्धीची आकडेवारी दिमाखानं बोलत आहे की देशातील एवढ्या शाळा अ श्रेणीत आहेत, एवढ्या ब व एवढ्या क. कारण स्वयंमुल्यमापन आहे. कोणताच मुख्याध्यापक खोटं बोलत नाही असं सरकारला वाटतं. परंतू प्रत्यक्षात वेगळंच चित्र असतं. येथील मुख्याध्यापक हा संस्थाचालकाच्या हातचा कळसुत्री बाहूला असतो. तो कळसुत्री बाहूला समजूनच काम करीत असतो.
शिक्षणक्षेत्रातही सुधारणा होवू शकते. परंतू जेव्हा हे शिक्षणाचे क्षेत्र मालक म्हणून ठेवलेल्या संस्थाचालकाकडून काढून त्याला सरकारी केलं तर....... किंवा मुख्याध्यापक नियुक्तीचे अधिकार शिक्षक नियुक्तीचे अधिकार तसेच त्यांना काढून टाकण्याचे अधिकार प्रशासनाने आपल्याकडे घेतले तर...... जेव्हापर्यंत असं घडणार नाही. तेव्हापर्यंत शिक्षणक्षेत्रात कधीच सुधारणा होणार नाही हे तेवढंच सत्य आहे.
आजही शाळासिद्धीचे खरे आकडे येवू शकतात. परंतू जर मुख्याध्यापकांना अभय दिलं तर.......जर प्रशासनानं नियुक्ती व पदच्यूतता हे दोन्ही अधिकार आपल्या हातात घेतले तर........ परंतू असं होणार नाही. कारण खायला पुरेसा पैसा कुठून मिळणार! कारण आज ब-याचशा शाळा ह्या मंत्र्यांच्या आहेत आणि बरेचसे मंत्री सरकारमध्ये आहेत. त्यामुळं ही आकडेवारी तेव्हाच सुधरु शकते, तेव्हा निवडणूक लढवितांना उमेदवाराककडून शासन लिहून घेईल की त्याची कोणतीही मालमत्ता नाही. शाळा तर नाहीच नाही. ज्या नातेवाईकांजवळ मालमत्ता आहे. शाळा आहे. त्याला मी नातेवाईक मानणार नाही. मग तो मित्र का असेना. असं आढळून आल्यास वेळीच त्याला निलंबीत करण्यात येईल. तसेच त्याची आणि त्याच्या नातेवाईकांची मालमत्ता सील करण्यात येईल. तेव्हाच शाळेत रोजच्या घडणा-या शैक्षणिक हत्या थांबतील नव्हे तर त्यांना शाळेमध्ये सर्वकष ज्ञान मिळेल. खेळायला मैदान, पुरेशी स्वच्छतागृहे व प्यायला स्वच्छ पाणीही मिळेल.तसेच शाळा सर्वांना आपलीशी वाटेल. कोणीही शाळाबाह्य राहणार नाही. तसेच शाळा सिद्धी हा बकवास उपक्रम ठरणार नाही. हे तेवढंच खरं आहे. आज केवळ शाळासिद्धीतच बकवासपणा नव्हता तर शालेय पोषण आहारातही बकवासपणा होता. शिक्षणक्षेत्रातच बकवासपणा नव्हता तर इतरही ठिकाणी बकवासपणा होता. हे महेशला माहित होतं.
आपण आदिवासी भागात भटकंटी करीत असतांना नेमकं जाणवतं की त्या भागातील बरीच बालकं कुपोषित आहेत. त्यांच्या शरीराचा पुर्ण भाग हा हाडाला चिकटलेला असून फक्त चेहरा आणि पोट वाढलेलं आहे. यालाच कुपोषित अवस्था असे म्हणतात व त्या अवस्थेला कुपोषण.
आज देश विकासाच्या क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असला तरी देशात असा कुपोषणाचा प्रकार ब-याच ठिकाणी आहे. आजही आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, मध्यप्रदेश एवढेच नाही तर ज्या भागाला आपण सुधारलेला मानतो. त्या महाराष्ट्रातही आपल्याला कुपोषितपणा दिसतो. यासाठीच सरकारनं त्या त्या भागातच नाही तर संपूर्ण देशातच मध्यान्ह भोजन योजना सुरु केली.
आहार.........आपल्या जीवनातील महत्वपूर्ण घटक. चांगला संतुलित आहार जर असेल तर बालकाची वाढ चांगली होते. नसेल तर होत नाही. संतूलित आहार म्हणजे सर्वगुणसंपन्न आहार असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आता सर्वगुणसंपन्न आहार म्हणजे काय?
सर्वगुणसंपन्न आहार म्हणजे ज्या आहारात सर्व जीवनसत्व, सर्व प्रकारचे क्षार, सर्व प्रकारचे प्रोटीन्स, तसेच स्निग्ध पदार्थ, तसेच सर्व प्रकारचे शरीराला लागणारे आवश्यक घटक असतात. ते अन्न. असे अन्न खाल्ल्याने शरीराला समप्रमाणात उर्जा मिळते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ती टिकूनही राहते. त्यातच थकवा जाणवत नाही. मग तो थकवा शारीरीक मानसिक वा कोणताही का असेना. संतुलित आहारानं शरीराची तसेच मनाचीही वाढ होत असते.
असा संतुलित आहार ज्याला मिळत नाही, असे व्यक्ती सतत चिडचिड करीत असून त्यांच्या स्वभावात सतत चिडचिडपणा येतो. तसेच त्याचा स्वभावही रागीट बनतो. म्हणून शासनानं बालकाच्या पुर्व प्राथमिक स्तरापासूनच शालेय पोषण आहार सुरु केला. परंतू या आहारातून खरंच विद्यार्थ्यांना सकस आहार मिळतो का? याचं उत्तर नाही असंच आहे. कारण शालेय स्तरावर जो तांदूळ येतो. तो तांदूळ लोकं खात नाही असाच येतो. तो ठोकळ स्वरुपाचा असतो. ज्याला राशनमध्ये मिळविल्यानंतर लोकं गरीब जनतेला विकून टाकतात.
शालेय पोषण आहार निमित्यानं शाळेत खारका बदामा येतात. डाळ येते. परंतू हा सकस आहार मधातीलच लोक फस्त करतात. तो विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचतच नाही. अशावेळी त्या पोषण आहाराचा फायदा काय?
शासनाचा संतुलित आहाराच्या नावानं येणारा असा शालेय पोषण आहाराचा ठोकळ तांदूळ........त्यातच तो दर्जेदार नसला तरी दर्जेदार आहे असं म्हणणारं शासन. ख-या अर्थानं जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत नाही असं म्हणताच येत नाही. हा संतुलित आहार नाही, तर तो असंतुलित आहार आहे. कारण चांगल्या घरची मुलं त्याला आवडीनं खात नाहीत. महत्वपूर्ण गोष्ट अशी की शासनानं एकतर आहार संतुलित द्यावा. (बारीक तांदूळ) असा ठोकळ तांदूळ शालेय पोषण आहाराच्या नावानं देवून ठकबाजी करु नये किंवा असा तांदूळ द्यावा. परंतू त्याला संतुलित आहार म्हणू नये वा संतुलित आहाराचा दर्जा देवू नये म्हणजे झालं.
आज लोकं सुशिक्षीत झालेले आहेत. ते आता अज्ञानी राहिलेले नाहीत. त्यांना चांगलं वाईट सारंच कळतं. तेव्हा सरकारचं अशा प्रकारचं वागणंही लोकांच्या लक्षात येतं. तरीही ते सरकारला दोष देत नाहीत. कारण हा आहार निःशुल्क असतो. त्याला पैसे मोजावे लागत नाही. परंतू एक मात्र निश्चीत की या आहारानं जी शरीरात समस्या निर्माण होते ना. ती समस्या पुढे चालून शरीरात विकृती निर्माण करते. ज्या विकृतीतून शारिरीक व मानसिक विकास खुंटतो हे तेवढंच खरं आहे. कारण त्या तांदळात असा कोणताच गुणधर्म नसतो की ज्याने विद्यार्थ्यांचा कुपोषितपणा दूर होईल.
महेशला विद्यार्थ्यांच्या बाबतीत कळवळा होता. परंतू त्याचेजवळ उपाय नव्हता. तो आपले मत वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडायचा. परंतू हा भ्रष्टाचार दूर व्हायचा नाही. शालेय पोषण आहार हा असाच उपक्रम. परंतू शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारामुळं सकस आहारापासूनही विद्यार्थी वंचित राहायचे. त्याचे दुःख महेशला होते.
महेशला विचार यायचा की केवळ शिक्षणक्षेत्रच नाही तर इतरही ठिकाणी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ झालेला आहे. योजना जनतेच्या सुखासाठी की स्वार्थासाठी आहेत तेच महेशला कळत नव्हतं. शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचारही महेशला आवडत नव्हता. परंतू महेश त्यावरही काही बोलू शकत नव्हता. त्यासाठीच तो शिक्षण घेत होता.
आज संगीता जगात नव्हती. परंतू तिच्या मनमोहक आठवणी जगात होत्या. तिनंच शिक्षक बनायला लावलं होतं. त्या आठवणी संगीताबरोबर संपल्या नव्हत्या. त्या अजूनही त्याच्या मनात होत्या व त्याला पदोपदी छळत होत्या. त्याला ते संगीतासोबतच बागेतलं फिरणं आठवत होतं. एकदा संगीता म्हणाली होती, जेव्हा तो बारावी पास झाला होता.
"तू शिक्षक बनावा असं मला वाटतंय."
"काय करणार मी शिक्षक बनल्यावर."
".........." ती तशी चूप झाली. तसा महेश तिला म्हणाला,
"मी शिक्षक जर बनलो तर तू माझ्याशी विवाह करशील काय?"
या प्रश्नावर ती काहीच बोलली नाही. परंतू ती थोडीशी हसली होती. त्यानंतर त्यानं शिक्षकी पेशात प्रवेश केला होता आणि त्यानं शिक्षकी पेशाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन तो शिक्षक झाला होता.
महेशचा सुरुवातीचा काळ अतिशय वेदनेत गेला. परंतू ज्यावेळी तो शिक्षक झाला. तेव्हा त्याच्या वेदना संपल्या होत्या. पुर्वी जे काही खायला मिळत नव्हतं. ते आता मिळत होतं. कधीकधी पुर्वी उपासातच दिवसं काढावे लागायचे. परंतू आता त्याला नोकरी लागल्यानं सुगीचे दिवस आले होते. त्याला मन मानेल ते खायला मिळत होतं.
ज्यावेळी महेश शिक्षक झाला. तेव्हाही तो बागेत संगीताबरोबर फिरायला गेला. म्हणाला,
"संगीता, तू म्हटलं होतं ना की तू आता शिक्षक बन. बघ, मी आता शिक्षक झालोय. सांग, आता तू विवाह करशील का माझ्याशी?"
महेशचा तो प्रश्न. त्यावर संगीता म्हणाली,
"होय माझ्या राजा, तुझ्याशी विवाह नाही करणार तर कुणाशी करणार. तू फक्त तयार राहा मस्तकावर बाशींग बांधून."
तिनं तसं म्हणताच त्याला अगदी हायसं वाटलं. तसा तो मस्तकावर बाशिंग बांधण्याची तयारी करु लागला होता.

*****************************************

सरकार जनतेच्या सुखासाठी वेगवेगळ्या योजना काढत असते. या योजना लोकांना त्यांच्या संकटकाळात मदत व्हावी म्हणून कार्यान्वीत केल्या जातात. यात सरकारची अपेक्षा असते की जे गोरगरीब आहेत. त्यांना मदत व्हावी. सरकारचं याबाबतीतील धोरण अतिशय सुंदर आहे. परंतू त्यात सरकारचं होत असलेलं नुकसान कोणीही समजून घेत नाही. कारण त्या नुकसानाला आपण सरकारचं मानतो. परंतू ते आपलं नुकसान असतं. आपण जो पैसा कराच्या रुपात भरतो. तोच पैसा असतो आपला. जो सरकार संकटकाळात लोकांना अनुदानरुपात देत असते.
अनुदान देत असतांना सरकार योजना आखत असते. परंतू हा अनुदानरुपातील पैसा गरीब व गरजूंना मिळणे आवश्यक आहे. परंतू या पैशाचा उपभोग गरीबांना मिळत नाही. तर त्याचा उपभोग श्रीमंतच घेतांना बरेचदा दिसतात. गरीबांना तर याची पुरेशी कल्पनाच नसते. ते अनभिज्ञ असतात अशा योजनांपासून.
मागे अशीच एक शेतक-यांसाठी जीवनधारा नावाची विहिरीची योजना निघाली होती. त्यात ब-याच शेतक-यांनी त्या योजनेचा लाभ घेतला. परंतू यात बराच गैरप्रकार झाला. काही काही शेतक-यांनी पैसा घेतला. परंतू विहिरी खोदल्याच नाही. काही शेतक-यांनी विहिरी खोदल्या. परंतू त्या जेवढ्या खोदायला हव्या होत्या. तेवढ्या खोदल्या नाहीत. यात बराच भ्रष्टाचार झाला. अशीच एक योजना संजय गांधी निराधार नावानं आली. या योजनेचा लाभ घेतांना लोकांनी त्यांचं पालनपोषण करणारी त्यांची मुलं असूनदेखील या योजनेचा लाभ घेतला. काहींनी तर चक्क योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पतींनाही मारुन टाकलं.
सरकारच्या अशा ब-याच योजना आहेत की ज्यातून काही काही लोकं आपला स्वार्थ साधून घेतात. चक्क या माध्यमातून पैसा त्यांच्याजवळ असूनही पैसा कमविणे हा उद्देश ठेवतात. अशाच काही योजना.
योजना....... काही काही योजना अशाच असतात की त्या योजना जनतेच्या लाभाच्या असतात. परंतू सरकारला नुकसानदायक ठरत असतात. अशा काही योजना आहेत की ज्यातून सरकारची फसवणूक केली जाते.
विधवा पेन्शन योजना अशी योजना की ज्यातून सरकारची सर्रास फसवणूक केली जाते. कारण ब-याचशा अशा महिला आहेत की ज्यांचे पती मरण पावताच त्या त्या पतीच्या मृत दाखल्यानं आपली विधवा पेन्शन सुरु करतात. त्यानंतर दुसरा विवाह करतात. परंतू आपण दुसरा विवाह केला, आता मला पेन्शन नको. असे सांगत नाही. अशा विधवा पेन्शनच्या ब-याच केसेस देशात आहेत की ज्यातून असाच सरकारचा पैसा बरबाद होतो.
राशन दुकानात राशन मिळत असते. त्याचं कार्ड असते. परंतू हे कार्ड गरीबाचंच असते असं नाही. कारण आजही राशन दुकानातील कार्डाची चौकशी केल्यास ज्यांच्या नावानं कार्ड आहे. ते त्यात बसत नाहीत. परंतू सरकार लाभ देते ना. मग कोणं सोडावं. असाच विचार करुन लोकं सर्रासपणे ह्या योजनेचा लाभ घेत आहे व सरकारचं नुकसान करीत आहे.
शेतीचं आज नुकसान होत आहे. कारण आज शेती बरोबर पिकत नाही. कधी पावसाच्या अवर्षणानं तर कधी कोणत्या कारणानं शेतीचं अतोनात नुकसान होतं. अशावेळी सरकार नुकसानभरपाई देतं किंवा दरवर्षी पीक पेरणीच्या वेळी धान्य आणि खते देतं. यामध्ये जी नुकसानभरपाई मिळते. ती नुकसानभरपाई गरीबांनाच मिळते असे नाही तर त्याचा लाभ श्रीमंतही घेत असतात.
प्रत्येक शाळेत शाळा अनुदान मिळत असते. सरकारी शाळेत ही सोय आहे. अशावेळी काही काही शाळेत मिळणारं अनुदान हे शाळेसाठी खर्च होत नाही. ते शाळेचे संचालक मंडळ आपल्या घरच्यासाठी खर्च करीत असते.
शिष्यवृत्ती योजना...... ही अशी योजना आहे की या योजनेतून अगदी श्रीमंत घरची मंडळीही या योजनेचा लाभ घेत असते. विशेष म्हणजे अशा योजना ज्यांना आवश्यकता आहे. त्यांना मिळत नाही आणि भलतेच हात मारुन नेतात.
महत्वपूर्ण वस्तूस्थिती ही की अशा सरकारच्या ब-याच योजना होत्या की ज्यातून लोकं आपली कमाई करीत. तेही महेशला आवडत नव्हते. कारण त्या योजना देणे सरकारला समजत होते. त्यात अतोनात नुकसान होते असंही महेशला वाटत होते. त्या योजना दिल्यानंतर त्याचं फलित काय निघालं? खरंच लोकांनी ही योजना त्यांच्या कामात आणली का? त्या योजनेचा लाभ खरंच गरीबांना झाला का की श्रीमंतांनी त्याचा लाभ घेतला? नेमके गरीब कोण? बी पी एल चे कार्डधारक की ज्यांना एकच मुल आहे, ज्यांच्या घरी फक्त सायकल आहे, गाडी नाही आणि ज्यांचं एक लहानसं कौलारु घर आहे. ज्यांच्याकडे शेतजमीन नाही वा बांधलेल्या घराचा जास्त परीसर नाही. कारण आज बी पी एल कार्डधारक लोकांच्या घरीही मोठमोठ्या गाड्या, मोठमोठी घरं व त्यांना स्वतःची तीन चार मुलं असतात. अशी माणसं बी पी एल धारक असली तरी ती दर्जेदार घरंदाज श्रीमंत असतात. परंतू त्यांचं मोजमाप श्रीमंतात करेल कोण? कारण गावात त्यांचाच दबदबा असतो व राशनवाले, पोलिसवाले तसेच सारेच जण त्याचे दबेल असतात. असंही महेशला वाटत होते.
महेशला वाटत होतं की विशेष म्हणजे आज अशा लाभ घेणा-या लोकांची चौकशी व्हायला हवी. चौकशीत ते दोषी आढळल्यास त्या लोकांवर कारवाई व्हायला हवी. त्यांतच त्यांच्याकडून हा सरकारी पैसा वसूल करायला हवा. जेणेकरुन पुढील काळात असा भ्रष्टाचार करुन कोणीही योजनेचा लाभ घेणार नाही आणि असा लाभ गरजू व गरीबांनाच मिळेल. तसेच जनतेचाही पैसा वाचेल. त्याचबरोबर देशाचा विकास होईल व जनतेवरही जास्त कराच्या रुपानं बोझा वाढणार नाही. तसेच आपण जो कर भरु. त्याचा अतिरेक होणार नाही. आपला पैसा हा सद्चरणी लागेल. तसेच कराच्या रुपानं जास्त जाणारा पैसाही वाचेल. एवढंच नाही तर देशातील महागाई कमी होईल व देश सृजलाम सुफलाम होवून जगात विकासाच्या क्षेत्रात अव्वल स्थानावर येईल हेही महेशला वाटत होतं.
महेशला इतर क्षेत्राबाबत तेवढं वाटत नव्हतं. परंतू शिक्षण क्षेत्रावर तो जास्त कटाक्ष टाकत असे. जणू शिक्षणक्षेत्रात शिक्षणाची उलटी गंगा वाहात आहे असंच त्याला वाटायचं.
संगीता तेवढी शिकलेली नव्हती. परंतू तिला महेशपेक्षा जास्त समजत होते. काही काही गोष्टीत तीच उपाय काढत असे व महेशला सतर्क करीत असे. त्याला त्याच्या कार्यातही हातभार लावत असे.

*****************************************

महेशला वाटायचं की शिक्षक चांगलेच शिकवू शकत. परंतू बंधन आहेत. त्याला संस्थाचालकाच्या व त्यांनीच नियुक्त केलेल्या व त्यांचाच नातेवाईक असलेल्या मुख्याध्यापकाच्या रोषाला सामोरेे जावे लागते. शिक्षक......... अलिकडे शिक्षण क्षेत्राला सर्व नेत्यांनी बदनाम केलंं आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. नेतेमंडळी ही जेव्हा शिक्षणमंत्री बनतात. तेव्हा त्यांना शिक्षणाबाबतची काहीएक जाण नसते. केवळ आणि केवळ एखादं पद प्राप्त व्हावंं म्हणूून शिक्षणाचं खातं घेतलेले शिक्षणमंत्री. ते आपल्या मनानुसार शिक्षकमत विचारात न घेता तकलादूदृष्टीचे निर्णय घेत असतात. त्यातच त्या निर्णयाला कोणी विरोध केल्यास त्या निर्णयाला वेळीच बदलवतात.
महेशला पाहात होता की शिक्षणक्षेत्रातही अनेक आमदार आहेत. ते आमदार शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे आहेत. परंतू त्यांना जर शिक्षण क्षेत्रातल्या प्रश्नांची जाण असेल तर........किंवा ते स्वतः शिक्षक असतील तर......ते आमदार शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा नक्कीच फोडू शकतात यात आतिशयोक्ती नाही. असे आमदार हे शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देवू शकतात. परंतू काही आमदार हे शिक्षक नसतात. ते इतर क्षेत्रातील असतात. त्यांना शिक्षकांच्या परीणामाची वा त्यांच्यावर होणा-या अत्याचाराची माहिती नसते. मात्र असे आमदार केवळ पैशाच्या भरवशावर निवडून आलेले असतात.
महेशला त्रास वाटत होता शासनाचा. शासनाची रोजचीच पत्र त्याची कटकट वाढवीत होते. ती रोजच भरावी लागणारी आकडेवारी त्याची चिंता वाढवीत होती. त्यातच एखाद्या वेळी ती आकडेवारी चूकली किंवा नाही भरली तर शासन त्याचा जाब त्याला विचारत असे.
तसं पाहता महेशचं मुख्याध्यापक पदही प्रभारी होतं. त्या पदात काम जास्त होतं आणि वेतन अत्यल्प होतं. त्यामुळं त्या पदावर काम करणं अवघड वाटत होतं. त्याला वाटत होतं की जसं काम असेल, तसं वेतनही मिळायलाच हवं. त्यासाठीच तो खपत होता. राबत होता.
आज ती सरकारची पत्र. ती पत्र जरी त्याची चिंता वाढवीत असले तरी त्याला समाधान वाटत होतं ते म्हणजे त्याच्या शाळेमुळं. कारण त्यानं मुख्याध्यापक बनताच शाळा वाढवली होती. आज त्याच्या शाळेची मुलं नावाजत होते अख्ख्या राज्यात. तशीच त्यांची प्रगतीही होत होती. हे सर्व त्याच्या शाळेतील शिक्षकांमुळं घडलं होतं. कारण त्याच्या हाताखालील ती शिक्षकमंडळी हिरीरीनं व आत्मविश्वासानं आपल्या वर्गात शिकवीत होते. मनात किंतू परंतू न ठेवता.

***********************************************

एकदा एका सभेत बोलणारा एक नेता म्हणाला की आजपर्यंत महाराष्ट्रात असे शिक्षणमंत्री होवून गेले की जे शिक्षणमंत्री बनल्यानंतर पुन्हा निवडूनच आले नाहीत. कोणीही निवडून आलेला नाही. म्हणून नाईलाजानं कोणालाही म्हणावेसे वाटेल की मंत्र्यांना वेड लागते की काय?
मंत्री........जे विविध क्षेत्रात कामे करीत असतात. त्यांचं उत्कृष्ट काम पाहून कोणीही त्यांना सहज निवडून देतो. शिक्षणक्षेत्र असं आहे की जे पालकांनाही आवडतं. कारण त्यांना त्यांच्या मुलांचं भविष्य बनवायचं असतं. असं भविष्य की ज्या भविष्यातून त्यांच्या मुलांचा विकास होत असतो. ते आपल्या मुलांना शिकविणा-या शिक्षकांना चांगलेच म्हणतात. चांगलेच मानतात. परंतू जर त्यांचा विश्वास असलेल्या शिक्षकांना कोणी काही म्हटल्यास ते त्यांना धुळही चारण्याचे काम करतात. जसे यापुर्वीच्या शिक्षणमंत्र्याचे झाले.
आताही शिक्षणमंत्री असलेल्या विद्यमान काळात शाळा ह्या विदर्भात एवढं तापमान असतांना एप्रील महिण्यातच सुट्ट्या लागायच्या. त्याचं कारण असायचं उष्माघाताचा आजार होवू नये. कारण विदर्भ असो की कोणताही भुभाग. लहान मुलांना उष्माघाताचा त्रास उदभवतोच. परंतू कोरोनाचे कारण पुढे करुन शिक्षणमंत्र्यानं भर उन्हाळ्यातही शाळा ठेवली होती. त्याचं कारण असं होतं की कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिकविता आलं नाही. शिक्षकांनी शिकवलं नाही.
तो कोरोना काळ होता. त्या काळात शिक्षकांची कसोटी लागलेली होती. महेशही त्यात होळपळून जात होता. त्या कसोटीत जसं शिक्षकांना अहोरात्र झटावं लागलं. तसं महेशलाही. या कोरोना काळात याच शिक्षकांनी नाक्यावर तर दिवट्या केल्याच. व्यतिरीक्त त्यांनी मोबाईलची पुरेशी व्यवस्था नसतांना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेवून अतिशय जोखीम पत्करुन विद्यार्थ्यांच्या घरीही जावून शिकवले. त्यामुळं या शिक्षकांवर कोरोना काळात ताशेरेच ओढता येत नव्हते. तरीही या शिक्षकांनी काहीच केले नाही. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले असा ठपका शिक्षकांवर ठेवून शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांची झोपच उडवली होती. त्याचं महेशला अतिशय वाईट वाटत होतं.
विदर्भातील पारा बेचाळीस त्रेचाळीस असतांना शिक्षकांपाठोपाठ विद्यार्थ्यांचीही शाळा ठेवली. त्यातच मराठवाड्यातून आलेल्या एका जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी महोदयांनी म्हटलं की शाळा ही साडेदहापर्यंत नक्कीच घ्या. त्यात हयगय चालणार नाही. परंतू ज्या ज्या पालकांची इच्छा असेल की त्याही वर विद्यार्थी शिकला पाहिजे. अशा पालकांच्या मुलांना जास्त वेळ बसवा. या मराठवाड्यातून विदर्भात आलेल्या शिक्षणाधिकारी महोदयांना विदर्भातील तापमानाची अवस्था माहित नव्हती. कारण तसाच विचार त्यांचा दिसला. त्यांना एसीच्या कम-यात बसल्यानंतर बाहेरचं तापमान काय असतं याची काय जाणीव नव्हती. एखाद्या वेळी येतीलही ते सगळं सहन करायला. परंतू वेळोवेळी या इवल्या मुलांसोबत बसतांना त्रेधातिरपीट उडत होती.
महेश विदर्भातील रहिवासी होता. इथे भरपूर तापमान होते. ते तापमान पाहता महेशला शाळा सकाळची बरी वाटायची. त्यातच दरवर्षी प्रमाणे शाळेला सुट्ट्या लागाव्या असंही त्याला वाटत होतं.
ज्याचं त्याचं नशीब त्यांनाच माहित. पाण्यातील मासोळ्यांचं जीवन त्यांनाच माहित. आपण त्या पाण्यात जगूच शकत नाही. इथे जो शिक्षक स्वतः शिकवत होता. स्वतः राबत होता. त्याला स्वतःलाच स्वतःची अवस्था माहित होती. आज संस्थाचालकाच्या अशा ब-याच शाळा होत्या की ज्या शाळेत पुरेसे पंखे नव्हते. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती. संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या भरवशावर बराचसा पैसा उभा केला होता. परंतू तो शाळेसाठी न वापरता स्वतःच्या घरासाठी वापरला होता. आज या गोष्टीचा तपास जर केला तर ब-याचशा संस्थाचालकांची कालची जी दयनीय परीस्थीती होती, ती आज राहिलेली दिसत नव्हती. याचं कारण काय? तर त्यांनी शाळेच्या माध्यमातून कमविलेला पैसा. काही काही मुख्याध्यापक हे शाळेतील कळसुत्री बाहूले असल्यागत वागत असल्याने त्या शाळेतील संस्थाचालकाचं फावत होतं.
विदर्भात विद्यार्थ्यांच्या शाळा ठेवल्या होत्या. त्यावेळी प्रत्यक्ष परीस्थितीचा कोणी विचारच करीत नव्हते. विद्यार्थी ज्या बाकावर बसायचे. ती बाकं गरम यायची. जे पाणी प्यायचे. ती पाण्याची बाटल व ते पाणी गरम यायचं. ते पाणी प्यायल्यावर विद्यार्थी घरी उन्हाळी लागल्यानं तडपायचे. शाळेत पंखे नसल्यानं अंगातून घामाच्या धारा निघायच्या. तरीही पालक पाठवायचे मुलांना. विद्यार्थ्यांना याबाबतीत विचारले असता ते म्हणायचे की सर, माझ्या मायबापापैकी घरी कोणीही नसतात. मग मी इकडे तिकडे फिरु नये उन्हात म्हणून शाळेत येतो. याचाच अर्थ असा की शाळा ही त्या पालकांच्या दृष्टिकोणातून शिकविण्याचं साधन नव्हतं तर मुलं सांभाळण्याचं साधन होतं.
आजची अशी ही उपद्व्यापी शिक्षण व्यवस्था. या व्यवस्थेपुढे हारणारा शिक्षक. म्हणूनच की काय, आजपर्यंत झालेले शिक्षणमंत्री पुन्हा निवडून आलेले नव्हते. याचा विचार विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी करायला हवा असं महेशला वाटत होतं. त्यांनी उटपटांग असे निर्णय घेवू नयेत. जेणेकरुन शिक्षणाच्या या कालचक्रात त्यांच्यावरचा विश्वास उडेल व त्यांनाही लोकं टार्गेट बनवून पुढील निवडणूकीच्या काळात नाकारतील. निदान शिक्षण मंत्र्यांनी तरी राष्ट्रहित विद्यार्थी हित व शिक्षक हित जोपासावे. जेणेकरुन शिक्षणाचे ध्येय साध्य करता येईल. विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास करायचाच असेल तर शिक्षकांना धारेवर धरुन चालत नाही. दडपशाहीचे तर धोरण अजिबात चालत नाही. त्यांच्यावर प्रेमाची फुंकर घालावी. प्रेम द्यावं. प्रेमाने सांगावं. प्रेमानं तर जगही जिंकता येते. हे तर शिक्षक आहेत. पाहा एकदा प्रयोग करुन. यश नाही मिळणार असे कदापीही होणार नाही असंही महेशला वाटायचं.
नवीन शैक्षणिक धोरण महेशला सुखवून जात नव्हतं. तसा त्याला त्या धोरणाचा तिटकारा वाटायचा. परंतू सरकारनं उचललेलं महत्वाचं पाऊल. ते आवडो की न आवडो, आपण शिक्षणक्षेत्रात असल्यानं स्विकारावंच लागेल. या उद्देशातून त्यानं ते धोरण स्विकारलं होतं. मात्र अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना शिकवावे कसे? हा प्रश्न त्याच्या समोर पडला होता. तो चांगलंच शिकवीत होता. तसं पाहता कसे चांगले शिकवावे याचंही ज्ञान देत होता.

***********************************************

महेशला वाटत होतं की विद्यार्थ्यांना कसे शिकवावे असे जर म्हटले तर काही शिक्षक मंडळी नक्कीच शिव्या हासडतील, म्हणतील की या माणसाला वेड तर लागलं नाही. परंतू महेश त्यांना आगावूचं ज्ञानामृत पाजत नव्हता वा पुरेशी अक्कलही देत नव्हता. परंतू आजही त्याच्या पाहण्यात असं दिसलं की काही शिक्षक विद्यार्थ्यांना बरोबर शिकवीतच नाही. याचाच अर्थ असा की काही शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविताच येत नाही असा नव्हता. परंतू याला आजची परीस्थिती तेवढीच कारणीभूत आहे. आजचा शिक्षक हा अगदी मन लावून अतिशय मेहनत घेवून आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी हिरीरीनं शिकवतो. याला काही अपवाद नक्कीच आहेत. परंतू बरेच शिक्षक या अपवादापलिकडचे आहेत. ते विद्यार्थ्यांना आपल्याला मिळणा-या वेतनापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात शिकवीत असतात. तरीही शासन त्यांच्याच माथ्यावर खडे फोडत असते.
महेशला वाटत होतं की नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी आपोआप शिकतात. त्यांना शिकवावे लागत नाही असे हे धोरण तयार करणा-या धोरण तयार कर्त्याचं म्हणणं. त्याच्याच म्हणण्यानुसार शिक्षक हा फक्त मार्गदर्शक असतो. त्यानं फक्त विद्यार्थ्यात ज्या उपजत क्षमता असतात, त्या कोणत्याही माध्यमातून बाहेर काढून त्या क्षमतांचा विकास करावा. हे म्हणणं धोरण कर्त्याचं. त्यानुसार त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्येक भाग हाताळला. परंतू हे नवीन शैक्षणिक धोरण जरी आलं असलं आणि या धोरणानुसार शिक्षकांना जरी शासनानं मार्गदर्शकीय भुमीकेत उभं केलं असलं तरी काही काही शाळेत तो मार्गदर्शक ठरु शकत नाही. त्याला विद्यार्थी वर्गाचे अगदी बोट धरुन शिकवावे.
नवीन शैक्षणिक धोरण...... महत्वाची वस्तूस्थिती ही होती की काही काही पालक हे आपल्या पाल्यांना आजच्या काळातही शिकवायला मागेपुढे पाहात. कारण मुलांची पैदाईश. आजही एवढी अफाट लोकसंख्या असूनही काही काही घरी चारपेक्षा जास्त मुलं होते. ज्यांना खायला नीट मिळत नव्हते. शिकविणे तर दूरच.
शासनानं शिक्षणाचा विचार करुन नवीन शैक्षणिक धोरण तयार केलं. परंतू नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशाच दोन बाजू या नवीन शैक्षणीक धोरणालाही होत्या. परंतू काही गोष्टी शैक्षणीक धोरण कर्त्याच्या वाखाणण्याजोग्या होत्या. त्या पाहणे गरजेचे होते. तसेच त्याला काय मर्यादा पडू शकतात तेही पाहणे गरजेचे होते.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार खेळाला जास्त प्राधान्य दिलं गेलं. वर्गावर्गात शिक्षकाने फक्त खेळ शिकवावं व खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा. जेणेकरुन विद्यार्थी खेळानुसार शिकतील. तसा महेश तसं शिकवीत होता.
शासनाचं हे म्हणणं बरोबर होतं. खेळाच्या माध्यमातून शैक्षणिक विकासच नाही तर सर्वांगीण विकास होवू शकतो. करता येतोही. कारण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात खेळायला जास्त आवडतं. परंतू यात एक मर्यादा आहे. ती म्हणजे गोंधळ होण्याची. ती नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिकवीत असतांना होणारा गोंधळ...... .....त्यातच त्याला रागावताही येत नाही, अशावेळी शिक्षकाने काय करावे हा प्रश्न नवीन शैक्षणिक धोरण कर्त्याने सोडविलेला नव्हता.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार महेश कृतियुक्त शिकविण्यावर जास्त प्रमाणात भर देत असे. त्यासाठी ते शिक्षकाला नाचायला सांगत. हेही अगदी बरोबरच होतं. जो शिक्षक नाचून बाळगून शिकवेल. त्या शिक्षकांचे नृत्य पाहून विद्यार्थी देखील नाचतील आणि नाचत नाचत शिकतील. परंतू यात एक मर्यादा म्हणजे पन्नाशी ओलांडणा-या आणि त्याहीपेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना पायाच्या दुखण्याच्या समस्या होत्या सांध्याच्या समस्या होत्या. बरेचसे शिक्षक विकलांग गटातून होते की ज्यांची नियुक्ती सर्वसामान्य शाळेत झाली आहे. अशा शिक्षकांनी कसे नाचून शिकवावे हाही एक प्रश्न होता. तो नवीन शैक्षणिक धोरण बनविणा-यांनी विचारात घेतलेला नव्हता.
नवीन शैक्षणिक धोरणात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला होता. यात स्मार्टफोन व टैबचाही वापर अनिवार्य केला होता. नवीन शैक्षणिक धोरण कर्त्याचं म्हणणंच होतं की मुले मोबाईल माध्यमातून जास्त शिकतात. त्यांना गुगलवर एका क्लिकवर सा-या जगाची माहिती मिळते. धोरण कर्त्याचं हे म्हणणं बरोबर होतं. परंतू यात बरेच दोष होते. पहिला म्हणजे जे शिक्षक शिकवीत. ते शिक्षक स्वतःच विद्यार्थ्यांना शिकविण्याचे सोडून आपल्या वैयक्तीक कामाकरीता वर्गामध्येही मोबाईल हाताळत बसत. व्हाट्सअप, फेसबूक व इंन्टाग्रामही पाहात असत. यात विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत होते. तसेच दुसरा महत्वाचा दोष म्हणजे वर्गात सर्वच विद्यार्थी श्रीमंत होते असे नाही. काही काही विद्यार्थी गरीबही राहात. असे विद्यार्थी स्मार्टफोन घेतील कुठून? सरकार काही सर्वांना टैबची व्यवस्था पुरवू शकत नव्हते. तसेच काही काही शाळेत या तंत्रज्ञानानुसार शिकवायचे झाल्यास ओव्हरहेड प्रोजेक्टर नव्हते. मग नेमके शिकवायचे कसे? हाही प्रश्न धोरण कर्त्याने सोडवला नव्हता.
अलिकडं सरकारनं मुल्यमापन प्रक्रिया अतिशय सुलभ करुन टाकली होती. शंभर गुणांपैकी अर्धेअधिक गुण हे आकारीक अर्थात विद्यार्थ्यांच्या गुणदोषावर दिलेले होते. याचाच अर्थ असा की कोणीही शाळाबाह्य ठरु नये. सर्वजण शिकावे. उच्च शिक्षण नाही शिकले तरी चालेल. परंतू प्राथमिक शिक्षण त्यांनी पुर्ण करायला हवं.

************************************************

शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात. ते जो पिणार तो कोणत्याही संकटांना घाबरणार नाही असंही म्हटलं जातं. हे अगदी बरोबर. परंतू हे कोणीही सांगत नाही की त्या वाघिणीचं दूध काढणार कसं? जो काढेल, तो हिंमतवान मर्द समजावा. याचाच अर्थ असा की वाघिणीचं दूध काढणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवणे होय.
महत्वाचं म्हणजे मुल्यमापनाचा मार्ग हा खडतर संकटांचा मार्ग असतो. तो पार केलाच नाही तर विद्यार्थ्यांना जीवनातील परीक्षा कशी कळेल. म्हणून मुल्यमापन प्रक्रिया महत्वाची. चांगल्या मुल्यमापनातून संकटावर मात करता येते.
नवीन शैक्षणिक धोरण जुन्या दोन्ही शैक्षणिक धोरणासारखंच होतं. थोडाफार फरक होता.......याचा अर्थ असा की दारु तीच होती. परंतू ती वेगवेगळ्या रंगात मिश्रीत करुन व वेगवेगळी पैकिंग करुन वेगवेगळ्या डब्यात भरलेली होती. फरक एवढाच की ती देशी होती की विदेशी हे सांगणं कठीण होतं.
महेशला शिक्षणक्षेत्राची माहिती होती. या क्षेत्रात काम भरपूर होतं. दररोज काही बाही माहिती मुख्याध्यापक मागत असे आणि ती गोळा करायला जीवाची त्रेधातिरपीट उडवत शिक्षक खपत असत. अशातच त्याला सरकारचं धोरण हे रात्र थोडी आणि सोंगे फार असंच वाटत होतं.

**********************************************

महेश मुख्याध्यापक बनला होता. त्याच्यासमोर आव्हान होतं कामाचं. संस्थाचालकांनी त्याला मुख्याध्यापक म्हणून बढती दिली होती. सध्या शिक्षणक्षेत्रात शिकविण्याऐवजी कागदं रंगवायचे काम जास्त होते. त्यातच बहुुतःश कामकाज ऑनलाइन असल्यानं रोजच व्हाट्सअपवर नवनवीन माहिती भरण्याचे पेव सुटले होते. एक काम संपतच नाही तर दुसरं काम येवून ठेपत होते. त्यातच उन्हाळी सुट्ट्या. त्यामुळे सगळे शिक्षकवृंद सुटीवर गेलेले असतांनाही ही हजामत करण्यासाठी त्यांना शाळेत बोलवावे लागत होते. बिचारे काही शिक्षक सुट्ट्या असतांनाही ही कामं व्यवस्थीत पार पडावी म्हणून शाळेत येत होते. परंतू या कसरतीत काही शिक्षक असेही होते की ज्यांना वर्ग एके वर्ग अशाच प्रकारे वागत होते. त्यांना या लिखीत कामाचं काही एक सुतोवाच नव्हतं
शिक्षणक्षेत्रातील ही व्हाट्सअपवर येणारी रोजची पत्र. ही माहिती भरा. ती माहिती भरा अशा प्रकारचा कामाचा रेटा. त्यातच ही माहिती भरण्यासाठी सीमीत वेळ. त्यातच काही काही शाळांना बाबू आणि शिपाईही होता. त्यांचं ठीक होतं. परंतू ज्या शाळेत बाबू शिपाही नव्हता. शिक्षकही सुटीवर होते. त्या शाळेतील मुख्याध्यापकानं काय करावं? कशी ही माहिती भरावी? हा प्रश्न होता महेशसमोर. त्याला रात्ररात्र झोपही येत नव्हती. शिवाय या माहितीतून काय साध्य होणार आहे? हाही एक प्रश्नच होता.
काही शाळेचं ठीक होतं की ज्या शाळेत बाबू होते. शिपाही होते. तसेच मुख्याध्यापकही कायम स्वरुपाचा होता. परंतू ज्या शाळेत बाबू नाही. शिपाही नाही तसेच मुख्याध्यापकही कायम स्वरुपाचा नाही. त्या शाळेचं कसं? हाही एक प्रश्नच होता महेशसमोर. कारण संस्थाचालकांनी त्याला मुख्याध्यापक तर बनवलं खरं. परंतू पद बसत असतानाही त्याला कायम स्वरुपाचे मुख्याध्यापक पद दिले नव्हते. ते एक प्रभारी पद दिले होते.
प्रभारी मुख्याध्यापकालाही इतर शिक्षकांएवढंच वेतन मिळत होतं. परंतू त्यालाही उन्हाळ्यातील सुटीतील प्रवास भत्ता देय नव्हता. त्यालाही साहजीकच उन्हाळी सुट्ट्या होत्या. मग त्यानं शाळेतील ही लिखीत स्वरुपाची शैक्षणीक कामं कशी करावी? हाही प्रश्न महेशसमोर होता.
आज शिक्षणक्षेत्र अगदी गुंतागुंतीचं झालं होतं. कोरोनाच्या काळात शाळा बंद जरी असल्या तरी शिक्षकांना शिकविण्याचे काम होतेच. तरीही कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असा बहाणा करुन शासनानं उन्हाळ्यातही विद्यार्थ्यांच्या शाळा ठेवल्या आणि आता उन्हाळी सुटीत माहिती भरण्याचं सत्र चालवून शिक्षकालाच नाही तर मुख्याध्यापकांनाही पागल करण्याचं धोरण अवलंबलं.
महत्वाचं म्हणजे शिक्षकांना कशाला हवी सुट्टी? असं सरकार म्हणत होतं. ही ऑनलाइन माहिती भरणं हेही त्यांचं काम. असं सरकार म्हणत होते. साध्या साध्या गोष्टी ठीक होत्या. परंतू ही दररोजची पत्र कशाला हवीत आणि यातून साध्य काय होणार? काय साध्य करायचंय? ह्या बाबी अजूनही अनाकलनीय होत्या. परंतू शासन ते करायला लावतच होते. कारण त्यांच्या आज शिक्षकांना मिळणारे वेतन डोळ्यात खुपत होता. त्यामुळं ते शिक्षकांना कसे स्वस्थ बसू देतील! ही देखील बाब आश्चर्य करण्यासारखीच होती. हो मानावं लागेल की शिक्षक शाळेचा आत्मा होता. प्राण होता. जसे विद्यार्थी शाळेचे आत्मे होते तसे. परंतू त्यांनाही जीवन आहे. त्यांनाही घरदार आहे. त्यांनाही त्यांची वैयक्तीकता आहे. असं सरकारला वाटत नव्हतं. परंतू जर अशी शाळेची कामं असतील आणि तेही शाळेला सुट्ट्या असतांना. तर त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते. असं शिक्षकांना वाटत होतं. त्यातच मुख्याध्यापकाच्याही.
मुख्याध्यापक असा घटक होता की जो वेतन मिळते म्हणून शाळेला चोवीस तास बांधील होता. जरी तो एखाद्या समारोहात असेल आणि शाळेत कमीजास्त झाल्यास तो समारोह सोडून तत्काळ त्याला जावे लागत असे. हे केवळ वेतन मिळतं म्हणून करावं लागत होतं आपली वैयक्तीकता त्यागून. जणू तो शासनाचा गुलाम होता.

************************************************

विशेष म्हणजे शासनानं या बाबींकडे लक्ष द्यायला हवे होते की त्यांनी कामं करुन घ्यावी. कामाला कोणताच शिक्षक वा मुख्याध्यापक नाही म्हणत नाही. परंतू निदान उन्हाळा तरी त्यांना चांगल्या पद्धतीनं उपभोगू द्यावा. या काळात शाळेव्यतिरीक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनात बरीच कामं असतात. त्यांच्या परीवारात विवाह समारंभ असतात. त्यांच्या मुलांचे शाळा प्रवेश असतात. पत्नीला दिवसातून दोन तास द्यायचे असतात. परंतू शासनाच्या अशा प्रकारच्या धोरणानं वा कामानं घरी लक्ष देता येत नव्हते. त्यातच त्यांच्या मनाची घालमेळ सुरु होत होती. अशी घालमेळ की त्याचं घरी मन लागायचं नाही. यातच सारखी चिडचिड होत असे व याची परियंती त्याचा अपघात वा आत्महत्या यात होत असे. निव्वळ आणि निव्वळ विचार करीत असल्यानं.........
एक याबाबतीत वास्तविकता होती. नुकतंच शासनानं एका तारखेला शाळा सिद्धी भरायला लावली. त्यातच पसतीस पेजेसचा यु डायसप्लसचा फाम. त्यात बिंदू नामावली. एवढंच नाही तर आता विद्यार्थ्यांची माहिती भरणं. एक निपटत नाही तर दुसरं. तरीही प्रवास भत्ता मुख्याध्यापकाला नव्हता. कारण तो प्रभारी. परंतू तो प्रभारी जरी असला तरी त्याला शाळेत तर रोजच जावं लागत होतं ना. तसेच उन्हाळी सुट्ट्या ह्या इतर शिक्षकांना. त्यालाच का नाही हाही प्रश्न. इतर शिक्षक शाळेत राबतात. मग मुख्याध्यापक हा काय बसून राहतो? वैगेरे सा-याच गोष्टी. त्यातच वरुन धमक्या. कामं न झाल्यास वेतन थांबेल. तेव्हा शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी जगावं तसं हाही मुख्य पैलू. खरंच हे शासन आहे की शिक्षक मुख्याध्यापकाच्या जीवाचे कसाई आहेत तेच कळत नाही. यावरुन एक म्हण आठवते. ती म्हणजे रात्र थोडी सोंगे फार. खरंच शाळेतील इतर शैक्षणीक कामे करायला मुख्याध्यापकाजवळ व शिक्षकांजवळ पुरेसा वेळ नाही. वेळ कमी आहे व कामं जास्त आहेत.म्हणून शिक्षणक्षेत्रातील या कामाला पाहता रात्र थोडी व सोंग फार ही म्हण अगदी यथोयोग्य बसते. शासनानं कामं नक्कीच सांगावीत. पण जी कामं अत्यावश्यक आहेत ती. विनाकारणची कामं सांगून विनाकारणचा शिक्षकांवर ताण देवू नये. असे जर झाले तर प्रत्येक मुख्याध्यापक व शिक्षक उद्या वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. असंही महेशला वाटत होते.
शाळेत कामे जास्त होती. त्यातच शिकवायला वेळ कमी असायचा. त्यामुळं महेशला भिती वाटायची ती म्हणजे विद्यार्थी शाळेत टिकतील की नाही याची. त्यातच तो विद्यार्थी वर्गासाठी असलेल्या योजना आपल्या मतातून पालकांना सांगायचा. त्याला मदत इतरही शिक्षक करायचे. विद्यार्थी लाभाच्या योजनेची माहिती सांगीतल्यावर त्या योजनेतून फलश्रुती होत होती. मुलं शाळेला भरपूर मिळत होती.
शाळा........त्या शाळेतील विद्यार्थी.......... या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक. हे शिक्षक अहोरात्र मेहनत करीत असत. ते विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना शाळेव्यतिरीक्त जो वेळ खर्च होत होता. तो वेळ कोणीही मोजत नव्हता.

*********************************************
अलिकडे शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. लोकं म्हणतात की शिक्षकांकडे भरपूर वेळ असतो. त्याला सुट्ट्याही भरपूर असतात. पर्यायाने सांगायचे झाल्यास शिक्षकाएवढा कोणीच सुखी नाही. परंतू ते धांदात खोटे आहे. शिक्षकांना जरी सुट्ट्या भरपूर असल्या तरी त्याच्याएवढा दुःखी कोणी नाही. कारण त्याला चोवीस तासच आपला वेळ अध्यापनासाठी द्यावा लागतो. यात कोणी म्हणेल कसे? त्याला उत्तरही आहे.
शिक्षक शाळेत पाच साडेपाच तास शिकवतो. त्यातच तो दर्जेदार शिकविण्यासाठी घरीही अभ्यास करतो. त्याचं टिपण काढतो. ते टिपण वहीत लिहितो. ही जी प्रक्रिया असते. ही प्रक्रिया सदोदित चालते. हे पाहता शिक्षक सुखी वाटतो का? याचाच अर्थ नाही असा निघतो. तरीही त्याचेबाबत कोणी तसा विचारच करीत नाहीत.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणे शिक्षकांचेही आहे. जेव्हापर्यंत कोणी या शिक्षकी पेशात येणार नाही. तेव्हापर्यंत त्याला शिक्षकांचे दुःख समजणार नाही. तसंच दुःख विद्यार्थ्यांच्या जीवनातही आहे. त्यालाही दिवसभर शाळेत राबावं लागते. त्यातच जेव्हा तो घरी जातो. तेव्हा त्यालाही घरची मंडळी स्वस्थ बसू देत नाही. त्यालाही घरची मंडळी वेगवेगळ्या स्वरुपात निरनिराळी कामं करीत असतात. या अशाच कारणानं त्यांना शाळेत रमत नाही. शाळा त्यांना निरस व कंटाळवाणी वाटते. अशावेळी त्यांना शाळा निरस व कंटाळवाणी वाटू नये म्हणून शालेय प्रशासनानं त्यांच्यासाठी शाळेत विविध लाभाच्या योजना आणल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) शिष्यवृत्ती योजना.
विद्यार्थी शिकावा व त्याला शाळेत खर्च येवू नये म्हणून त्याला शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवितात व शिक्षणासाठी त्यांना आपल्या पालकांवर पैशाच्या बाबतीत जास्त अवलंबून राहावे लागत नाही.
२) पाठ्यपुस्तक योजना.
शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात. ही पाठ्यपुस्तके मोफत असतात. त्याचं शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना कंटाळा वाटत नाहीत.
३) मध्यान्ह भोजन योजना.
विद्यार्थी लाभाच्या योजनेत मध्यान्ह भोजन योजनेचाही समावेश होतो. अति दुर्गम तसेच शहरी भागातही काही विद्यार्थ्यांना घरी बरोबर जेवायला मिळत नाही. त्यातच ते उपाशी राहतात. त्याचं कारण त्यांच्या पालकांचं विश्वकोटीचं दारिद्रय. पालक हे गरीब असतात. त्यातच ब-याच पालकांना तीनच्या वर मुलं असतात. म्हणून सरकारनं ही योजना सुरू केली आहे. या माध्यमातून पुर्वीही शाळेत अंडे, दूध, उकळपेंढी मिळासची. त्यानंतर काही दिवसानं तांदूळ देणे सुरु केले होते. नुकतेच काही दिवसानंतर मध्यान्ह भोजन योजना सुरु केली आहे.
४) पैसे वाटप.
शाळेत शिष्यवृत्ती मिळत असली, पाठ्यपुस्तके मिळत असली, मध्यान्हभोजन असलं तरीही काही मुलं शाळेत येत नाही. अशावेळी ती शाळेत यावी म्हणून त्यांना पैसेही दिले जातात. याला उपस्थिती शुल्क (भत्ता) म्हणतात. हे शुल्क ज्या दिवशी जो मुलगा शाळेत येतो. त्यालाच मिळत असते.
५) वैद्यकिय विमा योजना.
वैद्यकीय विमा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शाळेत अपघात झाला किंवा घरीही गंभीर स्वरुपाचा अपघात झाल्यास त्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय विमा मिळत असतो. ह्या विम्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या गंभीर आजाराच्या वेळी मदत होत असते. जसे कोरोना आजारात ज्यांचे मायबाप मरण पावले. अशांना मदत म्हणून अनुदान रुपात काही रक्कम मिळाली.
६) समावेशीत शिक्षण योजना.
काही विद्यार्थी हे शाळाबाह्य असतात. ते बरेच दिवस शाळेत जात नाहीत. त्यातच त्यांचं वय वाढत जातं. तसेच त्यांना त्या वाढलेल्या वयात शाळेत बसायला लाज वाटते. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना अशी शाळेत बसायला लाज वाटू नये, म्हणून त्यांना त्यांच्या वयानुसार शाळेत त्या त्या इय्यतेत बसायची सरकारनं परवानगी दिली आहे. तसेच जी मुलं विकलांग आहेत ना दिव्यांग आहेत. त्यांनाही त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार रँम्पव्यवस्था किंवा ब्रेललिपीतून शिकविणे सुरु केले आहे.
७) तंत्रज्ञान योजना.
या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी तंत्रज्ञानाद्वारे शिकावा म्हणून सरकारनं त्यांना संगणक प्रणाली लागू केली आहे. या माध्यमातून सरकारने विद्यार्थ्यांना टैबचेही वितरण केले आहे नव्हेतर करीत आहे.
महत्वपूर्ण वस्तूस्थिती अशी की देशातील प्रत्येक बालकाला शिकण्याचा अधिकार असून त्यांनी शिकावं. त्याला सर्वकष ज्ञान मिळावं व तो शिक्षणाच्या टप्प्यावर चांगल्या गुणवत्तेवर जावा नव्हे तर या माध्यमातून त्याचा हातभार देशविकासासाठी लागावा हा सरकारचा उद्देश आहे. परंतू याला काही मर्यादा आहेत. ती मर्यादा अशी की या देशातील लोकं शासनाच्या वेगवेगळ्या योजना घेवून शिकतात व शिकून मोठी होतात आणि नोकरी करायला विदेशात जातात. त्यामुळं त्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाला होत नाही तर तो विदेशाला होतो. ही एक शोकांतिकाच आहे. त्यामुळं विशेष सांगायचं म्हणजे विद्यार्थी वर्गानं शिकावं व महत्वाच्या योजनांचा लाभही घ्यावा. स परंतू घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग देशात राहूनच देशाच्या विकासासाठी करावा. जेणेकरुन देश विकासाच्या क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर येईल व देशाचे जगात नाव होईल. तसेच देश सृजलाम सुफलाम होईल असे वाटते.
महेशची नावाजलेली शाळा. परंतू आज पटसंख्या कमी झाली होती. कारण आजूबाजूला काँन्व्हेंटचं प्रस्थ वाढलं होतं. शाळेत मुलं मिळविणं म्हणजे तारेवरची कसरत होती. तसा मोठा बिकट प्रश्न होता. तो प्रश्न मोठा सतावत होता. त्यासाठी महेश शाळेत मिळणा-या योजना तर सांगायचा. व्यतिरीक्त तो शाळेनं काय करायला हवं तेही विषद करायचा.
प्रत्येक शाळेनं विद्यार्थ्यांसाठी काय करायला हवं. असा जर विचार केल्यास किंवा हा विचार कोणालाही सांगितल्यास तो नक्कीच वेेड्यात काढेल त्यांना. कारण कोणीही नक्की आणि हमखास सांगेल की शाळा विद्यार्थ्यांसाठी काय करेल, शिकवेल. अजून काय करणार.
मुख्यत्वे आजच्या परीस्थीतीत शाळा काय करेल, शिकवेल. या जुन्या गोष्टी झाल्या. या गोष्टी जुन्या म्हणजेच १९६४ आणि १९८६ च्या शैक्षणिक धोरणातील झाल्या. आता नवीन शैक्षणिक धोरण तयार करताना या जुन्या गोष्टी टाकून द्यायच्या आहेत. तसेच नवनवीन गोष्टी घ्यायच्या आहेत. तसेच शिक्षकांनीही केवळ शाळेत राहून विद्यार्थ्यांना शिकवायचंच आहे, तसेच त्यांना शिकवीत असतांना त्या शिकविण्यात रंजकता आणायची आहे. तसेच अशी रंजकता केवळ निर्माण करतांना त्यांना स्वयंअध्ययन करायलाही प्रेरीत करायचे आहे.
मुख्यतः शाळेत प्रवेश देतांनाच काही बदल करायचे आहेत. तो बदल म्हणजे ज्या ज्या विद्यार्थी वर्गाला शिकायचे आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे. या व्यतिरीक्त त्यांना विशेष सोयी देखील पुरवायच्या आहेत. जसे कर्णबधीर विद्यार्थ्यांना पुढे बसविणे. अंध विद्यार्थ्यांना रँम्प लावून देणे. त्यांना ब्रेल लिपीद्वारे शिकविणे. तसेच जर मुलगा जास्त वयाचा असेल आणि तो जर शाळेत गेला नसेल तर त्याला तो ज्या वयाचा असेल, त्या वयानुसार त्याला शाळेत टाकणे. तसेच त्याला जरी त्या वर्गातील अभ्यास येत नसला तरी अतिरीक्त पुरक अध्ययन घेवून शिकविणे. विद्यार्थ्यांना नाचून बाळगून शिकविणे. या सर्व गोष्टी शिक्षकाला आपल्या शिकविण्यात आणायच्या आहेत.
शाळा म्हणून शिक्षकाला विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असतांना ही जी अपंग मुले आहेत. त्या मुलांकडे लक्ष देत असतांना आणि त्यांच्यासाठी शाळेत सोयी करीत असतानाच आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्यांचा उपचार. कारण जी मुलं अस्थीव्यंग आहेत. त्यांचे पालक हे अडाणी असतात. त्यांना आपल्या अस्थीव्यंग मुलाला उपचारासाठी कुठे न्यावे याचे साधे गणित कळत नाही. ते उपचारच करीत नाही. त्यामुुळं अशा विद्यार्थ्यांना जर शिकवायचे असेल तर आपण पुरेसा न्याय देवू शकत नाही. म्हणून अशा विद्यार्थ्यांवर उपचार झाला तर त्यांना पुरेपूर शिकविता येईल. म्हणूनच उपचार.
दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे जी मुलं शाळाबाह्य आहेत. अशा मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणायचं आहे. असे करीत असतानाच ती मुले शाळेत कंटाळवाणी होणार नाहीत हेही पाहायचे आहे. त्यासाठी त्याला वस्तुनिष्ठ ज्ञान द्यायला हवं.
विशेष बाब ही की त्या विद्यार्थ्यांना अजिबात मारायचे नाही. तर त्यांना प्रेमानं कुरवाळायचं असून त्यांना प्रेमानच हाताळायचं आहे. आता तो कुंभाराच्या मातीचा गोळा उरलेला नाही. त्याच्याजवळ आज ज्ञानभंडार आहे असं नवीन शैक्षणिक धोरण सांगतं. मग शिक्षकाला काय करायचं आहे तर त्याच्याजवळ जे ज्ञान आहे. त्या ज्ञानाला पाठ्यपुस्तकातील ज्ञानाशी जोडायचं असून पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा संबंध व्यवहारीकतेशी जोडायचा आहे. तेव्हाच त्या ज्ञानाचं उपयोजन करता आलं असं मानता येईल. आता सामान्य विद्यार्थी...... विकलांग मुलांकडे लक्ष पुरवता पुुरवता कधी कधी सामान्य विद्यार्थी वर्गाकडेही लक्ष देता येणे शक्य होत नाही. तेव्हा हेही शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं की अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही. त्यांनाही सर्वकष सातत्यपुर्वक ज्ञान मिळवता यावं. यासाठी शिक्षकाने प्रयत्न करायला हवा. जेणेकरुन अस्थीव्यंगच नाही तर सामान्य मुलेही शिकू शकतील. मुखत्वे विद्यार्थ्यासाठी शाळेनं असं काही करायला हवं की ते कोणत्याही परीस्थीतीत मागेच राहणार नाही व ते सातत्याने पुढे जातील हे तेवढंच सत्य आहे.
ज्याप्रमाणे शाळेनं काय करायला हवं याबद्दल महेश सांगायचा. त्याचबरोबर शाळेत गेल्यावर आपला फायदा काय होतो तेही तो सांगत असे. हे सांगण्यातून त्याला समाधान मिळत असे.
विद्यार्थ्यांना जुन्या काळात मातीचा गोळा समजण्यात येत असे. तो तसं पाहिल्यास मातीचाच गोळा असायचा. कारण त्यावेळी तंत्रज्ञान विकसीत नसल्यानं त्याला बाह्य जगाची कल्पना नसायची. परंतू आज ते तंंत्रज्ञान विकसीत आहे. टिव्ही, मोबाईल, स्मार्टफोन या आधुनीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाह्य जगाची ओळख होते. तरीही त्याला शाळेत जाण्याची गरज असते. त्याची कारणं पुढीलप्रमाणे देता येतील.
१) शिस्त लावणे.
लहान लहान ती बालकं. त्यांना व्यवस्थीत शिस्त लागलेली नसते. त्यांच्या शौचालयाच्या समस्येपासून तर सा-या अडचणी असतात. ज्यावेळी पहिल्या वर्गात मुल प्रवेश करतं किंवा नर्सरी मध्ये मुल प्रवेश करतं. तेव्हा पहिली सवय असते ती म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासानं लघवीला जाणं तसंच शौचही करणं . त्यांना अर्ध्या अर्ध्या तासानं भूकही लागत असते. या सर्व गोष्टीवर नियंत्रण आणण्यासाठी शाळा असते.
शाळेत वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं आलेली असतात. अशी मुलं शाळेत आल्यावर काही समंजसपणानं वागत असतात. त्यांना सांगावंच लागत नाही. अशा मुलांचं उदाहरण जे वागत नाहीत त्यांना देवून त्यांना शिस्त लावण्याचं काम शिक्षकवर्ग पुरेपूर करीत असतो. अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे गरजेचे असते. ती शिस्त पर्यायानं घरी लावता येत नाही. कारण घरी मुलं आपल्या वडील व आईला घाबरत नाही. त्यांचं ऐकत नाही. ती मुलं शाळेतील शिक्षकांचंच ऐकत असतात.
विशेष म्हणजे अलिकडे कोणालाही आपल्या आईचं ऐकणारा श्याम सापडत नाही की जो आपल्या आईचं ऐकून तसा वागेल. आज तसं पाहिल्यास श्याम पाठ्यपुस्तकातूनही अदृश्य झाला आहे.
विद्यार्थ्यांना अलिकडे शिस्त लावणे फार कठीण झाले आहे. कारण आजचं नवीन शैक्षणिक धोरण. त्यामुळं विद्यार्थ्यांना शिस्त कशी लागणार हाही एक प्रश्नच आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आज कोणत्याही विद्यार्थ्यांना मारता येत नाही. अपशब्द बोलल्यास त्याचा अपमानही होतो. अशावेळी विद्यार्थ्यांना शिस्त कशी लावायची हा प्रश्न शाळेतील शिक्षकांसमोर उभा ठाकलेला आहे. परंतू तरीही जी शिस्त घरी लागत नाही नव्हे तर लावता येत नाही. ती शिस्त शाळेत नक्कीच लागते हे निर्वीवाद सत्य असल्यानं मुलांना शाळेत पाठवावे लागते.
२) संस्कार करणे.
शाळेत मुलांवर संस्कार होत असतात. कारण शिक्षक केवळ शाळेत शिकवीतच नाहीत तर ते विद्यार्थ्यांवर संस्कार करीत असतात. त्यासाठी ते विद्यार्थ्यांना बालकथा, बोधात्मक कथा सांगतात. ते श्यामची आईदेखील विद्यार्थ्यांना सांगतात. विशेष म्हणजे ज्या गोष्टी पाठ्यपुस्तकात नाही, त्याही गोष्टी विद्यार्थ्यावर संस्कार करण्यासाठी शिक्षक शिकवीत असतात. ते विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकात असलेला शिवाजीच शिकवीत नाहीत. तर जो भाग पाठ्यपुस्तकात नाही, तोही भाग कथेच्या रुपात मांडत असतात. त्यात गुरुभक्त अरुणी असतो. मातृभक्त पुंडलिक व श्रवणबाळ असतो. लांडग्याची कथा असते. महाभारत रामायण असतं की ज्याला पाठ्यपुस्तकात अजिबात स्थान नाही. तसेच अंगुलीमाल आणि सिद्धार्थ गौतमाच्या कथा असतात की ज्या घरी कोणीही सांगत नाही. विशेष म्हणजे या सर्व प्रकारच्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. संस्काराची लागवड केली जाते विद्यार्थी वर्गात. हे तेवढंच सत्य आहे.
३) अद्ययावत माहिती.
शाळेत विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे इतिहास शिकवला जातो. तसा भुगोलही शिकवला जातो. त्यातच विज्ञान आणि बाकी सर्व गोष्टी. या सर्वांचा उपयोग करुन घेवून विद्यार्थ्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवलं जातं. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला जंगू दिलं जात नाही. त्यांची बुद्धी दिवसेंदिवस शाळेत जात असल्यामुळे विकसीत होत असते. त्यांच्या बुद्धीला चालना मिळत असते. ती चालना देण्याचं काम शाळेतच होतं. घरी होत नाही.
४) व्यावहारीक ज्ञान.
विद्यार्थी जसे इतिहास, भुगोल विज्ञान शिकतात. तसेच ते गणित देखील शिकतात. यातून त्यांना व्यावहारीक ज्ञान मिळत असतं. कोणत्याही दुकानात गेल्यावर किती रुपये द्यायचे. किती परत घ्यायचे या सर्व गोष्टी त्याला शाळेत गेल्यानं कळत असतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास तो हुशार होतो. त्याला कोणीही फसवू शकत नाही.
याबाबत आपण पुर्वीचा काळ पाहिला की ज्या काळात सावकार व जमीनदार लोकांना फसवत असत. एकदा का सावकाराकडून कर्ज उचललं की बस त्याला पुर्ण पैसे देवूनही त्याचं कर्ज कधीच फिटत नसे. तो सावकार व्याजावर व्याज लावून प्रसंगी त्या शेतक-यांच्या जमीनी हडप करीत असे. अशा कितीतरी लोकांना जमीनदार व सावकारानं पुर्वीच्या काळी भुमीहीन केलं होतं. हा इतिहास आहे. परंतू आज सर्व लोकांना शाळेतील पाठ्यपुस्तकातून ज्ञान मिळत असल्यानं त्यांचे व्यावहारीक कौशल्य वाढत आहे. तसेच त्यांना सरासरी फसवणं कठीण जात आहे.
५) पोट भरण्यासह इतर उद्देश.
आज शिक्षणाचा उद्देश हा केवळ पोट भरणे एवढ्यापुरता मर्यादित उरलेला नाही. पोट तर साधे किडे मुंग्याही भरत असतात. विशेष बाब अशी की या शिक्षणातून आजच्या काळात कोणाचा जीवही वाचू शकतो. तसेच आजच्या काळात या शिक्षणातून दूर देशाचा कोणालाही प्रवास करता येतो. त्यातच आजच्या शिक्षणातून वेगवेगळ्या गोष्टीला लागणारं तंत्रज्ञानही मिळविता येतं. त्याचबरोबर आपलं पोटंही भरता येतं. परंतू त्यासाठी आवश्यकता असते शाळेत जाण्याची. कारण ह्या सर्व गोष्टी शाळेतच शिकविल्या जातात. घरी नाही.
६) मान सन्मान.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. त्यांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही गोष्टीशी अपेक्षा नसते. तरीही ते शिकवितात आणि विद्यार्थीही शिकतात.
विद्यार्थी जर जास्त शिकत असतील तर त्यांचा सन्मानही तेवढाच वाढतो. जर तो विद्यार्थी शिकलाच नाही तर त्याचा सन्मान वाढत नाही. याबाबतीत एक उदाहरण देतो. जसे एखाद्या कार्यालयात एखादा व्यक्ती आपल्या कामानिमित्य गेल्यास आणि तो निरक्षर आढळून आल्यास त्याला तेवढा मानसन्मान त्या कार्यालयात मिळत नाही. तसेच त्याचे कामही होत नाही. तसेच तो जिथे राहातो. तिथेही निरक्षर व्यक्तीची निरक्षरता पाहून तेवढा मानसन्मान मिळत नाही. महत्वपूर्ण गोष्ट अशी की शिक्षणाच्या माध्यमातून लोकांचा मानसन्मान वाढतो व तो मानसन्मान शाळेतूनच मिळत असतो.
७) रोगप्रतिकारक शक्ती साठी ज्ञान.
आता नवीन काळ. या काळात नवनवीन आजार येत आहेत. कोरोना याच काळातील आजार.
पुर्वीही असे आजार येत नव्हते असे नाही. असे आजार यायचे. तेव्हा महामारी आली असं वाटायचं. त्यावर रोगनिदान सापडायचं नाही. अशावेळी या महामारीत भरपूर लोकं मरण पावायचे. आज मात्र तसं नाही. आज रोग आला रे आला की त्याला नियंत्रीत करण्यासाठी त्याच्या लसी ताबडतोब संशोधन केल्या जातात. ही लस संशोधन करणं मोठं जिकीरीचं काम असतं. परंतू ते संशोधन करणं हे शाळेत गेल्यामुळंच शक्य होतं. कारण रोगांना लागणारे पेटंट हे लिखीत स्वरुपाचे असतात. ते वाचन करणे हे साधारण निरक्षर व्यक्तीला कळत नाही. यासाठी शाळा आवश्यक असते.
८) परीस्थीतीची अद्ययावत माहिती.
शाळेत गेल्यानं परीस्थीतीची अद्ययावत माहिती मिळत असते. शाळेत विद्यमान परीस्थीतीत चालू असलेल्या घडामोडीवरही परीपाठाच्या वेळी भाष्य केलं जातं.
९) नेतृत्व क्षमता.
देशाला शाळेत गेल्यानं नेतृत्व मिळत असते. उदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते शाळेत जावून शिकले. ते एवढे शिकले की त्यांना संविधान लिहिता आलं. जर ते शिकले नसते तर त्यांना संविधान लिहिता आलं नसतं. हा सगळा बदल शिक्षणानं झाला. महत्वाचं म्हणजे हे शिक्षण कुठं मिळालं असा विचार केला तर तो निश्चीतच शाळेत मिळालं असं नक्कीच म्हणता येईल. म्हणून आजच्या काळात शाळा महत्वाची. शाळा हे उत्तम नेतृत्व घडविण्याचं माध्यम आहे.
१०) देशाला बळकटी. आत्मनिर्भर होण्यास संधी.
अनेक उपयोगीक ठिकाणी आपल्याला शिक्षणाचा उपयोग होतो. कोणत्याही प्रकारचा फाम भरायचा असेल तर लिहिता वाचता येणं गरजेचं असतं. हे लिहिता वाचता शाळाबाह्य असलेल्या व्यक्तीला येत नाही. म्हणून शाळा महत्वाची असते.
महत्वाचं म्हणजे शिक्षण असेल तर तो व्यक्ती कुठेही राहू शकतो. कुठेही राहून पोट भरु शकतो. कुठेही प्रवास करु शकतो नव्हे तर तो आत्मनिर्भर होवून जीवन जगू शकतो. त्याला कुणावरही अवलंबून राहावे लागत नाही. प्रत्येक गोष्ट मग ती कठीणात कठीण का असेना, तो हाताळू शकतो.
१०) संकटावर मात.
शाळा असं माध्यम आहे की या शाळेत गेल्यानं जी आत्मनिर्भरता माणसाला देण म्हणून मिळते. त्याचबरोबर त्याला या शाळेतील शिक्षणाच्या भरवशावर संकटावर मात करण्याची प्रेरणाही मिळते. तो व्यक्ती जीवनातील मोठ्यात मोठ्या संकटावर मात करु शकतो. हे सत्य आहे.
आज शाळेची लोकांना फार मोठी गरज आहे. केवळ आज तंत्रज्ञानाचा काळ आहे आणि मोबाईल माध्यम आहे म्हणून सा-याच गोष्टी मोबाईलवर मिळत असल्या तरी पुरेपूर ज्ञान मोबाईल माध्यमातून मिळत नाही. ते ज्ञान शाळेतच मिळत असते. म्हणून आजच्या काळात तरी शाळा हे महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळं शाळेत गेल्यानं केवळ आपलाच विकास होतो असे नाही तर इतरांचाही विकास करता येतो. त्याचबरोबर शाळेत शिकविलेल्या ज्ञानानं नवनवीन संशोधन करुन देशाला आपण बळकटीही देवू शकतो. म्हणून शाळा ही व्यक्तीच्या जडणघडणीसाठी महत्वाची आहे. हे सत्य आपण मानायलाच हवं हे नाकारता येत नाही.
काही काही शिक्षक मंडळी शिकविण्यात आळस बाळगत असत. त्या लोकांना महेश आवर्जून सांगायचा की पुनर्जन्मावर विश्वास ठेवा. जर का आपण या जन्मात शिकवलं नाही ना तर पुढील जन्मातही आपल्याला कोणी शिकविणार नाही. म्हणूनच चांगले कर्म करा.
आपलं शरीर...... शरीर हे अनेक व्याधींची जननी आहे. या शरीरात नाना प्रकारचे रोग होत असतात. जे रोग शरीराला घातक असतात.
शरीराला रोग का होतात? असा जर कोणी प्रश्न विचारल्यास त्याचं नेमकं उत्तर आपल्याला सापडतं. ते म्हणजे ताणतणाव. आपण नेहमीच ताणतणावात वावरत असतो. आपण जर या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार दिला नाही तर अद्या ही सृष्टीही आपल्याला माफ करणार नाही. कारण ही बालकं सृष्टीचीच निर्मीती आहे. असं महेशला वाटायचं.
माणूस जन्मल्यापासून तर मरतपर्यंत माणसाला टेन्शन असतं. परंतू ते आपल्याला दिसत नाही की जन्मतः बरोबर कोणतं टेन्शन असतं माणसाला? होय, जन्मतः बरोबरही टेन्शन असतं. कधी भूक लागली आणि आईनं दूध पाजायला केलेला उशीर हे लहान बाळाचं टेन्शन. काही काही काही मुलं नाजायज पैदा होतात. तेव्हा त्याची आई त्याला कच-यात फेकून देते. तेही त्या लहान बाळाला टेन्शन. त्यातच काही काही मुलांना जन्मतःच व्याधी असतात. त्यावेळी त्या लहान बाळालाही इंजेक्शनं टोचली जातात. तेव्हा तेही त्या लहान बाळाचं टेन्शन. अलीकडे तर लहान बाळाला शौचालयाची जागाच राहात नाही हेही लहान बाळाचं टेन्शन नाही का? काही काही लोकं बाळाचा गुप्त धनासाठी बळी देतात. हेही टेन्शन नाही का? कधी बाळाला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू होतो. हेही बाळासाठी टेन्शन नाही का? त्यावेळी बाळ अनाथ होते.
हळूहळू बाळ मोठा होतो. त्यावेळी त्याला त्याची आई मरण पावल्यास अगदी लहानपणापासूनच अनाथाचं जीवन जगावं लागतं. बाप दुसरा विवाह करुन मोकळा होतो. कधीकधी तर मायबाप दोघंही मरण पावतात. तेव्हाचं तर जीवन अगदी असह्य असतं.
आज सरकार शाळेच्या माध्यमातून सांगत असतं की ताणतणाव रहीत राहा. परंतू अशी मुलं कशी ताणतणाववीरहीत राहतील. कोणी कितीही अशा मुलांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. तरी त्या मुलांचं दुःख कोणीच दूर करु शकत नाही. आपलं दुःख आपल्यालाच दूर करावं लागतं.
दुःखाबाबत सांगायचं झाल्यास दुःख येण्याला भाग्याची जोड असते असं म्हातारी माणसं म्हणत होती. कोणी म्हणायचे की पुर्व जन्मात आपण पाप केलं असेल, म्हणून आपल्याला त्याचे भोग म्हणून असे दिवस पाहायला मिळाले. परंतू भाग्याला आजचा काळ मानत नसल्यानं ते पुर्वजन्माचं पापपुण्य समजता येत नाही. परंतू एका अर्थानं विचार केल्यास ज्यावेळी माता जन्म दिल्यानंतर बाळालाय फेकून देते. हे फेकून देतांना ज्या बाळाला ती फेकून देते, त्या बाळाचा कोणता दोष असतो? ह्याला पुर्वजन्माचं पाप म्हणता येवू शकते. कारण कदाचित मागील जन्मात त्याच आईला तिचा जन्म झाल्यानंतर त्या बाळानं फेकून दिलं असेल हे नाकारता येत नाही.
आजकाल जन्म घेतांना काही काही मुलांचा जन्म अशा ठिकाणी होतो की त्या ठिकाणी धड बाळाला पोटभर खायला मिळत नाही. तसेच काही काही बाळाचा जन्म अशा ठिकाणी होतो की ज्याच्या पायाशी सुख लोळण घेत असतं. ह्याला काय समजावं? त्याला पुर्व जन्माचं पापपुण्य समजता येत नाही तर काय?
अलिकडे कोरोनाच्या काळात हाच अनुभव आला. काही काही काही माणसं धडधाकट असूनही तसेच ती उत्तम प्रकारची काळजी घेवूनही ती कोरोनानं मरण पावली. अन् काही काही माणसं धडधाकट नसूनही व कोणत्याही प्रकारची काळजी न घेवूनही जगत आहेत. यालाही पापपुण्य समजता नाही येवू शकत काय? हे आपलं पापपुण्यच आहे. परंतू जो मानेल किंवा समजेल. त्याला ते पापपुण्य कळेल.
महत्वाचं म्हणजे आपले चांगले कर्म आपल्याला चांगलं फळ देवू शकतात. तसेच आपले वाईट कर्मच आपल्याला वाईट कर्म प्रदान करतात. कोणी म्हणतात की आपण जे कर्म करतो. त्याचे फळ त्याच जन्मात प्राप्त होत असते. कारण असा जन्म वा पुनर्जन्म कोणीही पाहिलेला नाही. परंतू हे जरी खरं असलं तरी पुनर्जन्म नाही असं म्हणता येत नाही वा मानता येत नाही. पुनर्जन्म असेल व जे पापकर्म वा पुण्यकर्म या जन्मात भोगता आलं नसेल, ते भोगायला दुसरा जन्म नक्कीच मिळत असेल. म्हणून चांगले कर्म करा व चांगले फळ चाखायला दुसरा जन्म घेवून अवश्य या. कारण आपण जे बीजारोपण करु, तेच फळ आपल्याला चाखायला मिळेल. आंब्याच्या झाडाला कधीच संत्री लागणार नाही. तसंच कर्माचंही आहे. त्यामुळं वाईट कर्माचं रुपांतरण कधीच चांगल्या कर्मात होणार नाही. वाईट कर्माचं फलित वाईटच निघेल आणि चांगल्या कर्माचं फलित चांगलं. मग कितीही जन्म घेतले तरी कर्माचं फळ कधीच बदलणार नाही आणि हिच सत्य गोष्ट आहे वस्तुस्थितीला धरुन. ही सत्य बाब कधीच नाकारता येत नाही.
ते शिक्षणक्षेत्र.......त्या शिक्षणक्षेत्रात राबता राबता वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. तशी त्याची आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडणं व्हायची. कारण तो तिलाही वेळ देवू शकत नव्हता. सतत वर्तमानपत्रातून लिहिणं व सतत विद्यार्थ्यांना सर्वकष शिक्षण देणं याचाच तो विचार करीत असे. तसं एकदा असंच पत्नीसोबत त्याचं भांडण झालं. तसा तो विचार करु लागला. त्यात त्याचीच त्याला चूक कळून आली. त्याचं चुकलं होतं. तसा त्यानं त्याबद्दल एक लेख लिहिला. तो फार गाजला होता.
ती शाळा व ती शासनाकडून येणारी वारंवार पत्र. ती कामं लिखीत अर्थातच ऑफलाईन तसेच ऑनलाईन. ती कामं करताना त्रेधातिरपीट उडत असे. त्यातच महेश घरी येताच त्याला घरातीलही कामंही त्याची पत्नी सांगत असे. त्यामुळे आधीच थकलेल्या महेशला ती घरची कामं करणं जड जात असे. त्यामुळे घरी सतत भांडणं व्हायची. पर्याय राहायचा नाही.
पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही प्रेम निरतिशय करावं. कारण पत्नी पतीसाठी आयुष्यभर झटत असते. ती त्याच्या अखंड आयुष्यासाठी सर्वच व्रतवैकल्ये करते. मग त्यात वटपौर्णीमा असो, की हरतालिका व्रत असो, करवाचोथ व्रत असो की इतर बरेच काही असो, स्री ही पुरुषांसाठी झटत असते. त्याला जेव्हा ती पती मानते. तेव्हा त्या पतीला ती सर्वस्व मानते. त्यातच ती हे व्रत करीत त्याच्या अखंड आयुष्यासाठी विधात्याजवळ प्रार्थना करीत असते.
प्रेम...... आयुष्यात बहुतःश मुलं मुली प्रेम करतात. विवाहापुर्वी संबंध ठेवतात. एक स्री....... ती जेव्हा वयात येते, तेव्हा ती कोणावर तरी प्रेम करायला लागते. ती त्या पुरुषावर निरतिशय प्रेम करते. परंतू ज्यावेळी तिचा विवाह ठरतो. तेव्हा ती ते प्रेम वैगेरे सारं सोडते व आपला पती म्हणून मायबापानं सांगीतलेल्या मुलाचा स्विकार करते. त्यातच त्या भेटी, आठवणी, फिरणे, या सर्वच गोष्टीचा त्याग करते आणि पती जे म्हणेल त्यानुसार वागते. हे तेव्हापर्यंत घडते, जेव्हापर्यंत तो पती तिचं ऐकतो. परंतू जर तो पती तिचं ऐकत नसेल तर....... तर तिच्या मनात त्याच्याबद्दल असु़या निर्माण होते. याची परीयंती सतत भांडणं, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध यामध्ये होते.
पतीवर निरतिशय विश्वास करणा-या स्रिया. ......हा आपला भारत देश. या देशात आपली वेगळी अशी पुरातन संस्कृती आहे. ही संस्कृती पतीला देव मानणारी आहे. कारण तो पती जो बाहेर कामाला जातो आणि घरी आपल्याला पोसतो ही त्याची ओळख. ही ओळख आजपर्यंत होती. कारण स्रीयांना आतापर्यंत कळत नव्हतं की त्या काहीच कळत नाही. फक्त पतीवर अवलंबून असतात. तसा दबावही होता वडीलधारी माणसांचा. त्याचं कारण होतं की एखाद्याची स्नुषा जर बरोबर वागली नाही. तर तिच्या माहेरची मंडळी तिच्याशी नातेच तोडत असत. कारण त्यांना भीती असायची की त्यांच्या गावचे लोकं त्यांच्या या मुलीच्या वागण्यामुळं त्यांना वाळीत तर टाकणार नाही. कारण असंच घडत होतं. परंतू कालांतरानं तिला समजलं की आपल्याला आतापर्यंत मुर्ख बनवलं गेलं. आपण तर घरी आपल्या बाहेर कामाला जाणा-या पतीपेक्षाही जास्त कामे करतो. आजही एक स्री कामाला तर जाते आपल्या पतीएवढेच काम ती करते आणि घरी आल्यावर स्वयंपाकही. परंतू पती घरी आल्यावर काहीच करीत नाही.
एक स्री...... एकदा का तिचा विवाह झाला की ती पती एके पती करीत त्याचेसाठी आयुष्यभर झटते नव्हे तर त्याला आपला समजते. परंतू बदल्यात पती काय करतो. तिला चटके देतो. दररोज दारु पिवून येतो. तिला मारझोड करतो. पत्नी आपला आधारस्तंभ असते. ती आपल्याला आधार देते नव्हे तर चांगली पत्नी मिळाली की आपल्याच घराचा उद्धार होते. अशावेळी ती जर आपला उद्धार करु शकते तर आपण तिच्यासाठी झटलं पाहिजे की नाही. तिच्यावर प्रेम केलं पाहिजे की नाही. तिनं जर म्हटलं की दारु पिवू नका. तर आपण तिच्यासाठी ती प्यायला नको की नाही. परंतू आपण ते मुळातच करीत नाही.
महत्वपूर्ण गोष्ट ही की एक पती म्हणून आपण तिच्यावर निरतिशय प्रेम करावं आणि तिनंही आपल्यावर आपला समजून निरतिशय प्रेम करावं. परंतू आज असं घडतच नाही. आज काही काही पती आपल्या पत्नीवर जसं प्रेम करीत नाहीत. तशा अपवाद म्हणून काही स्रियाही आहेत. त्याही आपल्या पतीवर प्रेम करीत नाहीत. त्या विवाह करतात केवळ नावापुरता. अंगाला हळद लागावी म्हणून. एकदा का अंगाला हळद लागली रे लागली की त्या पतीच्या घरी येतात. परंतू त्यांना पतीत्वाचा दर्जाच देत नाही. तो पती फक्त नावापुरता राहतो. त्यांचे पती दुसरेच असतात. महत्वाचं म्हणजे आपला हा भारत देश संस्कारक्षम असतांना आपले असे वागणे बरोबर नाही. आपण असे वागू नये. आपण कधीही विवाह बाह्य संबंध ठेवू नये.
आपण विवाह केला ना. मग तो पती कसाही राहो, त्याला सुधारायचा विचार करावा. माहितीसाठी सांगतो. पती पत्नीच्या इशा-यावर चालतो. जर असं करायचं नसेल तर स्रियांनी विवाह करु नये. पतीनही पत्नीच्या आदेशात वागावं. असे विवाहबाह्य संबंध ठेवू नये. त्यानं तिच्यावर प्रेम करावं. तिनंही त्याचेवर. यालाच संसार म्हणतात. विशेष म्हणजे संसार म्हणजे बैलगाडीची दोन चाकं. एक डगमगला की गाडी चालत नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसेच त्यानुसार वागायला पाहिजे म्हणजे झालं.

************************************************

विद्यार्थी शिकावे असे महेशला वाटत होते. त्याचबरोबर शिक्षकांनीही शिकावं असं त्याला वाटायचं. तो शिकला होता. म्हणूनच त्याला शाळेचा कारभार चालवता येत होता. त्यातच त्याला ब-या वाईट गोष्टी कळत होत्या. अजूनही तो शिकतच होता. कारण त्याला संपूर्ण शिक्षण क्षेत्र ढवळून काढायचं होतं. त्याला वाटत होतं की विद्यार्थी शाळा शिकत असतात व शिक्षक त्यांना शिकवीत असतात. शिक्षक जीव ओतून शिकवितात व विद्यार्थी देखील जीव ओतून शिकतात. अशावेळी शिक्षक जे शिकवितात, ते विद्यार्थी वर्गानं किती आत्मसात केले. ते पाहणे गरजेचे असते. ते पाहण्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक असते. याला शिकविण्याच्या भाषेत मुल्यमापन असं म्हणतात.
हे मुल्यमापन. या मुल्यमापनासाठी प्रश्न काढणे अनिवार्य असते. तेव्हाच त्याची उत्तरंही लिहिता येतात. या प्रश्नावलीत प्रश्नांची काठीण्यपातळी ही विद्यार्थी वर्गाचा स्तर पाहून तयार केली जाते.
वर्गात असे कितीतरी विद्यार्थी असतात की जे अति हुशार असतात. काही विद्यार्थी हे कमकुवत असतात. तर काही मध्यम स्वरुपाचे. परंतू मुल्यमापन करीत असतांना प्रश्नावलीत प्रश्न या तिनही स्तराच्या विद्यार्थ्यांंना सोडविता यायला हवे असे काढायला हवेत. परंतू काही काही शिक्षकांना ते जमत नाही. ते एकाच स्तराचे प्रश्न काढतात. याची कारणं खालीलप्रमाणे सांगता येतील.
१) पहिलं म्हणजे शिक्षकांचं अज्ञान. काही काही शिक्षक हे अज्ञानी असतात. त्यांना शाळेत शिकवायचा कंटाळा येतो. परंतू वेतन मिळतं, म्हणून कसेतरी ते शाळेत येत असतात व शिकवीत असतात. त्यांना प्रश्नावलीत प्रश्न कसे काढायचे याचीही कल्पना नसते. कारण प्रश्ननिर्मीतीचं प्रशिक्षण झालं तरी ते त्यांच्या लक्षात नसतं. त्यामुुळं या सर्व अज्ञानीपणामुळं शिक्षक हे दर्जेदार प्रश्ननिर्मीती करु शकत नाही व दर्जेदार प्रश्ननिर्मीतीला कालसापेक्ष मर्यादा पडतात.
२) सस्थाचालकांचे हितसंबंध.
काही शाळेत संस्थाचालकाचे हितसंबंध हे सलोख्याचे असतात. काही तर नातेवाईकही असतात. अशा शाळेत शिक्षक जरी शिकवीत नसला तरी त्याला त्या शाळेतील मुख्याध्यापक काहीच म्हणत नाहीत. त्यामुळं साहजिकच तो शिक्षक अभ्यास करीत नाही व त्यामुुळं त्याला दर्जेदार प्रश्न निर्मीती कळत नाही.
३) शिक्षकांचा आळसपणा.
काही शाळेत शिक्षक संस्थाचालकाचे नातेवाईक तर असतातच. व्यतीरीक्त संस्थाचालकांचा त्यांचेवर वरदहस्त असल्यानं असे शिक्षक हे आळशी बनतात. अशावेळी प्रश्ननिर्मीती करतांना शिक्षकांनी अभ्यास न केल्यानं त्यांना दर्जेदार प्रश्ननिर्मीतीच करता येत नाही.
४) उद्बोधन वर्ग
पुर्वी अशा प्रश्ननिर्मीती व मुल्यमापनावर उद्बोधन वर्ग असायचे. कोणत्यातरी केंद्रात शिक्षकांचं प्रशिक्षण असायचं. ते चालायचं. सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठपर्यंत वा कधी मुक्कामी हे प्रशिक्षण असायचं. हे प्रशिक्षण होत असतांना त्या आठ दिवसात नृत्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा व्हायच्या. त्यातच या आठ दिवसात शिक्षक एवढा प्रशिक्षित व्हायचा की त्याला वर्षभर सांगावंच लागत नव्हतं की विद्यार्थी वर्गाला काय शिकवावं. ते उन्हाळी सत्रात उद्बोधन वर्गात प्रशिक्षित झाल्यानं त्यांना विद्यार्थी वर्गाला शिकविण्याचं गणित जमायचं. त्यातच दर्जेदार प्रश्ननिर्मीतीचं कौशल्यही. परंतू अलिकडे असे उद्बोधन वर्ग बंद झाल्यानं आज दर्जेदार प्रश्ननिर्मीती शिक्षकांना करताच येत नाही.
५) वयोमर्यादा व विसराळूपणा
अलिकडे शिक्षकांच्या निवृत्तीचं वय हे अठ्ठावन आहे. शासन त्याचं वय साठ वर्ष करण्याच्या मागावर आहेत. परंतू या मार्गात जसजसं वय वाढतं. तसतसा त्यांचा विसराळूपणा वाढीस लागतो. हा विसराळूपणा वयाच्या चाळीस वर्षापासून सुरु होतो. अशावेळी या विसराळूपणामुळं प्रश्ननिर्मीती समजत नाही व त्याला मर्यादा पडतात.
दर्जेदार प्रश्ननिर्मीती करण्यासाठी काही उपायही आहेत.
१) शिक्षकांचे उद्बोधन वर्ग घेणे.
२) शिक्षकांना ते जरी नातेवाईक असले तरी त्यांना नातेवाईक न समजणे.
३)वयोमर्यादेेचा विचार करुन शिक्षकांच्या निवृत्तीचे वय कमी करणे.
४) शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षित करणे.
५)शिक्षकांंचा आळसपणा दूर करणे.
महत्वाचं म्हणजे शिक्षकांना विनयशिल व नवरत्नाची खाण समजलं जाते. तो जर सुदृढ असला तर तो विद्यार्थी वर्गाला चांगलं शिकवेल. तसेच तो जर प्रशिक्षित असला तर तो चांगलं मुल्यमापन करु शकेल. तसेच दर्जेदार प्रश्ननिर्मीतीही करु शकेल हे निश्चीतच नाकारता येत नाही. त्यासाठी शिक्षकांना केवळ पदविका अभ्यासक्रमच नाही तर सतत जीवनात स्वतःला संस्थाचालकाचे नातेवाईक न समजता शिकणे गरजेचे आहे हे तेवढंच खरं.
महेश आज प्रभारी मुख्याध्यापक बनला होता. तो जेव्हा शिक्षक होता. तेव्हा त्याला वाटत होतं की मुख्याध्यापक सुखी असतो. परंतू तो जेव्हा मुख्याध्यापक बनला, तेव्हा तर त्याला फार मोठी अडचण जाणवत होती. आता तर किंचितही वेळ त्याला मिळत नसे. सततची दगदग दूरच. तो अगदी त्रासून गेला होता. परंतू काय करणार. मुख्याध्यापक पद सोडावसं वाटत होतं. परंतू ते त्याला भ्याडपणाचं लक्षण वाटत होतं.
प्रत्येक शाळा. ती शाळा चालावी म्हणून म्हणून त्या शाळेत मुख्याध्यापक नियुक्त केलेला असतो. हा मुख्याध्यापक शाळेचं प्रशासन चालवत असतो. तो जे काम करतो. त्यालाच मुख्याध्यापकाचे कर्तव्य असे म्हणतात. हा मुख्याध्यापक शाळेत देखरेख ठेवतो. तो शिक्षकाचे वेतन करणे, विद्यार्थ्यांना सुखसोयी देणे, जमाखर्च ठेवणे, शिक्षक शिकवितात की नाही ते पाहणे, विद्यार्थ्यांचे दाखले देणे, पालकांना सांभाळणे, शासनाला सांभाळणे आणि महत्वाचं काम म्हणजे आपल्या मालकाला सांभाळणे ही महत्वाची कामे करीत असतो.
मुख्याध्यापक हा शाळेचा कणाच असतो. तो जर नसेल तर ती शाळा डोकं नसलेल्या शरीरासारखी होते. नव्हे तर हा मुख्याध्यापक चांगल्या स्वभावाचाही असावा. उदा. ज्या जहाजाचा कप्टान चांगला ती जहाजं फारशी डुबत नाहीत. याचा अनुभव सांगतो.
एक अशीही शाळा की त्या शाळेत पुर्वी जो मुख्याध्यापक होता. तो अरेरावी स्वभावाचा होता. परंतू त्याला तसा स्वभाव ठेवणे रास्त होते. त्याला कारण होतं तो शाळेचा मालक. मालक पुष्कळ बेकार होता.
मुख्याध्यापक अरेरावी स्वभावाचा. त्यामुुळं ती शाळा बुडत चालली होती जहाजासारखी. परंतू मालकाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आता शाळा पुर्णतः नेस्तनाबूत होणार. अशावेळी तो मुख्याध्यापक अकस्मात मरण पावला. त्यामुुळं शाळेत पुरता काही दिवस गोंधळच उभा होता. कारण मुख्य म्हणजे जहाजाचा कप्तानच गेला होता. त्यानंतर काही दिवसानं तिथं दुसरा कप्तान बसला व पुन्हा नव्यानं शाळा वळणावर आली.
असा हा शाळेचा मुख्याध्यापक. शाळेसाठी झटत असतो अहोरात्र. परंतू त्यांच्या मेहनतीला काही कवडीची किंमत नसते. जसा एखाद्या देशाचा पंतप्रधान. तो कितीही चांगला असला तरी त्याला विरोधी पक्ष नावबोटं ठेवतच असतात. तसंच शाळेचं आहे.
मुख्याध्यापक हा शाळेचा सर्वेसर्वा असतो. परंतू त्यालाही त्याच्या मनासारखे निर्णय घेता येत नाहीत. कारण त्याचेही वर कोणीतरी वरदहस्त असतो. तो वरदहस्त चांगला असेल तर ती शाळा नावारुपाला येते. नाहीतर ती शाळा बुडते. हे सत्य आहे आणि ही सत्यता नाकारता येत नाही.
मुख्याध्यापक शाळेत सर्वेसर्वा समजून कर्तव्य करीत असतांना त्यांना कोण अडवतं? असा जर प्रश्न केला तर यामध्ये दोन घटक कारणीभूत ठरतात. पहिला म्हणजे त्या शाळेचा संस्थाचालक व दुसरा घटक म्हणजे शिक्षणाधिकारी. हे दोन्ही घटक मुख्याध्यापकाचे प्रमुख शत्रू असतात. तसं पाहता त्याचे मित्र कमी व शत्रूच जास्त असतात. त्याच्या शत्रूंमध्ये त्या भागातील पालक तसेच विद्यार्थी, त्या भागातील नगरसेवक तसेच त्या शाळेतील शिक्षक.......हे सर्व घटक त्याचे शत्रू असतात. तो जर चांगला वागेल तर हे सर्व मित्र.
मुख्य शत्रूंमध्ये त्या शाळेतील संस्थाचालक, याचा समावेश होतो. त्याचं कारण म्हणजे संस्थाचालकाला शाळेच्या माध्यमातून पैसा कमवायचा असतो. जर मुख्याध्यापक हा इमानदार असेल तर त्यावेळी संस्थाचालकाची गोची होते. म्हणून तो शत्रू. त्यानंतर दुसरा शत्रू म्हणजे त्या भागातील शिक्षणाधिकारी. हाही घटक संस्थाचालकासारखाच. परंतू थोडा वेगळ्या स्वरुपाचा. त्यालाही पैशाची भूक असते. तोही शिक्षकांच्या नियुक्ती व बाकी गोष्टींमध्ये शाळेकडून पैसा उकळत असतो. जर असा पैसा त्या शाळेतील मुख्याध्यापकाने त्याला वा त्याच्या चमुला न पुरविल्यास तो आणि त्याची चमू त्या मुख्याध्यापकाची शत्रू बनत असते.
मुख्याध्यापकाचे अलीकडे पालकही शत्रू आहेत. कारण एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास न आल्यास एखादा पालक त्याची तक्रार करु शकतो वा एखादी दुखापत झाल्यासही तो पालक त्या मुख्याध्यापकाची तक्रार करु शकतो. नव्हे तर तो मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचाही शत्रू असतो. जर त्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकानं मारहाण केली तर...... किंवा त्या विद्यार्थ्यांची शालेय कामं न केली तर.
अलीकडे मुख्याध्यापक शाळेतील सर्व कामं व्यवस्थीत पार पाडत असतात. परंतू वरील प्रकारच्या लोकांकडून त्याला समस्या येत असतात. अशा समस्या की त्या अडचणीच्याच वाटतात. त्यावेळी तो व्यवस्थीत काम करु शकत नाही. अशावेळी शाळा बुडत जर असेल तर त्याला दोषी समजण्यात येते. परंतू त्याचा दोष मुळातच नसतो.
मुख्यतः मुख्याध्यापक हा शाळेचा कणाच असतो. त्याला अभय देण्याची गरज आहे. त्याला जर अभय दिलं नाही आणि वरील प्रकारच्या सर्वच घटकांनी त्यांना त्रास दिला तर तो खचून जाईल व कोणीही दुसरा मुख्याध्यापक बनायला पुढे येणार नाही. अर्थातच शाळा बुडेल आणि शाळाच नसतील तर विद्यार्थी घडणार नाही. राहणारही नाहीत आणि ज्या देशात विद्यार्थीच राहणार नाही. तो देश देश म्हणून संबोधला जाणार नाही हे तेवढंच सत्य आहे.

********************************************

महेश नेहमी सांगत असे आपल्या शाळेत चांगल्या चांगल्या गोष्टी. ज्या चांगल्या गोष्टीनं शिक्षकांमध्ये उर्मी भरत असे व ते नव्या जोमानं काम करीत असत. त्यानं नवीन शैक्षणिक धोरणाबाबत केलेलं मार्गदर्शन वाखाणण्याजोगे होते.
नवीन शैक्षणिक धोरण आलं होतं. ते येण्यापुर्वी विशेष गरजा असणा-या मुलांना वेगळ्या शाळा होत्या. परंतू आता या नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्याही विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेतच शिकवावे लागत असे. त्यामुळं अशा मुलांसाठी महेशसमोर मोठा बिकट प्रश्न उभा राहिला. कारण शिकविण्यासाठी एका वर्गातील शिक्षकांसाठी पुरेसा वेळ नसतांना याही मुलांना शिकवावे लागत असे. टाळता येत नव्हते. त्यातच अशी विशेष गरजा असणारी मुलं वर्गात फार गोंगाट करीत. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षकालाही वेडं झाल्यागत वाटत असे. त्यातच त्यांचा टाहोही असे. आम्हालाही शाळेत घ्याहो.
अशा मुलांना अध्ययन अक्षमतेची मुलं म्हणत. त्या मुलांना शाळेत कोणी घेत नसे. मुलांना त्रास होतो म्हणून. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिकविताना कोणत्या गोष्टीचा अध्यापन पद्धतीत विचार करावा? असा प्रश्न प्रत्येकाला पडत असे. कारण अशी मुलं शिकवितांना शिक्षकाला फार त्रास होत असे.
अध्ययन अक्षम याचा अर्थ असा की शिकण्यास तयार नसणारे. याचाच अर्थ असा की ज्यांचा बुद्ध्यांक अतिशय अल्प असा आहे.
महत्वपूर्ण वस्तूस्थिती अशी की ज्याचा बुद्ध्यांक अति अल्प आहे. अशी मुलं कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही. त्यांना कितीही चांगलं शिकवलं तरी. कारण ते आपल्याच तालात मग्न असतात.
अशी अध्ययन अक्षम असलेली मुलं........ त्यांना शिक्षणक्षेत्रात विकासाच्या टप्प्यावर नेत असतांना त्यांच्यात उत्साह भरण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागते. कारण एकच एक गोष्ट अशा मुलाला वारंवार शिकवावी लागते. जी गोष्ट शिकवितांना नाकी नव येतं. याचं कारण म्हणजे त्याची विस्मरण शक्ती. ती मुलं, त्या मुलांना जेही काही शिकवलं तरी ते सारं एका क्षणात विसरत असतात.
अशी मुलं शिकवितांना काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहेत. ते महत्वपूर्ण मुद्दे असे.
१) वस्तू दाखवणे
अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल तर वस्तू दाखवूनच शिकवावे लागते. ती वस्तू त्या विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायमची टिकते. कारण तसं जर शिकवलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना काहीच कळत नाही व पाहिजे त्या प्रमाणात ते विद्यार्थी ज्ञानसंपादणूक पातळी संपादन करु शकणार नाहीत.
२) चित्रफिती वा चित्रफलक दाखवणे.
अशा अध्ययन अक्षम असणा-या मुलांना शिकवायचे झाल्यास त्यांना अशा चित्रफिती दाखवणे गरजेचे आहे. ते ज्ञान त्यांच्या अद्ययावतपणे चिरकाल लक्षात राहात असते.
३) कार्टून फिल्म दाखवणे.
अशा विद्यार्थ्यांना कार्टून फिल्म जास्त आवडत असतात. तेव्हा शिक्षकाने ज्या कार्टून चित्रपटाला कुसंस्काराचं माध्यम समजलं जातं. त्या कार्टून चित्रपटाचा वापर अशा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नक्कीच करावा. जेणेकरुन तो अनुभव अशा विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहिल.
४) सहल व शिबीर आयोजन.
अशा विद्यार्थ्यांसाठी शिबीर व सहलीचे आयोजन करावे. जेणेकरुन त्यांना वस्तूस्थितीचं ज्ञान यथायोग्य मिळेल व तो अनुभव चिरकाल त्यांच्या स्मरणात राहिल.
५) क्रिडास्पर्धेतील सहभाग व आयोजन.
अशा विद्यार्थ्यांसाठी क्रिडास्पर्धा आयोजीत कराव्यात. तसेच त्यांचा आवर्जून त्या स्पर्धेत सहभागी करुन घ्यावे. जेणेकरुन त्यांनाही शिक्षणात रंजकता वाटेल.
महत्वपूर्ण गोष्ट ही की आपण ऐकले असेल की जे शास्रज्ञ झाले, कलावंत झाले. त्यांचाही बुद्ध्यांक लहाणपणी कमीच होता. जसं सचिन तेंदूलकर लहाणपणी पाहिजे तेवढे हुशार नव्हते. परंतू आज ते क्रिकेटचे भगवान आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. थॉमस अल्वा एडीसन हा विजेच्या बल्बचा शोध लावणारा शास्रज्ञ. तो कधीच शाळेत गेला नाही. परंतू त्यानं विजेचा शोध लावला. तसेच त्याने वेगवेगळे शोध लावले. याचा अर्थ असा त्यांचा बुद्ध्यांक अभ्यासाच्या बाबतीत कमी होता असा नाही. फक्त तो बुद्ध्यांक शाळेतील पाठ्यपुस्तकात रमला नाही तर सचिनचा क्रिकेटमध्ये रमला व थॉमसचा विजेच्या बल्बमध्ये वा संशोधनात.
अलिकडे अशी भरपूर मंडळी आहेत की जी अजिबात शाळेत गेली नाहीत. परंतू मोठी झालीत. लहानपणी त्यांना वेडंच म्हटलं जाई. परंतू कालांतरानं ते थोर शास्रज्ञ झाले. काही चित्रपट अभिनेते झाले तर काही कलावंतही.
महत्वाचं म्हणजे शिकायला विद्यार्थी अध्ययन अक्षम आहे. त्यांचं कसं करावं? हा प्रश्न महत्वाचा नाही. तो पुढे चांगला निघावा. तसेच त्याच्याही बुद्धीचा देशासाठी वापर व्हावा ही आशा बाळगणं महत्वाची गरज आहे. कदाचित त्याच विद्यार्थ्यांमधून एखादा शास्रज्ञ निघाला तर...... बस...... याच गोष्टीसाठी त्याला शिकवणे गरजेचे आहे. बाकी आपण सर्वजण जाणतोच आहोत.

********************************************

ऑनलाईन कामं व शाळेची कामं करीत असतांना महेशजवळ पुरेसा वेळ नव्हता. आज पुरेसा वेळ नसतांना काही महेश आपल्या पत्नीला पाहिजे तसा वेळ देवू शकत नव्हता. त्यामुळं रोजची भांडणं. ह्या भांडणानं महेश त्रासला होता. तसं त्याला वाटायचं की खरच पुरुषांंना स्वातंत्र्य आहे काय? त्याला वाटत असे की शाळेत शासनाची कटकट ऐका व घरी पत्नीची. अरे नोकरी करुन जो पैसा येतो, त्या पानावर घर चालतं. त्यामुळे नोकरी करणं आपली आवश्यक गरज आहे. असं त्याला वाटायचं त्यामुळे तो शासनाची कामं आवर्जून करायचा. परंतू त्याला वाटायचं की घरची कामं त्याच्या पत्नीने स्वयं करावी. पतीला त्रास न देता. परंतू पत्नीची किती कामं करणार. तिही स्वयंपाक पाणी, भांडी धुणे कपडे धुणे, मुलाबाळांचं करणे इत्यादी कामं करता करता थकून जायची.
आजचा काळ धकाधकीचा होता. या काळात संविधानानुसार पुरुष आणि महिलांना समान स्थान दिलेले होते. त्यानुसार सर्वांना समान संधीही प्राप्त झालेली होती. त्यानुसार प्रत्येक स्री पुरुष समानतेने वागत होता. असे असतांना आजही तीस प्रतिशत महिलांना विशेष स्थान प्राप्त नव्हते. काहींना होते. अजूनही त्या पुरुषांच्या हातच्या कळसुत्र्या बाहुल्याच ठरत होत्या.
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झालेले असून भारतीय संविधान हे १९४९ ला बनलं होतं. तसेच ते २ जानेवारी १९५० ला लागूही झालं होतं. त्यानुसार महिला व पुरुषांना समान अधिकार मिळाले होते. परंतू त्याच अधिकाराचा गैरवापर होताना दिसून येत होता. आज काही पुरुषांवर अत्याचार होत असलेले दिसत होते. आज विवाह होवून घरात पत्नी म्हणून आलेली महिला पुरुषांना आपल्या हातचे कळसुत्री बाहुले तर बनवतच होती. तसेच अत्याचारही करीत होती. असे वास्तविक चित्र आज जनमानसात अगदी स्पष्टपणे दिसत होते. त्यानुसार आज घरी विवाह होवून आलेली महिला सर्वात प्रथम आपला वचक निर्माण करण्यासाठी आपल्या पतीच्या नातेवाईकांना तोडत होती. त्यानंतर सुरु होत होता तिचा अत्याचार.
वास्तविक जीवनात स्रीला कमजोर समजत पुरुषांना ताकदवार समजलं जातं. त्यानुसार ती पुरुषांवर. अत्याचार करुच शकत नाही. असं चित्र दिसतं. परंतू ते धांदात चूक आहे. आज बरेचसे पतीवर्ग कित्येक आपल्या पत्नीचा मार खातांना दिसतात. ही देखील एक शोकांतिकाच आहे. परंतू बरेचसे पुरुषवर्ग आपल्या इगो समस्येमुळे आपली नाचक्की होवू नये म्हणून गप्प राहतात. बरीचशी पती असलेली पुरुष मंडळी स्रीयांपुढं लोटांगण घालत तिचे शब्द न् शब्द ऐकतात व तिच्या माहेरच्या मंडळींची सेवाही करतात. परंतू ब-याचशा घरात ती मात्र आपल्या पतीच्या टाळते. ती त्यांची सेवा करीत नाही. उलट ती ज्या मायबापांनी त्याला जन्म दिला. त्याच मायबापांना वूद्धाश्रमात टाकायला सांगते. त्यावेळी विचार येतो की आपण विवाह नसता केला तर बरे झाले असते. ही मानसिकता आज प्रत्येक घराघरातून पाहायला मिळते.
आज अशी नवीन नवरी म्हणून घरी आलेली मुलगी आपल्या म्हाता-या सासूसास-यांना नीट जेवनही देत नाही. रात्रीचं जेवन सकाळी अर्थात शिळं जेवन त्यांना मिळत असतं. त्यातच हे शिळं जेवन खावून समजा पोटात काही गडबड झालीच तर त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांना जेवनच मिळत नाही. याला स्री अत्याचार नाही म्हणता येईल तर काय? हाही स्री अत्याचारच आहे. परंतू याकडे लक्ष कोण देतं, कोणीच नाही. कारण म्हाता-या माणसाचं आज कोणीच ऐकायला तयार नाही.
आजही साधा चष्मा तुटला तरी पुरुष बोलण्याच्या आधी ती स्रीच बोलते की कशाला गरज आहे चष्म्याची. त्यातच डोळे तपासणे दूरच.
हे म्हातारपण. या म्हातारपणात शरीरात रक्त कमी तयार होतं. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत असते. या काळात वेगवेगळे आजारही बळावतात. डोळ्यावर मोतियाबिन्दू आलेला असतो. त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं असतं. परंतू घरी मुलगा हा आपल्या पत्नीचंच ऐकत असतो. कारण ती त्याला सर्रास धमकी देते की माझं जर ऐकणार नसशील तर मी माहेरी किंवा तुला सोडून चालली जाईल. अर्थात निघून जाईल. हे वक्तव्य ती त्यावेळी करते, ज्यावेळी तिला दोन मुलं झालेली असतात. काही पुरुष हे विकृत मानसिकतेचे असतात. ते काही अशा महिलांचं चालूच देत नाहीत. काही मात्र चांगल्या स्वभावाचे असतात. त्यांना भीती वाटते की खरंच त्याची पत्नी त्याला सोडून गेली तर........ कारण तसे इतर मित्रांच्या बाबतीत घडलेलं असतं.
म्हातारी माणसं मात्र आपण पुर्व जन्मात काही पाप केलं अशी मानसिकता ठेवून गप्प बसतात. बिचारे आपला मुलगा सुखी राहावा अशी मानसिकता बाळगून. काही काही महिला तर याच स्वातंत्र्याचा फायदा घेवून त्यांचा पती जीवंत असतांना परपुरुषांशी संबंध ठेवतात. ते पतींनाही दिसतं. परंतू तो काहीही बोलू शकत नाही. कारण मुलं झालेली असतात आणि तेव्हा भीती वाटते की आपली ही पत्नी आपल्यालाच नाही तर आपल्या मुलाबाळांनाही सोडून त्या परपुरुषासोबत निघून जाईल. मग आपल्याच मुलाबाळांची आबाळ होईल. ती तशी जातेही. असं बरेचदा घडलेलं आहे. काही अंशी केवळ महिलाच जबाबदार असतात असेही नाही. पुरुषही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार असतात. हे तेवढंच सत्य आहे.
पुरुष हा स्रीला दुषणे देणारा व्यक्ती. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ती कितीही चांगली वागली तरी तिला तो दोष देत असतो. याच मानसिकतेतून समजा ती एखादे वेळी कोणाशी बोललीच तर पुरुषवर्ग तिच्यावर शंका घेतो. त्यात त्याला असंख्य वेदना होतात. अशा वेदना की तो कोणाला त्या वेदनेविषयी सांगू शकत नाही. प्रसंगी तो त्या वेदना विसरण्यासाठी तो व्यसनाचा आधार घेतो. मुख्सतः दारुचा. ही त्याची दारु दिवसेंदिवस वाढत जाते. ती एवढी वाढते की ती त्यांच्या पत्नींना सहन होत नाही. मग घटस्फोट व रोजची भांडणं इत्यादी गोष्टी घडतात.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की आजच्या काळात संविधानाचं राज्य आहे. त्यानुसार प्रत्येकजण कायद्यासमोर समान आहे. कोणीच लहान वा मोठा नाही. मग ते लहान बालक असेल वा एखादा वयोवृद्ध व्यक्ती. ती स्री असेल वा तो पुरुष. ते झाड असेल वा एखादा प्राणी. प्रत्येकाला कायद्यानुसार जगण्याचा अधिकार आहे. तेव्हा आजच्या काळात कोणी कोणाचा गुलाम नाही. त्यामुुळं महिला असो की पुरुष यांनी एकमेकांना कमजोर समजू नये वा गुलामागत वागणूक देवू नये. पुरुषांनी स्रीयांना समानतेचा अधिकार द्यावा. कारण तसा अधिकार संविधानानं दिलेला आहे. तिला सर्व गोष्टी करण्याचं बंधन नसावं. तसंच स्रीयांनीही संविधानानं स्वातंत्र्य दिलं म्हणून उहापोह करु नये. स्वातंत्र्याचा स्वैराचार करु नये. पुरुषांची मानसिकता लक्षात घेवून त्यावर अत्याचार करु नये. तसेच म्हाता-या सासूसास-यांवर तर अजिबात नाही. तेही तुमच्या मायबापासारखेच असतात. हे लक्षात घ्यावे. महेशला असं करणं आवडत नव्हतं. त्याला वाटत होतं की प्रत्येक नं आपल्या मायबापाची सेवा करावी. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनाही समानतेची वागणूक द्यावी.

***********************************************

शिक्षणक्षेत्रात आलेला नवोपक्रम असाच उपक्रम होता. तोही शिकवायचा होता. परंतू तो कसा पूर्ण करायचा हे काही शिक्षकांना कळत नव्हतं. तसा त्याबाबत शासन काही उद्बोधनवर्ग घ्यायचे. महेश शिबीरात जायचा. ते मार्गदर्शन ऐकायचा व ते मार्गदर्शन आपल्या शाळेत करायचा. त्याला आता नवीन शैक्षणिक धोरण आवडायला लागलं होतं. कारण त्याची थोडी फार तोंडओळख त्याला झाली होती. तरीही त्याला नवीन शैक्षणिक धोरणानं विद्यार्थी शिकणार का? असे वाटत होते.
शिक्षक शिकवीत असतात. त्यांच्या शिकविण्यात नवीन उत्साह असतो. तसं पाहता ते उत्साहानं शिकवीत असतात. परंतू ते शिकवीत असले इमानीइतबारे तरी त्यांच्या शिकविण्यात पाहिजे तेवढी धार नसते. त्याचे कारण म्हणजे त्यांची कल्पक दृष्टी. हा कल्पक दृष्टीकोनच त्यांच्या आड येत असतो.
अलीकडे शासनानं नवीन शैक्षणिक धोरण तयार करताना नवोपक्रमावर जास्त भर दिला होता. विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून त्यालाच स्वतःला स्वतःचे अध्ययन करण्याची संधी दिली होती. त्यानुसार त्याला प्रकल्प देणे, स्वाध्याय देणे, सहली आयोजीत करणे, शिबीर आयोजीत करणे इत्यादी गोष्टींना नवीन शैक्षणिक धोरणात प्राधान्याने अग्रक्रम दिलेला होता. तसेच या प्रकल्पाअंतर्गत शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार बनविलेल्या प्रकल्पाचे शालेय स्तरावर व पुढे राज्यस्तरीय प्रदर्शन भरविण्याच्या शिफारशीही शासनाने केलेल्या होत्या.
प्रकल्प करणे. त्या प्रकल्पाची मुद्देसुद माहिती लिहिणे. प्रकल्प पुर्ण करण्यासाठी स्वतःची धावपळ करणे. त्यासाठी संदर्भ साहित्य शोधणे, ऐन प्रकारे याला त्याला माहिती विचारणे. त्यातून नाविण्यपुर्वक आपला प्रकल्प बनवून तो सादर करणे ह्या कृती विद्यार्थी करत असे त्या माध्यमातून. यालाच नवीन शैक्षणिक धोरणाच्या भाषेत नवोपक्रम म्हणत. अशाच प्रकारच्या नवोपक्रमाला नवीन शैक्षणिक धोरणात अग्रक्रमाने प्राधान्य दिलेले होते. विद्यार्थी नवोपक्रम आवडीने करीत. कारण महेशचं मार्गदर्शन फारच जोरदार असायचं.
नवोपक्रमाला लागणारी साधनं शोधण्याचे विवीध मार्ग कोणते असा जर विचार केल्यास सातत्याने काही मार्ग सुचविता येतील. ते मार्ग आफलाईन व ऑनलाइन पद्धतीचेही असतात.
आफलाईन मार्ग.
१) पहिला म्हणजे लोक. लोकमाध्यम हा नवोपक्रमाला लागणारा योग्य मार्ग आहे. यात विद्यार्थी असे संशोधन करीत असतात. काही लोकांना विचारात घेवून त्यांचे विचार करुन मार्ग काढतो. ते विचार प्रत्यक्षात जरी संशोधनात मांडत नसला तरी त्या विचारीतून त्याच्या संशोधनाला मजबूतता मिळते.
२) लिखीत साधने.
लिखीत साधनांना या नवोपक्रमात अतिशय महत्व आहे. हा नवोपक्रमाचा आफलाईन मार्ग आहे. यामध्ये जेही काही लेखकांनी लिहून ठेवलेले साहित्य आहे. ते साहित्य विद्यार्थी वाचन करतो व त्याद्वारे टिपणे घेवून व त्यात काही आपले शब्द टाकून संशोधन करतो. तसेच आपले संशोधन अति उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करतो नव्हे तर प्रयत्नपुर्वक त्यात यशही प्राप्त करतो.
३) वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमे. नवोपक्रमासाठी आफलाईन मार्गात वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमाला अनन्यसाधारण महत्व आहे. या माध्यमातून विद्यार्थी नवोपक्रमाला लागणारी माहिती वाचन करतो व ती माहिती संग्रहित करुन त्या माहितीच्या संप्रेषण माध्यमातून वाटचाल करीत असतो.
४) सहलीला जाणे वा प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे. नवोपक्रमाला लागणा-या साधनात आफलाईन पद्धतीत सहल किंवा प्रेक्षणीय स्थळ भेटींना जास्त महत्व आहे. त्याला लागणारी माहिती हे प्रेक्षणीय स्थळ भेटीच्या माध्यमातून मिळत असते.
नवोपक्रमाला लागणा-या साधनात ज्याप्रमाणे आफलाईन साधनाला महत्व दिले गेले आहे. तसेच महत्व ऑनलाईन साधनालाही दिले गेले आहे. या साधनात प्रामुख्याने मोबाईलच्या खालील गोष्टीचा समावेश होतो.
१) गुगल
स्मार्टफोनवर गुगल असं माध्यम आहे की त्यात एका टिचकीवर सर्व माहिती एका क्षणात प्राप्त होते. त्याचा वापर करुन आपण नवोपक्रमाला लागणारी सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतो.
२) फेसबुक
फेसबुक वरुनही आपण नवोपक्रमाला लागणारी सर्व माहिती मिळवू शकतो. फक्त फेसबुकवर प्रश्न विचारावा लागतो.
३) मेसेंजरवर लोकांशी बोलून आपल्याला हवी ती माहिती मिळवता येवू शकते. तसेच त्या माहितीची टिपणे लिहून आपलं संशोधन अधिक मजबूत करता येवू शकते.
४) व्हाट्सअप
नवोपक्रमाला लागणारी माहिती व्हाट्सअप च्याही माध्यमातून मिळू शकते. कारण व्हाट्सअप वर एवढे ग्रृप असतात की प्रश्न टाकताच त्याचं उत्तर मिळू शकतं.
५) इन्टाग्राम
इन्टाग्रामच्या माध्यमातून आपण आपल्याला माहित नसलेली माहिती एका क्षणात मिळू शकते. तसंच प्रश्नाचे उत्तरही मिळू शकते.
६) ट्विटर
या माध्यमातून नवोपक्रमाला लागणारी माहिती मिळवता येवू शकते.
७) कोरा
Quora कोराच्या माध्यमातून नवोपक्रमाला लागणारी माहिती मिळवता येवू शकते.
याशिवाय इतरही अनेक ऑनलाईन मार्ग आहेत.
महत्वाचं म्हणजे शिक्षक जो आतापर्यंत आळशी बनलेला वाटत होता. तो या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आळस झटकून कामाला लागणार असून विद्यार्थीही सर्वगुणसंपन्न बनणार आहे व त्यातच विद्यार्थ्यांचे संशोधन वाढीस लागणार आहे.
अलिकडे विद्यार्थी शिकावा म्हणून ही सर्व साधनं......... काही ऑफलाईन काही ऑनलाइन. या माध्यमातून खरंच विद्यार्थी शिकणार का? असा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. तर या बाबतीत सांगतांना मी एवढंच म्हणेल की विद्यार्थी नक्कीच शिकेल. कारण यात शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांच्या कृतीवर जास्त भर देण्यात आला आहे. या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी वर्गाला केवळ बघ्यांच्या वा श्रोत्यांच्या भुमीकेत ठेवलं नाही. त्याच्या विचार करण्यावरही भर दिला आहे. त्याचेही मत विचारात घेतले आहे. त्यातच त्याला सर्वगुणसंपन्न बनविण्यावर जास्त भर दिला गेला आहे. यातून ख-या अर्थानं विद्यार्थी घडेल व देशाचा आदर्श नागरीकच नाही तर एक संशोधक म्हणून तो जगासमोर येईल हेही तेवढंच खरं आहे.

************************************************

गतवर्षी संगीता मरण पावली होती. तिला कोरोना झाला होता. तो कोरोना की ज्या रोगामुळं शाळा बंद होत्या नव्हेतर जनजीवनही विस्कळीत झालं होत. त्याच कोर्टानं संगीतालाही नेलं होतं महेशपासून कितीतरी दूर. एवढं दूर की जिथून ती कधीच परत येवू शकत नव्हती.
एक वर्ष पूर्ण झालं होतं. तो आता निवृत्त झाला होता. त्यातच नातवंड सांभाळत होता. आज त्याला अगदी हायसं वाटत होतं. परंतू पत्नीची आठवण येतच होती. ती आठवण त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती.
तो शिक्षक बनला . पुढे मुख्याध्यापकही बनला. परंतू त्या शिक्षक पेशात असताना व मुख्याध्यापक पदावर असताना त्याचा छळच झाला होता. शेवटच्या काळापर्यंत त्याला कायम स्वरुपाचे मुख्याध्यापक पद मिळाले नाही. ती एक त्याच्या जीवनात राहिली होती. कायम मुख्याध्यापक बनण्याची. पटसंख्या असूनही संस्थाचालक नंतरच्या काळात फेव्हरेबल नसल्याने त्याला ते पद बसत असतानाही त्याला त्या पदाचा लाभ मिळू शकला नाही. उलट गुलाम असल्यागत हमाली करावी लागली.
ती संगीता त्याला त्या काळातील आधार ठरली. कारण ज्यावेळी तो थकत असे, त्यावेळी ती संगीता नित्यनेमाने त्याला सांत्वना देत असे. म्हणत असे की हे परमेश्वराचे कार्य आहे. जणू तुम्हाला सोपवलेले. ते कार्य केल्यास तुमचे योगदान व्यर्थ जाणार नाही.
संगीताचे असे बोल ऐकताच महेशचं अंतःकरण भरून येई व तो नव्या दमानं कार्य करीत असे.
आज त्याचं शाळेतील जणू परमेश्वराने सोपवलेले कार्य संपले असले तरी एक कार्य बाकी होतं. ते कार्य म्हणजे प्रभारी पदाचा लाभ मिळवून घेणं. कारण तो निवृत्त झाला असला तरी त्याचा खटला न्यायालयात अजूनही सुरूच होता. त्यानं प्रभारी मुख्याध्यापकालाही कायम स्वरुपाच्या मुख्याध्यापकाएवढंच वेतन द्या ही मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. ज्याचा निर्णय न लागल्याने ती याचिका तो निवृत्त होवूनही प्रलंबीत होती.
महेशला निवृत्त होवून आता दोन वर्षे पूर्ण झाली होती. आज न्यायालयाचा निकाल येणार होता. तसा तो सकाळीच उठला. प्रातःविधी आटोपवला व त्यानं मंदिरातील देवाचं दर्शन घेतलं. तसा तो न्यायालयात गेला. न्यायालय सुरू झालं होतं. तसा तो न्यायालयात हजर झाला. तसे न्यायाधीश महोदय म्हणाले,
"न्यायालयाने आपल्याबाबतीत सर्व पुरावे तपासले. आपल्यावर खरंच अन्याय झाला आहे. प्रभारी मुख्याध्यापक जास्तच काम करीत असतो. तो कायम स्वरुपाच्या मुख्याध्यापकापेक्षा कितीतरी जास्त काम करतो. परंतू बदल्यात त्याला कायम स्वरुपाच्या मुख्याध्यापकापेक्षाही कमी वेतन मिळत असतं. तेव्हा हा अन्याय आहे. आपल्याला न्याय मिळायलाच हवा. तेव्हा न्यायालय आज या निष्कर्षापर्यंत येवून पोहोचले आहे की आपल्यावर खरंच अन्याय झालेला असून आपल्याला तो लाभ व भत्ते आपण लागले तेव्हापासून देत आहे. हाच न्यायालयाचा शेवटला निर्णय होय. तसेच दुसरे आपला मुद्दाही विचार करण्यालायक आहे. तो म्हणजे शाळेत रोजची येणारी पत्र. ज्यामुळे आपलं म्हणणं आहे की ह्या रोजच्या येणा-या पत्रांनी शाळेचं वातावरण गढूळ होतं. शिक्षक व विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होते. जसं आपण म्हणतो की विद्यार्थ्यांच्या दप्तरातलं ओझं कमी करा. विद्यार्थ्यांचे खांदे दुखतात. अगदी तसंच कदाचित असेल या शासनाच्या पत्राचं. त्यावरही न्यायालय निर्णय देत आहे की ही विनाकारणच्या माहितीची पत्र शाळेत नको. असं आढळून आल्यास त्या त्या शाळेला अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार शाळेला आहे. त्यांनी न्यायालयात यावं. न्यायालय नक्कीच त्यावर योग्य असा निर्णय देईल.
महत्वपूर्ण गोष्ट ही की शासनानं अशी विनाकारणची पत्र शाळेला पाठवू नयेत. ज्याने विनाकारण शिक्षक व विद्यार्थ्यांना मनःस्ताप होईल. शेवटी न्यायालय एवढंच म्हणेल की सर्व आपण न्यायालयात याचिका स्वरुपात मांडलेल्या गोष्टी न्यायालयाने निकाली काढलेल्या असून आता याबाबत आपल्या मनात कोणताही किंतू परंतू आपल्या मनात नसेल. न्यायालय आता आपल्याही मनात किंतू परंतू न ठेवता ही याचिका निकाली काढत आहे."
न्यायालयाने ती याचिका निकाली काढली. त्यानंतर त्याला प्रभारी पदाचाही कायम मुख्याध्यापकाएवढाच लाभही मिळाला आणि त्यातच तो फायदा इतरांनाही झाला. इतर शिक्षक हे जेव्हा ही प्रभारी बनत. तेव्हा त्यांनाही तसा लाभ मिळत असे.
शासनाचीही विना कामाची पत्र बंद झाली होती. कामाच्या गोष्टी आता शासन मागू लागलं होतं. त्यातच समजा एखाद्याला वाटलेच की आपल्यावर अन्याय झाला आहे. तेव्हा ते न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मिळवून घेत. शाळासिद्धीही कायम स्वरूपी संपली होती. हवेत गोष्टी करणं बंद झालं होतं. आता होतं काम करा आणि शाळेत राहा. ज्यानं काम न केल्यास आता त्यालाही घरचा रस्ता दाखवता येत होता.
शाळेत शिक्षक मन लावून शिकवीत होते. तरीही समाज अजून जागृत झाला नव्हता. सरकारनं वेगवेगळ्या योजना आणल्या. त्याचा तो लाभ घेत होता हा समाज. देशाची लोकसंख्या वाढलेली असतांनाही हा समाज कुटूंबनियोजन न करता अजूनही लोकसंख्या वाढवीतच होता. ते प्रसंगी उपाशी राहात होते. परंतू लेकरं देवाघरची फुलं म्हणत पैदा करीत होते. मुलांना अजूनही वंशाचा दिवाच समजत होते.
सरकारनं मुलींसाठीही सुविधा दिल्या होत्या शिक्षणात. तरीही मुली शिकत नव्हत्या. कारण त्यांचे मायबाप त्यांना शिकवीत नव्हते. नवीन शैक्षणिक धोरण आलं तरी ते मुलींना दुय्यमच स्थान देत होते आणि मुलाच्या जन्मासाठी कित्येक मुलींचा भ्रृणहत्येतून बळी जात होता.
निरक्षरता.........आज निरक्षरता अशीच होती. रक्ताळलेल्या जखमेसारखीच. अजूनही त्या जखमेतून रक्त आणि पू भळाभळा वाहात होतं. काही काही ठिकाणी समाज सुधारला होता. ते शिकवीत होते आपल्या मुलांना. मुलांची शाळेत येण्याची ओढ वाढत होती. परंतू ज्यावेळी त्यांना शिक्षणातील उद्याचं भवितव्य दिसायचं की शिक्षणातून नोक-या मिळत नाही. तसेच पुढील काळात शिक्षणाला पैसा लागतो. हे जेव्हा कळायचं. त्यावेळी ते गप्प बसायचे. शिक्षण सोडून द्यायचे. तीच जखम व्हायची शरीरावर नव्हे तर मनावर. ती जखम........ती निरक्षर रुपातील जखम जेव्हा मनावर व्हायची. तेव्हा ती अगदी मन पोखरुन जात असे आयुष्यभरासाठी. नवीन शैक्षणिक धोरण आलं तरी आजही त्याच जखमेनं त्यांच्या पिढ्या शिकू दिल्या नाही. कारण प्राथमिक शिक्षण निःशुल्क होतं. परंतू महाविद्यालय शिक्षण....... ते निःशुल्क नव्हतं. शिष्यवृत्ती मिळत होती. परंतू ती तुटपुंजी होती. तसेच मिळणारी शिष्यवृत्तीही मधातीलच माणसं खावून जात होती.
काँन्व्हेंटचं प्रस्थ वाढलं होतं. त्यामुळं ते विद्यार्थी शिकत असली नवीन शैक्षणिक धोरणातून तरी नवीन शैक्षणिक धोरणही या काँन्व्हेंटच्या प्रस्थापुढं फिकं पडलं होतं. कारण काँन्व्हेंटचं शिक्षण आणि सामान्य शाळेतील शिक्षण यात बराच फरक होता. ते शिक्षण भेदभाव निर्माण करणारं शिक्षण असल्यानं अजूनही मुलं शाळाबाह्य ठरत होती.
महेश आज मुख्याध्यापकच नाही तर मोठा विचारवंत बनला होता. त्यात संगीताचे जास्त श्रेय होते. महेशला आजही संगीताची आठवण यायची. ती संगीता........ ज्या संगीतानं त्याच्या मनात महत्वाकांक्षा कुटकूट भरली नव्हे तर वृद्धींगत केली होती. ती नुकतीच मरण पावली होती. तिनं त्याला त्यांच्या शालेय जीवनापासून सांभाळलं होतं. महाविद्यालय शिक्षण देखील तिनं त्याचेसोबत पूर्ण केले होते आणि घरचा विरोध असतांनाही तिनं त्याचेशी विवाह केला होता नव्हे तर पती म्हणून त्याचा सांभाळ केला होता. कधीकधी तो पुरेसा वेळ देत नसल्यानं त्याची तिच्याशी भांडणंही होत. तरीही ती त्याला समजून घेत असे आणि संसार करीत असे.
आज महेश तिच्यामुळंच उत्तूंग शिखरावर चढला होता. परंतू ती आज जीवंत नसल्यानं आता त्यालाच ते मुख्याध्यापक पद आणि ते विचारवंतपण अगदी दुखद वाटत होतं. जगण्यात रस वाटत नव्हता. कारण त्याला निरक्षरता नावाची जखम माहित होती. परंतू पत्नीविरहाचीही एक जखमच असते हेही त्याला आज माहित झालं होतं. जेव्हा त्यानं त्या जखमेचा अनुभव घेतला होता.


*****************************समाप्त**************
((((((((((((((((((((((((((((())))))))))))))))))))))))))))((((((((((((((((((((((((((((())))))))))))))))))))))))))))


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED