नव्वदच्या दशकातील कोल्हापूर खाद्य यात्रा Vrishali Gotkhindikar द्वारा अन्न आणि कृती मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नव्वदच्या दशकातील कोल्हापूर खाद्य यात्रा

नव्वद च्या दशकातील कोल्हापूरची खाद्ययात्रा 

माझी कोल्हापुरातील खाद्ययात्रा नव्वद च्या दशका आधीच म्हणजे लहानपणापासूनच सुरू झाली होती 😋याचे कारण माझ्या वडिलांना असलेली चांगले चुंगले खाण्याची व हॉटेलिंगची आवड😊😊तेव्हा महाद्वार रोड ला सेंट्रल हॉटेल होते तिथं पातळ भाजी पावव मिसळ उत्तम मिळत असे वडील आवर्जून खायला नेत असत

तेथेच खाली पूर्वी एक फक्त बिस्किटांचे दुकान होतेवेग वेगळ्या प्रकारची आणि चवीची बिस्किटे गोलाकार बरणीत दुकानातील पायऱ्या पायऱ्या च्या मांडणीवर  ठेवलेली असतवडील माझ्या मागणीप्रमाणे घेउन ती देत असत 

बिनखांबी गणपती पाशी विजय बेकरी होती तिथला पाव आणि खारी नेहेमी आणली जात असे

भवानी मंडपात एका छोट्या हॉटेलातला मिळणारा गोड शिरा त्यांना आवडत असेआई भलेही किती चांगला शिरा घरी करीत असो.. मला घेउन आठवड्यात एकदा तरी ते तो शिरा खायला जात😋

महानगरपालिकेच्या मागे खूप जुने न्यू जुने इंडिया हॉटेल आहे तिथली पातळ भाजी पाव ,फरसाण मिसळ खायला सुद्धा कधी कधी घेऊन जात .

अर्धा शिवाजी पुतळा चौकात गुरुप्रसाद बेकरीत कणकीची बिस्किटे तयार करून मिळतआपले साहित्य देऊन मोठ्या अल्युमिनियमचा डबाभर ती बिस्किटे करून वडील उत्साहाने घरी आणत.

शिवाय वडील कधी कधी कामत हॉटेलचा डोसा खायला नेत असत बायकांनी हॉटेलात जाणे तेव्हां तितके संमत नव्हते पण  मी लहान असल्याने मला मज्जाव नव्हतामग आईसाठी मात्र तो बांधून आणला जात असे

वाईकरांचा मोठा गोल गरगरीत बटाटे वडा प्रसिद्ध होतातो घरी आणुन खाल्ला जात असे तसेच बिंदू चौकातील मिलन हॉटेल ची भजी वडिलांचे मित्र अनेकदा घरी घेउन येत असत.

वडलांना फरसाण खुप आवडत असेकोल्हापुरातील भैय्या परदेशीचे फरसाण दुकान प्रसिद्ध होते शेव, पापडी, गाठी, चिवडा प्रकार वडील येता जाता आणत असत.तिथेच कुर्मा नावाचा मैद्याचा पट्टया स्वरूपात गोड प्रकार मिळे (अजुन सुध्दा मिळतो) तो खुप आवडीचा होता.

आठ पंधरा दिवसातून एकदा रविवारी सकाळी एक माणूस खरवसाचे चिकाचे दुध घेऊन अमच्या गल्लीत विकायला येत असे.त्याच्याकडून अर्धा लिटर दूध घेउन आई वेलदोडे पूड घालून त्याचा घट्ट ,मऊ , लुसलूशित आणि जाळीदार खरवस करीत असे.😋तो रविवार तेव्हा स्पेशल होऊन जात असे 😊😊

महाद्वार रोड ला दगडु बाळा भोसले यांचा मोठा पेढा प्रसिद्ध आहेजायफळ वेलची घातलेला व दुध घोटून केलेला हा पेढा आपली चव जिभेवर रेंगाळत ठेवतो😋

उभ्या शिवाजी पुतळा चौकात खत्री मिठाई प्रसिद्ध आहे.वेगवेगळे बर्फीचे मिठाईचे तुकडे छोट्या ताटलीत किमती सकट काचे आड मांडून ठेवलेले असतात 😊

त्याच्या समोरची माळकर जिलबी खायला लोकांच्या रांगा लागतातपूर्वी एक छोटेसे दुकान होते... आता चार पाच झालीत पण जिलबीची लोकप्रियता टिकून आहे

😋कधीतरी रंकाळा तलावावर भेळ खायला जात असू...पाणीपुरी तेव्हा मिळत नसे आईस्क्रीम मात्र गाडीवर मिळत असेआईसक्रीमची दुकाने नंतर सुरू झाली

 अंबाबाईच्या देवळापासून अगदी जवळच महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल ही माझी शाळा होती. शनिवारी दुपारी अथवा कधी शाळा लवकर सुटली तर शाळेतून येताना आम्ही  देवळात खेळायला जायचो.अंबाबाईचे देउळ इतके गजबजलेले आणि गर्दीचे नव्हते . आम्ही मैत्रिणी  अंबाबाईच्या देवळात जे खांब आहेत तिथे लपाछपी ,शिवणापाणी खेळायचो. महाद्वार रोडवरून देवळात जाताना फुटाणे , मीठ तिखट लावलेल्या कैरीच्या फोडी, मीठ लावलेल्या आवळ्याच्या चकत्या,रेवड्या, चिंचेचे गोळे असे मिळायचे .तेव्हा शाळेतल्या मुलींकडे आजच्या सारखा पॉकेट मनी  नसायचा कधीतरी एखाद्या मैत्रिणीने असे काही विकत घेतले की आम्ही सगळ्याजणी वाटून खायचो .

घर देवळाजवळ असल्याने रोज संध्याकाळी देवळात कारंजा पाहायचा, तिथं खेळायचं आणि मग दिवेलागणीला  घरी परतायचं असा आमचा  दिनक्रम असायचा.याआधी जेव्हा  रंकाळ्याजवळ आम्ही राहत होतो तेव्हा तेथील घुमटात् सुट्टी दिवशी मैत्रिणी जमून दुपारच्या उन्हात आमचा भातुकली खेळ चालायचा.😃😃तेव्हा दिवसा रंकाळा तलाव परिसर खूप शांत असायचा .रिकामा आणि निवांत असायचा .

90 च्या दशकात लग्नानंतर सासर कोल्हापूर असल्याने व अहोना पण खाण्याची आवड असल्याने😃ही खाद्य यात्रा आणखीन "स्पेशल" झाली ❤️

नव्वद च्या दशकात रंकाळ्यावर भेळ सोबत पाणि पुरी सुध्दा नुकतीच सुरू झाली होती.संतोष भेळ नावाच्या गाडीवर आम्हीं रविवारी भेळ ,पाणी पुरी खात असू तेथेच एकजण चनाजोर म्हणून फुटाण्याच्या डाळीचा चविष्ट प्रकार वरती कांदा कोथिंबीर मसाला घालून कागदाच्या पुडीत देत असे.ते माझ्या मुलाला खूप आवडत असे.त्याचा खुराक नेहेमी असे .

शिवाजी पुतळ्याला चारुदत्त वडा मिळत असे .थोडा मसालेदार असा हा वडा खूपच लोकप्रिय होता (अजुनहि तिथे तोआहे )पद्माराजे शाळेसमोर शितल वडा नावाचा चविष्ट वडा मिळत असे आता सुद्धा तो वडा त्याच चवीत तिथे मिळतो. 

माझ्या बँकेची शाखा तेथेच जवळ असल्याने बऱ्याच वेळा तो मागवला जायचा .😊कधी कधी संध्याकाळी तो घरी आणला जायचा 

कोल्हापुरात वड्या सोबत नेहेमीच ताजा लुसलुशीत पेटी पाव आणि हिरवी मिरची मिळते 😋 वडा कधीच पावाच्या दोन भागात ठेवून नाही खायचा तर ...एक घास वड्याचा , त्याबरोबर पावाचा एक तुकडा आणि सोबत मिरचीचा एक तुकडा असे कोल्हापुरात खाल्ले जाते .😊😊

शिवाजी विद्यापीठा पाशी शामचा वडासुद्धा मोठा मिळत असे पण आमच्या घरापासून तो भाग बराच लांब असल्याने क्वचित खाणे होत असे .

नंतर माझी बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत बदली झाल्यावर पुलावरील दयासागर चा वडा बँकेत येत असे .मिसळ मागवली जायची मिसळ सोबत आणलेला उरलेला पाव नंतर मागवलेल्या चहा सोबत आवर्जून खाल्ला जायचा 😃

याच वेळेस लक्ष्मीपुरीत बँकेच्या शेजारीच असलेल्या एल आय सी ऑफिसच्या आतील एका छोट्या कॅन्टीन मध्ये अंड्याची खांडोळी आणि बटाटा टोस्ट मिळतं असेखांडोळी म्हणजे गरम तव्यावर तेल टाकून त्यावर अंडे फोडून पवाचा स्लाइस त्यावर दाबून दोन्हीकडून छान भाजत ... त्याचे तुकडे करून  वर बारीक कांदा कोथिंबीर व कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातली जायची वरती टोमॅटो 🍅 सॉस टाकून खायचे.अत्यंत चविष्ट असा हा प्रकार आता कोल्हापुरात अनेक ठिकाणी मिळतोपण तेंव्हा त्याचे खुप "नाविन्य"होते.लंच ब्रेक मध्ये आम्ही मुद्दाम तेथे जाऊन खायचो.तसेच तेथे व्हेज टोस्ट साठी मुद्दाम तयार करुन घेतलेला गोल लोखंडी टोस्टर होता बटाट्याच्या सारणात मध्यभागी लोणी टाकून, ते सारण पावात भरुन भाजायला ठेवला की जो काहीं खरपुस वास यायचा...😋.. पोटात गलबल व्हायची 😃आणि तयार टोस्ट कापला की आतील लोणी बाहेर येऊन पाघळत असे.....😋फार मस्त आणि चविष्ट प्रकार होता तोअजूनही चव जीभेवर रेंगाळत आहे 😋😋

गंगावेश मध्ये सुवर्ण कॅफे  हॉटेल वडा आणि पुरी भाजी साठी प्रसिद्ध होते .भवानी मंडपात राजाराम हायस्कूल जवळ राजाभाऊ शिंदे यांची भेळेची गाडी असे खूप मस्त  अशी ती भेळ तोंडाला चव आणत असे😋😋 राजाभाऊ शिंदे एकदम पटापट भेळ तयार करीत असत ते नुसते बघणे सुध्दा खूप आनंदाचे असे 😊😊त्याकाळी ते इन्कम टॅक्स भरणारे असे एकमेव भेळवाले होते 😊

महाद्वार रोड वर तृषा शांती ची लस्सी मिळत असे दाट,माफक गोड .. वरती काजूचा चुरा टाकलेली लस्सी प्यायली की पोट शांत होत असे 😋उन्हाळ्याच्या दिवसात तर ही लस्सी प्यायला कोणतेच कारण लागत नसे 😃😃

महाद्वार रोड ला दिलीप आईसक्रीम सेंटर तेव्हा नुकतेच  चालू झाले होते . त्यावेळेस "ट्रिपल संडे" किंवा "कसाटा" आईसक्रीम खाणे अतिशय आवडीचे असायचे 

तसेच उभ्या शिवाजी पुतळ्याला इम्पिरियल आईस्क्रीम सेंटर मध्ये कॉकटेल आईसक्रीम छान मिळत असे😋कॉकटेल आईस्क्रीम प्रकार नुकताच प्रचलित होत होता . अत्यंत अरुंद आणि छोट्या दोन मजली दुकानात अगदी अडचणीत पण लोक आईसक्रीम चा आस्वाद घेत 😊😊

त्याच काळात मिरजकर तिकटी येथे म्हशीचे ताजे धारोष्ण समोरच पिळून दिलेले दुध मिळत असे. तसेच दुध पिळून मिळणारे दुधकट्टे गंगावेश भागात पण होते . (अजुनही आहेत)माझ्या लहान मुलाला मिरजकर तिकटी येथे रोज संध्याकाळी ज्युडो खेळायला मी घेऊन जात असे तेव्हा येताना ते एक पूर्ण ग्लासभर ताजे फेसाळणारे दुध प्यायची त्याला सवय लागली होती तो मला पण ते प्यायचा आग्रह करायचा अतिशय चविष्ट कोमट अशा त्या दुधाची चव अवीट असे 😋😋

विद्यापीठ हायस्कूलजवळ चाटची एक गाडी नुकतीच सुरु झाली होती .तिथे समोसा चाट, कचोरी चाट छान मिळतं असे.कुरकुरीत कचोरी किंवा समोसा मध्ये फोडून त्यात गरमागरम पांढऱ्या वाटाण्याचा हळद घातलेला रगडा,त्यावर हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि दही , शेव असं घालून मिळायचे .कधीतरी संध्याकाळी ते खायला मजा यायची😊😊 

 रविवारी सकाळी खासबाग ची चविष्ट  मिसळ खाल्ली कि दिवस "सार्थकी" लागत असे .😃(अजुनही तसेच आहे 😃) या मिसळ मध्ये पोहे किंवा चिवडा ,बटाटा भाजी ,मटकी उसळ एका लांबसर डिशमध्ये घालून त्यावर लाल भडक कट,शेव ,बारीक कांदा घातला जात असे.लोबत दोन पेटी पाव आणि लिंबू असे मिसळीचा "कट "मागेल तितका मिळत असे . (कोल्हापूरला मिसळीच्या रश्शाला कट म्हणतात😃)सोबत आग्रहाने गरम बटाटे वडा ही खाऊ घातला जायचा 😊😋नंतर गरम गरम निरशा दुधाचा चहा ...😊

रंकाळा रोडला मंडई समोर हिंदुस्थान बेकरीचे केक, खारी,कोकोनट बिस्कीट, रस्क...अशा अनेक गोष्टी मस्त मिळत .  त्या खरेदी करण्यासाठी रांग लागत असे 😊महाद्वार रोडच्या कोपऱ्यावर वणकुद्रे दुकानापाशी चोरगेंची मिसळ आणि कोळेकर तिकटी वर आहार मिसळ ही तेव्हाची रविवारची गर्दीची ठिकाणे असत.😊मिसळ सोबत गरम गरम चहा हे लोकांचे आवडते कॉम्बो असे 😋 प्रत्येकाची मिसळ करायची पद्धत वेगळी असे मात्र सगळ्याच जिभेची तृप्ती करणाऱ्या होत्या .,😋😋

पाव भाजी प्रकार त्यानंतर नुकताच चालू झाला होता आणि लोकप्रियतेच्या मार्गावर होता .!!उभ्या शिवाजी पुतळ्याजवळचे चोपदार हॉटेल पण तेव्हा मिसळ, भजी, वडा साठी खूप प्रसिध्द होते . 

बिनखांबी गणपती जवळच्या रसवंतीगृहात उसाचा रस लिटर वर मिळत असे .तो घरी आणून गाळून त्यात आले लिंबू टाकून प्यायला मजा यायची😊माझ्या लग्नानंतर मात्र अहोंचा  दवाखाना असलेल्या प्रयाग चिखली या गावात अनेक गुऱ्हाळघरे होती . रात्री दवाखान्यातून येताना ते चांगला किटलीभर ताजा रस ते घेऊन येत .सोबत गरम गरम चिक्की गुळ तसेच गुळाची खमंग रेवडी पण असेतेव्हा त्यांनी आणलेला ताजा रस पिण्यासाठी घरची सगळी अगदी "चातका" सारखी वाट पहात असत मनसोक्त रस प्यायला मिळत असे .😋😋 जर रस पिऊन सुध्दा शिल्लक राहिला 😃तर आई त्यात कणिक भिजवून दशम्या करीत असे😋 त्या सगळ्यांना खुपच आवडत.

प्रयाग चिखलीत दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असेभरपूर म्हशी गावात होत्यादर पंधरा दिवसाला अहोंच्या कुठल्या ना कुठल्या पेशंट कडून प्रेमाने मोठा डबा खरवस येत असे.(आता सुद्धा असा डबा येतो 😊😊)सुंठ पावडर आणि खमंग गुळ घातलेल्या  त्या खरवसाची चव अफाट होती .😋घरची , शेजारची सगळी जण मनसोक्त खातील इतका तो डबा मोठा असे .तयार खरवस आयता मिळाल्याने घरची, शेजारची सगळीच खुश होत ❤️ 

 त्याच काळात माझ्या लहान मुलाचा टॉफीचा प्रवास रावळगांव , पार्ले चॉकलेट कडून डेअरी मिल्क, फाईव्ह स्टार कॅडबरी कडे निघाला होता .

कोल्हापूरला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिलेबीचे स्टॉल लागायचे. आता ते सगळीकडे लागतात पण त्यावेळेस मात्र जिलेबीचा एकच स्टॉल गणेश मंगल कार्यालयाजवळ लागत असे "राष्ट्रीय खाद्य" जिलेबी त्या दिवशी आणून खाणे हे मस्ट असायचे😃😃

एस टी स्टँड जवळ सह्याद्री हॉटेल मध्ये  मसाला डोसा आणि कॉफी मस्त मिळत असे .

दावणगिरी लोणी डोसा अंबाबाई देवळापाशी नुकताच मिळू लागला होता.तो खाण्याचे सुध्दा  "अप्रूप "वाटत असे . 

स्टेशन रोड ला गोकुळ हॉटेल मध्ये महिन्यातून एकदा तरी जात असू तिथे पण ताजा मसाला डोसा आणि बटाटा पॅटीस मस्त मिळे😋या पॅटीस मध्ये बारीक चिरलेली खोबरे घातलेली कोबीची भाजी असे छोट्या वाटीच्या आकाराचे रव्यात घोळून केलेले हे पॅटीस फार आवडायचे . .. अजूनही अवडते 😋

तसेच कोल्हपुरात समिष आहार म्हणजे नॉनव्हेज मिळणारी पण बरीच हॉटेल होती .साकोली कॉर्नर वरून रंकाळा तलावाकडे जाताना  लागणाऱ्या मारुती हॉटेल मध्ये "वडा कोंबडा" आणि "गोळी पुलाव छान मिळत असे ...वडा कोंबडा म्हणजे मालवणी वडे आणि चिकन..आम्ही घरी सगळे शाकाहारी होतो पण मित्र मंडळी कडून त्याच्या चविष्टपणाची वर्णने ऐकायला मिळायची 😊शिवाय आम्ही शाकाहारी असलो तरी कोल्हापूर बघायला नॉनव्हेज खाणारी कोणी पाहुणे मंडळी आली की त्याना हे पदार्थ खायला न्यावेच लागायचे .कारण ती तर कोल्हापूरची "शान "आहे कधी कधी पाहुणे लोक अंबाबाई दर्शन साठी येत.. आणि दर्शन झाले की त्यांची पावले लगेच नॉनव्हेज हॉटेल कडे वळत 😃खास कोल्हापुरी "तांबडा पांढरा रस्सा "तेव्हा कोंडा ओळ च्या कोपऱ्यावर पद्मा हॉटेल मध्ये मिळत असे .

तसेच ओपल हॉटेल सुध्दा नॉन व्हेज व तांबडा पांढरा रस्सा यासाठी प्रसिध्द होते .असा हा नव्वद च्या दशकातील कोल्हापुरी खाद्य प्रवास नवीन नवीन पदार्थ नवी नवी हॉटेल यांच्या सोबत हा खाद्य प्रवास चालूच आहे आणि राहणार ....आमच्या सारखे अनेक "खवय्ये प्रवासी "या खाद्य मार्गावर चालत आहेत आणि राहणार 😊😊वेग वेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहणार