मुक्त व्हायचंय मला - भाग ११ Meenakshi Vaidya द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुक्त व्हायचंय मला - भाग ११

मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं ऐकून कितीतरी वेळ माधव आणि सरीता विचारात हरवले.मालती बराच वेळ दोघांचे चेहरे निरखत होती. दोघांनाही हे सत्य पचवणं जड जाणार आहे हे मालतीला आधीच लक्षात आलं होतं. "मुलांनो तुम्ही वेळ घ्या विचार करायला.मी मात्र घेतलेला निर्णय अंमलात आणणार आहे. मी एक घर परवाच पक्कं करून आले आहे.माझा भाऊ म्हणजे तुमचा मामा माझ्याबरोबर आला होता.मी वेगळी राहिले तर मला माझ्या माहेरच्या लोकांना मोकळेपणाने भेटता येईल. माझे आईवडील आता खूप म्हातारे झाले आहेत त्यांना मला काही दिवस तरी माझ्या घरी आणता येईल. मी लग्न झाल्यापासून माझ्या आईवडिलांना सुद्धा मनमोकळे भेटले नाही. तुम्हाला यावंस वाटलं तर माझ्या घरी या तुमच्या आजी आजोबांना तुम्हाला बघायचं आहे भेटायचं आहे. मी उद्याच माझं सामान घेऊन नव्या घरी राह्यला जाईन.त्या घराच्या दारावर माझ्या नावाची पाटी राहील ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे."एवढं बोलून मालती खूर्चीवरुन उठली." माधव सरीता थांबा थोडं मी स्वयंपाक करते इथेच जेऊन जा." मुलं अजूनही त्या धक्क्यातून सावरली नव्हती. त्यांना अपेक्षित नसलेल्या गोष्टी आज कळल्या होत्या.त्यातून त्यांना सावरायला वेळ लागणार होता.मालती मुलांना त्यांच्या विचारात सोडून स्वयंपाकघरात गेली.***एवढा मोठा निर्णय आई कधी घेईल असं त्या दोघांनाही वाटलं नव्हतं. हा निर्णय घेण्यामागे एवढ्या गोष्टी आहेत हे ऐकून  दोघंही सुन्न झाले होते. एकाही शब्द न बोलता फक्त एकमेकांकडे बघत राहिले.”माधव खरच आपलं चुकलं.आपण तिला नेहमीच गृहीत धरलं.आपल्याला जसा राग येतो तसा तिला येत असेल असं कधीच कसं आपल्या मनात आलं नाही....” सरिताला रडू येऊ लागतं.”आपण नेहमी बाबांचच अनुकरण करत आलो.ते चुकीचं वागत आहेत ते आपल्याला कसं कळणार? कारण आईनीही कधी विरोध केला नाही. किंवा आपल्यालाही ती कधी बोलली नाही रागावली नाही. पण आज आपल्याला कळलय तर आता आपण गप्प बसायचं नाही.बाबांना स्पष्ट सांगायचं की आता त्यांनी कसं वागायचं ते.” माधव डोळे पुसत बोलला.”माधव आई ऐकेल आपलं?” सरीताने विचारलं.“बघू प्रयत्न करू." माधव म्हणाला."काहीही झालं तरी आता बाबांना सांगायचच. आपण लहानपणापासून बघतोय ते आईला वाट्टेल तसं बोलायचे. तिचा जराही मान ठेवायचे नाहीत. तिचा त्यांनी मान ठेवला असता तर आपणही तिच्याशी असं बोललो नसतो.” माधव म्हणाला.“हो रे खरच आपलं पण चुकलंय. उशीरा का होईना आपण चूक सुधारू.” थोडावेळ दोघही शांत होते.जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा तिचं महत्व कळतं. ती जोपर्यंत जवळ असते तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातील तिची जागा कधीच समजून घेत नाही. मालती जेव्हा त्यांच्यापासून दूर जायला निघाली तेव्हा सरिता माधवच्या बाबतीत हे घडत होतं.मालतीचा स्वयंपाक होतं आला तेव्हा रघूवीर घरी आला. दोन्ही मुलांना यावेळी घरी बघून आश्चर्य चकीत झाला." अरे तुम्ही दोघं इथे ? अरे एवढं काय काम काढलेत.मघाशी माधव तुझा फोन आला होता पण तेव्हा तू बोलला नाहीस घरी येणार आहे म्हणून" मुलांनी फक्त रघूवीर कडे बघीतले उत्तर काहीच दिलं नाही.रघूवीरला आश्चर्य वाटलं. माधव आणि सरीताला कळत नव्हतं आपल्याशी नेहमी हसून खेळून बोलणारे बाबा खरे आहेत की आईने सांगीतलं ते खरं आहे. दोघं चांगलीच गोंधळली होती.रघूवीरने स्वयंपाकघरात जाऊन मालतीला विचारलं तिनेही माहिती नाही असं उत्तर दिलं.रघूवीर बाहेर आला. खूर्चीवर बसला. आता तो मुलांकडे बघू लागला. त्यांच्या चेह-यारून रघूवीरला कसलाच अंदाज आला नाही.अचानक माधव उठून स्वयंपाकघरात गेला आणि मालतीला म्हणाला" आई आम्ही निघतो." माधव म्हणाला"अरे जेऊन जा. माझा स्वयंपाक झाला आहे."मालती म्हणाली." नको. आता जेवायची इच्छाच नाही.जे आम्हाला माहिती नव्हतं ते आज कळल्यामुळे धक्का बसला आहे."" हो आई." स्वयंपाकघरात येत सरीता म्हणाली." मी समजू शकते तुम्हाला या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल. पण लक्षात ठेवा हे खोटं नाही. मला असं जीवन जगावं लागलं आहे. साध्या सरळ कुटूंबातील मी आणि मला रघूवीर सारख्या विचीत्र माणसाशी लग्न करावं लागलं. हा माझ्यासाठी पण खूप मोठा धक्का होता." मालती म्हणाली. माधव आणि सरीता दोघंही न जेवता आणि रघूवीरशी न बोलता घराबाहेर पडले.रघूवीरला दोघांच्या वागण्याचं नवल वाटलं.***चालता चालता  सरीता म्हणाली "बाबा आईला घटस्फोट देतील? बाबांना आपण काही सांगीतलं तर बाबा हो म्हणतील?”  सरीतानी साशंक मनानी विचारलं, “त्यांचा हो नाही म्हणण्याचा  आता प्रश्नच येत नाही. सरिता आपण इतकी वर्ष आपल्या आईला खरच ओळखलं नाही. बाबांनी त्यांच्या वागण्यातून तिचं चित्रण केलं.  आपण लहान होतो ग आपल्याया या गोष्टी कश्या कळणार होत्या. लहानपणीचं जाऊ दे आत्ता सुद्धा आईनी सांगितल्यावर आपल्या लक्षात आलं. आता आपल्याला आपली चूक सुधारायला हवी. आता आईला तिचं आयुष्य जगायला आपण मदत केली पाहिजे. इतकी वर्ष बाबा आपल्या मनासारखं जगले आता आईची वेळ आहे. बाबा विरोध करतीलच नेहमीप्रमाणे. त्यांचा विरोध आपण मोडून काढायचा. कळलं का?” माधव इतक्या आवेशात बोलत होता की आता त्याला दम लागला. सरिता मात्र अजून विचारातच होती. माधवनी तिला गदगद  हलवलं तेव्हा ती भानावर आली. "अग तुझं लक्षच नव्हतं का? इतक्या वेळ मी काय बोललो तुझ्या डोक्यात शिरलं का?” माधवने विचारलं.“हो...शिरलं नं. माझही हेच म्हणणं आहे. पण हे करायचं कसं? बाबांना हे सगळं कसं आणि कोण सांगणार? माधव मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?” सरीता“कोण म्हणजे? आपण दोघांनी बांधायची. मी बोलीन तू मला मधून-मधून साथ दे. तू पण बोल .कळलं? नुसती बघ्याची भूमिका घेऊ नको.” माधवत्याला वाटत होतं आज जर आपण काही केलं नाही तर आई आपल्याला कधीच भेटणार नाही. तिने संसारातून, घरातून बाहेर पडण्याऐवजी घरातच राहून तिचं स्वातंत्र्य तिला मिळवून दिलं पाहिजे आता उरलेल्या आयुष्यात तिचं जगणं बाबांच्या आयुष्याशी समांतर राहिलं तरी चालेल पण तिला बाबांच्या विचित्र स्वभावाच्या जोखडातून मुक्तं केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपली खरी आई भेटेल. असं माधवला वाटत होतं पण मालती एका घरात राह्यला तयारच नव्हती. त्यामुळे माधव आणि सरीता समोर नवीन पेच उभा राहिला. त्यातून मार्ग काढायला प्रयत्न करायला हवा असं त्यांना मनोमन वाटलं.______________________________क्रमशः. मुक्त व्हायचंय मलालेखिका…मीनाक्षी वैद्य