Bhagy Dile tu Mala - 87 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ८७

ये किसीं शाम की कहाणी नही
मेरी जिंदगी का हिस्सा है
रुलाकर खुश हो जाते है लोग
उनके लिये तो ये सिर्फ एक किस्सा है..

स्वराच्या आयुष्यात अन्वय नक्की काय आहे हे तिला दोन दिवसातच कळलं होतं. ह्या दोन दिवसात अन्वयशी एकदाही बोलणं झालं नव्हतं आणि कायम हसत राहणाऱ्या, इंद्रधनूसारख्या रंग वाटणाऱ्या स्वराचा रंग कधी नाहीसा झाला तिलाच कळलं नाही. स्वराचा संघर्ष नक्कीच कौतुकास्पद होता पण स्वरा अन्वयविना अपूर्णच आहे हे सत्य ह्याक्षणी तिलाही नाकारता आलं नसत. स्वरा हे दोन दिवस अगदी शांत- शांत होती. अन्वय सोबत असताना तिला सतत हसवत असायचा त्यामुळे लोकांच्या बोलण्याचा प्रभाव कदाचितच तिच्यावर पडायचा पण तो फक्त काही दिवसांसाठी बाहेर गेला आणि जणू तिच्या चेहऱ्यावरच हसू तो स्वतःसोबत घेऊन गेला आणि लोकांच्या नजरा, त्यांचे शब्द तिला पुन्हा तेवढ्याच यातना देऊ लागले. ते तिला इतकं असह्य झाल होत की तिने नंतर ऑफिसच्या व्यतिरिक्त बाहेर पाउलच टाकले नाही. घरी देखील असताना ती आई-बाबांसोबत थोड्या वेळ बोलकी राहत असे पण बाकी वेळ तिच्या डोक्यात सतत प्रश्न येत होते. त्यातला एक प्रश्न जीवघेणा होता " उद्या जाऊन जर सर्व काही नीट झालं नाही तर अन्वयने नक्की कुणाची बाजू घ्यावी? "

त्याने कुणाची एकाची बाजू घेतली तरीही अन्वयच हरणार होता आणि अन्वयच हरण म्हणजे स्वराची हार होती. अशा स्थितीत तिच्याकडे कदाचित एकच पर्याय उरणार होता? कोणता??? अगदी सर्वांच्या आयुष्यातून निघून जाऊन सर्वाना ह्या चेहऱ्यातून, ह्या श्रापातून मुक्त करण्याचा. अन्वय सोबतचे तीन महिने इतके सुंदर गेले होते की तिला कधी ह्या गोष्टीचा विचार आला नाही पण तो एक क्षण तिच्या नजरेसमोरून दूर झाला आणि स्वराच पुन्हा एकदा डोकं विचारू करू लागल. खाली दिमाग शैतान का घर असत हे तिला आता जाणवू लागल आणि ती विचार करूनही त्यातून बाहेर पडू शकत नव्हती. तिने विचार केलेला हा पर्याय कदाचित शेवटच्या क्षणी असणार होता. तो शेवटचा क्षण म्हणजे कोणता? ज्याक्षणी तिच्यामुळे अन्वयच्या डोळ्यात अश्रू येईल कदाचित तोच शेवटचा क्षण असणार होता म्हणून हजार वाईट विचारातही ती एक आशा घेऊन बसली होती कदाचित गवतात सुई शोधायच काम ती करू पाहत होती. ती आशा होती आईच मन जिंकण्याची पण कितपत सोपं होतं तिला हे आव्हान पूर्ण करन फक्त तीन महिन्यात गळून पडलेली स्वरा हे खरच करू शकणार होती का?

मागे दोन दिवस गेले होते. स्वरा ह्या दोन दिवसात फारच कमी बोलली होती. मग ते ऑफिसच काम असो की घरी. ती बोलायची फक्त आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू असाव म्हणून बाकी अन्वय तीच हसू स्वतासोबतच घेऊन गेला होता. दोन दिवस झाले होते. आज स्वराला एक फाइल आणायला पुन्हा सासरी जायचं होतं त्यामुळे तिचे हात- पाय जरा थरथर कापू लागले होते. आई पुन्हा काही बोलतील तर कदाचित तिला ते सहन होणं शक्य नव्हतं म्हणूनही कदाचित असेल पण काम महत्त्वाचं असल्याने तिला घरी जाण भाग होत आणि ती सकाळी- सकाळीच सासरी पोहोचली. हॉलमध्ये जातानाही तिची नजर इकडे- तिकडे फिरत होती. तिने हॉलमध्ये लक्ष दिले. तिथे कुणीच नव्हतं त्यामुळे हळुवार पावले टाकत ती समोर गेली. आई बहुदा किचनमध्ये काम करत होत्या. स्वरा हळुवार पावले टाकत बेडरूमकडे जाऊ लागली. स्वरा मध्ये जातच होती की नेमक्या त्या त्याच वेळी तिच्यासमोर आल्या. त्यांची क्षणभर नजरा- नजर झाली आणि स्वराच हृदय मोठ्याने धडकू लागलं. स्वरा स्वतःच्या हार्टबिट्सना कंट्रोल करू पाहत होती पण तिला ते काही जमत नव्हतं. तिच्या डोळ्यात कदाचित ते स्पष्ट दिसत होतं. अन्वयच्या आईने तिच्याकडे बघत होत्या. काही क्षण अगदी सर्व शांत होत. आई काहीच बोलत नाहीत म्हणून ती जाऊ लागली तेवढ्यात आई म्हणाल्या," मला वाटलं होतं कायमस्वरूपी गेलीस. तुझ्या जाण्याने काही दिवस सुख-शांती मिळाली होती घराला पण एवढ्या लवकर येशील आणि घराचं सुख चैन हिरावून घेशील अस वाटलं नव्हतं. काय करणार आलिया भोगासी असावे सादर. मुलाने चूक केली तर तुला बोलून काय फायदा म्हणा? जा आपल्या रूममध्ये. मी तुला जास्त बोलले हे समजलं तर माझा नवरा आणि तुझा नवरा मलाच धुवून काढतील. जा मालकीण बाई. इतकं घाबरत घाबरत यायची गरज नाहीये. तुमचंच घर आहे. तुम्ही मालकीण आहात ह्या घराच्या. काही लागलं तर सांगा मी येते घेऊन."

स्वरा ऐकून शांत उभी होती तर आई बोलून किचनमध्ये गेल्या. स्वराने आजपर्यंत आईला कधीच पलटून उत्तर दिले नव्हते पण ह्या दोन दिवसात तिच्या डोक्यात काही प्रश्न घर करून होते त्याची उत्तरे कदाचित तिला हवी होती म्हणून ती किचनमध्ये गेली. आई काम करत होत्या. तिला अस सरळ त्यांना विचारण योग्य वाटलं नाही म्हणून तिने फ्रीजमधून पाणी काढलं. काही क्षण ती त्यांच्या बाजूला घिरट्या घालत होती. तीच पाणी पिऊन झालं आणि हळूवार स्वरात तिने विचारले," अन्वयच्या आई, तुम्हाला माझा इतका त्रास का होतो?"

तिचा प्रश्न येताच आईची नजर तिच्यावर गेली. त्या डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होत्या. तर स्वरा आवंढा गिळून त्यांच्या नजरेला नजर मिळवू पाहत होती. काहीच क्षणात तिची नजर त्यांच्या नजरेवर स्थिर झाली. ती आज पहिल्यांदा त्यांना एकटक बघते आहे म्हणून तिच्या नजरेला नजर देत आई म्हणाल्या," सांगितलं तर तू सोडून जाणार आहेस का कायमच?"

स्वरा ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच शोधत होती त्यामुळे ती ह्याक्षणी हे उत्तर देणे शक्यच नव्हतं. ती त्यांच्याकडे बघत होती आणि त्या सौम्य आवाजात म्हणाल्या," स्वरा मला का त्रास होऊ नये तूच सांग? तू आलीस आणि माझं सर्व आयुष्यच बदललं. चेहरा एकदा विसरायचा विचार केला तरीही बाकीच्या गोष्टी कशी विसरू? तुला काय वाटत मी विसरायचा प्रयत्न केला नसेल पण तुम्हाला माहिती कस असेल कारण तुमचा- माझा संवाद कुठे होतो. बर तुझ्याशी मी बोलत नाही समजू शकते पण माझा मुलगा किती माझ्याशी बोलतो ते माहिती आहे ना? बर तेही सोड. तुला माहिती आहे. मी आजारी का पडले होते ते?"

स्वराने हळूवार आवाजात म्हटले," अन्वय सर सांगत होते की तुम्ही टेन्शन घेतलंय म्हणून."

अन्वयच्या आई हसत उत्तरल्या," तुमच्या लग्नानंतर मी कित्येक दिवस घराच्या बाहेर पडले नाही भीतीने पण कधी ना कधी निघन तर गरजेच होतच म्हणून एक दिवस निघाले फिरायला. मला जशी आशा होती अगदी त्याप्रमाणे सोसायटीच्या सर्व स्त्रिया माझ्या भोवताली उभ्या झाल्या आणि त्यांनी जणू माझ्यावर टीकास्त्र सोडले. मला माहित होतं की त्या तसच बोलणार पण मला त्याहीपेक्षा जास्त त्रास झाला तो हे ऐकून की ज्या मुलाने माझा एक शब्द आजपर्यंत पाळला नाही त्यानेच तुझ्यासाठी मला सोडलं. एका आईसाठी ही किती मोठी गोष्ट असू शकते हे तू एक आई झाल्याशिवाय कळणार नाही आणि हे एक दिवस नाही तर रोज घडतय. आज काल तर स्त्रिया माझ्यासोबत बोलायला ह्याच कारणासाठी येतात की माझ्या मुलाने काय केलं हे सांगता यावं म्हणून. स्वरा हे मी मान्य करते आहे की तुम्ही तुमच प्रेम आहे म्हणून लग्न केलं पण आम्हाला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळते आहे हे तू सांगू शकतेस? स्वरा तुला जर एखाद्या सासूने मनापासून स्वीकारल असत ना तरीही रोज रोजचे लोकांचे हे बोलणे ऐकून त्यांची चिडचिड झालीच असती आणि कदाचित तुला त्याही सासूचे टोमणे ऐकावे लागले असते. बर मी तुला आज म्हणते की मी तुम्हाला माफही करेन पण तू मला, माझ्या नवर्याला, माझ्या मुलीला जे समाजाच बोलणं खाव लागत, तू बाहेर फिरायला जातेस म्हणून लहान मुलांवर त्याचे काय परिणाम होतात आणि तुम्ही तिला डांबून का ठेवत नाही हे सांगितल्या जात ते सर्व बंद करू शकणार आहेस का? लोकांकडे तो दुर्लक्ष करू शकतो पण सर्वच करू शकत नाहीत. आपण समाजाचा भाग आहोत तेव्हा त्यांचं एकाव लागतच. स्वरा तुम्ही नवीन पुढीचे आहात, तुम्ही कदाचित लोकांना इग्नोर करून जगू शकता पण आम्हाला नाही जमत ते. आम्ही कायम जोडून ठेवत आलोय आणि माझ्या घरच्यांना, मला जो त्रास तुझ्यामुळे, दुसऱ्या शब्दात तुझ्या चेहऱ्यामुळे होतोय त्याला अप्रत्यक्षरित्या तुम्ही दोघेही जबाबदार आहात आणि म्हणून मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. जग म्हणत की एक मुलगी दोन घर सांभाळते पण ज्या मुलीच्या येण्याने अगदी पहिल्या दिवशी बहीण- भाऊ, आई-बाबा असे तुकडे झाले त्या मुलीला मी नक्की का स्वीकारावं हे माझं मन मला विचारत आणि मी नाही देऊ शकत त्यावेळी उत्तर. आता तुझं उत्तर. स्वरा तू काहीही कर पण मी तुला स्वीकारणार नाही. तू माझी वैरी नाहीस पण तुझा चेहरा तुझा वैरी आहे हे सत्य आहे. तुझी चूक असो वा नसो, मला फरक पडावा की नाही तरीही हेच सत्य आहे आणि ते कधीच बदलनार नाही. तुला जगायच आहे म्हणून तुझ्या चेहऱ्याचा त्रास तुला होत नाही पण मला, माझ्या कुटुंबामुळे तुझ्या चेहऱ्यांने त्रास होणार असेल तर नको मला तो चेहरा? स्वरा पुन्हा एक गोष्ट सांगते, अन्वय बोलत नसला तरीही तो लोकांचे रोज बोलणे खातो. एखादी चांगली मुलगी मिळाली असती तर तो आता लोकांचे बोलणे खात असता की आपल्या स्वप्नात हरवला असता तूच विचार कर. तुला नाही वाटत का तू त्याचा आनंद, स्वप्न हिरावून घेतला आहेस. तो कितीही म्हणेल त्याला त्रास होत नाही पण तू कधी विचार नाही केलास का, अन्वयचे बाबा आपल्या भांडणामुळे कंटाळून जाऊ शकतात मग अन्वय रोज रोज तेच बघून, ऐकून कंटाळला नसेल कशावरून?? आहे ह्याच उत्तर तुझ्याकडे?"

आईच बोलून झालं. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. त्या चूक होत्या की माहीत नाही पण त्या आपला त्रास सहज बोलून गेल्या होत्या. माणसांच्या स्वभावाची एक विशेषतः आहे. ती अशी की त्याला आपला त्रास आधी दिसतो मग समोरच्याला त्याच गोष्टीचा किती त्रास होतोय किंवा झालाय हे लक्षात येत नाही. सेम अन्वयच्या आईसोबत झालं होतं. त्यांना आपल्या त्रासासमोर स्वराचा त्रास कधीच दिसला नाही. त्या म्हणाल्या की तुझा चेहरा तुझा वैरी आहे पण ज्यांचा चेहरा चांगला नाही त्यांनी जगन सोडून द्यायचं असत का त्यांनी हे सांगितलंच नाही आणि कदाचित स्वराला विचारायचा अधिकार सुद्धा नव्हता.

आईच बोलणं होताच स्वरा सरळ बेडरूममध्ये गेली. तीने हळूच दार लावून घेतले आणि अचानक तिच्या डोळ्यात साठलेले अश्रू बाहेर आले फक्त ती मोठ्याने रडत नव्हती. कितीतरी वेळ तिचे अश्रू नदीप्रमाणे वाहत होते आणि स्वरा त्यांना मोकळी वाट करून देत होती. बऱ्याच वेळा रडल्यानंतर स्वरा शांत झाली. समोर अन्वयचा फोटो ठेवून होता. तिने तो हृदयाला कवटाळून धरला आणि भावुक होत म्हणाली," सॉरी अन्वय सर, मी माझ्या स्वार्थासाठी तुमच्या आईच्या नजरेत तुम्हाला चुकीच ठरवलं. तुमच्याही नकळत त्यांच्या मनात किती त्रास भरलेला आहे हे पाहू शकले नाही तेही कदाचित माझ्यामुळे. माझे अश्रू पुसताना, माझ्या चेहऱ्यावर हसू आणताना कदाचित तुम्ही आईचे अश्रू पुसायचे, त्यांच मन जपायचं विसरून गेलात. अन्वय सर तुम्ही लग्नाच्या वेळी विचारलं होत की तू स्वयमशी लग्न का करत नाहीस? तेव्हा ते कदाचित मी समजून घेतलं नाही पण आता त्याचा अर्थ कळतोय. एका आईच मन दुखावून कदाचित मी माझा संसार थाटला आहे हे मी कधीच विसरू शकणार नाही. मला तेव्हाच समजून जायला हवं होतं की एका ऍसिड अटॅक ग्रस्त मुलीच्या आयुष्यात लग्न नावाचा शब्द मुळात नसतोच. लग्न करणारा समजून घेईलही पण लग्न म्हणजे कुटुंब असत आणि त्याविना दोन लोक कधीच आनंदी राहू शकणार नाही हे स्वार्थात विसरलेच. त्यांना मनवुन घेईल ह्या विचारात मी त्यांना प्रत्येक क्षणी त्रास देत आले आहे. मला समजून जायला हवं होतं की ज्या मुली चेहऱ्याने खराब असतात त्यांना सहानुभूती दिली जाऊ शकते पण त्यांना लग्न करायचा अधिकार नसतो आणि असला तरीही त्यांना आवड नसते कारण तिला स्वीकारून जगाने तिच्यावर उपकारच केलेले असतात आणि उपकार कधीच अधिकाराची जागा घेत नाही. मला ह्या समाजाने जिवन जगायचा अधिकार दिला तेच खूप आहे हे समजून जायला हवं होतं मला. समजून जायला हवं होतं. आई बरोबर म्हणतात सर, रोज एकच गोष्ट ऐकुन तुम्हीही कंटाळून गेला असणार फक्त तुम्ही सांगितलं नाही. अन्वय सर खरच सॉरी माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद नाहीसा झाला. आयुष्याची गोड स्वप्न बघायच्या काळात तुम्हाला माझ्यामुळे नको तो त्रास सहन करावा लागतो. तुम्ही बोलत नाहीत म्हणून काय झालं. मला समजायला हवं होतं. आता समजले सर मी. आई म्हणाल्या ना मी उत्तर दिलं तर सोडून जाणार आहेस का त्यांना तेव्हा सांगू शकले नाही पण आता म्हणेन की माझ्यामुळे इतक्या लोकांना त्रास झालेला मी नाही बघू शकणार. नाही बघवणार सर मला. मी पोहोचतेय सर माझ्या निर्णयापर्यंत. कदाचित काहीच दिवसात मी......."

तिने दार लावून घेतलं आणि कितीतरी वेळ तशीच रडत राहिली. ना तिला वेळेची पर्वा होती ना जगाच भान. तिच्यासमोर काही प्रश्न होते आणि जगाच अनभिज्ञ सत्य. मनी एक विचार,"अन्वय सर प्रत्येक वेळी समाजाकडे इग्नोर करून जगता येत नाही. आपण समाजाचा भाग आहोत तेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्यांचा प्रभाव आपल्यावर पडणारच. तेव्हा त्यांना इग्नोर करून नक्की कुठे जायचं? आई बरोबर म्हणते, नाही करू शकत आपण इग्नोर. आपल्याला फरक पडत असो वा नसो पण समाज एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचे मत तितकेच महत्त्वाचे आहेत हे सत्य आहे. इथे चुकलात सर तुम्ही. इथे चुकलात."

आज स्वरा कितीतरी वेळ अन्वयचा फोटो हृदयाशी कवटाळून रडत राहिली. तिला ऑफीसला जायचंही भान नव्हतं. ती तशीच रडत बेडवर पडून राहिली. ना पोटात अन्न होत ना पाणी तरीही तिला त्याने काहीच फरक पडला नव्हता. ती आपलं दुःख फक्त अश्रूद्वारा बाहेर काढत राहिली. आज तिने दिवसभर स्वतःला रूममध्ये बंदिस्त करून ठेवल होत. दुपार पर्यंत तर तिचे अश्रूचे थांबले नव्हते आणि दुपारी तिला कमजोरीने केव्हा झोप लागली तिलाच कळलं नाही.

मेरी मौजुदगी का असर हर किसीं पर पडा है
देखा है वो जला चेहरा सबने पर किसीं ने कोमल मन नही पडा है..

ती सायंकाळची वेळ होती. स्वरा उठली तेव्हा बाहेर अंधार पडायला लागला होता. पोटात अन्नाचा एकही कण न गेल्याने तीच डोकं भयानक दुखत होत त्यामुळे उठताच तिने आधी टॅबलेट घेतली. डोक्यासाठी टॅबलेट नक्कीच घेतली होती पण रडून-रडून तिचे डोळे सुजले आहेत हे तिला जाणवू लागल होत. तेव्हा अशा अवतारात घरी जाणही योग्य नव्हतं. इथेच राहिली असती तर तिला पुन्हा हा एकांत वेदना देऊ बघत होता म्हणून नक्की काय करावं तिला समजत नव्हतं. काही वेळ गेला, तीच डोकं दुखणं आता हळूहळू कमी झालं होत. स्वरा पटकन वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर बसली आणि विचार करू लागली. काही क्षण असेच गेले आणि तिला काहीतरी सुचल. ती तडक तिथून उठली आणि बाजूची बॅग घेऊन तिने बाहेरचा रस्ता पकडला. हॉल मधून जाताना आई-बाबा तिथेच बसून होते पण तीच त्यांच्यावर लक्ष गेलं नव्हतं. ती पटापट निघाली आणि टॅक्सी स्टॅण्डकडे जाऊ लागली. जाताना आईला आज येणार नाही हे कॉल करून सांगायला विसरली नव्हती. आईला कॉल करताच तिने पुन्हा आपला मोबाइल बंद केला आणि क्षणात टॅक्सी स्टॅण्डवर पोहोचली. तिथे समोरच तिला एक टॅक्सी मिळाली. तिने त्याला पत्ता सांगितला आणि ती शांतपणे टॅक्सीमध्ये बसली. टॅक्सी हळूहळू समोर जाऊ लागली तर स्वरा अजूनही आपल्याच विचारात हरवली होती. आज अन्वयला खऱ्या अर्थाने ती मिस करत होती पण तो आज नव्हता आणि तिला ही स्थिती सावरन अगदीच अशक्य झाल होत तरीही स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न ती करत होती. मधातच तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे पण ती पुन्हा पुसून चेहऱ्यावर खोट हसू आणायची. तिचा हा केविलवाणा प्रयत्न सतत सुरू होता पण तिला आज त्यात काही यश मिळत नव्हत. माणसाचा कंट्रोल पॉवर कितीही उत्तम असला तरीही प्रत्येक वेळी भावनांवर कंट्रोल मिळविता येते नाही हे स्वरा मागचे काही दिवस विसरली होती पण आज पुन्हा तिला त्याची जाणीव होऊ लागली.

सायंकाळचे ७ ते ७.१५ ची वेळ झाली होती जेव्हा टॅक्सी एका जागी थांबली. तिने ड्राइवरला पटकन पैसे पे केले आणि अगदी धावत- धावतच ती समोर जाऊ लागली. साधारणता ५ मिनिटे तिला त्या जागी पोहोचायला गेले. ती दारावर पोहोचली आणि पटकन बेल वाजवून तिथेच उभी राहिली. तिची अवस्था नक्की कशी आहे हे कुणीही तिच्या चेहऱ्यावरून वाचून सांगू शकत होत म्हणून तिने आधी स्वतःला स्टेबल केलं. चेहऱ्यावर खोटच पण गोड हसू आलं आणि ती तशीच उभी राहिली. अगदी काही सेकंद झाले. समोरून दार उघडल्या गेलं. ती व्यक्ती आणि स्वरा दोघेही क्षणभर एकमेकांना बघतच होते आणि स्वयमच्या आई म्हणाल्या," स्वरा तुम इस वक्त?"

त्यांनी तिला प्रश्न केला. स्वराने उत्तर तर दिलं नाही पण पुढच्याच क्षणी त्यांना घट्ट मिठी मारली. काही क्षण तरी तिने मिठी सोडली नाही आणि स्वयमच्या आईनेही तिला वेगळं केलं नाही. ते तसेच होते की मागून स्वयमचा आवाज आला," कोण है ममी?"

त्याच्या आवाजाने स्वराने आईची मिठी सोडवली. आता आई मधून वेगळ्या झाल्या. ती आता स्वयमला बघू शकत होती. तिला स्वयम दिसताच, तिने हळुवार पावले टाकत त्यालाही मिठी मारली. स्वयम आणि आई एकमेकांना बघून नजरेनेच हिला काय झालं म्हणून प्रश्न विचारत होते पण त्यांच्याकडेही आज त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यामुळे तिला हसवायला तो बोलून गेला," क्या बात है स्वरा मॅडम? आज सरप्राइज पे सरप्राइज. वैसे जैसे गले मिल रही हो उससे लग रहा है की अन्वयसे लढ कर आयी हो. नही रेहना उसके साथ तो बता दो. मै अबभी तयार हु शादी के लिये. करोगी मुझसे शादी?"

त्याच्या बोलण्याने स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल. तिने हळूच त्याला पाठीवर धपाटा घालत हळुवार स्वरात म्हटले," लढ कर नही आयी हु. बस याद आ रही थि आपकी इसलीये मिलने चली आयी. अन्वय सर गये है लंडन तो सोचा की आपको मिल लेती हु और स्वयम शादी तो जरूर करणी चाहीये तुम्हे लेकिन मुझसे करणे की कोशीष की तो अन्वय सर तुम्हे बहोत मारेंगे. उनके बिवी को कोई उनसे छिन ले तो क्या वो तुम्हे छोडने वाले है?"

स्वराच बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलंच होत की त्याच्या आई मागून जवळ येत म्हणाल्या," तुही समझाना स्वरा इसे. मेरी उमर हो रही है, मुझसे अकेले दिन भर रहा नही जाता. इसलीये शादी करणे को केहती हु तो टाल देता है. अब तुमही बता दो तो शायद समझ जाये वरणा मेरी तो सूनताही नही."

स्वरा काही बोलणार त्याआधीच स्वयम हसत उत्तरला," ममी प्लिज हमे कॉफी बना दिजीए ना. मुझे अभि चाहीये प्लिज."

स्वयमच्या आई तोंडात काहीतरी पुटपुटत किचनमध्ये गेल्या आणि स्वराने हळूच म्हटले," स्वयम ठीक ही तो केह रही है ममी. उनकी छोडो पर क्या तुम्हे जरूरत नही है किसीकी. जो हमेशा तुम्हारा खयाल रखे. तुमसे घंटो बाते करे, तुम्हारी परवाहँ करे, तुम्हे अपणा माने और बेइंतेहा प्यार करे. जिंदगी मे कोई तो चाहीये स्वयम जीससे हम हमारा सुख-दुःख बाट सके. तो क्यू नही करते तुम शादी?"

स्वयम हसतच म्हणाला," स्वरा सच बोलू तो मन नही मानता शादी के लिये. शायद तुम्हारी याद से इतने जलदी बाहर आना मुश्किल है. तुम्हारी जगहँ किसीं और को देणे को मन नही मानता. जब मन ही तयार नही है तो किसींको कैसे अपणाऊ?"

स्वराच्या चेहऱ्यावर आता किंचित हसू पसरल. ती त्याचा हात हातात घेत म्हणाली," स्वयम एक बात बताउ. जब तुम मेरे साथ नही थे ना तब मेरीभी हालत ऐसीही थि पर जब अन्वय सर मेरे जिंदगी मे आये तो धीरे- धिरे मै वो बाते भुलने लगी. जिंदही ऐसीही है स्वयम, जब तक दुसरे किसीं से लगाव नही होता तब तक पुराणी यादे मिटती नही. किसींको जिंदगी मे आने तो दो. तब सब कुछ ठीक होणे लगेगा. अब ये सच है ना की मै किसीं और की हु तो क्या तुम्हे जिंदगी मे आगे बढने का हक नही है? स्वयम वैसे ये जिंदगी सिर्फ तुम्हारी नही है, ममी की भी है..जैसे तुम अकेले हो ना वैसे वो भी है. उन्हे भी साथ चाहीये, उनके प्रति क्या तुम्हारा कोई फर्ज नही बनता? पापा गये उसके बाद लगा ना तुम्हे उनसे बात करणी चाहीये थि पर अब वो हो नही सकता. ममी के साथ भी ऐसा हु तो क्या करोगे?"

ते बोलतच होते की त्याच्या आई बाहेर आल्या आणि स्वरा बोलायच थांबली. त्याच्या आईने दोघांच्याही हातात कॉफी दिली आणि स्वरा सोफ्यावर बसत म्हणाली," नही सुनी ना इसने तुम्हारी बात? लगाही मुझे. ये नही सूनता किसीं की बात. अपणे मनकीही करता है हमेशा.."

आईचा चेहरा पडला आणि स्वरा म्हणाली," तो क्या हुआ? आप मुझे कॉल करके बुला लिजीए? मै आ जाऊंगी. आपको एकेलपनसे परहेज है ना तो इसका डिसीजन बदलता नही तब तक मै हु. आपकी बेटी. उसे दिजीए अपणा वक्त. जीस दिन समझेगा ऊस दिन खुद आपसे बात कर लगा अब आप उसे फोर्स मत किजीए.."

स्वयमच्या आई हसतच म्हणाल्या," बडी आयी आ जाऊंगी!! क्या हमे पता नही की शादी के बाद किसीं और को मिलणे के लिये कितना वक्त मिलता है. तेरा भी हाल कुछ ऐसाही होगा. घर, ऑफिस करते करते थक जाती होगी. वैसे मुझे बता तो क्या अबभी सास गुस्सा है तुझ पे? तुझसे बात करती है ना?"

त्यांचा प्रश्न येताच स्वराचा चेहरा पडला. नजर खाली झाली पण त्यांना समजून येऊ नये म्हणून पुढच्याच क्षणी मोठ्याने हसत म्हणाली," वो पुराणी बाते है. अब तो उनको मेरे बिन चैन नही पडता. आज ही कितनी तारीफ कर रही थि मेरी. मै उनकी लाडली बन गयी हु इसिलीये तो अन्वय यहा न होते हुये भी मुझे घरसे बाहर रेहने की इजाजत मिल गयी. वो कितना प्यार करती है मुझसे ये मै आपको बता भी नही सकती."

ती एकाच श्वासात सर्व बोलून गेली तर ते ऐकत होते. स्वराचा अजूनही हसण्याचा आवाज मोठाच होता म्हणून त्यांनीही मिश्किल हसत तिला साथ दिली.

स्वरा काही वेळ वेड्यासारखी मोठ्याने हसत होती तर ते तिला बघत होते. बहुतेक ती आपली दुःख हसण्यातून व्यक्त करत होती त्यामुळे तिला भान नव्हतं पण पुढच्याच क्षणी तिला जाणवू लागल की ते आपल्याला विचित्र नजरेने बघत आहेत म्हणून स्वराने हसन बंद केलं तरीही त्यांची ती नजर तिला त्रास देत होतीच. त्यांच्या नजरेत काही प्रश्न होते हे तिला जाणवत होतं म्हणून स्वराने विषय वळवीत म्हटले," आंटी सॉरी आपको तकलीफ दे रही हु पर क्या आप जलदी खाना बना सकती है. मुझे बहोत जोरो से भूक लगी है."

तिचा केविलवाणा आणि सत्य बोलणारा चेहरा बघून त्या दोघांनाही काहितरी बिनसलं आहे हे कळलं होतं पण कुणीच तिला प्रश्न विचारला नाही. उलट स्वयमच्या आई म्हणाल्या," ऊसमे कैसी तकलीफ. अभि बनाती हु. तुम बाते करो तब तक मै बना कर ले आती हु. लो ये गयी और ये आयी."

त्यांच्या दोघांच्याही हातातले कॉफीचे कप त्यांनी घेतले आणि सरळ किचनला गेल्या पण इकडे स्वयम तिला आताही विचित्र नजरेने बघत होता हे तिला जाणवू लागल. तिला त्याच्या नजरेला उत्तर देणे खूप कठीण जात होते म्हणून तीही लगेच किचनला गेली. किचनला जातानाही तिने त्याच्याकडे वळून बघितले. तो अजूनही तिलाच बघत होता. तिला समजलं की स्वयमलाही आपल्या मनातील समजत तेव्हा तो माझ्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून स्वरा जी किचनला गेली ती नंतर बाहेर आलीच नाही.

स्वरा आज त्याच्या आईला थोडं फार काम करू लागत होती पण तिच्या बोलण्यात, काम करण्यात नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता. कदाचित अजूनही तिच्या डोक्यात स्वयमची ती नजर तशीच जागी होती म्हणून ती आईशी फार काही बोलत नव्हती. तशी स्वरा त्यांच्यासमोर बोलायला घाबरत नसे पण आज तिला नक्की काय झालंय हे आईलाही समजत नव्हतं. त्याही तिच्या मनातलं समजून घेण्याचा वेध घेऊ लागल्या. इकडे स्वयमच्या नजरेतून तिची सुटका झाली होती पण आता आईच्या नजरेत ती सापडली आणि तिथेही तिला स्वतःची नजर खाली करूनच काम करावं लागतं होत. ती काम करताना मधातच आईकडे नजर टाकत असे आणि पुन्हा घाबरून काम करण्यात मन लावत होती. स्वराच आज स्वतःशीच युद्ध सुरू होत आणि काहीही केल्या ती त्यातून बाहेर पडू शकत नव्हती कारण एकच होत, तिला सतत हसवणारा आज कुठेतरी हरवला होता.

रात्री १० च्या आसपासची वेळ होती. त्यांचं जेवन आटोपलं आणि स्वरा बेडवर येऊन पडली. खर तर आज तिला स्वयमसोबत बोलायच होत पण तो आज तिला तिच्या मनातलं विचारेल म्हणून ती त्याच्या रूमला गेलीच नाही. स्वरा निवांत बेडवर पडलीच होती की स्वयमच्या आई बेडवर आल्या. त्यांनी पाठ बेडला टेकवलीच होती की स्वरा त्यांच्या कुशीत विराजमान झाली. त्याची आईही तिला प्रेमाने कुरवाळत होती. अगदी १०- १५ मिनिट तिथे शांतता होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. स्वयमची आई कदाचित तिच्या मनाचा वेध घेत होती म्हणून शांत बसली होती पण तिचा उदास, शांत चेहरा बघून त्यांनी तिला विचारलं," स्वरा क्या सच मे तुम्हे तुम्हारी सांस ने अपना लिया है? झूठ मत बोल. तेरी झुठी हसी को मै अच्छेसे पहचान लेती हु. तेरा चेहरा, तेरी नजर सब मुझसे बाते कर रही है बस स्वयम के सामने बोल नही पायी. बता ना स्वरा क्या हुआ? तू इतनी सेहमी सेहमी क्यू है? मुझसे भी छुपायेगी अब सब?"

स्वरा नम्र आवाजात त्यांचा हात हातात घेत म्हणाली," नही अपनाया शायद जिंदगीभर नही अपणायेगी. उन्हे मेरे चेहरे के वजहसे लोग ताने मारते रेहते है, उन्हे हर पल मेरे वजह से तकलीफ होती है इसलीये वो चाहती है की मै उनके घर से निकल जाऊ. उनहोणें मुझे आज बताया की मेरी वजह से उन्हे कितना झेलना पड रहा है. मेरी वजह से उनकी जिंदगी, खुशीया सब छिन गयी है. आज वो बोलती जा रही थि और मै सूनती गयी. आज तक मुझे लोगो की बातो से फरक नही पडा पर मेरे वजह से किसींको तकलीफ हो ये मुझे भी मंजूर नही. इसलीये जब से उनकी बाते सुनी है बस आंखो से आसू बह रहे है. घर जाती तो माँ हजारो सवाल करती, मेरी ऐसी हालत देखकर शायद वो तूट जाती इसलीये इधर चली आयी. मेरे वजह से उनकी जिंदगी नरक बन गयी है ये सोचकर ही खुद से घीन आ रही है. मै उनकी जिंदगी मे नही होती तो उनका हराभरा परिवार आनंद से रेहता. मेरे वजहसेही सब हो रहा है इसलीये सोच रही हु…"

ती बोलतच होती की बाहेर उभा राहून सर्व ऐकत असलेला स्वयम मध्ये येत म्हणाला," सॉरी सॉरी मैने चुपकेसे सब सून लिया. मुझे भी तुम आयी तबसे लग रहा था की कुछ तो प्रॉब्लेम है इसलीये तुमसे पुछने आया था और पुछने से पेहलेही मुझे सब पता चल गया."

तो एका श्वासात बोलून गेला तर स्वराने काहीच रिऍक्ट केलं नाही. ती त्याच्याकडे एकटक बघत होती आणि स्वयम हसतच म्हणाला," सॉरी टू डिस्टर्ब यु पर तुम जो केहणे जा रही हो उससे पेहले मुझे कुछ केहना है. अगर इजाजत हो तो कहू?"

स्वराने पापण्या हलवत होकार कळविला आणि तो शांत स्वरात म्हणाला," स्वरा तुम गलती करणे हा रही हो, जो मैने कभी करी थि. मै अगर हिम्मत करता तो शायद पापा कुछ दिन नाराज होते लेकिन तुम और पापा दोनो मेरी जिंदगी मे होते. स्वरा अन्वय की ममी को या किसीं और को इतना महत्त्व मत दो. अगर सोचना है तो अन्वयके बारे मे सोचो. पिछले कुछ दिनोसे मै सिर्फ उसके बारे मे सोच रहा हु और सच मानो उसे बिना मिलेही उसके लिये मेरी इज्जत बढ गयी. वो कैसे? स्वरा, आज की दुनिया मे ना प्यार बहोत लोग कर लेते है पर जब शादी की बात आती है तो उन्हे घरवाले याद आते है, जाती धर्म याद आते है. वहा लडकी सुंदर हो तो भी उसे अपणाने से घबरा जाते है. मा- पापा नही मानेंगे ये बात सोचकरही वो अपणे प्यार को भुल जाते है पर अन्वय को पेहले से पता था की ऐसा होणे वाला है फिर भी उसने तुम्हारा साथ नही छोडा. तुमने मुझे उसके बारे मे जितना बताया है उससे ये केह सकता हु की अन्वय तुम्हे किसीं भी हालत मे कमजोर पडणे नही देगा. वो तुम्हे कभी हारने नही देगा, वो दुनियासे लढ रहा है वो भी सिर्फ तुम्हारे लिये इसलीये किसीं और के लिये उसे मत छोडणा. सच मे स्वरा मैने जो गलती की है वो तुम मत करो और सच बोलू तो मै जीस स्वरा को जाणता हु वो इतने जलदी हार नही मानती. साथ मे अन्वय हो तो क्या डरणा? मुझे पुरा भरोसा है तुम दोनो के प्यार पर की तुम दुनिया जित जाओगे. क्या तुम्हे अन्वय के प्यार पर भरोसा नही है?"

स्वयम पटापट बोलून तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. तिच्या चेंहँऱ्यावरून काहीच समजत नव्हतं आणि त्याच्या आई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या," सही केह रहा है स्वयम, हमे पुरा भरोसा है तुम्हारे प्यार पे, तुम पे. इतने जलदी हार मत मानो. अन्वय अगर तुम्हारे लिये अपणे घर वालो से लढ रहा है तो क्या तुम उसे और साथ नही दे सकती? वो हार गया स्वरा तो शायद जिंदगी भर खुद को माफ नही कर पायेगा ये सोचकर की वो तुम्हे हक नही दिला सका. बदल जायेंगे ये दिन भी स्वरा और मेरी बेटी लढ कर अपणा हक हासिल कर लेगी इस बात पे हमे पुरा भरोसा है. अगर नही हुआ तो ये फैसला तो तुम ऊस वक्त भी ले सकती हो. तब हमभी साथ होगे तुम्हारे पर इस वक्त ये सही नही है स्वरा. अन्वयके प्यार के लिये लढ ज बेटा. क्यूकी ऐसा प्यार दुबारा नही मिलता."

स्वराने अगदी पुढच्याच क्षणी एक हात स्वयमचा आणि एक हात आईचा हातात घेतला आणि हळूच त्यावर किस करत म्हणाली," थॅंक्यु!! दिलं का बोझ थोडा कम हुवा है. मै नही केह सकती माँ की आगे क्या होगा पर ऊनका दिलं जितने का पुरा प्रयास करूंगी. आय प्रॉमिस."

तीच उत्तर ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरल होत आणि समाधानही तेवढ्यात स्वयम म्हणाला," तुम सही केहती हो स्वरा कभी कभी खुदके स्वार्थ मे हम अंधे हो जाते है इसलीये दुसरो का दुःख नही देख पाते. तुमने सही कहा की मैने अपणे खयाल मे डुबे रेहते माँ को तकलीफ दि है इसलीये मम्मी आजसे आप मेरे लिये लडकी धुंड सकती हो. आपकी खुशी मेही मेरी खुशी है."

त्याच्या आई मोठ्याने ओरडत म्हणाल्या," क्या बात है मेरे लाल. तुणे दिलं खुश कर दिया. मै कल सेही धुंडने लग जाती हु."

आज तिघांच्याही चेहऱ्यावर हसू होत..त्यांच्यात त्यांनतर बऱ्याच वेळ गप्पा चालल्या आणि स्वयम झोपायला गेला तर स्वरा आईच्या कुशीत झोपली होती. स्वयमच्या लग्णांच्या बातमीने तिला खूप आनंद झाला होता. तो आपल्याबद्दल इतकी काळजी करतो ह्याचा तिला आनंद झाला होता पण त्याचे शेवटचे शब्द " कभी कभी हम अपणे स्वार्थ मे इतना अंधा हो जाते है की दुसरो का दुःख नही देख पाते." हे तेच शब्द होते ज्यांनी स्वराला दिवसभर त्रास दिला होता आणि शेवटी तेच शब्द तिच्या डोक्यात घर करून तसेच राहिले. ती थोडी सकारात्मक झाली होती पण हे शब्द जसेच्या तसे तिच्या मनात घर करून होते. झोप कदाचित आजही येणार नव्हती कारण ती आपल्याच मनाला आज विचारत होती," मी माझ्या आनंदासाठी, स्वार्थासाठी त्यांचं आयुष्य नकळत दुःखात लोटल ते खरच योग्य आहे का? चेहऱ्याने खराब असणाऱ्या माझ्यासारख्या मुलींना खरच लग्न करायचं अधिकार आहे का? बायको बनायचा अधिकार असला तरीही एक सून, वहिनी, बनून त्यांच्यात क्लेश निर्माण करायचा मला अधिकार आहे का आणि सर्वात शेवटचा प्रश्न, स्वतःच प्रेम मिळवुन आनंदी असताना त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद हिरावून काहीही न झाल्यासारख वागण्याचा मला अधिकार आहे का?"

प्रश्न हजार होते आणि त्याच उत्तर एकच असणार होत. कदाचित त स्वरालाही माहिती होत. ती क्षणभर ते विसरली होती पण पुढे हाच प्रश्न तिच्या भाग्याची कहाणी लिहिणार होता.

जी लु जिंदगी अपणे मुताबिक
मुझे किसका डर है
पर जितें जितें दुसरो को दुखाउ
ये किस तरहँ का प्यार है??


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED