निकिता राजे चिटणीस
पात्र रचना
1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
3. निकीता चटणीस नितीन ची बायको
4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
13. कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
भाग ७
भाग ६ वरून पुढे वाचा ...........
निकिता
“दोन सुंदर मुली तिसर्या मुलीच्या सौंदर्या ची, तिच्या स्मित हास्याची तारीफ करतात आणि ती सुद्धा प्रामाणिकपणे हे जरा आश्चर्यच आहे. मुलींनो हे प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध आहे असा तुम्हाला वाटत नाही का ?” दिनेश ची कॉमेंट
“ए चल रे तू अजून तिला भेटला नाहीये, म्हणून अस बोलतोयस. आत्ता ती येईलच मग मी बघते तुझ्याकडे. बघ आलीच ती.” – विशाखा.
“हाय एव्हरी बडी.” – चित्रा.
“हाय. चित्रा, मी आधी ओळख करून देते. मी विशाखा, ही निकिता, दुपारी ही माझ्या बरोबर होती. हा दिनेश आणि हा वसंत. आम्ही सर्वच B.sc. फायनलला आहोत. आणि मी विचारलेल्या टॉपिक वर सर्वांच कन्फ्युजन आहे. आणि ही चित्रा देशमुख, हिला कोण ओळखत नाही ? कॉलेज मधली सर्वात हुशार मुलगी आहे. आणि अर्थात सर्वानुमते कॉलेज क्वीन.”
“वेल्कम टु अवर ग्रुप.” सगळे एक सुरात.
“हं काय प्रॉब्लेम आहे तुमचा आपण सरळ मुद्यांवर येऊ. संध्याकाळची वेळ आहे आणि वाया घालवायला माझ्या जवळ वेळ नाहीये. तेंव्हा सांगा.” - विशाखा
“मघाशी सांगितल्या प्रमाणे आम्हाला. Rate Law आणि Third Order Reaction समजावून घ्यायचं आहे. खूप कठीण आहे समजायला. प्लीज.” – विशाखा.
“म्हणजे तुम्हाला Rate of Reaction आणि Order of reaction समजलेलं नाही. Correct?” – चित्रा.
“हो.” – विशाखा.
“ओके. तुम्हाला क्रिकेट मध्ये इंट्रेस्ट आहे का ?” – चित्रांनी विचारलं.
“अरे, हे काय विचारणं झाल? हिंदुस्थानात अस कोणी आहे का की ज्याला क्रिकेट मध्ये इंट्रेस्ट नाहीये. पण क्रिकेट चा आणि केमिस्ट्रि चा काय संबंध? तुम्ही चेष्टा करताय न?” इति दिनेश
“नाही नाही, मी चेष्टा करत नाहीये. आई शपथ. आणि अहो जाहो ची जरूर नाही. ओके? आता अस बघा क्रिकेट मध्ये रन रेट कसा काढतात ? टोटल रन भागीले नंबर ऑफ ओवर्स बरोबर ?” – चित्रा.
“हो.” – दिनेश.
“आता हे फारच ढोबळ calculation झाल. म्हणजे वर वर पाहील, तर फक्त batsman आणि bowler ह्या दोघांचाच विचार केला आहे. म्हणजे batsman नी किती runs काढले आणि bowlers नी किती overs टाकले एवढंच विचारात घेतल्या गेल आहे. आता पहा हवामान जर दमट असेल, तर त्याचा बॉल वर आणि बॅट वर परिणाम होतो. ओलसर बॉल ला ओलसर बॅट नी टोलवल्यावर चेंडू जास्त दूर जाणार नाही. म्हणजे runs कमी. जर outfield ओलसर असेल तरीही चेंडूची गती तेवढी राहणार नाही. runs कमी. जर फास्ट bowler असेल तर action is to reaction प्रमाणे चेंडू हलक्या ने टोलवून सुद्धा सीमापार जातो. तसंच spinner असेल तर हेच करायला जास्त जोर लागतो. पर्यायाने बॅट्समन थकतो. धावांची गती मंदावते. जर विरुद्ध टिम च्या कॅप्टननी उत्तम फील्डिंग लावली असेल तरीही runs कमी निघतात. अर्थात मॅच बघतांना हे सगळं आपल्या लक्षात येतच. पण रन रेट काढतांना हे सर्व बघितल्या जात नाही. म्हणून हे फार ढोबळ आहे अस मी म्हणते. विज्ञान हे ढोबळमानांवर चालत नाही. सगळ्या conditions पारखून त्यावरूनच निष्कर्ष काढायचा असतो. कळतंय ना मी काय म्हणतेय ते.” चित्रांनी एक प्रवचनच दिलं.
“हो. हो.” – आम्ही सगळेच.
“कुठलीही रासायनिक क्रिया ही फक्त त्या दोन पदार्थांच्या गुण धर्मावर आधारित नसते, तर, conditions under which the reaction takes place need to be observed. आता temp. आणि pressure कायम ठेवून जी रिएक्शन होते ती पदार्थांच्या concentrations वर अवलंबून असते. म्हणजे सोल्यूशन मध्ये पदार्थांची मात्रा किती आहे यावर. हा झाला law of mass action. आता जर catalytic agent वापरला, तर equilibrium कडे जाण्याची गती वाढेल. म्हणजेच rate ऑफ reaction वाढेल. आता reaction rate काढायचा म्हणजे formula वापरायचा. that’all. आता निरनिराळ्या conditions मध्ये रेट कसा असेल ते फॉर्म्युला वापरुन काढणं फार कठीण नाहीये. साध उदाहरण देते. आपण खाण्याचा सोडा पाण्यात घातला तर किती वेळात फसफसेल ते बघा मग गरम पाण्यात सोडा घाला आणि बघा आणि मग गरम पाण्यात लिंबू पिळून थोड मीठ घालून सोडा घाला आणि बघा. आता क्रिया आहे सोडा फसफसण्याची. पाणी गरम म्हणजे temp. Condition बदलली. लिंबू आणि मीठ म्हणजे catalytic agent मिसळले catalytic agent क्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण रेट वाढवतो. I hope you understand now. काही शंका असतील तर विचारा.” – चित्रा म्हणाली.
तिच विषयावर असलेलं प्रभुत्व वाखाण्याजोग होत. समजावून सांगण्याची हातोटी अप्रतिम होती. कुणीच काही बोललं नाही. नुसत्याच माना हलवल्या. “ओके देन. आता उशीर बराच झालेला आहे तेंव्हा order of reaction वर उद्या याच वेळी बोलू. पण माझी एक सूचना आहे. वाचून या म्हणजे समजायला सोप होईल. बाय. शुभ रात्री.” चित्रा म्हणाली आणि गेली सुद्धा.
त्या दिवशी न बोलताच, नुसतं शुभ रात्री म्हणून आम्ही घरची वाट धरली. त्या नंतर चित्रा आम्हाला तीन चार दिवस zero order, first, second, आणि third order reactions शिकवत होती. आमच्या आयडिया एकदम क्लियर झाल्या. ह्या दिवसांत ती आमच्या मध्ये मिसळूनच गेली आणि आमच्या ग्रुपची मेंबर झाली. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस कार्तिक तिला शोधत आला.
“अग चित्रा इथे आहेस होय तू. किती शोधलं तुला.” – कार्तिक.
“काय रे, काय झाल ?” – चित्रा.
“आपण कॉनफरन्स मध्ये पेपर वाचणार आहोत ना, त्याच्या बद्दल सरांना आपल्याशी चर्चा करायची आहे.” – कार्तिक.
“बापरे, आता फार उशीर झाला आहे रे. आता चर्चेला बसलो तर घरी जायला खूपच उशीर होईल. किमान दोन तास तरी जातील.” चित्रा म्हणाली.
“काळजी नको कारूस. मी तस सरांना सांगितलं. तर सर म्हणाले की उद्या कॉलेजला लवकर या. आपण बसू. ठीक आहे ?” – कार्तिक
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चित्रा आणि कार्तिक दोघंही आले. दोघांचेही चेहरे प्रफुल्लित दिसत होते. म्हणाली की “काल तुमची ओळख करून द्यायल्या विसरली म्हणून आज मुद्दाम कार्तिकला पण बरोबर आणलं. हा कार्तिक साने आम्ही दोघंही एकाच बॅच मधे आहोत. आणि पेपर पण दोघ मिळून वाचणार आहोत. कार्तिक, ही विशाखा, ही निकिता, हा दिनेश, आणि हा वसंत. हे सर्व B.sc. फायनलला आहेत.” मग आम्ही चहा पिता पिता बोलत होतो. म्हणजे चित्रा आणि कार्तिकच बोलत होते त्यांच्या पेपर बद्दल. आणि आम्ही ऐकत होतो. त्या दिवशी कार्तिक ला पाहीलं, त्याच्या बरोबर बोलले आणि माझी मी, राहिलेच नाही. त्याचा सहवास हवा हवासा वाटायला लागला. मग मीच त्याला म्हणाले की “welcome to our group.” सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्यानी पाहील पण मग सगळ्यांनीच त्याला वेल्कम केल.
नितीनला जाग आली. निकीताला खिडकी पाशी उभी असलेली पाहून त्यानी विचारलं, “काय ग झोप येत नाही का ? नाही, खिडकीपाशी उभी आहेस म्हणून विचारतोय.”
नितीन उठला वाटत. हं झोप येत नाहीये खरी. पण आता येईल. छान गार वारा अंगावर घेतला आता येईल. नितीन कुशीवर वळला आणि पुन्हा झोपी गेला. पुन: कार्तिक, तो काही माझ्या मनातून जाईना. मग ठरवलं की काही दिवस औरंगाबादला जायचं. तसंही सहा सात महीने उलटून गेलेत. मागच्या वेळेला ऑपरेशन झाल्यावर गेले होते आठ दिवस. मग नंतर तीन चार महिन्यांनी चार दिवस. उद्या नितीनला विचारावं जाऊ का म्हणून. असा विचार केल्यावर मात्र झोप लागली. दुपारी ह्या विषयावर आईशी बोलले. तर त्या म्हणाल्या की “खुशाल जा. तसे मामांना भेटून बरेच दिवस झालेत. काहीच हरकत नाहीये. संध्याकाळी नितीनशी बोल आणि जा उद्या.”
पण रात्री जेवणाच्या टेबलावर, मी काही विचारायच्या आतच नितीन म्हणाला की त्याला उद्या औरंगाबादला जायचं आहे. एक दोन महत्त्वाच्या मीटिंगा आहेत. जवळ दिवस जाईल. “निकिता तू येतेस का, सकाळी लवकर जाऊ तुला घरी सोडतो. मिटिंगा संध्याकाळ पर्यन्त चालतील असा अंदाज आहे. संध्याकाळी वापस येऊ. काय ?”
“अरे काय हे नितीन! आई म्हणाल्या. तिला जरा किमान आठ दिवस तरी राहू दे. माहेरी जातेय तर एक दिवसांत कस म्हणतोयस परत येऊ म्हणून.” – आईच म्हणाल्या.
बर झाल आईंच म्हणाल्या. पण नितीनचा चेहरा पडला होता. पण तो काही बोलला नाही. नुसतीच होकारार्थी मान डोलावली. मला म्हणाला “आज रात्रीच बॅग भरून ठेव म्हणजे सकाळी उशीर होणार नाही.” रात्री सगळी आवरा सांवरी करून बेडरूम मध्ये पोचले तेंव्हाही स्वारी घूश्यातच होती. मला एकदम हसू फुटलं. त्याचाही त्याला राग आला. बोलायलाच तयार नव्हता शेवटी मीच हार पत्करली.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.