निकिता राजे चिटणीस - भाग ५ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग ५

निकिता राजे चिटणीस

पात्र रचना

1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा

3. निकीता चटणीस नितीन ची बायको

4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई

5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा

6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी

7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र

8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी

भाग ५

भाग ४ वरुन पुढे वाचा ......

अविनाश

मग मी नितीनला तिथेच सोडून हॉस्पिटलला परत आलो. निकीताला संध्याकाळ पर्यन्त पाणी सुद्धा द्यायच नव्हत. मग आम्हीच कॅंटीन मध्ये जाऊन जेवून आलो. जेवण झाल्यावर इतकी झोप येत होती की मी पाय लांब केले. ही बसली होती निकिता जवळ रामरक्षा म्हणत. तशी तिला दुपारी झोपायची सवय नाहीच आहे. मला पण नाहीये कारण दिवसभर मी ऑफिस मध्येच असतो. पण आज झोपलो थोडा वेळ. चार च्या सुमारास नितीन आला. तरतरीत दिसत होत. बहुधा एक डुलकी काढून आला असावा.

सहा च्या सुमारास रेसिडेंट डॉक्टर आपल्या बरोबर डाएटिशन ला घेऊन आलेत. त्यांनी खाण्या पिण्याचा चार्ट बनवून दिला. म्हणाली की “हा चार्ट कॅंटीनला जाईल आणि त्याप्रमाणे पेशंटच जेवण, नाश्ता, चहा, कॉफी सगळ पाठवल्या जाईल. बाहेरून आणि घरून पण काहीही आणून पेशंटला देऊ नका.”

आम्ही माना डोलावल्या. निकितानि नर्सला खूण केली तिनी आम्हाला बाहेर काढल डॉक्टर पण बाहेर आले आणि म्हणाले की “बोला पण भावना आवरा कारण हुंदका, ठसका, खोकला आत्ता तरी यायला नको. जखम ओली आहे. इंटरनल ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. तस झाल तर भारी पडेल. अजून एखाद्या तासाने चमचाभर पाणी दिल तर चालेल. but carefully. दहा वाजे पर्यन्त सूप येईल ते अर्धा अर्धा चमचा करत द्या.”

दहाच्या सुमारास डॉक्टर राजवाडे आलेत. तपासून म्हणाले की “सगळ ठीक आहे. आत्ता रात्री इथे एकालाच थांबता येईल. तुम्ही तुमची सोय केली आहे न ?”

“हो डॉक्टर इथे जवळच हॉटेल बूक केलंय. आम्ही आता निघतोच. नितीन थांबेल.”

डॉक्टरांच्या पाठो पाठ आम्ही पण निघालो. कॅंटीन मध्ये जेवून हॉटेल चा रस्ता पकडला.पुढचे दोन तीन दिवस पण असेच गेलेत. फक्त निकिता चालायला लागली होती. शक्ति भरून येत होती. मुकुंदा आणि दामले संध्याकाळी तासभर येत होते. चौथ्या दिवशी डॉक्टरांनी बोलावल. म्हणाले “सगळ ठीक आहे. आजच डिस्चार्ज देऊ. अजून आठ दिवसांनी टांके काढावे लागतील. आता तुम्ही टांके पुण्याला काढणार का ? की आठ दिवस इथे राहू शकता.”

“पण तुम्हीच आत्ता म्हणाला की आजच डिस्चार्ज मिळेल.” मी आश्चर्यानी विचारलं.

“हो. डिस्चार्ज आजच मिळेल. तुम्हाला बाहेर सोय करावी लागेल. किंवा टांके पुण्याला काढा. बाकी post operation care, काय घ्यायची ते तुम्हाला नीट समजाऊन सांगीन आणि डिस्चार्ज रीपोर्ट मध्ये पण लिहिले असेल. पुण्याला तुमचे डॉक्टर असतीलच ते guide करतील. काही प्रॉब्लेम नाहीये. मुख्य म्हणजे आता कुठलीच emergency नाहीये. फक्त काळजी घ्यायची आहे. प्रवासात गाडी हळू न्या . धक्के बसणार नाहीत यांची काळजी घ्या. बस.” डॉक्टर म्हणाले.

मुकुंदाला फोन करून सांगितल की निकिता ला डिस्चार्ज मिळतोय आणि आम्ही येतोय. नितीन डिस्चार्ज प्रोसीजर पूर्ण करे पर्यन्त आम्ही जाऊन हॉटेल मधून चेक आउट करून आलो. नितीन आणि निकिता तयार होऊन लॉबीतच बसले होते. निकिता साठी वहिनींनी खास साधा स्वयंपाक वेगळा केला होता. जेवण झाल्यावर गप्पा टप्पा मध्ये संध्याकाळ केंव्हा झाली हे कळलंच नाही. संध्याकाळी दामले पती पत्नी आले. पुन्हा गप्पा. रात्रीच जेवण दामल्यांच्या कडे. बऱ्याच वर्षांनी दिवस कसा छान गेला. डॉक्टर काय म्हणाले ते सांगितल्यावर मुकुंदा म्हणाला की “इथेच रहा. आमचा पाहुणचार घे. मस्त मजेत आठ दिवस जातील”

“अरे माझा व्यसयाय आहे बाबा, आधीच चार दिवस कंपनी वाऱ्यावर सोडून आलो आहे. आता जायला हवं. टांके काय पुण्याला पण काढता येतील.” बरीच भवति न भवति होऊन अस ठरल की ही आणि निकिता इथेच राहतील आणि मी आणि नितीन पुण्याला जाऊ. टांके काढायच्या वेळेला नितीन येऊन जाईल. त्याच्याच बरोबर ह्या दोघी ही पण पुण्याला येतील. फायनल.

निकिता चिटणीस

ऑपरेशन होऊन जवळ जवळ वर्ष दीड वर्ष उलटलय. आता सगळं रुटीन सेट झालेलं आहे. सकाळी उठून बाबांचा आणि नितीनचा चहा नाश्ता करायचा. ते दोघ ऑफिस ला गेले की मग आम्हा दोघींचं आरामात सुरू व्हायच. चहा नाश्ता करून आईंची, आंघोळ पूजा पोथी, होई पर्यन्त एक वाजलेला असायचा. मग जेवण, थोडी डुलकी, दुपारचा चहा की संध्याकाळ व्हायची. मग आम्ही थोड पाय मोकळे करून यायचो. की मग जेवणाची गडबड. सगळी कामं राधा बाईच करायच्या. राधाबाईंना मूलबाळ काहीच नव्हत नवरा बऱ्याच वर्षांपूर्वी परागंदा झालेला. वीस वर्षांपूर्वी त्या आमच्या घरी आल्या आणि घरच्याच होऊन गेल्या. अतिशय सुस्वभावी आणि कामाला वाघ. कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा पार्टी असू द्या त्यांच्यावर सोपवून आम्ही निर्धास्त असायचो. त्यांना कधी थकलेल्या पाहील नाही. आम्ही पण त्यांना मानानेच वागवायचो. दुपारी आई, मी आणि त्या बरोबरच जेवायचो. एकाच टेबलावर. बंगल्याच्या मागे त्यांच्यासाठी एक खोली टॉयलेट बाथरूम सकट बांधून दिली होती. त्या तिथे राहायच्या. मात्र नितीनला आणि बाबांना सकाळचा चहा आणि नाश्ता माझ्याच हातचा लागायचा.

आयुष्य तस सुखात चाललं होत. कशाचीही कमतरता नव्हती. खर्चावर बंधन नव्हती. खरं सांगायचं तर कुठेही बोट ठेवायला जागा नव्हती. पण तरीही कुठे तरी बोच होती. काहीतरी हरवलं होत. something is missing in the life. कळत नव्हत पण जाणवत होत. नितीन चिटणीस ची मी branded बायको होती. काय करावं, ह्याच विचारात बरेच दिवस गेलेत. मग एक दिवस एक जाहिरात वाचण्यात आली. एक कुठल्याशा शाळेत vecancy होती आणि अर्ज मागवले होते. त्या दिवशी रात्री जेवणाच्या टेबल वर मी हा विषय काढला. मला वाटलं होत की लगेच होकार मिळेल. पण तस झाल नाही. नितीननी एक भाषणच दिल. प्रबोधन म्हणा किंवा विश्लेषण म्हणा हवं तर. म्हणाला

“तुला नोकरी करायची आहे ती कशाकरिता, एक म्हणजे पैशांसाठी, दोन, time pass म्हणून, की काहीतरी अस करायचं आहे की ज्यांनी तुला तुझ्या स्व‍त्वाची जाणीव होईल.”

मी confused . “अं ?”

“म्हणजे अस बघ तुला जर ही नोकरी मिळाली, तर तुझं त्यात मन रमायला हवं, म्हणजे त्यात तुझे मन पूर्णपणे गुंतायला हवं. नाही तर त्या पदाला तू न्याय देऊ शकणार नाही, तर आधी तू ठरव की तुला कशासाठी जॉब करायचा आहे. पैशा साठी, टाइम पास म्हणून, का identity साठी ते तू विचार करून ठरव. ह्या विषयावर आपण उद्या बोलू सविस्तर. मधल्या काळात, तुला काय अर्ज करायचा तो कर.” नितीन म्हणाला. झालं. निर्णय काहीच नाही आणि विचारांचा भुंगा मात्र मागे लागला. शेवटी उद्या उत्तर द्यायचं म्हणजे काहीतरी confidently सांगणं आवश्यक होऊन बसलं होत. शेवटी ठरवलं की बघू उद्याचं उद्या. ऑफिस ला जायच्या आधी बाबा म्हणालेच “काय ? झाला का विचार करून, नोकरीचं ठरलं का काही ?” मी नुसतीच नकारार्थी मान हलवली पण मी मान हलवायच्या आधीच ते घराबाहेर पडले होते. बहुधा त्यांना प्रश्न नुसताच माझ्या वर फेकायचा होता. मी service परतवू शकणार नाही ह्याची त्यांना खात्री होती. Ace Service. मग दुपारी जेवण झाल्यावर आईंनीच विषयाला वाचा फोडली.

“काय ग केलास का काही विचार, आलीस का कुठल्या निष्कर्षाप्रत.”

“नाही. हेच समजत नाहीये की मला नेमकं काय हवं ते. आणि त्यामुळे काय करायचं ते ठरवणं अवघड जातंय” .

“मी करू का थोडी मदत ? म्हणजे ठरवायचं तूच आहेस मी फक्त प्रश्नांचा विस्तार करते म्हणजे तुला सोपं पडेल.” आई म्हणाल्या.

“चालेल सांगा.”

“अस बघ माणूस डिग्री घेतल्यावर नोकरी शोधतो बरोबर ?” – आई.

“हो बरोबर.”

“आता असं काय असतं की त्याला नोकरीची जरूर असते ? तर, त्याला स्वयंपूर्ण व्हायच असत. वडीलांच्या अंगावर असलेलं ओझं थोड हलक करायचं असत. स्वत:च्या संसाराची पायाभरणी करायची असते. आणि ह्या सगळ्याला पैसा लागतो. तू ह्याच्यात कुठे बसते ?” आईंनी प्रश्नांचा विस्तार करायला सुरवात केली.

“कुठेच नाही.” मी म्हंटलं.

“आता दुसरं काही बायका किंवा मुली नोकरी करतात. का ? तर नवऱ्याच्या पगारात भागत नाही किंवा महिन्याची तोंडमिळवणी करता, करता आकस्मिक खर्चा साठी पैसाच उरत नाही म्हणून. पुन्हा मुलांच शिक्षण आहे, तीही आजकाल खर्चाची बाब असते. आणखीही संसारात इतर बरेच न टाळता येण्या सारखे खर्च असतात, त्याच्यासाठी बायका नोकरी करतात. खरं म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. बायकांना घरातली सर्व कामे आटपून ऑफिस ला जावं लागत. आल्यावर पुन: घर काम आहेच. झोप सुद्धा मनाप्रमाणे मिळत नाही. सुटीच्या दिवशी आठवड्या ची कामे वाट पहातच असतात. पण ही तारेवरची कसरत त्यांना करावीच लागते. इलाजच नसतो. मुली नोकरी करतात ते लग्नापर्यंत बाबांना हातभार लागावा आणि स्वत:च्या लग्नासाठी थोडीफार तरतूद करता यावी म्हणून किंवा लग्नानंतर जरूर असल्यास नोकरी हाताशी असावी म्हणून. आता तू ह्याच्यात कुठे बसते ?” आईंनी पुन्हा एक प्रश्न माझ्यावर फेकला.

“कुठेच नाही. म्हणजे पैशांसाठी मला नोकरी करायची काहीच आवश्यकता नाही. एक्स्ट्रा पैशांची काहीच गरज नाहीये. माझे असे खर्च आहेतच किती की ज्याच्यासाठी धडपड करावी. छे, पैशांसाठी नाही. मग टाइम पास साठी ?”

क्रमश:..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.