दिलं से दिलं का ये सफर क्यू समझ ना पायी
तेरे प्यार के एहसास को क्यू मेहससू ना कर पायी
था खुली किताब के जैसा तेरा सच
क्यू जान कर भी मै तुझको अपणा ना पाई?
स्वराने कित्येक वर्षे आधी एक स्वप्न बघितल होत. प्रेमात पडल्यावर प्रत्येक व्यक्ती जसा पाहतो त्यातलच एक स्वप्न. आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याच. मागचे काही वर्षे जणू तिला ह्या स्वप्नाचा विसरच पडला होता पण पुन्हा एकदा त्या स्वप्नांने तिच्या आयुष्यात नव्याने जागा निर्माण केली आणि स्वराच्या आयुष्यात आपोआप आनंद येऊ लागला. तिला आता कशाचीच कमी वाटत नव्हती फक्त वाट होती तिला, त्याला मनातलं सर्व सांगायची.
स्वरा अन्वयसोबत बोलल्यापासून मुक्त झाली होती आणि त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात टेन्शन कधी आलेच नाही. आता घर असो की कामाची जागा स्वरा प्रत्येक जागी आनंदी असायची. तिच्या आयुष्यातील प्रश्नांची शृंखला संपली आणि स्वरा जणू लोकांनी दिलेला तो यातनामय प्रवास सहज विसरून जाऊ लागली होती. तिच्याही मनाला पंख फुटले होते आणि ते आकाशात उडायला आतुर होते. तिला आता स्वप्न पहायची होती आणि ती पूर्णसुद्धा करायची होती. अचानक स्वरा अशी कधी बदलेल अस कुणालाच वाटलं नव्हतं पण ती बदलली आणि स्वराला आता कशाचीच चिंता उरली नाही. तिच्या आयुष्यात तिचा सर्वात जवळचा व्यक्ती येऊ पाहत होता म्हणून ती आतुर होती त्याला भेटण्याशी. अशी भेट जी जी प्रत्येकाच्या ओठी असणार होती.
तो प्रसंग होऊन १०-१५ दिवसांचा कालावधी होऊन गेला होता. स्वरा जोमाने कामाला लागली होती. कार्तिकने तिला एक प्रोजेक्ट पूर्ण करायला दिला होता त्याच संबंधात तिला आज पुण्याला यावं लागलं होतं. स्वरा आज सकाळी-सकाळीच पुण्याला पोहोचली आणि पटापट आपले काम आवरू लागली. तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी एक-दोन मिटिंग होत्या त्या ती पूर्ण करत होती जेणेकरून सायंकाळी लवकर निघता येणार होत पण नेमका आजच कामाला उशीर होत होता. हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधारही लवकरच पडायचा त्यामुळेही स्वरा लवकरात लवकर काम आवरायचा प्रयत्न करत होती. आज तिने कामाला उशीर होऊ नये म्हणून दुपारी जेवण करनही टाळल होत पण व्हायचा तेवढा उशीर झालाच. ती काम करून बाहेर पडली तेव्हा घड्याळात ५ पेक्षा जास्त वाजून गेले होते. तिला बस पकडून जायला पुन्हा उशीर होणार होता त्यामुळे तिला निघायला आता कंटाळा येत होता. तिला नक्की काय करू सुचत नव्हतं म्हणून ती काही क्षण तिथेच उभी राहिली. ती विचार करतच होती की तिला काहीतरी सुचल आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू परतल. तिने पटकन मोबाईलमधून कॅब बुक केली आणि चेहऱ्यावर हसू आणत ती कॅबची वाट पाहू लागली. ती मुख्य शहरात असल्याने कॅबला यायला फार काही वेळ लागला नाही. अगदी १० मिनिटात कॅब हजर झाली आणि स्वरा त्यात विराजमान झाली. स्वरा आज काम करून खूप थकली होती त्यामुळे प्रवास करायला तिला थोडा कंटाळा आला होता पण आज तिच्या जिवलग व्यक्तीला पुन्हा भेटता येईल म्हणून ती मनोमन खुश झाली होती. तिला क्षणभर वाटलं होतं की कॉल करून कळवाव पण त्यापेक्षा सरप्राइज द्यावं म्हणून तिने तो आपला विचार बाजूला ठेवला आणि कॅबमधून बाहेरची वर्दळ बघण्यात व्यस्त झाली. तसे तिला जायला फक्त १५ ते २० मिनिट लागायला हवे होते पण सायंकाळच्या ट्रॅफिकमुळे जवळपास पाऊणतास झाला होता तरी ती पोहोचली नाही. आता जवळपास ६ वाजले होते तरीही ती पोहोचली नाही म्हणून पूजा घरी तर जाणार नाही ना ह्याची भीती तिला सतावू लागली. तिला भीती वाटताच तिने पटकन पूजाला कॉल लावला पण मॅडम काही कॉल उचलेना. मॅडम कुणाशी तरी बोलत होत्या. दहा मिनिटं पुन्हा गेले पण पूजा काही कॉल उचलेना. स्वराला आता राग आलाच होता की ड्राइव्हर म्हणाला," मॅडम इनकोअर सॉफ्टवेअर सोल्युशन्स आले आहे."
कॅब ड्राइव्हर तिच्याकडे बघत होता तर स्वराच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या. आता तिला वाटत होतं की तिला एकदा कॉल करून विचारून घ्यायला हवं होतं म्हणून ती स्वतःच स्वतःवर रागावत होती. तो ड्राइव्हर तिच्याकडे बघत असल्याने आधी तिने त्याला पैसे दिले आणि ऑफिसच्या बाहेर रोडवर उभी झाली. तिने पुन्हा मोबाइल हातात घेतला आणि पुन्हा कॉल लावला. ह्यावेळी सुदैवाने तिने कॉल उचलला आणि स्वरा ओरडतच म्हणाली," ए मूर्ख केव्हाची कॉल करते आहे म्हणजे काम असेल कळत नाही का? किती टेन्शन आलेल मला. इतकं कुणाशी बोलत होतीस की माझा कॉल उचलता आला नाही तुला? बर तेही सोड मला सांग आधी तू कुठे आहेस?? इथे जीव जातोय माझा कळत नाही का?"
पूजा हसतच उत्तरली," हो माझी राणी जरा आधी श्वास घे. महत्त्वाचा कॉल होता म्हणून उचलता आला नाही. आता तुझं उत्तर. ऑफिसला आहे, बस आता घराकडे निघतेच आहे पण तू आज ह्यावेळी कसा कॉल केलास??"
ती ऑफिसलाच आहे हे ऐकून स्वराच्या जीवात जीव आला आणि ती म्हणाली, " माझ्या येळपट मैत्रिणीला भेटायची इच्छा झाली म्हणून कॉल केला."
पूजा गमतीतच म्हणाली," स्वरा काम करून- करून तुझे स्क्रु ढिले झाले आहेत. भेटायला कॉल नाही तर बोलायला करतात. वेडाबाई!!"
स्वराही आता रागातच उत्तरली," हो मला माहित आहे शहाणे पण मी भेटायचच म्हणाले. तुझ्या कंपनीच्या खाली उभी आहे. चल पटकन ये जास्त वाट बघायला नको लावुस. आधीच काम करून करून पाय दुखायला आलेत आणखी उभं राहायला लावून माझा जीव घेऊ नकोस."
पूजा मोठ्याने ओरडत म्हणाली," व्हॉट अ सरप्राइज मेरी जाण!! तू पुण्यात आहेस!! आय मीन तू कंपनीत आहेस! तू थाम्ब मी आलेच धावत- पळत. जाऊ नको कुठे. मी आलेच."
स्वरा समोर काही बोलणार आधीच तिने फोन ठेवला आणि स्वराच्या तोंडून पुन्हा शब्द आले," वेडाबाई!! मोठी झालीस पण अगदी लहान मुलासारख वागतेस."
स्वरानेही फोन ठेवला आणि तिची वाट बघू लागली. स्वराने फोन ठेवून काही सेकंदच झाले होते की पूजा खरच धावत-पळत येताना दिसली. स्वराला तिला अस बघुन हसू येत होतं. ती तिला बघतच होती की पूजाने तिला येऊन घट्ट मिठी मारत म्हणाली," मिस यु सो मच स्वरा! खूप मिस करत होते तुला. बर झालं आलीस ते. किती दिवसाची ओढ आज पूर्ण झाली. खूप खूप आनंद होत आहे मला तुला पुन्हा बघून. आता धम्माल करू आपण. आज काही खर नाही."
स्वरा तिच्यावर थोडी ओरडतच म्हणाली," धम्माल वगैरे नंतर आता माझं पूर्ण शरीर दुखत आहे सो आधी घरी चल, पोटभर जेवायला दे आणि मग बघू तुझी धम्माल."
पूजाने तिची मिठी सोडली आणि हसतच म्हणाली," हा काय मोठा प्रॉब्लेम नाही मॅडम! तुम्ही चला तर आज पंचपक्वान खायला घालते. तुझे आवडते गुलाब जामुन असो की मग पाणी पुरी सर्व खाऊ पण हॉटेल मध्ये हा. मला बनवायला कंटाळा येतो. काहीही म्हण पण आज धम्माल तर बनतेच आफ्टरऑल माझी बेस्टी आली आहे."
स्वरा हसतच उत्तरली," बर बाबा करू धम्माल पण आधी चल. खरच खूप थकले आहे. चल जाऊ पण अशीच पायदळ नेणार आहेस का घरी की काही साधन आहे जायला. मी पायदळ वगैरे नाही येणार हा!!"
पूजाने पटकन तिचा हात पकडला आणि तिला समोर नेत म्हटले," तू पण जास्तच टेन्शन घेतेस वेडाबाई! हे काय रिक्षा स्टॅण्ड समोरच आहे. तुला पायदळ नेऊन मला माझ्या अंगावर पाप थोडी घ्यायचे आहेत. चला जाऊ."
पूजाने स्वराचा हात पकडतच तिला रिक्षाकडे नेले आणि दोघीही रिक्षामध्ये बसल्या. पूजाने तिचा पत्ता सांगितला आणि दोघीही रिक्षात बसून जाऊ लागल्या. रिक्षा सुरूच झाली होती की स्वरा उत्तरली," किती दूर आहे ग तुझी रूम इथून?"
पूजा तिला इशारा करत उत्तरली," अगदीच जवळ. बोलता-बोलता पोहोचू आपण तिथे. लागेल ग अर्धा तास! बर ते सोड मला सांग तू स्पेशली भेटायला आलीस की कामानिमित्य??"
स्वरा विचार करत उत्तरली," दोन्हीही!! कामानिमित्त आले पण म्हटलं भेटून जाऊ."
पूजा आता गाल फुगवतच उत्तरली," अच्छा मला वाटलं फक्त मला भेटायला आलीस! पण इथे तर समजत आहे की मला भेटायला आलीच नव्हतीस. तुला आठवनच नाही येत ना माझी? तू विसरलीस मला. मला ऐकून वाईट वाटलं. मी नाराज झाले स्वरा..!!"
पूजाने तिची मान दुसरीकडे वळवली आणि स्वरा तिचा हात हातात घेत उत्तरली," पूजा मिस करते ग खूप पण स्वतःच्याच प्रॉब्लेम्स मधून वेळ मिळत नाही म्हणून भेटन होत नाही. तुला तर माहिती आहे ना मला किती प्रॉब्लेम्स आहेत ते? तुला नव्याने सांगावे लागतील का?? एक सोडवायला गेलं तर दुसरा तयार असतो. जणू प्रॉब्लेम्सला कुणी माझाच पत्ता दिलाय. तुला विसरेन मी कधी अस वाटत का?"
स्वरा जरा उदास झाली आणि पूजा हसतच उत्तरली," वेडाबाई मी तर गंमत करत होते, माहिती आहे की कामात बिजी झालं की वेळ मिळत नाही आणि मिळाला तरी इतक थकून जातो की कुठे जायच मन करत नाही पण मला छान वाटलं तू भेटायला आली आहेस हे बघून. माझ्या जिवाभावाची मैत्रीण आज माझ्यासोबत आहे तेच खूप झालं मला. कारण काहीही का असेना तू आलीस तेच खूप आहे. अटलिस्ट ह्या बहाण्याने तुझे दर्शन तर झाले. मिस यु स्वरा..!!"
स्वराने तिचा हात हातात घेतला आणि शांत झाली. काही क्षण असेच गेले. त्यांच्या गप्पा सुरूच होत्या की पूजाची रूम आली आणि त्या दोघीही रिक्षामधून उतरल्या. स्वरा पैसे देणार होती पण पूजाने अजिबात ऐकलं नाही. चालकाला पैसे दिले आणि पूजा स्वराचा हात पकडून समोर घेऊन जाऊ लागली. वर ग्लोबल अपार्टमेंट नावाची मोठी पाटी झळकत होती. स्वराच त्यावर लक्ष गेलच होत की पूजा तिला हात ओढून लिफ्टमध्ये घेऊन गेली आणि पाहता-पाहता पूजाची रूम आली. तिने चावीने दार उघडले आणि मध्ये पोहोचली. स्वराही क्षणात मध्ये पोहोचली आणि आतमधल वातावरण बघून हसू लागली. पूजाने पटकन सर्व कपडे उचलून खुर्चीवर ठेवले आणि हसत उत्तरली," तुला तर माहिती आहे ना स्वरा मला आवरायचा किती कंटाळा येतो!! म्हणून उशीर झाला जॉबवर जायला तर असच ठेवते आणि आल्यावर आवरते. कधी-कधी असच ठेवून झोपी जाते. कोण बघायला येतंय आपली रूम? एकटा जीव सदाशिव! ना कुणाच टेन्शन ना कुणाची पर्वा. मीही बोलत काय बसले. तू ठेव बॅग ती आधी आणि फ्रेश हो."
तीच बोलणं सुरूच होत की स्वराने बॅग ठेवली. पूजाने तिला वॉशरूमचा रस्ता दाखवला आणि स्वराही फ्रेश व्हायला पोहोचली. काहीच क्षणात ती बाहेरही आली. स्वरा येताच पूजा फ्रेश व्हायला मध्ये गेली आणि काहीच क्षणात बाहेर आली. ती बाहेर येईपर्यंत स्वराने झाडू मारून, कपडे नीट घडी करून ठेवले होते. पूजाला हे सर्व बघून राग आला आणि ती रागातच उत्तरली," कशाला केलंस शहाणे आल्या-आलीच? मी केलं असत ना? मला ना तुझी हीच गोष्ट आवडत नाही. तुला काय वाटत मला।काम करता येत नाही?"
स्वराही हसतच उत्तरली," येतात ग! माझ्यापेक्षा चांगले येतात पण मॅडम बोलायला जास्त वेळ नको का मिळायला म्हणून पटकन आवरून घेतलं. आता बघ कशी झाली रूम. आता गप्पा मारायला किती मज्जा येईल ना? "
पूजाकडे आता बोलायला काहीच नव्हतं त्यामुळे ती क्षणभर हसत होती.
काहीच क्षण गेले स्वरा-पूजा निवांत बसल्या होत्या. इकडे स्वराने दिवसभरात काहीच खाल्लं नसल्याने तिच्या पोटात कावळे ओरडू लागले होते त्यामुळे काहीच क्षणात त्या दोघीही बाहेर पडल्या. स्वरा आज इतकी थकली होती की तिला चालायची अजिबात इच्छा नव्हती पण आपली बेस्टी आज खूप दिवसाने आल्याने पूजा मात्र काहीतरी वेगळाच प्लॅन बनवून बसली होती. आज पूजा कितीतरी वेळ तिला शॉपिंग करायला घेऊन त्रास देऊ लागली. स्वरा तिला जेवण करायची घाई करत होती तर पूजा स्वराला काहितरी गिफ्ट घ्यायच म्हणून आज शॉपिंगच्या मागे लागली होती. पूजा स्वराच काहीच ऐकत नाही म्हणून ती शेवटी एकटीच जेवायला जाऊ लागली आणि तेव्हा कुठे पूजाने शॉपिंग आटोपली. स्वराला एका छान हॉटेलमध्ये नेऊन तिला आवडतात त्या सर्व वस्तू बोलविल्या. स्वरा तर त्यावर तुटूनच पडली. स्वराला अस लहान मुलासारख पटापट खाताना बघुन पूजाला हसू आवरत नव्हतं. नावालाच दोघीही मोठ्या झाल्या होत्या बाकी एकमेकांसोबत असल्या की लहान मुलांपेक्षाही लहान बनायच्या. अशी ही त्या दोघांची मैत्री..!! फायनली सैर करून, पोटभर जेवून त्या रूमवर पोहोचल्या.
त्या रूमवर पोहोचल्या तेव्हा रात्रीचे ११ च्या आसपास झाले होते. स्वरा खूपच थकली होती म्हणून पूजाचे कपडे घालून गादीवर पडली. पूजाही कपडे चेंज करत गादीवर पडली. स्वरा खूप थकली असल्याने काहीच बोलत नव्हती तर पूजाला नेमका त्याच वेळी कॉल आला. पूजाने तो कॉल रिसिव्ह केला आणि पाच मिनिटात फोन खाली ठेवत म्हणाली," काय यार आई पण ना? केव्हाची मागे लागली आहे लग्न कर म्हणून. तिला ना मी एकटी आहे, सुखी आहे हे बघवत नाही. आता म्हणे मुलगा बघायला येतोय तर घराकडे ये. नुसती कटकट आहे बघ तिची. लग्न करून मूलच तर जन्माला घालायचे आहेत. आता मीही हेच करायचं का? कंटाळा आणलाय तिने. आता जावं लागेल मुलगा बघायला. पर्याय आहे का दुसरा?"
पूजा रागातच बोलून गेली तर स्वरानेही त्यात सूर मिसळला," हो ना मलाही लग्नाचंच टेन्शन आहे. काय उत्तर देऊ कळत नाहीये?? किती दिवस झाले नुसता गोंधळ सुरू आहे."
स्वरा बोलून गेली आणि पूजाचा राग क्षणात नाहीसा झाला. ती पुढच्याच क्षणी हसत उत्तरली," काय म्हणालीस तू? तू आणि लग्न?? मी स्वप्न तर बघत नाहीये ना? स्वरा मला चिमटा घे पटकन?"
स्वराने जोरानेच चिमटा घेतला आणि पूजा जरा मोठ्यातच ओरडत म्हणाली," अय्यो!! खरच आहे. म्हणजे मी ऐकलं ते खरं आहे?"
स्वरा मान झालो करत उत्तरली," हो एक-एक शब्द बरोबर ऐकलास तू?"
पूजा आता जरा शांत झाली आणि हळूच म्हणाली," मला खरंच विश्वास बसत नाहीये. मला वाटलं जसा तुला प्रेमाचा राग होता त्यावरून तू लग्न कधीच करणार नाहीस पण इथे तर तू स्वतःच लग्नाचं सांगत आहेस. बर ते सोड. सांग ना, कोण तो? मलाही सांग ना त्याच नाव? प्लिज!! मला आवडेल त्याच्याबद्दल ऐकायला."
स्वरा काही क्षण शांत बसली कारण तिला माहीत होतं स्वयमच नाव घेताच ती चिडून उठेल त्यामुळे काही क्षण ती शांतच होती तेव्हाच पूजा म्हणाली," सांग ना!! मला नाही सांगणार ?? जा मी कट्टी!! मी बोलणारच नाही तुझ्याशी!! एक तर भेटत नाहीस, बोलणं होत नाही. त्यात लग्नाचा निर्णय घेतला आणि आता मला सांगत नाही आहेस. तू बदलली स्वरा खूप. ही ती माझी बेस्टी स्वरा नाही."
पूजा रुसल्याच जाणवताच स्वरा हळुवार आवाजात उत्तरली," स्वयम अगरवाल.!!"
स्वराने उत्तर दिलं आणि ती तिच्या चेहऱ्याकडे बघू लागली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. तिला २४० वोल्टचा झटका बसला होता. अचानक रुसण्यावरून तिचा चेहरा रागीट झाला आणि पूजा रागातच उत्तरली," तो?? तो तुला सोडून गेला होता एकटीला सोडून तो? त्याची हिम्मत कशी झाली तुझ्या आयुष्यात परत येण्याची. बर तो आलाही असेल पण तू का माफ केलंस त्याला? त्यांच्यामुळे किती त्रास झाला तुला माहिती आहे ना? तो माफीच्या लायकीचा नाही तुझ्याआ का केलंस माफ त्याला?? माफ तर केलंस पण लग्नाचं पण बोलत आहेस. हे काय सुरू आहे स्वरा?"
स्वरा तिच्या डोळ्यात बघत हळुवार उत्तरली," स्वरा आधी निवांत एक मी काय म्हणतेय मग बोल. मी का त्याला माफ केले हे ऐकणार नाहीस का?"
पूजा रागातच म्हणली," हम्मम"
स्वराने तिचा हात हातात घेतला आणि उत्तरली," पूजा आपल्याकडून गैरसमज झाला होता. तो कधी बोलला नाही आणि आपण त्याला चुकीच समजत राहिलो. इतके वर्ष आपण त्याला फक्त चुकीच समजत राहिलो."
पूजा पुन्हा रागात उत्तरली," कसला गैरसमज??"
स्वराने पुन्हा म्हटले," त्याच्या वडिलांनी त्याला वचन मागितल होत की तो मला कधीच भेटणार नाही. तो त्यांचं बोलणं मानायला तयार नव्हता पण त्याचे बाबा बेडवर होते आणि तो नाही म्हणू शकला नाही. काकूने सुद्धा मला हेच सांगितलं. त्याने वडिलांसाठी शेवटपर्यंत वचन निभावल. त्याने वचन तोडल ते त्याचा बाबा देवाघरी गेल्यावर. मी त्याच्या घरी पण गेले होते. तो खूप रडत होता, इच्छा नसतानाही मला एकट सोडलं म्हणून आणि त्याच वेळी तो म्हणाला की आता तुला पुढे कधीच एकट सोडणार नाही कारण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू आहेस त्या स्थितीत. आता तू सांग त्याच्या जागी असती तर बाबाना मरू दिलं असतस? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा आईवडील महत्त्वाचे नाहीत का? मला माहित आहे तू काय, मी काय त्याने केलं तेच केलं असत. कारण आई- वाडीलांविना आपण खुश नाही राहू शकत."
पूजा आता जरा शांत झाली होती. तिचा रागही गेला आणि ती हळुवार शब्दात उत्तरली," अरे वा! बर आहे की मग. आता तुला तुझं प्रेम मिळालं. तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार मग कधी करणार आहात लग्न??"
स्वरा आता गादीवर आडवी झाली आणि तिच्या पायावर डोकं टेकवत म्हणाली," माहीत नाही कधी ते. मी त्याला अजून उत्तर दिलं नाही."
पूजाला समजत नव्हतं की तिने उत्तर का दिलं नाही अजून म्हणून ती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचू लागली. काहीतरी होत तिच्या चेहऱ्यावर जे पूजाला समजत नव्हतं म्हणून पूजा विचार करत उत्तरली," स्वरा स्वयमने तुला लग्नाचं विचारून सुद्धा तू होकार दिला नाहीस शिवाय तुझ्या बोलण्यात उत्साह देखील नाही काही कारण आहे का ह्यामागे?"
स्वरा उदास स्वरात उत्तरली," हो एक कारण आहे खूप मोठं. त्या कारणामुळे निर्णय घ्यायला मन मानत नाहीये."
पूजा तिच्या चेहऱ्यावर हात फेरीत म्हणाली," मग सांग कळू दे मला. बघू शक्य असेल तर होईल गोंधळ दूर."
स्वराने पुन्हा एकदा तिचा हात हातात घेतला आणि हळुवार म्हणाली," पूजा तुला आठवते मला कियाराने ह्या जॉबसाठी पाठवल तेव्हाची गोष्ट. त्यांनी मला जॉबवर घेतलं पण एक अट टाकली. ती अशी की मला लोकांसमोर जाता येणार नाही. बंदिस्त जीवन जगावे लागेल एका केबिनमध्ये. त्यावेळी माझ्या घरची स्थिती काहीशी ठीक नव्हती म्हणून मी ती अट स्वीकारली आणि जॉब करू लागले. जॉब कसली बंदिस्त राहू लागले. जवळपास वर्षभर अशीच स्थिती राहिली. मी एकाच ऑफिस मध्ये राहून कुणी मला बघितलं नव्हत की ओळखत नव्हते कारण मी बंदिस्त होते. एक दिवस दुसरे सर ट्रान्सफर होऊन ऑफिसला आले आणि माझं जीवनच बदललं. त्यांनी मला फक्त केबिनमधून मुक्त केलं नाही तर मी कुठे चुकतेय त्याची जाणीवसुद्धा करून दिली. मी त्यांना आधी घाबरायचे पण नंतर समजलं की ते खरच चांगले आहेत आणि माझी-त्यांची मैत्री झाली. खूप मस्त दिवस होते त्यांच्यासोबत. अगदी सुंदर!! त्यांनी मला मुक्त केलं पण जाताना त्यांनी सांगितल की त्यांच माझ्यावर प्रेम आहे. मी त्यांना काही बोलणार त्याआधीच ते म्हणाले की मी हे स्वार्थी बनून केलं नाही, मी फक्त तुला माझ्या भावना सांगितल्या बाकी तुला त्रास होउ नये म्हणून मी तुला कधीच कॉल करणार नाही. मी माझं प्रेम निभावत राहीन तेही तुझ्या दूर राहून. तो एक दिवस आणि आजचा दिवस. त्यांनी आजपर्यंत मला सताहून कॉल केला नाही."
पूजा जरा विचार करत उत्तरली, " प्रेम आहे तुझं त्यांच्यावर??"
स्वरा हसत उत्तरली," हाच प्रश्न मलाही पडतो पण उत्तर नाही मिळालं. दोघेही एकाच वेळी आयुष्यात आले. एक माझा भूतकाळ तर दुसरा वर्तमानकाळ. दोघांनाही गमावन सोपं नाही. स्वयमने लग्नाचं विचारलं तेव्हापासून त्या दोघात कितीतरी दिवस गोंधळ उडत होता. मी विचार करत गेले पण माझी कुवत कमी पडली. काही दिवस मला उत्तर मिळाल नसत तर मला वेड लागलं असत म्हणून ज्या अन्वय सरांनी माझे सर्व प्रश्न सोडवून मुक्त केले त्यांनाच कॉल करून मी विचारलं."
पूजा तिला अडवत म्हणाली," काय म्हणाला मग अन्वय??"
स्वरा मिश्किल हसत उत्तरली," मला वाटलं होतं की त्यांच्याशी बोलून माझा गोंधळ दूर होईल पण तो अधीकच वाढला. ते म्हणाले मला नाही भेटलीस तरीही चालेल पण जगणं सोडू नकोस. मी देवाला प्रार्थना करेन की तू आयुष्यात कायम आनंदी राहावीस. तू खुश तर मी खुश. जा आणि लग्न कर त्याच्याशी पण खुश राहा. स्वप्न बघ आणि ते पूर्ण कर. आता तूच सांग त्यांचं माझ्यावरच इतकं प्रेम बघितल्यावर मी स्वयमला कसा होकार देऊ??"
पूजा तीच बोलणं ऐकून काही क्षण शांतच होती. अस म्हणा की दोघेही शांतच होते आणि कितीतरी वेळाने पूजा उत्तरली," मी ज्या स्वराला ओळखते ना ती स्वयमचा होकार यावा म्हणून कितीतरी आतुर होती तेव्हा स्वयमने लग्नाचं विचारल्यावर त्या स्वराने काय करायला हवं होतं? सरळ ती लग्नाला तयार झाली असती. त्यामुळे मी अस म्हणेन की हे सर्व गोंधळामुळे होत नाही आहे उलट तुला अन्वय जास्त आवडू लागला आहे. त्याच निस्वार्थ प्रेम बघून तू स्वयमला उत्तर देऊ शकत नाही आहेस. बाकी दुसर कारण नाही.."
स्वरा तिच्या बोलण्यावर बारीक लक्ष देऊन होती आणि पूजा पुन्हा उत्तरली," मी अस म्हणेन की अन्वयने त्या जुन्या स्वराला ठेवलंच नाही त्यामुळे स्वयमला ती स्वरा कधी भेटलीच नाही उलट अन्वयने अशी स्वरा निर्माण केली जी त्याच्या निस्वार्थ प्रेमामुळे त्याच्याकडे सहज आकर्षिल्या जात आहे. स्वरा तुला प्रेमाचा किती राग होता हे मी जवळून पाहिलं आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की तू प्रेमाबद्दल पुन्हा बोलशील. पण ते शक्य झालं कारण अन्वयमुळे. तुला एक निस्वार्थ प्रेमच, प्रेमाची जाणीव करून देऊ शकत होत. अन्वयच प्रेम निस्वार्थ आहे म्हणून तू त्याला सोडू शकत नाही आहेस. वेडाबाई तू त्याच्यात अडकून असताना समोर कशी जाणार? कशी उत्तर देणार स्वयमला जेव्हा की तो तुझ्या मनातच नाहो. वेडाबाई अन्वय तुला आवडायला लागला आहे. आताच बघ ना स्वयमच नाव घेताना तुझा चेहरा कसा पडला होता पण अन्वयच नाव घेताना तो एकदम खुलून निघाला. मी बघितलं तुला. तुला नाही वाटत का अन्वय सोबत असताना तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असतो. स्वयमशी बोलताना असतो का?"
स्वरा विचार करत उत्तरली," हो ग लक्षातच आलं नाही. अन्वय सर ३-४ महिन्यांनी जरी बोलले ना तरी माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू परतल पण मी स्वयमशी प्रयत्न करूनही नीट बोलू शकत नाही. त्याच्याशी नजर मिळवू शकत नाही उलट अन्वय सर सोबत असले की सेफ वाटत. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे असत. खूप खास आहेत ते. त्यांच्याबद्दल विचारही आला आणि तरी क्षणात हसू येत."
त्याच्याबद्दल बोलताना स्वराचा चेहरा एकदम खुलून निघाला होता आणि ती पुढच्याच क्षणी उत्तरली," म्हणजे मला अन्वय सर आवडायला लागले अस म्हणायचं आहे का तुला??"
पूजा हसतच उत्तरली," हो नवीन स्वरा अन्वच्या प्रेमात पडली आहे. त्याने तिला प्रेम करायला शिकविल. त्याने तिला जगायला शिकविल म्हणून ती आता दुसऱ्यांचा विचार करुस शकत नाही."
स्वराचा चेहरा अजूनही तसाच होता पण एक विचार तिच्या मनात आला आणि ती उदास झाली. पूजापासून ती गोष्ट लपून राहिली नाही आणि पूजाने विचारले," काही राहील का पुन्हा??"
स्वरा विचार करत उत्तरली," हो!! मी ना स्वयमला सांगितलं की तुझं उत्तर देईन म्हणून दिल्लीला येऊन."
पूजा आता क्षणभर स्वतःवरच हसत उत्तरली," तो मोठा प्रॉब्लेम नाही. बर स्वरा एक सल्ला देऊ ऐकशील?"
स्वरा तिच्याकडे बघत उत्तरली," हो सांग ना!!"
पूजा हसतच उत्तरली," मला पूर्ण अंदाज आहे की तुला अन्वय आवडतो पण प्रेमाची गोष्ट आहे म्हणून जरा वेळ घे. तुझा गोंधळ लग्नाबद्दल स्वयमला काय सांगू हा नाही तर अन्वयला तुला सोडता येत नाहीये हा आहे. मग मी म्हणेन की पुढचे काही दिवस, स्वतःच अनुभव की तू स्वयम सोबत असताना जास्त खुश असतेस की अन्वयच्या नसण्याने तुला जास्त त्रास होतो. ह्या काही दिवसात एक क्षण जरी तुला वाटलं ना की तू अन्वयशिवाय राहू शकत नाहीस तर आधी सरळ अन्वयला सांग. मग पक्का सांगते की तुझ्या चेहऱ्यावर अगणित समाधान असेल. मला आशा आहे असच होईल पण स्वयम सोबत जास्त आनंद मिळणार असेल तर ते त्याला सांग. भेटायला तर बोलावलं आहेसच तेव्हा एक तर त्याला अन्वयसोबत लग्नाबद्दल सांग किंवा मग त्याला लग्नाला होकार दे. तेव्हा पुढचे काही दिवस तुझं उत्तर शोध. तुला तुझं उत्तर मिळेल."
स्वराच समाधान झालं होतं तरीही एक प्रश्न तिला सतावत होता आणि ती उत्तरली," पण एकाला स्वीकारलं तर दुसऱ्याची काय चूक? त्याला कारण काय द्यायच?? महत्त्वाचं आपलं प्रेम की समोरच्याच??"
पूजा हसतच उत्तरली," स्वरा आयुष्यात एकच व्यक्ती कायम राहतो. मान्य की चुक स्वयमची नसेल पण मागे काही वर्षात तुझं पूर्ण आयुष्य बदललं आहे आणि त्यात नवीन नाती येऊ शकतात हे स्वयमला स्वीकारावं लागेलच. तो जिला तिथे सोडून गेला, ती स्वरा ही नाहीच हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा तो सहज मान्य करेल आणि अन्वय तर स्वतःच म्हणाला आहे की त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता राहिला प्रेमाचा प्रश्न. मी कायम म्हणेन की लोक आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच निवडतात. त्यात काही गैर नाही पण मी जिथून विचार करते तिथून मला जाणवत की आपण एखाद्या व्यक्तीवर कितीही प्रेम करून त्याला आनंदी ठेवू का सांगता येत नाही पण जो आपल्यावर प्रेम करतो तो कायमच आपल्याला आनंदी ठेवेन. तेव्हा एकदा त्याच प्रेम अनुभवून बघायला हरकत नाही. मला विश्वास आहे त्याच्यासारख प्रेम कुणीच करणार नाही कारण त्याचा दिवस, रात्र आपल्याने सुरू होऊन आपल्यावर संपेल. जर मुलगा अन्वय सारखा प्रेम करणारा असेल तर पक्क म्हणेन की त्याच प्रेम अनुभवण्यापेक्षा प्रेमाची सुंदर व्याख्या नाही. माझी आई कायम म्हणते लग्न आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी करावं म्हणजे मागायला आणि मिळवायला काहीच उरणार नाही. पटतय बोलणं??"
स्वरा तिच्या हातावर किस करत उत्तरली," हो पटत आहे. कदाचित तू बरोबर म्हणते आहेस. माझ्या मनात अन्वयप्रति भावना आहेत, नाही तर कदाचित मी स्वयमने विचारताच लग्नाला होकार कळविला असता. थॅंक्यु माय जान मला माझ्या उत्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी. तू नसती तर कदाचित मला कळलंच नसत मी अन्वय बद्दल काय फिल करते. तुला भेटुन समजलं तो गोंधळ नव्हता तर अन्वयला सोडून जाण्याची भीती होती."
स्वराच्या चेहऱ्यावर काही क्षणाआधी आनंद अजिबात दिसत नव्हता पण अन्वयच नाव येताच तिचा चेहरा एकदम खुलून निघाला होता. तिला माहीत होतं स्वराच उत्तर काय असणार होत पण ज्या प्रेमामुळे इतकं महाभारत घडलं आता तेच घडू नये म्हणून पूजाने स्वराला विचार करायला वेळ दिला होता पण तिलाही ठाम विश्वास होता की तिला एक दिवस नाही तर रोज अन्वयची आठवण येईल आणि एक दिवस अन्वय जेव्हा समोर येईल तेव्हा कदाचित तीच त्याच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करेल.
आयुष्यात भरपूर वेळा एकाच व्यक्तीवर दोन खरे लोक प्रेम करतात त्यावेळी बहुतांश लोक आपल्याच प्रेमाचा स्वीकार करतात पण जर प्रेम करणारा अन्वय सारखा असेल तर त्याच प्रेम अनुभवण्यात काहीच हरकत नाही. कारण ते प्रेम कितीही प्रयत्न केल तरीही तुम्हाला सोडून जाणार नाही.
एक एहसास की मै तेरी हु
दिलं को थंडक दे गया है
तुझसे प्यार करणेके सोच सेही
दिलं बार-बार धडकने लगा है
क्रमशा