निकिता राजे चिटणीस - भाग ६ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग ६

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

9.   चित्रा पालकर             निकीताची कॉलेज ची मैत्रीण

10.    विशाखा नाडकर्णी          निकीताची कॉलेज ची मैत्रीण

11.  दिनेश कळसकर           निकिता चा कॉलेज चा मित्र

12.  वसंत कुलकर्णी            निकिता चा कॉलेज चा मित्र

13.    कार्तिक साने             निकिता चा कॉलेज चा मित्र  

 

 

भाग 6

भाग 5 वरुन पुढे  वाचा  .........

निकीता

मुली नोकरी करतात ते लग्नापर्यंत बाबांना हातभार लागावा आणि स्वत:च्या लग्नासाठी थोडीफार तरतूद करता यावी म्हणून किंवा लग्नानंतर जरूर असल्यास नोकरी हाताशी असावी म्हणून. आता तू ह्याच्यात कुठे बसते ?” आईंनी पुन्हा एक प्रश्न माझ्यावर फेकला.

“कुठेच नाही. म्हणजे पैशांसाठी मला नोकरी करायची काहीच आवश्यकता नाही. एक्स्ट्रा पैशांची काहीच गरज नाहीये. माझे असे खर्च आहेतच किती की ज्याच्यासाठी धडपड करावी. छे, पैशांसाठी नाही. मग टाइम पास साठी?”

“ओके. ते ही बघू. निव्वळ टाइम पास करायचा म्हणून नोकरी करायची. पण मला असं सांग की तुझ्या टाइम पास साठी, म्हणजे अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी एखाद्या गरजू मुलीची जागा हिरावून घेणं, तिला वंचित ठेवण, म्हणजे तिच्या संसारातल्या साध्या साध्या अडचणींना, सामोरं जाण्याच बळ काढून घेतल्या सारखं होणार नाही का ? हे नैतिकतेला सोडून होईल अस तुला वाटत नाही का ? किंवा एखाद्याची नोकरी सुटली असेल आणि त्याचा संसार उघड्यावर पडला असेल, ह्या नोकरीमुळे त्याला त्याचा संसार सावरायची जी संधि मिळेल त्या पासून त्याला वंचित ठेवणार का ? ह्या नोकरीमुळे कोणी श्रीमंत नक्कीच होणार नाही. पण त्यांच्या अडचणींवरचा उतारा खात्रीने असेल.” – आई. 

“पण आई जिथे इंटरव्ह्यु घेतील तिथे सगळ्यांना समसमान संधि असणार आहे. मग मी कोणाची संधि हिरावून घेईन असं कसं ? स्पर्धेत कोणी तरी एक जिंकणार आणि बाकी हरणार हे तर होतच . मग ह्याच्यात अन्याय कुठे होतोय. मला काहीतरी करून मोठं व्हायच आहे. समाजात आपलं असं स्थान असावं अस वाटतंय. त्याच हे पहिल पाऊल आहे अस समजून पुढे जायचं आहे.”

“कबूल आहे. ही स्पर्धा आहे हे मान्य. पण जरा विचार कर शैक्षणिक समानता जरी असली तरी आर्थिक असमानता पण भरपूर आहे. तुला मोठं व्हायच आहे मग पहीलं पाऊल सुद्धा दमदार टाक न. माणसाची स्वप्न मोठी असावीच पण ती साकार करण्यासाठी विचार पण खुजे असू नयेत. सुरवात जरी छोटी असली तरी दमदार असावी. जसा नदीचा उगम हा छोटाच असतो पण तो कोणी थांबवू शकत नाही. तशीच आपली सुरवात असावी. छोटी असली तरी त्यात भविष्यातला भव्यतेचा आविष्कार जाणवला पाहिजे. आपल्या ध्येया बद्दल आपल्या मनात जराही किंतु परंतु असू नये. पहा, विचार कर यावर.” – आई.

“आई, प्रश्नांची किती छान उकल करून दाखवली तुम्ही. आता माझ्या मनातली सर्व कोळीष्टीक दूर झाली. आता माझ्या विचारांना खरी दिशा मिळाली. आई तुम्ही खरं तर प्राध्यापकच व्हायला हवं होत.”

“अग मी होतेच प्राध्यापक. गणिताची प्राध्यापक होते मी. ह्यांचा बिझनेस उत्तम चालायला लागला मग सोडून दिली. खरं सांगायचं तर मला रिसर्च मध्ये जास्त interest होता. मग मी पीएचडी ला enroll केल आणि माझा प्रबंध मागच्याच वर्षी submit केलाय. अजून व्हायव्हा व्हायचा आहे. तारीख येण्याची वाट आहे. बघू काय ते.” – आईंनी समारोप केला.

“My god इंजीनियर सासरे, MBA नवरा, आणि सासू पीएचडी. आणि मी कोण साधी B.sc. अस नाही चालणार. ह्या घरात शोभून दिसायचं असेल तर मला माझा स्तर उंचवावाच लागेल. ओके. done.”

“तथास्तु” आई म्हणाल्या.

त्या दिवशी कंपनी मध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या. त्या बद्दलच नितीन आणि बाबा बोलत होते. आईंना तर समजत होत, पण मी अनभिज्ञ होते. मी प्रयत्न करत होते. बऱ्याच वेळ बोलणं चालू होत आई अधून मधून काही विचारत पण होत्या. माझ्या एवढंच लक्षात आल की कुठलं तरी नवीन काम मिळालं होतं. फायनल शिक्का मोर्तब झाल होतं. आणि त्यामुळे येत्या वर्षात लाखों रूपयांचा फायदा होणार होता. आई ज्या पद्धतीने शंका विचारत होत्या त्यावरून त्या बऱ्याच updated असाव्यात असा अंदाज आला. अर्थात ऐकून ऐकून, हळू हळू मला पण सगळं कळायला लागेलच. पण त्याच्या मुळे माझ्या नोकरीचा विषय काही निघाला नाही. मला तर बाई सुटल्या सारखंच झाल. सगळं आवरून बेडरूम मध्ये आले तेंव्हा नितीन गाढ झोपला होता. दिवस भरात बरीच दग दग झाली असेल. थकला असेल असा विचार करून त्याला डिस्टर्ब न करता मी पण आडवी झाले. अंथरुणावर पडले होते पण डोळ्यांवर एवढीशी सुद्धा झोप नव्हती. डोक्यात विचार चालूच होते. शेवटी खिडकीशी जाऊन उभी राहिले.

खिडकीतून बाहेर बघत होते. नजर समोर होती पण काही बघत नव्हते. तितक्यात एक तारा तुटला आणि कार्तिकची आठवण झाली. अंगभर एक शिरशिरी येऊन गेली. कार्तिक! मन केव्हाच भूतकाळात पोचलं होत. कॉलेज मधल्या रम्य आठवणींमध्ये मन केंव्हा गुंतून गेल कळलंच नाही. एकेक प्रसंग मनाच्या पटलावरून सरकत होता.

कॉलेज मध्ये आमचा एक ग्रुप होता सहा जणांचा. मी, विशाखा, चित्रा, दिनेश, वसंत आणि कार्तिक. H B group म्हणून प्रसिद्ध होता. H B म्हणजे हँडसम  आणि ब्यूटीफूल आम्ही तिघी कॉलेज मध्ये सौंदर्याचा लॅंडमार्क होतो. आणि दिनेश, वसंत आणि कार्तिक मध्ये कोण जास्त हँडसम, हे ठरवणं अवघडच होत. आमच्या पैकी कोणीही अभ्यासात कधी कुचराई केली नाही. प्रत्येकाचा first class ठरलेला. कार्तिक आणि चित्रा तर आमच्या दृष्टीने अल्टिमेट होते. आम्हाला सीनियर होते, केमिस्ट्रि मधे M.Sc. करत होते. बाकी आम्ही चौघं B.sc. ला होतो. कॉलेज मधल्या मुला मुलींनी आपापल्या मताने आमच्या जोड्या पण लावल्या होत्या. पण तस आमच्या मधे काहीच नव्हत. आधी कार्तिक आणि चित्रा, आमच्या ग्रुप मध्ये नव्हते. पण एक दिवस विशाखाला केमिस्ट्रि मध्ये अडचण आली. मला पण कन्फ्युजन होतच. मग कोणाला तरी विचारून बघावं, असं ठरवलं. चित्रा खूप हुशार आहे अस ऐकून होतो. तिला गाठायचे ठरवलं. एक दिवस ती कॅंटीन मध्ये एकटीच बसलेली दिसली. विशाखा म्हणाली “ए चल, ती एकटीच आहे आत्ताच जाऊन विचारू.”

आम्ही भीत भीतच समोर गेलो. “ए ती धड बोलेल न, की झिडकारून टाकेल ? हुशार माणसांचा भरवसा देता येत नाही. हुशार माणसं मूडी असतात अस ऐकलंय. काय करायचं ?” मी म्हंटलं. मी जाम घाबरले होते.

“मी विशाखा आणि ही निकिता. आम्ही B.sc. फायनलला आहोत.” विशाखानी चुळबुळत म्हंटलं.

“बरं मग ?” – चित्रा.

“आम्हाला जरा आमच कन्फ्युजन दूर करायचं होत. केमिस्ट्रि मध्ये. Rate Law आणि Third Order Reaction बद्दल.” विशाखाच बोलत होती.

“मग तुमच्या प्रोफेसरांना स्टाफ रूम मधे भेटा न. ते क्लियर करतील तुमचं कन्फ्युजन. प्रोफेसर कोण आहेत ?” – चित्राने विचारलं.

“हुबळीकर सर.” – विशाखा.

“मग बरोबरच आहे. मला आत्ता वेळ नाहीये आपण संध्याकाळी पाच वाजता भेटूया का ?” – चित्रा.

“चालेल. कुठे भेटायचं ?” – विशाखा.

“तुम्ही नेहमी सायकल स्टँड जवळच्या कट्ट्यावर असतां न, तिथेच भेटू. फक्त या वेळी गॉसिप च्या ऐवजी अभ्यासाचं बोलू, ...काय ?” आणि ती हसत हसत निघून पण गेली.

आम्ही speechless. “काय छान हसते ग.” मी विशाखाला  म्हंटलं.

“हो आणि हसतांना तिचं  सौंदर्य पण किती खुलून येत. beautiful. कोणीही हिच्या प्रेमात पडेल.” विशाखा म्हणाली. साडे चार वाजता आमचे सर्व पिरीयडस संपले. आणि आम्ही चौघं कट्ट्यावर. आमची रोजचीच प्रथा होती ही. कॉलेज संपल्यावर कॅंटीन मधून चहा आणायचा आणि कट्ट्यावर बसून थोड्या गप्पा टप्पा, थोडी चकल्लस करायची आणि मग पाच वाजे पर्यन्त घराच्या वाटेला लागायचं. रोजचाच शिरस्ता होता. हां आमचा एक नियम होता की कोणत्याही शिक्षकांची थट्टा मस्करी करायची नाही. ते कसेही शिकवत असले तरी शिक्षक म्हणून आदरणीयच आहेत यावर आमच सर्वांचंच एकमत होत आणि हा नियम सर्वच पाळत होते अगदी कटाक्षानी. आणि म्हणूनच आमचा ग्रुप वेगळाच होता. आज मात्र विशाखा आणि मी केवळ चित्रा बद्दलच बोलत होतो. आणि विषय होता तीच हसणं  आणि हसल्यावर ती किती लोभस दिसते हा. शेवटी दिनेश म्हणाला सुद्धा.

“दोन सुंदर मुली तिसर्‍या मुलीच्या सौंदर्या ची, तिच्या स्मित हास्याची तारीफ करतात आणि ती सुद्धा प्रामाणिकपणे हे जरा आश्चर्यच आहे. मुलींनो हे प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध आहे असा तुम्हाला वाटत नाही का ?”

“ए चल रे तू अजून तिला भेटला नाहीये म्हणून अस बोलतोयस. आत्ता ती येईलच मग मी बघते तुझ्याकडे. बघ आलीच ती.” – विशाखा.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.