राजा दशरथाने वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केला.
भरपूर अन्न वस्त्र धन दान केले. ऋषी मुनी योग्यांचा योग्य तो सन्मान केला. यज्ञात शेवटची समिधा टाकताच त्या यज्ञ कुंडातून अग्निदेव प्रकट होतात. त्यांच्या हातात एक सुवर्ण पात्र असते ज्यात पायस(खीर) असते. ते पायस अग्निदेव दशरथ राजास देतात आणि म्हणतात:-
"हे दशरथा तू केलेला यज्ञ संपन्न झाला आहे. तुझ्यावर सगळे देव प्रसन्न झाले आहेत. श्री विष्णू देवांनी स्वतः मला आदेश देऊन हा प्रसाद घेऊन इथे पाठवलं आहे हा माझा सन्मान च आहे असे मी मानतो. ह्या पात्रातील पायस तिन्ही राण्यांना भक्षण करण्यास दे. हे पायस अत्यंत मधुर आणि ओजस्वी आहे. कामधेनूच्या दुधापेक्षाही ह्या पायस मध्ये शक्ती आहे ते प्राशन करताच तुझ्या तिन्ही राण्या कालांतराने ओजस्वी पुत्र प्रसवतील. तुला श्रीविष्णूंचा अंश असलेले पुत्र होतील. तू व तुझ्या राण्या धन्य धन्य होतील.
तुझ्यासारख्या आदर्श राजाचे दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो आहे आता मला आज्ञा दे",असं अग्निदेव म्हणतात राजा व राण्या अग्नीदेवाला नम्रपणे वंदन करतात,राजा पायस असलेले पात्र आपल्या हातात घेतात आणि अग्नीदेव अंतर्धान पावतात.
(पुढे रामायणात काय घडते ते बघू पुढच्या भागात. जय श्रीराम🙏)
दशरथा, घे हे पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान
तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान्
श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
करात घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान
राण्या करतिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान
प्रसवतील त्या तीन्ही देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान
कृतार्थ दिसती तुझी लोचने
कृतार्थ मीही तुझ्या दर्शने
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञी अंतर्धान
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★