ती एक सावित्री Vrishali Gotkhindikar द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती एक सावित्री

ती ..एक “सावित्री .

.ती एका लहान तालुक्याच्या गावची मुलगी घरची परिस्थिती चांगली ..घरात पण एकुलती एक त्यामुळे खूप लाडकी सुंदर गुणी हुशार अशा तीला खूप शिकायचे होते वडील पण म्हणत “मुलगाच आहे माझा तो ...तालेवार असा !!!वडलाना भारी कौतुक होते लेकीचे .,बारावी झाली आणी निकालाचे वेध लागले तीला .सायन्स साईड होती मग शहरात मेडिकल साठी प्रवेश घेणार होती ती आणी अचानक शेजारच्या मोठ्या गावातून लग्नासाठी तीला मागणी आली मोठे” घराणे” भरपूर शेती मुलगा दिसायला चांगला आणी  पदवीधर होता त्यांने तीला कुठल्याशा लग्नात पाहिली होती म्हणे वडिलांना काय करावे ते समजेना ..लेकीचा विचार घेतला .तीला पण स्थळ “म्हणून पसंत पडले शिवाय त्यांनी पण सांगितले आम्ही मुलीला लग्नानंतर शिकवू . किती हवे तितके असे अचानक सारे घडले आणी पंधरा दिवसात लग्न पार पडले पण .काही दिवस आनंदात गेले जणु सारे काही मना सारखे घडत होते आणखी मग काय बिनसले कोण जाणे .नवरा अगदी तुसडा वागू लागला ..नंतर समजले त्याचे बाहेर “प्रेमप्रकरण होते ,घरच्यानी खूप विरोध केला होता पण तरीही तो ऐकणार नाही म्हणूनच या .. लग्नाची गडबड केली होती ..तो सुधारेल कदाचित या लग्नानंतर...तीला काय करावे समजेना ..हताश झाली पण पुढे मार्ग नव्हता कारण नव्या बाळाची चाहूल लागली होती थोड्याच दिवसात तिचा बारावीच्या निकाल चांगला लागला ..पण ती स्वत अशी काही संसारात अडकली होती की पुढचे शिक्षण ..केवळ अशक्य होते .सासरच्या लोकांनी केलेली फसवणूक घरी सांगून वडीलाना ती दुख्खी .करू इच्छित नव्हती मग ठरवले तीने ..आता हेच आहे आपले घर मग ..इथेच राहायचे समाधानाने सासू सासरे मात्र तिच्या चांगल्या वागण्याने समाधानी होते त्यांना पण ओशाळवाणे वाटे ..इतक्या चांगल्या मुलीचे आपण नुकसान केले त्याची भरपाई तिच्या वर जास्त जास्त प्रेम करून करायला पाहत असत .ती मनातून सुन्न होती ....पण हसतमुख दाखवत होती सध्या बदल एकच होता बाळाच्या चाहुली मुळे नवऱ्याचा पाय घरात ठरत होता आणी मग आला तो क्षण ...नव्या बाळाच्या आगमनाचा ..तीला एक सुंदर मुलगी झाली अगदी तिच्या सारखीच ..बाळाला  पाहताच सगळी अगदी हरखून गेली ..जणु एक "परीच "आली होती धरती वर !!नवरा मात्र बाळाला पाहताच रागाने लाल झाला ..ही कार्टी आली का तुझ्या पोटी असे म्हणून तोंड फिरवून निघून गेला त्याला “दिवा हवा होता वंशाला ..सासू सासऱ्यांनी खूप समजवायचा प्रयत्न केला पण तो ऐकणांर्यातला नव्हताच ..यानंतर काही दिवस जातात तोच पुन्हा “नव्या “बाळाची चाहूल लागली या वेळेस मात्र तीने ठरवले की हे मुल आपल्याला नकोच ..पण तिच्या मनावर काय होते ?..नवऱ्याला समजले तेव्हा म्हणाला आता तरी आणा आमच्या घराण्याला वारस ..जणू काही सारे तिच्या हातात च होते !सासू सासरे पण म्हणाले पाहू काय होते ते कदाचित बदलेल स्वभाव त्याचा .नियतीला सामोरे जाणे हेच राहिले तिच्या हातात ..यथा अवकाश तीचे दिवस भरले ..यावेळी मात्र तीला जुळ्या मुली झाल्या ..तिचा जीव घाबरून गेला ..नवऱ्याला कळताच त्याने थयथयाट केला ..या चौघीना घरात येवू देणार नाही म्हणाला कसे तरी सासू सासऱ्यांनी त्याचे मन वळवल..यानंतरचे दिवस मात्र तीचे खूप च कठीण होते काही वर्षात सासू सासरे देवा घरी गेले .तिचा होता तो आधार पण तुटला नवरा आता दारूचे व्यसन पण बाळगू लागला घरची सारी घडी विस्कटली ..पैसे आवक कमी आणी व्यसनामुळे जावक जास्त असे होवू लागले तिच्या आई वडिलांना आता सारेच समजले होते पण आता फक्त हळहळ करण्या वाचून काहीच उरले नव्हते मुलीना आम्ही सांभाळतो म्हणाले पण आपल्या नक्षत्रा सारख्या मुलीना दूर करायला तिचा जीव होईना  आता काहीही करून मुलीना शहाणे आणी शिक्षित करणे हेच तीचे ध्येय होते दिवसे दिवस परिस्थिती आणखी बिघडू लागली आता हा “पिणारा “..तिचा नवरा घरी येवून रोज तीला अचकट विचकट शिव्या देवू लागला इतके कमी म्हणून की काय मारहाण पण सुरु झाली जाणत्या लेकी समोर हा सारा तमाशा तीला नको वाटे पण कोण येणार होते तिच्या पाठीशी ?मुलीना ही हे सारे असह्य होई पण काय करणार होत्या त्या तरी .?वडिलांचा त्यांना तिरस्कार वाटे तरी देखील ती त्यांना सांगत असे त्यांचे चुकले तरी ते  वडील आहेत तुमचे तुम्ही फक्त तुमच्या शिक्षणाकडे ध्यान ठेवा मुली खरेच हुशार निघाल्या .वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी यश संपादन केले यथावकाश त्यांना त्यांचे”राज कुमार “येवून घेवून गेले ..मधला काळ तिच्या दृष्टीने खूप कठीण होता ..पण कोणत्या अदृश्य शक्तीने तीला बळ दिले होते कोण जाणे ..नवरा आता पूर्ण हाता बाहेर गेला होता व्यसनांनी त्याला पार “पोखरून “टाकले होते ..ती स्वत पण आता सतत आजारी असे ..इतके वर्षे साऱ्या खाल्लेल्या खस्ता आता “अंगावर” आल्या होत्या आता तर आई वडिलांचे छत्र पण नव्हते तीला आणी एके दिवशी नवऱ्याची तब्येत इतकी खालावली की हॉस्पिटल मध्ये न्यावे लागले डॉक्टरनी सांगितले व्यसनाने त्याच्या दोन्ही  किडनी चे कार्य थांबले होते एक किडनी तरी ताबडतोब बदलायला हवी होती .,.नाहीतर जीवाची शाश्वती नव्हती हे ऐकून ती सैरभैर झाली ..ऑपरेशन खर्चाचा आकडा तिच्या आटोक्या बाहेर होता शिवाय किडनी विकत घेणे पण केवळ अशक्य होतेमुलींकडे काही मागणे तिच्या तत्वात बसत नव्हते किंबहुना ही गोष्ट तीने मुलीना सांगितली पण नव्हती कारण मुली दूर गावी त्यांच्या घरात सुखी होत्या त्यांना समजले असते तर मुली आणि जावयांनी सगळी मदत केली असती मुलींना खरोखर चांगली घरे आणि भली माणसे भेटली होती त्यांना तसदी देणे तिला अजिबात योग्य वाटत नव्हते अशात तु तुझी एक किडनी दे नवऱ्याला .बराच खर्च वाचेल असे तिला तिच्या एका भावाने तीला सुचवले तीने डॉक्टरशी सल्ला मसलत केली .डॉक्टर म्हणाले तसे एक किडनी वर शरीराचे कार्य चालू शकते पण  तुमची तब्येत हे करण्यास योग्य नाहीये .ती हट्टाला पेटली ..मी त्यांच्या साठी हे करायला तयार आहे म्हणाली ज्याच्या साठी हे सारे करीत होती .त्याला याचे काहीच सोयर सुतक नव्हते !!मग सुरु झाले सत्र किडनी मॅच करण्याचे सर्व टेस्ट व्यवस्थित पार पडल्या आता ती तिची एक किडनी नवऱ्याला “दान करणार होती दोन दिवसांनी ऑपरेशन पार पडले सारे व्यवस्थित झाले ..तिलाही खुप रक्त चढवावे लागले पण तिच्या मनाला समाधान इतकेच की आता नवरा वाचेल ..नातेवाईक मंडळी जवळ होती त्यांना ती म्हणाली मला खूप थकवा आलाय आता झोपते शांत ..एक दूरची बहिण फक्त जवळ झोपली तिच्या झोपण्यापूर्वी नवऱ्याचा जरा फ्रेश चेहेरा पाहून तीला बरे वाटले कधी नाही ते हसला पण तो तिच्या कडे पाहून ..बहुधा आयुष्यात पहिल्यांदा असेल ..ती कृतकृत्य झाली !!!सकाळ उजाडली शांत झोपलेल्या तीला पाहून बहिणीला पण बरे वाटले बिचारीची इतकी तडफड फळाला आली म्हणा बहिणीने  हाक मारली उठवण्या साठी ..पण ती केव्हाच पैलतीरी पोचली होती यमाच्या दरबारात नवऱ्याच्या प्राणाची “भीक “मागणारी ही सावित्री मात्र “अहेवपणी “स्वताच यमाला भेटायला निघून गेली ..वृषाली गोटखिंडीकर