नाते जन्मापलिकडचे - भाग 19 lekhani द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • प्रेम करावे. पण...

    प्रेम करावे. पण...........?          प्रेम व विवाह. या एकाच...

  • काळी बाहुली - भाग 7

    काळी बाहुलीभाग ७ गायब झालेली मुलगीमाळ्यावरचा तो आवाज ऐकून नि...

  • Complicated Love - 3

    भाग 2 वरून पुढे " मॅडम आपला स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफी "...

  • Miss'tery - भाग 15

    त्या लोकांना आधीच माहित होते कि तिथे रेड पडणार होती.. त्यांच...

  • स्टॅम्प पेपर भाग 3

    स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत.               वाड्याचा माल...

श्रेणी
शेयर करा

नाते जन्मापलिकडचे - भाग 19

बरेच दिवस शिवने वैदेहीला मेसेज केलेला नसतो. तिला वाटतं असते कदाचित तिच्यागेल्या वेळीच्या बोलण्यावर तो विचार करत असेल.ती देखील काही त्याला मेसेज करत नाही.खरंतर आतून तिला वाटत असते आपण मेसेज करावा खूप काही बोलावं पण ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असते.

पण काही दिवसांनी ती स्वतःच त्याला मेसेज करते.
"काय शेठ... कित्येक दिवस मेसेज नाही काही नाही. विसरला कि काय तूझ्या बेस्टी ला?"
त्याचा तासाने रिप्लाय येतो 
"नाही गं तुला कसं विसरेल.. कामात होतो म्हणून"
"अच्छा, माझ्या बोलण्यावर विचार केला का?"
"हा केला पण मला नाही वाटतं मी तसं करतोय.. तुझा भ्रम असावा "
त्याच्या त्या हट्टी स्वभावाला बघून तिने सुस्कारा सोडला. शेवटी तिने त्याला शेवटचं वाक्य सुनवलं "हे बघ.. तूझ्या भल्यासाठीच सांगतेय, नको अपेक्षा धरूस तुमच्यात पुढे काही नातं फुलेलं याचं."
"बरं एक ऐक... मला कालच स्वप्न पडलं होतं.. त्यात मी माझ्यात असलेल्या devil रुपाला पाहिलं होतं.."
"Devil?"
"हो.. हे बघ माझी खरंतर दोन रूपं आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक..सकारात्मक माणसांसाठी काम करत नसेल तरी तो कधी माणसांवर अन्याय होऊ देत नाही.. आणि दुसरा जो माझ्यातला एक devil चं समज.. त्याला माणसं अजिबात आवडत नाहीत...आणि हे रूपं या जगासाठी खूप घातक आहे. चुकून पण यावर जर माझा ताबा सुटला ना तर समजून जा काय होईल...."
"😯पण त्याला माणसं का नाही आवडत?"
"खूप बेसिक कारण आहे त्याचं.. निसर्गाप्रतीच वर्तन आणि त्याने विसरलेला त्याचा धर्म...आणि ही गोष्ट ठाऊकच आहे तुला.... चांगलीच आणि मी literally त्या माणसाचा जीव एका चुटकीत घेऊ शकतो.पण ते माझ्या rules ला violate करेल म्हणून मग मी बरंच कंट्रोल करतो ""
"Hmmm. त्यात आपण देखील येतो.. "
"हो ठाऊक आहे मला... पण शेवटी आपण जगाहून वेगळे आहोत "
"जगाहून वेगळे असलो तरी या जगातलेच आहोत. जन्म माणूस म्हणून घेतलाय..निसर्गाच्या नासधुस मध्ये आपण ही भागीदार आहोत आणि हे मान्य करावच लागेल कितीही कडू असलं तरी!"
"Hm"
"पण या गोष्टीत स्वतःचा वाटा होईल तेवढा कमी ठेवला पाहिजे जमेल तिथे. "
"Yepp.."
"आणि माणुसकी हा धर्म तर जपायलाच हवा.. तू देखील आणि मी देखील तेव्हाच आपण सक्षम आहोत स्वतःला जगाहून वेगळं म्हणण्या इतकं "
"पटतंय मला तुझं..नक्कीच प्रयत्न करणार.. खरंतर आता जाऊन माझे डोळे उघडलेत. नाहीतर कधी विचारच केला नवता कि मी पण काय वेगळं करतोय, थँक्स यार "
"Yepp, मला स्वतःला निसर्गाची नासधूस आवडत नाही. ते बघून क्रोध जागा होतो.म्हणून मी जेवढं होईल तेवढं त्या माणसांना समजवायचा प्रयत्न करते. अगदी माझ्या घरच्यांना सोडत नाही "
"Good..आपण विषयावरून भटकलो. हा तर माझं devil रूप मला दिसलं. मी स्वतःला जेव्हा आरश्यात बघत होतो तेव्हा माझं प्रतिबिंब म्हणून devil दिसला. तो मला घेऊन जायला आलता. मी चाललो देखील होतो, पण आकृती ने मला तिथून ओढलं, नाहीतर पूर्ण त्याच्या ताब्यात गेलो असतो. आणि हे या जगाससाठी घातक आहे.. आणि माझी स्वप्न ही साधी नसतात... प्रत्येकात एक संदेश असतो किंवा भविष्य असतं."
"Oh मग तुमच्या नात्याचा काय संबंध?"
"बघ ती मला माझ्या devil रूप सोबत जाण्यापासून का थांबवत असेल?आणि असं ती का करेल? काहीतरी संबंध असेल ना तिचा माझ्यासोबत. म्हणून तर करत असेल. आणि एक अर्धांगिनीच असं वाचवू शकते तिच्या नवऱ्याला "

"🤦‍♀️बाबा तू लग्नापर्यंत जाऊन पोहोचलास?!अजून काही धड नाही तुमच्यात आणि तू तिथे गेलास. हे बघ गरज नाही कि ती अर्धांगिनीच असावी.ती व्यक्ती अगदी मैत्रीण /मित्र, आई -बाबा किंवा कोन्हीही असू शकतं. आकृतीचा नक्कीच संबंध आहे तूझ्या आयुष्यात, मी त्याला नाकारत नाही, पण त्यावर तू जर प्रेमाचं बंधन लादत असशील तर प्लीज सोडून दे ते."

"तुला असं का वाटतं नेहमी कि ती नाही आहे माझी life partner?"
"हे बघ मी तुला अगोदरचं सांगितलंय कि माझं मन सांगतंय कि तुम्ही ऐकायर येणार नाही, तर तेचं खरं आहे.."
"बघूया किती खरं ते."असं बोलून तो ऑफलाईन जातो.

"काय करावं मी ह्याचं देवा.. बुद्धी रे बुद्धी 😭🤦‍♀️"स्वतःशीच ते पुटपुटली.ती त्याला एक शेवटचा मेसेज टाकते "अति घाई संकटात नेई "

"डोक्यात प्रकाश पडला तर बरं 😮‍💨"

"काही माणसं खूप हट्टी असतात त्यांच्या मताबाबत.. जो पर्यंत त्यांची कान उघडणी होतं नाही ना तो पर्यंत ते काही सुधारणार नाही " एका ब्रह्मांडच्या कोपऱ्यातून शिव चं मार्गदर्शन करणारी शक्ती म्हणाली. ती हलकीच हसली.
"काय झालं दिव्यम ?"मागून कोणीतरी विचारलं.
त्याने मागे वळून बघितलं.त्यांचे गुरु होते ते.आपलं अदृश्य कवच हटवत गुरुजी समोर अवतरतो.
"प्रणाम गुरुजी 🙏"त्यांच्या पाया तो पडतो. त्याला ते आशीर्वाद देतात.
"आपली मुलं कसे करत आहेत जगात?"
"प्रवास चालू आहे त्यांचा 😊हळू हळू गोष्टी उलगडतील. पण शिव मात्र आहे हट्टी 😄कधी कधी त्याच्या वागण्यावर बघून हसायला येतं मला "
गुरुजी देखील हलकेच हसले.
"शिकेल शिकेल तो.. लहानच आहे तो अजून ."थोडा थांबा घेत "वैदेही काय म्हणते बरं?"

"नवीन आहे सगळं तिच्यासाठी 😊हळू हळू पुढे सरकतेय पण हो तिच्या शक्ती विषयी जाणीव व्हायला लागलीये तिला. खरंतर शिवनेच थोडासा मार्ग दाखवला तिला "

"हो तो गरजेचा होता.बरं झालं.. बरं बघू जरा तिला "दिव्यम ने बाजूला होतं समोर असलेल्या भल्या मोठ्या सोनेरी पात्राकडे हात दाखवला. गुरुजी समोर येत त्या पात्रात चित्रित होणाऱ्या दृश्याकडे बघू लागले. त्या पात्राने वैदेहीचे चित्र दाखवले. तिच्या चेहऱ्यावर तेचं गोड हसू होते. गुरुजींना तिच्याकडून येणाऱ्या ऊर्जेत काहीतरी वेगळेपण जाणवले. त्या ऊर्जेला समजण्यासाठी त्यांनी डोळे बंद केले. 

पण समोर दृश्य बघताच ते गंभीर झाले.
"हे ऊर्जा एवढी वेगळी का आहे? आणि मी का झुकला जातोय याच्यापुढे? हे काय आहे?"ते मनाशीच पुटपुटले. 

पुढे काय होईल या साठी वाचत राहा ✨
रेट नक्की करा आणि follow करा ✌️✨