भाग्य दिले तू मला - भाग २५ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग २५

हासिल हो गया है
दर्द-ए-दिलं का इलाज
कुछ जंग मोहब्बत से नही
अपणे हुनर सी जिती जाती है


स्वराने शेवटी स्वतःच्या नशिबाशी भांडण करून यश मिळविलंच. एक अशी वेळ होती जेव्हा ती मान खाली करून गावात पोहोचली होती तर एक अशी वेळ आली जेव्हा तिच्यासाठी गावात कार्यक्रम आयोजित केल्या जाऊ लागले पण स्वराने त्या सर्वाला नकार दिला होता. हजारो यातना दिल्यावर ते प्रेम नक्की काय कामाच होत? ह्या काही दिवसात तिने आपले कोण, परके कोण सर्वाना ओळखलं होत म्हणून आता तिची ह्या सर्वातून इच्छाच उडाली होती. स्वराने स्वतःच्या मेहनतीने स्वतःच नशीब पलटवल होत. आता जे कधीतरी तिला बोलत होते तेही शांत बसले होते तर ज्यांनी कधीतरी तिच्यावर विश्वास व्यक्त केला होता ते तिला येऊन शुभेच्छा देत होते पण स्वराला ह्यातलं काहीच नको हेही त्यांना कळालं नव्हतं. ती एक साधारण मुलगी बनून राहायचा प्रयत्न करत होती आणि लोक तिला काहीतरी वेगळच बनवू पाहत होते. तिची एकच माफक अपेक्षा होती ती म्हणजे "आदर". तिला त्यात जास्त रस होता आणि लोक ते सोडून सर्व काही देत होते . स्वराला आता हे सर्व नकोस झालं होतं म्हणून ती घरातच बसून होती फक्त काहीतरी केल्याचं समाधान नक्कीच तिच्या चेहऱ्यावर होत.

स्वरा गावात आली तो दिवस सोहळाच होता. तिचे जागोजागी पोस्टर्स लागले होते. गावात फक्त तिच्याच चर्चा होत्या. आपल्या मुलीने पुन्हा एकदा आपलं नाव रोशन केलं म्हणून तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज काही केल्या कमी होणार नव्हता. एवढं सर्व असलं तरीही स्वरा मात्र घरात शांत बसून होती. खूप जास्त मेहनत केल्यावर, नको नको ते सहन केल्यावर आपल्यावर स्तुती सुमने उधळावी हे तिला पसंद आलं नव्हतं त्यामुळे ती ह्या सर्वाला भारावून गेली नव्हती.

स्वरा घरी आल्यापासून आपला पूर्ण वेळ आईवडिलांसोबत घालवू लागली. मागच्या ५ वर्षात ती एकदाही घरी आली नव्हती. तिने स्वतःला यश मिळविण्यात, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात अस झोकून दिल की मोह आपोआप गळून पळाला होता. ते ५ वर्ष ती त्यांच्यापासून दूर राहिली होती पण आता तिला एक-एक क्षण त्यांच्यासोबत घालवायचा होता. सुरुवातीचे काही दिवस तिच्या आईने तिचे खूप लाड केले. तिला हवं ते बनवून खायला घालत होती. त्यांच्या तासंतास गप्पा सुरु असायच्या. कधीतरी स्वराच्या घरी तिचे जुने शिक्षक यायचे आणि मग गप्पाना उधाण यायचं. कॉलेजचे ५ वर्ष तर तिने मोजून मोजून काढले होते पण आपल्याच लोकांसोबत असताना वेळ कसा जातोय तिला काहीच कळत नव्हतं. तिच्या शाळेकडून तिचा सत्कार देखील झाला होता त्यामुळे स्वरा हे नाव त्या भागात सतत घेतल्या जाऊ लागलं. स्वरा हे जिद्दीच सर्वात मोठं उदाहरण बनल होत आणि एवढं असतानाही स्वराला त्या बाबींचा क्षणभरही अभिमान वाटला नाही. हजारो त्रास दिल्यावर जर कुणी काही देत असेल तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही हे लोक विसरले होते पण स्वरा नाही.

तेरे चंद लफजो से हम खुश नही होणे वाले गालिब
याद तो तेरे हर जखम है जो जिंदगीभर भुलना चाहते नही

स्वरा अलीकडे खूप आनंदी राहू लागली होती. तिला आठवत सुद्धा नव्हतं की आपल्यासोबत एवढा मोठा अपघात झाला होता. तिच्या आजूबाजूच्या लोकांनी देखील तिला स्वीकारलं होत त्यामुळे तो न्यूनगंड तिच्या मनातून कायमचा निघाला होता. इकडे इतका आनंदाचा क्षण होता त्यात राजला १० वर्षाची शिक्षा झाल्याची बातमी कानावर आली आणि सरविकडे जल्लोष सुरू झाला. स्वराला मात्र त्याच काहीच वाटलं नव्हतं कारण तिने आयुष्याचा ते प्रकरण केव्हाच बंद केलं होतं त्यामुळे ऐकून आनंद झाला नसला तरीही तिच्या चेंहँऱ्यावर समाधान नक्कीच होत. त्याला ही शिक्षा पुरेशी नव्हती पण जो कधी म्हणायचा की मला नकार ऐकण्याची सवय नाही आज तोच जेलमध्ये काय काय करत होता. घमंड जास्त दिवस टिकत नाही तो कुणाचाही असो हे त्याला ह्या काही वर्षात समजलं होत कदाचित त्याला हीच शिक्षा खूप होती त्यामुळे सरविकडे त्याला शिक्षा मिळण्याच्या बातम्या असताना ती एकटीच रूममध्ये शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. आनंदाचे दिवस येतात तेव्हा भरभरून येतात असा तो काहीसा काळ होता.

स्वरा घरी येऊन २-३ महिने झाले होते. आईवडिलांसोबत तिचा पूर्ण वेळ कसा गेला तिलाच कळले नाही. कॉलेज संपून फक्त काही दिवस झाले होते आणि स्वराला वेगवेगळ्या कंपनीमधून इंटरव्ह्यूसाठी कॉल्स येऊ लागले. स्वराने काही दिवस घरच्यांसोबत रहायच असल्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आता तिने जेवढं कमावलं होत ते वाढविण्यावर लक्ष घ्यायच होत म्हणून तिने इंटरव्ह्यू द्यायचं ठरवलं. आज तिचा पहिला इंटरव्ह्यू. आई-वडिलांना सोडून जाऊ लागू नये म्हणून तिने सर्वात आधी नागपूरलाच इंटरव्ह्यू द्यायचे ठरवले होते. स्वरा इंटरव्ह्यूला निघाली तेव्हा तिच्या आईने हातावर दही साखर ठेवले होते. त्यांना विश्वास होता की आता आपले दिवस नक्की बदलतील. स्वराही आपला पहिला इंटरव्ह्यू द्यायला खूप कॉन्फिडन्ट होती म्हणून वेळेआधीच निघाली. आता यश फक्त तिच्यापासून काहीच पावले दूर होते.

साधरणाता ११ ची वेळ झाली होती. सर्व मूल आधीच आले होते. स्वराचा ६ वा नंबर होता म्हणून ती बिनधास्त होती. स्वराने कॉलेज लाइफमध्ये खुप अभ्यास केला होता त्याशिवाय इतक्या लोकांना तोंड दिलं होतं म्हणून तिचा कॉन्फिडन्स खूपच हाय होता. समोरचे मूल इंटरव्ह्यू द्यायला खूपच घाबरले होते म्हणून त्यांना बघून स्वराला थोडं हसू आलं होतं. ती ह्या बाबतीत जरा वेगळी होती. अभ्यास, असो की कुणासमोर बेधडक बोलणं तिचं ते आवडत काम त्यामुळे आज तिला घाबरायला काहीच कारण नव्हतं. एक-एक करता करता शेवटी तिचा नंबर आलाच. तिने आतमध्ये जायच्या आधीच स्कार्फ काढला आणि आतमध्ये जाऊ लागली. त्यांनी तिला आतमध्ये बोलावले. स्वराला बसण्यासाठी सांगण्यात आले आणि ती बसताच पहिला प्रश्न समोरून आला," मिस स्वरा मोहिते हा तुमचा चेहरा असा का?"

स्वरा हसतच उत्तरली, " सर कुणाच्या तरी प्रेमातल्या नकाराची ही निशाणी आहे. मी नकार दिला आणि त्याला माझा नकार पचला नाही म्हणून हे सर्व घडलं. ज्याचे त्याचे इगो प्रॉब्लेम काय करणार?? "

स्वराने हसत उत्तर दिलं आणि समोरच लोक शांतच झाले. स्वराने मागच्या काही वर्षात माणसे बदलताना बघितली होती त्यामुळे समोरच्या माणसांकडे तीच लक्ष गेलं नव्हतं. ती त्यांचे चेहरे वाचायला विसरली होती. पुढे त्यांनी तिला भरपूर प्रश्न विचारले. तीही अगदी कॉन्फिडन्टली उत्तर देत होती. समोरच्यांचा प्रश्न आला की स्वराच उत्तर तयार असे त्यामुळे इंटरव्ह्यूअर हैराण झाले होते. सुमारे १५-२० मिनिट तिचा इंटरव्ह्यू चालला होता. त्यात तिने प्रत्येक व्यक्तीला इम्प्रेस केलं होतं. फायनली इंटरव्ह्यू संपला आणि तुम्हाला जॉबबद्दल कळविण्यात येईल अस सांगून तिचा सर्वांनी निरोप घेतला.

आजची मुलाखत इतकी छान झाली होती की तिला माहिती होत आपली जॉब नक्की पक्की होईल. घरीही आली तेव्हा तिचा चेहरा त्यामुळेच खुलला होता . घरच्यांना ही बातमी तिने उड्या मारतच दिली होती त्यामुळे घरचेही खूष होते. आजचा दिवस स्वरासाठी खूप खास होता कारण जेवढी मेहनत तिने केली होती आतां त्या मेहनतीला फळ येणार होत. त्या रात्री स्वराला आनंदाच्या भरात झोपच आली नाही. पुढच्या काही दिवसानंतर आपलं आयुष्य काहीतरी वेगळं असेल ह्या विचाराने ती मनोमन सुखावली होती. आता आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतील आणि आपण आई-वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करू ह्या विचाराने तिला आज झोप आली नव्हती. त्यांनीही तिच्यासाठी खूप मेहनत घेतली होती. आता मुलीच्या आयुष्यात सर्वच चांगलं होईल म्हणून त्या रात्री त्यांना मात्र सुखाची झोप आली होती.

मुलाखत होऊन आणखी काही दिवस गेले. खर तर ४-५ दिवसातच जॉब लेटर यायला हवं होतं पण ८ दिवस होऊनही अजून लेटर आलं नव्हतं. घरच्यांनी तिला त्याबद्दल विचारायला सुरुवात केली होती. स्वरा त्यांना काही दिवसात जॉब लेटर येईल म्हणून समजावत होती पण अजूनही जॉब लेटर का आलं नाही हा विचार तिलाही सतावू लागला. पुन्हा दोन तीन दिवस तिने वाट पाहिली तरीही जॉब लेटर काही आलं नव्हतं आणि तिने स्वतःहून फोन लावला. ती जरा आज घाबरली होती म्हणून रिंग जाताना पण तीच हृदय धडधड करत होत. काही क्षणात समोरून कॉल उचलत रिसेप्शनिस्ट म्हणाली, " हॅलो एस.के. कॉम्प्युटर हब. आम्ही आपली काय मदत करू शकतो?"

स्वरा हसतच उत्तरली, " मॅडम मी स्वरा मोहिते. काही दिवसाआधी मी तुमच्याकडे जॉब साठी मुलाखत दिली होती. सर म्हणाले होते की तुम्हाला काहीच दिवसात कॉल लेटर येईल पण दहा दिवस झाले तरी अजूनही कॉल लेटर आलं नाही म्हणून म्हटलं कॉल करून बघावं."

रिसेप्शनिस्ट नम्रपणे म्हणाली," हो मॅडम कॉल लेटर सर्वाना पोहोचले. तुम्हाला आलं नसेल म्हणजे तुमची निवड झाली नाहीये. बाकी सर्वाना पुढील काही दिवसात जॉईन व्हायचे आहे. तुम्हाला पुन्हा काही माहिती हवी आहे का मॅडम? "

स्वराने हसतच फोन ठेवून दिला. इतकी चांगली मुलाखत गेलेली असतानाही आपली निवड का झाली नाही ह्याबद्दल स्वराला प्रश्न पडला होता. ती स्वतःच दुःखी झाली होती. घरच्यांनी तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या तेव्हा त्यांना ही बातमी देणं तिला परवंडणार नव्हत म्हणून ती शांत बसली होती.

एका कंपनीमध्ये जॉब लागली नाही तर काय म्हणून तिने तीन-चार महिन्यात वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉबसाठी मुलाखत दिली होती. प्रत्यक्षात तिची मुलाखत खूप चांगली जायची पण ऐन वेळेवर अस काहीतरी व्हायचं की तीच सिलेक्शन होता होता रहायच. स्वराला नकाराच कारणच कळत नव्हतं त्यामुळे सुरुवातिला आनंदी असणारी स्वरा आता थोडी उदास राहू लागली होती. स्वराला जॉब का मिळत नाहीये हा प्रश्न तिला सतावू लागला होता. तिला जॉब मिळत नव्हती म्हणून आपल्याच अभ्यासात काही कमी असेल म्हणून पुन्हा ती जास्त अभ्यास करत होती तरीही परिस्थिती काही बदलत नव्हती. नकार तिच्या आयुष्याचा भाग बनत गेला. स्वरा अलीकडे विचारातच हरवली असायची तिला कारण सापडत नव्हत म्हणून ती आणखीच दुःखी झाली होती.

अशीच एक सायंकाळ. स्वरा टेरिसवर बसली होती. ती समोरच शांत वातावरण बघण्यात बिजी होती की समोरून एक काकू आपल्या मुलीला म्हणाल्या, " ए बाये आपले चेहरा बघ कस झालाय आणि वरून विचारतेस की मूल लग्नाला का नकार देतात?"

स्वराला वाटलं की त्या काकू तिलाच म्हणत आहेत. स्वरा धावतच टेरिस वरून बेडरूममध्ये पोहोचली. तिला आज खूप दिवसाने आरशात बघावस वाटत होतं पण ती आरशाजवळ जाऊनही स्वतःला आरशात बघू शकली नाही. तेवढ्यात पून्हा काकूंचे शब्द तिला आठवले," चेहरा बघ मग कळेल नकार का येतात!! "

काकूंचे शब्द आठवताच स्वराच्या डोळ्यातून अश्रू आपोआप बाहेर आले. आज कितीतरी दिवसांनी तिच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि पुन्हा एकदा समाज नक्की कसा आहे ह्याच तिला उत्तर मिळाल. मागील काही दिवसांपासून ती जी उत्तर शोधत होती ते उत्तर नकळतपणे समोर आलं होतं. इथे पण लोकांना स्वराच्या टॅलेंट, शिक्षणापेक्षा चेहराच महत्त्वाचा वाटत असल्याने स्वराचे डोळे पाझरायला लागले होते. स्वरा पुन्हा एकदा दुःखांच्या गर्ते छायेत बुडाली होती आणि मनात एकच प्रश्न होता," आयुष्य जगताना चेहरा इतका महत्त्वाचा का होऊन जातो की बाकी सर्व गोष्टीकडे आपोआप दुर्लक्ष होत?"

प्रश्न खूप गंभीर होता आणि त्याच उत्तर कदाचित कुणाकडेच नाही.

मेरे हौसलो के पंख न जाणे क्यू काटना चाहते हो ?
मेरे जजबात हर बार क्यू कुरेदना चाहते हो ?
क्या हक नही है मुझे आगे बढने का
अगर नही तो बता दो , क्या मुझे मौत का कफन पेहनांना चाहते हो ????

क्रमशा ...