भाव तरंग Vrishali Gotkhindikar द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाव तरंग

तुझे रूप ...

चांदणे पदरावर ..हसू तुझ्या अधरावर .

बटा रुळतात कपाळावर ..घोस केसांचे कानावर ..

भुवयांच्या कमानीतून सुटतात जणू “बाण “..

पाहून त्यातील इशारे अक्कल पडतेय “गहाण !!

डोळ्यात दिसतात नवे नवे तराणे .

कुणाला “घायाळ “करायचे सुचतायत बहाणे ??

नाकाच्या शेंडयाचा ..”तोरा काही और ...

ओठांची महिरप पाहून मनात नाचतात “मोर “..

पाहून तुला “राणी “..या दिलाचे झालेत “तुकडे “..!

आता तरी “मेहेर्बानीची “..नजर टाक इकडे ...

***चंद्राचे प्रपोजल ***

काल रात्री बर का एक “अजबच “घडले ..

चंद्राने मला चक्क ..”प्रपोज “..केले !

“रात्री पाहतो कधी गच्चीतला “वावर “तुझा ..

खर सांगू तुज्यावर जीव जडलाय माझा ..

तुझे रूप ,तुझे गुण ,.तुझी प्रतिभा ,तुझी अदा “..

चर्चा चालू असते तारकामध्ये ..पण तुझी सदा “

मी म्हणाले त्याला ..

“तुझा संचार दुरवर .

.कधी इथे तर कधी तिथे ..

“बारा गावची तुला खबर ..

प्रीतीची तू कशी जाणशील “कदर “..

मला अडवून म्हणतो कसा ....

..”प्लीज बेअर वीथ मी ..

..मला समजून घे यार .

आहे मी थोडासा “बदनाम “..

पण एकदम देवू नको नकार “

मी म्हणाले वेड्या ..

“विचार सुद्धा नको माझा आणूस तुझ्या मनाने

एंगेज केलेय .कधीच मला माझ्या “प्रियाने “!

विसरलास कसे तु . भाऊ मानलेय तुला ..

परवाच तर दिवाळीला “औक्षण “केलेय तुला “

ऐकुन माझे बोल चेहराच त्याचा पडला ..

“हिरमुसला “बिचारा मावळूनच गेला ..

जाग आली तेव्हा गंमत वाटली मला .

स्वप्नातल्या प्रपोजल चा ..शेवट असा झाला ..

आयुष्य !!!

आयुष्य काही फक्त असेच ढकलायचे नसते !

चांदण्याना उशाशी घेवून आभाळ पहायचे असते !

वाळूच्या अंगावर रेलून सागराला अंगावर घ्यायचे असते !

आभाळाकडे डोळे लावून

पावसाची “नक्षी “चेहेऱ्यावर घ्यायची असते ..

मैत्री भेटतच असते वेगवेगळ्या वळणावर .....

तिची .”अजब गजब” रूपे पाहायची असतात

प्रेम मात्र येत असत आयुष्यात .

अचानक “चाहूल “..न देता .....

त्याची ‘नशा “..पुरेपूर उपभोगायची असते ...!!!


कविता ..

तुझे अचानक माझ्या खोलीत येणे..

आणी टेबलावरील माझी कविताची “वही “..वाचायला घेणे .

“..ए कीती छान लिहितोस रे ..

...कसे सुचते तुला हे सारे ....?”

कपाळ भर पसरलेल्या “बटा”..हाताने मागे सारत ..

...एक तिरपा “कटाक्ष “..टाकणे .,

..मी तर पुरताच ...’घायाळ “....

..”मला शिकवशील कशी करतात ..कविता “??

तुझे मान वेळावून ..हसत..प्रश्न करणे ....

पण तुला कसे सांगू ग ..

तूच तर आहेस माझी “कविता “...!!!


त्याचे प्रेम ..

त्याला जेव्हापासून ती भेटलेली असते ..

त्याचे मन जणू कापसासारखे ‘तरल”झालेलं असते !!

“तीचे बोलणे “..तीचे हसणे “..

त्याची नुसती “उलघाल “होत असते

मनातले हे “वादळ “तीला कसे सांगावे

हे मात्र त्याला उमगत नसते .!

स्थळ ..काळ ..वयाचे बंधन असते जरी .

त्याला मात्र वाटत असते ती त्याच्या स्वप्नातली “परी “.

तशी ती ही असते रुप गुणाची “खाण”.

त्याला मात्र असते फक्त तिच्या “अस्तित्वाचे “भान ..

“आताच का हे “प्रेम “व्हावे .

हे त्याचे त्याला ही कळत नसते ..

तिचा “सहवास “अप्राप्य आहे

हे कळते ..पण वळत नसते ..

आता पुढे काय होईल ...काय मनात देवाच्या

त्याला मात्र तिची ..साथ द्यायचीय “अंतापर्यंत जगाच्या ...!!!

तुझी अदा ..!!!

तुझी वाट पहात रोजच्या वेळी .रोजच्या ठिकाणी

मी असतो अधीर आणी अस्थिर .

वातावरणात असते एक अनामिक उदासी ..

आणी अचानक जणू सारा परिसर ..उत्साही होतो

तू आलेली असतेस ना ..!!!

मी मुद्दामच तुला पाहिले ..नाहीसे करतो ..

ए माफ कर ना ..थोडा उशीर झाला ..

नको नं असा ..रागावू . ..!असे म्हणून ..

“एक घायाळ “कटाक्ष “..तू माझ्या कडे टाकतेस ..

आणी मग तुझे अविरत ...बोलणे सुरु होते .

नाद मधुर घंटा ..कीण कीण ..कराव्या तसे तुझे शब्द

ते खडीसाखरे सारखे ,,..बोल .

तुझे बदामी ..चंचल गहिरे डोळे ..

बोलताना डोळ्यात उमटणारे ..जिवंत भाव ..

आणखीनच गुलाबी वाटणारे ..ते रसदार ओठ ..

हेलकावे घेणारे ते ..तुझ्या कानातले ..झुमके .

मध्येच .डाव्या हाताने केस सारखे करीत काहीतरी गाणे म्हणत .

बरका ..बघ ना ..ऐक ना ..असे काहीतरी निरर्थक बोलत

सहजच ..डोळ्यावर येणाऱ्या बटा तू

हाताने .हलकेच मागे ..टाकतेस ..

सारे सारे ..पाहताना मी “मंत्रमुग्ध “..होत असतो .

आणी मग तू अचानक मला हलवतेस..

बोल ना ..तुझे लक्ष कुठे आहे ?

मी काय बोलणार ..काही ऐकण्यापेक्षा ..

तुझ्या “अदा “..मध्येच माझी दांडी “गुल “झालेली असते !!!

तुझ्या आठवणीत ..!!

तुझी आठवण असते माझ्याच अवतीभवती ..

एखाद्या “मादक “अत्तराच्या वासासारखी ..रेंगाळत ....!!

वाटत असते तू आहेस माझ्या ..जवळपास ..

हलकेच हसत..काहीतरी गुणगुणत..!

दिवस उजाडल्या पासून होत असतात मला तुझेच “भास ..

तुला हे सांगितले कधी ..तर तुझा बसतच नसतो विश्वास ..

तसा असतो मी कामाच्या व्यापात दिवसभर ..

तरी तुझाच हसरा ,देखणां चेहेरा असतो माझ्या डोळ्यासमोर ..!

संध्याकाळी निवांत वेळी ..तुझाच असतो हात हातात ..

आणी वाटत असते मला मी पाहतोय खोलवर तुझ्या गहिऱ्या डोळ्यात

रात्री पण होत असते असेच माझ्या मनात तुझे येणे

अन मग हलकेच मिटून जात असतेस ..

माझ्या डोळ्याच्या पापण्या ..अलगद तुझ्या नाजूक हाताने !!!

अशीच “उलघाल “होत असते ..रोज रोज माझ्या मनाची

कधी भेट घडेल तुझी ..उकल होत नसते या “प्रश्नाची “!!

तू मात्र हसत असतेस ..असे “पागल “झालेले .पाहून मला

यालाच म्हणतात “प्रेम “..कधी कळेल ग हे तुला ?

प्रेम ..

आपल्या रोजच्या बोलण्यात तु सतत करीत असतोस ..

माझ्या वरील प्रेमाचा उच्चार .

माझे फक्त “स्मितहास्य “..पाहून ..

तु अगदी “अस्वस्थ “होत असतोस ..

पण खरे सांगू का तुला ..

मी खूप विचार करीत असते .,

कसे असेल तुझ्या प्रेमाचे स्वरूप ..आणी त्याची व्याप्ती ..

असेल का ते प्रेम ..

सकाळच्या नाजूक कोवळ्या किरणा सारखे

आल्हाद दायक आणी उबदार

मंद अशा सुगंधाने ..भारलेले ...!!

असेल का ते प्रेम ...

आकाशा सारखे विशाल .माझी प्रत्येक भावना समजून घेणारे

आणी मला आपल्या हृदयात सामावून घेणारे

असेल का ते प्रेम ..

सागरा सारखे “अथांग अमर्याद ..

अगदी आपल्या अंतिम श्वासा पर्यंत साथ देणारे

स्थळ ..काळ ..वेळाच्या ही पुढे धावणारे ..

शाश्वत ..आणी चिरंतन ..

एकदा जवळ बसवून समजावशील .का हे सारे मला ?

प्रिय आईस ..

तसे समोरा समोर कधीच नाही पहिले मी त्या “इश्वराला..

पण तुझ्याच चेहेर्यात दिसतात ..”भास ..कायम त्याचे मला

सुखा बरोबर दुख्खे पण होती माझ्या सोबत आयुष्यभर ..

पण “तरुन गेले साऱ्यातून फक्त तुझ्या आशीर्वादावर

प्रेमाने तुझे “गुणगान गाईन म्हणले तर शब्द “अपुरे “असतात माझे

असे म्हणतात देवाच्या दरबारात पण सतत कौतुक चालू असते तुझे ..

.कोण असेल बरे सांग तुझ्या पेक्षा प्रेमळ मूर्ती माझ्यासाठी ?

.आणखी कोणता असेल ग सांग तुझ्या पेक्षा तेजोमय “दिवा .माझ्यासाठी.?

देवाना ही घ्यावा लागतो जन्म तुझ्याच कुशीमध्ये

खरे “स्वर्गसुख “..असते फक्त तुझ्याच पदरा मध्ये ..

...तु होतीस् तेव्हा कधीच नाही जाणवले “महत्व “.तुझे ..

तुझ्या माघारी जाणवते आहे पावलो पावली अस्तित्व तुझे ...

*****