निकिता राजे चिटणीस
पात्र रचना
1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
3. निकीता चटणीस नितीन ची बायको
4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
Disclaimer
ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे आणि यातील सर्व व्यक्तिरेखा आणि प्रसंग काल्पनिकच आहेत. यांचा कोणत्याही जीवंत अथवा मृत व्यक्तीशी अथवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर कोणाला काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
दिलीप भिडे
ही कादंबरी जरा वेगळ्या पद्धतीने लिहिली आहे. या कादंबरीतील पात्रे त्यांच्या दृष्टीतून कथा पुढे नेतात. आणि कथन करतात.
दिलीप भिडे
भाग १
अनंत दामले
अचानक टेलिफोनच्या घंटीने जाग आली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दोन वाजले होते. कोण असावं एवढ्या आपरात्री असा विचार करतच फोन उचलला.
“हॅलो अनंतराव मी मुकुंद देशपांडे बोलतोय”
“बोला मुकुंदराव एवढ्या आपरात्री फोन केलात म्हणजे तसंच काही कारण असलं पाहिजे. काही emergency आहे कां ?”
मुकुंदरावांचा आमच्याच वसाहतीत बंगला होता. आणि आमच्या संध्याकाळच्या बगीच्यातल्या बैठकीतले मेंबर. काय झालंय ?
“हो. emergency आहे आणि आमची कार चालूच होत नाहीये. वर एवढा भयंकर पाऊस आणि आपरात्रीची वेळ काही सुचत नाहीये बघा.” – मुकुंदराव
“मुकुंदराव आधी शांत व्हा बघू. काय झालंय ते नीट सांगा त्या शिवाय मी काय करायचंय ते कसं कळणार. पण तुम्ही आधी शांत व्हा.”
“संध्याकाळी बोललो होतोना, की मित्राचा मुलगा आणि सून येणार म्हणून, तर त्या पोरीला अचानक पोटात प्रचंड कळा येताहेत. तिच्याकडे बघवत नाहीये. ताबडतोब हॉस्पिटल ला न्यावं लागणार आहे. आणि नेमकी आत्ताच त्यांची कार चालूच होत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला.” - मुकुंदराव
“मी लगेच निघतो. चिंता करू नका.”
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. १०-१५ फुटापालिकडलं काहीही दिसत नसतांना गाडी चालवायची म्हणजे एक दिव्यच होत. पण इलाज नव्हता . जाण भाग होत. मुकुंदरावांकडे medical emergency होती. आणि अश्या वेळेस धावणार नाही तो मित्र कसला. खरं तर आता, साठी ओलांडलेल्या मला, हे अश्या वातावरणात गाडी चालवण जरा अवघडच होत.
“अहो थांबा मी पण येते. एवढ्या आपरात्री तुम्हाला एकटयांनी जाऊ देणार नाही.” बायको दारातूनच ओरडली
“अग मी एकटा कुठाय, मुकुंदराव असतील त्यांच्या मित्राचा मुलगा आणि त्याची बायको. गाडीत जागा नाहीये पाचव्या माणसाला. येतो मी.” बायकोच्या चेहेऱ्यावर काळजी दिसत होती पण तरी त्याकडे दुर्लक्ष करून मोठी हिम्मत करून गाडी काढली.
प्रचंड पाऊस, कॉलनीतले कच्चे रस्ते, मागच्या सीट वर वेदना असह्य झालेली मुलगी, वर मुकुंदराव आणि नितीनचे चिंताग्रस्त चेहेरे, काम कठीण होतं. निकिताला कमीत कमी धक्के बसतील याची काळजी घेत गाडी अत्यंत हळू चलवावी लागत होती. त्यामुळे नितीन मात्र अस्वस्थ झालेला दिसला. म्हणाला “काका या स्पीड ने पोचायला खूपच उशीर होईल, मी चालवू का?”
पण मुकुंदरावांनी परस्परच त्याला उत्तर दिल. म्हणाले “नको तुझी मनस्थिति ठीक नाहीये आणि शिवाय तुला निकिता कडे लक्ष्य द्यायचं आहे. तिला सांभाळ ते जास्त जरूरी आहे.”
राजवाडे हॉस्पिटल गावात मध्यवर्ती भागात होते आणि डॉक्टर अनुभवी आणि निस्पृह असल्याची कीर्ती होती. काळजी वाटत होतीच पण डॉक्टरांविषयी खात्री होती. हॉस्पिटल मध्ये पोचलो एकदाचे. रात्रीचे 3 वाजले होते. दारातच रेसिडेंट डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय हजर होते. एक काळजी मिटली होती. बाकीचे सोपस्कार भराभर होऊन निकिता आयसीयू मधे अॅडमिट झाली.
आम्ही बाहेर. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर चिंता आणि प्रश्नचिन्ह.
पाचच मिनिटांत डॉक्टर आले आणि तडक आयसीयू मध्ये गेले.
थोडा वेळ तसाच गेला. ती शांतता जीवघेणी होती. एकमेकांशी बोलण्यातही कोणाला स्वारस्य नव्हत. बाहेर पाऊस कोसळतच होता या परिस्थितीत पावसाची भीती वाटायला लागली होती. बाहेर गडद अंधार. बहुतेक सर्व शहराचे दिवे गेले असावेत. म्हणूनच आम्हाला येतांना एकही street light दिसला नाही.
आणि अचानक दिवे गेले. क्षणभर काहीच कळेना काय झालंय ते. सर्वत्र अंधार. पाच मिनिटांनी दिवे आले. समोरच वॉर्डबॉय होता त्याला विचारले तर म्हणाला की आत्तापर्यंत inverter चालू होत आता generator सुरू केलंय. आता निरनिराळ्या tests करायच्या आहेत म्हणून.
तितक्यात डॉक्टर राजवाडे स्वत:च आले. “बसा बसा रीलॅक्स. आम्ही आवश्यक त्या सगळ्या tests करायला घेतल्या आहेत. पण अपेंडिक्सच emergency operation कराव लागणार अशी लक्षण दिसताहेत.” डॉक्टर सांगत होते.
“क्रिटिकल आहे का” नितीनने विचारले.
“होय. सध्या तरी जी symptoms दिसताहेत त्यावरून तरी अस वाटतंय. पण टेस्ट रीपोर्ट आल्यावरच फायनल सांगता येईल. तोपर्यंत you will have to wait. Have patience.” – डॉक्टरांचं उत्तर.
“मग आम्ही आता काय करायच.” - मुकुंदराव
“तुम्ही काहीच करायचं नाहीये. जे काही करायच आहे ते आम्ही करू. पण निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. देशपांडे, पेशंट तुमच्या कोण.” – डॉक्टर.
“हा नितीन, माझ्या मित्राचा मुलगा, आणि ती पेशंट निकिता, ह्याची बायको.” - मुकुंदराव
“Ok. तर मग नितीन तुझा consent लागेल. अरे सॉरी तुम्हाला एकेरी नावांनी बोललो.” – डॉक्टर.
“Its ok Doctor.” – नितीन.
“ठीक तर मग तुम्ही फॉरमॅलिटीज पूर्ण करा. आम्ही सर्व तयारी करून ठेवतो.- डॉक्टर.
“डॉक्टर एक विचारू ?” – नितीन म्हणाला.
“ऑपरेशन करांवच लागेल का हेच विचारायच आहे ना ?” – डॉक्टर.
“हो. ऑपरेशन म्हटलं की काळजी वाटते म्हणून. इतक सिरियस आहे का ? आजकाल मी अस ऐकतोय की अपेंडिक्स वर antibiotic नि सुद्धा इलाज करता येतो.” – नीतिन
“खरंय तुमचं म्हणणं. पण हा खात्रीशीर उपाय नाहीये. एक पाच मिनिट थांबा मी जरुरीच्या सूचना देऊन येतो आणि तुमच पूर्ण शंका निरसन करतो चालेल ?” – डॉक्टर म्हणाले, त्यांच्याजवळ वेळ नव्हता.
“Ok. चालेल.” -नितीन म्हणाला.
डॉक्टर आतमध्ये गेले पुन्हा बाहेर आम्हीच तिघं.
“अरे नितीन डॉक्टरांचा अनुभव बघता ते उगाच काही सांगतील अस वाटत नाही” इति मुकुंदराव.
“मुकुंदराव नितीनच्या बोलण्यात तथ्य आहे. त्यांच्याच बायकोच ऑपरेशन आहे तेंव्हा सत्य परिस्थिति आपल्याला पूर्णपणे कळली पाहिजे” मी मध्येच बोललो.
“बघा काका आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे अस मला वाटत मग परिस्थितीशी दोन हात करता येतात. आणि ज्ञानात भर पडत असेल तर चांगलंच आहे ना तेवढंच बळ अंगी येत.” – नितीन म्हणाला.
“करेक्ट आहे” मी आणि मुकुंदराव, आम्ही दोघेही एकदम उद्गारलो. मुकुंदरावांना पण ते पटलं म्हणाले “पोरगा धीराचा आहे.”
“खरंय वादच नाही.”
थोडा वेळ कोणीच बोलल नाही.
“काका अहो तसं नाहीये, तुम्ही दोघं माझ्या बरोबर आहात म्हणून, नाहीतर कोसळलोच असतो.” – नितीननी कबुली दिली.
“आम्ही आहोतच तुझ्याबरोबर no worries.” मी नितीनला धीर दिला.
तेवढ्यात नर्स आली. डॉक्टरांनी तुम्हाला बोलावलाय. तिने त्यांची केबिन दाखवली.
“या बसा. आता मी तुम्हाला सर्व समजाऊन सांगतो म्हणजे तुमच्या सर्व शंका दूर होतील.” डॉक्टर म्हणाले. त्यांनी सरळ सुरवात केली.
“तुम्हाला माहीतच असेल की अपेंडिक्स, हा शरीराला आवश्यक असा अवयव नाही. जिथे छोट आंतड मोठ्या आंतडयाला मिळत, तिथे एका बोटा एवढी ही growth असते. जो पर्यन्त तिला धक्का लागत नाही तो पर्यन्त सर्व काही ठीक असत. पण जेंव्हा infection होत तेंव्हा त्यावर सूज येते. आकार वाढतो वेदना सुरू होतात. ताप येतो, उलट्या सुरू होतात, हळू हळू वेदना वाढत जातात. असह्य होतात.” डॉक्टर एक क्षण थांबले, आणि पुढे सांगायला सुरवात केली.
“जर सूज वाढली आणि आतमध्ये पस झाला तर मग अपेंडिक्स फुटण्याची शक्यता वाढते. आणि मग या परिस्थितीत जीवन मरणाचा संघर्ष सुरू होतो. मघाशी नितीन म्हणाला त्या प्रमाणे, औषधे देऊन इन्फेक्शन कमी नक्कीच करता येईल. आणि हे सर्व आताही करूच पण हे सर्व सुरवातीच्या stage ला ठीक असत प्रादुर्भाव वाढल्यावर ऑपरेशन करून अपेंडिक्स काढून टाकणे हेच श्रेयस्कर असत. आता असह्य वेदना होताहेत म्हणजे आपल्या पेशंट ची स्टेज, ही पुढे गेलेली आहे असा आमचा अंदाज आहे म्हणून ऑपरेशन जरूरी आहे असा आम्हाला वाटतंय.”
क्रमश: .............
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.