मला स्पेस हवी पर्व २ भाग २६ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग २६

मला स्पेस हवी पर्व २ भाग २६

२४ व्या भागात आपण बघीतलं की नेहाला फोन येतो. फोनवर सुधीरचं नाव बघून नेहाच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. आज या भागात बघू नेहा सुधीरशी फोनवर कशी बोलेल.

“हॅलो”

“हं काय करतेस? “

“ऑफिसमध्ये केलाय फोन तर मी ऑफिसमध्येच असणार नं? सुधीर तूपण ऋषी सारखाच प्रश्न केला.”

सुधीरला आपण विचारलेला प्रश्न खरच बालीश होता हे लक्षात आलं.तो हसला.

“हो मी ऋषीसारखच विचारलं. गंमत सोड. चार दिवस मला वेळ झाला नाही तर तू फोन करायचा. “

“माझ्या मागे पण गडबड होती. तुला एक बातमी द्यायची आहे”

‘कोणती? तू पुण्याला परत येते आहे?”

“नाहीरे बाबा रमण शहा मघाशी “

“काय ? रमण शहाचं काय?”

नेहाचं वाक्य पूर्ण होऊन देताच सुधीर जोरात बोलला.

“अरे ऐकून घे.”

“बोल.”

“रमण शहाने मघाशी ऑफिसमध्ये येऊन माझी क्षमा मागितली.”

“क्षमा मागितली??”

“हो.”

“नेहा रमण सारखी माणसं फसवी असतात.त्याच्यावर कसली विश्वास ठेवलेस?”

सुधीर गेले सहा महिने मी रमण शहाला ओळखते आहे त्याचा चेहरा बघून कळत होतं की त्याला खरच पश्चात्ताप झालेला आहे. म्हणत होता की त्याच्या बायकोने त्याला समजावले त्यामुळे त्याला त्याची चूक लक्षात आली आहे”

“नेहा रमण कितीही शपथेपूर्वक सांगत असला तरी अशा माणसावर विश्वास ठेवायचा नसतो.”

“मी आता आधी सारखी घाबरट राहिली नाही.माफी मागूनही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला चांगली समज देईन.तू खूप काळजी करू नकोस.”

“नेहा त्या माणसाला मी बघीतलं तेव्हा कळलं नाही हा असा का बोलतोय? त्याची अस्वस्थता कळत नव्हती पण त्याचा बावरलेला चेहरा, गोंधळलेले डोळ्यातील भाव मला कळले होते पण त्या मागचं कारण तू सांगीतल्यावर कळलं.अग तो रमण तुझ्यासाठी पूर्ण वेडा झाला आहे हे लक्षात आलं माझ्या. अग त्याला तुझं घरही माहिती आहे. तो ऑफिस मध्ये नाही पण घरी येऊन त्रास द्यायला लागला तर?”

“सुधीर शांत हो. तो घरी आला तरी मी दार ऊघडणार नाही.मग तो घरात कसा येईल?”

“’तू म्हणतेस त्यात तथ्य असलं तरी मला काळजी वाटणारच. त्याने माफी मागितली असली तरी त्याच्या बोलण्यावर एकदम विश्वास ठेऊ नकोस. कुणास ठाऊक माफी मागणं हेसुद्धा त्यांचं नाटक असू शकेल!”

“हो असू शकेल पण सुधीर रमण शहाबद्दल जोपर्यंत तुला कळलं नव्हतं तोपर्यंत मी त्याला घाबरायची. तुला ही गोष्ट कळली तर तू कसा रिॲक्ट होशील यांची भिती वाटायची. पण तुला ही गोष्ट कळूनही तू ज्या प्रकारे मला धीर दिलास, समजून घेतलंस त्यामुळे मला आता त्याची भिती नाही वाटत. आता मी त्याला वठणीवर आणू शकते.”

“तू आता घाबरत नाहीस हे चांगलं झालं पण तरीही जपून रहा. या आठवड्यात पुण्याला ये.”

“हो बघते.”

“बघू नकोस ये आईबाबा तुझी आठवण काढतात आहे. परवा अक्षयपण म्हणाला की तुझ्या आईबाबांना पण तू सुट्टीत पुण्याला यावं असं वाटतं आहे. नेहा सहा महिन्यांच्या वर झाले तू पूणं सोडून.”

“सुधीर मला पण आता यावसं वाटतंय. माझ्या कामाचं शेड्युल बघते.जाहीरातीची जुळवाजुळव कुठवर आली ते बघते मग येते. “

“नक्की ये. बहुदा प्रणालीचा फोन येईल तुला. नेहाला फोन करू की नको असं मला विचारत होती.”

“विचारायचं काय? “

नेहाला आश्चर्य वाटलं.

“नेहा तू इतकी तडकाफडकी पुण्याहून बंगलोरला गेलीस की सगळ्यांना तुझी भिती वाटते.तू नीट बोलशील की नाही? “

“ प्रणालीला सांग घाबरू नकोस.नेहा नीट बोलेल.”

“मी सांगीतलं. पण तू तिच्या फोनची कशाला वाट बघतेस? तू कर फोन.”

“हो मीच करेन.चल ठेऊ फोन.ऑफीसमध्ये आहे.”

“हो ठेव बरं वाटलं तुझा आवाज ऐकून.”

“मलासुद्धा.”

नेहाने फोन ठेवला.तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. त्यात सुधीर बंगलोरला आल्यावर त्याच्याबरोबर घालवलेल्या मधुर क्षणांची आठवण रेंगाळत आली.

या आठवणीत नेहाला भरभरून आत्मविश्वास देण्याचं सामर्थ्य होतं.

नेहाने फोन ठेवला तेव्हाच तिच्या टेबलवरचा इंटरकॉम वाजला. तिने फोन घेतला.पलीकडून ताम्हाणे साहेब होते.

“गुड मॉर्निंग साहेब “

“गुड मॉर्निंग. मॅडम तुम्ही जरा केबिनमध्ये या. त्या टूर्सचं वेळापत्रक जर तुमच्या हातात आलं असेल तर त्याबद्दल आणि जाहीरातीबद्दल चर्चा करूया.”

‘हो सर.लगेच येते.”

‌नेहा फोन ठेवून ताम्हाणे साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी तिने अपर्णा आणि राजेशला फोन करून ताम्हाणे साहेबांच्या केबिनमध्ये बोलावलं.

ताम्हणे साहेबांच्या केबिनमध्ये नेहा शिरली पाठोपाठ अपर्णा आली.

“या बसा.”

दोघी साहेबांच्या समोरच्या खुर्चीवर बसल्या.

‘राजेश सर येतील एवढ्यात ते आले की टूर्सचं प्लॅनींग बघता येईल.”

“ठीक आहे. नेहा मॅडम तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे आपण या वर्षी उन्हाळ्यात टूर न्यायचं ठरवलंय.मागची जाहिरात सेलिब्रिटींकडून केली पण यावेळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण टूरची जाहिरात आपल्या प्रवाशांना घेऊन करायची आहे. तेव्हा तुम्ही ही गोष्ट कशी आमलात आणणार आहे? त्या साठी काही प्रयत्न झाले आहेत का?”

साॅरी. मधल्या काळात मी आजारी पडल्याने हे काम जरा लांबलं आहे पण आता माझ्या विभागाने काम सुरू केलय. अपर्णा..”

नेहाने अपर्णाकडे बघीतलं.

“हो मॅडम.सर काही प्रवाशांशी मी बोलले आहे.ते तयार आहेत. मॅडम आल्यानंतर सगळं ठरणार होतं. आता परवाच मी शुटींग कुठे करता येईल म्हणजे स्टुडिओमध्ये न करता लाईव्ह लोकेशन कुठे घेता येईल याबाबत सत्यम ॲडव्हर्टायझिंग कंपनीच्या शर्मा सरां बरोबर बोलणं झालं आहे. ते लोकेशन सर्च करून मग मला फोन करतील.”

“ठीक आहे.”

ताम्हाणे साहेब म्हणाले.तेवढ्यात राजेश आला.
“बसा “
साहेब म्हणाले.

“थॅंक्यू”

राजेश ने ताम्हाणे साहेबांना टूर्सचं बुकिंग किती झालं आणि टूर्सचं प्लॅनिंग कसं केलंय ते दाखवलं.

“साहेब यात काही चेंजेस करायचे असतील तर करू शकतो.”

“नेहमीचं आहे तेच ठेवा.”
साहेब म्हणाले.
“ठीक आहे.”
राजेशने मान डोलावली.

“साहेब मी बोलू ?”

नेहाने विचारलं

“हं बोला तुमचे सजेशन नेहमीच छान असतात.”


“सर आपण प्रत्येक वेळी ज्या पाॅंईटवर लोकांना नेतो त्यातले काही पाॅइंट काढून टाकून त्या ऐवजी नवीन काही दाखवलं तर ते एक आकर्षण राहील प्रवाशांना.”

“कोणते पाॅइंट आहेत?”

“ते थोडा रिसर्च करून बघाव लागेल. बाकी लोक दाखवत नसतील असे दाखवू. ते बघताना सिनीयर सिटीझनना छान तिथे रेंगाळलेला आवडेल असे स्पाॅट निवडू. या वयात घाईने सगळं बघण्याची इच्छा नसते .
आवडलेल्या ठिकाणी जरा रेंगाळून तिथल्या काही छान
आठवणी गोळा करायला काही प्रवाश्यांना खूप आवडतं. “

“हं विचार चांगला आहे. तुम्ही तशी ठिकाणं शोधा.”

“हो.”

“लवकरात लवकर हे काम करा कारण तिथे राहण्याची सोय करायची असेल तर लवकर तिथल्या हाॅटेलना काॅन्टॅक्ट करावं लागेल.”

“;हो. दोन दिवसात हे काम करू. राजेश सर तुम्ही एकदोन ठिकाणांची माहिती काढा.”
नेहा राजेशला म्हणाली.

“ हो. लगेचच बघतो.”

“ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी तयार करून फायनल सांगा. जाहीरातींचं स्क्रिप्ट लिहायला नवीन लेखक शोधणार होते ते मिळाले का??”

“हो. सत्यम ॲडव्हर्टायझिंग एजन्सीतील दोन लेखक आहेत आणि आपल्याला एका लेखिकेने काॅन्टॅक्ट केलंय.”
अपर्णा म्हणाली.

“ते तिघं कसे लिहितात यांची टेस्ट घेतली का?”

“नाही.लवकरच तशी टेस्ट घेऊन तुम्हाला सांगू.”

“ ठीक आहे.आता मात्र वेळ घालवू नका. आता परीक्षांचा सीजन येईल तेव्हाच आपल्याला आपल्या टूर्स ची जाहिरात केली पाहिजे.”

“हो होईल ते.

“ठीक आहे. तुमचं रेडी झालं की सांगा. आपल्या टूर्स मध्ये वेगळे पण कसं ठेवता येईल ते बघा…”

“नक्की.तसं वेगळेपण ठेवायलाच हवं.साहेब मला वाटतं झाल असेल बोलणं तर निघू?


नेहाने विचारलं.

“हो चालेल निघालात तरी.”

नेहा, अपर्णा आणि राजेश ताम्हाणे साहेबांच्या केबिन मधून बाहेर पडले.
________________________________
क्रमशः
नमस्कार वाचकहो ‘मला स्पेस हवी पर्व २’ ही कथा मालिका शेवटाकडे आली असली तरी संपलेली नाही. माझ्या घरी पाहुण्यांची गडबड असल्याने वेळेवर भाग लिहून पोस्ट करू शकत नाही त्यासाठी तुमची परवानगी आहे असं समजून काही दिवस मी ब्रेक घेते आहे.नंतर पुन्हा तुम्हाला ही कथा मालिका वाचायला मिळेल.
धन्यवाद.
मीनाक्षी वैद्य.