माधवी Arun V Deshpande द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माधवी

माधवी

अरुण वि.देशपांडे

आफिसातून आल्यावर नेहमीप्रमाणे विजयने विचारले – अनिता –आज काही टपाल आलाय का ?

विजयसाठी चहा करण्यात गुंतलेल्या अनिताने किचनमधूनच उत्तर दिले – समोरच्या टेबलावर तर आहे की आज आलले टपाल .एक दोन पत्र आणि तुमची कथा असलेले एक मासिक .!

मोठ्या उत्साहाने विजय टेबलाजवळ गेला.समोरच्या टेबलावरची पत्रं नजरेसमोरून घातली,आणि मासिक

उघडले .अनुक्रमणिकेत आणि मासिकात त्याचीच कथा पहिली होती.सुंदर अशा कथा-चित्रांनी आपली कथा प्रकाशित झालेली पाहून विजय खुश झाला .सहा महिने वाल पाहायला लावणाऱ्या संपादकाचे त्याने मनोमन आभार मानले कारण प्रथितयश मासिकातून कथा येण्यासाठी वाट पहायची असते “,याची त्याने सवय लावून घेतलेली होती.

अनिताने चहाचा कप समोर ठेवीत म्हटले –झालात ना खुश ?तुमचं बरं असतं बाई –आफिसचे काम झाले की मन रमविण्यासाठी हे साहित्य आणि लेखन तुम्हाला उपयोगाचे आहे. आणि आम्ही पहा .बसतो टीव्ही च्या समोर. चहाचा रिकामा कप बाजूला ठेवीत विजय म्हणाला – “जरा जाऊन येतो ,माधवला अंक दाखवतो ,त्याला हे मासिक आणि त्यातली माझी कथा –दोन्हीही आवडेल..विजयकडे पहात अनिता म्हणाली –माधवचे नावं नुसते सांगण्यासाठी ,तुम्हाला –ही कथा माधवीला कधी दाखवतो “असे झाले आहे तुम्हाला .काय ? बरोबर ना ?, दरवाज्यामागे असलेल्या चपला घालीत विजय म्हणाला – अनिता –हे जर तुला माहिती आहे तर पुन्हा विचारतेस कशाला ?

“जा हो, पण लवकर या बरे का “!, तिकडे गेल्यावर तुम्हाला वेळेचे भान रहात नाही आणि इकडे आम्ही बसतो तुमची वाट पहात “ अनिताचे बोलणे ऐकून “ बिलकुल जास्त वेळ बसणार नाहीये मी ,लवकर येतो ,मग तर झाला ? ! असे म्हणत विजय माधवच्या घराकडे वळाला . चार घरे सोडून पाचव्या अपार्टमेंटमध्ये माधवचा flat होता . विजय त्याच्या घरी गेला तर दरवाजा बंद .कुलूप लावलेला .आपले असे स्वागत व्हावे ? विजय मनोमन निराश झाला . हे दोघे असे गेलेत तरी कुठे ? हिरमुसल्या मनाने विजय आल्यापावली परतला . आत आलेल्या विजयच्या चेहेऱ्याकडे पाहून अनिता म्हणालीच – काय हो ,

भेटली नाही वाटतं तुमची आवडती मैत्रीण आणि हक्काची वाचक.? तुमच्या चेहेरयावरूनच समजतंय आम्हाला .

काही न बोलता विजय खुर्चीत बसून राहिला .अनिताचे असे बोलणे म्हणजे त्याला टोमणा “नव्हता .अनिताच्या बोलण्याची पद्धतच तशी होती .शिवाय माधवची “माधवी –विजयची आवडती व्यक्ती आहे “हे तिला माहिती होते .कधी कधी ती विजयला चिडवायची सुद्धा ..म्हण्यची..तुम्हाला बरे बुवा ,असे रसिक चाहते मिळतात , आम्हाला नाही कधी भेटत कधी असे कुणी !

माधवची आणि विजयची ओळख तशी चार-पाच वर्षापासूनची . एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भेट झाली आणि उपक्रमातील सततच्या सहभागामुळे मैत्री अधिक घट्ट झाली. “नोकरी सांभाळून थोडे फार सामाजिक सेवाकार्य करता आले तर जरूर करावे “ विजयाच्या या मताशी माधव मनापासून सहमत होता .या समान धाग्यामुळे हे दोन मित्र अधिक जवळ आले .त्यांची घरे ही स्नेह्बंधानाची झाली.

साहित्याची आवड असलेला विजय, एक लेखक म्हणून अलीकडे चांगलाच नावारूपाला आलेला ,चार-दोन पुस्तके त्याच्या नावावर जमा झालेली होती .सहाजिकच साहित्यिक आणि कार्यकर्ता अशा दोन्ही रुपात वावरणाऱ्या विजयला –सभा-संमेलने ,मासिके आणि दिवाळी-अंक ,कथा आणि कविता विषयक उपक्रमासाठी निमंत्रणे येउ लागली,त्याचा सहभाग बधत होता.या क्षेत्रात तो आता चांगलाच स्थिरावला होता.

एखाद्या फालतू व्यसनापेक्षा “,साहित्याचे आणि लेखनाचे व्यसन “,विजयला लागले आहे , हे गोष्ट अनिताला खूप आवडत होती .अशा क्षेत्रात विजयची होणारी परागती, मिळणारा नावलौकिक , होणारे सन्मान “एका लेखाची बायको “-ही तिचीनवी-ओळख तिला खूप सुखावह वाटत होती.

घर, नोकरी ,आणि साहित्य उपक्रम” ,या तीनही आघाड्यावर जे यश मिळते आहे “ याचे सर्व श्रेय –अनिताचे आहे..”व्यासपीठावरून विजय हे सांगत असे ,त्या वेळी हे कौतुक ऐकून अनिताच्या चेहेऱ्यावर आणि मनात समाधानाचे चांदणे फुलायचे .

परस्पर सामंजस्य “, एकमेकांच्या सहवासाचे महत्व, पती-पत्नीच्या प्रेमाचे रेशीमधागे “, एका यशस्वी संसाराची लक्षणे “ अनिता-विजयच्या संसारात दिसत होती. मित्रपरिवारात विजय –अनिता ही जोडी म्हणजे

“आदर्श जोडपे ठरत होते. विजय मधला कलावंत ओळखून त्याच्यातील कलाकाराला फुलवायचे या भावनेने अनिता विजयचा साहित्यिक –संसार सुद्धा “,मनापासून सांभाळीत असे,फुलवीत असे.घरातून मिळणाऱ्याअशा प्रेमळ आणि भक्कम आधाराच्या बळावर विजय सातत्याने लेख करू लागला .

दरम्यान –माधवच्या रूपाने त्याला एका सह्रदय मित्राच्या मैत्रीचा लाभ झाला “, माधवची पत्नी-माधवी “,

हळूच अनिता-विजयच्या आयुष्यात आली,मग,. माधवी – रसिक वाचक होती, वाचनाची आवड आणि तिला असणारी साहित्याची जाण” विजयला विलक्षण भावली. माधवीला विजयच्या मनात एक स्वतंत्र स्थान मिळाले.विजयच्या लेखनाचे कौतुक करणारी “, त्याचे सर्व स्वभाव-विशेष आवडून घेणारी “, एक हक्काची मैत्रीण “,म्हणून विजयसाठी एक आवडती व्यक्ती माधवी झाली .कलासक्त –कलाप्रिय “माधवीला कथा –कादंबरी ,कविता ,कोणतेही पुस्तक हाती पडो , झपाटलेल्या वाचका प्रमाणे ती एखादे पुस्तक वाचून त्यावर भरभरून बोलायची, त्यावर विजयशी चर्चाकरणे तिला आवडू लागले. माधवीच्या या व्यक्तिमत्वाची मोहिनी विजयच्या मनावर पडली नसती तरच आश्चर्य , आणि माधवीला विजय एक उत्तम लेखक-कवी –साहित्यिक आहे” याचे अप्रूप होते “,एक साहित्यिक आपला जवळचा स्नेही आहे “ही भावना ती सर्वांशी कौतुकाने शेअर करते “याचा आनंद विजयला होऊ लागला. आणि मग, विजयच्या नव्या लेखनाचे कौतुक माधवी कडून ऐकणे “ ही त्याची नवी सवय अनिताच्या लक्षात आली.

माधव-माधवी दोघेही नित्यनेमाने विजयच्या घरी येत. अनिता दोघांचे स्वागत मोठ्या अगत्याने करी. सुरुवातीचा परकेपणा मध्येच केंव्हातरी अलगदपणे गळून पडला “.अनिताला वाचनाची आवड होती पण ती एका सामान्य वाचक “या भूमिकेतून वाचन करीत असे. विजयचे साहित्य प्रसिद्ध झाले “ ते पाहून होणारा आनंद ती मर्यादित व्यक्त करीत असे.

माधवी मात्र विजयच्या लेखनाचे अगदी मुक्त –कंठाने कौतुक करायची .असे असले तरी एखादे लेखन नाही आवडले तर,ते कसे असते तर अधिक छान झाले असते “,या बद्दल स्वतःचे मत मांडून .विजयच्या लेखंवर टीका देखील करायची “. अशावेळी तिच्या टपोऱ्या-डोळ्यांची नजर “ त्याच्यावर रोखलेली असायची ,आणि तिच्या बोलक्या –चेहेऱ्यावर कौतुक दिसायचे “,” माधवीचे हे मनोरम रूप “विजय आपल्या डोळ्यात साठवून घेत असे.

माधवीचा हा लडिवाळ –स्नेह “समाधानाचा एक अपूर्व समाधानाचा ठेवा आहे “,असे विजयला मनापासून वाटत असे.पुढे पुढे मग..माधवीने नवा विषय सुचवावा “आणि विजयने त्यानुरूप असे छान लेखन करावे “,असे नेहमीच होऊ लागले. विजयच्या लेखनासाठी आता जणू “माधवी हीच प्रेरणा झाली होती “.एकदा बोलतांना तो अनिताला म्हणाला – “बघ अनिता, ही माधवी माझ्या आयुष्यात आली नसती तर माझ्यातील साहित्यिक इतका खुलला नसता. तिच्यासारखी आगळी मैत्रीण- तिची वेगळी मैत्री “या गोष्टी मला मिळणे ही मी माझ्या भाग्याची गोष्ट आहे असे समजतो “..

विजयचे हे बोलणे ऐकून घेतल्यावर अनिता गंभीरपणे म्हणाली – हे हो काय ?,कोण ही माधवी ? मी तर तिच्या आधीपासून तुमच्या पाठीशी आहे ,सोबत आहे “ मी नाही का केली तुम्हाला मदत ? आज माझ्यामुळेच तर तुम्ही लेखक- कवी,साहित्यिक “म्हणून तुमची ओळख झाली आहे.आणि आता तर तुम्ही अगदी सरळ सरळ सगळे श्रेय या माधवीला देता आहात “. म्हणे- “मैत्रीण असावी तर माधवी सारखी “.

विजय –तुम्ही माधवीच्या प्रेमात तर नाहीना ?” असे स्वप्न पाहू नका महाराजा तुम्ही. एक लक्षात ठेवा –तिला माधव आहे “,आणि तुमच्यासाठी तुमची बायको –मी अनिता आहे..

हे सारे बोलणे रागातून आणि गैरसमजातून नाहीये “,अनिता अशा हलक्या मनोवृत्तीची नक्कीच नाही “उलट तिला आपल्या नवर्याची खात्री आहे की- तो भरकटत जाणारा नाहीये.” इतक्या वर्षांच्या सहवासाने अनिताला हा विस्वास वाटतो आहे ही जाणीव विजयला सुखद वाटणारी होती .एक गोष्ट नक्की होती की-

ही माधवी-“विजयला खूप आवडते “,हे अनिताला जाणवत होते.

गम्मत म्हणजे- स्वतहा अनिताला –माधवी खूप आवडत होती.एखाद्या व्यक्तीच्या मनात इतका गोडवा असतो “? मन स्वच्छ आणि नजर निर्मल असू शकते ? या गोष्टी ती माधवीच्या सहवासात अनुभवत होती .तिच्या अशा स्वभावाचे आकर्षण जर आपल्याला इतके वाटत असेल तर – विजयच्या कलावंत मनाला माधवी आणि तिचे हे रुप” अधिकच भावणारे असणार “,यात नवल ते काय .

माधवीचा असा अनोखा सहवास एक नवा अनुभव देणारा आहे “हे विजयला जाणवत होते .एक आवडती व्यक्ती म्हणून तिच्यावर आपण मनापासून प्रेम करीत आहोत “,ही गुंतवणूक मनास आवडू लागली आहे.

तसे म्हटले तर ..आवडत्या मित्रावर आपण प्रेमच करीत असतो ना ? कारण –त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडत असते.त्याचा सहवास आपल्याला घडवणारा असतो , “मित्राचे स्थान जगण्याला एक नवा अर्थ देणारे असते .”आणि आपल्या आयुष्यात माधवीचे स्थान हे “जिवलग मित्राचे आहे “.

आपण माधवीवर प्रेम करतो “, पण ,यामुळे तिच्या संसारिक –जीवनावर काहीच परिणाम होणार नाही .तिला तिचा देखणा संसार आहे “,आणि अनिता सोबत आपला संसार छानच चालू आहे “. दोन्ही आपापल्याजागी स्थिर आहेत-भक्कम आहेत “. त्यात ढवळून जावे असे काहीच घडलेले पण नाही “ही जाणीव अनिताला आहे आणि माधवीला तर नक्कीच आहे.

माणसांना ओळखण्याची जबरदस्त शक्ती माधवीला लाभलेली आहे.याची प्रचीती अनेकवेळा आली आहे .तेंव्हा आपल्या मनात तिच्याविषयी असणाऱ्या भावना या “गैर “ आहेत असे तिला वाटले असते –जाणवले असते तर .भीड-भाड न ठेवता –माधवीने सुनावले असते ..असा मोकळेपणा माधवीच्या स्वभावात आहे.

म्हणूनच एका निश्चिंतपणे आणि हक्काने आपण माधवीत गुंतलो आहोत.आता तिच्या सहवासात आनंद घेण्याची आपल्या मनाला सवयच लागलेली आहे.आपल्या समोर बसलेल्या माधवीशी आपल्याला काहीच देणे-घेणे नसते ..ही समोरची माधवी म्हणजे- माधवची पत्नी . माधवीच्या अंतरंगात असणाऱ्या- दुसऱ्याच माधवीकडे आपण आकर्षित झालेलो आहोत .आणि माधवच्या –माधवीशी – या माधवीचा “काहीएक संबंध नाही.

म्हणूनच त्यादिवशी मोकळेपणाने माधवीला म्हणू शकलो – माधवी –माझ्या कल्पनेत असलेली माझी प्रेरणा –माझी स्फुर्तीदेवता , माझी जिवलग मैत्रीण “म्हणून तू मला आवडतेस .” एक सांग माधवी- तुला पण माझी मैत्रीण –माझी सहेली “ होऊन माझ्यातील कलावंतावर प्रेम करणे आवडेल का ?”

हे ऐकून घेत –माधवी म्हणाली – खरेच , असे असू शकते का ? आपल्याला कुणीतरी प्रिय अशी मैत्रीण,आवडती सहेली “मानताय “ही भावनाच मला एकदम वेगळी वाटली .आपणही असेच काहीतरी लिहून आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी खूप इच्छा आहे”. कुठल्या शब्दात त्या व्यक्त कराव्यात तेच समजत नाही. तुमच्या कल्पनेतील तुमची मैत्रीण ,तुम्हाला आवडणारी तुमची प्रिय अशी सहेली होणे “मला खूप खूप आणि मनापासून आवडेल.”.

त्यादिवशी अनिताला विजयच्या या सहेली कल्पनेची खूप जम्मत वाटली. विजयच्या मनात माधवीची जागा अतिशय आदराची आणि निर्मल स्नेहाची आहे “हे तिला काधीपासुंचे जाणवलेले होते.आणि आता तर विजयची प्रिय सहेली –आपल्याला आवडणारी माधवीच आहे “,याचे तिला एक अनामिक समाधान वाटत होते.

दारावरच्या बेलचा आवाज झाला आणि विजय आपल्या तंद्रीतून भानावर आला .अनिताने दरवाजा उघडला ,बाहेर माधव आणि माधवी उभे होते , त्यांना आत येण्याचे सांगून अनिताने बसण्यास सांगितले.आत आलेल्या माधवच्या हातात मिठाईची बॉक्स दिसत होता ..आणि माधवीच्या चेहऱ्यावर अपार आनंद झळकत होता. हे पाहून अनिताने विचारले-

माधवी-एव्हढे काय विशेष आहे आज ?मिठाई घेऊन आला आहात ते –

खुर्चीत बसत माधव म्हणाला – आनंदाची बातमी आहे म्हणून साजरा करायला आलो आहोत .मला प्रमोशन मिळालाय .ब्रांच-मेनेजर म्हणून बदली झाली आहे .नवी शाखा उघडते आहे आमच्या बँकेची ,त्यासाठी माझी नेमणूक झाली आहे .लवकरच जायचे आहे आता आम्हाला इथून.

अनिताला –विजयला पेढे देत माधवी म्हणाली –आज आमच्याकडून पार्टी ,बाहेरच जाउया छान हॉटेलमध्ये

ठरल्याप्रमाणे सारेजण बाहेर गेले.हॉटेलात गप्पा सुरु झाल्या.माधव आणि माधवी दोघेही खूप आनंदात भरभरून बोलत होते .अनिता मात्र विजयच्या चेहऱ्याकडे पहात होती.त्याचा चेहरा उतरून गेलाय याची तिला जाणीव होत होती.

पार्टीहून परतल्यावर विजय खुपवेळ जागा होता.माधवीच्या स्नेहाला आता आपण दुरावणार ,ही कल्पना फारच क्लेशदायक होती. माधवीच्या प्रेमाचा आधार आपल्या प्रतिभेला संजीवनी देणारा होता.हे दिवस सारून आता निरोपाचे दिवस येणार होते...विजयने माधवीसाठी निरोपाचे पत्र लिहिण्यास सुरुवात केली..

प्रिय सहेली ,

माधवी ..

माधवच्या प्रमोशनची बातमी मनाला खूप खूप आनंद देऊन गेली.त्याच्यासारख्या योग्य आणि कर्तव्यदक्ष माणसाला योग्यवेळी बढती मिळाली ..ही त्याच्या कार्याला मिळालेली पावतीच आहे.तुमच्या या आनंदात अनिता आणि मी ..दोघे ही सहभागी आहोत.

माधवी – तुझे अवचित येणे ,आमच्या घरात मिसळून जाणे हा एक रम्य योगायोग आहे असे मी समजतो ,तुझ्या रूपाने मला निर्मल मनाची ,सुंदर भावना जपणारी एक मैत्रीण लाभली. तुझा स्नेह मी माझ्या

हक्काची ठेव मानली. तुझ्या सहवासाने ,तुझ्या शब्दांनी मला लेखन-उत्साह दिला ,तुझ्या कौतुकाची ,तुझ्या प्रेमाची ही भावनिक सावली माझ्या लेखनाच्या पाठीशी सदैव असू दे.

माधवी .मी तुला माझी प्रिय अशी जिवलग सहेली मनात आलो आहे .तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्यादिवशी तू माझ्या समोर बसून ऐकत होतीस –एकचित्त होऊन पहात होतीस..आणि मी सांगत होतो-तू मला मैत्रीण म्हणून का आवडतेस ,किती आवडतेस ..माझी सहेली तूच आहेस माधवी.”

तुझ्या चेहेऱ्याने तुझ्या मनातल्या आवडीची पावती दिली “,तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा आहे.पण, आता माझी सहेली दूर जाणार, नजरेआड असणाऱ्या कोणत्यातरी गावी तुम्ही जाल ,तिथे तुम्ही छान रमाल ,तुम्हाला हे सहज जमणारे आहे “ हे मला माहिती आहे.

माधवी-तुम्हाला दुराव्ण्याच्या कल्पनेने निराश झालो असलो तरी तुझा आधार असणार आहे “, ही जाणीव मला हुरूप देणारी आहे. तुझ्या या मित्राला तुझ्या हृदयातील एक सुरक्षित जागा दे, जप आणि सांभाळ ,माझ्यातील कलावंताला मोठा कर “,हीच एक इच्छा आज व्यक्त करतो आहे.

तू म्हणाली होतीस एकदा- मलाही लिहावसं वाटतंय ,भावना व्यक्त कराव्याश्या वाटतात . मग, आता लिही ,तुझे मनोगत माझ्यासाठी फार मोठा मानसिक आधार असेल माधवी.