रंगीला राजस्थान..? Vrishali Gotkhindikar द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंगीला राजस्थान..?

खाद्य सफर

रंगीला राजस्थान..😋

राजस्थान बघायचे ठरले तेव्हा नेहेमीप्रमाणेच आम्ही ठरवले होते की राजस्थानला तिथल्या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायचाच... भले ते कितीही गोड असोत 😊😊त्या दृष्टीने थोडा अभ्यास पण करून गेलो होतो .आमच्या या सफरीची सुरवात गोडानेच झाली आम्हीं निघालो त्या दिवशी अयोध्येत श्रीरामाचे आगमन होणार होते तो मंगलमय दिवस साजरा करायला मी घरातून निघतानाच सर्वांचे तोंड गोड करायला पेढे घेऊन गेले होते प्रवासाची सुरवात पेढ्याने झाली प्रवासात  भेटलेले राजपुरोहीत कुटुंब काही मिनिटातच आपलेसे झाले😊😊याला मुख्य कारण त्यांच्या सोबत असलेली बच्चे कंपनी आणि आमचा अती बोलका स्वभाव,😃😃विशेषतः त्यांच्या सोबत असलेली सात महिन्यांची छोटी जी मला चिकटली ती आम्ही गाडीतून उतरताना परत आईकडे जायलाच तयार नव्हती😊एकमेकांची माहिती करून घेताना गप्पा टप्पात राजस्थान खाद्य प्रवासाची पहीली  ओळख झालीआम्हीं प्रथम अबुला जाणार आहोत हे समजल्यावर त्यांनी लगेच  सांगितले रेल्वे स्टेशन वर छान "मटका रबडी"  मिळते ती खायची  विसरू नका.ते कुटुंब रहाणारे पाली राजस्थान येथील होते .त्यांनी सांगितले की तेथली  अत्यंत प्रसिद्ध चीज म्हणजे "गुलाब हलवा" जो फक्त तेथेच तयार होतो.ज्यात दुध आटवून गुलाब पाकळ्या घालून याच्या वड्या पाडून त्यावर सोनेरी वर्ख लावला जातो जी अत्यंत चविष्ट असते .आम्ही म्हणालो आम्हाला तर ती मिळणार नाही आम्ही कुठे येणार तुमच्या पालीला ....?ते गृहस्थ  म्हणाले तुम्ही उदयपूरला तीन दिवस आहात ना मी पाठवीन तुम्हाला तिकडे हा गुलाब हलवा कामाच्या निमित्ताने माझे मित्र येत जात असतात उदयपूरला आम्ही तर या अगत्याने चकितच झालो त्यांनी हॉटेल चा पत्ता आणि आमचा नंबर पण घेतला .ती गोष्ट आम्ही तेथेच विसरलो. अबू रोड. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर "मटका रबडी" ची अनेक दुकाने दिसली फक्त वीस रुपयात छोटा मटका भरलेली रबडी सोबत खायला एक गुलाबी चमचा..😊 अजिबात साखर नसलेली फक्त दुध आटवून केलेली ही रबडी खुप चवदार होती 😋त्यामुळे एक खाऊन आमचे समाधान झाले नाही हे सांगायलाच नको ... 😃😃आश्चर्य म्हणजे राजस्थानला पाउस तर नाहीच त्यामुळे  गुरांना हिरवा चारा मिळत नाहीतरीही आम्ही दुधाची किंमत विचारली तर पन्नास रुपये लिटर समजली आणि दुधाची मिठाई सुद्धा स्वस्त ..अगदी वीस तीस रुपये प्लेट ..आपण महाराष्ट्रात भरपूर पावसाने समृद्ध असून  हिरवा चारा मुबलक असून ६५ रुपये लिटर दुध घेतो .शिवाय इथली सर्व मिठाई शुद्ध तुपातली हातात नुसती घेतली तरी तुपाचा घमघमाट येणारी ..😊माउंट अबूला "नक्की लेक " हा सनसेट पिकनिक स्पॉट आहे तिथली "रबडी जलेबी," मसाला दूध अतिशय चविष्ट होते "खीचू "हा तांदळाच्या उकडी सारखा असलेला पापडखार आणि तिखट घातलेला वेगळा प्रकार प्रथमच खाल्ला. बरा वाटला "फेणी" नावाचा एक पदार्थ आपल्या सुत्तर फेणी सारखा जो दुधात घालून खायला दिला गेला मस्त होता 😋गरम गरम जिलेबी तर होतीच .😋माउंट अबू वरून कुंभलगड किल्ल्यावर जाताना तळाशीच शेव भाजी थाळी मस्त मिळाली खूप तिखट अशी ही शेव भाजी खाताना मजा आली  त्या हॉटेल चे नाव "गोरबंद" असे होते कुतूहलाने अर्थ विचारता गोरबंद म्हणजे उंटाचा शृंगार असे समजले इथे  उंट जीवापलीकडे जपले जातात असे म्हणतात की नववधुपेक्षाही उंटांचा शृंगार जास्त असतो 😊😊जसे कोकणात नारळ किंवा केळीच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो तसे येथे उंटाचा उपयोग असतोउंटाचे दुध असते ,प्रवासाला उंट असतो ,उंटाच्या कातड्याच्या अनेक वस्तू बनवतात उंटाच्या केसांचे ब्ल्यांकेट बनवतात जे त्या थंडीत अतिशय उबदार असतेउंटाला इथे अतिशय मान दिला जातो उदयपुरला आमचा  तीन दिवस मुक्काम होता दुसरे दिवशी संध्याकाळी अचानक कौंटरवरून तुमच्याकडे गेस्ट आले आहेत असा निरोप आला आता इथे कोण आले भेटायला ..जरा नवल वाटले ते गृहस्थ रुममध्ये आले नमस्कार करून म्हणाले मी राजपुरोहीत यांचेकडून आलो आहे तुम्हाला हा बॉक्स दिलाआहे त्यांनी दोन मिनिटे ट्यूब पेटेना मेंदूची ....,😃😃मग चटकन आठवले ते रेल्वेत भेटलेले आमचे सहप्रवासी त्यांचे आडनाव नाव राजपुरोहीत होते नाहीं का 😊त्यांनी आमच्यासाठी "गुलाब हलवा" चा बॉक्स दिला होता आम्ही तर त्यांचे बोलणे  विसरून पण गेलो होतो .भेटायला आलेले ते गृहस्थ राजपुरोहीत यांचे मित्र होते त्या गृहस्थांचे आभार मानून चहापाणी विचारले त्यांनी नम्रपणे नकार दिला याचे पैसे किती द्यायचे असे विचारल्यावर ते म्हणाले,“ हमने  अपने मेहेमानोकी खातीर की है...पैसेकी बात ही नही "❤️आणि आमचा निरोप घेऊन निघून गेले .मिठाई खरोखर "अप्रतिम" होती अत्यंत अलवार ,गुलाब आणि केशर दोन्हीचा सुगंध येत होता .😊😊आम्ही राजपुरोहीत यांना फोन लावून धन्यवाद दिले .ते म्हणाले ,"आमच्या गावाची इतकी प्रसिद्ध मिठाई तुम्हाला सादर करता आली याचा मला आनंद वाटतो."!!!😊आम्ही फोन वर त्यांना कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण देऊन पुन्हा धन्यवाद सांगितले चितोडगडला गेलो तिथे एके ठिकाणी "दाल बाटी चुरमा" थाळी घेतली खमंग भाजलेली भरपूर तूप घातलेली बाटी... आणि साधे मसाले वापरलेली घट्टसर चविष्ट डाळ..जो चुरमा दिला होता त्यामधे तुपात तळून कुस्करलेली बाटी, सुंठ, जायफळ, भाजुन बारीक केलेला डिंक , बारीक साखर असे बरेच प्रकार होते ही राजस्थानची स्पेशल डिश समजली जाते 😊सोबत कढी ,पट्टीच्या आकाराचे तळलेले पापड ,आणि खिचडी होती शेवटी ताक..चव छान होती .आमच्या राजस्थानच्या संपूर्ण चौदा दिवसाच्या प्रवासात सगळीकडे जेवणानंतर जिरे पूड लावलेले मोठा ग्लास ताक नेहेमी मिळत असे जेवणात पाण्याऐवजी ताकच प्यायले जायचे .यानंतर नाथद्वारा ला  कृष्ण प्रसाद घेतला या थाळीत दुध ,लोणी, मुरंबा ,भाजी अशा गोष्टी होत्यातिथला "गुलाबजाम " आणि "मालपुवा" फार चविष्ट होता 😋भगवान प्रसाद म्हणून रोट,चुरमा लड्डू ,बुंदी लड्डू ,बर्फी पण होती शिवाय इथे फाफडा ,सेव ,भुजिया , बुंदी लाडू, विविध प्रकारचे नमकीन याचीही रेलचेल होती. ताजे आणि स्वादिष्ट असल्याने सगळ्याचा थोडा थोडा आस्वाद घेतला .,😊😊यानंतर जोधपूरला गेलो तेथे क्लॉक टॉवर जवळ एक  मिश्रीलाल हॉटेल नावाचे जुने हॉटेल  आहे तिथे "काला जामून" आणि "प्याज की कचोडी" खाल्ली काला जामून मध्ये आत केशर मिसळलेले पनीर होते. लुसलुशीत आणि गोडसर वेलदोडे केशर पाकातला हा जामून....एकदम अप्रतिम चव ..😋बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत आणि मसालेदार कांद्याचे सारण भरलेली प्याज की कचोडी ... वाहवा....एकदम हटके चव होती .😋यानंतर बिकानेरला गेलो बिकानेर ला मिष्टान्नाची मोठी मोठी दुकाने आहेत बिकानेरी चना प्रसिद्ध आहे इथे मात्र खायचे बरेच प्रकार असल्याने ते खाण्यासाठी आम्ही आमच्याच मित्र जोडीला सोबत बोलावले आणि मिरची वडा,गाजर हलवा ,कचोरीचाट, मूंग हलवा ,घेवर ,रसगुल्ला ,जिलेबी असे अनेक प्रकार घेऊन शेअरिंग केले ....😊कारण इतके सारे गोड आणि तिखट प्रकार एकाच वेळी खाणे आपल्याला जरा कठीण जाते 😊😊तिथे किती खायचे याला मात्र   काही प्रमाणच रहात नव्हते😃😃मिरची वडा प्रकार म्हणजे भली मोठी तिखट हिरवी मिरची ,आत लाल तिखट घातलेले बटाट्याचे सारण वरचे डाळीच्या पीठाचे आवरण पण तिखट असा भन्नाट प्रकार सोबत चटणी अगदी हाय हाय झाले 😃😃मग त्यावर गाजर हलवा खाल्ला ज्याची चव अगदीच वेगळी होती नंतर बिकानेरचा खुसखुशीत फाफडा खाल्ला सोबत डाळीची चटणी होतीत्यानंतर त्यावर गोड म्हणुन रसगुल्ला खाल्ला 😃हा तर नावाप्रमाणेच रसदार आणि गुलाब इसेन्स वाला होता इथे छोटे मोठे दोन्ही प्रकारचे घेवर असतात आता आमचे बकासुरा पेक्षाही जास्त खाणे झाल्याने छोटा घेवर मागवला ,😃😃नाजूक कुरकुरीत पाकात बुडवलेल्या घेवर वर रबडी घालून देतात ज्याच्या चवीचे वर्णन करणे कठीण आहे!! कचोरी चाट मध्ये खुसखुशीत कचोरी एका द्रोणात कुस्करुन त्यात हिरवी, लाल चटणी, कांदा, शेव, मसाला,घट्ट दही घालून दिली होतीएकदम टॉक 😋 चव होती..तृप्त मनाने बाहेर  पडलो 😋दुपारी तिथल्याच एका हॉटेल मध्ये गटटे की सब्जी खायला  मिळाली डाळीच्या पिठात वेगवेगळे मसाले घालून त्याचे घट्ट रोल करून ते वाफवून घेतात व त्याचे तुकडे दही घातलेल्या ग्रेव्हीत घालतात तो प्रकार चांगला होता पोखरणला खास  चमचम नावाची मिठाई खायला मिळाली .जिची दिवसाची विक्री  दहा ते बारा लाख रुपये होते आणि वार्षिक विक्री पंधरा ते  से वीस करोड़ रुपये  आहे .ही  छेना ची  मिठाई आधी साध्या बंगाली चमचम मिठाई प्रमाणेच केली जायची .आजकाल यात केशरही मिसळले जाते .शाम मिठाईवाला हे दुकान यासाठी जास्त प्रसिद्ध आहे .अत्यंत मऊसर ,माफक गोड ,केशर स्वादाची लांबट आकाराची ही मिठाई मस्त होती जयपूरला किल्ला बघायला गेलो तेव्हा उतरून आल्यावर एका हॉटेल मध्ये राजस्थानी पद्धतीचे वांग्याचे तिखट भरीत आणि कढी गोळे खायला मिळाले संपुर्ण राजस्थान ट्रिप मध्ये पाच ते सहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अलग अलग चवीची जिलबी खाल्ली 😋😋परतीच्या प्रवासात जयपूर मुंबई रेल्वेत संध्याकाळी  सवाई माधोपुर येथे गरम गरम मुंग पकोडे विकायला आले होते हे पण खुप प्रसिद्ध आहेत गरम खुसखुशीत मुंग पकोडे आणि सोबत हिरवी मिरची होती .  राजस्थान प्रवासात भरपूर खाणे झाले होते तेव्हा परतीच्या प्रवासात आम्ही ठरवले आता काहीही गोड खायचे नाहीपण योगायोग बघा  😃😃आमची आणि राजस्थानी मिठाईची गट्टी इतक्यात तुटणार नव्हती 😃या परतीच्या प्रवासात रेल्वेत जे मोठे कुटुंब भेटले ते मुळचे कोल्हापूरचे ....अघळ पघळ बोलणारे भेटले आम्हीही मिसळून वागणारे असल्याने त्यांच्या सात महिन्याच्या मुलीसकट मोठ्या मुलांशी सुद्धा आमची मैत्री झाली कोल्हापुरचा मुलगा आणि जयपूरची मुलगी अशा लग्नाला ती दोन नात्यातली कुटुंबे एकत्र गेली होती गप्पा करता करता एक दोन स्टेशने गेल्यावर त्यांनी एक मोठा मिठाईचा बॉक्स माझ्यापुढे केला घ्या हो घ्या खूप "खास" आहे मिठाई ...असे ते म्हणाले राजस्थानात लग्न कार्यात मोठे मोठे मिठाई बॉक्स भेट द्यायची प्रथा आहे असेच दोन बॉक्स त्यांनाही मिळाले होते ते सर्वजण लग्ना निमित्त संपुर्ण आठवडाभर जयपूरला असल्याने आणि मुळचे पक्के "कोल्हापुरी" तिखट खाणारे असल्याने गोड खाऊन वैतागले होते 😃😃प्रेमाने त्यांनी पुढे केलेल्या त्या बॉक्समध्ये जवळ जवळ तेरा चौदा प्रकारच्या बर्फी लाडू आणि नमकीन होते आम्ही म्हणालो अरे बाप रे ... इतके तर आम्ही नाही खाऊ शकत ..अहो चव तरी बघा असे म्हणत त्यांनी प्रत्येक बर्फी ,लाडू ,नमकीन प्रकारचा एक एक पीस आम्हाला दिला .मग काय आम्ही पण ताव मारला ...😊😃त्यात खवा ,गुलाब ,आंबा ,शाही ,बेसन, खुरचन ,पिस्ता ,बदाम ...अशी बर्फी 😋बुंदी .मोतीचूर ,रवा ,रवा बेसन ,पिननि .....असे लाडू 😋खारी बुंदी ,फाफडा ,शेव ,पापडी ....असे नमकीन 😋दिल अगदी गार्डन गार्डन होऊन गेले ❤️पोट आणि मन दोन्ही तृप्त ❤️असे राजस्थान प्रवासात जाताना आणि येताना मिठाईचे "योग" जुळून आले 😊राजस्थानी पदार्थांचे सर्व प्रकारचे सर्व स्वाद मनसोक्त चाखायला मिळाले 😊😋आणि प्रवासाचा शेवट ही गोड झाला❤️