नाते जन्मापलिकडचे - भाग 9 lekhani द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते जन्मापलिकडचे - भाग 9

यधण्या तिच्या नृत्यबद्धल कौतुक करत होती. वैदेहीने तिचे आभार मनात विचारले "बरं तू ते पाहिले का?"

FLASHBACK
एका कोपऱ्यात वैदेहीने यधण्याला खेचले.
"का गं काय झालं? असं का बाजूला आणलंस मला.. क्या करणे वाली हो मेरे साथ हा.."स्वतःच अंग झाकत ती घाबरायची acting करत होती.
"ए गप्प असं काही नाही आहे. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे " तिने आजूबाजूकडे नजर फिरवली. "बोल "
"अगं तुला माहित आहे, शिव माझ्याकडे नजर चोरून बघण्याचा प्रयत्न करत आहे.. मी हे मागापासून बघत आहे."
"Ooo😏तेरे सौंदर्यने किसीका तो दिल चुरा लिया लगता है 😁😁😁"तिला चिडवत ती म्हणाली. वैदेही हलकीच लाजली पण तिने लगेच आपल्या भावनांवर ताबा मिळवला.
"चूप.. पण मला एकदा त्याला टेस्ट करायचं आहे. आता कार्यक्रम आहे ना आपला.. जरा बघ तो माझ्या परफॉर्मन्स च्या मध्ये मला बघतोय का."
"परफॉर्मन्स आहे, बघणारच ना तो, तू भी कमाल करती है "
"ते पण आहे, पण हे एक बघ कि तो मला बघण्यासाठी आटापिटा करतोय का.. ती अनामिक ओढ मला बघण्यासाठीची.. तुला कळले. तो असा मुलगा आहे कि उगाच कोणत्या गोष्टीच्या मागे मुळीच लागणार नाही, कारण असल्याशिवाय "
FLASHBACK ENDS

"तू बोलतेस ते बरोबर होतं गं.. मी खरंतर शिवच्याच मागे बसली होती.. तुझा परफॉर्मन्स सुरु झाला तेव्हा अधून मधून कोण ना कोणतरी येतच होतं, literally शिव वाकून वाकून बघण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे कि असं जाणवत होतं कि त्याच्या नजरेतून काही सुटता कामा नये "वैदेहीची मान थोडी उंचावली..

"बघ मी म्हणले होते ना "
" हो गं.. पण याचा मायना काय धरावा? "
" खरंतर मीच गोंधळली आहे, मन मात्र सांगतंय कि अपेक्षा करू नकोस. असं का??? "ती थोडी दुखावली.
"काय माहित "तिला सांत्वन देत ती म्हणाली.

कार्यक्रम संपला, पण तरी देखील तरुण मंडळी अजून हॉल मध्ये होती, त्यात हे सगळे चिल्ले-पिल्ले.
सिद्धी देखील आली होती.
"छान दिसतेस गं सिद्धी 🙂‍↕️"असं शिव म्हणाला. वैदेही देखील समोर होती. तिला थोडे वाईट वाटले. कारण ती देखील खूप सुंदर दिसत होती, पण तरी देखील शिव ने मात्र तिचे कौतुक केले नाही.

आणखी वाईट कुठे वाटतं होते, तर जो शिव तिची झलक बघण्यासाठी आटापिटा करत होता, तोच शिव तिला एकदा देखील "खूप छान दिसतेस "अशी साधी कौतिक देखील करत नाही..नंतर शिव सिद्धी सोबतच बोलत बसला.वैदेही बाजूला आहे, तिच्याशी पण बोलावं याचं भान त्याला उरलंच नाही.. वैदेही बोलायचा प्रयत्न करत होती, पण मात्र त्याचं बोलणं लगेच सिद्धी कडे वळायचे.

यधण्याला ते समजले. वैदेहीसाठी वाईट वाटतं होते."चल वैदेही, आपण घरी जाऊ. कदाचित आपलू गरज नाही इथे "तिचा खांदा थोपटत ती म्हणाली.

वैदेहीने देखील संथ मान डोलावली. जडावल्या पावलांनी ती हॉल च्या बाहेर पडली.. बाहेर जाण्या अगोदर तिने शेवटचे शिव कडे पाहिले.अश्रू दाटून आले, पण तिने ते वाहायच्या अगोदरच रोखून धरले. ती घरी परतली. घरात प्रवेश करण्या अगोदर आपला चेहरा हसमुख ठेवला.

घरी आल्या आल्या आईने विचारले "वडापाव खाल्ले कि नाही तू?"
"अगं एक दोनच भेटले ना गं, पण ठीके काही हरकत नाही. तू खाल्लंस?"
"हो अशु ने आणून दिले होते."
"बरं, आणि पप्पा??"
"ते त्यांच्या मंडळी सोबत आहेत, नगरसेवक आहेत ना "मिश्किलपणे आई म्हणाली.वैदेही देखील हलकीच हसली.
"मी येते कपडे बदलून "असं बोलून ती बेडरूम मध्ये गेली.

तिला पुन्हा ती गोष्ट आठवली. कपडे बदलले.खिडकीच्या बाहेर आकाशात डोकावले.
मंद हवा सुरु होती. शेवटी ते साठवलेले अश्रू गळलेच.हवा तिला सुखावणाऱ्या गाराव्याने शांत करू पाहत होती. ती थोड्या वेळात शांत झाली..

"ताई, येतेस ना जेवायला?"तिला लाडाने घरी ताई बोलवायचे.
"हो एक पाच मिनिट.. आले "गालावरील अश्रू पुसत, स्वतःला सावरत ती म्हणाली.

तिने स्वतःलाच प्रश्न केला,
"प्रेम हेच असतं का???कि याहून काहीतरी खूप वेगळं दडलं आहे या शब्दामागे ??"

पुढे काय होईल या साठी वाचत राहा.