निकिता राजे चिटणीस - भाग ३ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निकिता राजे चिटणीस - भाग ३

निकिता राजे  चिटणीस

पात्र  रचना

 

1.       अविनाश ͬचटणीस                         चंदन इंजीनीǐरंग चे मालक

2.       नीतीन चीटणीस           अविनाश चिटणीसांचा मुलगा

3.       निकीता चटणीस           नितीन ची बायको

4.       शशीकला ͬचटणीस          नीतीन ची आई

5.       रघुनाथ (मामा) राजे        निकीताचे मामा

6.       पार्वती ( मामी )राजे       निकीता ची मामी

7.       मुकुंद देशपांडे             अविनाश चिटणीसांचे मित्र

8.       अनंत दामले             मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

 

 

 

भाग ३

 भाग २ वरून पुढे वाचा .......

नितीन

“डॉक्टर म्हणतात अपेंडिक्स काढून टाकाव लागेल. तिच्याकडे बघवत नाही हो. इतक्या वेदना होत आहेत की जीवाचा थरकाप होतो.”

....

....

“बाबा आहात ना ? फोन कटला वाटत, पावसामुळे फोन च काही खरं दिसत नाही.”

“अरे बाबा मी लाइन वरच आहे. तू बोल. टेस्टस केल्यात का ?” – अविनाश.

“हो. सोनोग्राफी करताहेत, अजून रीपोर्ट यायचाय. आता मधे थोडा वेळ मिळाला म्हणून लगेच तुम्हाला कळवतोय.”

“अशा गाव खेड्यांमद्धे अशी मोठी शस्त्रंक्रिया म्हणजे प्रॉब्लेमच.” – अविनाश.  

“बाबा अस का म्हणता हे हॉस्पिटल खूपच चांगल आहे, आणि डॉक्टर राजवाड्यांशी बोलल्यावर तर आम्ही, एकदम आश्वस्त झालो. तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हालाही असच वाटेल. हवं तर मुकुंद काकांशी बोला, इथे दामलेकाका पण आहेत, त्यांच्यांशी पण बोला.”

“अरे मी डॉक्टरांच्या अनुभवा बद्दल बोलत नाहीये. अनुभवी आहेत, नक्कीच चांगले असतील. पण समजा जर काही कॉमप्लीकेशन झाले तर त्यांचं निवारण करण्या साठी अश्या ठिकाणी सर्व सोयी असतीलच असं नाही, असा विचार मनात आला. अजून काही नाही.” अविनाश नी आपली शंका बोलून दाखवली.

“हां हे नाकारता येत नाही. पण बाबा, आता अश्या परिस्थितीत आपण काय करू शकतो ?”

“तेच, तेच तर म्हणतोय मी. डॉक्टरांना म्हणावं वेदना कमी करण्यासाठी औषधोपचार करा. दुख: कमी झाल्यावर तिला गाडीत घाल आणि पुण्याला या. इथे बरीच super speciality hospitals आहेत. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपल्याला काही टेंशन राहणार नाही. परत इथे आपल्याकडे माणुसबळाची पण कमतरता भासणार नाही.” – बाबांनी  त्यांना काय वाटतं ते सांगितलं.

“बरोबर आहे बाबा तुमचं म्हणणं पण पुण्याला आजच्या आज आणण शक्य नाही. इथली परिस्थिति खूप विचित्र आहे.”

“आता याच्यात काय विचित्र आहे ? साधी सरळ सोपी गोष्ट आहे. गाडीत घाल आणि घेऊन ये संपल.” – बाबा.

“...... कसं सांगू sss, बाबा, एक तर काल संध्याकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आत्ताही पडतोच आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झालय. दहा फुटावरच दिसत नाहीये. वर आपली गाडी बंद पडली आहे. काल दामले काकांनी आणलं म्हणून अॅडमिट तरी करता आल. त्यांचे उपकारच मानायला हवेत. अगदी देवासारखे धाऊन आले. खरं तर या वयात अश्या वेदर मध्ये गाडी चालवण त्यांच्या साठी फार अवघड गोष्ट होती. पण त्यांनी मागे पुढे न पाहता मदत केली.”

“Ok. यांचा अर्थ, आपल्याला फारसा चॉइस दिसत नाहीये तेंव्हा लेट अस फेस इट.” बाबांनी मला धीर दिला. “तू मात्र धीर सोडू नको. खंबीर रहा ते जास्त जरूरी आहे. आम्ही पण लगेच  निघतोच.” – बाबा.  

“बाबा तुम्ही स्वत: ड्राइव्ह करू नका. ड्रायव्हर घ्या.” मी तेवढ्यात बाबांना सांगितलं.  

“अर्थातच ड्रायव्हर घेणार. अश्या हवेत कोण गाडी चालवणार. इथे पण चांगलाच पाऊस पडतो आहे.” – बाबा.

“ठीक तर मग वाट पहातो. पण मग आता डॉक्टरांच्या म्हणण्या प्रमाणे पुढे जायच ना ?”

“नक्कीच, डॉक्टरांचा सल्ला प्रमाण ते म्हणताहेत तसंच करा. बर ठेवतो आता. तयारी करायची आहे. ड्रायव्हरला फोन करायचा आहे. ओके?” – बाबांनी  फायनल सांगितलं.

“ओके, निघाल्यावर फोन करा.”

“करतो.” – बाबा.

हुशः एक काम झाल. आता रीपोर्ट आला का ते बघाव. चला नितीनराव चला. बसायला वेळ नाही.

हॉल मध्ये मुकुंद काका बसले होते आणि दामले काका फेऱ्या मारत होते.

काका रीपोर्ट आला का

“नाही अजून.” – मुकुंदराव.

“मी विचारून येतो.”

“हे अनंतराव आता पर्यन्त चार वेळा विचारून आलेत. पण तुझे फोन झालेत का. काय म्हणाले बाबा ?” – मुकुंदराव

“बाबांना सर्व डीटेल मध्ये सांगितल. ते इथे यायला निघताहेत. कारनेच येतायत.”

“अरे एवढ्या पावसात कार चालवत येणार ? काल पाहिलंसना अनंतरावांना किती त्रास झाला ते.” मुकुंदकाका जरा आश्चर्यानेच म्हणाले.  

“हो बाबांना म्हंटलं मी, की ड्रायव्हर ला बोलवा म्हणून.”

“मग ?” – मुकुंदकाका

“हो म्हणालेत.”

डॉक्टरांनी बोलावल आहे. नर्स सांगत आली.

“हं” डॉक्टरांच्या समोर सोनोग्राफी चे फोटो होते. आणि एक रीपोर्ट चा कागद . “काय करू प्रथम फोटो समजाऊन सांगू का फायनल रिपोर्ट सांगू. ?”

“डॉक्टर फोटो राहूद्यात तसंही आम्हाला त्यातलं काही कळणार नाही. तुम्ही रीपोर्ट काय आहे तेच सांगा.” मुकुंदकाका म्हणाले.

“Ok. कंडिशन विशेष चांगली नाहीये. infection ची मात्रा बरीच आहे. खूप सूज आलेली आहे. त्वरित ऑपरेशन करांव लागणार आहे. आपल्या जवळ थांबण्यासाठी फारसा वेळ नाहीये.” – डॉक्टरांनी थोडक्यात पण स्पष्ट सांगितलं.

“तरी किती वेळ आहे आपल्या कडे ? म्हणजे माझे आई बाबा पुण्याहून इकडे यायल्या आत्ता निघताहेत म्हणून ....” मी विचारलं.

“दोन चार तास थांबू शकतो पण तेव्हढेच. शिवाय पेशंटला तितका जास्त वेळ वेदनांचा त्रास होणार.” डॉक्टर म्हणाले.

“नितीन जर आपण इमर्जनसी  पर्यन्त पोचलोच आहोत, तर चार तास थांबून काय साधणार आहोत. परिस्थिती अजून खराब होण्याची वाट का बघायची? त्या पोरीला इतक्या वेदना सहन करण्याची किती शक्ति उरली असेल हाही एक प्रश्नच आहे. माझ्या मते तू बाबांना फोन लाव आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे.” – दामले काका

मी थोडा विचार केला. दामले काकांच्या बोलण्यात तथ्य जाणवत होत. बाबांना फोन लावायला हवा. “मला पाच मिनिटे द्या. मी फोन लावतो.” मी डॉक्टरांना म्हंटल .

“अरे अरे, इतक पॅनिक होण्याच काहीच कारण नाहीये. तू, बाबांशी बोल, या काकांशी बोल, आणि जरूर वाटली तर माझ्याशी बोलणं करून दे. आपल्या जवळ तेवढा वेळ नक्कीच आहे. ओके?”  डॉक्टर म्हणाले.

“ठीक आहे. समजा बाबांना तुमच्याशी बोलायच असेल तर तुम्ही कुठे असाल ?”

“मी इथेच आहे. काळजी करू नकोस.”- डॉक्टर    

आम्ही हॉल मध्ये बसून एकमेकांकडे बघत बसलो.काय बोलावं ते सुचेना. तसा  दामले

काकांनी मघाशी निर्णय दिलाच होता. त्या दोघांचही त्यावर एकमत होत. माझीच द्विधा मनस्थिती झाली होती.

“मग नितीन काय म्हणतोस .मला अस वाटत की तू एकदा जाऊन तिची तब्येत बघून ये. इथे आल्या पासून  ती एकटीच आहे. तिला जरा धीर येईल तुला बघून. थोडा वेळ बस तिच्या बरोबर” दामले काका म्हणाले.

“बाबांना फोन करू का, काय करू ? बाबांनी डॉक्टर म्हणताहेत तसंच करा, अस मघाशी फोन केला तेंव्हाच  सांगितलं. पण मलाच ठरवता येत नाहीये. तुम्हीच सांगा “

“जे काय करायचं ते लगेच कर. मी बोलू का बाबांशी? पहा ठरव  काय ते.” – मुकुंद काका.

“खरंच तुम्हीच बोलता का?” मला यावेळी त्या दोघांचाच आधार होता.

“ओके मी बोलतो पण तू जाऊन  तिला धीर दे. आणि हे बघ गंभीर चेहऱ्याने बसू नको. लाईट मूड घे. जा आता. मी बोलतो.” मुकुंद काका म्हणाले.

“हॅलो”

“हॅलो अविनाश मी मुकुंदा बोलतोय.”

“हुं , बोल काय परिस्थिति आहे?” – बाबा

“डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन लगेच करावं लागणार आहे. तसे ३_४ तास आहेत हाताशी. तू येई पर्यंत, पण प्रश्न हा आहे की एवढा वेळ वाया घालवायचा का ?” - मुकुंद काका.  

“अरे तुम्ही लोकं आहात ना तिथे मग परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घ्या. माझ्यासाठी थांबण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही. वेळ घालवण्यात काही अर्थ

नाही. कारण ऑपरेशन तर अटळ आहे. आम्ही आता निघतोच आहोत. कोणच हॉस्पिटल म्हणालास राजवाडे हॉस्पिटल?” – बाबा

“हो.” – मुकुंद काका

“चल तर मग ठेवतो.” – बाबा.

क्रमश: .............

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.