तोतया वारसदार - भाग 22 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 22

   तोतया वारसदार

पात्र रचना 

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

रोहन                       - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा            - महादेवराव – विश्वनाथ – सहावी पिढी.

  गोकर्ण ला स्थायिक.

वसुधा                      - लक्ष्मण आणि वर्षाची आई.

बबन                       - सारंग वकिलांचा चपराशी

सुभाष गोखले                 - बबनचा बार मधला मित्र.

भाग  २२           

भाग २१   वरून पुढे  वाचा....

 

संध्याकाळी, सारंग गेल्यावर बबननी त्यांच्या नोटिंगची फाइल काढली. त्यात सारंगने लिहिल होतं की व्यंकटेश आणि सौमित्र दोघांनाही संपत्तीत स्वारस्य नाहीये, जय आज रात्रीच लंडनला  वापस जाणार आहे आणि निशांत बरोबर रोहन सुद्धा गोकर्णाला पडताळणी करायला गेला आहे. अविनाश बद्दल काहीच उल्लेख नव्हता. यांचा बबन ने असा अर्थ लावला की अविनाश बद्दल काही विशेष बोलणं झालं नाही. तो बेपत्ता आहे आणि त्याचा शोध लागला नाही हे त्या लोकांनी मान्य केलं असणार.

बबन विचार करत होता की जर कोणालाच इस्टेट नको आहे, तर मग कोणाला मिळणार? गोकर्णचे गोखलेच सगळीच इस्टेट घेऊन जाणार की काय? नाही नाही, असं होऊन चालायचं नाही. आपल्याला हिस्सा मिळायलाच पाहिजे. त्यानी गोखल्यांना फोन लावायचा प्रयत्न केला पण ऑफिस मधे कोणीच नव्हतं. मग त्यानी त्यांच्या घरीच जाण्याचा निर्णय घेतला.

गोखल्यांच्या घरी गेल्यावर ती दोघं जवळच्याच एका हॉटेल मधे गेले, बबनने त्यांना सगळं अपडेट दिलं. सांगितलं की निशांत आणि रोहन गोकर्णला पडताळणी करायला गेले आहेत.

“म्हणजे, जर त्यांच्या पैकी कोणी निघालं तर त्यांना वारसदार घोषित केल्या जाईल. बबन राव आपण आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.” – गोखले.

“माझं तर काही डोकच चालत नाहीये, तुम्हीच जरा विचार करा आणि सांगा.” – बबन

“हूं, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे, पण नुसता विचार आहे, कसं करायचं ते अजून ठरत नाहीये.” – गोखले म्हणाले.

“काय आयडिया आहे?” बबनने कुतुहलाने विचारले.

“आत्ता नको, मी पूर्ण विचार करून योजना बनवतो आणि मगच सांगतो. पण त्यांच्या आधी मला हे सांगा, की अविनाशची फाइल बंद झाली आहे ना? त्यांच्या शोधाची मोहीम कुठवर आली आहे?” – गोखले

“अविनाश बद्दल काहीच कळलेलं नाहीये. निशांतने इथल्या आर्मी वेलफेअर ऑफिस मधे चौकशी केली, पण काहीच जास्तीची माहिती मिळाली नाही. मग तो  दिल्लीला गेला होता, पण तिथेही बहुधा काही समजलेलं दिसत नाहीये. म्हणून पुढचं पाऊल म्हणून निशांत आणि रोहन गोकर्णला चालले आहेत.” – बबन   

“ठीक आहे मग मी योजना तयार झाली की तुम्हाला फोन करतो.” – गोखले.

बबनने मान डोलावली आणि दोघ चालू पडले.

*****

रात्री मुंबईला पोचल्यावर, निशांतनी त्यांच्या ओळखीच्या टॅक्सी कंपनीला फोन केला आणि एक टॅक्सी चार दिवसांसाठी बूक केली. टॅक्सी यायला थोडा उशीर होता म्हणून दोघांनी जेवण उरकून घेतलं. टॅक्सी आल्यावर त्यांचा प्रवास सुरू झाला.

निशांत नी सांगितलं की “हॉटेल मुर्डेश्वरला आहेत, म्हणून आपण मुर्डेश्वरला जातो आहोत, गोकर्ण ते मुर्डेश्वर जेमतेम तासभराचा प्रवास आहे.”  रोहनला काहीच माहिती नव्हती, त्याने त्यामुळे हो म्हंटलं. मुर्डेश्वरला ते लोक सकाळी पोचले. हॉटेल वर जाऊन आंघोळी वगैरे आटोपून नाश्ता करायला खाली उतरले. टॅक्सी ड्रायव्हर त्यांची वाटच पाहत होता, त्याला बरोबर घेऊन नाश्ता आटोपला आणि गोकर्ण कडे निघाले.

गोकर्णला पोचता पोचता १२ वाजून गेले होते. मंदिरात बरीच गर्दी होती, पण त्यांनी गोखले गुरुजींना भेटायचं आहे म्हंटल्यांवर त्यांना दरवाजा वरच्या शिपायानी आत सोडलं. गोखले गुरुजी कामात होते, म्हणून त्यांना थांबाव लागलं. दुपारी २ च्या सुमारास गुरुजी मोकळे झाले, आणि गाभार्‍यातून बाहेर आले. तिशीच्या गुरुजींना पाहून निशांत आणि रोहन दोघांनाही आश्चर्य वाटलं त्यांनी साठी ओलांडलेल्या माणसाची कल्पना केली होती.

“नमस्कार, मी लक्ष्मणशास्त्री गोखले. तुमचं काही काम आहे माझ्याकडे,  अशी सूचना मिळाली मला.”

“बरोबर आहे. गुरुजी मी निशांत, नागपूर वरून खास तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. हे माझे सहकारी रोहन.” निशांत पुढे होऊन म्हणाला.

“असं आहे होय, म्हणजे तुम्हीच माझ्याशी फोन वरून संपर्क साधला होता तर. बोला काय काम आहे?” – गोखले गुरुजी.

“काय आहे शास्त्रीजी आमचं काम जरा वैयक्तिक स्वरुपाचं आहे, तेंव्हा जर तुमची हरकत नसेल तर आपण तुमच्या घरी जाऊन बोलू शकतो का? म्हणजे तेवढ्याच साठी आम्ही नागपूर वरून इथे आलो आहोत.” – निशांतनी घरीच का, याची आवश्यकता प्रकट केली.

“असं काय वैयक्तिक काम आहे? इथे आपल्याला कोणीच त्रास देणार नाही. इथे कोणीच दुसर्‍याच्या कामात लुडबुड करत नाही.”

निशांतनी चटकन निर्णय घेतला. म्हणाला “ठीक आहे. आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारू?”

“गोखले जरा विचारात पडले, त्यांच्यासाठी हा अनुभव नवीनच होता. ते गोंधळले  आणि म्हणाले “तुम्ही पोलिस आहात का? की CID?”

“नाही. आम्ही तुमच्या सारखी साधीच माणसं आहोत, पण एका वेगळ्याच कारणा  साठी, काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे, म्हणून. आणि म्हणूनच आम्ही एवढ्या दुरून इथे आलो आहोत.” – निशांत.

“ठीक आहे विचारा, पण जो प्रश्न मला विपरीत वाटेल, त्याचं उत्तर मी देणार नाही.” गोखल्यांनी ठामपणे सांगितलं.

“तुमच्या किती पिढ्या इथे देवळात काम करत आल्या आहेत?” – निशांत.

“गेल्या पांच पिढ्या, मी सहावी पिढी.” – गोखलेशास्त्री

“सर्वात प्रथम इथे कोण आलं?” – निशांत.

“विश्वनाथ, ते माझे खापर पणजोबा.” – गोखले शास्त्री.

“ते कुठून आले?” – निशांत.

“मला समजत नाहीये की हे सगळं तुम्ही का विचारता आहात? असो, ते वेळणेश्वराहून आले. झालं समाधान? आता मला तुमचा संशय यायला लागला आहे, आमची इतकी माहिती गोळा करण्याचं तुम्हाला कारणच काय ?” – गोखले शास्त्री.

“शास्त्री बुवा, शांत व्हा. याच्या पुढची चर्चा फंक्त तुमच्या घरी आणि ती सुद्धा  तुमच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांसमोरच होऊ शकते. तेंव्हा आता आपण तुमच्या घरीच जाऊ.” – निशांत.

“हे बघा,” गोखले शास्त्री म्हणाले, “मला वाटलं होतं की कोणीतरी तुम्हाला माझं नाव सांगितलं, आणि काही अनुष्ठान वगैरे करायला तुम्ही मला भेटायला आला आहात. पण तुमचं बोलणं भलत्याच वळणावर जात आहे. मला तुमच्यात आता काही स्वारस्य उरलं नाही. तेंव्हा आता तुम्ही निघा. मला उशीर होतोय. नमस्कार.”

“शास्त्रीजी, एक मिनिट” निशांत म्हणाला. “आता काय आहे? मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये, या आता तुम्ही.” गोखले शास्त्री म्हणाले आणि चालू पडले.

निशांत त्यांच्या मागे धावला, म्हणाला, “आमचं एक मिनिट ऐकून घ्या, मग तुम्हीच आम्हाला तुमच्या घरी घेऊन जाल. अगदी खात्रीने.”

“जे काय आहे, ते एकदाचं बोलून टाका, पण मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही.” – गोखले शास्त्री अत्यंत वैतागाने बोलले.

निशांत जरा विचार करून बोलला “शास्त्रीजी, तुमचे खापर पणजोबा, विश्वनाथ शास्त्री, यांचे मोठे बंधु सखारामपंत गोखले, वेळणेश्वर मधले त्या वेळचे प्रसिद्ध वैद्य, यांच नाव कदाचित तुम्हाला ऐकून माहीत असेल, तर..”

निशांतला मध्येच तोडून गोखले शास्त्री म्हणाले, “हो माहीत आहे, पण त्यांचं काय? २०० वर्षांपूर्वीची आमच्याच वंशाची माहिती, मला का सांगताय तुम्ही? यातून काय साधणार आहे? आणि मुळात तुम्हाला हा इतिहास कसा माहिती आहे? कोण आहात तुम्ही? मला कशात अडकवण्याचा प्लॅन आहे तुमचा? आणि का? माझा आणि तुमचा संबंधच काय?” गोखले शास्त्री आता गोंधळले होते, त्यांना आता चीड येत होती. त्यांच्याच वंशाची माहिती हे त्रयस्थ का सांगताहेत  हेच त्यांना उमगत नव्हतं.

“शास्त्रीजी मला तुमची मन:स्थिती समजते. तुमच्या सर्व प्रश्नांची माझ्याजवळ उत्तरं आहेत.” निशांत घाई घाईने बोलला. “त्या सखाराम पंत गोखल्यांचा हा खापर पणतू.” रोहनला समोर करून निशांत म्हणाला, “हे श्री रोहन गोखले, लंडनला असतात. खास तुम्हाला भेटण्या साठी लंडन हून इथे आले आहेत. पण तुम्हीच विश्वनाथरावांचे वंशज आहात, ही खात्री करून घेण्या साठीच प्रश्न विचारले. यांचं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. आता तुम्हीच सांगा तुम्ही आम्हाला घरी नेणार का?”

गोखले शास्त्री थोडा विचार करत होते, मग म्हणाले की “तुम्ही जे काही सांगता आहात, ते खरे आहे, असं धरून चालतो.”

“अहो १०० टक्के खरं आहे, नाहीतर लंडन वरून तुम्हाला भेटायला हे रोहन कशाला आले असते?” निशांतनी आपली बाजू मांडली. त्याने रोहनचा पासपोर्ट दाखवला. “याच्यावरचे हे शिक्के पहा, चारच दिवसांपूर्वी हे भारतात आले. ते ही खास तुम्हाला भेटण्यासाठी.”  

“हे रोहन गोखले आहेत एवढंच पासपोर्ट वरून स्पष्ट होतंय, पण हेच सखारामपंतांचे वंशज आहे हे कसं कळणार? आणखी एक, यांना इथे येऊन चार दिवस झालेत, आणि खास मला भेटण्या साठी आले म्हणता, तर हे इथे चार दिवसांपूर्वीच यायला हवे होते. पण आज चार दिवसांनंतर आलेत. असं का?” – लक्ष्मणशास्त्री म्हणाले. अजूनही त्यांची या लोकांना घरी घेऊन जायची तयारी होत नव्हती. त्यांच्या शंकांचं अजून पूर्ण निरसन झालं नव्हतं. आणि ते साहजिक होतं. कोणीही अनोळखी माणसांना आपल्या घरी घेऊन जाणार नाही.

“माझ्या लक्षात येतेय,” निशांत म्हणाला. “ या रोहन चे आजोबा हे नागपूरचे. मी त्यांच्या साठी काम करतो, यांनीच मला तुमच्याशी संपर्क साधायला  सांगीतला होता. आणि त्या प्रमाणेच आपलं बोलणं झालं होतं. आता यांना भारतातली काहीच माहिती नाही, म्हणून हे आधी नागपूरला आले आणि मग आम्ही दोघं तुम्हाला भेटायला इथे आलो. आमच्या जवळ काही कागद पत्र आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. बघा तुमची खात्री पटते का”

ठीक आहे, दाखवा.” शास्त्री म्हणाले.

मग निशांतने वंशावळी दाखवली, आणि सांगीतलं की “विनायकरावांची  मुलं व्यंकटेश आणि सौमित्र आणि सौमित्रचा मुलगा रोहन,

आता रोहन पुढे आला. “मीच रोहन. आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला बदमाश किंवा चोरटा वाटतो का?”

शास्त्री थोडा विचार करत होते. ते रोहन आणि निशांत कडे पाहत होते. कुठल्याही दृष्टीने ते बदमाश वाटत नव्हते. “ ठीक आहे. चला घरी. पण असं काय आहे जे इथे बोलू शकत नाही हे जरा सांगाल का?”

“शास्त्रीजी मला जे बोलायचं आहे ते सर्वांसमोर बोलायचं आहे. माझं बोलणं तुम्हाला पटलं नाही तर आम्ही लगेच निघून जाऊ. एवढा विश्वास ठेवा आमच्यावर.” – रोहन  

घरी पोचल्यावर लक्ष्मण गोखले शास्त्री म्हणाले “बसा, मी आईला आणि बहि‍णीला बोलावून आणतो.”

त्या दोघी आल्यावर शास्त्री म्हणाले, “ही माझी आई वसुधा, आणि ही माझी बहीण वर्षा. आणि आई हे रोहन गोखले, आणि हे निशांत. रोहन लंडन हून आला आहे आणि निशांत नागपूर वरून. मी म्हणालो होतो ना तुला नागपूरहून कोणी तरी आपली चौकशी करताहेत म्हणून, तीच ही लोकं.”

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com