"आणि हो जाता जाता तुझ्यात असलेलं गुपित मी तुला सांगून जातो "
"माझ्यात असलेलं गुपित?? Heh??"ती पुटपुटली.
"सांग काय आहे ते "तिने रिप्लाय केला.
"हा सांगतो.. पण अगोदर आभारप्रदर्शन करायला नको का तुझे..."
"Heh"तिला आणखी गोंधळात टाकलं.
"वैदेही देवी 🙏आम्ही आपले खूप आभारी आहोत.. तुमच्यासारखं कोणीच नाहीये जो माझ्याशी मनातल्या गोंधळाचं उत्तर शोधू शकेल. माझं कावरं बावरं झालेलं मन ऐकू शकेल...तुमच्यातच ती गोष्ट आहे देवी🙏अशीच कृपा राहवो "
"तथास्तु बालक ✋अष्टपुत्र सौभाग्यवती भव"तो हसला.
"देवी अगोदर सौभाग्यवती तरी येउदे आयुष्यात तेव्हा हे आशीर्वाद द्या 😄अगोदरच देऊन ठेवले. चुकून माझ्यावर लागू झाले तर 😂"
"अरे मग तर आणखी बेहेत्तर... तसंही तू माणूस नाहीयेस.. मग बघूया ना आपण एक्सपेरिमेंट करून 😁"
"हं हं राहूदे हो... असो आपण विषयावरून भरकटायला नको.. मला पण जायचंय "थोडा थांबा घेत त्याने पुन्हा लिहायला सुरवात केले.
"तू एक healer आहेस वैदेही.. सध्या तूझ्या पॉवर जागृत नाहीत, पण जर तू ते अनलॉक केलंस तर मात्र....."तो थांबला.. त्याला खुणावलं गेलं थांब म्हणून.
"सांग ना यार.. अशी उत्कंठा वाढवू नकोस 😭😭"
"नाही, ते तू शोध. सगळं जर मी सांगितलं तर अर्थ काय त्याला 😉😁बाकीचे तू तुझं शोध. मी तुला तुझा मार्ग दाखवला, पुढचा प्रवास हा पूर्णपणे तुझा "
"मतलबी 😒"तो हलकाचं तिच्या या भोळेपणावर हसला.
"आता हिला कोण सांगणार ना बॉस..कि ती स्वतः खूप सक्षम आहे तिचं अस्तित्व शोधण्यासाठी "डोक्याला हात लावत तो हसत म्हणाला.
"तू देखील तसंच होतास हे विसरू नकोस शिव -😃"
"अ.. तुमचा आवाज नाही येत आहे... काय बोलतंय तुम्ही?? आ????🙉👂 काय तर नेटवर्क गेल वाटतं. नंतर कनेक्ट होतो मी "असं बोलून तो पळ काढून निघून गेला.. त्याला माहित होतं त्याला भलं मोठं lecture ऐकायला लागलं असतं जर तो थांबला असता तर.
ती शक्ती देखील हलकीच त्याच्यावर हसली."नौटंकी साला.. कुठे पळून जाशील रे. पुन्हा इथेच येशील.
हॉल मध्ये येत त्याने तिला एक मेसेज टाकला.
"एवढं लक्षात ठेव... कि तू कोणाला ही हेअल्थ करू शकतेस.. अगदी माझ्यासारख्या Non-human ला देखील."हे वाचताच वैदेही डोकं खाजवू लागली.
"मायला कधी उवा झाल्यातरी एवढी खाज सुटली नव्हती तेव्हा आता सुटतेय,काय भानगड आहे ही?"ती विचारात हरवून गेली.ती विचारात हरवलीच होती कि मागून भावाने जोराचा बुक्का तिच्या पाठीत हाणला, "काय मग कुपोषित हिप्पो, तुझं साम्राज्य कसं चालूये? खायला देतेस ना त्यांना?"तो timepass साठी तिला काहीपण म्हणायचा.
"😑"डोळे बारीक करत ती त्याच्याकडे बघत होती.
"काय मग 'पाडेकरांच्या' घराला लागलेलं ग्रहण 🤗तुझं कसं चालूये?तुला इतर ग्रह नाहीत का? येऊन जाऊन इथेच चक्रा मारतोस..काय तर, तुझी कुठेच किंमत नाही रे 😗 सगळीकडे मार खातोस."आता तो तिच्याकडे डोळे बारीक करून बघत होता..
ती त्याची मज्जा घेत होती.. खेळकर पद्धतीने भुवया उडवत होती.
त्याला आणखी चिडवण्यासाठी आपल्या नाकाचा शेंडा वर करत ती त्याला ठेंगा दाखवत होती.. तो चिडला......... आणि.........."मम्मी!!!😭😭😭बघ ना ताई मला चिडवतेय 😭😭😭"
"गेला लगीच मम्मी कडे 😏"केसं उडवत "स्वतः fight नाही करू शकत.. ताकदच नाही त्याच्यात...मोट्टा "समीर चौघुले style मध्ये ती म्हणाली.
ती तिच्या मोबाईल मध्ये गेम खेळत बसली.असाच एक दिवस संपला.
पुन्हा काही दिवसांनी शिवचा तिला मेसेज आला..
"वैदेही.... यार मला जाम आवडू लागलीये आकृती 😭😩पण तिच्याशी बोलायला भेटत नाही... माझ्याशी स्वप्नात पण येऊन गेली 🥰असं वाटतं का माही भेटलो मी हिला आधीच.. वेदिका पेक्षा पण जास्त सुंदर आहे ती 🥰आणि तिच्याहून दुप्पट चांगली"वैदेहीचं डोकं सटकलं.
"एक चमाट मारिन... दोन वेगळ्या मुलींची तुलना करतोस!!तुला ना काय घेणं देणं नाही आवडण्याशी.. तू आकृतीचा फक्त उपयोग करतोय वेदिका वरून मन उठवण्यासाठी.. बाकी काही घेणं देणं नाही तुला .वेदिका भेटली नाही म्हणून तिचं अस्तित्त्व तू दुसऱ्या मुलीमध्ये शोधू पाहतोय..आणि फक्त वेदिकाच्या बाबतीत नाही तर सिद्धी आणि इतर सगळ्यांसोबत घडतंय... तू रिया वरून move ऑन करू शकत नाही आहेस.. म्हणून तू इतर मुलींमध्ये ती भेटतेय का?हे शोधत फिरत आहेस. काय स्तिथी करून घेतलीये स्वतःची!"
हे वाचताच तो गडद विचारात हरवला.. "मी हे खरंच असं वागतोय का?"असं त्याला वाटू लागलं.
"मला थोडा वेळ हवा.. विचार करण्यासाठी.. मी येतोच "असं बोलून तो ऑफलाईन गेला.
सुस्कारा तिने सोडला."देवा ह्याच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होऊ दे रे, त्याचं खरं प्रेम त्याला लवकरात लवकर मिळूदे.. नाहीतर हा असा भरकटलेलं तारू बनून फिरत राहील.."
"तथास्तु बाळा ✋🙂↕️जशी तुझी इच्छा "ब्रह्मांडातून जणू तो आवाजच तिला आला. ते खरं कि खोटं हे तिला कळत नव्हतं..
पण मनाशी थोडा स्वार्थ देखील जन्म घेत होता.
"ती जर मी असली तर खूप बरं होईल... शेवटी बऱ्याच प्रतीक्षे नंतर मला माझं फळ भेटेल 🙂↕️"
"बघूया ना.. काय होतं ते. गरज नाही तूच असावी ती.. पण गरज असू शकते कि ती तूच असशील"ब्रह्मांडच्या कोपऱ्यातून कुठूनतरी ते वाक्य होतं..तिला हे सगळं ऐकू येत होतं..
पण मनाशी कोणते आश्चर्य तिने बाळगले नाही.. जणू तो आवाज तिला ठाऊकच होता!!
पुढे काय होईल यासाठी वाचत राहा ✨रेट करायला विसरू नका.. आणि आवडलं तर follow देखील करा.
माफ करा जरा सेमिस्टर च्या परीक्षा देत होते.. त्यातच व्यस्त झाले. पण पुढे मी नियमित भाग टाकेल ✨