मुक्त व्हायचंय मला - भाग ९ Meenakshi Vaidya द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुक्त व्हायचंय मला - भाग ९

मुक्त व्हायचंय मला भाग९वामागील भागावरून पुढे…

याही गोष्टीला बरीच वर्ष झाली.मावशींचं गावाकडे जाणं हळूहळू लांबत गेलं.

पुन्हा जेव्हा मालतीला चक्कर आली तेव्हा तिला दिवस होते पण मालतीने या वेळी हुशारी केली रघूवीरला सांगीतलं नाही. पण रघूवीरचा त्रास तीन महिने कसा थांबवायचा यावरही मालतीने तोडगा काढला.

अती श्रमाने त्या दिवशी मालती चक्कर येऊन पडली तेव्हा तिच्या पायाला जखम झाली.त्याला व्यवस्थीत बॅंडेज करून औषध घेऊन मालती आणि मावशी डाॅक्टरांकडून आल्या. त्या पायाची सबब सांगून मालतीने स्वतःला  रघूवीरपासून वाचवलं.

" सूनबाई आता जरा दमाने घ्या.दोन जीवांच्या आहात. आता फक्त पायावर निभावलं जास्त दगदग करू नका.मी आहे नं!" मावशींनी मालतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

" मावशी तुम्ही असतांना मला कसली काळजी नाही.आता रघूवीरला मला दिवस गेले आहेत ही बातमी वेळ पाहून सांगावी लागेल.कारण फार काळ तो माझ्यापासून लांब राहणार नाही. ." मालती म्हणाली.

" हो खरय तुमचं म्हणणं. ठरवा कधी सांगायचं ते." मावशी मालतीला म्हणाल्या.

***त्यानंतर काही दिवस मालती नी तब्येत ठीक नाही याचं नाटक चालवलं.कसं माहिती नाही पण मालतीच्या नशीबाने हे तिचं नाटक चाललं.

कसेबसे तीन महिने पूर्ण झाले.चवथा महिना चालू झाल्यावर मालतीने रघूवीरला सांगीतलं. त्याने प्रचंड आकांडतांडव केलं. पण यावेळी मालती आपल्या निर्णयावर ठाम होती.

"तुला मागच्यावेळी मी सांगीतलं होतं.मला एवढ्यात मूल नको आहे. एवढ्यात का मला मुलंच नको आहे. का खोटं बोललीस माझ्याशी?"

"मला मूल हवंय. मी वाढवणार आहे त्या बाळाला. तुम्हाला प्रेग्नंट व्हायचे नाही किंवा तुम्हाला बाळंतपणाच्या कळा पण सोसायच्या नाहीत. तेव्हा तुमचा निर्णय तुम्ही माझ्यावर लादू शकत नाही. विषय संपला." मालती पटकन रघूवीरला म्हणाली.

" एवढी मिजास आहे. कोणाच्या भरवशावर करणार आहे हे बाळंतपण?" रघूवीरने संतापून विचारलं.

" मावशी आहेत माझ्या मदतीला." मालती

" तिला मी गावी सोडून देतो आहे."रघूवीर म्हणाला.

" साॅरी माझं बाळंतपण होईपर्यंत आणि माझं बाळ मोठं होईपर्यंत मी मावशींना गावी पाठवू शकत नाही." मालतीने सडेतोड उत्तर दिलं.

" तूला विचारतोय कोण? मावशी बॅग भर मी गावी सोडतोय तुला." रघूवीरने ओरडून मावशींना सांगीतलं.

" मी गावी जाणार नाही. जोपर्यंत माझ्या सुनेचं बाळंतपण होत नाही आणि बाळ मोठं होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार." मावशींच्या आवाज नेहमीपेक्षा दमदार होता.

" कोण आहे तुझी सून?" रघूवीरने विचारलं.

" रघूवीर मला मावशी कोण आहेत हे कळलय.त्या इथून जाणार नाहीत." मालतीने उत्तर दिलं.

" अशी कशी जाणार नाही? हे घर माझं आहे." रघूवीर

" ठीक आहे. मी दुसरीकडे भाड्याने घर घेते.तिथे माझा हुकूम चालेल.माझ्या हुकूमाप्रमाणे मावशी माझ्याचजवळ राहतील." मालतीने स्पष्ट बोलून ‌विषय संपवला.

यानंतर रघूवीर काही बोलला नाही.मावशींनाही गावी पाठवलं नाही.

या अपमानाचा ऊट्ट काढायचच हे मात्र रघूवीर सतत आपल्या मनाला बजावत राहिला.

***

मालतीला या सगळ्या गोष्टी इतक्या वर्षांनंतर आठवल्या.सरीता आणि माधवचा चेहरा बघून वाईट वाटलं. मालतीला वाटलं हे सगळे प्रसंग मुलांना सांगावे का?  माधव आणि सरीता यांचा जन्मसुद्धा किती खटपटी करून झाला.

माधवनंतर रघूवीरच्या मनात फार बदल झाला नाही. कारण त्याला मुलांबद्दल आस्थाच नव्हती. मुलं असणं हे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यात अडथळा होता. म्हणून माधव नंतर  रघूवीरचं मालती कडे बारीक लक्षं होतं. माधवचं करता करता मावशी आता थकल्या होत्या. त्यांच वय ऐंशीच्या जवळपास होतं पण मालतीचं बाळंतपण करण्याचा खूप उत्साह होता.

मालतीने याही वेळेस हुशारीने दिवस गेल्याची बातमी लपवली. त्याच्या आक्रस्ताळेपणा कडे अजीबात लक्ष दिलं नाही.

योग्यवेळी मालतीने मुलीला जन्म दिला. मुलीचं नाव सरीता नाव ठेवल्या गेलं. दोन्ही मुलांची नावं मालतीच्या आवडीनें ठेवल्या गेली.कारण रघूवीरला फार काही इंटरेस्ट नव्हता.

***

हे सगळं घडून गेल्याला खूप वर्ष झाली.ज्या मुलांसाठी आपण जीवाचा आटापिटा केला त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी रघूवीरने आयुष्यभर आपल्या विरूद्ध कान भरले.

मुलं लहान होती आपण काही ठोस पावलं उचलली नाहीत त्यामुळे रघूवीर असं करू शकले.आपण पण मुलांसमोर भांडणं नको म्हणून गप्प बसलो. रघूवीर वेगळ्याच मातीचे बनले आहेत. त्यांनी स्वतःच्या आईलाच कधी प्रेमाचं, आदराचं स्थान दिलं नाही तर आपल्याला कुठून देणार!

मालतीला आता प्रकर्षाने वाटू लागलं की  आपले नाही पण त्या आजीचे कष्ट मुलांना सांगायला हवेत. त्या माऊलीने आपल्याला जर पाठींबा दिला नसता तर आज ही मुलं या जगात आलीच नसती.

आज मावशी नाहीत या जगात पण त्यांच्याबद्दल मुलांना सांगायलाच हवं. आजीच्या मामत्वाचा रेशीम बंध मुलांजवललमुलं आपल्याला पुन्हा नक्की भेटायला येतील याची मालतीला खात्री होती.

____________________________

क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका…मीनाक्षी वैद्य