एक प्रेम कथा अशीही... भाग 9
भाग 8 वरून पुढे
सूर्य पश्चिमेकडे सरकू लागला होता. आजूबाजूलचा सर्व परिसर तांबूस प्रकाशाने न्हाहून निघाला होता. जणू अस्ताला जाणारा सूर्यहि सोने उधळीत असावा असेच भासत होते. अधूनमधून सुंदर असे राघू, मैनेचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते. हलक्या हलक्या वर्षासरी वरुणच्या नेत्राला मोरपंखी स्पर्श करीत होत्या. " कही दूर जब दिन ढल जाये सांझ कि दुल्हन बदन चुराये... " कुठेतरी रेडिओवर सुरु असेलेले जुने गाणे त्या सायंकाळचे सौंदर्य अधिकच खुलवत होते . एका हातात गुलाब पुष्पाला अलवार स्पर्श करीत वरुण त्याच्या घराच्या समोर असलेल्या बागेत उभा होता.
" अरे मित्रा नक्कीच पार्टी करू.. अश्या या थंड थंड वातावरनात एक गरमा गरम चिकन तो बनता है बॉस.. फक्त काही दिवस थांब मित्रा.... पुढच्या सप्ताहात...नक्की... डन मित्रा ".
वरुणने त्याच्या माथ्यावर जमा झालेले बारीक वर्षासरीचे थेंब हाताने पुसून टाकले. त्याची खट्याळ नजर वर जमा झालेल्या काळ्या मेघांना न्हाहाळत होती.
" मनाला वेड लागेल असेच हे मनमोहक वातावरण आहे.... छे आपल्याला काही असं लेखकासारख किंवा कवीसारखं बोलता येणार नाही. अश्या सांझ वेळी माझं मन एकच गाण गुणगुणायला लागत... " हा असा सांझ गारवा वाटे मनाला हवा... हवा "पण हे झालं जुन्या काळातल्या लोकांचं आणि आता जर पावसाच्या सरी बरसायला लागल्या कि एकच गाणं माझ्या मनात वाजू लागत " वर ढगाला लागली कळ.. .. पाणी थेंब थेंब गळ.. " वरुण स्वतःशीच हितगुज करीत होता आणि मनातल्या मनात खुदुखुदू हसत होता.
" पण काहीहि म्हणा बाहेरच वातावरण अगदी प्रफुल्लतेचा गारवा देणारच आहे. सदाफुलीच्या रोपट्याला लहडलेले पांढरी, गुलाबी सुमने आणि त्यावर बारीक बारीक उभे असलेले दवबिंदू, गाडी -मोटारीमुळे लोकांच्या अंगावर उडणारे फवारे त्यामुळे त्यांची झालेली त्यांची तारांबळ, राघू मैनेचे मुक्तपणे आकाशात विहार करणारे थवे अगदी शांतपणे पाहत राहून त्याच्यातच विलीन व्हाव असंच वाटतंय. अश्या थंडगार बोचऱ्या वातावरणात एक कप कडक अद्रकची चहा आणि एक प्लेट गरमा गरम कांदा भजी हवी होती. छे ! पण आईसुद्धा घरी नाही. नाहीतर आईलाच गरमा गरम भजी करून मागितली असती. एक मिनट पण आई जरी घरी नसली तरी घरात बटाट्याचे चिप्स आहेतच कि.. गरम भजी जरी नसली तरी काय झाले.. तळलेले गरमा गरम चिप्स आणि सोबतच एक कप अद्रकचा चहा घेऊन या थंडगार सायंकाळचा आस्वाद घेऊ ".वरुणच्या चेहऱ्यावर आनंदाचे रिंगण गुंफले होते. ठरल्याप्रमाणे तो किचन मध्ये जायला निघाला आणि एवढ्यात...
वरुणचा मोबाईल खणाणला. कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून तो फोन आला होता. त्यामुळे त्याच्या कपाळावर आठ्यांनी गर्दी केली होती.
" Hello.. वरुण मी अवनी बोलतेय ".पलीकडून आलेल्या आवाजाने वरुणची तंत्री उडाली होती.
" हा... अवनी बोल ना कशी आहेस आणि माझा नंबर आहे तुझ्याकडे?"
" ते जाऊदे... तू आत्ता माझ्या घरी येऊ शकतोस का मला काही रोपवाटिकेतून रोपटे विकत घ्यायचे आहे आणि काही पुस्तकांची खरेदीहि करायची आहे ". एकादमात अवनी म्हणाली.
" हो येतो ना आत्ताच येतो तुझ्या घरी ".वरुणच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं होतं. त्याने भराभरा सर्व आवरा आवर केली आणि अवनीच्या घराकडे जायला निघाला.
चेक्सच निळं शर्ट आणि त्यावर काळा पॅन्ट वरुणवर कमालीच उठून दिसत होतं. त्याची दुचाकी गाडी भरघाव वेगाने धावत असल्यामुळे जेल लावून उभे केलेले त्याचे केस वाऱ्यावर भुरुभुरु उडत होते. अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी डोळ्याला लावलेल्या त्याच्या गॉगल भोंवती जमल्या होत्या. डोळे मिचकावून तो समोरच सर्व काही पाहण्याचा प्रयत्न करीत होता.
" ऐरवि एवढी रागावणारी अवनी आज चक्क आपल्याला खरेदी करायला सोबत चल म्हणते" या वाक्याने त्याच्या चंचल मनात आनंदाच्या सुप्त लहरी उठल्या होत्या. शेवटी त्याची दुचाकी गाडी अवनीच्या घरासमोर थांबली. मोकळे सोडलेले केस, हलकासा मेकअप आणि चेहऱ्यावर एक स्मितहास्य असणारी अवनी त्याच्या नजरेस पडली. तिने हळुवारपणे आपल्या घराचे गेट उघडले . तिची स्कुटी बाहेर काढत शांतपणे वरुनला म्हणाली.
" आई बाबा आज घरी नाही आहेत...मला आज थोडंस मोकळं बाहेर फिरायचं मन करत होतं म्हणून तुला बोलावलं.. तुला काही त्रास तर नाही ना झाला?".
कितीतरी वेळ तिच्याकडे एकटक पाहत असलेला वरुण भानावर आला.
" नाही... नाही... त्यात त्रास कसला ".
अवनीने आपली स्कुटी सुरु केली. वरूनही तिच्यासोबत आपली स्कुटी घेऊन चालत होता. अवनीची स्कुटी भरघाव वेगात होती. हलकेच स्पर्शुन जाणाऱ्या वाऱ्यामुळे मोकळे सोडलेले तिचे केस तिच्या तेजोमय चेहऱ्याभोवती पिंगा घालत होते.वरूनही अधून मधून तिला हलकेच चोरनजरेने न्याहाळत होता.
शेवटी त्या दोंघाचीही गाडी रोपवाटिकेजवळ थांबली. अवनी काही फुलझाडे आणि फळझाडे विकत घेऊ लागली.
" दादा ते गुलाबाचं रोपटं कसं दिल? "
"वीस रुपयाचं आहे ताई "
" बर द्या ते पण " सर्व रोपटे हातात घेऊन अवनी म्हणाली.
" पहिल्यांदाच एक गुलाब एका गुलाबाचं रोपटं घेऊन गुलाब उमलण्यासाठी प्रतीक्षा करेल " वरुण अवनीच्या कानात तिची खोडी काढत म्हणाला. एक निरागस हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमललं होतं.
" हा... हा... हा अतिशय टुकार विनोद होता हा ". तोंड वेडंवाकड करीत ती म्हणाली. अवनीच्या चेहऱ्यावर जरी क्रोध असला तरी तिच्या मनात हास्याच अंकुर फुटल होतं.
अवनी आणि वरुणने नंतर काही पुस्तकांची खरेदी केली. वरुण अवनीच हे मुक्तपणे विहार करणार रूप पहिल्यांदाच पाहत होता. आज तिच्या चेहऱ्यावरची कांती लख्ख झळाळत होती.
" ऐ वरुण आपण चहा घेऊया का?" अवनीने प्रश्न विचारला.
" हो.... चल ना त्या बाजूच्या रेस्टॉरंट मध्ये खूप छान चहा मिळतो "
" रेस्टॉरंट मध्ये नाही रे...त्या टपरीवर चहा पिऊ ".
" काय? टपरीवर चहा आणि ते पण तू.. " वरुणच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या.
" का.... मी नाही घेऊ शकत का "
" घेऊ शकते तस काही नाही "
" मग..... "
गरमा गरम चहाचे दोन वाफाळलेले कप त्यांच्यासमोर ठेवले होते. अवनी त्या गारव्यात विलीन होऊन चहाचा मनमुरादपणे आस्वाद घेत होती. एका हाताने रिमझिम बसरणाऱ्या वर्षासरीला ती अलवार स्पर्श करीत होती. आपल्या नाजूक मुठीत ती पावसाचे काही थेंब पकडून त्यांच्याशी लडिवाळपणे खेळत होती. वरुण तिचं हे रूप आपल्या नेत्रात साठवत होता. हि खरंच अवनी आहे कि तिची जुळी बहीण हा भाबडा प्रश्न त्याच्या मनाला छळत होता. न राहवून तो म्हणाला.
" तुला असं कधी पाहिलंच नाही ना.. म्हणून जरा विचित्रच वाटतंय म्हणजे बघ ना तू नेहमी पुस्तकातच आपले डोके खुपसून असायची "
" खरं आहे रे... जीवनात स्वैरपणे जगायचं राहूनच गेल. मी पहिली पासून ते दहावी पर्यंत टॉपर होती. अकरावी आणि बारावी मध्येही मी माझा अव्वल क्रमांक कायम राखला. पण या सर्व शर्यतीत जीवनात बेधुंदपणे आणि बेधडकपणे जगणं विसरूनच गेले. खरंतर मला लेक्टर बंक करून कँटीन मध्ये टाइमपास करायला आवडतं, मुलांवर शिट्ट्या मारून कमेंट करायला आवडतं, भरघाव स्कुटी चालवत अगदी देहभान विसरून जोरजोरात गाणी म्हणायला आवडतात. आयुष्याच्या हिंदोळ्यावर आपला प्रत्येक रंग उधळावा अशी इच्छा असते. परंतु घरच्यांचा माझ्याबाबत असलेल्या अपेक्षा आणि सततची अव्वल राहण्याची टांगती तलवार मला हे सर्व करण्यापासून रोखून ठेवत आहे ".
" आपण किती लवकर समोरच्याच्या वागणुकीतून आपलं मत बनवतो ना पण त्याच्या मनात काय चाललंय...कोण जाने " वरुण स्वतःच्या मनाशीच म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर हजार सश्यांची उत्सुकता होती.
" तुला जर कधी असं करावस वाटलं तर नक्की सांग.. मी नक्कीच तूझ्या सोबत असेल ".
" खरं सांगू ..... तू किती बेधडकपणे सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या करतोस. म्हणजे कुठलाच लगाम तू आपल्या मनाला लावत नाही.नाहीतर आमचं घ्या पुस्तक, अभ्यास आणि मी या त्रिकोणातून कधी बाहेर पडेल कुणास ठाऊक. तू माझ्याशी केलेल्या चेष्टा, कमेंट ह्या मला आवडतात ह्याचा अर्थ असा नव्हे पण त्याचा रागही मला आला नाही ".
वरुणच्या मनाला हर्षेउल्हासाच्या गुदगुल्या होत होत्या.
" या जगात कितीतरी लोक सभ्यतेचा मुखवटा घालून मिरवीत असतात. त्यांच्या हृदयात काहि वेगळं असतं आणि ओठावर काही वेगळं असतं. तुला बघून असं वाटलं कि तूझ्या ओठावर जे असतं तेच तूझ्या हृदयातही असतं ".
" जरा जास्तच स्तुती नाही होतं आहे का हि ? " वरुण लाजून म्हणाला.
" तुला असं का वाटतंय? तू फक्त बदलू नकोस जसा आहेस तसाच राहा... हवा तसा मनाप्रमाणे वागणारा... कशालाही न जुमानता बेधुंद होऊन आपले जीवन जगणारा "
" बस... बस... बस.. कर.. रे इतकं पुस्तकी ज्ञान माझ्या डोक्यावरून जात ". दोघेही ऐकमेकाकडे बघून खुदुखुदू हसत होते.
" चल निघुयात का आपण घरी? " अवनीने प्रश्न विचारला.
" हो निघूया आता... ".
दोघांच्याही गाड्या अगदी हळुवारपणे परतीच्या मार्गावर धावत होत्या. वरुणच्या मनात अवनीबद्दल असलेले कितीतरी गैरसमजेचे धुके आज स्पष्ट झाले होते. हा रस्ता कधी संपूच नये असे त्याला वाटत होते. अजूनही तो अवनीला एकटक पाहत होता.
शेवटी तिच्या घराजवळ दोघांच्याही गाड्या थांबल्या. घराबाहेर गाडी लावून अवनी गेट उघडण्याच्या तयारीत होती.
" ऐ टॉपर " हा वरुणचा स्वर तिच्या कानी पडला.
" काय झालंय तुला...काही हवंय का? " अवनी वरुणजवळ जाऊन विचारू लागली.
" खरं तर कसं सांगू कळतच नाही आहे. तू सतत माझ्यावर खडूससारखी रागवायची म्हणून माझ्या मनात तुझ्या स्वभावाविषयी पूर्वग्रह दूषित बनले होते. त्यासाठी मी खरंच तुझी माफी मागतो ".
" अरे त्यात माफी मागण्यासारखं काय आहे. तुझ्याजागी कुणीही असलं असतं तरी माझ्याबद्दल तसंच मत बनलं असतं. आणखी एक गोष्ट जे लोक मला अतिशय जास्त जिव्हाळ्याचे असतात त्यांच्यावरच फक्त मी रागावते कारण त्यांच माझ्या मनात एक वेगळेच स्थान असते. चल निघते मी bye उद्या भेटू कॉलेज मध्ये "
"Bye "
" अरे हा एक गोष्ट तर तुला सांगायचीच राहिली. ऋतुजा फार उदास दिसतेय रे आजकाल काय झालंय तिला माहित आहे का? "
" नाही बुवा.. माझं तर कुणाशीच जास्त बोलणंच नाही होतं आहे ".
" Ok चल मग Bye आपण बोलू उद्या ऋतुजाशी "
अवनीने तिच्या घरात प्रवेश केला. तिच्या घराचं लोखंडी गेट लावून ती वरुणकडे एकटक पाहत होती. एक खट्याळ हास्य तिच्या चेहऱ्यावर होतं. आपला उजवा हात हलवून ती वरुणला bye करत होती. वरूनही तिच्या हास्याला प्रतिसाद देत होता पण त्याच्या कानात तिचे तृप्त करणारे तेच शब्द " जे लोक मला जिव्हाळ्याचे असतात फक्त त्यांच्यावरच मी रागावते"
पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. एवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली.
💕💕💕 परियो से भी ज्यादा है तू हसीन
दिलनशी हुआ यकीन
दिवारो पे तुने मेरे दिल कि
दस्तक दि दूर से हि
हर पल तेरी है जुस्तजू
फिर से तू आए रुबरु
ख्याहिशे तेरी मै करने लगा
ख्याहिशो मे तेरी बहने लगा
फिदा क्या तुझपे मै होने लगा
आ... ह्म्म्म.
पहली दफा, हुआ है ये क्या 💕💕
क्रमश...
टीप :- खूप खूप sorry या कथेचा भाग लिहायला उशीर लागला आता या कथेचे भाग सलग येईल. पुढचा भाग परवा येईल