भाग्य दिले तू मला - भाग ६२ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ६२

तुमको देखा तो मेहसुस हुवा
आंखो से इजहार कैसे होता है
मजाक करणे वाले मूह पे तेजाब फेक जाते है
सच्चा प्यार तो हमेशा खामोश रेहता है

स्वराला दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑफिसला जायचं असल्याने स्वरा सकाळी- सकाळीच मुंबईसाठी स्वारगेट बसस्टॉपवर पोहोचली होती. सोबत पूजा देखील होती. बस सुटायला आता अगदी १० मिनिटे बाकी होती आणि पूजा उत्तरली," स्वरा सॉरी! खर तर कॉलेजला होते तेव्हा तुझ्यासोबत प्रत्येक क्षण घालवायला मिळत होता पण आता कामाच्या नादात मलाच वेळ मिळत नाही त्यामुळे तुझ्या सोबत राहता येत नाही. तू काल सांगितलं किती आणि काय सहन केलंस तेव्हा फारच वाईट वाटलं. एक क्षण वाटून गेलं मी सोबत असते तर?? कदाचित मी तेव्हा तुझ्या सोबत असते तर खरच सपोर्ट मिळाला असता तुला, तुझे दुःख कमी करू शकले नसते पण प्रत्येक क्षणी दुःखात सहभाही होऊन तुझं दुःख वाटून घेतलं असत पण नाही झाल सॉरी!! स्वरा मी प्रॉमिस केलं होतं की तुला हवं तेव्हा तुझ्यासोबत राहीन पण नाही देता आली यार मला साथ. एक मैत्रीण म्हणून मी कायमच कमी पडले. आता ना मला स्वताचच राग येतोय. कशी झाले मी इतकी स्वार्थी??"

पूजाचा चेहरा पडला होता आणि स्वरा हसतच म्हणाली," बर झालं सोबत नव्हतीस नाही तर अन्वय सर कसे आले असते माझ्या आयुष्यात? आयुष्यात प्रॉब्लेम्स नसते तर प्रॉब्लेम सोडवणारा कसा आला असता? मान्य की मी कॉलेजला असताना तुला बॉयफ्रेंड म्हटलं होतं पण ते गमतीत होत. ते सिरीयस नको घेऊस. तेव्हा मी जरा दुःखी होते पण काय आता तुझ्यासोबत लग्नाची स्वप्ने पण पहायची का? लोकांनी काय म्हटलं असत आपल्याला? लेस्बियन! नको रे बाबा विचारच!! आधीच लोकांनी काय कमी नाव दिलेत मला? भूत, माकड आता लेस्बियन नाही परवंडणार!! आता नको बाबा पुन्हा एक नाव. बर तेही केलं असत तुझ्यासाठी, पण तुझ्या आईला नसती आवडली तुझी ही गर्लफ्रेंड. अशी जळकी गर्लफ्रेंड??

स्वराच्या शब्दाने पूजाच्याही चेहऱ्यावर हसू आलं होतं आणि ती हसतच उत्तरली," सर्व काही बदललं पण तुझा हा स्वभाव बदलला नाही. पण हा त्या तुझ्या तीक्ष्ण प्रश्नापेक्षा हे बेस्ट आहे बाबा. माझी तर बोलतच बंद व्हायची तुझ्या प्रश्नासमोर. फायनली तू पुन्हा नॉर्मल झाली आहेस आणि आनंद आहे की ह्या पृथ्वीतलावर तुझ्या प्रश्नांची उत्तरे देणारा कुणीतरी आहे. नाही तर साक्षात देवालाही ती उत्तरे द्यायला खाली ह्याव लागलं असत."

पूजा सहज हसू लागली होती तर स्वराही चेहऱ्यावर थोडं हसू आणत म्हणाली," खर सांगू तर बरं झालं पूजा तू सोबत नव्हतीस. एकटी होते तेव्हा बरच काही शिकायला मिळालं. आता मी इतकी कठोर बनले आहे की लोकांना एकटीच फेस करू शकते. मला आठवते ती फेज जेव्हा माझ्या डोक्यात सतत प्रश्न यायचे. तुला हैराण करून सोडायचे, सर्वाना हैराण करून सोडायचे अगदी अन्वय सरांनाही केलं होतं पण ते एकमेव होते ज्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधून आणले म्हणून तर मी त्यांची झाले आणि मी नकळत माझ्याच बंधनातून मुक्त झाले. खूप काही शिकविल मला ह्या जगाने पूजा आणि राहील तुझं स्थान माझ्या आयुष्यात तर ते कायम खास आहे. एक मैत्रीण म्हणून तू कायम खास आहेस आणि राहशील. ती जागा कुणीच घेऊ शकणार नाही अगदी अन्वय सर देखील नाही. बघ ना माझ्याच नकळत तू काहीच क्षणात माझ्या मनातल ओळखलंस. जे मी कधीच माझ्या तोंडावर सुद्धा येऊ दिलं नसत. अन्वय सर म्हणतात मित्र कायम सोबत असावेत हा अट्टहास असू नये पण जेव्हा सर्वात जास्त गरज असते तेव्हा जो सोबत असतो तो खरा मित्र. तू कायम सोबत नसलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर कोड तू सोडवलस ह्यातच तुझं स्थान समजून घे. तू आताही खूप खास आहेस वेडाबाई माझ्यासाठी. मिस यु पूजा!!"

पूजा जरा आता भावुक झाली होती आणि पूजा उत्तरली," आय एम रिअली हॅपी फॉर यु स्वरा! एक वेळ तुझा प्रेमाबद्दल राग बघून मला वाईट वाटायच. आयुष्य एकट जगणं सोपं नसत हे मला माहिती आहे. तेव्हा तुझी फार काळजी वाटायची पण आता मी निवांत आहे. तुझ्याही आयुष्यात भरभरून प्रेम करणारा कुणी आहे हे ऐकून छान वाटत आहे. थँक्स टू अन्वय सर! त्यांना भेटले तर माझ्या मैत्रिणीला मला परत मिळवून देण्यासाठी थॅंक्यु म्हणेन कारण जे काम दुसर कुणीच करू शकणार नव्हते ते त्यांनी केलं. मला तर उत्सुकता आहे त्यांना भेटायची. भेटवशील ना?"

पूजा बोलतच होती की बस निघण्याची वेळ झाली. स्वराने तिला घट्ट मिठी मारली आणि जाऊ लागली तेव्हाच पूजा तिचा हात पकडत उत्तरली," स्वरा मला कालपासून एक प्रश्न पडला आहे तो असा की जर तू स्वयमशी लग्नाबद्दल शोअर नव्हती तर त्याला भेटायला कशाला बोलावलं होतं??"

स्वरा आता हसतच उत्तरली," त्याची परीक्षा घ्यायला. स्वयमबद्दल सर्व सांगून अन्वय सरांनी किती सुंदर सल्ला दिला मला. किती सुंदर प्रकारे समजावून सांगितलं प्रेम काय असत!! तेव्हा मला त्यालाही अन्वय सरांबद्दल सर्व सांगायचं होत. बघायच होत तो आमच्या नात्याला काय नाव देतो?? तो माझ्या-अन्वय सरांच्या नात्याला कस घेतो ते बघायच होत?"

पूजा गोंधळात पडली होती आणि त्याच स्वरात उत्तरली," मग काय उत्तर देणार होतीस त्याला?"

स्वरा आता क्षणभर हसत राहिली आणि बसमध्ये चढत उत्तरली," तू बेस्टी आहेस, तूच विचार काय काय उत्तर देणार होते. तुला मिळेल पटकन उत्तर..इतकं मोठं कोड सोडवलस हे नाही जमणार का??"

बस निघाली आणि स्वरा हसत हसत समोर जाऊ लागली तर पूजाचा अचानक लाईट लागला. तीही हसू लागली आणि मनात शब्द आले," पागल म्हणजे तू त्याला आधीच सांगनार होतीस की मी अन्वयच निस्वार्थ प्रेम कधीच विसरू शकत नाही. त्याला आज नाकारल तर मी जिंकेल पण प्रेम हरेल म्हणजे स्वरा तू मला बनवत होतीस? म्हणून त्याला भेटायला बोलावलंस!! तू आधीच ठरवलं होतंस त्याला काय उत्तर द्यायचं ते? म्हणजे माझ्यासोबत सर्वच लोक मूर्ख बनले? त्याच्याच तोंडून काढून घेणार होतीस की लग्न कर अन्वयशी! म्हणजे प्रोब्लेमच नाही. वा! क्या बात है!! उगाच टॉपर नाहीस तू!!" तिलाही क्षणातच स्वराच्या हसण्यामागचं उत्तर सापडलं. स्वरा हसत होती आणि पूजा उत्तर विचार करून स्वतःला आवरू शकली नाही. तिच्या तोंडून शब्द आले," लबाड पोरगी!! पण काहीही म्हण आहेस खास!! स्वरा प्रत्येक आई-वडिलांना एक मुलगा नाही मिळाला तरीही चालेल पण तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक आई-वडिलांना देऊ दे. तुझा अभिमान किती वाटतो ते शब्दात नाही सांगू शकत आणि धन्य ते अन्वय सर की ज्यांनी सांगितलं प्रेम अजूनही जिवंत आहे. ते चेहऱ्यावर नाही मनावर होत. प्रेमाला सुंदर चेहरा नाही तर सुंदर मन जिवंत ठेवत असत. अन्वय सर खूप खूप थॅंक्यु स्वराच्या आयुष्यात नवं-नवीन रंग भरण्यासाठी. खूप खूप थॅंक्यु!!"

हळूहळू बस समोर जाऊ लागली आणि पूजा दिसेनाशी झाली. स्वराही आपल्या सीटवर जाऊन बसली आणि बाजूची गर्दी बघू लागली. शहरातून जाताना बराच गोंगाट होता त्यामुळे ती बाहेरच बघत बसली होती पण बसने जसा शहरी रस्ता पार केला तशीच स्वरा शांत झाली आणि बाहेरच वातावरण बघून तिच्या मनात विचार आले," प्रेम…!!! अगदी छोटा शब्द पण त्यात किती सामर्थ्य असत हे प्रेम करणार्यानाच कळत. एक वेळ अशी होती की मला प्रेमाची घृणा होता पण अन्वय सर तुम्ही केव्हा माझ्या आयुष्यात आलात आणि मी नकळत तुमची होऊन गेले मला कळलंच नाही. पूजा बरोबर म्हणते की मला प्रेमाची जाणीव करून द्यायला फक्त निस्वार्थ प्रेमच हवं होतं. तुमच्या प्रत्येक शब्दात ते मला जाणवत म्हणूनच कदाचित त्या प्रेमाची ओढ कधीच कमी होत नाही. अन्वय सर मी हे आज मान्य करते की मला ओढ आहे तुमची आणि स्वयम समोर असतानाही त्याला उत्तर देऊ शकले नाही कारण तुमच्यात मी अडकले होते आणि त्यातून फक्त मीच माझ्या मनाला मुक्त करू शकत होते. मलाही कधी कधी प्रश्न पडायचा की का मी स्वयमला उत्तर देऊ शकत नाही, आज मला पूजाकडून ते कळलं. हो सर तुम्ही ह्या स्वराला पूर्णता बदलल म्हणून ह्या स्वराच्या आयुष्यावर तुमचा अधिकार आहे किंबहुना मी म्हणेन की मलाच आता तुमचं निस्वार्थ प्रेम आयुष्यभर अनुभवायचं आहे. प्रेम चुकीच असत मला कायम वाटायचं पण आता आनंदाने सांगेन की मला हेच प्रेम अनुभवायचं आहे. आयुष्यभर अनुभवायचं आहे, प्रत्येक सेकंद अनुभवायचं आहे. प्रेम चुकीच नसतंच, चुकतात ती मानस आणि कधी कधी परिस्थिती पण प्रेमच आहे जे आपल्याला सर्वात आनंदी करू शकते त्यामुळे आता ह्याच प्रेमाला मला माझ्या आयुष्याचा भाग बनवायचा आहे. सर द्याल ना मला स्थान तुमच्या आयुष्यात आणि अनुभवू द्या जगातील सर्वात सुंदर गोष्ट ?? 'प्रेम"- नात रेशमी धाग्यांचे....!!!' "

स्वराच्या डोक्यात विचार सुरू होते आणि बस हळूहळू समोर जाऊ लागली. बस समोर जाताना तिला काहीतरी आठवलं आणि ती मनातल्या मनात पुन्हा बोलू लागली," सर हाच तो मार्ग ना?? रिमझिम पडणारा पाऊस. तुम्ही आणि मी सोबती. तुमची किती इच्छा होती मला बघण्याची पण मी स्कार्फच काढला नाही आणि तुमची ती इच्छा तशीच राहिली. किती वेंधळट हो मी!! जगाचा विचार करताना तुमच्या भावनांना कायमच कमी लेखत आलेले पण तुम्ही मला कधीच चुकीच समजलं नाही उलट कायम माझ्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून प्रयत्न करत होतात. स्वता दुखावले असताना कसे तुम्ही इतरांना खुश ठेवू शकतात खरच मला त्याच नवल वाटत. मला आज जाणवत की तुमच्यासारखा एकमेव आहे म्हणून कदाचित स्वरा हजारो नसल्या तरीही त्यांच्याही आयुष्यात प्रेम आहे. फक्त प्रेम नाही हा निस्वार्थ प्रेम. चेहर्या पलीकडे जाऊन केलेलं प्रेम, बंधना पलीकडे जाऊन केलेलं प्रेम.."

दिवस तोच होता पण रिमझिम पडणारा पाऊस केव्हा मोठा झाला ते मला कळलंच नाही. ती रात्र भयानक वादळाची. तुम्ही आणि मी रूममध्ये बसलेलो. तुम्ही माझ्याशी बोलायला आतुर झालेला आणि मी पुन्हा एकदा वेंधळटासारखी वागले. जो व्यक्ती माझ्यावर मनापासून प्रेम करत होता, त्याच्यासमोरच म्हणाले ह्या चेहऱ्याला कुणी बघू शकत नाही तर बाकी काही करणंच दूर. मला कस कळलं नाही की जो व्यक्ती माझ्यावर इतक प्रेम करतो, त्याचेही काही स्वप्न असतील. त्याने स्वप्नातही काही क्षणाचा विचार केला असेल तेव्हा अस काही ऐकल्यावर त्याला नक्कीच त्रास होईल आणि ते मी बोलून तुमच्या स्वप्नाची राखरांगोळी केली. त्या रात्री तुम्ही पावसात भिजत होतात आणि मी फक्त बघत राहिले. थोडी स्वार्थी आहे ना मी स्वताच्याच दुःखात बुडाले होते तेव्हाही. किती त्रास देतात ना सर तुम्हाला माझे प्रश्न. तरीही कायम तुम्ही त्याची उत्तरे घेऊन येता. धन्य ती माउली जिने असा हिरा जन्माला घातला आहे.

त्या नंतर जेव्हा तुम्ही माझ्याशी न बोलताच निघून गेलात तेव्हाच कदाचित मी तुमच्याकडे ओढले गेले होते, तुमची बेचैनी मला त्रास देत होती फक्त मनात प्रेमाबद्दल विष कालवून ठेवलं असताना मी ते स्वीकारू शकले नाही बस इतकंच पण आता जास्त नाही. पुन्हा मी मूर्ख, तुम्हालाच विचारायला लागले स्वयमबद्दल काय करू? किती त्रास झाला असेल ना तुम्हाला तरीही तुम्ही तो शब्दात व्यक्त केला नाही. खरंच मानलं पाहिजे सर तुम्हाला!! प्रेम करावे तर तुमच्यासारख. तेव्हा मी मुर्खपणे वागले पण आता नाही. आता मला अनुभवायचं आहे तुमचं प्रेम. मग जे होईल ते पहिल्या जाईल. जगाचा विरोध असेल तरीही मी तयार आहे तो विरोध सहन करून तुमचं प्रेम रोज अनुभवायला.."

स्वरा आज आपल्या आयुष्याचे धागे दोरे जोडू पाहत होती आणि ती पुन्हा भूतकाळात पोहोचताना जाणवलं की सुरुवात खूप आधीच झाली होती फक्त तिच्या बंदिस्त मनाला तिला समजावणं कधी जमलंच नाही. पण स्वरासाठी सोपं नव्हतंच ते. ज्या प्रेमामुळे इतका मोठा अपघात झाला होता तेच प्रेम इतक्या सहज स्वीकारणं!! आज स्वराच्या डोक्यात इतके विचार होते की त्या विचारात ती केव्हा मुंबई पोहोचली तिलाही कळलं नाही.

स्वरा ऑफिसला पोहोचली तेव्हा जवळपास ११.३० झाले होते. कार्तिक तिला ओरडणार हे पक्क होत त्यामुळे ती थोडी घाबरली होती. ती ऑफिसला पोहोचली आणि डेस्कवर बसलीच होती की काकांनी, कार्तिकने स्वराला बोलावल्याच फर्मान जाहीर केलं. स्वराने पटकन बॅग बाजूला ठेवली. बाप्पाला कार्तिकपासून वाचव अशी प्रार्थना करून त्याच्या केबिनमध्ये पोहोचली. स्वराला समोर बघताच त्याने घड्याळात बघत विचारले," स्वरा टाइम क्या हुआ है?"

स्वरा नजर खाली करत उत्तरली," सॉरी सर!!"

कार्तिकने पुन्हा एकदा जड आवाजात विचारले," देर होने की वजह??"

स्वरा आताही नजर खाली करत हळुवार आवजात उत्तरली," सर कल काम के लिये देर हो गयी थि इसलीये अकेले रात को मुंबई नही आ पायी. कल दोस्त के यहा पर रुक गयी थि. आज सुबहँही निकली थि पर बससे आते- आते देर हो गयी."

कार्तिकचा मूड अजूनही ठीक वाटत नव्हता आणि तो पुन्हा म्हणाला," हमम.. अँड व्हॉट अपडेट्स अबाऊट येस्टरडेज मिटिंग??"

स्वरा आता जरा शांत झाली होती आणि त्याच्याकडे बघत म्हणाली," सर अच्छि थि. मैने पुरी कोशीष की है उन्हे कन्व्हेंस करणे की लेट्स होप फॉर द बेस्ट. उनहोणें कहा है की वो सिधे आपसे कॉन्टॅक्ट करेंगे इस बारे मे. इसलीये मैने उनसे कुछ कहा नही."

स्वरा एवढं बोलून शांत झाली तर कार्तिक कसला तरी विचार करत होता. काही वेळ वातावरण शांतच होत आणि तो हसत म्हणाला," आय नो अबाऊट युअर परफॉर्मन्स. सो जस्ट चिल!! वी विल वेट!! नाऊ यु मे गो आणि जॉईन द टेबल."

त्याचा विश्वास बघून स्वराचाही स्वतःवरचा विश्वास वाढला आणि ती हसतच बाहेर पडली. ती डेस्कवर बसली आणि दीपिकाकडे बघू लागली. ती स्वराकडे बघत नव्हती. अलीकडे जेव्हापासून स्वरा-अन्वयच्या लग्नाबद्दल तिला विचार आले होते तेव्हापासून दीपिका थोडी शांत-शांत राहत होती. स्वराशीही जास्त बोलत नव्हती. तिची इर्शा बघून स्वराला क्षणभर हसू येई. स्वराने तो विषय गमतीतच सुरू केला होता पण आता तो विषय लवकरच बाहेर येणार होता तेव्हा ती दीपिकाला काय उत्तर देणार होती ते बघायच होत कारण आता तिला कुठलंही खास नात तुटू द्यायचं नव्हतं. नात्यांची किंमत तिला अन्वयनेच तर शिकवली होती. स्वराने काही क्षण दीपिकाकडे बघितले आणि पुन्हा कामावर लागली. ती कामात असताना वेळ कशी निघून जाईल तिलाही कळत नव्हतं.

ती रात्रीची वेळ होती. स्वराचा मूड खुपच मस्त होता. आजच्या दिवसात असा एकही क्षण नव्हता जेव्हा तिच्या मनात अन्वयबद्दल विचार आला नव्हता. अन्वयबद्दल विचार आला की ती आपोआप खुश व्हायची. आजही ती गादीवर पडली होती आणि स्वताचच मोबाइल हातात घेत ती त्याचे, त्याच्या भाचीसोबतचे फोटो बघू लागली. त्यात त्याने कॅप्शन दिलं होतं " माय लव्ह!!" स्वराने ते कॅप्शन बघितलं आणि हळूच हसत म्हणाली," ती तुमचं प्रेम आणि मी कोण?? भोपळा??"

स्वरा क्षणभर स्वतःवरच हसत म्हणाली," आज तिला म्हणून घ्या माय लव्ह पण उद्या माझ्याबद्दलही असच स्टेटस ठेवावं लागेल मग बघू सर्वांसमोर म्हणता का माय लव्ह म्हणून."

स्वरा अन्वयच्या फ़ोटोकडे बघून हसतच होती की तिला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. स्वराने फोन उचलला होताच की समोरून व्यक्ती म्हणाली," सॉरी सॉरी ताई!! म्हणाले होते की लवकर कॉल करेन पण जमलंच नाही. अभ्यासात व्यस्त होते म्हणून राहूनच गेलं. आज वेळ मिळाला म्हटलं ताईशी गप्पा माराव्या म्हणून कॉल केला."

स्वराला तिच्या आवाजावरूनच कळलं होतं की ती मृन्मयी होती. स्वरा तिचा आवाज ऐकताच हसत म्हणाली," चालत ग त्यात काय!! असो तू सांग कशी आहेस? अभ्यास कसा सुरू आहे?"

मृन्मयी हसतच उत्तरली," मी मस्त आणि अभ्यास म्हणशील तर तोही मस्त. करावाच लागेल ना द ग्रेट स्वरा मॅडमचा रेकॉर्ड तोडायचा आहे मला. इतकं अवघड काम आहे सो मेहनत पण तशीच हवी ना?? तेव्हाच तर अन्वय दादा मला स्पेशल गिफ्ट घेऊन देणार आहेत मग अभ्यास जास्त करायला नको. त्याच नादात तर इतके दिवस कॉल करता आला नाही. आज वेळ मिळाला आणि स्वतःला थांबवू शकले नाही."

स्वरा आता रागावतच उत्तरली," अच्छा म्हणजे माझाच रेकॉर्ड तोडणार ते पण गिफ्टसाठी वरून मलाच सांगत आहेस? तुझ्या अन्वय सरांची नंतर खबर घेते आधी तुझी घ्यावी लागेल बहुतेक? लहान मानूंस असून जास्तच बोलते आहेस ना!!"

तीच उत्तर ऐकून काही क्षण शांतता होती. मृन्मयीला बघून स्वराला हसू आवरल नाही आणि ती हसत म्हणाली," गंमत करतेय वेडाबाई! खूप मेहनत कर आणि जर माझा रेकॉर्ड मोडला तर मिच गिफ्ट देईन खुश. इतकी मेहनत कर की गरीब घरच्या मुलांना , त्यांच्या आई- वडिलांना पैशावरून कुणीच डीवचनार नाही. करशील ना?"

मृन्मयी आत ओरडतच उत्तरली," हो खूप करेन. कॉल करण्याचा फायदा झाला!! आता दोन-दोन गिफ्ट मिळणार आहे मग तर मेहनत करावीच लागेल. आता डबल मेहनत करेन बघ!!"

स्वरा आता तिच्या नादानीवर हसू लागली आणि काही क्षण तीही हसत होती. काही क्षण असेच गेले आणि मृन्मयी उत्तरली," माझं सोड तू सांग तुझं काय सुरू आहे??"

मृन्मयीने गमतीला सुरुवात केली होती. स्वराचाही काहीसा असाच मूड होता म्हणून तिची गंमत करायला ती म्हणाली," अजून काय बर माझ्या लग्नाची तयारी सुरू आहे.!! तू येणार का करायला?? थोडं ओझं कमी होईल माझ्यावरच!!"

मृन्मयी अगदी चंचल होती म्हणून मोठ्याने ओरडत बोलून गेली," अय्या किती भारी, येईल ना? का येणार नाही लाडक्या बहिणीच्या लग्नात! एक मिनिट मला आता लक्षात येतंय. काही दिवस झाले अनुभवत आहे.एकदम शांत राहणार अन्वय दादा इतका खुश का?मला वाटलंच होत की काहीतरी खिचडी शिजत आहे तुमच्यात. अन्वय दादा पण खुश आहे खूप काल भेटायला आला होता तेव्हा जाणवलं. पण खडूसने मला काही सांगितलं पण नाही. पन असो..आय एम हॅपी!! चला फायनली तुमचं जुळलं. आता स्वरा- अन्वय एक होणार!!"

मृन्मयी पटकन आवेशात सर्व बोलून गेली म्हणजे तिला काहीतरी अन्वयबद्दल माहिती होत हे स्वराने जाणलं आणि ती जरा खडूस होत म्हणाली," इथे अन्वय सर कुठून आले? मला तर मुलगा आई बाबाने बघितला. तू अन्वयबद्दल बोलते आहेस म्हणजे काही सांगितलं का त्यांनी तुला??"

मृन्मयी आता शांत झाली होती तर स्वरा मनातल्या मनात हसत होती. मृन्मयीला काय बोलू सुचत नव्हतं आणि ती हळुवार उदास स्वरात उत्तरली," अभिनंदन ताई!! मी काहीही बोलत असते ग लक्ष देऊ नको. काहिच सांगितलं नाही त्यांनी मला.."

स्वरा पुन्हा रागावत उत्तरली," अस कस? उगाच थोडी बोलत कुणी? काहीतरी सांगितलं त्यांनी तुला तेव्हाच अस बोलून गेलीस तू.. सांग नाही तर मार खाशील माझा आता!!"

मृन्मयी पुन्हा हळूच बोलून गेली," नाही ग खरच काही सांगितलं नाही त्यांनी? तुला माहिती आहे ना ते शांत असतात शक्यतो मग काय बोलणार आहेत माझ्याकडे??"

स्वराला माहिती होत ती अस काही सांगणार नाही म्हणून अक्कल लढवत म्हणाली," जर तू सांगितलं ना तर मी विचार करेन अन्वय सरांशी लग्न करायचा. आईलादेखील सांगेन..पण जाऊदे आता तू सांगतच नाहीस तर करावं लागेल आई म्हणतेय त्याच्याशीच लग्न. चल ठेवते फोन."

स्वरा फोन ठेवणारच होती की ती उत्तरली," ए थांब ताई कुठे जात आहेस मी सांगते सर्व( स्वरा हसू लागली"). खर सांगू तर ते काहीच म्हणाले नाही उलट मलाच जाणवलं की त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते केव्हाही भेटतात ना मला तेव्हा त्यांच्या ओठी तुझंच नाव असत. मी त्यांना एकदा तुझ्याबद्दल विचारलं तरीही ते काहिच बोलले नाही पण मला माहित आहे त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. सौरभ सर म्हणतात की ते अलीकडे कोणत्या तरी विचारात हरवलेले असतात. स्वरा ताई खर सांगू तर त्यांच्या श्वासा-श्वासात तूच बसली आहेस. मी म्हणेन की त्यांच्या सारखा लाइफ पार्टनर तुला कुणिच भेटू शकत नाही. शोधूनही नाही. प्लिज ताई आईला सांग ना नकार द्यायला."

स्वरा क्षणभर हसत म्हणाली," आई नाही ऐकणार ग तू येऊन बोलतेस का?"

मृन्मयी हसतच उत्तरली," तुमच्यासाठी काहीही!! तू सांग केव्हा येऊ. आता येते तिकीट करून."

स्वराच्या चेहऱ्यावर आज लाली पसरली होती आणि ती हळूच हसत उत्तरली," बस एवढंच सांगितल तू अन्वय सरांबद्दल अजून नाही का काही?"

मृन्मयी विचार करत उत्तरली," आहे ना एकदा ते मला शॉपिंग करायला घेऊन गेले. मी तर शॉपिंग केली पण ते कितीतरी वेळेपासून एका लाल साडीकडे बघत होते. साधी साडी होती ती पण त्यांना काय वाटलं त्यात माहिती नाही बघतच होते. तुझं काही कनेक्शन आहे का ग लाल साडीसोबत किंवा रंगासोबत??"

स्वरा हसतच उत्तरली," हो त्यांनी मला पहिल्यांदा त्याच रंगांच्या ड्रेसमध्ये बघितलं होत."

स्वरा पटकन बोलून गेली आणि मृन्मयी चिडवत उत्तरली," अन्वय दादा आणि रोमँटिक?? क्या बात है!! हा स्वभाव तर मला माहीतच नव्हता त्यांचा. सतत अभ्यास, करिअर बद्दल बोलणारा तो असाही असेल विश्वास बसत नाही. भेटू दे पुढे त्याला कशी चिडवते तुझ्या नावाने!!"

समोरून मृन्मयी हसत होती तर इकडून स्वरा. अन्वयबद्दल बोलताना कुणाच्याही चेहऱ्यावर क्षणभर उदासी नव्हती. बऱ्याच वेळा गप्पा मारल्यावर स्वराने फोन ठेवला. ती पुन्हा एकदा त्याच्या फ़ोटोकडे बघत उत्तरली," अन्वय सर इतकं प्रेम कुणी करत का हो? तेही अशा मुलीवर जी सुंदरच नाही पण सुंदरतेला डाग आहे. काय बघितलं बर तुम्ही माझ्यात अस की जगावेगळ प्रेम करता माझ्यावर?? काय आहे ह्या मुलीत की जगाशी लढायला तयार झाला होतात?"

तुमसे मिल गयी हु फिर एक बार
अब दूर रेहने को दिलं करता नही
मै डुबी हु खयालो मे शाम-ओ-सहर
अब मेरा दिलं मेरी सूनता नही...

क्रमशा....