नाते जन्मापलिकडचे - भाग 20 lekhani द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते जन्मापलिकडचे - भाग 20

"हे काय आहे नक्की?"भुवयी आक्रसल्या गेल्या. तेवढ्यात त्यांची तंद्री मोडली गेली.
"गुरुजी!काय झालं? भुवयी का आक्रसतेय?"
"नाही काही नाही. बरं त्यांचं मार्गदर्शन कर बरं का "
दिव्यम ने मान डोलावली.गुरुजी विचार करत निघून गेले.

अकरावीचा वर्ष संपला.. बारावी आली.बारावीचा वर्ष देखील जवळ जवळ संपत आला.फेब्रुरी मध्ये शिव चा वाढदिवस होता. तिला वाटून गेले,'ह्याचा वाढदिवस बरोबर याच महिन्यात येतो, प्रेमाच्या महिन्यात. सगळेच त्यावर प्रेम करतात. सगळ्यांचा लाडका आहे वरतून, सगळ्यांना आकर्षित देखील करतो. त्या सर्व व्यक्तींमध्ये मी देखील येते, पण आपण इतके लांब आहोत कि त्याच्या प्रेमाचा अनुभव देखील कधी घडणार नाही 😞.मी कधी कोणावर प्रेम नाही करणार. ती हिम्मत तरी होईल का कोणावर प्रेम करायची? कारण जीव कायम शिव मध्ये अडकून राहील.मनात कुठेतरी खोलवर अजून देखील त्याचं प्रेम मिळण्याची अपेक्षा राहिलीये..मिळेल कि नाही माहित नाही, पण तरी देखील आपण अपेक्षा ठेऊच शकतो ना. कदाचित आता नाही पण पुढे जाऊन कदाचित होऊ शकतं आमचं.माझ्या प्रेमाची जाणीव होईल त्याला, आणि मग तो मला त्याचं प्रेम देईल 😄"स्वतःच्या जखमावर मलम लावत ती स्वतःला समजावत होती.
"त्याच्या आयुष्यात कदाचित मीच लिहिली गेली असेल फक्त उशिरा येणं असेल त्याच्या आयुष्यात."त्या वाक्यात वापरलेल्या कदाचित या शब्दाचं वजन किती आहे ही तिला कळलं नव्हतं.

पुन्हा स्वतःला खोटं सांत्वन देत ती अभ्यासात व्यस्त झाली.
तिची ही अवस्था दिव्यम वरतून पाहत होता. त्याच्या काळजात धस्स झालं."बाळा कधी कधी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. त्याचा जास्त विचार केला कि त्रास फक्त आपल्याला होतो, आणि वरतून अपेक्षा धरल्या कि त्रास आणखी जास्त वाढतो. तेचं तुझं झालंय.खरंतर असं वाटतं कि येऊन तूझ्या डोक्यावर मायेचा हात ठेवावा आणि तुला चार गोष्टी समजवाव्यात, पण आता ते शक्य नाही. आपली बरीच जुनी ओळख असून देखील आपण या काळात अनोळखी आहोत, पण हो लवकरच भेटू आपण.तो पर्यंत सावर स्वतःला."

बारावीची परीक्षा उरकली.आता ती पूर्ण मोकळी होती. स्वतःला चित्रकलेत तिने व्यस्त केले होते. शिव ची आठवण आली कि त्याला लगेच ती मेसेज करायची. पण एके दिवशी 5-6 दिवस झाले तरी त्याला मेसेज तो पोहोचला नव्हता. कोणत्यातरी कारणाने तो ऑफलाईन होता. तिला कळत नव्हते अचानक काय झाले.पण अखेर तो एक -दोन दिवसात ऑनलाईन आला.तिने लगेच त्याच्यावर प्रश्नांनाचा मारा सुरु केला.

"काय, कुठे होतास तू? आणि एवढे दिवस ऑफलाईन का होतास?मला किती काळजी वाटतं होती अचानक काय झालं म्हणून "
"अगं हो हो.. दमानं घे. अगं मी संस्कार शिबिरात गेलो होतो. तिथे मोबाईल वैगरे वापरणं allowed नाहीये. तिथे व्यस्त होतो मी."
"अच्छा.. कशी गेली मग शिबीर "
"खूप.....प्रेमळ 🙂‍↕️"या वाक्यावरून तिला संशय आला.
"होका "
"हो.तिथे मला एक same तुझ्यासारखीच मनाने स्वच्छ, साधी एक मुलगी भेटली.'श्री ' नाव होतं तिचं. खूप सुंदर नाव आहे "
"ती देखील सुंदर आहे, ती मला आवडली... Hm hm अजून पुढे काय कथा घडली?"
"अरे वा ओळखलं तू 😁. असो पुढे.तर आम्ही भेटलो पण तुला सांगू पहिल्यांदा मला वाटलं कि मी खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालोय. हे कधीच मी कोणत्याही मुलीसोबत फील केलं नव्हतं. तिला साधं बघितलं ना तरी देखील मनाला सुख भेटते.तिच्या समोर जगातील कितीही सुंदर मुलगी असुदे, फिक्की पडते.. तिच्या ऊर्जेसमोर सगळ्या झाकल्या जातात. किती तरी मुली माझ लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत होत्या, पण मन मात्र श्री मध्येच अडकलं होतं.. आमचा eye contact झाला ना कि असं वाटतं होतं आम्हाला शब्दांची गरज नाही, नजरेतूनच संवाद साधले जायचे. तिला माझ्या मनातलं कळायचं आणि मला तिच्या.थांब तुला तिचा फोटो दाखवतो."त्याने तिला फोटो पाठवला. तो फोटो बघताच वैदेहीला purity ही भावना प्रत्यक्ष अनुभवायला भेटली, ते देखील फक्त एक फोटो वरून.."एवढी purity?? ती देखील इतकी कि कलियुगाला लाजवेल??आणि पहिल्यांदा हिला बघताना मला कोणताही प्रकारचा possessiveness शिव प्रति जाणवत नाहीये.. जे इतर मुलींसाठी जाणवला. मनातून वाटतं होतं कि ह्या मुली का त्याच्या आयुष्यात आल्यात, पण आज ती भावना मुळीच जन्म घेत नाहीये माझ्यात. ह्याचा काय अर्थ असू शकतो?"मनातच तिने प्रश्न केला.

"खूप सुंदर आहे रे दिसायला, आणि मुख्य तर तिची purity मला इथे जाणवली ती देखील स्पष्ट "
"हो ना. ती आहेच तशी प्रेमळ, सरळ, साधी. तुला सांगू माझ्या आईला देखील ती खूप आवडली 🥰"
"अरे वा!!छान, मग पुढे काय झालं?"
"मला तर ती आवडली. नंबर घेतलाय मी, पण तिच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे मला ठाऊक नाहीये."
"तिला पण तू आवडलाच असशील. पण हेच कि त्या गोष्टीला वेळ दे. हळू हळू ते रोपटं उगवू दे."
"हो नक्की.. पण मी आज खूप खुश आहे.. असं वाटतंय कि जिची मी एवढ्या आतुरनतेने वाट बघत होतो, ती मला भेटलीये. आणि खरंतर मला आत्ता तुझं बोलणं पटतंय गं."
"कोणतं बोलणं? "
"तेचं कि रिया वरून मन उठवण्यासाठी मी दुसऱ्या मुलींमध्ये माझं मन रमवू पाहत होतो. खरंतर हे अचानक दुरावनं मला सहन होतं नव्हतं. माझ्या मनाला व्यस्त ठेवण्यासाठी मी इतरांमध्ये ती गोष्ट शोधू पाहत होतो. तू खरंतर वेळो वेळी मला समजावत आली होतीस, पण मी मात्र हट्टी!मी माझंच चालवलं,आणि तुझं ऐकलं नाही. त्यासाठी खरंतर सॉरी "तिला समाधान वाटले.
"वेडा आहेस का? तू स्वतःची चूक मान्य करतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे. जीगरा लागतो चूक मान्य करायला.पण तू ते केलंस म्हणून तुझा अभिमान आहे. आणि राहिली गोष्ट कि तू आधी का नाही ऐकलं माझे.. कधी कधी प्रत्यक्ष अनुभवातूनच माणूस घडत असतो कारण कोणी बोलण्यापेक्षा आणि ते समजण्यापेक्षा जेव्हा तो तो ती गोष्ट स्वतः अनुभवतो तेव्हा त्याला गोष्टी जास्त पटकन डोक्यात घुसतात.तूझ्या बाबतीत देखील तेचं झालं "
"हे अगदी खरं बोललीस. म्हणूनच मी तुला माझी अत्यंत प्रिय बेस्टी म्हणतो 🥰. तूच गं तूच जी मला समजून घेऊ शकते.जी माझ्या चुकीच्या वागण्याला विरोध करू शकते नाहीतर बाकीच्या कोणामध्ये तो दम नाही.. मैत्री या अत्यंत पवित्र नात्याला तू खरी जागलीस "
"हो हो मला नारळाच्या झाडावर नको चढवूस 😂बस झालं कौतुक "
"छे ss तू आणि नारळाच्या झाडावर कधीच नाही चढू शकतं 😂उंची बघितलिस का स्वतःची.. बटली कुटली "मिश्किल हास्य त्याच्या चेहऱ्यावर आले.
"ओय.. उंचीचा काही संबंध नाही. त्याला arm strenth लागते समजला का.. शी शिव शी!!general knowledge zero. Very very bad.."
"मोट्ठी.. जा अभ्यास कर"
"ओय माणसा.. आठव जरा तुझ्याच वयाची आहे मी. नुकतेच माझे पेपर झालेत. लगेच कुठे अभ्यासाला बसवतोस "
"अरे हा!!! तूझ्या उंची मुळे मला वाटलं तू लहान आहेस. Complain किंवा bournvita पी जा.. जरा उंची वाढेल "तो आपल्या खोलीत खिदी-खिदी  हसत होता.
"देवा देवा!!अडलंय तुझं थेट्टर माझ्या उंची पाशी. जा भाई मी रिकामटेकडी नाही तुझ्यासारखी. शुss शु sss!!"
"हा हा जातो, बाय." असं बोलून तो ऑफलाईन गेला.
वैदेही हलकीच हसली.

"काही महिन्यांपूर्वी जी गोष्ट मी म्हणले होते.. ती खरी झाली का?"मनातच विचार तरळले.

पुढे काय होईल ह्या साठी वाचत राहा 🙏✨