उसकी रेहमतमेही रेह गयी होगी कोई कमी
वरणा किसींको ताजमहल तो किसिंको कब्रस्तान ना बनाता
एक मंजिल है प्यार की तो दुसरी मंजिल है सुकून की
अगर मोहब्बत ना होती तो मेरा हाल आज कुछ यु ना होता
अन्वय घरी तर पोहोचला होता पण तिच्या प्रश्नाने त्याचा काही पिच्छा सोडला नाही . स्वरा फार कमी बोलायची पण जेव्हा बोलायची तेव्हा तेव्हा तीच एक एक वाक्य विचार करायला लावायच. आधी हे सर्व पूजाने अनुभवलं होत तर आज पहिल्यांदा अन्वयने अनुभवलं . तिचा प्रश्न त्याच्या मनात असा घर करून गेला की त्याला त्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं . त्याने आज जेवणही केलं नव्हतं . बेडवर झोपायला पडला तर झोपही येईना . काही क्षण तसच त्याच्या विचारांशी युद्ध सुरू होत पण त्याची मनस्थिती काही ठीक वाटत नव्हतीं . तो तडक बेडवरून उठला आणि गॅलरीमध्ये पोहोचला . बाहेर छान थंड वारा वाहत होता आणि त्याच्या मनात प्रश्न आला , " अन्वय , स्वरा आज अगदी थोडस बोलली पण तिच्या शब्दात घाव दिसतात रे ! खरच बोलली ती की कुणी तिला बंधनातून सोडवून निघून जाईल पण पुढे काय ? आज तू तिला ह्या बंधनातून सोडवलसही तरीही तुझ्यानंतर ऑफिसमध्ये कुणी दुसरा येईल मग तो तुझ्या वागण्याप्रमाणे थोडी वागणार आहे ? त्याने तिला बंदिस्त करून ठेवल तर ? तसेही इतर लोकांनी तर तिला आधीच बंदिस्त केलं आहे मग दुसरा बॉस आला आणि त्याने दिला बंदिस्त केलं तर ? म्हणजे पुन्हा स्वरा आयुष्याच्या लढाईमध्ये हरेल ? अशी किती वेळा आणि कुणासमोर ती हरेल ? ह्यावर पर्याय नाहीये का काही ? "
अन्वय विचार करत होता पण त्याला त्याच उत्तर मिळत नव्हत . आयुष्यात पहिल्यांदाच तो स्वतःला हतबल समजत होता . त्याच्या हातात शक्ती होती सर्व काही बदलण्याची , ईच्छाही होती पण तरीही तो काहीच करू शकत नव्हता . ना तिच्या वयक्तिक आयुष्यात , ना तिच्या प्रोफेशनल लाइफमध्ये . आज आयुष्यात सर्वांत जास्त दुःख त्याला होत होत . त्याचे डोळे पाणावले होते तरीही त्या प्रश्नाचं कोड सुटत नव्हतं . त्या रात्री त्याला झोपच लागली नाही . तो फक्त विचार करत होता आणि अचानक त्याच्यासमोर तिचा चेहरा यायचा . सुंदर चेहरा नाही जो त्याच्या मनात बसला होता तर तो कुरूप चेहरा ज्याला पाहून लोक आपली वाट बदलतात . तिला लोक त्रास देताना तो अनुभवत होता आणि त्याच्या अंगावर भीतीने थरकाप सुटला . रात्र सरत होती आणि तो आपल्या विचारात गुंतला होता . रात्री बऱ्याच अंती त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल होत . त्याने काहीतरी मनाशी ठरवलं होतं पण त्यालाही माहीत होतं की आपण जे ठरवलं ते इतकं सोपं नाही पण त्याने ठरवलं होतं आणि आजपर्यंत अशी कुठलीच गोष्ट नव्हती जी अन्वयने ठरवली होती आणि पूर्ण केली नव्हती . काय होत अन्वयच्या मनात ?
सकाळचे 11.30 वाजले होते . अन्वय ऑफिसला आला होता पण त्याने अजूनही कामाला सुरुवात केली नव्हती . तो चेअरला टेकून निवांत पडला होता . काहीतरी त्याच्या डोक्यात विचार होते जे त्याला स्वस्थ बसू देत नव्हते . मागचा एक आठवडा त्याची अशीच स्थिती होती . आधी सतत कामावर लक्ष देणारा अन्वय अलीकडे ऑफिसला येत तर होता पण त्याच कामात लक्ष लागत नव्हत . त्याच्या मनात कुठली तरी गोष्ट होती जी रुतून बसली होती . ती पूर्ण केल्याशिवाय कदाचित त्याला चैन पडणार नव्हतं . तो चेअरवर डोळे मिटून बसलाच होता की समोरून आवाज आला , " मे आय कम इन सर ? "
आवाज तर त्याला आला होता तरीही त्याने डोळे उघडले नाही उलट तो आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं . तो डोळे मिटुनच म्हणाला , " येस कम इन मिस टॉपर ."
तो अजूनही डोळे मिटुनच होता . स्वरा आतमध्ये आली तरीही त्याने कसलीही हालचाल केली नव्हती . त्याला इतकं शांत बघून स्वरा काही क्षण तशीच उभी राहिली . तिला नक्की त्याच्याशी बोलू की नाही कळत नव्हतं . तेव्हाच अन्वय म्हणाला , " मिस टॉपर तुम्ही काम करायला आलात ना मग माझ्याकडे काय बघत बसला आहात ? सांगा काय काम आहे ? "
तो बोलत तर होता पण त्याने डोळे उघडले नाही . तिच्या चेहऱ्यावर क्षणभर चिंतेच्या रेषा झळकत होत्या आणि ती हळूच म्हणाली , " सर ही मागच्या कामाची फाइल आहे . पूर्ण झाली आहे . प्लिज एकदा चेक करून घ्या आणि सही करा . "
तो डोळे मिटुनच म्हणाला , " ठीक आहे मी बघतो नंतर . "
काल अचानक राग आज एकदम शांत. स्वराला त्याचा स्वभाव बघून काहीच कळत नव्हतं पण तिला विचारायची काही हिम्मत झाली नाही आणि ती विचार करत करतच जाऊ लागली . ती दारापर्यंत पोहोचलीच होती की पहिल्यांदा डोळे उघडत तो म्हणाला , " मिस टॉपर वन कॉफी विथ मी प्लिज . "
तिने पलटून त्याच्याकडे पाहिले . पहिल्यांदा तो डोळे उघडून बघत होता . खर तर तिने आताच कॉफी घेतली होती म्हणून ती नकार देणार होती पण जेव्हा ती त्याच्याकडे वळाली तेव्हा त्याचे लाल भडक डोळे , उतरलेला चेहरा पाहून क्षणभर तिच्या डोक्यात वेगळीच शंका आली आणि ती हळूच स्वरात म्हणाली , " चालेल सर . "
ती चेअरवर येऊन बसली तर अन्वयने कॉफी ऑर्डर केली . तो पून्हा चेअरला टेकून बसला आणि त्याने डोळे मिटले . स्वरा त्याच्याकडे बघून कसलं तरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही मिळालं नाही . दोघात काही वेळ शांततेच वातावरण होत आणि स्वरा नकळत विचारून गेली , " सर तुमची तब्येत बरी नाहीये का ? काल पासून जाणवत आहे शिवाय आज पण डोळे लाल आहेत . तुमची झोप झाली नाहीये बहुतेक . "
ती त्याच्याकडे बघत होती तर तो डोळे मिटून क्षणभर हसला . त्यांच्यात ती शांतता अजूनही जशीच्या तशी होती तेवढ्यात काका कॉफी घेऊन आले . काकांनी कॉफी टेबलवर ठेवली आणि क्षणात बाहेर गेले . तीच आताही लक्ष कॉफीकडे नव्हतं . ती फक्त त्याला न्याहाळत होती आणि अचानक त्याने डोळे उघडले . त्याच्या डोळ्यात बघताच तिने आपली नजर खाली केली . अन्वय क्षणभर गालातल्या गालात हसत म्हणाला , " मीस टॉपर कॉफी प्लिज ! "
त्याचा आवाज येताच तिने कॉफीचा कप हातात घेतला आणि शांतपणे घेऊ लागली . अन्वयनेही कॉफीचा सिप घेत म्हटले , " मिस टॉपर तुम्ही मला प्रश्न विचारता , आज मी एक प्रश्न विचारू ? "
स्वरा त्याच्याकडे पाहतच उत्तरली , " विचारा ना सर ! "
त्याने कॉफीचा कप खाली ठेवला आणि हळूच हसत उत्तरला , " मिस टॉपर तुम्ही कुणासाठी जगत आहात आणि कशासाठी ? इन शॉर्ट तुमचे आयुष्यात गोल्स काय आहेत ? "
स्वराने कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि मिश्किल हसू ओठांवर आणत म्हणाली , " सर हा प्रश्न जर तुम्ही मला काही वर्षाआधी विचारला असता तर ह्याची मी वेगवेगळी उत्तर दिली असती पण ह्या काही वर्षात ती सर्व स्वप्न , ते गोल्स आणि जगायच कुणासाठी हा प्रश्न मी माझ्या सोबत विसरून गेले त्यामुळे सध्या मला विचारणार तर त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे . जगते आई - वडिलांसाठी , गोल्स आई - बाबांच्या चेहऱ्यावर कायम हसू आणण आणि जगत आहे कारण ते माझ्यासोबत आहेत म्हणून . "
ती हसतच होती की अन्वय पुन्हा म्हणाला , " तुमची सर्व लाइफ त्यांच्या अवती - भवती आहे मग ते गेल्यावर तुम्ही काय करणार आहात ? "
स्वरा हलकेच स्मित करत उत्तरली , " कदाचित देवाला प्रार्थना करेन की ह्या बंदिस्त जगातून मला लवकर मुक्त कर . माझ्यासारख्या लोकांना तुझी गरज आहे ह्या समाजाची नाही . "
ती हसत होती तर अन्वय पुन्हा शांत झाला . त्याला समोर काही विचारायची हिम्मत झाली नाही . काही क्षण दोघेही कॉफी घेत होते आणि कॉफी संपताच स्वरा उठून आपल्या केबिनला पोहोचली .
काही क्षण गेले . स्वरा तर गेली होती पण अन्वय अजूनही शांत झाला होता . एक तर त्याला काल रात्री तिच्या प्रश्नाने हैराण करून सोडले होते तर आज नव्याने तिने पुन्हा त्याला काहीतरी बोलून हैराण करून सोडले . त्याच्या डोक्यात सहज प्रश्न येऊन गेला , " आपलंच आयुष्य आणि आपल्यासाठी काही नाही . तू जगते आहेस , सर्व सहन करून फक्त आई - बाबांसाठी ? स्वरा काय कोड आहेस तू ? तुझ्याबद्दल जेवढा विचार करतोय तेवढाच आणखी माझा गोंधळ उडतोय . जगात तुझ्या एवढं कुणी सहनशील असेल का ग ? जी सर्व सहन करतेय पण स्वतःच आयुष्य जगता यावे , स्वतःच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं म्हणून नाही तर दुसऱ्यांसाठी ..खरच काय आहेस स्वरा तू ? "
अन्वयने विचार करता - करता क्षणभर तिच्या केबिनवर नजर टाकली . त्याला वाटलं होतं की ती इथून बोलून गेल्यावर थोडी उदास असेल पण सर्व उलटंच झालं . ती हसत हसत आपलं काम आवरत होती . तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं की कुठली चिंता ! तिला दुसऱ्यांसाठी जगायच होत तरी आयुष्याचा कंटाळा आला नव्हता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला जग कितीही त्रास देत असल तरीही तिने कुना विरुद्ध एक शब्द पलटून बोलला नव्हता . स्वरा म्हणजे जणू प्रेमाचं एक उदाहरणच फक्त खंत अशी होती की त्याच प्रेमाने तीच आयुष्य उध्वस्त केलं होतं . अन्वयच्या डोक्यात पुन्हा तोच प्रश्न आला , " स्वरा तुझ्याएवढं खरच कुणी सहनशील असेल ? "
तो काही क्षण तिच्याकडे पाहत होता आणि त्याच्या डोक्यात काहीतरी ट्यूब पेटली . त्याने तिच्यावरून लक्ष टेलिफोनकडे दिलं आणि कुणाला तरी फोन लावला . काहीच क्षणात काका आतमध्ये आले आणि अन्वय हसत उत्तरला , " काका सर्वाना सांगा की पुढच्या 10 मिनिटात सर्व आपापल्या फाइल्स घेऊन मिटिंगमध्ये रूम मध्ये या, स्वरालाही सांगा."
काका बाहेर जाताच त्यांनी सर्वाना सरांचा निरोप पोहोचवला . निरोप येताच सर्व जरा गोंधळले होते तर स्वरा तेच हसू ओठांवर ठेवत मिटिंग रूमकडे निघाली . तो त्या दोन्ही दृष्याकडे बघून क्षणभर हसत होता . आता जवळपास सर्व स्टाफ मिटिंग रूम पोहोचला ह्याची खात्री होताच तोही मिटिंग रूममध्ये पोहोचला . त्याला बघताच सर्वांनी उठून " गुड आफ्टरनून " विश केलं . त्यानेही हसूनच त्यांचं विश स्वीकारलं आणि चेअरवर जाऊन बसला . त्याने पुन्हा एकदा सर्वांचे चेहरे न्याहाळले . सर्वांचे चेहरे खूप सुंदर होते तरीही एकाच्याही चेहऱ्यावर तरतरी नव्हती . आता त्याने लक्ष स्वराकडे दिले आणि जाणवलं की तिचा चेहरा खराब झालाय तरीही तीच हसू त्या चेहऱ्यावर येऊन त्याच्या मनाला प्रसन्न करत होत . तो क्षणभर हसतच म्हणाला , " सो फ्रेंड्स . आजपर्यंत तुम्हाला जी कामे दिली आहेत . त्याच्या फाइल्स मला दाखवा . तोपर्यंत इथून कुणीही हलणार नाही . "
आता सर्वच जरा घाबरले होते . कुणीच आपली फाइल दाखवायला तयार नव्हत आणि स्वराने आपली फाइल समोर केली . त्याने फाइल हातात घेतली आणि 10 मिनिट बघत होता . एक एक पान पलटवताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता . फाइल पाहून झाली आणि त्याने आनंदातच बाजूला ठेवली . त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सर्व टेन्शन फ्री झाले . हळूहळू अन्वय सर्व फाइल चेक करत होता आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरल होत . अलीकडे त्याच कामात मन लागत नव्हत आणि आता तो काम बघायला बसला तेव्हा दोन तास होऊन गेले होते तरी त्याला कंटाळा आला नव्हता . शेवटी सर्व फाइल चेक करून झाल्या . त्याच्या चेहऱ्यावर अजूनही हसू होत म्हणून सर्वच खुश होते . त्याने एकदा सर्वांकडे नजर टाकली आणि बेंचवर हात मारत म्हणाला , " ऑल ऑफ यु . तुम्ही इथे काम करायला येता की मज्जा मारायला ? एकाची फाइल पूर्ण झाली नाहीये . नक्की तुमचं ऑफिसमध्ये काय सुरू असत ? तुम्हाला आणि मिस स्वराना सारखीच सॅलरी मिळते ना तरीही तिने आपले काम कसे वेळेत पूर्ण केले आणि तुम्ही काय करत आहात ? फक्त पार्टी करायला जमत तुम्हाला आणि कामाच काय ? ते कोण पूर्ण करणार ? बोला आता शांत का? "
तो रागात बोलत होता तर आता सर्व शांत झाले होते आणि तो पुन्हा रागावत म्हणाला , " तुम्हालाही हवी आहे का स्वरा सारखी स्पेशल केबिन . हवी असेल तर सांगा मी देतो तुम्हाला ? " ते कुणीच काहीच बोलत नव्हते आणि तो पुन्हा एकदा बेंचवर हात आपटत म्हणाला , " आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग ! आज कोणत्याही स्थितीत काम पूर्ण झालं पाहिजे अन्यथा अर्धी सॅलरी कापली जाईल . "
ते सर्व अजूनही त्याच्याकडे तोंड पाडून बघतच होते की तो ओरडतच म्हणाला , " माझं तोंड पाहून काम पूर्ण होणार आहे का ? गेट आऊट ऑल ऑफ यु आणि काम झाल्याशिवाय आज कुणीही घरी जायचं नाही . "
त्याने बोलणं पूर्ण करताच सर्व आपापल्या डेस्ककडे पळाले तर स्वरा अजूनही त्याच्याकडे बघत होती . काही क्षण गेले . आताच सर्वांवर रागावणारा तो क्षणात हसू लागला आणि स्वराच्या चेहऱ्यावर गोंधळ पसरला होता . स्वरा त्याच्याकडे बघत होती आणि तो हळूच उत्तरला , " मिस स्वरा असच बघत बसणार आहात का ? "
त्याच उत्तर ऐकताच ती पटकन पळाली पण त्याला वळून पाहायला तीच मन आवरू शकलं नाही . ती त्याला विचित्र नजरेने बघत चालली होती तर तो आताही तिच्यावर हसत होता .
तो केबिनला पोहोचला आणि समोरची सर्व मज्जा बघत होता . आज दिवसभर सर्व आपल्या कामात व्यस्त होते एवढंच काय त्यांनी टिफिन पण खाल्ला नव्हता . थोडं फार रागावल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कितीतरी टेन्शन आलं होतं . तर त्याने स्वराकडे बघितलं ती आताही शांत राहून काम करत होती . त्याने स्वराकडे बघत हसतच म्हटले , " स्वरा आज तुझा आदर पुन्हा वाढला आहे . तू गेले 8 वर्ष हे सर्व सहन करते आहेस तरीही तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत नाही आणि ह्यांना बघ एक दिवस ओरडलो तर कसे चेहरे केलेत त्यांनी . हेच लोक जेव्हा तुझ्यासोबत असे वागतात तेव्हा समजत नाही का ग ह्यांना की तुला किती त्रास होत असेल ? आपला त्रास सर्वाना दिसतो पण आपणच समोरच्याला त्रास देताना मग त्या गोष्टी लक्षात येत नाही का ? " तो पुन्हा हसतच म्हणाला " म्हणून तू बेस्ट आहेस स्वरा . मला माझं उत्तर मिळाल खरच तुझ्यासारख सहनशील कुणीच नाही . पण माझं तुला प्रॉमिस आहे की हे जास्त दिवस चालणार नाही . तू जे जे सर्व डिजर्व करतेस ते तुला मिळेल . आय प्रॉमिस स्वरा तू पुन्हा आपल्यावर प्रेम करायला लागशील आणि जेव्हापर्यंत हे साध्य होणार नाही तोपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही . "
अन्वयच्या चेहऱ्यावरचा राग अचानक नाहीसा झाला होता आणि आपोआपच चेहऱ्यावर हसू आलं . आज त्या सर्वांना काम करताना बघून तो क्षणभर हसलाच होता . त्यांनी तिला जो त्रास दिला होता त्याच थोडं फार त्याने त्यांना परत केलं होतं , आशा होती की ते तिचा त्रास आता समजून घेतील ?
सायंकाळचे 6 वाजले होते . ऑफिस सुटायची वेळ झाली होती पण कुणीही टेबलवरून उठत नव्हते . अन्वयने आपली बॅग हातात घेतली आणि मेन रूममध्ये जात मोठ्यानेच म्हणाला , " काही गरज नाहीये रात्रभर काम करायची . जा घरी लवकर . सर्व वाट बघत असतील तुमची घरी आणि पैसे पण कापल्या जाणार नाही . "
तो हसत हसत बाहेर पडला तर सर्व अजूनही त्याच्याकडे बघत होते . तो आज खूप खुश होता आणि स्वतःच्या धुंदीतच चालत होता . त्याला स्वरा मागून येत आहे ह्याचही भान नव्हतं . स्वरा त्याला आवाज देत होती पण त्याच कुणाकडे लक्ष नव्हतं . तो चालतच होता आणि स्वरा धावत पळत त्याच्या जवळ येत म्हणाली , " सर किती आवाज देत होते तुम्हाला थांबत का नाहीत ? "
तिला बघून तो म्हणाला , " सॉरी लक्ष नव्हतं . "
ती काही क्षण श्वास घेऊ लागली . आता ती नॉर्मल वाटत होती आणि दोघेही हसतच चालू लागले तेवढ्यात स्वरा उत्तरली , " आज तुम्ही मला प्रश्न विचारला ना मग मला एक उत्तर हवंय , देणार ? "
अन्वय हसतच उत्तरला , " बापरे ! आज मिस टॉपर मला प्रश्न विचारणार भीती वाटते आहे . तुमचा प्रश्न आला ना की बस काळजात धसकन होत . कुठून आणता हो असे शांत करणारे प्रश्न ? ( तिचा चेहरा पडलेला पाहून ) बर विचारा ? मला जमलं तर देईन उत्तर . तसे तुमच्या प्रश्नांना उत्तरे नसतात पण करेन प्रयत्न ."
ती हसत हसत उत्तरली , " तुमचे आयुष्यात काय गोल्स आहेत ? "
तो रस्त्यातच थांबला . त्याने तिच्याकडे नजरभर बघितले आणि हसतच उत्तरला , " आतापर्यंत आयुष्यात एकही गोल्स नव्हते पण आता एकच गोल आहे ज्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करणार आहे . ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सर्वात जास्त आनंद होईल मला .तोपर्यंत ते पूर्ण करण्याचे मार्ग शोधत बसायचे . अगदी तसेच जसे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधतो पण हाती काहीच लागत नाही. "
ती प्रश्नार्थक नजरेने उत्तरली , " तेच ना कुठला गोल ? "
तो हसत - हसत उत्तरला , " मिस टॉपर काही प्रश्नांची उत्तरे वेळ आल्यावर मिळतात . तुम्हालाही मिळेल ह्या प्रश्नाचं उत्तर तोपर्यंत ही गोष्ट माझ्यावर उधार राहिली ."
त्याच उत्तर ऐकून ती क्षणभर हसली पण नंतर विचारांच्या गर्ते छायेत बुडाली तर अन्वय तिला अस बघून फक्त हसायच काम करत होता . " काय होत त्याच गोल ? " हा प्रश्न तिच्या मनात होता तर उत्तर तिच्या समोर असतानाच ती विचार करतेय म्हणून तो हसत होता . अन्वय - स्वराच एक वेगळं नात होत ..जे तिला कधीच समजणार नव्हतं आणि गंमत अशी की तोही तिला त्याच्याबद्दल काहिच सांगू शकणार नव्हता . पण हे आयुष्यभर असच राहणार होत का ?
तुझे हसणे जणू सोनेरी पहाट
तरीही ते सतत बघायला का पाहावी लागते वाट?
क्रमशा ....