Dhirubhai Ambani books and stories free download online pdf in Marathi

Dhirubhai Ambani

धिरूभाई अंबानी “एक वादळ “

चोखड या गावी जुनागड स्टेट मध्ये एका बनिया कुटुंबात जन्मलेला हा मुलगा कधी इतक्या मोठ्या उद्योग समुहाचा साम्राज्य अधिपति बनेल असे वाटले नव्हते
त्यांचा जन्म 6 जुलै 2002 चा

धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शिक्षक होते. त्यांचे मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण गुजरातमधे, ते सुध्धा गुजराती माध्यमातुन झाले. मग त्यांना एडनला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर दहा वर्षे सेल्समनची नोकरी केली व ते भारतात परत आले. प्राथमीक शिक्षकाचा मुलगा, फक्त मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण, कुटुंबाला कोणत्याही प्रकारची उद्योग व्यवसायाची पार्श्वभुमी नाही, एडनमधील पेट्रोल पंपावरचा अनुभव ही क्वालिफिकेशन्स घेऊन धिरुभाई मुंबईला परतले. हा त्यांच्यावर ‘फॉरीन रीटर्न’ चा शिक्का मात्र जरुर बसला!! या शिक्यावर त्यांना चांगल्या नोकर्‍या जरुर मीळत गेल्या असत्या. पण ते भारतात परतले ते नोकरी करायची नाही असे ठरवुनच!
कारण त्यांच्या मनात फक्त बिझिनेस चे स्वप्न होते !
सर्व प्रथम मसजीद बंदर येथे 350 sq feet मध्ये ऑफिस सुरू केले
त्या वेळी फक्त एक फोन एक टेबल व दोन कर्मचारी होते त्यांच्या जवळ ..
भुलेश्वर ला एका छोट्या घरात ते रहात होते
प्रथम च्ंपकलाल दमानी या आपल्या पुतण्या सोबत व्यवसाय सुरू केला होता
पण नंतर बिजनेस बाबतीत वेगवेगळी मते असल्याने ही पार्टनर शिप बंद पडली
बिजनेस साठी कोणतीही जोखीम घ्यायची त्यांची तयारी असल्याने त्यांनी स्वतंत्र बिजनेस सुरू केला
जगामधे कापडाला, म्हणजेच टेक्सटाईलला मोठी मागणी असते हे त्यांनी ओळखले. भारत त्या वेळी कापड उद्योगात एक आघाडीचा देश होता. त्यामुळे त्यांनी कापड निर्यातीच्या ( Textile Export ) व्यवसायात उतरायचे ठरवले. यात अनंत अडचणी होत्या. मुंबईसारख्या ठिकाणी धंद्यासाठी जागा मीळणे अवघड होते. त्यामुळे त्यांनी चाळीच्या एका खोलीतुन व्यवसायाला सुरवात केली. कंपनीचे नांव “रिलायन्स” ठेवले व कापड निर्यातिच्या व्यवसायाला 1966 साली सुरवात केली. पण थोड्याच काळात धिरुभाईंच्या लक्षात आले की परदेशामधे ज्या उच्च दर्जाच्या कापडाची मागणी असते त्या उच्च दर्जाचे कापड भारतात तयार होत नाही. मग त्यांनी स्वतःच अशा प्रकारच्या उच्च दर्जाच्या कापडाच्या निर्मीतीला हात घालण्याचे ठरवले. त्यासाठी अहमदाबादला स्वत:ची टेक्सटाईल मील सुरु केली. उच्च दर्जाचे तंत्रद्यान व मशीनरी वापरुन उच्च दर्जाच्या कापडाच्या उत्पादनाला सुरवात केली. आधी हे कापड फक्त एक्सपोर्ट साठी बनवले जायचे. पण हेच कापड भारतातील जनतेला उपलब्ध करुन देण्याचा व यासाठी देशभर 1500 शोरुम्स काढण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी धेतला. पण त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. त्यांचा ‘ओन्ली विमल’ हा ब्रॅन्ड लोकप्रीय झाला. त्यांचे कापड सर्वात महाग असुनही त्याने विक्रीचे नवीन विक्रम करायला सुरवात केली. साड्यांमधे अनेक आधुनीक डिझाइन्स आणुन त्यात अमुलाग्र बदल घडवुन आणले.
नायलॉन, रेयॉन, पॉलिएस्टर या कृत्रीम धाग्यांचे महत्व त्यांनी ओळखले होते. भविष्यकाळात या धाग्यांना प्रचंड महत्व येणार आहे याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे या धाग्यांसाठी लागणारे रॉ मटेरीयल बनविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी अमेरिकेतील एका नावाजलेल्या कंपनीबरोबर कोलॅबोरेशन करण्याचे ठरले. पण या प्रकल्पाला 400 कोटी रुपये एव्हड्या मोठ्या भांडवलाची गरज होती. हे भांडवल फक्त बँका, वित्त पुरवठा करणार्‍या संस्था किंवा बडे भांडवलदारच पुरवु शकत होते. पण त्यांच्याकडे न जाता शेअरच्या रुपाने सर्वसामान्य माणासाकडुन हे भांडवल उभारण्याचा धाडसी निर्णय घेऊन धिरुभाईंनी खर्‍या अर्थाने शेअर बाजाराचे दरवाजे सर्वसामान्य माणसाला खुले करुन दिले. कारण तोपर्यंत काही मुठभर मंडळीच शेअर मार्केटमधे गुंतवणुक करीत असत. सर्वसामान्य जनता यापासुन दुरच असे. धिरुभाईंचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला.!! रिलायन्स ही खर्‍या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या भांडवलावर उभी राहिलेली कंपनी ठरली. भारतात पुर्वी असे कधी घडले नव्हते. यापुढील काळात रिलायन्सने हेच धोरण कायम ठेवले. पेट्रोकेमिकल्सचे महत्व धिरुभाईंनी ओळखले व त्यात पण प्रवेश करुन यश मीळविले. भांडवल उभारणीचे अनेक नवीन मार्ग त्यांनी शोधुन काढले व लोकप्रीय केले. डीबेंचर्स किंवा कर्ज रोखे हा प्रकार त्यांनीच प्रथम भारतात आणला. त्याचा परीणाम असा झाला की त्यांच्या भागधारकांची ( शेअरहोल्डर्सची) संख्या वाढतच गेली. मुंबईच्या कुपरेज या फुटबॉलच्या ग्राऊंडमधे शेअरहोल्डर्सची मिटींग घेऊन भारताच्या कार्पोरेट क्षेत्रामधे एक आगळा वेगळा विक्राम प्रस्थापीत केला.!! कारण तोपर्यंत शेअरहोल्डर्सच्या मिटीग्ज एखाद्या हॉटेलच्या हॉलमधे होत असत व त्याला मुठभर शेअर होल्डर्स उपस्थीत रहात असत. ज्या सामान्य लोकांनी रिलायन्समधे पैसे गुंतवले आहेत त्यांना उत्तम परतावा हा मिळालाच पाहिजे यावर धिरुभाईंचे बारीक लक्ष असे. आज रिलायन्स ही भारतातील सर्वात जास्त शेअर होल्डर्स असलेली कंपनी असुन आज त्यांची संख्या 38 लाख इतकी आहे. अनेकांचे उखळ रिलायन्सच्या शेअरवर पांढरे झाल्याचे, अनेकांची घरे, मुलीची लग्ने या शेअरच्या जीवावर झाल्याचे पाहिले गेले आहे . रिलायन्सने अनेक विक्रम प्रस्थापीत केले आहेत. खाजगी क्षेत्रातील ही भारतातील सगळ्यात मोठी कंपनी असुन फॉर्च्युन 500 कंपन्यांमधे सर्वात प्रथम येणारी भारतीय कंपनी म्हणुन रिलायन्सने मान मीळवला आहे.! 1970 साली वर्षाला काही लाख रुपये टर्न ओव्हर असणार्यान रिलायन्सचा वार्षीक टर्न ओव्हर 2 लख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. मुकेश व अनील या त्यांच्या सुपुत्रांनी रिलायन्सला नवीन उंचीवर नेऊन ठेवले असुन अनेक नवीन क्षेत्रात रिलायन्सने प्रवेश केला आहे.
पण हे सगळे करीत असताना धिरुभाईंनी काही तत्वे पाळली. त्यांनी दुसर्‍या कोणत्याही कंपनीची डायरेक्टरशीप स्विकारली नाही. त्यांनी आपली सगळी एनर्जी रिलायन्ससाठीच वापरली. आपल्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी ते कोणालाही, अगदी ऑफीसमधल्या प्युनलाही, केव्हाही आणि कोठेही भेटायला तयार असत. पांढरा सफारी हा त्यांचा युनिफॉर्म बनला होता व शेवटपर्यंत त्यांनी त्यात बदल केला नाही. ते कधी पत्र लिहिण्याच्या भानगडीत पडत नसत. त्यांचे म्हणणे होते की पत्र लिहिल्यावर त्या पत्रलिहिणार्‍या व्यक्तीला काय म्हणायचे आहे या वर लक्ष न देता वाचणारे त्या पत्रातील चुका काढत बसतात!. त्यांचा सगळा व्यवहार हा फोनवर किंवा ऑफीसमधे बसविलेल्या टेलेक्स मशीनवर चाले.
एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडनमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे. थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शिकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाक्षरांनी लिहुन ठेवले आहे.
धिरुभाईंनी हे सगळे यश महाराष्ट्राच्या राजधानीत, म्हणजे मुंबईत मिळविले.
आपल्या यशाचा प्रवास फक्त एक रुपया पासून त्यांनी सुरू केला होता ...आणि त्याचे एवढे मोठे साम्राज्य बनले
रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक .
रिलायन्स पॉवर समूहाचे संस्थापक
रिलायन्स कॅपिटल समूहाचे संस्थापक
त्यांच्या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्ना मुळे त्यांना उद्योग क्षेत्रातले वादळ म्हणून ओळखले जाते .
मालमत्ता 60 बिलियन डॉलर पेक्षा जास्त असून अंबानी कुटुंब हे जगातील तिसरे अतिश्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जाते .
एकूण 85000 कर्मचारी त्यांच्या उद्योगात काम करतात .
त्यांच्या इतक्या मोठ्या यशा मागे त्यांची अशी काही विधाने आहेत जी त्यांच्या दृष्टीकोना विषयी माहिती देतात .
त्यांच्या मते मोठी मोठी स्वप्ने पहायच्या वेडा मुळेच हे सारे घडू शकले
तुम्ही तुमची स्वप्ने पाहिली नाहीत तर आजूबाजूचे त्यांची स्वप्ने
पाहण्या साठी तुम्हाला कामाला लावतील .!!
गरीब म्हणून जन्माला येणे हा दोष नाही पण गरीब म्हणून मरणे हा नक्कीच दोष आहे !!
आपल्या फायद्याचे पहायला आपल्याला कुणी आमंत्रण देण्याची गरज नसते !!
आपल्या राज्य कर्त्यांना आपण बदलू शकत नाही पण त्यांनी आपल्या वर कसे राज्य करावे हे आपण निश्चित बदलू शकतो .!
काही जोखीम पत्करायची तयारी असेल तरच उद्योजक जन्म घेवू शकतो !
निश्चित ध्येय आणि अथक परिश्रम तुम्हाला तुमच्या यशा कडे घेवून जात असतात !!1
हे त्यांचे मौलिक विचार पुढील पिढी साथी नक्कीच एक आदर्श म्हणून रहातील ॥
एका मोठ्या आजाराला सामोरे जाताना 24 जून 2002 मध्ये त्यांना ब्रिच candy हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले .
पण 6 जुलै 2002 ला वयाच्या 69 व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली.....
त्यांच्या मागे त्यांची पत्नी कोकिळाबेन ,दोन मुले अनिल आणि मुकेश अंबानी तसेच दोन कन्या नींना कोठारी आणि दीप्ती साळगांवकर या आहेत .
रिलायन्स उद्योग समूह आता दोन भागात विभाजन झाला आहे .त्यापैकी मुकेश अंबानी RIL आणि IPCL पहातात आणि धाकटे चिरंजीव अनिल अंबानी RELIANCE CAPITAL ,RELIANCE POWER आणि RELIANCE INFOCOM चा कारभार पहातात.
एका सामान्य कुटुंबात जन्म घेवून सुध्हा केवळ आपली
प्रगति करून घेण्याची इच्छा आणि नवीन नविन गोष्टी स्वीकार करून त्या अमलात आणणे या जबरदस्त इच्छा शक्तीमुळे अथक परिश्रम आणि दूरदृष्टी मुळे ते इतके मोठे उद्योजक बनले की आज संपुर्ण विश्व त्यांच्या कडे “आदर्श “म्हणून पाहते .त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!!!!!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED