निकिता राजे चिटणीस
पात्र रचना
1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक
2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा
3. निकीता चटणीस नितीन ची बायको
4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई
5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा
6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी
7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र
8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी
9. चित्रा पालकर निकीताची कॉलेज ची मैत्रीण
10. विशाखा नाडकर्णी निकीताची कॉलेज ची मैत्रीण
11. दिनेश कळसकर निकिता चा कॉलेज चा मित्र
12. वसंत कुलकर्णी निकिता चा कॉलेज चा मित्र
13. कार्तिक साने निकिता चा कॉलेज चा मित्र
भाग 9
भाग 8 वरून पुढे वाचा ...........
निकिता
“तू अस कर आधी मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन यांचे short कोर्स असतात. ते जॉइन कर. साधारण वर्ष सहा महिन्यांचे असतात. वर्षभरानंतर तुला बऱ्याच गोष्टी कळायला लागतील. त्यानंतर अकाउंटस चे क्लासेस लाव. ते पण तसेच असतील. तुला बॅलंस शीट आणि प्रॉफ़िट अँड लॉस अकाउंट, टॅक्सेशन वगैरे समजायला लागेल. वर्ष दीड वर्षात बऱ्यापैकी ज्ञान वाढेल. मग ट्रेनी म्हणून तू कंपनी जॉइन कर. नितीन ला सांग की मला कोणतीही सूट सवलत नकोय. इतर ट्रेनी सारखीच वागणूक मिळावी. मग कोणी काही म्हणणार नाहीत. तुझ्याशी cooperate करतील. उलट तुला सन्मानाची वागणूक मिळेल. मालकांची बायको असूनही साध्या कर्मचार्याप्रमाणे काम करते आहेस हे पाहून अत्यंत आदराने तुझ्याकडे बघतील, काही काळानंतर तूच त्यांची बॉस असणार आहेस हे सुद्धा सहज स्वीकारल्या जाईल. आणि तुझ्या पासून कोणतीही माहिती लपवून ठेवणार नाहीत. तुझा प्रत्येक शब्द झेलल्या जाईल, तुझ्याशी जवळीक साधण्याचाही सगळ्यांचा प्रयत्न असेल. कोणाला जवळ येऊ द्यायचं आणि कोणाला जरा दूरच ठेवायचे हे पण कळायला लागेल .ह्याच्यात वेळ जाईल पण हाच प्रॉपर मार्ग आहे. आता याच्यापुढच्या पायऱ्या भराभर कशा चढायच्या ते तुझ्या हुशारीवर आणि skill वर अवलंबून असेल. दोन तीन वर्ष जातील पण काम पक्कं होईल. तू हुशार आहेस, काही वर्षांतच कंपनी ची आधार स्तंभ होशील ह्याची मला खात्री आहे. बघ. विचार कर.” कार्तिकनी एक लांबलचक भाषणच दिलं.
कार्तिक is great. विचार ठरला, अगदी पक्का. “कार्तिक अरे तू तर केमिस्ट्रि चा विद्यार्थी मग हे ज्ञान कुठून आणलं ?”
“मी खूप वाचन करतो. जे जे मिळेल ते वाचतो. माहिती मिळते. ज्ञान वाढतं, नेहमीच काही परीक्षेचा अभ्यास करायचा नसतो. तू पण वाचायला सुरवात कर. तुला आवडत नाही हे मला माहीत आहे पण स्वत:ला ही सवय लाव. बहुश्रृत होशील. आणि विविध प्रकारची माहिती असल्यामुळे कुठल्याही थरात सहज मिसळून जाशील. असे बरेच फायदे आहेत वाचनाचे. आवड जर नसेल तर हे कष्टाचं काम आहे. याची मनाला सवय लावावी लागते. पण खूप फायदा होतो. करून बघ.” – कार्तिक.
आता संध्याकाळ होत आली होती. आम्ही एकमेकांना गुड नाइट करून निघालो.
घरी पोचले तेंव्हा नितीन यायचाच होता. मामीला खूप प्रश्न विचारायचे होते मला. थोडक्यात मी सुखी आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होत. त्यांच समाधान केल. त्यांची काळजी मिटली. नितीन आला, मला म्हणाला चला निघूया. मामांनी फार आग्रह केला की निदान आजच्या दिवस थांबून जा म्हणून. पण नितीननी कामाची सबब पुढे केली. शेवटी जेवून जायला तयार झाला. जेवताना मामा आणि नितीन बरंच काही बोलत होते. पुण्याला पोचायला आम्हाला रात्रीचा एक वाजला. पण नितीन खुशीत होता. एक तर नवीन काम मिळण्याचे chances दिसत होते. आणि दुसरं म्हणजे मी राहण्याचा हट्ट केला नाही. तो खुश तर मी खुश.
दुसऱ्या दिवशी नितीन आणि बाबा ऑफिस ला गेल्यावर माझी शोध मोहीम सुरू झाली. बराच रिसर्च केल्यावर एका क्लासचे डिटेल्स समाधानकारक वाटले. आईंना सांगितलं की नुसतं घरी बसण्यापेक्षा, काही तरी शिकावं अस वाटतंय म्हणून क्लासेस बद्दल जी काही माहिती गोळा केली होती ती तपशीलवार त्यांना सांगितली आणि त्यांनी मान डोलावून होकार दिल्यावर मी लगेच बाहेर पडले. आणि तो क्लास लावून टाकला. दोन दिवसांनीच बॅच सुरू होणार होती. आईंना आल्यावर सांगितलं की “क्लास लावला. दुपारी बारा ते तीन अशी वेळ आहे.” तर म्हणाल्या की “बरच झाल. ज्ञान केव्हाही घेतल तरी वाया जात नाही. उत्तम. आणि तुझाही वेळ सत्कारणी लागेल.”
मला अस वाटलं होत की जेवणाच्या टेबलावर हा विषय निघेल. पण नितीन आणि बाबा नवीन कामाच्या रूपरेषा आणि ते वेळेत कस पूर्ण होईल यावरच बोलत होते. आम्हा दोघींना मध्ये बोलायचं काहीच कारण नव्हत. आम्ही शांतपणे जेवत होतो. काय हवं नको तेवढं बघत होतो. जेवणं आटोपली, थोडा वेळ टीव्हीवर मालिका बघू म्हंटल तर या दोघांच जोरजोरात डिसकशन. मालिका पण गेल्या. शेवटी मला झोप यायला लागली. दुपारची डुलकी काढता आली नव्हती. मी एक्जिट घेतली. बेडरूम मध्ये जाऊन पडले. झोप येतच होती. मला झोप लागे पर्यन्त तरी नितीन झोपायला आला नव्हता. आमचा क्लास सुरू झाला. अजूनही नितीनशी बोलणं झालंच नव्हत. तो त्यांच्या कामात इतका व्यस्त होता की त्याला माझ्याकडे सुद्धा पाहायला फुरसत नव्हती. आईंशी बोलले तर त्या म्हणाल्या की “राहू दे आत्ता तो कामाच्या खूप गडबडीत आहे. नंतर थोडा मोकळा झाला की बघू. तू तुझा क्लास चालू ठेव.”
क्लास मध्ये पहिल्याच तासाला अकॅडेमी चे प्राचार्य आलेत. ते म्हणाले की “तुमचा अभ्यासक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी जरा १० मिनिटे बोलणार आहे. इथे तुम्हाला administration म्हणजे व्यवस्थापन हा विषय शिकवला जाणार आहे. व्यवस्थापकीय अधिकाऱ्याचं काम नेमकं काय असत ? हा अधिकारी त्या त्या ऑफिस किंवा कंपनी चा कुटुंब प्रमुखच असतो. म्हणजे आपले वडील कुटुंब प्रमुख असतात. ते काय करतात तर सगळ्यांची काळजी वाहतात. कोणाला काय जरूर आहे हे त्यांना बरोबर कळत. कोणाची काय इच्छा आहे आणि आपण काय देऊ शकतो यांचा ताळमेळ घालून निर्णय घेतो. कोणाची अव्वाच्या सव्वा मागणी असेल तर समजावून सांगतात, नाहीच ऐकलं तर वडिलकीचा अधिकार वापरतात. ते असं का करतात तर कुटुंबाचं गाडं सुरळीत चालाव म्हणून. ह्या अधिकार्यांची पण हीच कर्तव्य असतात. एक म्हणजे कंपनी सुरळीत चालावी जेणेकरून सर्व कामं वेळच्या वेळी व्हावीत. सगळ्यांच्या सोबत सुसंवाद साधायचा म्हणजे त्यांच्या बद्दलची सर्व माहिती जाणून घ्यायची. लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि त्यातून मार्ग काढायला त्यांची मदत करायची. कर्मचारी जर आनंदात असेल तर कामात तो कुचराई करणार नाही. कंपनी ची कामे वेळच्या वेळी झाली तर व्यापार वाढेल प्रॉफिट वाढेल आणि त्याचा सर्वांनाच फायदाच होईल. त्यांना तुमच्या बद्दल आपलेपणा वाटला पाहिजे पण त्याच बरोबर तुमचा धाकही वाटला पाहिजे. एक गोष्ट महत्त्वाची अशी की प्रेमानी, गोड बोलून ९० टक्के कामे होतात. तेंव्हा आवश्यक तिथेच अधिकाराचा वापर करा. धन्यवाद.”
तीन महिन्याच्या कोर्स चा सारांश सरांनी १० मिनिटांत सांगीतला. आता शिकायचा तो विषयाचा तपशीलवार अभ्यास. कोर्स ची कल्पना बरीचशी आली होती. करू शकेन असा आत्मविश्वास पण वाटला.
मग पुढचे अडीच महीने, स्टाफ लिस्टिंग, मस्टर रोल, पे रजिस्टर, लीव रजिस्टर, आणि त्यांचे सविस्तर तपशील, प्राथमिक उपचार बॉक्स आणि सेवा. आपत्कालीन सेवा, सर्व साधारण व्यवस्थापन अश्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या. नंतर चे १५ दिवस स्टाफ मधल्या व्यक्तींचे वेगवेगळे स्वभाव आणि त्यांच्याबरोबर संवाद कसा साधायचा, आपल्याला हवी असलेली माहिती त्या व्यक्तीला ना दुखवता कशी काढून घ्यायची, आणि त्या माहितीच्या आधारे रजिस्टर कसं भरायचे आणि भरताना माहितीच वर्गीकरण कसं करायचं. आणि सगळ्यात शेवटी माहितीच विश्लेषण कसं करायचं हे सर्व शिकवलं. आणि ह्याच्यासाठी एक मोठ्या कंपनी मधून निवृत्त झालेले H R MANAGER आणि एका कॉलेज मधले मानसशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक यायचे. खरं म्हणजे १२ ते तीन अशी क्लास ची वेळ सांगितली होती. पण दुसऱ्याच दिवसापासून वेळ बदलून ती ११ ते पाच करण्यात आली. शिकवण्याची पद्धत इतकी छान होती की आम्हाला वेळेच ओझं कधी जाणवलंच नाही. तीन महिन्यातच आमच ज्ञान खूप वाढून गेलं, क्लास संपला . आता प्रॅक्टिकल. त्याच्यासाठी पांच कंपन्या तयार होत्या. आमच्या ग्रुपची पाचा मधे वाटणी झाली. माझ्या वाट्याला चंदन इंजीनीरिंग ही कंपनी आली. म्हणजे आमचीच की. मला तर प्रश्नच पडला की काय करावं शेवटी ठरवलं की आईंनाच विचाराव. आईंशी बोलल्यावर लक्षात आलं, की बाबांचा रघुवीर आणि नितीनचा पंडित, ह्या दोन ड्रायव्हर शिवाय कंपनीत कोणीच मला ओळखत नाही. मग आईच म्हणाल्या की “तू संध्याकाळच चहा पाणी बघ मी रघुवीर आणि पंडित शी बोलते. तू मुळीच काळजी करू नको. उद्या जा. पण miss राजे म्हणून जा. चिटणीस आडनाव लावू नको. झालं. प्रश्न मिटला.”
“पण आई ह्या दोघांना पण कळायला नको.”
“नाही कळणार. तू सांगशील तेंव्हाच कळेल मग तर झालं ?” – आई.
आमच दुसऱ्या दिवसापासून प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरू झालं.
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.