निकिता राजे चिटणीस - भाग ८ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग ८

निकिता राजे चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

 

 

भाग  ८

भाग ७  वरून  पुढे  वाचा ...........

निकिता

 

“अरे काय हे नितीन! आई म्हणाल्या. तिला जरा किमान आठ दिवस तरी राहू दे. माहेरी जातेय तर एक दिवसांत कसं म्हणतोयस परत येऊ म्हणून.” – आईच म्हणाल्या.

बर झाल आईच म्हणाल्या. पण नितीनचा चेहरा पडला होता. पण तो काही बोलला नाही. नुसतीच होकारार्थी मान डोलावली. मला म्हणाला “आज रात्रीच बॅग भरून ठेव म्हणजे सकाळी उशीर होणार नाही.” रात्री सगळी आवरा सांवरी करून बेडरूम मध्ये पोचले तेंव्हाही स्वारी घूश्यातच होती. मला एकदम हसू फुटलं. त्याचाही त्याला राग आला. बोलायलाच तयार नव्हता शेवटी मीच हार पत्करली.

“का रे मी माहेरी जाणार म्हणून इतका त्रागा कशाला ? नको जाऊ का ?”

“तू जा पण आठ दिवस राहायची काय आवश्यकता आहे. सकाळी जाऊ आणि संध्याकाळी परत येऊ.” – नितीन तक्रारीच्या सुरात बोलला.

“अरे पण चार दिवसच तर म्हणतेय मी, किती महीने झालेत औरंगाबादला जाऊन.”

“माहीत आहे न तुला, की मी जेंव्हा ऑफिस मधून घरी येतो तेंव्हा मला तू डोळ्या समोर लागते. तुला एक दिवस कमी पडत असेल तर, तू अस कर रोज सकाळी औरंगाबादला जात जा आणि संध्याकाळी परत ये. अगदी हवे तितके दिवस, कार आणि ड्रायव्हर तुझ्या दीमतीला, मग तर झाल.” नितीन बोलला.

“आता काय बोलणार ? बोलणंच खुंटलं. ओके म्हणण्या शिवाय दूसरा काही ऑप्शनच नव्हता.” दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो तर आईच म्हणाल्या  “हे काय तुझी बॅग कुठाय ? विसरलीस का काय ? जा पटकन घेऊन ये. आठ दिवस काय एकाच ड्रेस वर राहणार आहेस का ?”

“अहो आई, मी पण संध्याकाळीच परत येणार आहे.”

“अरे नितीन राहू दे तिला चार दिवस. तू कशाला अडवतो आहेस तिला.” – आई.  

“मी नाही. मी तर म्हंटलं तिला की रहा आठ दिवस, आराम कर, तर तीच म्हणाली की मैत्रिणी नसल्यामुळे तिथे तिला करमत नाही. म्हणून ती पण संध्याकाळी माझ्या बरोबर वापस येईन म्हणून.” – नितीन.

“अं? असं म्हणाली ती? माझा नाही विश्वास बसत, मला आपलं वाटलं की माहेरी जातेय तर राहील चार दिवस. पण ठीक आहे. तू आणि तुझी बायको! ठरवा तुम्हीच काय ते.” आई म्हणाल्या.

आईंच्या बोलण्यामुळे माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली होती. पण पाण्यावरच्या लाटे सारखीच, लगेच विरूनही गेली. औरंगाबादच्या वाटेवर असतांना नितीन म्हणाला निकिता, अग तू थोडा वेळ जरी नजरे आड झाली की माझा जीव कासावीस होतो. नितीनची पण ना कमाल आहे ! त्याला एवढं सुद्धा प्रेमाने बोलता  येत नाही. रूक्ष आणि सरळ सोट. इंजीनीरिंग कंपनी आहे, हा पण इंजीनियर, rough, कामात हुशार. माणसांवर उत्तम वचक. सगळं ठीक आहे. जसं कामात हवं तस. पण माझं काय ? पण आता मला पण सवय झाली. त्याच अस बोलणंच प्रेमाचं असतं हे मला समजून आलंय. त्याच्या बोलण्यावर मी नुसतंच हसून त्यांच्याकडे पाहील आणि त्याच्या हातावर हात ठेवला. तेवढ्याने सुद्धा त्याचा चेहरा फुलला. पुढचा प्रवास छानच झाला. तो त्याच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल भरभरून बोलत होता. मी पण लक्षपूर्वक ऐकत होते. मला पण आईंसारखं  updated राहायलाच हवं. मध्ये नगर जवळ चहा साठी थांबलो. नितीन अखंड बोलत होता. नवीन प्रोजेक्ट च प्लॅनिंग, कामाची दिशा, time frame, किती वेळात पूर्ण करायचं, कस करायचं, नफा, खर्च सगळं, जणू काही त्याच्या मेंदू मधे पूर्ण आराखडा तयारच होता. मी कौतुकाने बघत होते. नितीन handsome होताच पण आत्ताचं  तेज काही वेगळच होत.

औरंगाबादला पोचलो तेंव्हा नऊ वाजले होते. मला सोडून नितीन लगेच निघाला. मामा घरी नव्हते बाजारात गेले होते. आता जावई येणार म्हंटल्यांवर बरंच  काही आणायला गेले असतील. मामी म्हणाल्या सुद्धा अरे निदान चहा तरी घेऊन जा. पण हा म्हणाला की आत्ता उशीर झाला आहे. संध्याकाळी आल्यावर घेईन. आणि तो निघाला सुद्धा. कार्तिकला फोन केला तर तो कॉलेज मधून चार वाजता फ्री होणार होता. दुपारच जेवण झाल्यावर मामा, मामी, आणि मी तुफान गप्पा, वेळ कसा गेला ते कळलंच नाही. साडे तीन वाजता मामीनी चहा केला आणि मी

निघाले. कार्तिकनी कॉलेज मध्येच lecturership पत्करली होती. त्याला ते आवश्यकच होत. भेटल्यावर कळलं की त्यानी एक टू बेडरूम चा फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि गावी असलेल्या आई बाबांना आणि बहि‍णीला पण आणलं होत. त्याला धाकटी बहीण होती हे मला माहीत नव्हत.

“कधी बोलला नाहीस रे की तुला धाकटी बहीण आहे म्हणून ?”

“अग आपल्या बोलण्यात कधी विषयच निघाला नाही आणि आत्ता ती कुठे दहावीत गेली आहे. त्याच्यामुळे कधी संभाषणात आलं नाही. इतके दिवस बाबा गावी शेती करत होते. आता झेपत नाही त्यांना. पुन्हा मजूर मिळत नाहीत. फार अडवणूक करतात. वेळेवर नांगरणी, पेरणी झाली नाही किंवा कापणी झाली नाही तर नुकसान ठरलेले. कधी पाऊस पडत नाही, पेरणी वाया जाते. दुबार करावी लागते, कधी पीक कापणी ला तयार असत पण त्या वेळेला सर्वांनाच मजूरांची गरज असते. अश्या वेळेला अवकाळी पाऊस आला तर सर्व उभ पीक नष्ट होत. नुकसानच नुकसान. कोरडवाहू शेतीची अशी सगळी कथा आहे. वर मला गावी जाण शक्य नाही. म्हणून शेती विकायचा विचार आहे. आत्ता सध्या पुरती बटईने  दिलेली आहे. बघू पुढचं पुढे. बरं ते सोड तू सध्या काय करते आहेस काहीतरी क्रिएटिव करते आहेस की नाही ?” – कार्तिकनी सांगितलं.

 

“अरे काही करायचा विचार यायच्या आधीच ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. मग चार सहा महीने कोणी बोलूच दिल नाही. पण आता विचार करते आहे, पण  काय करू ? तू एवढा हुशार, सुचव न काही.”

“हं मला अस वाटत की तुमची मोठी कंपनी आहे तर तिथेच जॉइन कर म्हणजे कंपनीला घरचा, विश्वासातला माणूस मिळेल. आणि तुला पण हळू हळू कामातल्या खाचा खोंचा कळायला लागतील. तू हुशार आहेस, तुझ्यात spark आहे. अस काही तरी innovative करून दाखव की कंपनीच्या व्यवहारात तुझं काय contribution आहे ते तुला आणि इतरांना पण कळेल.” – कार्तिक.

“अरे तुला माहीत नाही, पण कंपनी २० वर्ष जुनी आहे. आणि व्याप खूप मोठा आहे. सगळा कारभार सेट आहे. मी इंजीनियर नाही आणि सर्वच बाबतीत अनुभवी. तू म्हणतो आहेस ते ऐकायला छान वाटतंय पण कसं शक्य आहे, बाबा आणि नितीन मला अशी लुडबुड करू देतील का ? दुसरं म्हणजे तिथे बरेच अनुभवी लोक आहेत. वयाने मोठे आहेत. नितीन सुद्धा त्यांच ऐकतो. त्यांच्या कामात ढवळा ढवळ करत नाही. छान चाललंय की सगळं. नकोच. पुन्हा सगळे म्हणतील की मालकाची बायको आली आयत्या बीळावर. नियतीलाही आवडणार नाही माझ्या चुका कोणी काढल्या तर, किंवा कोणी कामावरून माझी चेष्टा केली तर. आणि खरं सांगायचं  झालं तर, इतर वेळेला जरी तो  प्रश्नांना शांतपणे मार्गी लावत असला तरी माझ्या बाबतीत तो फार लवकर अपसेट होतो. नको, अस नकोच.”

“अग पण नितीन सुद्धा मालकांचा मुलगा म्हणून डायरेक्ट रूजू झालाच की. मग तुला काय हरकत आहे ?” – कार्तिक.

“अरे नितीनची गोष्ट वेगळी आहे. तो खूप हुशार आहे, शार्प आहे, IIT चा इंजीनियर आहे. अहमदाबाद चा MBA आहे. झालच तर इंग्लंड वरुन  BUSINESS MANAGEMENT चा डिप्लोमा पण आहे. आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे लहानपणापासून बाबांना पाहतो आहे. अरे बाळकडू नावाची काही चीज असते की नाही ? तू दुसरं काही तरी सुचव, जे मला करायला सोपं असेल. आणि ज्याच्यात मला CONFIDENCE येईल. मला कोणी हसणार नाही. आणि नितीनची मान खाली जाणार नाही. चांगला आपुलकीचा सुखी संसार चालला आहे. त्यात खिळ नको. आमच्या घरात महाभारत नको. तू सुचव ना दुसरं काही तरी.” थोडा वेळ तसाच गेला. कुणीच काही बोललं नाही.

“तू अस कर आधी मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन यांचे short कोर्स असतात. ते जॉइन कर. साधारण वर्ष सहा महिन्यांचे असतात. वर्षभरानंतर तुला बऱ्याच गोष्टी कळायला लागतील. त्यानंतर accounts चे क्लासेस लाव. ते पण तसेच असतील. तुला balance sheets, आणि p & L account. टॅक्सेशन वगैरे समजायला लागेल. वर्ष दीड वर्षात बऱ्यापैकी ज्ञान वाढेल. मग ट्रेनी म्हणून तू कंपनी जॉइन कर. नितीन ला सांग की मला कोणतीही सूट सवलत नकोय. इतर ट्रेनी सारखीच वागणूक मिळावी. मग कोणी काही म्हणणार नाहीत. तुझ्याशी cooperate करतील. उलट तुला सन्मानाची वागणूक मिळेल. मालकांची बायको असूनही साध्या कर्मचार्‍याप्रमाणे काम करते आहेस हे पाहून अत्यंत आदराने तुझ्याकडे बघतील, काही काळानंतर तूच त्यांची बॉस असणार आहेस हे सुद्धा सहज स्वीकारल्या जाईल. आणि तुझ्या पासून कोणतीही माहिती लपवून ठेवणार नाहीत. तुझा प्रत्येक शब्द झेलल्या जाईल, तुझ्याशी जवळीक साधण्याचाही सगळ्यांचा प्रयत्न असेल.  कोणाला जवळ येऊ द्यायचं आणि कोणाला जरा दूरच ठेवायचे हे पण कळायला लागेल .ह्याच्यात वेळ जाईल पण हाच प्रॉपर मार्ग आहे. आता याच्यापुढच्या पायऱ्या भराभर कशा चढायच्या ते तुझ्या हुशारीवर आणि skill वर अवलंबून असेल. दोन तीन वर्ष जातील पण काम पक्कं होईल. तू हुशार आहेस, काही वर्षांतच कंपनी ची आधार स्तंभ होशील ह्याची मला खात्री आहे. बघ. विचार कर.” कार्तिकनी एक लांबलचक भाषणच दिलं.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.