नाणारचा टॉवर श्रीराम विनायक काळे द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाणारचा टॉवर

नाणारचा टाॅवर

                                   

 

    १९६० ते ७० च्या दशकात संदेशवहनाची माध्यमं बिनतारी तारायंत्र, टेलिफोन,रेडिओ एवढीच उपलब्ध होती. टेलिफोनआणि तारायंत्र फक्त सब पोस्ट ऑफिस मध्येच उपलब्ध होती. असंख्यखेडेगावांमध्ये या सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्रसरकारने प्रत्येक ग्राम पंचायतीला रेडिओ संच दिलेले होते. पंयायतकार्यालयाजवळ राहणारी पांढरपेशी मंडळी सकाळसायंकाळच्षा बातम्या, कामगारसभा हे रेडीओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकत असत.  या दशकात केंद्र सरकारनेसरकारी आणि लष्करी गुप्त संदेश वहनासाठी देशातील महत्वाच्या भागांमध्ये सूक्ष्म तरंगकेंद्रे निर्माण करण्याचा देशव्यापी कार्यक्रम राबविला. त्यावेळीप्रगत तंत्रज्ञान नव्हते. संदेश प्रक्षेपणातअंतर ही मोठी समस्या होती. म्हणूनविशिष्ठ अंतरावर टॉवर उभारून रिले सेंटर्सचे नेटवर्क उभारण्यात आले.

            विशिष्ठरेखावृत्तीय स्थानावर, विशिष्ठअंतरावर आणि  समुद्रसपाटीपासून विशिष्ठ उंचीवरची ठिकाणे निर्धारित करून त्या ठिकाणी रिले टॉवर उभारण्यातआले. या सर्वेमध्ये ना़णार कुंभवडे हद्दीवरभिंताड  वाडीतलाटेंब निवडण्यात आला. हा टेंबनाणार गावच्या महसूली क्षेत्रात येत असल्याने या स्पॉट जवळ डोंगरतिठा ते कुंभवडे रस्यावर“नानर सूक्ष्म तरंग केंद्र” अशीपाटी लावण्यात आली. या  स्पॉट पासून कुंभवडे धुमाळवाडीअर्धा तास चालीच्या अंतरावर. नाणारमधलीघनगरवाडी पाऊण तास चालिच्या अंतरावर होती. तिथून दहा मिनीटाच्या चालीवर“ जितवणी” बारमाहीपाण्याचे ठिव होते. नाणार आणि कुंभवडे हे दोन्ही गाव टेंबापासून तास-दीड तास चालीवर इतके लांब. शासकिय संदेश वहनासाठी ही यंत्रणा उभरलेलीअसल्यामुळे या सूक्ष्म तरंग केंद्रांची माहिती टॉप कॉन्फिडेंशियल सदरा खाली गुप्त ठेवण्यातआलेली असून आजही गुगलवर यासंदर्भात कोणताही तपशिल उपलब्ध होणार नाही. संपूर्ण किनारपट्टीवरअसे असंख्य टॉवर कार्यरत असून ते पोस्टल टेली कम्युनिकेशनला  जोडलेले आहेत. या टॉवर वरूनकुठेही विना विलंब  फोनलावता येतो.

             केंद्रसरकारची टीम सर्वे करून नाणार टेंबाचा स्पॉट निश्चित करून गेल्यावर पाच सहामहिन्यानीऑक्टोबर १९७२ च्या दरम्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. एका दिवशी सर्वे प्रमाणेटेंबाबर निर्धारित जाग्यावर टॉवर आणि  कार्यालय,स्ट्रॉंग रूम, स्टोअ‍ररूम यांचा एरिया निश्चित करण्यासाठी त्या विभागाचा कोणी उच्चपदस्त इंजिनिअर शेट्टीसाहेब जीप घेवून आला. त्याच्या सोबत सामानाचे दोन ट्रक आणि वीसेक बेलदार लेबरही आले.कुंभवडे तिठ्याच्या जवळ सर्वे टीमने लावलेल्या ‘नानरसूक्ष्म तरंग केंद्र’ पाटीजवळजथा थांबला. टेंबाच्या  माथ्यापर्यंत जाण्यासाठीगच्च वाढलेल्या झाळी – झाडकळ छाटूनकाढायला हवी होती. माथ्यावरचा टॉवर उभारायचा स्पॉट  पायथ्यापासून सुमारे पन्नास– साठ फूट उंचीवर असून तीव्र चढाव  असल्यामुळे   पायथ्या पासून  माथ्यापर्यंतचा भाग बेणून  कामचलावू  रस्ता बनावला हवा होता. तसेचजवळपास कुठे पाण्याची उपलब्धी पहायला हवी होती.  यासाठी काही स्थानिक कामगारांचीमदत पाहिजे होती. इथून कुंभवडे धुमाळ वाडीतली घरे दिसत होती. शेट्टी साहेबाचा ड्रायव्हरमिशाळ बेलदारांचा मुकादम यल्लाप्पा  ह्याला सोबत घेवून निघाला.जथ्यातले  लेबर  तात्पुरत्या निवासासाठी टेण्टउभारायच्या कामाला लागले.

                  मुख्य रस्त्यापासूनधुमाळ वाडीकडे जाणारा पक्का रस्ता नसला तरी सगळा कातळी भाग असल्यामुळे  ट्रक,टेम्पो जाऊन जाऊन  चाकोरी पडलेली होती. जीपधुमाळ वाडीकडे वळलेली दिसल्यावर वाडीतली पोरे-टोरे  वाडीच्या तोंडाशी धकटुच्या  घरासमोर जमा झाली.  जीप थांबवून मिशाळ ड्रायव्हरखाली उतरला. जाणत्या मंडळीना रामराम करून तो म्हणाला, “ थितंतिकटी पाशी बोरड लावल्याला हाय न्हवं, ततंटावर बांदायच काम कराया गोव्यास्न मोटं सायब आल्यात.”  मागे सर्व्हे झाल्यावर तिथे    पाटी ठोकल्यावर गावात चर्चाझाली होती.गव्हर्मेंट  कसलासाटावर बांधणार आहे ही कुंभवडे, नाणार,तारळ, सागवे,गोठिवरे  गावानी गोष्ट कर्णोपकर्णीप्रसृत झालेली होती. अशिक्षित गावंढ्या जनतेला टॉवर म्हणजे काय याची माहिती नव्हती.मुंबईला गिरण्यांच्या उंच चिमण्या असतात तसलं कायतरी होणार आहे नी तिथून मुंबई,पुणे, सांगली,कोल्हापुर या शहरांमध्ये फोन करायची सोय होणार आहे इतपत महितीलोकाना होती. “असा व्हय..... चला धकटुच्यालोट्यावर बसॉया..... पानी-बीनी  खावा......” मिशाळ नी यल्लाप्पा धकटुच्या लोट्यावर जावून टेकले.  पाणी प्याल्यावर मिशाळ म्हणाला,“तितं  लय गचवन हाय त्ये साफ करायाहोवं.... टावराच  काम   याय तथं मात्याव जाईस्तोवररस्ता बांदायचा हाय. तुमच्या वस्तीवरल  म्हाईतगार कामदार असत्यालधा पाच तर इचराय आल्तो.... ”

                   आडगावचेधुमाळवाडकरी मोठे धोरणी होते. त्यानी मुद्द्याची गोष्ट विचारली.“तशेमिळती म्हना... पन रोज काय भेटात..... ?”  बेलदार अडचून रोज घेतात हेसर्वश्रुत असल्यामुळे  बेरकीपांडु धुमाळ  यल्लापाला  म्हणाला,“ तुमी  किती रोज घेतास?”त्यावर यल्लाप्पा म्हणाला, “ आताआमी  नव्वद-शंभर पावत घेतु की . परआमचं  कामबी तसंच आस्तया.....”  मानडोलावीत बेरकी हसत पांडु म्हणाला, “ तुमी म्हंस्तासता  बरोबर....पन तुमी दोन हातानीच  कामकरतास न? आमी बी तसाच करताव..... आता येकाद्रो  जास्त कमी करीत  तां येगळां. आता हाताची पाचवबोटा काय सारकी नाय. आमकाव   नव्वद  रुपाये रोज भेटात  तर येव आमी....!”त्यावेळी  त्या आडवळणी गावानी कुठेचसाठ ते सत्तर रुपयाच्या वर मजुरी मिळत नसे. आंबा सिझन मध्ये कोणी  कोणी अडल्यावेळी दहा रुपयेजादा रोज  देई.मिशाळाने नव्वद रुपये रोज द्यायचे कबूल करून लगेच साताठ लोकाना जीप मध्ये घालून सोबतनेले. सायबा साठी  अंडीआणि एक कोंबडा  घेतला.

                धुमाळ वाडीतलेकामगार टेंबा जवळ पोचले तेंव्हा  शेट्टी सायबाचा टेण्ट  उभा झालेला होता. बेलदारानीत्यांच्या जथ्यासाठी  मांडव  घालायचे माम सुरु केले होते.जीप मधून उतरल्या उतरल्या धुमाळ वाडकरी गडी  कामाला लागले. दोघानी कुंबयाचेबंद काढायला घेतले. बाबु नी  सख्या धुमाळ  जितवण्यावरून पाणी आणायलानिघाले. त्यांच्या सोबत  दोन दोन कळशांच्या कावडीघेवून दहाबारा बेलदारही निघाले. जितवण्यावर  दोन तीन ठिकाणी  चिव्याची बेटे होती. सख्यानेदहाबारा काठ्या तोडून घेतल्या. धुमाळ वाडकराना  मांडवाच्या कामाची हदन होती.  चार जणानी संध्याकाळ पर्यंत  लांब रुंद  मांडव पुरा केला. कामगारानीतीन धोंड्यांच्या  चुलीमांडल्या. मिशाळाने किराणा दुकानाची चौकशी केली.  जवळ म्हनजे कुंभवड्यात मांडाजवळसदानंद भाऊ देसायांचे  एकमेव  दुकान. बाबु धुमाळाला  सोबत घेवून  मिशाळ आणि कल्लाप्पा  कुंभवड्यात गेले.  बेलदाराने मोठी खरेदी केलीम्हणताना  सदानंदभाऊनी त्याना  रेशनवरच्या  स्वस्त दराने  गहू, तांदूळ , जोंधळेदिले. साखरही  रेशनच्यादरापेक्षा दीड रुपया चढ घेवून  दिली. भाऊ मिशाळाला म्हणाले,“मी इथला सरपंच आहे. तुज्या सायबाला  भेटायला घेवून ये. तुम्हाला  काय लागेल ती मदत देवू.”

              सामानातूनदोन   अ‍ॅसिडच्या  हेवी  कपॅसिटीच्या  बॅटऱ्या आणलेल्या  होत्या.  त्याना  जोडून  जोडून चार बल्ब लावून लख्खउजेडाची सोय केली होती. संध्याकाळी  कामगाराना सोडायला जावून  मिशाळाने  सायबाला चहासाठी दूध घेतले  नी  कामगाराना दुसरे दिवशी येतानाआणखी  चारगडी व  पाचसहा बायल् माणसे  आणायची  वर्दी देवून मिशाळ गेला.  दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवारीकामगार टेंबाकडे रवाना झाले.  ते  पोचल्यावर  चहा करून झाल्यावर मिशाळानेशेट्टी साहेबाला उठवले.  सायबासाठी  पडदे लावून बाथरूम संडासचीसोय केलेली होती. सायबाचा तंबू  हे  धुमाळवाडीकर कामगारांसाठीअप्रूप होते. आंघोळ  उरकूनसाहेब  राजापुरलारवाना झाला. कामगारानी  टेंबाच्या  पायथ्या पासून  माथावळी पर्यंत  जायची वाट बेणायला सुरवातकेली.

                   साहेबाने  राजापूरला  तहसिलदार,एलेक्ट्रीसिटी बोर्ड  याना वर्दी दिली. केंद्रशासनाचा महनीय प्रकल्प असल्यामुळे  सब स्टेशन पासून नियोजीतटॉवर  पर्यंत  अतिउच्च दाबाच्या विद्युत्वाहिन्या टाकायच्या होत्या. शेट्टी साहेबाने वर्दी दिल्यावर युद्ध पातळीवर अंमलबजावणीसुरू झाली. पुढच्या तीन दिवसात  टेंबाच्या  माथ्यावर नियोजीत  रिले सेंटर पर्यंत  पोल टाकून लाईन ओढूनही झाल्या.अर्थात अगोदर टेंबाजवळून  लाईन गेलेल्या होत्याच. टेंबासमोरच्यापोलवरून  माथ्यापर्यंत  दहा-बारा पोल टाकून  केबल ओढाव्या लागल्या. याठिकाणी  कायम  उच्च दाबाने  वीज पुरवठा  व्हायला हवा या साठी  काही  केबल जोडण्या फिरवण्याचे  काम  करावे लागले. पुढे नाणार  कुंभवडे गावातल्या लोकांसाठीकमी व्होल्टेज, वीज पुरवठा खंडित होणे  या अडचणींचे  कायमस्वरूपी  निराकरण या निमित्ताने  झाले. 

               शेट्टीसाहेब आणि त्याच्यासोबत आलेले टेक्निशियन्स   यानी  सर्व्हे मध्ये निश्चित केल्याजागी  टॉवरचा  स्पॉटफिक्स केला. त्या पासून शंभर दीडशे फुटावर रिले सेंटर, स्ट्रॉंगरूम, स्टोअर रूम वगैरे इमारतींचे  एरिया ठरवून  दिले.  शेट्टी सायबाला रोज कोंबडालागे.मिशाळ रोज गावात जावून चढ्यादराने अंडी  कोंबडे  विकत  घेई.  बेलदार हप्त्यात बुधवार रविवारीनाणार तिठ्ठ्यावर च्या धनगर वाडीतून बकरा आणीत. जवळ जवळ पंधरा दिवसानी  प्रारंभिक कामे पुरी झालीनी रस्त्याचे  कामही  पुरे झाले  नी  शेट्टी साहेब  निघून गेला.  टॉवरचे फौंडेशन  आणि इमारतीचे काम स्थानिककंत्राटदाराला दिलेले होते.  शेट्टी साहेबाने  दाखवलेल्या मार्किंग  वर  बांधकाम सुरू झाले.  अधून मधून शेट्टी साहेब विजिटकरून  कंत्राटदारनीट काम करतो आहे की नाही  याची पहाणी  करून जाई. दरम्यानच्या काळात  सिमेंट व अन्य सामान ठेवायची  शेड  बांधून झाल्यावर  सायबाने  धुमाळ वाडीतला बाजी, गणू  आणि सोन्या या तिघाना दररोजआठ तासाच्या शिफ्ट बेसवर   वॉचमन म्हणून  टेंपररी नेमून घेतले. त्यावेळी89 रुपये  डेली वेजीस तत्वावर रोज मिळे.काम म्हणजे  फक्तबसून लक्ष ठेवणे  एवढेच.हा भाग निर्मनुष्य  एकवशी  असल्याने   रात्री  एकट्याने  राहण्याचा प्रश्न होता. त्यावरत्या तिघानी तोडगा काढला. उजाडल्या पासून संध्याकाळ पर्यंत एकाने थांबायचे आणि रात्री  दोघानी जोडीने थांबायचे.दर पंधरा  दिवसानीपाळी नी  जोडीबदलायची .  आजही  तीन  वॉचमन नियमित  वेतनावर सेवेत आहेत. ते  सुद्धा  दिवसा एकजण आणि रात्री  जोडी ने थांबायचे याच पद्धतीने    ड्युटी करतात.

                  रस्त्याचेकाम झाल्यावर  टॉवरर्चेफाउंडेशन  आणि  इमारतीचे काम सुरू झाले.त्यावेळी  सिमेंट  ओपन मार्केटला  मिळत नसे.  त्या कालखंडात  महाराष्ट्रभर  सिमेंटचे  दुर्भिक्ष्य  होते. बरीच बांधकामे सिमेंटअभावी  रखडलेलीहोती.  पणहे  शासनाचेकाम असल्यामुळे  सरकारीकोट्यातून मुबलक सिमेंट मिळायचे. कंत्राटदार  मिळालेल्या स्टॉक मधली पोती  जादा पैसे घेवून गरजूना विकीतअसे. त्या दीड दोन वर्षाच्या काळात  नाणार कुंभवडे  पंच क्रोशीत झालेली बांधकामे  टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टर कडून  काळ्या बाजाराने सिमेंट नेवून  केलेली आहेत. पाऊस  काळापर्यंत निम्मे  बांधकाम  पुरे होत आले. पावसात  चार महिने  हा स्पॉट  उंचावर असल्यामुळे  वाऱ्याचा  जोरही भलताच असायचा. म्हणूनपाऊसकाळात काम बंद  ठेवावेलागले.

                  धुमाळ वाडीत  गंगाराम धुमाळ बर्कनदार होता.त्याची ठासणीची बंदूक होती. टॉवरच काम सुरू होवून हाय टेन्शन केबल टाकून लाईट सुरू   झाला.  शेट्टी साहेबाने मोठा सर्चलाईट  आणलेलाहोता. रात्री त्याचा फोकस टाकला की ससे, डुकर, भेकरी  यांची हुकुमी शिकार मिळायची.  जवळ असलेल्या  जितवण्यावर रात्री  पाणी  प्यायला  आलेली जनावरे  टॉवर्कडून फोकस टाकला  की स्पष्ट  दिसत. गंगाराम  धुमाळ,नाणार मोंडेवादीतला    दुसनकर  हे दर चार दोन दिवसानी रात्रीचे  टॉवरजवळ  शिकारीला जायचे.  पुढे  पुढे  आजुबाजुच्या गावतले  बर्कनदार, रत्नागिरी  हून  काही सरकारी अधिकारीसुद्धा  स्पेशल  जीप काढून  खास शिकारीसाठी  नाणार टॉवरकडे येत. अगदी  आजही  महिन्यातून  चार पाच वेळा  कुणी ना  कुणी  शिकारीसाठी हटकून  टॉवरकडे  खेप करण्याचा प्रघात आहे.एकतर नाणारात  देवानेचपारध करायला  बंदीघातलेली आहे. त्यामुळे  स्थानिक  लोक  शिकार करीत नाहीत. दुसरेम्हणजे   टॉवरजवळून हातिवले जैतापूर  पर्यंतचा परिसर दिसतो. त्यामुळेरात्री  कस्टमकिंवा पोलिस यांची   टीमजीप घेवून  गस्तघालायला आलीच तरी  लांबून  हेडलाईटचे फोकस  दिसतात. त्यामुळे  बेसावध  रेड मध्ये सापडायची भीतीनाही.  मुंबईतले  शिवसेनेचे  एक कार्पोरेटर  त्या दशकात  मित्रमंडळ घेवून  वर्षातून दोन तीन वेळेलाशिकारीसाठी  नाणारटॉवरकडे  यायचे.  

                 पावसाळासंपला नी दसऱ्यानंतर  धूमधडाक्यानेकामाला सुरुवात झाली.  रिलेसेंटरच्या मुख्य कक्षाला स्लॅब घातलेला  आहे. त्याकाळी  नाणार पंचक्रोशीतल्या खेडेगावानी  तेमोठे अप्रूप होते. गावातली हौशी मंडळी मुद्दाम बघायला येत असत. टॉवर उभारण्या साठी  मटेरियल येवून पडल्यावर शेट्टीसाहेब  टेक्निशियन्सची  वेगळीटीम घेवून आला.  दिसामाशी   काम उठायला  लागले  तेंव्हा तर स्थानिक माणसे  आश्चर्य चकित झाली. लांबूनपहाणारे म्हणत “ह्यां म्हंजे  चा चार  शिडयो बांधलानी हत.......टेंबार  वारोम्हणशा तर  काय....  एक कावटी  इली आस्ली तर मानुस दुकू  उडॉन जायत........ ह्याकायटिकताना क्टिन हा......” मात्र  त्याची मजबूती नी भव्यता  त्या स्पॉटवर  जावून  बघितलं  तरच  येईल.  टॉवरचं  काम सुरू झालं नी पुन्हा  कोंबड्यांचा रतीब सुरू झाला.कुंभवड्यात कोंबडी मिळेनाशी झाल्यावर नाणार,हरचली,तारळ, गोठिवरे ,  सागवे   ते पार जुवाठी  माडबन पर्यंत  जीप दामटून मिशाळ कोंबडीपैदा करी. लोक अजूनही टॉवरचा विषय निघाला की हटकून सांगतात.“त्ये टायमाक  टॉवर बांदनारो  सायब् इलो व्हतो ना, तेना  नानार कुंबवड्या सकट धा   गावात  औषदाक म्हनशा  तर कोंबडा शिल्लक ठ्येवलान्  नाय.........”

               टॉवरचं  काम पुरं झालं. शेवटच्या  टप्प्यात तीन फुटी हेवी ड्युटी   अ‍सिडच्या   पन्नास साठ बॅटऱ्या  आल्या. एकेक बॅटरी  एवढी  जडशीळ की  केबलचे लवंग़ण  करून त्यात चिव्याचे मजबूतदांडे घालून  चार  खांदकरी ती वाहून नेत.  स्ट्रॉंग रुम मध्ये  एमर्जन्सी  साठी   बॅटरी  सप्लाय कायम जय्यत ठेवलेलाअसतो. आरंभी  नेमलेले  वॉचमन नियमित वेतनावर  सेवेत रुजू झाले. त्यानादैनंदिन  कामम्हणजे सकाळ संध्याकाळ बॅटऱ्या आणि अन्य मशिनरीची रिडिंग घेवून  तीरजिस्टरला नोंद करणे.  रोज  एकदा पणजीला रिपोर्ट करणे. काहीतांत्रिक अडचण असेल तर पणजीमधिल ऑपरेटर सुचना देईल त्याप्रमाणे किरकोळ सेटिंग्जकरणे एवढेच काम असते. महिन्यातून एकदा पणजीवरून कोणीतरीटेक्निशियन येवून सगळी यंत्रणा तपासून जातो. असा मनुष्य येण्यापूर्वी पणजीहूनसुचना येते आणि कोड्वर्ड दिला जातो. दरमहा पाच तारखे पूर्वी या कर्मचाऱ्यांचे वेतनदिले जाते.

             स्थानिक लोकाना अगदी अल्प फी मध्ये टॉवरकडे जावून फोनकरण्याची मुभा आहे. तुम्ही नंबर दिलात की तिथला वॉचमन तत्काळ तुम्हाला संबंधितनंबर जोडून देतो. अक्षरश: मिनिटभरात कॉल लागतो. हायस्कूलच्या कामासंदर्भात मी चार- पाच वेळेला टॉवरवरून फोनकेलेले आहेत. तुम्हाला रिसिव्हर वरून बोलता येते किंवा पॅनेल समोर उभे राहूनस्पीकरद्वारा संभाषण करता येते. वॉचमन रजिस्टरला कॉल  नोंदून त्याची अल्प फी जमाकरून सही घेतो. येथे हॉट लाईन असल्यामुळे विना त्रास विनाव्यत्यय फोन करता येतो. अलिकडे  मोबाईल सुरु झाल्यानंतर नाणार टॉवरची  बी. एस्.एन्. एल्. जे फुल्ल  रेंज  पंधरावीस कि.मी. च्या एरियात  मिळू लागली. आरंभ काळी  सेवेत असलेल्यांपैकीबाजी धुमाळ आजही हयात आहे. टॉवरच्या बांधकामाच्या वेळी घडलेल्या आणि नंतरच्याकाळातल्या शिकारीच्या गंमती तो मोठ्या हौशीने सांगतो.

                  ***********