शिणुमा शिणुमा श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

शिणुमा शिणुमा

                     शिणुमाशिणुमा

 

    1978मध्ये बी.एड्. होवून आल्यावर राजापूर तालुक्यात विजयदुर्ग खाडी काठावरच्या कुंभवडे या अति दुर्गम गावात शिक्षक म्हणून माझे करियर सुरू झाले.खाडी पलिकडे मुटाट,मणचे हे गाव सुद्धा संपर्क सुविधेचा अभाव असलेलेच पण इथला समाज बऱ्यापैकी सुधारलेला.खाडीपलिकडे साागवे, कुंभवडे, नाणार,तारळ, उपळे या गावांमध्ये दिवसभरात फक्त एकदा, संध्याकाळी राजापुर डेपोतून वसतीचीगाडी यायची. ती रात्री मुक्कामी थांबून सकाळी राजापुरला जायची. ह्या गावात अजूनसुधारणांचे वारे वाहू लागलेले नव्हते.कुंभवड्यात दोन वर्षे काढल्यानंतर शेजारच्याचनाणार गावात नवीन हायस्कुल सुरु झाले नी मला तिथे मुख्याध्यापक म्हणून संधीमिळाली. मी नाणार हायस्कुलला दाखल झालो. त्या वर्षी दहावी एस्.एस्.सी. च्या नवीनबदललेल्या इंग्रजीच्या पुस्तकात टेलिव्हिजन नावाचा धडा होता. हा धडा शिकवायला सुरुवात केल्यावर माझ्या लक्षात आलं की वर्गातल्या एकाही मुलाने टेलिव्हिजन बघितलेला नव्हता.

       आज या गोष्टींवर कोणी विश्वासही ठेवणार नाही. पण त्या वेळी माझ्या वर्गातल्या जवळ जवळ वीस मुलानी रेडिओ, टेपरेकॉर्डरहीजवळून पाहिलेला नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी स्टाफ वर असलेल्या आम्हापाच शिक्षकांपैकी कोणाकडेच रेडिओ किंवा टेप रेकॉर्डरही नव्हता. आमचे क्लार्क पेडणेकर हे सधन घरातले त्यांच्या घरी या दोन्ही वस्तू होत्या. मी त्याना सांगून  दुसऱ्या दिवशी शाळेतल्या सगळ्याच मुलाना दोन तास एकत्र बसवून रेडिओ आणि टेपरेकॉर्डर वाजवून दाखवला. संपूर्ण शालेतली फक्त दोन मुलंजी मुंबई कणकवली इकडे फिरून आलेली होती त्यानी टी. व्ही आणि  सिनेमा बघितलेला होता. त्यावेळी मी ठरवलं कीह्या मुलाना एकदा सिनेमा दाखवायचाच. अर्थात ही बाब प्रत्यक्षात आणणं महाकठिण होतं.

                हे कसं काय जमवायचं याचा विचार करताना मला अकस्मात आठवलं...... 1971 त्ते75 दरम्याने मी कॉलेज  शिक्षणासाठी  रत्नागिरीला असताना आम्ही रहायचो त्या आगाशेवाड्यात भगवान किल्लेकर यांचं रेडिओ दुरुस्तीचं दुकान होतं. ते हरहुन्नरी आणिप्रेमळ होते. मी आर्टस् ला असल्यामुळे दुपारनंतर  मोकळीक असे. मग अधूनमधून  मी किल्लेकरांच्या दुकानात बसूनरेडिओ, ट्रांझिस्टर लावून गाणीऐकत असे. त्यांच्याकडे रेकॉर्ड प्लेयर आणि जुनी हिंदी मराठी गाणी,नाट्य गीते  यांच्यागोल  रेकॉर्डस्/   तबकड्या होत्या. त्यावेळीही टेप रेकॉर्डर  नी कॅसेट वापरात आलेल्या नव्हत्या. गोल चाकाभोवती फीत गुंडाळायचे टेप रेकॉर्डर कधीमधी दुरुस्तीला यायचे.

            किल्लेकरांकडे  एकदा फिल्ड पब्लिसिटी ऑफिस चा 70 एम्. एम्. फिल्म प्रोजेक्टर दुरुस्तीला आला. त्यावेळी दोनतीन दिवस प्रोजेक्टर त्यांच्या दुकानातच होता. त्यानी आमच्या साठी खास त्या ऑफ़िसरकडून  प्रपंच पिक्चर ची रीळे मागवून घेतली. आगाशे वाड्यातल्या ओसरीवर  आम्हाला प्रपंच सिनेमा  पहायला मिळाले. तसेच काही सुंदर डॉक्युमेंट्री पहाता आल्या. मौजीरामके सपने ही कार्टून डॉक्युमेंट्री  बघितल्यावर कार्टून ही संकल्पना आम्हाला प्रथम कळली. हा संदर्भ लक्षात आला नी मी दोन दिवसानी रत्नागिरी गाठली.

            त्यावेळी माझे मेहुणे- विजुताईचे मिस्टर  सी.व्ही. भावे हे लोकल फंड ऑडीट डिपार्टमेंट मध्ये ऑडिटर होते .  रत्नागिरीला उतरल्यावर मी आधी त्याना भेटायलागेलो. मी कोणत्या कामाला आलो हे बोलल्यावर ते म्हणाले , “हात्तीच्या, हे काम आहे होय?मग तुमचं काम झालं समजा.मागच्याच  आठवड्यात फिल्ड पब्लिसिटी ऑफिसचं ऑडिट आम्ही केल. ते ऑफिसर चांगले आहेत. मी त्याना सांगतो. ”मग अशोक हॉटेल मध्ये जेवण करून झाल्यावर आम्ही फिल्डपब्लिसिटी ऑफिसमध्ये गेलो. फिल्ड पब्लिसिटी ऑफिसरश्री. दिलिप चित्रे माझ्या समवयस्क होते. आमच्या शाळेतल्या मुलानी अजून पिक्चर बघितलेला नाही हे ऐकून तेसुद्धा आश्चर्यचकित झाले.

               चित्रेना विजयदुर्ग किल्ला पहायचा होता. नाणारहून होडीने  तासाभरात विजयदुर्गला जाता येत असे. मी त्याना दोन तीन दिवस सवड काढून  यायलासांगितलं. आमच्या शाळे बरोबर मी पुर्वी कुंभवडा हायस्कूलला होतो तिथे  आणि  नाणार जवळच सागवे हायस्कूल  तिथले हेडमास्तर  कुलकर्णी माझे मित्रच  असल्यामुळे तिथेही एक शो दाखवयचा असा बेत निश्चित झाला. मी भेटलो त्या नंतरच्याआठवड्यातले  गुरुवार ते शनिवार हे दिवस नक्की झाले. मी परत आलो तेव्हा कर्मधर्म संयोगाने कुंभवड्याचे हेडमास्तर पुजारीआणि सागव्याचे हेडमास्तर आबा कुलकर्णी दोघेही मला राजापुरला भेटले. त्याना माझाबेत ऐकून खुप आनंद झाला. चित्रे नॉन्व्हेज घेणारे होते त्यांच्या साठी आबांकडेअस्सल  कोकणी मच्छी कडीच बेत शुक्रवार धरूनयोजला.

                     ठरल्या प्रमाणे गुरुवारी दुपारी तीन वाजता दिलिप चित्रे जीप घेवून आले. त्यावेळी नाणार ईंगळ वाडीत नव्यानेच इंजिनची होडी सुरू  झालेली होती. चहा वगैरे घेवून झाल्यावर हायस्कुलच्या हॉल मध्ये मुलाना दोन डॉक्युमेंटरी  दाखवायच्या आणि रात्री संपूर्ण गावाला शेजारी चित्रपट दाखवायचे  ठरले. सगळ्यामुलाना एकत्र बसवण्यासाठी कॉमन हॉल मधली पार्टिशन्स   काढणं सुरु झाल्यावर  पाचवी सहावीतल्या  मुलानी “अ‍ॅ ..... शिणुमा ... शिणुमा” म्हणून एकच गिल्ला केला.त्यांच्या सोबत आलेल्या अटेण्डन्टला सगळी जुळणीकरून दिल्यावर   मीआणि चित्रे इंजिनच्या होडीने विजयदुर्गला निघालो.   किल्ला बघून संध्याकाळीकाळोख पडायच्या सुमाराला आम्ही परत आलो. रात्री नऊला शो सुरु करायचा होता पण आठवाजल्या पासुनच लोकं  जमायला सुरुवात झाली. गावातल्या सगळ्या वाड्यांमधली झाडून सगळी माणसं आलेली होती.

              शाळेसमोरच्या मोकळ्या पटांगणात माणसाना बसवून  स्क्रीन  च्या  बाजुलाआणि वरती घोंगड्या लावून आडोसा केल्यावर प्रोजेक्शन स्वच्छ  दिसू लागलं. त्यावेळी मुख्य सिनेमा दाखवण्यापुर्वी  न्युज रिल्स म्हणजे काही डॉक्युमेंटरी दाखवणं बंधनकारक:असे. चित्रपट गृहातही मुख्य खेळ सुरू होण्याअगोदर ही प्रथा पाळली जायची. नर्मदा नदीदर्शनावर आधारित माहिती पट सुरु झाला. त्यात नर्मदा नदीचं भव्य दर्शन झाल्यावर लोकंअक्षरश: मंत्रमुग्ध झाली. त्यानंतर 'शेजारी' सिनेमा  दाखवला.  रात्री बारा वाजता शो संपला . परत जाताना माणसं चित्रेना  “पुना कदि येशा? ” मग दाखवलेली रिळं सुलट गुंडाळून  ठेवून  अर्ध्या तासानंतर आम्ही झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी पाच व्या  पिरीएड नंतर आमच्या शाळेतल्या मुलाना प्रपंच  सिनेमा दाखवून नंतर  आम्ही सागव्याला जाणार होतो.पाचक्या तासिकेची  बेल  झाल्यावर  चित्रेना बोलावलं. त्याना पहाताच मुलानी एकच गिल्लाकेला.

                  नियोजना प्रमाणे  सागवे, कुंभवडे दौरा पार पडला. त्यानंतर पुढची दोनतीन वर्षं  चित्रे साहेब  न चुकता नाणार दौरा करीत. पेडणेकरांकडची मच्छी कडी आणि  इंजिनच्या होडीतूनविजयदुर्गपर्यंत फेरफटका मारून येणं त्याना भलतंच आवडायचं.  आता मुलही त्याना ओळखयला लागली होती. चित्रेंची जीप शाळेसमोर थांबली नी चित्रे ऑफिसकडे यायला लागले  की, मुलं आनंदाने टाळ्या वाजवून सिनेमावाले साहेब इले.....म्हणत त्यांचं स्वागत करीत.

                            ************