एक उमर गुजारी है
खुद का वजुद धुंडने के वासते
फिर एक दिन युही तेरी आंखो मे हमने देखा
सच केहते है हम तुझे देखकर हर सवाल भूल बैठे
" क्या हो तुम- जिंदगी या खुदा?? "
सायंकाळचे ७ वाजले होते जेव्हा अन्वय- स्वरा घराकडे निघाले होते. गाडी जसजशी समोर जात होती तसतसे मागचे लोक आणि आठवणी भराभर मागे जात होत्या तरीही स्वराचे अश्रू तसेच होते. गाडी सुरू होऊन बराच वेळ झाला असला तरीही त्यात काही बदल झाला नव्हता. अन्वयला तिला रडलेलं बघवत नसे पण आज ते अश्रू तिचा हक्क होता म्हणून तोसुद्धा काहीच म्हणाला नाही. तो अधून-मधून तिला न्याहाळत होता आणि पुन्हा एकदा बाहेर नजर टाकायचा. बाहेर थोडा अंधार पडला होता आणि गाड्यांचा कर्कश आवाज आतां जरा जास्तच ऐकू येत होता अस असलं तरीही त्या हॉर्न पेक्षा त्याला तिच्या रडण्याचा आवाज जास्त त्रास देत होता म्हणून बराच वेळ शांत राहिल्यावर अन्वय म्हणाला," स्वरा काही अश्रू वाचवून ठेवलेस फायद्याच होईल अस नाही वाटत का तुला??"
तिने त्याचा प्रश्न ऐकला आणि त्याला आपल्या रडण्याने त्रास होत असेल हे जाणवताच रडनही थांबवलं. तिने रडन थांबवलं असलं तरीही काही क्षण तिचे हुंदके काही गेले नव्हते. तिने स्वतःला सावरायला काही वेळ घेतला आणि हळुवार शब्दात विचारले," काय म्हणालात काही समजलं नाही?"
अन्वयने तिच्यावर हलकेच नजर टाकली आणि मिश्किल हसत उत्तरला," मी म्हटलं की आताच सर्व अश्रू संपवून टाकू नकोस. एका आईला सोडून आलीस म्हणून रडते आहेस ना पण विसरू नकोस की दुसरी आई तुला आता रडवणार आहे. तिथे थोडेसे अश्रू राहू देत. ती किती त्रास देणार आहे त्याचा अंदाज तुला घरी जाताच येईल म्हणून म्हटलं की काही अश्रू ठेव जरा जपून. सासूबाईच बोलणं ऐकल्यावर यायला नको का अश्रू? ती काय अगदी नॉर्मल बोलणार आहे? छळ करणार आहे तुझा? असा छळ जी नॉर्मल सासू करूच शकत नाही."
स्वरा अन्वयच बोलणं ऐकून हळूच हसत म्हणाली," तुम्हाला काय वाटत अंदाजा नाही मला त्याचा? अंदाज आहे आणि मी तयार आहे त्यासाठी. तिथे अश्रूची गरज पडणार नाही. आणि आधीच सांगते हा काहीही झालं तरी तुम्ही सासू सुनेच्या मध्ये यायच नाही. नाही तर तुम्हाला माझा सासुरवास सहन करावा लागेल."
स्वरा हसलीच होती की अन्वयने हसतच म्हटले," मला तर शंका आहे बाबा. बोलणं सोपं आहे आणि कारण कठीण. एक दिवस तू स्वतःच म्हणशील की ह्या हेकड सासुपासून मला वाचवा अन्वय सर! नाही तर जीवच घेईल माझा ही. खडूस सासू कुठली. अन्वय इतका क्युट आहे आणि ह्या का अशा अस बोलायला जास्त वेळ नाहीये. बघ हा आताही विचार कर मी आहे तयार मधात पडायला. तू म्हणशील तर आपण मिळुन भांडू तुझ्या खडूस सासुशी."
अन्वय तिला हसवायला बोलून गेला होता आणि तिर योग्य जागी जाऊन लागला होता. त्याच्या बोलण्याने ती क्षणभर स्वतःला हसण्यापासून थांबवू शकली नाही आणि हसतच उत्तरली," तुम्ही आपल्या आईबद्दल अस बोलता? थांबा मी सांगतेच त्यांना. माझं माहिती नाही पण तुमचंच भांडण नक्की होईल मग."
स्वरा आता कार मध्ये मोठ्याने हसू लागली. तिला बघून, काही वेळेआधी रडणारी हीच स्वरा होती ह्यावर कुणाचाच विश्वास बसने शक्य नव्हते. अन्वय तर काही क्षण तिच्यात हरवला होता. स्वराने त्याच्यावर नजर टाकली आणि तो पटकन पलटी घेत म्हणाला," मी सासुबद्दल बोललो हा. माझी आई तर स्वीट आहे खूप. सासू म्हणून हेकड असेल मला अंदाज आहे त्याबद्दल म्हणून तुला जरा वॉर्न केलं. बाकी मला काय?? पण स्वरा मला पक्का विश्वास आहे की काहीच दिवसात म्हणशील अन्वय सर वाचवा मला. मग मीच सुपरमॅन, स्पायडरमॅन सारखा तुला वाचवायला येईल. तुला सासुपासून वाचवेन आणि दूर पळवून नेईन.."
अन्वय मनाला येईल ते बोलत होता आणि स्वराला त्याच बोलणं ऐकून हसू आवरत नव्हतं. असा एक क्षण नव्हता जेव्हा ती कार मध्ये त्याच्याकडे बघायची आणि तिला हसू यायचं नाही म्हणून तिने आता तोंड बाजूला हसणे पसंद केले होते..काही क्षण असेच हसण्यात गेले. ती हसण्यात व्यस्त होती आणि अन्वय अचानक म्हणाला," स्वरा आय लव्ह यु!! किती स्तुती करू तुझी खरच कळत नाहीये मुळात तुझी सुंदरता व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. खूप सुंदर दिसत आहेस आज. माझी एक क्षण नजर नव्हती हटत तुझ्यावरून आणि आताही हटत नाहीये इतकी सुंदर तू दिसत आहेस."
स्वराच्या चेहऱ्यावरचे हसण्याचे भाव क्षणात लाजेने घेतले आणि ती तोंडावर हात ठेवत रोमँटिकपणे म्हणाली," अच्छा जी! काय खास आज बर आज माझ्यात? नेहमीसारखी तर दिसतेय. ह्यात काय सुंदर बर!!"
ती त्याच्याकडे आता नजर रोखून बघू लागली आणि अन्वय काही क्षण विचार करत म्हणाला," अ…. काय नाही ते विचार. मी प्रत्येक क्षणी माझ्या स्वप्नांत असच तर बघितलं होत तुला. स्वप्नांत आणि आज सत्यात जेव्हा बघतोय तेव्हा जाणवत की काहीच फरक नाही. तेच ते लाजन, हसन आणि तोच शृंगार. तुझी निरागसता मला नेहमीप्रमाणे वेड लावले आहे. ह्यापेक्षा खास म्हणशील तर स्वरा, अन्वयच मिळून तयार झालेलं एक नाव ' स्वरान्वय' जे आपल्या एक होण्याची साक्ष देत आहेत. किती शोभून दिसतंय ते नाव तुझ्यावर तुला माहिती आहे?"
तिने त्याच्याकडे बघतच विचारले," तुम्हाला कस कळलं माझ्या हातावर स्वरान्वय लिहिलं आहे अस? इतकी बारीक नजर आहे तुमची?"
स्वरा त्याच्याकडे नजर रोखून बघ होती तर अन्वयने हसतच उत्तर दिले," तुझा हात हातात होता तेव्हा लक्ष गेलं. स्वरा आणि अन्वय एकत्र ' स्वरांवय'. नशिबाने फक्त आपल्याला जोडल नाही तर नाव सुद्धा एकरूप केलं. ह्यापेक्षा आपल्या प्रेमाला आणखी काय हवं? चेहऱ्यातील गोडवा आणि वयाच्या पलिकडे जाऊन केलेलं प्रेम म्हणजे 'स्वरांवय'. एक तिची बाजू आणि एक त्याची बाजू समजून घेऊन जगाशी संघर्ष करायला, जगाला प्रेमाचे महत्त्व सांगायला जवळ आलेले दोन लोक म्हणजे स्वरान्वय.."
तो बोलून गेला आणि स्वरा शांतपणे एकटक त्याच्याकडे बघू लागली. ती काहीच न बोलता त्याच्याकडे बघते आहे हे बघून अन्वयने विचारले," काय झालं अशी वेड्यासारखी का बघत आहेस?"
स्वराने आताही त्याच्यावरून नजर हटवली नाही आणि हळुवार हसत म्हणाली," काय उत्तर देऊ बर तुमच्या प्रेमाला? कस शब्दात व्यक्त करू तुमचं प्रेम..मला जमत नाहीये म्हणून तुमच्याकडे एकटक बघते आहे..आज नवरोबाच बोलणं एकण्यातच मज्जा वाटतेय. कस जमत हो नवरोबा तुम्हाला हे सर्व?"
अन्वय तिची उडवतच म्हणाला," जमत तर खूप काही मॅडम पण बायको उत्तर देत नाही त्याच काय करू?? सतत बघत राहीलो की लक्ष दुसरीकडे करते. नजरेला नजर मिळवायला घाबरते, आय लव्ह यु म्हटलं की वेड्यासारखि हसते पण उत्तर देत नाही. आता काय काय आणि किती करावं ना बिचाऱ्या नवऱ्याने?"
अन्वय तिच्याकडे बघून बोलत होता तर हसणाऱ्या स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजेचे भाव होते. त्याने तिला पुन्हा शांत केले. अन्वय म्हणतो खरच ती त्याच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती तर अन्वय त्याही लाजण्यात समाधानी होता. ती लाजत राहिली आणि अन्वय खुश होत राहिला. नकळत अश्रू हरवल्या गेले आणि पुन्हा एकदा त्या क्षणाना बहर आला..
सपणो के दुनिया की तलाश
तुझपे आकर खतम हुयी है
मै केहती नही किसींसे तेरी दिवानगीही मुझे
खुदसे प्यार करणा सिखाती है...
रात्रीचे जवळपास ८ वाजले होते जेव्हा कार एका जागी थांबली. अन्वय खाली उतरताच त्याच्या मागेच ती उतरली आणि हळुवार नजरेच्या कोपऱ्यातून आजूबाजूचा परिसर बघू लागली. ती आजूबाजूचा परिसर बघण्यात हरवलीच होती की अन्वयने तिची बॅग डिक्कीतुन काढली आणि तिचा हात पकडत म्हटले," जायचं स्वरा!!"
तिने एक क्षण त्याच्याकडे बघितले, पुढच्याच क्षणी हसूनच त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्या नजरेवर विश्वास ठेवून समोर चालू लागली. मनात भीती होती पण अन्वयचा हात हातात असल्याने तिची थोडी भीती कमी झाली होती. तिला भीती वाटत असल्याने तिची नजर एकाच जागेवर स्थिर राहत नव्हती, चालत असताना तिची नजर वारंवार इकडे तिकडे जात होती आणि नकळत का होईना त्याच्या घराचे दर्शन तिला होत होते. ते घर बघून स्वरा काही क्षण त्यात हरवली. दोन मजली बिल्डिंग होती ती. बाहेर मस्त फुलझाडे, वेली तर काही ठिकाणी फळांची झाडे होते. स्वरा बघत बघत समोर गेली आणि एका जागी जाऊन थांबली. अन्वयने तिची बॅग खाली ठेवली आणि हळुवार डोर बेल वाजवली. स्वराची नजर इकडे तिकडे घिरक्या घेत होती तर अन्वय आता दार उघडण्याची वाट बघू लागला. काहीच क्षण गेले आणि खाडकन समोरून दार उघडल्या गेलं. अन्वयची आई पटकन समोर आल्या. अन्वयच्या तोंडून आईला बघताच शब्द निघाला," आई…"
आई हे नाव ऐकताच स्वरा त्यांना नमस्कार करायला वाकली आणि त्याच वेळी आई काहीही न बोलता समोरून दुसरीकडे गेल्या. स्वरा वाकली आणि आईने वाट बघताच तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर आले. अन्वयला समजू नये म्हणून तिने ते पटकन पुसले आणि चेहऱ्यावर खोट हसू आणत ती पुन्हा उभी झाली. अन्वय क्षणभर तिच्याकडे बघतच होता. तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव नक्कीच वाचणार हे तिला माहीत होतं, तेव्हा त्याला त्रास होऊ नये म्हणून तिने काहीही न झाल्याचे भाव आपल्या चेहऱ्यावर आणले पण तो अन्वय होता. तिच्या चेहर्यापलीकडे जाऊन त्याने तिला वाचायला शिकले होते. अन्वयला क्षणात समजलं की तिला वाईट वाटलं असणार म्हणून तो आत पाऊल टाकत म्हणाला," मिसेस अन्वय..आजच्या दिवशी मीच तुमची सासू आणि मीच तुमची ननंद. आत येऊ नका हा!! मी आलेच काही मिनिटात. अगदी पाय ठेवायचा नाही मध्ये मी म्हटल्याशिवाय.नाही तर मागे जे होईल त्याला जबाबदार तुम्हीच असणार."
अन्वय तिला समजवत मध्ये पोहोचला. आईच वागणं त्यालाही त्रास देऊन गेलं होतं पण ती अटलिस्ट तिला काहीच म्हणाली नाही म्हणून थोडं बरही वाटलं होतं. जाताना त्याने आईच्या बेडरूमकडे बघितले. त्यांनी दार लावून घेतलं होतं. अन्वय क्षणभर हसला आणि किचनमध्ये पोहोचला.
अगदी ५ मिनिट झाले होते जेव्हा अन्वय परत आला. त्याने थाळी सजवून आणली होती. ती त्याला बघतच होती की तो तिला ओवाळू लागला. आताच काही क्षणाआधी तिला जरा वाईट वाटलं होतं पण अन्वयच वागणं बघून पुन्हा चेहऱ्यावर हसू परतल. त्याने ओवाळून घेतले आणि तांदळाने भरलेला माप खाली ठेवला आणि उभा झाला. ती त्याला लाथ मारणारच की तोच म्हणाला," मिसेस अन्वय असच आत घेतल्या जाणार नाही हा तुम्हाला. उखाणा घ्यावा लागेल आधी. त्याशिवाय प्रवेश नाही. चला घ्या बघू उखाणा!!"
स्वरा त्याला बघून हसतच उत्तरली," हे काय अन्वय सर? मला नाही येत उखाणा वगैरे. मी येतेय मध्ये. मला नाही माहिती काहीच.."
अन्वय पुन्हा तिला अडवतच म्हणाला," कोण अन्वय सर? मी तुमची ननंद आहे आणि ननंदला दुखावन तुम्हाला परवंडणार नाही हा. घ्या बर उखाणा. उगाच उशीर करू नका. लोक काय म्हणतील ह्या घरच्या सुनेला इतकं देखील येत नाही. किती बेइज्जती होईल आमची. ते काही नाही हा उखाणा तर घ्यावाच लागेल."
स्वरा त्याच बोलणं ऐकून क्षणभर हसलीच. त्याच्या बोलण्यावरून तिला समजलं होत की तो मध्ये असच येऊ देणार नाही म्हणून थोड्या वेळ ती विचार करत उत्तरली…
मी अमावास्येचा अंधार
तुम्हीच दिली मला रोशनी
माझ्या सासरी आज नाव घेते
मी अन्वयसरांची पत्नी
स्वरा हसत होती तर अन्वय रागाने तिच्याकडे बघत होता. तिला समजलं की त्याला उखाणा एकून राग आलाय म्हणून कान पकडत म्हणाली," सॉरी सॉरी! घेते दुसरा उखाणा ह्यावेळी काहीतरी खास." तिने पुन्हा विचार करत म्हटले…
श्वास माझा देणं त्याची
कसे मी हे ऋण फेडू
जिवलगाच नाव घेते
मी त्यांची कुलवधू
मी त्यांची कुलवधू...
तिचा उखाणा आला आणि अन्वयच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतल. तो आता हळूच हसत म्हणाला," आता येऊ शकता मध्ये."
तिने पाय समोर केला आणि पुन्हा विचार करत पाय मागे घेत म्हणाली," ननंद बाई उखाणा मीच का घ्यावा? नवऱ्याच पण कर्तव्य नाही का? आता मी तेव्हाच मध्ये येईन जेव्हा ते नाव घेईल. नाही तर येणारच नाही. बघा हा सून उगाच नाराज झाली तर??"
स्वरा त्याच्याकडे बघून हसत होती आणि अन्वय क्षणात माप ओलांडून बाहेर गेला. त्याचे डोळे तिच्यावर स्थिरावले होते आणि तो रोमँटिक अंदाज मध्ये म्हणाला…
स्वतःचे भाग्य लिहिणारा मी
तिच्या भाग्यावर विसंबून राहिलो
माझ्या स्वामींनीचे नाव घेतो
तिच्या भाग्यानेच आम्ही मिळालो
अन्वय तिच्या डोळ्यात बघत होता आणि तीही त्याच्या डोळ्यात. अन्वयने त्याच क्षणी तिचा हात पकडला आणि दोघांनीही नजरेला नजर देत एकाच वेळी मध्ये पाऊल टाकले.
दोघेही मध्ये आले, स्वरा मध्ये येऊन घर बघत होती तर अन्वय बाहेर ठेवलेली बॅग सोबत घेऊन मध्ये येत म्हणाला," खाली दोन बेडरूम आहेत आणि वर दोन पण तिथे कुणी राहत नाही. दाखवेन तुला घर पण उद्या. आता थकली आहेस सो जाऊन फ्रेश हो. चल मी तुला दाखवतो वॉशरूम..ते मध्ये पोहोचले आणि दोघेही फ्रेश होऊ लागले.
त्यांना अंघोळ करून फ्रेश व्हायला जवळपास ११ वाजले होते. स्वरा केव्हाची आपली बॅग अनपॅक करत बसली होती. तीच काम आता बऱ्यापैकी आटोपलं होत आणि बेडवर निवांत बसत तिने विचारले," अन्वय सर तेव्हाच काय बघत आहात त्या बाल्कनीतुन बाहेर? तिथे नक्की आहे तरी काय??"
तिचा प्रश्न येताच अन्वय हळुवार आवाजात म्हणाला…
स्वप्न आभासाची ती दुनिया
आज सत्यातही उतरली
वाटले नव्हते कधीच मला
आपली कहानीही पूर्ण होईल..
तो अस्पष्ट चेहरा कधीचा
नकळत स्पष्ट होत गेला
पाहिले तुला तेव्हाच कळले
मला माझ्या स्वप्नाचा अर्थ मिळाला
गेल्या अशा कित्येक रात्री
तुझ्या आठवणीत झुरताना
झाली होती राखरांगोळी
तुझ्यापासून दूर होताना
तरीही जगत होतो मी तासंतास
तू कधीतरी येशील ह्या आशेवर
आज सोबत आहेस तर सांगावस वाटत
तुझ्या विना झालो होतो मी बेघर
खऱ्या अर्थाने आज
माझे मला मिळाले जीवन
तुझा सहवास लाभताच प्रिये
आलंय घराला घरपण
आलंय घराला घरपण..
स्वराने मागून त्याला मिठीत घेतच म्हटले," अन्वय सर किती सुंदर ना!! शब्दच नाहीत कवितेला. इतकी सुंदर सुरवात असेल आपल्या नात्यांची अस कधीच वाटलं नव्हतं."
ती पटापट बोलत होती आणि अन्वयने हसतच विचारले," तुला आठवतंय आज कोणता दिवस आहे?"
स्वरा विचार न करताच उत्तरली," १४ फेब्रुवारी. आपलं लग्न झालंय. दुसर काय!!"
अन्वयने तिच्याकडे बघून हसतच विचारले," पुन्हा कधी ह्या तारखेचा उल्लेख केला होता का मी?"
स्वरा कितितरी वेळाने विचार करत उत्तरली," ओ माय गॉड!! विसरलेच मी. पहिली कविता आणि आज तोच दिवस. क्या बात है!!! नवरोबा मन जिंकल तुम्ही पहिल्याच क्षणी.."
अन्वयही क्षणभर हसतच उत्तरला," स्वरा दिल्लीला आल्यापासून कित्येक रात्री मी ह्याच जागी उभं राहून तुझा विचार करण्यात काढल्या आहेत. तेव्हा खरच वाटलं नव्हतं की तू कधीतरी माझ्या बाजूला येऊन उभी राहशील आणि मिठी मारशील. मला खरच विश्वास बसत नाहीये की आज तू सोबत आहेस आणि ते सर्व दुःखाचे क्षण क्षणात संपले."
स्वराही मिठी घट्ट करत म्हणाली," सॉरी अन्वय सर! माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुम्हाला. मी आहेच अशी वेंधळट. कधी कधी समजतच नाही काय करू ते!!"
ती बोलतच होती की अन्वयने वळून तिला बाहुत उचलून घेतले. तिला बाहुत उचलताच तिची बोबडी वळाली आणि ती त्याच्या नजरेत नजर टाकून बघू लागली. अन्वयने क्षणात तिला बेडवर ठेवले आणि लाईट ऑफ केला. ती बेडवर होती आणि तिच्या हार्ट बिट वाढल्या होत्या. तोही तिच्या बाजूला पडला आणि क्षणात त्याने तिला घट्ट मिठी मारली. स्वराच हृदय अजूनही धडधड करत होत. तिला वाटत होतं की काहीतरी होईल पण तो फक्त मिठीत घेऊन पडून राहिला आणि ती स्वतःवरच वेड्यासारखी हसत राहिली. काही क्षण असेच गेले. अन्वय निवांत तिच्या कुशीत पडून होता आणि तिने मधातच त्याला विचारले," अन्वय सर एक प्रश्न विचारू?"
अन्वय आतापर्यंत शांत होता पण आता हसतच उत्तरला," अरे देवा! अजून प्रश्न आहेच का? मला वाटलं ह्यातून सुटका झाली माझी. हे भगवान बचा ले रे मुझे!!"
स्वराने त्याच्या हातावर मारत म्हटले," आतापर्यंत बायको बायको म्हणून किती प्रेम येत होत ना माझ्यावर आणि आता लगेच हे भगवान. उलट बायको म्हणून माझा जास्त अधिकार बनतो तुमच्यावर. हो की नाही?"
अन्वयने मिठी घट्ट करत म्हटले," बर बायको विचारा मग. आज पहिल्याच दिवशी तुम्हाला नकार कसा देणार ना. विचारा."
स्वरा पुढच्याच क्षणी विचार करत म्हणाली," प्रश्न पण नाही आहव फक्त काही सांगायचं आहे तुम्हाला. अन्वय सर आई म्हणाली की अन्वय सरांच वय जास्त आहे सो त्यांची अपेक्षा असेल की मूल लवकर व्हावं. मला वाटत आपल्या प्रवासाची नवीन सुरुवात करताना ह्यावर बोलणं व्हावं म्हणून सांगतेय की मी माझं मन केव्हाच सोपवल तुम्हाला तेव्हा माझं शरीर सोपवायलाही मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला हक्काने सर्व मागू शकता. अगदी ह्याक्षणीही वाटत असेल तरीही. मी तुमचीच आहे. ह्या क्षणापासून आपल्यात कुठलंच बंधन असणार नाही बस एवढंच बोलायच होत."
अन्वय काहीच बोलला नाही म्हणून पुन्हा तिनेच विचारले," काय झालं सर काही चुकीच बोलले का?"
अन्वय जरा नौटंकी करत उत्तरला," हेच विचार करतोय की लग्नापूर्वी म्हणाली होतीस की वयाने फरक पडत नाही आणि आज पहिल्याच रात्री दाखवून दिलंस न की मी म्हातारा आहे ते. चालू आहेस तू!"
अन्वय शांत झाला आणि स्वरा उदास होत म्हणाली," नाही हो मला तस म्हणायचं नव्हतं. मला तर... वाईट वाटलं ना तुम्हाला सॉरी. मी वेंधळट आहे आधीच म्हणाले. नाही समजत मला काही बोलायच ते. प्लिज रागावू नका ना. प्लिज!!"
ती बोलतच होती की अन्वय तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला," चुप!! ( ती शांत झाली आणि एकटक त्याच्याकडे बघू लागली ) स्वरा मला वाटत की जेव्हा लग्न होत ना तेव्हा कोणत्याही जोडप्याने २-३ वर्षे आधी आपल्या स्वतःचे हवे तेवढे क्षण जगावे मग बाळाचा विचार करावा कारण एकदा बाळ झालं ना तर मग आपल्यासाठी जगायच राहून जात. कधी आईवडील तर कधी मुलांसाठी जगायच उरत तेव्हा आपण वेळ घेऊ काही वर्षे माझं वय जास्त असेल तरीही आणि राहिला स्पर्शाचा प्रश्न तर तो ठरवून होत नाही. जेव्हा होईल तेव्हा आपोआप होईल. सो त्याचा विचार करायची गरज नाही."
तिने त्याचे बोट ओठांवरून काढत म्हटले," मग समोर बाळ नाही झालं तर?"
अन्वय हसत उत्तरला," तर तो माझा प्रॉब्लेम असेल. नाही झालं तर नाही झालं. एक स्वरा आणखी दत्तक घेऊ तुझ्यासारखी पण बाळाचा विचार करून मला आपले क्षण हिरावून घ्यायचे नाही उलट मला वाटत की तू मला पूर्णपणे ओळखावं आधी मग बाकी सर्व आलं. ओळखण आणि असं ह्यात खूप फरक आहे तेव्हा मला आधी ओळख तू मग बाकीच ठरव. स्वरा आम्ही पुरुष जरा चलाख आहोत. लग्नाआधी गोडगोड बोलतो आणि लग्नानंतर काहितरी वेगळच निघत तेव्हा ओळखून घे मलाही."
स्वरा आता त्याच्या मिठी शिरत म्हणाली," पण माझा नवरा खास आहे. ज्याने चेहऱ्याला बघितलं नाही त्याला आणखी कशाचा मोह असणार? अन्वय सर आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे कारण मला माझ्या आयुष्यातील सर्वात सुखरूप जागा मिळाली. ती म्हणजे तुमची मिठी. आता मला कुणीच त्रास देऊ शकणार नाही. मी ओळखलं तुम्हाला आता कशाचीच गरज नाही. तुम्ही सोबत आहात बाकी चिंता करायला माझ्यासाठी काहीच उरल नाही.."
अन्वय- स्वराने दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठीत घेतले होते. एक प्रेमळ मिठी. ना त्यांना कशाचा लोभ होता ना जगाची चिंता. प्रेम म्हणजे खूप काही नसतं ह्या शिकवणीचा पुन्हा एक किस्सा..
*******
सकाळचे ६ वाजले होते. अन्वय सवयीप्रमाणे आजही लवकर उठून फ्रेश झाला होता. तो स्वतःला आरशात बघतच होता की त्याच लक्ष गेलं ते शांतपणे बेडवर झोपलेल्या स्वरावर. ती एकदम शांत पडलेली होती. ना तिच्या चेहऱ्यावर कसलं टेन्शन ना जगाची चिंता. अन्वय तिला बघताच तिच्या बाजूने चालत गेला आणि गुडघ्यावर बसत म्हणाला," आजची सकाळ खरच खूप सुंदर आहे. आता सवयीप्रमाणे विचारशील की का खास आहे बर? कारण काय तर तुला प्रश्न विचारून मला हैराण करायची सवयच झाली आहे ना!! हा तर ऐक, खास ह्यासाठी की माझ पहिल प्रेम माझ्यासोबत आहे. तिच्यासोबत असताना मला अगदी कस सुंदर सुंदर वाटत आहे. आयुष्यात कितीतरी सकाळ आल्या असतील हे नक्की पण तुझ्यासोबत असताना मात्र ह्या क्षणाची मज्जाच काहीतरी वेगळी. तुझा चेहरा बघताना सकाळ किती खास वाटतेय तुला नाही कळणार. लव्ह यु स्वीटहार्ट!!"
अन्वय तिच्याकडे बघतच होता की स्वरा म्हणाली," मी पहिलं प्रेम आणि सृष्टी कोण? तिचा जन्म झाला तेव्हा म्हणाला होता ना की ती तुमचं पहिल प्रेम आहे."
स्वराने अजूनही डोळे उघडले नव्हते पण तिने त्याचा हात घट्ट पकडून घेतला होता आणि तो हसतच म्हणाला," लपून ऐकत होतीस तर माझं बोलणं?"
स्वराने आता डोळे उघडत त्याला म्हटले," हो ऐकत होते. माझी ना उघडझोप आहे तेव्हा कुणी जरासा जरी आवाज केला तरी मला ऐकू येत. तुमचंही ऐकलं मी सर्व बोलणं पण प्रश्न हा नाहीच. मी जे विचारल आधी त्याच उत्तर द्या?"
अन्वय हसतच उत्तरला," तिची आणि तुझी गोष्ट वेगळी. तिची तुलना तुझ्याशी शक्यच नाही."
स्वराने हसतच विचारले," मी पहिलं आणि शेवटच कोण? कुणी तरी पुन्हा आहे ना तुमच्या आयुष्यात? बोला बोला गप्प का बसला आहात?"
अन्वय जरा आता शांत झाला आणि हळुवार स्वरात उत्तरला," बरोबर म्हणते आहेस. आहे कुणीतरी पण आता नाहीये कदाचित येईल लवकरच."
स्वराचा चेहरा आता पडला होता. तिची गंमत तिच्यावरच येऊन पडली आणि अन्वय हसतच उत्तरला," वेडाबाई! येईल ना ती काहीच वर्षात. आपलाच अंश असेल ती म्हणजे आपली मुलगी. तीच असेल माझं शेवटच प्रेम. त्यानंतर कुणावर होणार बर प्रेम?"
स्वराचा चेहरा आता जास्तच खुलला आणि हसतच म्हणाली," काही दिवसांपासून अगदी रोमँटिक रोमँटिक वागत आहात! काय खास आहे बर अन्वय सर? आधी तर नव्हता ना असे. अचानक इतका फरक कसा पडला बर?"
अन्वय तिच्या नाकावर टिचकी मारत उत्तरला," बायकोचा प्रभाव सर्व! काय करणार तिला बघितलं की आपोआप रोमांस बाहेर येतो. बघ ना बायको येताच अनरोमँटिक मुलगा सुद्धा रोमँटिक झाला."
स्वरा पुन्हा एकदा लाजत उत्तरली," बर बर नवरोबा! ते सोडा मला सांगा इतक्या सकाळी- सकाळी का उठला आहात?"
अन्वय उभा होत म्हणाला," अग सकाळी सकाळी फिरायची सवय झाली आहे ना. रोज दिवस तिथूनच सुरू होतो म्हणून आताही जातोय."
स्वराने पटकन विचारले," मी पण येऊ??"
अन्वय जरा दूर होत उत्तरला," तुमच्याकडे फक्त ५ मिनिट आहेत. जर तोपर्यंत आलात तर पक्का जाऊ. नाही तर मी निघून जाईल. जमेल का??"
त्याने जस बोलणं थांबवलंच होत की ती पटकन वॉशरूमला गेली आणि अगदी काही मिनिटात बाहेर आली. अन्वय तिला बघून हसतच होता की ती उत्तरली," बघा फक्त ४ मिनिटातच आले. आता मला बघून हसत काय बसला आहात. आता चला नाही तर मीच तुम्हाला सोडून जाईल. मग म्हणायचं नाही हा की बायको बनल्यावर क्षणात बदललीस कालच्यासारखा!!"
अन्वय तिच्यावर हसत- हसतच समोर जाऊ लागला. तीही त्याच्याकडे बघत- बघतच समोर चालू लागली.
अगदी काही सेकंदातच ते घराच्या बाहेर पडले. ते समोर चालतच होते की तिने विचारले," अन्वय सर कुठे जातोय आपण?"
अन्वय समोर बघतच म्हणाला," अग इकडे जवळच पार्क आहे. लहानापासून मोठे सर्वच खेळत असतात इथे सो तिकडेच जातोय आणि बर का तुला एक चेतावणी आहे."
स्वराने प्रश्नार्थक नजरेने विचारले," कसली चेतावणी बर? मी कुत्र्यांना वगैरे घाबरत नाही हा!! तेवढी घाबरट नाहीे मी!! मी फक्त माणसांना घाबरते."
अन्वयने गमतीतच म्हटले," माहिती आहे म्हणून आधीच चेतावणी दिली. इथे भरपूर मुली आहेत, ज्या फक्त मला क्षणभर बघावं म्हणून येतात. एक दिवानी सुद्धा आहे ती तर तुला बघूनच टोमने मारेल. म्हटलं तुला ईर्षा होईल तिला बघून म्हणून आधीच सांगतोय."
स्वराने अगदी हलकेच स्मित करत उत्तर दिले," कस आहे ना सर.... ईर्षा नक्की होईल पण त्यांना, मला नाही. आज हे मंगळसूत्र बघतील ना माझ्या गळ्यात तर त्याच इर्षेने जळून खाक होणार आहेत तेव्हा तुम्ही माझी नाही तर तुमच्या गोपिकांची काळजी घ्या. समझें??"
स्वरा हसत होती आणि अन्वय क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला. कदाचित अन्वयलाही तिच्या तोंडून हेच ऐकायचं होत. तिच्या तोंडून तो तिच्यासाठी कोण आहे हे ऐकून घेण्याचा मोह तो आवरू शकला नाही म्हणून त्याने हे जाणूनच म्हटले होते.
ते बोलत- बोलत समोर आले. आता पार्कचा रस्ता सुरू झाला आणि अन्वयचा तो हसरा चेहरा क्षणात गायब झाला. स्वरासोबत तो चालला होता पण त्याच लक्ष स्वराकडून लोकांकडे ट्रान्सफर झालं. त्याला जाणवलं की लोक फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघतच नाही आहेत तर जो तो तिचा चेहरा बघताच तिच्यापासून दूर पळतोय तरीही तिच्या चेहऱ्यावर सतत सर्वांची नजर आहेच. अन्वय-स्वरा समोर जात होते पण परिस्थिती काही बदलत नव्हती. आजपर्यंत असे फार कमी क्षण आले होते जेव्हा तिच्यासोबत अस चालायची वेळ आली होती पण जेव्हा ती त्याची हक्काची बायको झाली होती तेव्हा त्याच लोकांच्या नजरा त्याला त्रास देत होत्या. त्याला लोकांच्या नजरेत घृणा बघून राग आला होता. त्याने पुढच्याच क्षणी स्वराकडे बघितले. ती अजूनही हसतच होती. अन्वय स्वराकडे बघावे आणि स्वराही त्याच्याकडे बघून हसली. स्वराने बघताच अन्वयने चेहऱ्यावर खोट- खोट हसू आणलं पण तो आपल्या हाताची मुठी आवळून राग शांत करू पाहत होता. स्वरा सर्वांकडे बघून हसत होती तर अन्वयच्या डोक्यात वेगळेच विचार होते. त्याने आज तिच्यासोबत पहिल्यांदा प्रवास केला आणि त्याला जाणवलं की स्वराने आयुष्यात नक्की काय काय सहन केल. आजपर्यंत त्याला तिला सल्ला देणे की लोकांकडे लक्ष देऊ नकोस ते सोपं वाटत होतं पण तिच्या सोबत असून ते समोर प्रत्यक्ष बघताना त्याला स्वतालाच ते करणं शक्य होत नव्हतं. लोकांच्या नजरा तर स्वराला बघून बदलल्या नव्हत्या पण अन्वयचा हसरा चेहरा मात्र काहीच क्षणात बदलला फक्त स्वराला आपल्या भावना कळू नये म्हणून तो कसातरी स्वतःला आवरून होता.
काही क्षण गेले. तो ज्या जागी रोज चहा घ्यायचा तिथे पोहोचला आणि स्वराला त्याने हसतच विचारले," स्वरा चहा घेऊया? मस्त मिळतो इथे. तुला आवडेल."
स्वराने एकदम गोड हसत उत्तर दिले," तुमच्यासोबत वेळ घालवायला कायम आवडत मला तेव्हा नाही म्हणायचा विषयच येत नाही. चला घेऊ."
काही क्षण का असेना स्वराच गोड हसू बघून तो शांत झाला होता आणि लगेच समोरच्या बाकावर जाऊन बसला. स्वराला बघताच काही लोक बाजूला उठून गेले तर काही स्वराकडे बघतच होते हे अन्वयच्या नजरेने हेरल होत तरीही तो गप्प होता. अन्वयने चहा सांगितला तेव्हा तो दुकानदार देखील स्वराकडे बघत होता. त्याला त्या क्षणी तुला लोकांचा खूप राग येत होता पण स्वतःचा राग आवरत अगदी गोड हसत तो उत्तरला," भैया वो ना मेरी बिवी है. मस्त है ना इसलीये देख रहे हो ना उसे? देखो देखो इतनी सुंदर लडकी फिर देखने को नही मिलेगी."
अन्वयने बोलताच चहावाल्याने पटकन नजर खाली केली आणि त्यांना चहा दिला. अन्वयने इतरांकडे दुर्लक्ष करून स्वराला चहा दिला आणि स्वरा हसतच म्हणाली," अन्वय सर खूप मस्त जागा आहे ही. मला खूप आवडली. सर्व वयाचे लोक इथे आहेत सोबत आहे हा निसर्ग. मनाला भुरळ घालणारा. त्याला काही तोडच नाही. आता तुम्ही एकटे नाही यायचं मीही रोज येईल. तुम्हाला आवडेल ना माझ्यासोबत यायला?"
अन्वय काही क्षण विचार करतच होता. त्याला एक प्रश्न पडत होता की लोकांच्या नजरेचा तिला खरच काही फरक पडत नाहीये का? कसे बघत आहेत तिला हे लोक? खरच वाईट वाटत नसेल तिला? अन्वय विचार करतच होता की तिने हसतच विचारले," कुठे हरवलात नवरोबा? बोला आवडेल ना सोबत आलेलं?"
अन्वयने तिच्या चेहऱ्यावरच हसू बघितलं आणि स्वतःच्या मनाला शांत करत म्हणाला," तुझ्यासोबत प्रत्येक क्षण माझा खास आहे. मी तर बहाणे शोधतो तुझ्यासोबत असण्याचे मग खरच ही संधी सोडेल का? अफकोर्स!! आता तू नाही येत म्हणालीस तरी उठवून घेऊन येईल."
स्वरा अन्वयच्या बोलण्यावर हसत म्हणाली," सर तुम्ही वाटत नाही पण खरंच कॉमेडियन आहात. तुम्हाला मला कायम हसवन जमत म्हणून तर तुम्ही मला…"
अन्वयने हसतच विचारले," समोर.."
स्वराने आता जाणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि चहा घेऊ लागली. आज जागा एकच होती पण दोघांची मनस्थिती वेगळी होती. अन्वयच्या डोक्यात प्रश्न होते तर ती सतत हसत होती. अन्वय तिच्यासोबत असला की ती हसणार नाही अस कधीच शक्य नव्हतं..
स्वरा- अन्वय दोघेही काही मिनिट तिथेच बसून होते आणि आता पुन्हा फिरू लागले तेव्हाच स्वरा म्हणाली," अन्वय सर आज लवकर जाऊ घरी. स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. उगाच आई ओरडतील की महाराणी सारखी बसुन सर्व बघते आहेस म्हणून."
अन्वय हसतच उत्तरला," तुला त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा नाही तेव्हा आई ओरडणार नाही हे पक्क आणि आज काहीच बनबायची गरज नाहीये. आज मला मनुला कॉलेजला सोडायच आहे आणि सोबतच मधूला वगैरे ड्रॉप करू. तुझी भेटही होईल त्यांच्याशी. मी म्हणेन घरी लवकर जाण्यापेक्षा समोर डेस्क खाली आहे तिथे जाऊन गप्पा मारू."
ती काही बोलणार त्याआधीच अन्वय तिचा हात पकडून समोर घेऊन गेला. अन्वय- स्वरा तिथे पोहोचताच तिथे दोन स्त्रिया होत्या त्या बाजूला झाल्या आणि पुन्हा एकदा अन्वयचा राग अनावर झाला. तो तिच्यासोबत बसला तर होता पण त्याच्या नजरेत लोकांप्रति राग होता. अन्वय समोर बघतच होता की स्वराने हसतच विचारले," अन्वय सर तुम्ही तर म्हणत होतात की इथे तुमच्या खूप गोपिका आहेत पण मला एक पण दिसली नाही. कुठे आहेत हो तुमच्या गोपिका?"
अन्वय आज आपल्याच विचारात हरवला होता. त्याच वेळी अगदी त्याच्या पायाजवळ फुटबॉल येऊन थांबला. अन्वय त्या मुलाकडे बघतच होता. फुटबॉल त्याला हवा असतानाही तो त्यांच्याकडे येत नव्हता. हे अन्वय निवांत बघत होता. बहुदा तो स्वराला बघून घाबरत होता हे क्षणात त्याच्या लक्षात आले. आता त्या मुलाच्या बाजूने सर्व मूल गोळा झाले आणि स्वराला बघू लागले. अन्वयने आज जे सर्व पाहिलं होतं ते त्याला सहन झाल नव्हतं म्हणून तो डेस्कवरून उठला आणि समोर पडलेल्या बॉलला त्याने जोराने किक मारली. तो बॉल मुलांना क्रॉस करून सरळ गोल मध्ये गेला. अन्वयने त्या एका किकमधून त्याच्या मनातला राग बाहेर काढला. पुढच्याच क्षणी त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन जाऊ लागला. तिने पूढच्याच क्षणी त्याला विचारले," आताच तर म्हणालात की थांबू मग आता काय झालं?"
अन्वय हसतच उत्तरला," त्यांना तुला बघून इर्शा होईल की नाही माहीत नाही पण इथे माझ्या बायकोला मूल बघत आहेत ते बघून मला नक्कीच इर्शा होत आहे म्हणून नको बाबा आता अजून एकही क्षण!!"
अन्वय खोट हसू ओठांवर आणत तिच्याकडे बघत होता तर स्वरा त्याच बोलणं ऐकून अगदी गोड हसत होती. स्वरा- अन्वय एकमेकांना बघत आता घराकडे जाऊ लागले. आज अन्वयला लोकांच्या नजरा बघून त्रास होत होता म्हणून त्याने पुन्हा लोकांकडे लक्ष दिलेच नाही. तो हरवला होता तिच्या हसऱ्या चेहऱ्यात. तो आनंद जो कदाचित काहीही केला असता तरी विकत घेता आला नसता. तोच आनंद त्याला इतक्या घृणास्पद नजरामध्ये खुश करून गेला होता.
******
जवळपास सकाळचे १० वाजले होते. अन्वय- स्वरा फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. आई किचन मध्ये काम करत होती तर बाबा बाहेर वर्तमानपत्र वाचत बसले होते. बाबांना बघताच स्वराने त्यांना वाकून नमस्कार केला. अन्वय त्यावेळी बाबांकडे बारीक नजर ठेवून होता. बाबानी तिच्या डोक्यावर हात तर ठेवला होता पण तिचा चेहरा बघून बाबांच्या चेहऱ्यावर जे भाव आले होते ते त्याच्या नजरेतून सुटले नाही. अन्वयने आज सकाळपासूनच हेच बघितल होत म्हणून आता त्याला ते सहन होणार नव्हतं आणि अन्वय जरा मोठ्याने म्हणाला," स्वरा उशीर होतोय निघुया!! त्यांची फ्लाइट निघेल."
अन्वय बाबांशी नजर न मिळविताच समोर गेला आणि कारमध्ये बसला तर स्वरा मागून येऊन बसली. ती बसताच अन्वयने रागात कार सुरू केली. आज अन्वय कार तर चालवत होता पण त्याच मन काही थार्यावर नव्हत. सतत त्याच्या डोक्यात तेच ते प्रसंग सुरू होते. स्वराला कदाचित कळत होतं की त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे पण तिला त्याला दुखवायच नव्हतं म्हणून काहीच बोलली नाही. कारण तिलाही माहीत होतं की त्याला हे सहज स्वीकारणं सोपं जाणार नव्हतं. आज पहिलाच दिवस होता नंतर त्याला सवय होईल म्हणून तीही शांतच बसली होती. सुमारे अर्धा तास झाला जेव्हा ते घरी पोहोचले. स्वरा कारमधून बाहेर आली. मृन्मयी तिची बाहेर वाट बघत होती. स्वराला बघताच तिने मिठी मारत म्हटले," ताई येते मी. कॉलेज आहे नाही गेले तर उगाच अभ्यास राहील. अन्वय सरांसोबत तू पण ये मला भेटायला मग भेटू. बाय."
स्वरानेही तिला मिठी मारली आणि मृन्मयी कारमध्ये बसून कॉलेजकडे निघाली. अन्वयने जाताना स्वराकडे बघितलेही नव्हते म्हणून ती क्षणभर हसली कारण असाच प्रसंग तिने त्याच्यासोबत मुंबईलाही अनुभवला होता म्हणून तो काय फिल करतोय हे तिला समजायला फार वेळ लागला नाही. ती हसत- हसतच वर पोहोचली. सर्वांच्या बॅग पॅकिंग सुरू होत्या आणि स्वराने विचारले," झाली जायची सर्व तयारी?"
स्वराला बघताच माधुरीने तिला धावतच मिठी मारली तर पूजाही जवळ येत उत्तरली," आम्हाला वाटलं की येणारच नाहीस. बर झालं आलीस अटलिस्ट भेटून तर जाता येईल."
स्वराने पूजाला मिठी मारत म्हटले," मलाही वाटलं नव्हतं निघता येईल अस पण अन्वय सर घेऊन आले मला. म्हणाले की आधी मनुला सोडतो हॉस्टेलला नंतर तुम्हा सर्वांना सोडतो. मग आले भेटायला. सर्व त्यांचीच कृपा!!"
स्वराने तिची मिठी सैल केली आणि दीपिकाला मिठी मारत म्हटले," ताई काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना इथे तुला?"
दीपिकाने हसतच उत्तर दिले," कमी होती पण तुझी इतर गोष्टीची नाही. तुझ्याविना कुणालाच करमत नव्हतं ग मग काय बोलत बसलो तुझ्याबद्दल. रात्री किती वाजले माहिती नाही झोपायला."
स्वराने मिठी सैल केली आणि हळूच म्हणाली," सॉरी माझ्याविना तुम्हाला इथे राहावं लागलं. जर काही कमी राहिली असेल तर सॉरी!! माहिती आहे खूप छान अरेंजमेंट करू शकले नाही पण जेवढं जमलं तेवढं केलं."
पूजा आता रागावतच म्हणाली," बघा ना आई कशी परक्या सारखी बोलते ही? एक दिवस झाला फक्त लग्न होऊन आणि हिने परक पण केलं आम्हाला. स्वरा कस आहे ना तू आता दुसऱ्याच्या घरची सून झाली आहेस पण आम्ही अजूनही आईच्या मुली आहोत सो आम्ही हक्काने येऊ आमच्या घरी. कळलं?"
माधुरीही आईजवळ जात म्हणाली," हा ना केवळ एका मुलीच लग्न झालंय. बाकी आम्ही आहोत. आईला कॉल करू रोज. तुझी कमी जाणवू द्यायची नाही आम्हाला. तू राहा आपल्या नवऱ्यासोबत. आईकडे आम्ही बघू."
स्वरा आईला मिठी मारतच म्हणाली," खर सांगू तर खरच रोज एक कॉल करा आईला. मला जमेल की नाही माहीत नाही पण तुम्ही नक्की करा म्हणजे तिला कधीच एकट वाटणार नाही."
सर्वांच बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि आई हळूच म्हणाल्या," हो बाबा करा सर्व पण आता चला जेवून घ्या. निघायला घाई होईल नाहीतर. स्वरा तू पण जेवून घे ग."
स्वरा हसतच उत्तरली," आई अन्वय सरांनी काही खाल्लं नाही अजून. मी खाईन त्यांच्यासोबत."
स्वराच्या आई क्षणभर हसल्या आणि किचनमध्ये पोहोचल्या. ती अगदी पहिल्याच दिवशी त्याच्या घराचा तिच्या जिवलग माणसांचा विचार करतेय म्हणून तिलाही समाधान मिळालं होतं.
त्यांचं जेवण आवरल तेव्हा जवळपास पावणे १२ च्या आसपास झाले होते. अन्वय देखील घरी पोहोचला होता. दीडची फ्लाइट असल्याने त्यांना लवकर निघावं लागणार होतं. त्यांचं जेवण झालं आणि त्या बॅग घेऊन तयार झाल्या तेव्हाच आई रडत म्हणाल्या," मागचे काही दिवस घर किती भरलं भरलं वाटत होतं पण आता सर्वच जात आहात. ह्या घराचं घरपण तुम्ही मुलीच होतात. आता कसे जातील आम्हा म्हाताऱ्यांचे दिवस काय माहिती?"
आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि अन्वय त्याच क्षणी आईजवळ येत उत्तरला," आई तुमच्या पासून मी स्वराला कुठेच नेत नाहीये. तुम्हाला केव्हाही वाटलं तर बिनधास्त भेटायला या आणि ती विसरलीच तुम्हाला तर मी येत जाईन दोन तीन दिवसात भेटायला पण अस रडू नका. तुम्ही कधीच एकटे पडणार नाही. शब्द आहे माझा. प्लिज डोळे पुसा बर."
पूजाही मिठी मारतच उत्तरली," हो आई! आम्ही कुठेच जात नाही आहोत. आम्ही येत राहू आणि आठवणीने कॉल करू. जर आम्ही नाही केला तर तुम्ही स्वतःच करा. मग तर झालं."
माधुरीही मिठी मारतच उत्तरली," इतरांच माहिती नाही पण तुझी लहान मुलगी अजून तुला खूप त्रास देणार आहे. जाऊ दे हिला नवरा मिळाला तर आता तुझी आठवण काही येणार नाही तिला पण मी असेल तुझ्यासोबत कायम. मग रडायचं कशाला?"
तिच्या शब्दांनी अगदी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू परतल आणि अगदी सर्वांनी मिठी मारून घर सोडल.
काहीच क्षणात कार सुटली आणि आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू जमा झाले. ते फक्त एका मुलीने सोडून जाण्याचे नव्हते तर त्या घराची रौनक क्षणात नाहीशी होण्याचे होते. अगदी क्षणात घर खाली झालं त्यामुळे आईच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते…
अन्वय कार ड्राईव्ह करत होता. काही क्षण सर्व शांत होत आणि दीपिकाने हसतच विचारले," काय स्वरा मॅडम!! कसा होता मग सासरचा पहिला दिवस?"
अन्वय केव्हापासूनच शांत होता त्यामुळे त्याला हसवायला ती उत्तरली," दिपू ताई, माझ्या सासूबाई ना लग्नाला तर आल्या नाही पण घरी गेल्यावर त्यांच प्रेम बघून मात्र भारावून गेले. काय ती ओवाळणी आणि उखाण्याचा प्रसंग!! अशी सासू प्रत्येकालाच मिळायला हवी बाबा. ननंद तर विचारूच नको. उखाणा घेतल्याशिवाय त्यांनी मला घरातच घेतलं नाही."
स्वराने अन्वयकडे क्षणभर बघितल. तो स्वतःला हसण्यापासून थांबवू शकला नव्हता. त्याला हसताना बघून स्वराचा चेहराही बराच खुलला..दीपिका आता चिडवतच म्हणाली," नॉट बॅड हा! वाटलं नव्हतं तुला बघून एकाच क्षणात फ्लॅट होतील. तशी आहेस तू की कुणीही एका झटक्यात फ्लॅट होतील. अन्वय सर झाले मग त्यांची आई कशी नाही होणार?"
स्वराने अन्वयकडे बघतच म्हटले," फ्लॅट काय सोडायला तयार नव्हत्या त्या मला!! रात्री पण माझ्याच अवती-भवती होत्या. एक क्षण सोडलं नाही त्यांनी मला. इतकं प्रेम कोण करत बर??"
अन्वयला आता किती हसू नि किती नको झालं होतं. तेवढ्यात पुन्हा दिपीकाने विचारले," विचारायला नको पण मी तुम्हा दोघांनाही ओळखते तेव्हा विचारावच म्हणते. रोमांस वगैरे झाला की नाही काही. आफ्टरऑल लव्ह मॅरेज आहे तुमचं. काहीतरी खास गिफ्ट दिलं असेल ना त्यांनी तुला."
स्वरा हर्षोल्हासित होत उत्तरली," रोमांस अगदी काही कमी नाही. सकाळी-सकाळी आज ना आम्ही मस्त हातात हात घेऊन चालत होतो. सर्व जग बघत होत पण अन्वय सर हात सोडायला तयार नव्हते. मी म्हटलं त्यांना की लोक बघत आहेत तर म्हणाले कसे बायको आहेस तर लोकांनी बघायला नको. मग मी बिचारी काय बोलणार. लाजत- लाजतच जीव जात होता माझा. ताई सर ना वरूनच खडूस दिसतात पण आतून जाम रोमँटिक आहेत. एकाच दिवसात एवढं मिळाल. पुढे पुढे काय होत काय माहिती?"
दीपिका आता अन्वयची उडवत म्हणाली," अन्वय सर चोरी पकडली गेली आपली. हे काहीतरी वेगळंच ऐकतेय. जाऊन सांगणार आहे मी ऑफिसमध्ये सर्वाना. पुढे भेटलात तर ते काही सोडणार नाहीत तुम्हाला."
आज कारमध्ये सर्व हसत होते फक्त पूजाला सोडून. तिच्या मनात नक्की काय सुरू आहे ते कुणालाच माहिती नव्हत. घरापासून तर एअरपोर्टपर्यंतचा हा प्रवास असाच गमतीशीर सुरू होता आणि फायनली एअरपोर्ट आलं. माधुरी, दीपिका, अन्वय समोर जात होते आणि पूजाने स्वराचा हात पकडत बाहेरच अडवले. तिला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि जरा उदास स्वरातच तिने विचारले," स्वरा हे काय बोलत होतीस सासू, ननंद वगैरे. त्यांना हे सर्व करायचं असतच तर लग्नात आले असते. का मग खोट बोललीस? खर खर सांग नक्की काय झालं काल रात्री?"
स्वराने हसतच तिच्या काळापावर मारले आणि उत्तरली," खरच मी जे सांगितलं तेच झालं फक्त थोडासा फरक आहे. काल सायंकाळी गेलो ना तेव्हा आईने दार उघडलं. मी त्यांना नमस्कार करायला गेले पण त्या समोरून क्षणात निघाल्या..मला अगदी काही सेकंद त्याच वाईट वाटलंच होत आणि अन्वय सर मला बाहेरच थांबवून मध्ये गेले. ते क्षणात आरतीच ताट घेऊन आले आणि बाकी सर्व विधी त्यांनीच पूर्ण केल्या. आधी सासू मग ननंदचे कर्तव्य पूर्ण केले आणि पुढच्याच क्षणी माझ्या हातात हात टाकून घरात प्रवेश पण केला..माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता तो. मला ते शब्दात पण व्यक्त करता येत नाहीये."
पूजाच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं आणि ती म्हणाली," क्या बात है!! सर्वात वेगळे आहेत सर. मस्त सुरुवात झाली आयुष्याची. आय एम हॅपी फॉर यु. बर एक विचारू रागावणार नसशील तर?"
स्वराने हसतच म्हटले," हेच ना की काल काही रोमँटिक क्षण वगैरे झाले का तुमच्यात?"
पूजा हसतच उत्तरली," हो.. झालंय का काही?"
स्वरा जरा इटकावत म्हणाली," त्यांनी काही म्हटलं नाही पण मीच म्हटलं की मी तुमचीच आहे. तुम्हाला आवडेल तेव्हा मला स्वतःच बनवा तर म्हणाले की आधी ओळखून घेऊ एकमेकांना. जगून घेऊ सुंदर क्षण एकमेकांसोबत मग काय आहेच आयुष्यभर मुलांच करायला!! हे क्षण पुन्हा परत येणार नाहीत सो जगुन घेऊ. बाकीच नंतर."
पूजा तिला मिठी मारतच म्हणाली," ग्रेट चॉइस डिअर! खरच अन्वय सरांसारख कुणी नाही."
स्वराने मिठी सैल करत म्हटले," एकच्चूली येस!! ही इज अ ग्रेट पर्सन. पूजा तुला सांगू आधी ना खूप विचार यायचे पण आता नाही येत. आता आमच्या प्रेम कहाणीचा शेवट काय असेल नाही माहिती, माझा शेवटचा दिवस कोणता असेल नाही माहिती पण मला नाहीये त्याची चिंता. आज ना अन्वय सर माझ्यासोबत बाहेर फिरायला आले. नेहमीप्रमाणे लोक मला चुकीच्या नजरेने बघत होते. त्यांना ते अजिबात आवडलं नाही. म्हणून सकाळपासून तोंड फुगवून आहेत. कोण करत यार एवढं प्रेम?? कुणाला तरी त्रास होताना आपल्याला तोच त्रास सहन होन फक्त प्रेमातच होत. आपली इतकी काळजी कोण घेत?? आपल्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून नौटंकी करून हसवत ते प्रेम किती खास असत ह्याचा अनुभूव येतोय मला. आता जगाने मला कितीही त्रास दिला तरीही मी आनंदाने सहन करेन. पूजा उद्याही आता माझा शेवटचा दिवस असेल तरी हरकत नाही कारण अन्वय सरांसोबत हे क्षण मी असे मनात घट्ट साठवून घेईल की मला पुढे कधी आयुष्यात जगायच राहून गेलं अस वाटणारच नाही. पूजा मागच्या ८ वर्षात मी काही मिस केलं असेल ना तर ते प्रेम आहे पण आज आनंदाने सांगू शकते की ह्या आनंदासमोर जगाने दिलेले दुःख सुद्धा काहीच नाही."
स्वरा एका श्वासात बोलून गेली आणि पूजा तिचा हात पकडत उत्तरली," बस अशीच खुश राहा बाकी आम्हालाही काहिच नकोय. लव्ह यु मॅडम!!"
त्यांचं बोलणं सुरू होतच की अन्वयने त्यांना आवाज दिला आणि दोघीही क्षणात त्यांच्याकडे गेल्या. अन्वयने त्यांच्या तिकीट काढून ठेवल्या होत्या. फ्लाइटमध्ये बसायचीही जवळपास वेळ झाली होती. त्यामुळे तिघीनीही स्वराला मिठी मारली आणि अन्वयला शुभेच्छा देऊन जाऊ लागल्या. त्या जातच होत्या की अन्वय म्हणाला," खर सांगू तर आपण एकमेकांना जवळून ओळखत नाही पण मला एक गोष्ट माहिती आहे की स्वरा माझ्या आयुष्यात येईपर्यंत तुमची साथ तिला कायम मिळत आली आहे. कदाचित तुमच्या साथीमुळेच स्वरा माझ्या आयुष्यात आहे. तेव्हा सर्वात आधी थॅंक्यु आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वराला आजपर्यंत जस जपल त्याप्रमाणेच मी तिला जपेन हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो. मी प्रयत्न करेन की तिला फार त्रास होणार नाही माझ्या घरी."
अन्वयच बोलत होताच की पूजा उत्तरली," जीजू ते सांगायची गरज नाही. मी गेले कित्येक वर्ष तिच्यासोबत आहे पण आज ह्या २४ तासात तिच्या चेहऱ्यावर जो आनंद बघितला आहे तेवढा आनंद ह्याआधी कधीच बघितला नाही त्यामुळे तुम्ही असताना तिच्या चेहऱ्यावरच हसू कधीच गायब होणार नाही ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे."
माधुरी स्वराचा हात पकडत म्हणाली," जीजू मला ही गोष्ट आधीच माहिती होती म्हणून मी तिला तुमच्याशी लग्न कर म्हणून सतत सांगत होते. मी तर देवाला प्रार्थना केली होती की अन्वय सरांनी तिला प्रेमात पाडाव. तुम्ही फक्त प्रेमातच पाडल नाही तर तिला तिचा आनंद दिलाय तुम्ही. तुम्ही नसत म्हटलं तरी आम्हाला माहीत आहे की तिच्या आयुष्यात कितीही त्रास असला तरीही तुम्ही तिच्या चेहऱ्यावर हसू आणायला कायम सोबत असाल."
दीपिका हसतच उत्तरली," अगदी बरोबर. अन्वय सर तुम्ही असण्याने फक्त ती इतकी खुश आहे तर पुढच्या प्रवासात तिला किती आनंदी ठेवू शकता ह्याची आम्ही कल्पनाही नाही करू शकत. खूप खूप शुभेच्छा दोघांनाही नवीन आयुष्यासाठी."
अन्वय त्यांचं बोलणं ऐकतच होता की फ्लाइटची घोषणा झाली आणि तिघीही क्षणात निघाल्या. त्यांची सर्वांची नजर स्वरावर होती आणि स्वराची त्यांच्यावर. एक क्षण असा आला की त्या दिसेनाशा झाल्या.
फ्लाइटने उड्डाण घेतले आणि अन्वय- स्वराही घराकडे निघाले. अन्वय आताही कारमध्ये शांत बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर अगदी सकाळचे क्षण जसेच्या तसे उभे होते तर स्वरा त्याची तिच्याप्रति असलेली काळजी बघून भारावून गेली होती. तिला त्याच हे प्रेम बघून किती आनंद झाला होता तीच तिला माहिती नव्हत. काय होते " स्वरान्वय " एक दुसर्याला त्रास होतोय हा विचार करून शांत होता तर दुसरी त्याची काळजी बघून झालेला त्रास क्षणात विसरली होती. कशी असणार होती त्यांची पुढची कहाणी??
आंखो से इजहार होते
देख रहा हु मै पलभर
सुना है हर बार इजहार
शब्दो से नही होता...