भाग्य दिले तू मला - भाग ९७ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ९७


रेह जाते है कदमोके निशाण
युही अकेली राहो पर
लोग बदलते रेह जायेंगे
पर जो ना बदले वो हम है...

ती सकाळची वेळ होती. स्वरा बाहेर जाऊन बसली तर अन्वय फाइल घेऊन मध्ये आला होता. आई जरा निवांत टेकून होती. ती कसल्यातरी विचारात हरवली होती की अन्वय फाइलकडे बघत म्हणाला," मातोश्री गुड न्युज, सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. इनर इंजरी नाहीत काहीच पण वरचे घाव भरायला ३-४ महिने जातील आणि जमलं तर डॉक्टर आज सुट्टी पण देतील तुम्हाला. सो आता तुमची काळजी जाईल."

अन्वय फाइलमध्ये बघून बोलत होता तर आईने त्याच्याकडे कानाडोळा केला. त्याला जाणवलं की आई आपल्याशी बोलत नाहीये म्हणून त्याने फाइल बाजूला केली आणि हसतच उत्तरली," ओ.. अजून राग गेला नाही वाटत. काल पण निहूशीच बोलत होती आणि आज पण माझ्याशी बोलत नाही आहेस. मातोश्री आई मुलावर रागावली तर चालत पण मुलाने एकदा आईवर राग काढला की मग मात्र मातोश्री दुखावल्या जातात. जास्त विचित्र वाटत नाहीये का?? बहुतेक चूक झाल्यावर बोलण्याचा अधिकार फक्त आईलाच आहे, मुलांना नाहीच म्हणून माझ्याशी बोलत नाही आहेस. हरकत नाही, चूक झाली माझी. रागात जास्तच बोलून गेलो, जास्त दुखावल्या असणार तर सॉरी आणि बोलायच नसेल तरीही हरकत नाही पण स्वतःला त्रास करून घेऊ नका बस एवढीच विनंती आहे. आधीच त्रास होतोय तुला खूप त्यात माझ्यामुळे नको करून घेऊस आणखी."

अन्वय एकटाच बोलत होता. आई काहीच प्रतिसाद देत नव्हती म्हणून अन्वय किंचित हसत उत्तरला," बहुतेक तुम्हाला मी इथे आलेलं आवडलं नाही. सॉरी हा उगाच तुमचा त्रास वाढवतो आहे त्यासाठी पण काय करू सध्या तुमचं म्हणणार आज कुणीच नाही. ना जगातले ते लोक जे तुम्हाला सतत ऐकवत होते ना तुमचे नातेवाईक जे तुम्हाला काळजीने विचारत होते. आता मी आणि माझी क्रूर बायको दोघेच आहोत इथे. थोडया वेळ चालवून घ्या, तुमची लाडकी मुलगी किंवा बाबा आले की देतो पाठवून मग त्रास होणार नाही तुम्हाला."

अन्वय हसत हसत बोलून गेला. त्याने ह्यावेळी आईकडे बघितलेदेखील नाही. तो बाहेर जाणारच की आई हळुवार आवाजात म्हणाल्या," अन्वय माझा चेहरा खूप खराब दिसतोय का? निहूच्या सासूबाई म्हणत होत्या तेव्हा आवाज आला मला. खरंच मला बघन इतकं अवघड जातंय तुम्हाला?"

आईचा आवाज ऐकू येताच अन्वय जाग्यावरच थांबला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होत. तो क्षणात आईकडे वळाला. आई त्याच्याकडे एकटक बघत होती तर अन्वयच्या चेहऱ्यावर आताही तेच हसू कायम होत. तो हसतोय हे बघून अन्वयच्या आईने नजर खाली केली आणि अन्वय हळुवार म्हणाला," ह्याच उत्तर द्यायला आपल्याकडे एक उत्तम व्यक्ती आहे. तुम्ही थांबा मी येतो तिला घेऊन. कदाचित माझ्यापेक्षा ह्याच सुंदर उत्तर तीच देऊ शकते, एका तीच उत्तर आणि मग ठरवा काय ते.."

आई नजर वर करणार त्याआधीच अन्वय बाहेर पळाला आणि क्षणात स्वराचा हात पकडून मध्ये घेऊन आला. स्वराला त्याच नक्की काय सुरू आहे समजत नव्हतं म्हणून ती विचित्र नजरेने दोघांकडे बघत होती. आई अजूनही समोरच बघत होती तर अन्वयने हसतच म्हटले," स्वरा आई विचारतेय त्यांचा चेहरा खूप विद्रुप दिसतोय का? त्यांनी मला विचारलं पण मी तुला सांगतोय ह्याच उत्तर दे कारण मला वाटत ह्याच उत्तर तुझ्यापेक्षा कुणीच नीट देऊ शकत नाही. तू एकमेव आहेस जे हे स्वता अनुभवलं आहेस तेव्हा तूच ह्याच उत्तर देऊ शकतेस. आम्ही देऊ पण आईला फक्त बर वाटावं म्हणून आणि ते योग्य होणार नाही कारण तिला पुन्हा काही महिने हे सहन करायचं आहे सो दे तिला उत्तर आणि मुक्त कर ह्या प्रश्नातून.."

अन्वय शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे बघत होता तर स्वराने क्षणभर त्याच्यावर नजर टाकली. त्याच्या नजरेत तिला विश्वास दिसत होता म्हणून ती बोलून गेली," आई सुंदरता चेहऱ्यात नसते ती कायम नजरेत असते. मान्य की आज तुमचा चेहरा खराब झाला आहे असे लोक म्हणतात पण चेहरा शाश्वत नाहीच, तो तरुणपणी, म्हातारपणी बदलत राहणारच. मग जो चेहराच एक राहू शकत नाही, त्याच्या खराब होण्याने इतका विचार का करायचा. खर तर तुमचा चेहरा खराब झाला नाहीये लोकांची मानसिकता खराब झालीय. ते तुम्हाला तस बघत आहेत म्हणून तुम्ही त्यांना तस दिसत आहात. अन्वय सरांच्या नजरेत तर तुम्ही आधी होतात तशाच दिसत आहात मला आताही. तुमचा चेहरा क्षणिक खराब झालाय तो काही महिन्यात नक्की चांगला होईल पण मला जितका विश्वास आहे त्यावरून सांगते की जर आयुष्यभर जरी असा चेहरा राहिला तरी तुमच्या मुलाला त्याने फरक पडणार नाही कारण मी आता जे शब्द बोलले आहे ते सर्व मला त्यांनीच म्हटले होते आणि त्या दिवसापासून मी लोकांची बोलणी, विचार बाजूला सारले. सोपा उपाय होता हा फक्त मला समजायला जरा उशीर लागला. मी म्हणेन की अन्वय सर असताना तुम्हाला कशाचीच चिंता करावी लागणार नाही. जशा माझ्या आईसाठी मी कितीही विद्रुप दिसत असले तरीही तिची राजकुमारी आहे तसच आज तुमच बहिरंग कसंही दिसत असल तरीही तुम्ही अन्वय सर, निहारिका ताई ह्यांच्यासाठी त्याच आई असणार ह्याचा पूर्ण विश्वास आहे आणि बाकीच्या जगाबद्दल म्हणाल तर ते जे तुमच्या वाईट क्षणात साथ देऊ शकत नाहीत ते तुमचे नाहीच मग त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या विचाराने तुम्हाला फरक सुद्धा पडायला नको. विचार करायचा असेल, कुणाच्या नजरेत बघायच असेल तर आपल्या मुलांच्या बघा कदाचित तुम्हाला तुमच्यापेक्षा सुंदर दुसर कुणीच वाटणार नाही. फक्त तुम्हाला बर वाटावं म्हणून बोलत नाहीये तर माझी प्रत्येक सकाळ त्यांच्या नजरेत माझी सुंदरता बघूनच होते. तुम्ही आहात सुंदर मग कुणी काहीही म्हणू दे फक्त ते तुम्हाला स्वीकारावं लागेल, जगाला जे म्हणायचं ते म्हणू द्या, जग कंटाळल की स्वतःच शांत होऊन जाईल. त्यांना अटेंशन दिलं नाही की बसतात ते शांत."

स्वरा बोलून शांत झाली तर अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणात गोड हसू पसरल. ते दोघेही पुढच्याच क्षणी आईच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधू लागले पण त्या शुण्यात हरवल्या होत्या. त्या काहीच बोलत नाहीत म्हणून स्वरा बाहेर जाऊ लागली तेवढ्यात अन्वयने तिचा हात पकडला आणि ती तिथेच थांबली. अन्वयने तिचा हात पकडत आईकडे नेले आणि तिला बाजूला बसवत म्हणाला," आई आज हॉस्पिटलमधून तुला सुट्टी होणार आहे पण कदाचित तुला २-३ महिने बेडवरून उठायला त्रास होईल सो आपल्याला एक नर्स ठेवावी लागेल. तुला स्वराच्या हातच जेवायला आवडत नाही तर पूर्ण वेळ एक कामवाली ठेवावी लागेल. माहिती आहे तुला आवडत नाही कुणाच्या हातच पण मॅनेज करावं लागेल, तुला चालेल ना?"

अन्वय आईकडे बघत होता. आई आताही काहीच बोलल्या नव्हत्या आणि अन्वयने हळुवार म्हटले," दुसरा देखील एक पर्याय आहे. हे सर्व काम स्वरा एकटी करू शकते. स्वरा तुला चालेल का?"

स्वरा क्षणाचाही वेळ न घेता उत्तरली," मला आवडेल करायला. तस पण आई जर तुम्हाला माझ्याकडून प्रॉब्लेम असेल काम करायला तर अस समजा की मी तुमची नर्स आहे. हवं असल्यास तुम्ही मला पैसे पे करू शकता म्हणजे तुम्हाला कुणाकडून फुकट काम करवून घ्यावे लागणार नाही आणि तुम्हाला मला सून म्हणवून घेण्याचीही गरज पडणार नाही. मला खरच अधिकार नकोत, पण तुम्ही बरे झालात तर माझ्या मनाला नक्की समाधान मिळेल कारण कुठेतरी तुमच्या ह्या स्थितीची जबाबदार मीच आहे."

स्वरा बोलून गेली आणि अन्वय पटकन हसला. दोघानाही समजत नव्हतं की तो नक्की का हसतो आहे म्हणून स्वराने त्याच्याकडे बघत विचारले," तुम्ही का हसत आहात सर?"

तिने प्रश्न विचारला होता तरीही अन्वय काही क्षण हसतच होता. काही क्षणाने त्याने स्वतःचे हसणे आवरत म्हटले," बघ विचार करून घे आताच ह्या निर्णयावर. आई आधीच टोमने मारायला मागे पुढे बघत नाही तेव्हा बरी झाल्यावर म्हणेल की माझ्या आजार काळातदेखील तिने पैसेच निवडले आणि माझा मुलगा म्हणतो की माझी बायको सर्वांची काळजी घेते. तिला तर आताही पैसेच हवेत हे कसं कळत नाही बर माझ्या मुलाला?"

अन्वय एकटाच हसत होता. बाकी दोघेही शांतपणे त्याच्याकडे बघत होत्या. त्याला जाणवलं की आपण उगाच वेड्यासारखे हसत आहोत म्हणून त्याने हसणे थांबवले. काही क्षण त्याने आईवर नजर टाकली आणि म्हणाला," बहुतेक नर्सच बघावी लागेल. चला मी घेतो शोध. स्वरा आईला आराम करू दे चल येऊ नंतर."

अन्वय स्वराचा हात पकडत बाहेर घेऊन जाऊ लागला तेव्हाच आई म्हणाली," दुसरी बाई आली तर घर अस्ताव्यस्त होईल शिवाय चोरीची भीती असेल तेव्हा तुझी बायको परवडेल. सांग तिला सॅलरी देते म्हणावं हवी तेवढी पण हे काही महिने घर मॅनेज कर. मला नाहीये हे काही महिने तिचा प्रॉब्लेम पण मी चांगली झाल्यावर मीच करेन सर्व सांगून दे तुझ्या बायकोला."

अन्वय-स्वराची नजर आईच्या विरुद्ध बाजूला होती पण त्याचं उत्तर ऐकताच दोघांच्याही चेहऱ्यावर निरागस हसू पसरले. त्यांनी आईकडे बघितले तर नव्हते पण आज नकळत त्यांच्या मनात काय सुरू आहे ह्याच उत्तर दोघांनाही मिळालं होतं. ते काहीही न बोलता बाहेर निघाले पण खूप दिवसाने एक आशा त्यांच्या मनात जागी झाली होती.

आईने होकार दिला आणि स्वराने पूर्ण चार्ज स्वतःच्या हातात घेतला. अगदी आईचे औषध देण्यापासून तर जेवण भरवण्यापर्यंत सर्व तीच करत होती. आईला साधं वॉशरूमला जायचं असेल तरीही स्वरा तिथे उपलब्ध असायची. आईचे घाव साफ करताना स्वराच्या चेहऱ्यावर घृणा नव्हती की त्यांच्या चेहऱ्याकडे बघताना तिला कसली भीती वाटत नव्हती. आई स्वराशी काही बोलत नव्हत्या पण त्या आज पहिल्यांदा तिच्या निरागस चेहऱ्याकडे, तिच्या नजरेत बघू लागल्या आणि कदाचित त्यांना हवं असलेलं उत्तर त्यांना सापडू लागल. आईला आता साधं वॉशरूमला जायला तिची साथ घ्यावी लागत होती पण तिने दिवसात एकदाही त्याचा कंटाळा केला नाही उलट आईचा शब्द येण्याआधीच स्वराला त्यांना काय हवं समजत होत. कदाचित स्वरा म्हणाली तेच योग्य होत, आपल्या माणसांना बोलायची गरज नसते ते आपोआप समजून घेतात. स्वराने त्यांना कायमच आपलं मानलं होत त्यामुळे तिला त्यांना समजून घेणे अगदीच कठीण गेले नव्हते. कुणी स्वराला आपलं मानलं नसलं तरीही स्वराच जग त्यांच्याशिवाय पूर्ण होणार नव्हतं आणि म्हणून ती आईची जिवाभावाने सेवा करत होती पण ह्या सर्वात एक गोष्ट होती जी अन्वयला माहिती नव्हती. तिने स्वतःला दिलेलं वचन. आई नीट झाल्यावर ती सर्व सोडून जाण्याच. ते वेळेवर ठरणार होत पण आजपर्यंत अस एकही वचन नव्हतं जे स्वराने पूर्ण केलं नव्हतं आणि ती हे वचन देखील पूर्ण करणार होती. तिला त्याबद्दल माहिती होत तरीही एकदाही तिने अन्वय किंवा कुणाला त्याबद्दल भनक लागू दिली नव्हती. तिला तोडण्यापेक्षा जोडण कायम आवडत होत ह्याच ते एकमेव उदाहरण होत.

खुश हु क्यूकी पेहली बार मुझे मौका मिला है
खुदको भुलाकर मुझे किसी और के लिये जिना है..

*******

सायंकाळची वेळ. आज आईला सुट्टी होणार असल्याने स्वरा आईच सर्व करून दुपारच्या वेळी घरी परतली होती. येताच ती फ्रेश झाली आणि तिने आईची संपूर्ण रूम निट आवरून घेतली. घराची स्थितीही काहीशी नीट नव्हती, घर नीट साफ केलं आणि आईची वाट बघू लागली. आज स्वरा सकाळपासून मशीनसारख काम करत होती तरीही तिला थकवा जाणवलेला नव्हता. स्वराचे सर्व काम आटोपले आणि स्वरा आईच्या येण्याची वाट बघू लागली. बाहेर हलकेच अंधार पडला होता. दिवाळीचे दिवस अजूनही गेले नसल्याने स्वराने पुन्हा एकदा मस्त घर सजवून घेतले होते. बाहेर मस्त रंगीबेरंगी रांगोळी आणि दिवे प्रकाश देत होते जेव्हा कार घरासमोर येऊन थांबली. कार समोर बघताच स्वरा किचनमध्ये धावत गेली. अन्वयने आईला हळुवार पकडत दारावर आणले आणि तेव्हाच स्वरा धावतच, हातात थाळी घेऊन दारावर आली. हातात आरतीची थाळी बघून अन्वयच्या बाबांनी विचारलं," स्वरा हे काय आरती वगैरे, कुठे युद्ध थोडी जिंकून आलीय लता?"

स्वरा गोड हसू ओठांवर आणत उत्तरली," आयुष्यभर त्यांनी युद्धच केलं ह्या घरासाठी. हे घर नक्कीच विटा सिमेंटने बनले आहे पण ह्याला घरपण देण्याचं कार्य आईने केलं आहे. ह्या घराच्या लक्ष्मी पुन्हा एकदा सुखरूप घरात आल्या म्हणून मी त्यांची आरती ओवाळते आहे. घरातील सुख-समृद्धी फक्त आईमुळे टिकून आहे. त्या आल्यात आणि पुन्हा एकदा घर उजळून निघालं. बघा आजूबाजूला. त्यांच्याविना हे जग सुद्धा कोमेजल होत. त्या आल्या आणि पुन्हा एकदा घराला घरपण आलं. ज्या लक्ष्मीने ह्या घरासाठी आपलं पूर्ण आयुष्य दिलं मी त्याच व्यक्तीच्या पुन्हा नवीन पर्वाची कामना करतेय."

स्वरा आईची आरती करू लागली आणि आई नजरेच्या एका कोपऱ्यातून बाजूच वातावरण बघू लागली. स्वराने जणू सर्व अंगण आईसाठी सजवलं होत. चारही बाजूने दिव्यांचा प्रकाश तेजाच काम करत होता. स्वराची आरती करून झाली आणि आई मध्ये जाऊ लागल्या. मध्ये येताच आईला आठवू लागला तो लक्ष्मीपूजनाचा क्षण. तीच जागा होती आणि स्वराला बोलणारी लोक होती. आईची काळजी करणारे लोक होते पण आईला ह्या दोन दिवसात त्यातले पुन्हा कुणीच दिसले नाही. आईला क्षणातच अन्वयचा रडवेला चेहरा दिसू लागला, स्वराने आईकडे आरती देताना तिच्या चेहऱ्यावर असणारे भाव त्या जणू आज अनुभवू लागल्या आणि त्यांना त्यांचंच वाईट वाटू लागलं. त्या विचारातच हरवल्या होत्या की स्वरा त्यांचा हात पकडत म्हणाली," चला आई."

तिचा कोमल हात लागताच आईच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडला फक्त तो कुणाला दिसला नाही. आई स्वराचा आधार घेत बेडरूममध्ये जाऊ लागल्या आणि स्वरा पुन्हा अन्वयला म्हणाली," अन्वय सर तुम्ही बाहेरच थांबा मी आईला अंघोळ घालून देते आणि कपडे चेंज करायला लावते."

अन्वय, अन्वयचे बाबा बाहेर थांबले तर स्वरा त्यांना मध्ये घेऊन गेली. क्षणात बेडरूमच दार लावल्या गेलं आणि दोघेही मध्ये पोहोचले.

स्वरा- आई परत बेडरूममध्ये आल्या तेव्हा अर्धा तास उलटून गेला होता. आई जरा आता फ्रेश वाटत होत्या. त्यांनी कपडे चेंज केले आणि स्वरा त्यांना बेडवर झोपवून कुठेतरी बाहेर निघाली. आई आता बेडवर बसल्या आणि इकडे-तिकडे बघू लागल्या. स्वराने त्यांची बेडरूम नीट सजवली होती. त्या इकडे-तिकडे बघतच होत्या की अन्वय मध्ये येत म्हणाला," कस वाटत आहे मातोश्री? त्रास वगैरे तर होत नाहीये ना?"

आई काहीच बोलल्या नाही पण त्यांच्या हसण्यात अन्वयला बरीच उत्तरे मिळाली होती. आज सकाळपासून स्वरा आईच सर्व करत होती. त्या तिच्याशी बोलल्या तर नव्हत्या पण त्यांनी एकदाही तिला उलट सुनावल नव्हतं म्हणून अन्वय खुश होता. आईला नीट बोलता येत नाहीये हे त्याला माहिती होत म्हणून डॉक्टरांनी दिलेले औषध तो बघू लागला तेवढ्यात निहारिका मध्ये येत उत्तरली," काय रे दादा कशी आहे तब्येत? डॉक्टर काय म्हणाले?"

निहारिका अन्वयकडे बघत होती. तो उत्तर देणारच की आई अडखळत म्हणाल्या," निहारिका ह्यावेळी कशाला आलीस? आलीस तर आलीस पण लेकीला का घेऊन आलीस? घाबरणार ना तुझी लेक माझी अवस्था बघुन."

निहारिकाचा मूड काहीसा ठीक दिसत नव्हता. तिच्या डोळ्यात राग होता आणि तोच राग ती शब्दात व्यक्त करत उत्तरली," तुझी अशी अवस्था झालीय म्हणून काय आईला सोडून देऊ? माझी अशी अवस्था झाली तर सोडून देशील का मला? आई खर सांगू तर ना तू, हिची आजी फक्त वयाने मोठे झाले आहात. नावाला अनुभवी आहात बाकी तुमच्यात कसलच मोठेपण नाही. खरी अनुभवी व्यक्ती तर माझी वहिनी आहे. जिला स्वतःला काही कमी त्रास नाहीत तरीही ती दुसऱ्याच करत असते. तू बोललीस ना तिला लक्ष्मीपूजनाला तरीही एकदाही तिने तुम्हाला उलट उत्तर दिलं का? असो तुमच्याकडून अपेक्षा तरी कसली करू."

ती रागात पटापट बोलून गेली आणि अन्वयने हसतच विचारले," निहू अचानक काय झालं तुला? इतकी रागात का आहेस??"

निहारिका पुन्हा रागातच उत्तरली," कारण हिच्या आजीला चांगलंच सुनावुन आले मी. मी म्हटलं की उद्या तुमच्यासोबत अस काही झालं ना तर आयुष्यभर तुमच्या नातीशी भेटू देणार नाही. हॉस्पिटलमध्ये जेवढं माझ्या आईला ऐकवलं ना त्यांनी तेवढं त्यांना परत करून आले. परत नाही बोलणार काहीच आणि फक्त त्यांना नाही तर माझ्या आईलाही सूनवायला आलेच आहे मी. ही आजारी आहे म्हणजे हिला कुणी सांगायचं नाही अस तर नाही ना. आई तू म्हणतेस ना माझ्या मुलीला त्रास होईल तुला बघून. तर मी एक प्रश्न विचारते तुला. उद्या जर माझ्यासोबत असा अपघात झाला तर काय आई अशी आहे म्हणून टाकून देईल का मला ही? अजिबात नाही, मी तिला असे संस्कार देईल की ती मला बघून कधीच घाबरणार नाही उलट मी माझ्या लेकिला स्वरा वहिणीसारखं खंबीर बनवेन. उद्या कुणावर कशी परिस्थिती येईल कुणाला माहिती नाही पण जर ती स्वरा वहिनी सारखी बनली ना तर ती कधीच आयुष्यात हार माननार नाही. दादा मी तुला कधी बोलले नाही पण आज म्हणते की ह्या घराला फक्त स्वरा सारखीच सून शोभते आणि ज्यांना ती सुंदर वाटत नाही ना त्यांच्या नजरा खराब झाल्या आहेत. खूप आदर आहे मला तुझ्या निवडीच्या आणि दादा हक्काने सांगेन ह्यांनी जर तिला स्वीकारलं नाही ना तर तिला अजिबात सोडू नकोस. ज्या लोकांना ती मान्य नाही त्याना सोड कारण ज्यांना हिऱ्याची किंमत नाही त्यांच इतकं काय मनाला लावायच."

निहारिका आज सतत बोलत होती तर आई,बाबा अन्वय सर्व ऐकत होते. पुढच्याच क्षणी निहारिकाने आपल्या मुलीला आईच्या हातात देत म्हटले," भीती वाटली तर वाटू दे पण सवय व्हायला हवी तिला. तशी पण ती निडर आहे सो नाही घाबरणार बघत राहा."

आईने सृष्टीला हातात घेतले आणि आई तिच्यावर नजर टाकू लागली. सृष्टी आईच्या जखमावरून हात फिरवत होती पण तिच्या नजरेत कुठलीच भीती नव्हती. ती उलट आपल्या आजीला बघून खुश जाणवत होती. तिने हळूच आजीच्या दुसऱ्या गालावर किस्सी दिली आणि पुन्हा निहारिका म्हणाली," बघितलं तुमच्या पेक्षा माझी मुलगी हुशार आहे. तिला खरी सुंदरता कळते नाही तर तुम्ही बसलात जगाची चिंता करत पण मातोश्री मला एक सांगा ते जग कुठे आहे हो ज्यांची तुम्हाला इतकी पर्वा होती, मला तर ते कुठेच दिसत नाही आहेत. मग मला एक उत्तर द्या की तुम्ही कोणत्या जगासाठी वहिनीचा सतत तिरस्कार करत होतात? तिला सतत बोलत होतात? आज आपल्यावर वेळ आली असताना, स्वतःबद्दल कुरूप शब्द ऐकताना किती त्रास झाला ना तुला, वहिनीने कितीवर्षं हे सहन केलंय मग तिला कस वाटत असणार? आई तू सतत मला किती त्रास होतो हे ऐकवत आली आहेस मग आज मला सांग की तुझं दुःख मोठं आहे की वहिनीच? आजच्या काळात चांगल्या चांगल्या मुली कारण शोधत असतात आपल्या नवऱ्या सोबत वेगळं राहायला पण तुझी सूनच आहे जिने इतकं ऐकलं तरीही त्याला वेगळं होऊ दिल नाही. तिच्या जागी मीही असते ना आई तरीही तुझा स्वभाव बघून सोडून गेले असते पण वहिनी आहे म्हणून नाही गेली. असो मी पण काय दगडावर डोकं आपटत आहे म्हणा."

आज घरात केवळ निहारिका बोलत होती तर बाकी सर्व ऐकत होते. आईला तर एक शब्द बोलता येत नव्हता. पहिल्यांदा अन्वयही शांत होता. निहारिका रागात राग बोलून गेली आणि कितीतरी वेळेपासून लपवुन ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यात उभे झाले. तिच्या डोळ्यात अश्रू येताच निहारिकाने अन्वयला घट्ट मिठी मारत म्हटले," दादा वहिनी ह्या जगाला नाही तर वहिनीला हे जग सूट करत नाही तेव्हा तू तिला दूर कुठेतरी घेऊन जा. खूप त्रास देत रे तिला हे जग. त्या आईला काय वाटत असेल ज्यांना माहिती आहे की रोज आपल्या मुलीला कुणाच्या तरी कर्माची शिक्षा भोगावी लागते. काय स्थिती असेल ना त्या आईची आणि किती मोठ मन असेल त्या मुलीच जिला त्रास होणार हे माहिती असतानाही तिने एका घराला आपलं बनविल. तिरस्कार सहन केला तरीही तिने घर तुटू दिलं नाही. मी आजपर्यंत फक्त ऐकत आले होते की त्यांची स्थिती चांगली नसते पण माझ्याच घरी हे सर्व बघून किती वाईट वाटत हे मला आज जाणवत आहे. दादा तिला नको होऊ देऊ आणखी त्रास प्लिज घेऊन जा दूर कुठेतरी. अस प्रेम निभावं की जगाला त्या प्रेमाचा हेवा वाटायला हवा. काल सासूबाईंने माझ्या आईला माझ्या समोर ऐकवलं तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की तिने किती आणि काय सहन केल असेल तेव्हा दादा प्लिज घेऊन जा. ती गेल्याशिवाय ना ह्यांना तिची कमी समजणार नाही. प्लिज ऐकशील ना दादा माझं बोलणं?"

निहारिका त्याच्या मिठीत बसून रडत होती तर अन्वय तिला सांभाळत होता. ज्या वेदना स्वराने कधीतरी अनुभवल्या होत्या त्याच वेदना पुन्हा एका मुलीला समजत आहे हे बघून अन्वयला आनंद झाला होता कारण प्रत्येक वेळी ती गोष्ट समजून घ्यायला अनुभवणे गरजेचे नसते हे निहारिकाच्या बोलण्यावरून समजलं होत. कदाचित त्यालाही हे इतके महिने बोलायच होत पण आईला ऐकवन त्याला जमलं नाही पण आज निहारिकाने ते सर्व ऐकवून एका स्त्रीचा सम्मान केला होता म्हणून अन्वयला तिचा आदर वाटत होता. आज अन्वयच्या डोळ्यातही समाधानाचे अश्रू होते. जगाची रीत माहिती नाही पण दोघा बहीण-भावानी आपली नजर बदलली होती आणि ते जगाच्या रिती-भातीला आव्हान द्यायला तयार झाले होते. म्हणतात सुरुवात स्वतःपासून करावी त्याचच ते उत्तम उदाहरण होत.

रात्र हळूहळू वाढत होती. स्वरा परत आली तेव्हा निहारीका शांत झाली होती आणि जणू तिथे काही झालंच नाही अस जाणवू लागल. रूमच वातावरण तर अगदीच शांत होत फक्त निहारिकाची मुलगीच होती जी सतत हसत होती. आजीच्या चेहऱ्याकडे बघताना सुद्धा तिला कसलीच भीती जाणवत नव्हती. त्या छोट्याश्या जीवाला बघूनही सांगता येत होतं की दोष हा कायम पाहणाऱ्याच्या नजरेत असतो. आई सृष्टीला बघत होती. तिच्या निरागस हसण्यावर आईच लक्ष गेलं आणि त्या क्षणभर हसू लागल्या.

आजचा स्वराचा पूर्ण दिवस काम करण्यात गेला होता. स्वराने घरी येताच पूर्ण स्वयंपाक बनविला आणि आईला जेवण, औषध देऊन निवांत बेडवर बसली होती. ती आज दिवसभर काम करत होती तरीही तिला क्षणभर थकवा जाणवला नव्हता. आईच सर्व करूनच ती आपल्या रूममध्ये परतली आणि कधी नव्हे ती निहारिका सोबत निवांत गप्पा मारू लागली शिवाय सृष्टी स्वराच्या हातात असल्याने स्वराचा थकवा क्षणात नाहीसा झाला होता. संपूर्ण जग जेव्हा एखाद्याला कुरूप म्हणत त्याच वेळी एखाद्य बाळ त्याच व्यक्तीला न घाबरता तिच्यासोबत निवांत खेळत तेव्हा एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो, सुंदरता म्हणजे नक्की काय आणि अनुभव नक्की वयाने येतात का? तस असेल तर मग लहान मुले इतक्या सहज सर्व कस स्वीकारतात आणि मोठे लोक इगो घेऊन का जगत बसतात? ह्याची उत्तरे निहारिका आज शोधत होती पण तिला उत्तर मिळत नव्हत तर स्वरा ह्या प्रश्नापलीकडे जाऊन फक्त सृष्टीसोबत खेळण्यात व्यस्त होती. आज निहारिकाला खऱ्या अर्थाने स्वरा समजली होती पण बाकी सर्वाना कधी समजणार होती की स्वराला नाईलाजाने स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करावं लागणार होतं??

रात्रीचे जवळपास ११ वाजायला आले होते. आई निवांत बेडवर पडल्या होत्या. अन्वयचे बाबा जेवण करून बेडरूममध्ये पोहोचले होते. त्यांनी हळुवार दार ओढून घेतले आणि बेडवर येऊन बसले. ते केव्हाचे बेडवर येऊन बसले पण एक शब्द बोलत नव्हते. बऱ्याच वेळेपासून अन्वयची आई त्यांचं हे वागणं अनुभवत होती पण त्या काही बोलू शकल्या नाही. जवळपास १५-२० मिनिट पुन्हा गेले. अन्वयचे बाबा कसल्या तरी विचारात हरवले होते आणि आईने विचारले," काय हो इतके गुमसुम का? कोणत्या विचारात हरवला आहात?"

अन्वयच्या आईच्या आवाजाने त्यांचं लक्ष तिकडे गेलं. त्यांनी त्यांच्या नजरेत बघत हळुवार आवाजात म्हटले," लता मी आत येत होतो तेव्हा अन्वय-स्वराच बोलणं लपून ऐकलं. स्वरा अन्वयला म्हणत होती की २-४ महिन्याच्या सुट्टया टाका आणि जर मिळाल्या नाही तर माझं रेजिग्नेशन घेऊन जा. आईसमोर मला काहीच महत्त्वाचं नाही. लता आपण चुकलो तर नाही ना तिला ओळखायला? जगाच्या विचारात आपण एका हिऱ्याला ओळखायला तर विसरलो नाही ना? आपला तिरस्कार तिने मनाने स्वीकारणे हे देखील प्रेम नाही का? आपली मुलं वयाने लहान असूनही आज जे स्वराबद्दल बोलले तेव्हा ते खरच खोटे आहेत का? पहिल्यांदा मला वाटत की ते योग्य आहेत आणि आपण मोठे असूनही चुकीचे आहोत. आपण खरच तिला ओळखायला चुकलो आणि ती तिरस्कार सहन करूनही फक्त आपल्या लोकांसाठी जगत राहिली मग तिच्यासारखी दुसरी सुंदर सून आपल्याला खरच मिळणार आहे? तुला काय वाटत लता??"

अन्वयच्या आई शांतपणे ऐकत होत्या. अन्वयच्या बाबांनी त्यांना काही प्रश्न विचारले होते पण त्याच एकही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं किंवा कदाचित होत पण त्यांच्या ओठावर ते यायला तयार नव्हत. आज अन्वयचे आई-बाबा दोघेही डोळे उघडे ठेवून कसला तरी विचार करत होते. त्यांच्याकडे बोलायला शब्द नव्हते की आपल्या मुलांना अभिमानाने दाखवायला चेहरा नव्हता. नजरा खाली झुकल्या होत्या आणि त्यातच बरीच उत्तरे दडलेली होती.

एक पल काफी है
किसीं को समझने के लिये
हाल दिलं का अक्सर
झुकी हुयी नजरे बया कर जाती है...