भाग्य दिले तू मला - भाग १२ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग १२


स्वयमच्या शब्दांनी आज ती पूर्णता तुटली होती. गेले कित्येक दिवस ती त्याला हे सर्व सांगायला वाट पाहत होती पण त्याने दोन तीन वाक्यात तिच्या स्वप्नांची राख - रांगोळी केली. त्याने तिच्या प्रेमाला स्वीकारले नाही ह्याच दुःख तर तिला होतच पण तो अशा पद्धतीने तिला नकार देईल असा स्वप्नातसुद्धा तिने विचार केला नव्हता. ती कितीतरी वेळ वेड्यासारखी तशीच उभी होती. हळूहळू सर्व गाड्या सुद्धा पार्किंग मधून नाहीशा झाल्या होत्या पण तिला कशाचच भान नव्हतं. ती शांत होती. तिला पुढे काय करायला हवं काहीच कळत नव्हतं म्हणून ती तिथेच उभी राहिली. काही क्षण गेले. अंधार पडू लागला होता आणि नाईलाजाने तिचे पाय होस्टेलकडे वळाले. चालताना फक्त तिचं शरीर चालत होत बाकी मन ते कुठेतरी हरवल होत. आजुबाजूने मुली येत-जात होत्या पण स्वराच आज कुणाकडेच लक्ष नव्हतं. कशीतरी चालत चालत ती होस्टेलला पोहोचली. ती दारावर आलीच होती की पूजा ओरडत म्हणाली, " स्वरा कुठे आहेस? दुपारी गायब झालीस ती झालीसच. केव्हाची कॉल लावते आहे पण तू उचलतच नाही आहेस आणि हा काय अवतार बनवून घेतला आहेस? "

पूजा एकावर एक प्रश्न विचारत होती तर स्वरा शांतपणे रूममध्ये आली. तिने आपली बॅग बेडवर फेकली आणि सरळ वॉशरूममध्ये गेली. पूजाने स्वराला अस कधीच बघितलं नव्हतं म्हणून ती फक्त तिच्याकडे पाहत होती. स्वरा वॉशरूममध्ये गेली तशीच काही वेळात परतही आली. स्वतःचा चेहरा पुसून घेत ती बेडवर पडली आणि वरून चादर अंगावर घेत ती झोपू लागली. तिला झोप येत नव्हती पण पूजाला ह्यातलं काहीही कळू नये म्हणून ती झोपायचं नाटक करत होती. पूजा काही वेळ तिला बघत होती पण जशी ती झोपू लागली तशीच पूजाला भीती वाटली आणि ती तिच्या अंगाला हात लावून बघू लागली. अंग तर थंडच होत मग ही आता अशी का झोपली ते तिला कळतच नव्हतं. ती चक्रावून गेली होती आणि शेवटी न राहवता तिने विचारले, " स्वरा ! नक्की काय झालं आहे सांगशील का? "

स्वराला माहीत होतं की पूजाला तिची काळजी आहे त्यामुळे असच शांत बसून ती राहिली तर पूजाही टेन्शनमध्ये येईल म्हणून इच्छा नसतानाही ती हळूच बोलून गेली, " पूजा सॉरी मी खूप थकले आहे आज. मला झोप येतेय उद्या बोलू आपण. "

स्वराने तिला उत्तर देताच डोळे मिटले . त्यानंतर पूजानेही तिला काहीच विचारलं नाही. उलट लाईट ऑफ करून ती कियाराकडे गेली.

स्वरा बेडवर पडली तर होती पण तिच्या डोक्यात हजारो प्रश्न होते. तिला रडायचं तर होत पण दुसरीकडे तिला कमजोरही पडायच नव्हतं. तिला त्याच्या नकाराचा त्रास झाला नव्हता पण तो ज्या पद्धतीने तिच्याशी बोलला होता त्याच वाईट वाटलं होतं. स्वराला माहीत होतं की त्याच नक्कीच तिच्यावर प्रेम आहे. तिने त्याच्या डोळ्यात ते सतत पाहिलं होतं त्यामुळे ह्यामागे काहीतरी कारण आहे हे तिला माहीत होतं. त्याच उत्तर ऐकल्यावरच ती बाकी समोर काय करायचं ती ठरवणार होती. आज तिला इतका त्रास होत होता की तिने जेवण सुद्धा केलं नाही. बस फक्त विचार करत राहिली. तिची आधल्या रात्री झोप झाली नव्हती त्यामुळे डोळ्यावर झोप येत होती पण झोपायचा प्रयत्न केल्यावर मात्र तिला तिचेच विचार झोपू देत नव्हते. पाहता-पाहता रात्रीचे एक वाजले. विचार होते की तिची साथ सोडत नव्हते आणि हळूच मोबाइल हातात घेत तिने स्वयमला मॅसेज केला.

" स्वयम तुम्हे लगता है ना की मै तुम्हारे जिंदगी से दूर चली जाऊ तो वो भी मुझे मंजूर है लेकिन बस ये बता दो की इन तीन दिनो मे ऐसा क्या हुआ की तुम मुझसे इस तरहँ से बात कर रहे हो? जब से रूम पर आई हु तब से बस सोचही रही हु. निंद का भी पता नही. माना की तुम्हे मुझसे प्यार नही पर एक दोस्त के नाते मुझे वजहँ बता दो. वरणा इस का असर मेरी पढाई पर पढ सकता है. अब तुम सोचो की जिद पर अडे रेहकर कुछ नही बताना है या बात करके सब कुछ संभालना है. मै तुम्हारा सुबहँ 9 बजे कॅन्टीन मे इंतजार करुंगी. "

तिने मॅसेज केला पण बरीच रात्र झाली होती त्यामुळे एवढ्या रात्री रिप्लाय येणार नाही हे तिला माहीत होत त्यामुळे मोबाइल बाजूला ठेवून ती पुन्हा डोळे मिटू लागली. आज तिला बऱ्याच वेळ झोप आली नाही पण थकव्याने शेवटी पहाटे पहाटे झोप लागली.

सकाळी 8 चा अलार्म वाजताच तिचे डोळे उघडले . पूजा आताच उठली होती. तिला गुड मॉर्निंग विश करत ती सरळ फ्रेश व्हायला पोहोंचली. रोज निवांत सर्व आवरणारी स्वरा आज एवढ्या फास्ट आवरत आहे बघून क्षणभर तिला हसू आलं. पूजाला काहीतरी लिहायचं असल्याने लिहीत बसली होती. जवळपास पाऊणतास झाला. ती कपडे चेंज करून रूममध्ये परतली आणि पटापट तयारी करू लागली. आज ती पटापट सर्व आवरत होती. स्वयमसाठी सजून सवरून तयारी होणारी ती आज पाच मिनिटात सर्व आवरून तयार झाली हे बघून तिला शॉकच लागला होता. ती तिला बघतच होती की बॅग हातात घेत स्वरा बाहेर जाऊ लागली. पूजा आता भानावर आली आणि मोठ्याने ओरडली, " ओ मॅडम कुठे जात आहेस एवढ्या लवकर? नाश्ता पण केला नाही अजून? कॉलेजला तर वेळ आहे? "

स्वरा पायात चप्पल घालतच उत्तरली, " पूजा आज मला लायब्ररीतुन काही बुक्स घ्यायचे आहेत सो मी लवकर जाते. आपण सरळ कॉलेजला भेटू. "

पूजा समोर काही बोलणारच तेवढ्यात ती गायब झाली. स्वराच्या पायाला आज पंख फुटले होते त्यामुळे ती राजधानी एक्सप्रेससारखी धावत होती. तिला केव्हा एकदा कॅन्टीनला पोहोचते अस झालं होत. खर तर स्वयमचा अजूनही मॅसेज आला नव्हता त्यामुळे तो येईल की नाही ह्याबद्दल खात्री नव्हती पण तिच्याकडे पर्याय नव्हता म्हणून धावत पळत ती कॅन्टीनला पोहोचली. तिने कॅन्टीनला पोहोचताच आतमध्ये लक्ष दिलं पण तिला कुठेच स्वयम दिसला नाही. तरीही ती एका रिकाम्या बेंचवर जाऊन बसली. काही क्षण गेले. तिचे हातपाय थरथर कापत होते. ती सेकंदा - सेकंदाला घड्याळीत बघत होती पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. आता नऊ वाजून दहा मिनिटे झाली होती. तो येईल की नाही ह्याची भीती तिला सतावू लागली. नर्व्हसनेसने तीच अंग पूर्ण गळून गेलं होतं. तेवढ्यात तो समोरून येताना दिसला. तिला आता थोडी हिम्मत आली. त्याला बघताच ती उठून उभी राहिली. तो जवळ आला आणि हसूनच तिला बसायला सांगितले. स्वराचा चेहरा पूर्ण उतरला होता त्यामुळे तिने काही खाल्लं नसेल हे त्याला जाणवलं आणि त्याने पटकन दोन चहा बोलावल्या. चहा आला पण दोघेही शांतच होते. स्वराला खूप काही विचारायचं होत पण तिची बोलायची हिम्मत होत नव्हती. स्वयमला ते समजलं आणि तोच सुरवात करत म्हणाला, " सॉरी स्वरा फॉर माय बिहेविअर. मुझे बहोत गुस्सा आ रहा था इसलीये बोल पडा. तूम्हे दुखाना मेरा इंटेशन नही था. बस जो गुस्सा दो - तीन दिन से पाल रखा था अचानक बाहर आ गया. अपोलॉजि फॉर दॅट. सॉरी ! "

स्वरा शांतपणे ऐकत होती. तोही आज शांत होता आणि ती हळूच म्हणाली, " इट्स ओके स्वयम. तूम्हे अपनी फिलिंग बताने का पुरा अधिकार आहे. मुझे उससे कोई प्रॉब्लेम नही. बस मुझे वजह बता दो. ताकी मैं शांत हो सकू. मेरा जवाब मिलतेही मै चली जाऊंगी. "

स्वयम हळुच गालातल्या गालात हसला. ती त्याच्याकडून उत्तराची वाट पाहत होती आणि तो हळूच हसत म्हणाला, " स्वरा तुम्हे याद है तुमने मजाक मे एक दिन कहा था की तुम्हारी अचानकसे रूम चेंज हो गयी, खाना अच्छा मिलणे लगा, अचानक से बुक्स मिल गयी. इसके पिछे तुम्हे कुछ अजीब मेहसुस नही हुआ? "

स्वरा हळूच म्हणाली, " नही ! क्यूकी वॉर्डनने कहा था की उपरसे ऑर्डर आये थे. उपर कोण है वो मुझे नही पता और बुक्स तुमने भेजे थे इसलीये कुछ अजीब नही लगा. पर इस बात का हमारी वजहँ से क्या ताल्लूक है? "

स्वयम आता हळूच हसत म्हणाला, " बस येही से शुरुवात हुयी वजहकी. तुम्हे नही पता पर तुम किसीं और को पेहलीही नजर मे पसंद आयी थी. वो बडे बाप का लडका है इसलीये हर चीज वो मॅनेज करता गया. ये उपर से ऑर्डर उसनेही दिये थे. बर्थडे के दिन ड्रेस, चैन सब उसनेही भेजे थे, मैने कुछ नही किया और अब तुम्हारा जवाब देता हु. दो तीन दिन पेहले हम घुमने गये थे ना उसके बाद की बात है. शायद तुम्हे नही पता पर वो तुम पे हर दिन नजर रखता है. जब उसे पता चला की हम दोनो नजदिक आ रहे है तब उसे वो पसंद नही आया. मै हॉस्पिटलमध्ये था तब की बात है. वो आया और बहोत कुछ केहकर चला गया? जाणना चाहोगी क्या कहा उसने? "

स्वरा सर्व शांतपणे ऐकत होती आणि हसूनच तिने आपलं उत्तर कळविल. तोही हसतच उत्तरला, " उसने कहा की वो तुमसे दिवानो की तरहँ प्यार करता है. अगर तुम उसे नही मिली तो वो तुम्हे किसी और की भी नही होणे देगा. वो मुझे हॉस्पिटलमध्ये मे पापा के सामने धमकी देकर गया है की अगर मैं तुम्हारे नजदिक आता हु तो वो मेरा पुरा करीअर बरबाद कर देगा. मेरी फॅमिली को नुकसान पोहोचायेगा. "

मैने उसकी बात को सिरीयस नही लिया लेकिन पापाने अगले ही पल बताया की वो उसे जाणते है. वो बहोत बार ऐसें कर चुका है. पापा ने मुझसे प्रॉमिस लिया की तुम उसके मामले मे मत पडो. अब मुझे भी लगता है की एक रिशता निभाने के लिये हर रिशता नही तोड सकता. मुझे उसके बारे मी जितना पता है उससे बता सकता हु की वो किसीं हाल मे भी तुम्हे पाकर रहेगा और वो जब तक है तब तक कोई भी लडका तुम्हारे करिब नही आयेगा. ये सब देखकर मुझे लगता है की ये रिशता हम आगे नही लेकर जायेंगे. हम दोस्त रहेंगे उससे ज्यादा कुछ नही. मुझे इन सबमे पडणा नही है. पापा की पेहलेही तब्येत ठीक नही रेहती मुझे और तकलीफ नही पहुचानी. होप यु अंडरस्टॅण्ड धीस. "

स्वराने त्याच सर्व बोलणं शांतपणे ऐकलं आणि हळूच हसत म्हणाली , " उसका नाम और कहा मिलेगा? "

कितीतरी वेळाने ती एकच वाक्य बोलली आणि तेही अस की तो शॉकच झाला. तो तिला एकटक बघतच होता की ती मोठ्याने म्हणाली, " स्वयम नाम और कहा मिलेगा? "
तिच्या डोळ्यात त्याला भयानक राग दिसला होता म्हणून त्याच्या तोंडातून पटकन निघून गेलं, " नाम राज सलूजा ! मेकॅनिकल बिल्डिंग. लास्ट इयर. किसीं को भी पुछ लो बता देगा. "

त्याच उत्तर ऐकताच ती पटकन चेअरवरून उठली. ती समोर जातच होती की काही क्षण थांबून ती परत आली आणि रागातच स्वयमला बोलू गेली, " स्वयम तुम्हारा फैसला क्या होगा ये तुम देख लो लेकिन एक बात मै बता दु की मुझे सिर्फ तुमसे प्यार है और वो कोई भी, कितना भी पॉवरफुल हो मुझे नही पा सकता. मैं जिंदगीभर अकेले रेह जाऊंगी लेकिन उसकी कभी नही बनाना चाहती. ये जिंदगी भर याद रखना. "

ती रागातच कॅन्टीनबाहेर निघाली. स्वयमने जे काही सांगितलं होतं ते ऐकून तीच डोकं गरम झालं होतं. तिला आता खूप राग येत होता त्यामुळे पटापट पावले टाकत ती मेकॅनिकल बिल्डिंगकडे पोहोचली. लास्ट इयरची क्लास रूम शोधत ती आतमध्ये पोहोचली. तिथे भरपूर मूल बसून होते आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, " राज सलूजा. "

राज सलूजाच नाव घेताच मधातून एक तरुण बाहेर आला. तो दिसायला देखणा, शरीराने मजबूत, उंची जवळपास 6 फूट. त्याला पाहताच ती पुन्हा एकदा म्हणाली, " आपसे अकेले मे बात करणी है. प्लिज बाहेर आइये. "

ती रागातच बाहेर निघाली तर राज सुद्धा तिच्या मागे मागे आला. ती जिथे कुणी दिसत नाहीये अशा जागी जाऊन उभी झाली. तो आलाच होता की ती म्हणाली, " मिस्टर राज आपको क्या लगता है की मै आपली पर्सनल प्रॉपर्टी हु जो आप जैसे चाहे वैसे युज कर सकते हो. बिलकुल नही. आप स्वयम जैसे कितनेभी लडको को मुझसे दूर करो फिर भी मै तुमसे प्यार नही करणे वाली. तुमने कितनी भी कोशीश की ना तो भी तुम्हारे हात खाली ही मिलेंगे. आज के बाद मेरे पिछे घुमते दिखाइ दिये तो सिधे तुम्हारी पोलीसमे शिकायत करुंगी . होंगे तुम कितने भी बडे लेकिन मैं तुमसे नही डरती ध्यान रखना. तुमने जितने भी मुझे तौफे दिये है वो कल सुबहँ ९ बजे गार्डन मे लेणे आ जाणा और स्वयम को अगली बार से तकलीफ हुयी तो देख लेना. तुम जाणते नही मै कोण हु? "

ती पटापट बोलून तिथून निघून गेली तर तो अजूनही तिच्याकडे बघत होता. त्याला आयुष्यात एवढं कुणीच बोललं नव्हतं.त्यामुळे तो तिला बघत होता. स्वरा एवढं सर्व रागात बोलून तर गेली होती पण ती त्याला खरच ओळखत नव्हती. तो काय काय करू शकत होता ह्याचा तिला अंदाजा नव्हता. ती जात होती आणि तो आता स्वतावरच हसू लागला. त्याच्या हसण्यात नक्कीच काहीतरी लपल होत . ते कुत्सित हसू बरच काही सांगत होत.

क्रमशा ....