रात्रीची वेळ होती. स्वरा, पूजा दोघीही आपल्या बेडवर बसल्या होत्या. स्वरा पुन्हा एकदा गुमसुम होती तर पूजा तिला काय झालंय म्हणून काम करता करता हळूच स्वराकडे लक्ष देत होती. स्वराने दिवसभर तर स्वतःच्या भावना सावरून धरल्या होत्या पण आता तिला ते लपवन कठीण जात होतं. ती स्वयम समोर मन घट्ट करून सर्व ऐकत राहिली होती पण तीच तिलाच माहिती होत की तिला त्याच्या बोलण्याचा किती त्रास होत होता. त्याचा प्रत्येक शब्द तिला अनंत यातना देऊन गेला होता. तिला हे नातं समोर न्यायला त्याच्यावर बळजबरी करायची नव्हती म्हणून ती शांत बसली होती पण आता तिला रडू आवरत नव्हतं आणि अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. ती स्वतःचे अश्रू पुसायचा प्रयत्न करत होती पण आज ते तीच ऐकणार नव्हते. ती रडत आहे हे लक्षात येताच पूजा धावतच तिच्या बेडवर गेली आणि म्हणाली, " स्वरा काय झालं? रडत का आहेस? कालपासून तू खुप अपसेट दिसत आहेस. सांग ना काय झालं? "
पूजा बाजूला येऊन बसताच स्वरा तिच्या कुशीत शिरली आणि रडू लागली. पूजाला नक्की काय झालं काहीच कळत नव्हतं. ती तिला शांत करायचा प्रयत्न करू लागली. काही क्षण स्वरा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यामुळे रडतच राहिली. पूजाही तिला कुशीत घेऊन तिला सावरत होती. स्वराला आता हे सर्व पूजापासून लपवन जमणार नव्हतं म्हणून ती रडतच म्हणाली, " पूजा काय चूक होती ग माझी? कुणी माझ्यावर प्रेम करत असेल आणि माझ्यासाठी काही करत असेल, त्याबद्दल मला काहीच माहीत नसेल तरी मी न केलेल्या चुकीची शिक्षा मला का मिळते आहे? मी तर मनापासून प्रेम केलं होतं ना मग स्वयमने फक्त त्या तिसऱ्या व्यक्तीच ऐकून मला का नकार दिला? मला का दुसऱ्याच्या कर्माची शिक्षा मिळावी? "
पूजाला थोडाफार कळलं होतं पण ते तिसऱ्या मुलाबद्दल काय बोलतेय तिला काहीच कळत नव्हतं म्हणून तिने हळूच तिला विचारलं, " स्वरा स्वयमने कुणाच ऐकून तुला नकार दिला काही कळत नाहीये मला. प्लिज जरा नीट सांगशील का? "
स्वराने आपलं रडन थांबवत तिला एक आणि एक शब्द सांगितला. पूजाला तर तिच्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता म्हणून ती काही क्षण शांतच होती. स्वरा आता एकदम शांत झाली आणि पूजा म्हणाली, " वाटलं नव्हतं स्वयम इतका सेल्फीश निघेल म्हणून. मान्य की त्याने धमकी दिली पण म्हणून कुणी आपलं प्रेमच नाकारत का? मला तर त्याचा खूपच राग येतोय. थांब त्याला कॉल करूनच झापते. "
ती कॉल करणारच की स्वरा तिला थांबवत म्हणाली, "पूजा त्याने नक्की काय होणार? त्याला आपल्या करिअरची चिंता आहे आणि मला कुणाला माझ्यावर प्रेम करा म्हणून फोर्स करायचं नाही. होतोय मला त्रास पण मी करेन मॅनेज सर्व. तू काळजी नको करू. एवढी पण कमजोर नाहीये मी कुण्या मुलाने नकार दिला म्हणून कमजोर पडेन. हा फक्त पहिल प्रेम अपूर्ण राहील ही खंत कायमच मनात राहील. असो नो टेन्शन. "
स्वरा स्वतःच्या भावना लपवाव्या म्हणून खोट खोट हसत होती हे पूजाला कळलं होतं पण तेच तिच्यासाठी बर होत म्हणून पूजाही काहीच म्हणाली नाही. काही वेळ दोघीही शांतच होत्या आणि पूजा म्हणाली, " बर ते ठीक आहे पण हे राजच काय करणार आहेस उद्या? म्हणजे तू त्याला उलट बोलून गेलीस तर तो काही करणार तर नाही ना? म्हणजे जशी त्याला धमकी दिली तसच तुझं पण करिअर तर संपवणार नाही ना? "
पूजा बोलून गेली आणि स्वरा हळूच हसत म्हणाली, " त्याची माझ्यासमोर काय हिम्मत? आज पण त्याला बोलले तर माकडासारखं बघत होता मला गुपचूप. तो काय करणार आहे . तस पण जास्तीत जास्त हॉस्टेलची रूमच चेंज करावी लागेल ना ते चालेल. जेवणाची सवय आधीच आहे. तस पण मला आता हे काहीच नकोय. त्याला उद्या सर्व वस्तू परत करेन आणि म्हणेन की बाबा रे तुला ही स्वरा परवंडणार नाही तेव्हा दूर राहा. "
स्वराने आपला मूड स्वतःच चेंज करून घेतला आणि दोघीही हसू लागल्या . आज स्वराला भूक पण मस्त लागली होती म्हणून दोघीही जेवायला निघाल्या. तिथे जेवताना पण स्वरा म्हणाली, " पूजा हे शाही भोजन आजच आहे सो खाऊन घे पोटभर उद्या काही मिळणार नाही. "
स्वरा एवढी दुःखी असताना पण कुठून कुठून गंमत शोधायची तिलाच माहिती. त्यांचं जेवण आटोपलं आणि ते थोडा वेळ गप्पा मारून झोपी गेले. स्वयंमच्या नकाराने ती नक्कीच दुखावली होती पण फक्त प्रेम प्रेम करत रडत राहणाऱ्यातली ती नक्कीच नव्हती.
सकाळचे पून्हा 8 वाजले होते. स्वराने त्याला 9 वाजताची वेळ दिली असल्याने ती लवकर तयार झाली होती. त्याने दिलेल्या सर्व वस्तू तिने एका पिशवीत भरल्या आणि तयार होत बाहेर जाऊ लागली. स्वराने तिची मधातच वाट अडवत तिला थांबवले आणि तिच्यासोबत यायचा हट्ट करू लागली. स्वराने शेवटी तिचा हट्ट मान्य केला आणि दोघीही काहीच क्षणात बाहेर निघाल्या. ते चालतच होते की पूजा म्हणाली, " स्वरा आज ना मला कुठल्या तरी मिशनवर जात असल्यासारखे वाटत आहे. काय होईल ग तिथे? "
स्वरा हसतच उत्तरली, " काही नाही ग त्याचा घमंड तुटेल बस आणखी काय? आपण वस्तू दिल्या की त्याला सांगायच. ह्या रुटच्या सर्व लाइन्स व्यस्त आहेत तरीही पुन्हा संपर्क करू नये. धन्यवाद . "
पूजा जरा विचार करत म्हणाली , " मराठी कळेल का त्याला? "
दोघीही कार्टूनच. कधी काय बोलतील काही अंदाज नसायचा. चालता - चालता त्या गार्डनला पोहोचल्या . तिथे फार काही गर्दी नव्हती. पण तो अजूनही आला नव्हता त्यामुळे त्या पुन्हा तिथेच बसून गप्पा मारू लागल्या. काही क्षण गेले . ह्यांच्या गप्पा सुरूच होत्या की राज आला. राज सोबत त्याचे काही मित्रही होते. पूजा त्यांना बघून जरा घाबरली होती पण स्वरा अगदी कॉन्फिडन्ट होती. तो येताना दिसताच तिने पिशवी त्याच्या समोर ठेवली आणि अगदी प्रेमाने म्हणाली, " मिस्टर राज थॅंक्यु फॉर युअर काइंडली हेल्प बट वी डोन्ट निड युअर हेल्प अगेन. सो प्लिज टेक धिस अँड लिव्ह मी अलोन. प्लिज इसके बाद मेरे लिये कुछ भी मत करणा. मेरे रास्ते पेहलेसेही अलग थे पर इसी पल से तुम्हारे भी अलग है ये ध्यान रखना. मैं यहा छोटे शहर से पढणे आयी हु बाकी मुझे कुछ नही चाहीये. ना प्यार ना और कुछ. प्लिज मेहरबानी कर दो फिर से मेरे जिंदगीमे वापस ना आणा. "
ती शांतपणे बोलून गेली आणि पूजाला इशारा करून दोघीही जाऊ लागल्या पण राजच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होत. ती जात आहे बघून त्याने तिचा हात पकडला आणि जरा गर्वातच म्हणाला, " स्वरा तुमसे प्यार किया है और ये कभी कम नही होगा. मैने स्वयमसेभी कहा था और तुमसेभी केहता हु अगर तुम मेरी नही हुयी तो किसीं की नही हो सकती. मुझे जो बात पसंद आ जाती है वो मैं कैसे भी हासिल कर लेता हु. तुम तो मेरी जिंदगी हो कैसे जाणे दु तुम्हे? तुमने गिफ्ट वापस दिये नो प्रॉब्लेम शादी के बाद ये तुम्हारे ही होंगे लेकिन ये हात ना छुटा था और ना छुटेगा. तुम मेरी जिद हो और तुम्हे पाने के लिये किसीं भी हद तक जा सकता हु. तुम दिल्ली से क्या कही पे भी चली जावो मै पिछा नही छोडने वाला. ना आज ना और कभी. ना मानी तुम तो घर मे आकर शादी की बात करुंगा फिर भी नही मानी तो ??"
तो हसत राहिला. तिचा हातही त्याने सोडला नव्हता. ती सोडवायचा प्रयत्न करत होती पण एवढ्या मजबुतीने त्याने तो पकडला होता की ती सोडवु शकली नव्हती. स्वरा आधी शांतीने घेत होती पण स्वराची आग आता मस्तकात गेली होती आणि तिने त्याच्या कानशीलावर लगावली. त्याच्या कानावर एक पडताच त्याने हात आपोआप सोडला आणि स्वरा म्हणाली, " एक तमाचा क्या पडा हात छुट गया और उमर भर की बात करता है. तेरे जैसे से शादी करणे से बेहतर है की मै जिंदगीभर अकेली रहु. केहना नही चाहती थि पण अब केहती हु तू ख्वाब देखणा छोड दे वरणा जिंदगीभर पछतायेगा. मै तेरी नही होणे वाली चाहे मुझे मौत भी आ जाये. समझा? चल राह छोड. "
स्वरा रागात निघून गेली तर तो अजूनही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. स्वराने त्याच्या कानाखाली जार काढला तेव्हा त्याला तिथे काही मुलांनी बघितले होते. त्याने नजर फिरविताच जाणवलं की सर्व त्याच्याकडे बघून हसत आहेत. कारण तो स्वता सर्वांवर हुकूम झाडायचा पण आज एका मुलीने त्याच्या कानाखाली देऊन त्याची इज्जत, त्याचा घमंड चुर चुर केला होता. हळूहळू त्याच्या कानाखाली मारली ही गोष्ट कॉलेजभर पसरली होती. प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर हसत होता आणि रागातच तो कॉलेज सोडून घरी निघाला.
हळूहळू राजच्या कानाखाली कुणीतरी मारली हे कॉलेजभर पसरल होत. ती मुलगी स्वरा आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नव्हता त्यामुळे ती जिथे - जिथे जात होती तिथे तिथे सर्व तिच्याकडे पाहत होते. स्वराला नक्की सर्वांच काय सुरू आहे कळत नव्हतं. ती लोकांच्या नजराणी त्रस्त झाली होती.
तर दुसरीकडे राज घरी गेला होता. बातमी पसरली तसेच त्याला कॉल्स, मॅसेज येऊ लागले होते. त्याला सर्वाना उत्तरे देणे कठीण जाऊ लागले म्हणून घराचे दार लावून तो एकटाच आतमध्ये बसला होता. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा अस घडलं होत की कुणीतरी ताच्यावर हात उचलला होता. स्वता आई - वडिलांनी सुद्धा त्याच्यावर कधीच हात उचलला नव्हता त्यामुळे आजचा क्षण त्याच्या डोक्यात घट्ट बसला होता.
क्रमशा....