मुक्त व्हायचंय मला - भाग ५ Meenakshi Vaidya द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुक्त व्हायचंय मला - भाग ५

मुक्त व्हायचंय मला भाग ५


मागील भागावरून पुढे…

दुस-या दिवशी चंदू मालतीच्या ऑफीसमध्ये लंचटाईममध्ये भेटायला जातो.

" मी काल फोन केला होता रघूवीरला." चंदू

"कशाला?" मालती

"अगं दोन महिने झाले तुमच्या लग्नाला.तुझ्याशी बोलणं झालं नाही म्हणून आईबाबा म्हणाले बघ तिला फोन करून ती येत असेल तर.म्हणून मी तुला घरी लॅंडलाईन वर फोन केला तर रघूवीर म्हणाले महत्त्वाचं काम असेल तरच मालतीला माहेरी पाठवीन.तेकाम मला महत्वाचं वाटलं तरच पाठवीत.एवढं बोलून झालं नंतर तुला फोन दे म्हणणार होतो तर त्यांनी फोन कट केला." चंदू

"चंदू यापूढे घरी फोन करत नको जाऊस." मालती

"का?" चंदू

"नाही आवडत त्यांना." मालती

"कमाल आहे सख्ख्या भावाने फोन केलेला आवडत नाही.!" चंदू

हो. दुर्दैवाने आहे तसं आणि ते बदलणार नाही.

"ठीक आहे तुझ्या घरी फोन केलेला चालणार नाही तर तू ऑफीसमधून आपल्या घरी ये. नंतर जा घरी." चंदू

"छे: ते तर अजीबात चालणार नाही." मालती

"का?" चंदू

"ते मधून कधीतरी माझ्या ऑफीसमध्ये फोन करून विचारतात की मी ऑफीसमध्ये आली आहे की नाही." मालती

"कमाल आहे एवढा अविश्वास!" चंदू

"याला अविश्वास नाही म्हणत चंदू हा अन्याय आहे. पण आता इलाज नाही सगळं भोगावं लागेल." मालती

"भोगावं का लागेल? तू नोकरी करतेस ठामपणे आपले विचार मांड" चंदू

"चंदू लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांनी मला काही अटी सांगीतल्या.त्या अटींप्रमाणेच जगायचं.मला रोज ऑफीसमध्ये जायला यायला ते नेमके पैसे देणार.बसला उशीर झाला तरी ऑटो किंवा टॅक्सीचे घरी यायचं नाही.दर महिन्यात पगार झाला की यांच्या हाती पगार द्यायचा.त्यातून  ते रोज मला पैसे देणार." मालती

"बापरे! कठीणच आहे सगळं." चंदू

"जो माणूस लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात न करता नव्या नवरीला अटी सांगत बसला तो काय संसार करणार माझ्याबरोबर. प्रेमाचा अंश त्या माणसात सापडणं कठीण आहे." मालती

"मालती आत्ता फक्त दोन महिने झाले तुमच्या लग्नाला पूर्ण आयुष्य कसं काढशील त्यापेक्षा.." चंदू

चंदूचा वाक्य मध्येच तोडत मालती म्हणाली

"ते शक्य नाही चंदू. घटस्पोट घेणं योग्य नाही. आत्तापर्यंत माझं लग्न झालं नाही म्हणून सगळे प्रश्न विचारायचे त्याने आईला किती त्रास व्हायचा.आता घटस्फोट घेतला तर आणखीन वेगळे प्रश्न राहतील. शिवाय काही वर्षांनी तुला नाही पण नंदाला या विचीत्र परीस्थितीचा कंटाळा येईल.मग सगळंच अवघड होऊन बसेल." मालती

"वाटलं नव्हतं ग हा रघूवीर असा असेल." चंदू

"माझं नशीब रघूवीरची पूर्ण आणि योग्य माहिती आपल्याला कळली नाही.जर कळली असती तर मी हे लग्न केलेच नसतं." मालती

"मग काय आयुष्यभर सहन करशील?" चंदू

"इलाज नाही. आईबाबांना आता त्यांच्या म्हातारपणात दु:ख, चिंता  द्यायची इच्छा नाही." मालती

"तुझी ही अवस्था बघून आईबाबांना तसंही दु:ख होणारच आहे. त्यात तू तुझं पूर्ण आयुष्य कशाला पणाला लावतेस?" चंदू

"मी लगेच घटस्फोट घेतला तरी वेगळं आयुष्य काय जगणार मी? आधी प्रौढ कुमारिका होते नंतर घटस्फोटिता म्हणून जगीन.या दोन्ही आयुष्यात सुखाचे क्षण फार येणार नाहीत. लोकांच्या नजरेतील ती विचीत्र दाहकता सहन करत जगावं‌ लागेल त्यापेक्षा कुणाचीतरी बायको आहे ही स्थिती चांगली आहे.त्यात नोकरीला जाऊ देतात त्यामुळे जरा सुसह्य होतं. घरी रहावं लागलं असतं तर कठीण झालं असतं." मालती

"मालती तुझी परीस्थिती एवढी वाईट असेल असं वाटलं नाही.याने पण आईबाबांना वाईट वाटणारच  आहे." चंदू

"तू आईबाबांना एवढं सविस्तर सांगतो कशाला?" मालती.

"अगं कधीतरी माझ्या तोंडून निघेलच. नंदाला तर सांगणारी.बघ काही दिवस त्याच्या स्वभावात बदल घडवतो का नाही तर सरळ वेगळी हो." चंदू

"बघते." मालती

"कोणालाही तुला भेटायचे असेल तरी ऑफीसमध्येच यावं लागेल." चंदू

"हो तसंच समज." मालती

"कठीण आहे. ऑफीसमधून तू आपल्या घरी चल मग तुझ्या घरी जा." चंदू

"नको.ऊगीच भांडणाला विषय नको" मालती

"बरं चल.मी निघतो." चंदू

"ठीक आहे." मालती

चंदू फारच निराश झाला मालतीला भेटून. मालतीचं लग्नं ठरलं याचा सगळ्यांना किती आनंद झाला होता तो आनंद विरला.

ऑफीसमधून निघताना चंदूची पावलं जड झाली होती.______________________________क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका…मीनाक्षी वैद्य.