Urmila books and stories free download online pdf in Marathi

उर्मिला

उर्मिला

ले- अरुण वि. देशपांडे

नंदन रोजच्याप्रमाणे आफिसात आला. आजही येतांना नेहमीप्रमाणे त्रास झाला होता. सिटीबस पकडतांना भलतीच धावधाव करायला लागायची. त्यात पुन्हा –उभे राहून प्रवास करायचा –खिसा आणि पाकीट “दोन्ही सांभाळीत ही कसरत करणे सोपे काम नव्हते. यामुळे आफिसात येईपर्यंत अगदी एखादी लढाई जिंकून आलोत असेच वाटत असायचे.

समोरचा पंखा एकदम फुल स्पीड मध्ये सुरु करीत तो खुर्चीवर टेकला. पंख्याच्या हवेने मनाला ताजेतवाने वाटले. थोड्याच वेळात आपण फ्रेश झालो आहोत “,असे जाणवले आणि मग त्याने प्यूनला आलेला टपाल समोर ठेवण्यास सांगितले. आलेल्या टपालाचा भला मोठा गठ्ठा त्याने पाहिला “घसरगुंडीवरून जशी नजर झर्राकन वरून खाली येते “,तशीच त्याची नजर त्या ढिगाऱ्यावरून खाली-वर झाली, त्यात त्याच्या नावाचे पत्र दिसत होते. पाकिटाच्या मागे “भेजनेवाले का पता – पाहून –हे घरून आलेले पत्र आहे “हे कळाले. लगेच हे पत्र वाचून “मूड खराब करून घेण्यात काही अर्थ नव्हता “,या पत्रात प्रोब्लेमच असणार, त्यामुळे हे पत्र संध्याकाळी घरी गेल्यावर वाचलेले बरे. आत्ता वाचून. ” सकाळी-सकाळी अपसेट होणे नको “,असे म्हणत त्याने ते पत्र खिशात ठेवून दिले.

आलेले टपाल पाहून झाल्यावर त्याने ते सर्व बाजूला ठेवून दिले. मग टेबलावरचा फायलींचा ढिगारा दिसला

आता अगोदर या सर्व फायली क्लियर करून झाल्या पाहिजेत. हे झाले नाही तर. . बॉसची बोलणी खावी लागणार “.

नंदनची पोस्ट खरे तर होती प्रोबेशनची पण त्याच्या बॉसने नंदनला जणू “बिन-पगारी –फुल अधिकारी “बनवून सगळी जबाबदारी त्याच्या गळ्यात टाकली होती. नंदनला. अजून कन्फर्मेशन मिळत नव्हते तरी काम आणि काम, वाढती जबाबदारी चुकत नव्हती. पुढील चांगल्या दिवसाची तरतूद करण्यासाठी कामाचे डोंगर हटवून दाखवणे गरजेचे होते. . .

या आफिसात लागून त्याला आता २ वर्ष होत आले होते. येत्या सहा महिन्यात कायम स्वरूपी नोकरीचा आदेश अपेक्षित होता. असे झाल्याने खूप प्रश्न निकालात निघणार होते. इथे पगार खूप कमी नव्हता,. पण. खूप चांगला आहे “,असेही म्हणता येत नव्हते. . त्याला एकट्याला छान राहता येईल इतका हा पगार नक्कीच होता.

एकदा का कामात डोकं खुपसून बसले की त्यानंतर वेळ कसा पळायचा हे कळायचं नाही. घड्याळी -आकड्यापेक्षा कागदावरील आकडे अधिक वेगाने पळायचे आणि त्यांचा पाठलाग करता करता नंदन अगदी

थकून जायचा. आता ही त्याने घड्याळाकडे पाहिले,दुपारचे चार वाजले होते. लंच टाईम केंव्हाच होऊन गेला होता. पण हातावरील कामाच्या नादात नंदनला खुर्चीवरून उठणे जमले नव्हते. खुर्चीतच आळसाने तो

तसाच बसून राहिला. अंग सैलसर सोडले. जरा बरे वाटले. टाईप करून करून हाताला आणि बोटाला चांगलीच कळ लागलेली आहे हे त्याच्या लक्षात आले. भिंतीला खुर्ची टेकवत तो अधिक आरामशीर बसून राहिला. पाय टेबलाच्या खाली ठेवले. अशा पोज मध्ये त्याला खूप छान बरं वाटत होतं

आपल्याला चांगली कडकडून भूक लागली आहे असे त्याला जाणवले. त्याच्या ऑफिसच्या समोरील रस्त्यावर जणू खाऊ-गल्लीच होती. जी आवडेल ते खाण्यास मिळायचे. . त्यातील एका हॉटेल मध्ये तो जाऊन बसला. ओळखीचा वेटर लगेच येऊन उभा राहिला. . त्यानी दाखवलेल्या कोपर्यातील टेबलाकडे जाऊन नंदन बसला. पंख्याखाली एकदम शांत शांत वाटत होते. आवडीचे पदार्थ खाऊन पोट भरले. आणि त्याला सकाळी आलेल्या पत्राची आठवण झाली.

खिशात ठेवलेले पत्र त्याने काढले. . त्याची नजर पत्रातील मजकुरावरून फिरू लागली. घरच्या परिस्थतीत काही एक बदल नव्हता,सगळं नेहमीचच. नंदनच्या घरी सगळा मोठा पसारा. त्याच्यापेक्षा दोन मोठे भाऊ,त्यांचा भरलेला संसार,यात भरीस भर म्हणजे -ज्यांचे लग्न अजून जमत नव्हते अशा नंदनच्या दोन बहिणी घरात होत्या. नंदनच्या वडिलांनी आपले रडगाणे त्या पत्रात लिहिले होते.. ”दोन्ही पोरं –त्यांच्या बायका एकत नाहीत, सासू-सुनांच अजिबात पटत नाही. . ” वगेरे असेच अजून बरेच काही होते त्या पत्रात,आणि “ काही पैसे पाठवावेत अशी सुचना करण्यास ते विसरले नव्हते.

पत्र वाहून झाल्यावर “आपल्याला काहीच वाटले नाही.. असे नंदनला वाटून गेले. . पत्रात दरवेळी तोच तो मजकूर वाचून आता पूर्वीसारखी काळजी आता तेव्हढ्या तीव्रतेने वाटत नाहीये हेच खरे “त्याचे घर बदलणे शक्य नव्हते,त्या घरातील माणसांचा स्वभाव –तो देखील तसाच रहाणार याची त्याला खात्री होती.

राहता राहिले पैसे पाठवण्याचा प्रश्न,आता तो देखील अवघड होता,त्यालाच पैसा पुरवतांना तारेवरची कसरत करावी लागत होती,त्यातून पुन्हा मागितले की लगेच गावाकडे पैसे पाठवणे कसे जमायचे ?”,या विचारासारसी नंदनने पत्र घडी करून खिशात ठेवून दिले. . आणि वेटर कधी येतो याची वाट पहात बसला. . लंच करून झाला,ऑफिसमध्ये टेबलवरचे काम त्याची वाट पहात होतं,पुढील चार तास खाली मान घालून त्याला आकडेमोड करीत मानमोड काम करावे लागणार होते.

सवयीप्रमाणे तो टेबलावरील कामाच्या ढिगार्यात हरवून गेला,आणि बघता बघता फाईल –ढिगारा कमी कमी होत संपला. हातावेगळ्या केलेल्या कामाकडे पाहून नंदनला परिश्रमांचे सार्थक झाल्याचा आनंद वाटत होता. ऑफिस-प्यून च्या पाठोपाठ नंदन त्याच्या बॉसच्या केबिन मध्ये शिरला, नंदनने संपवलेले काम पाहून बॉसला बरेच वाटत असावे पण त्यानी चेह्रेर्यावर तसे काही दिसणार नाही याची काळजी घेतलीय हे नंदनला जाणवत होते.

सर, एक पेंडिंग रिक्वेस्ट आहे,आठवण करून देतो. . आपल्याला ऑफिस कामासाठी मला एका सहायकाची अतिशय गरज आहे. आणि तातडीने हे करावे. कारण कामच इतके वाढले आहे की.. माझ्या पेक्षा ते तुम्हाला जास्त माहिती आहे.. .

नंदनला एका मदतनिसाची गरज आहे “हे बॉस जाणून होते. त्यामुळे काही तरी करणे आवश्यक होते.

हे पहा नंदन. मी एका उमेदवाराला उद्या मुलाखतीसाठी बोलावले आहे. . उद्या तो आल्यावर. त्याची मुलाखत,वगेरे सोपस्कार,त्याच्या निवडी बद्दलचा निर्णय. . या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात.

पगार कसा आणि किती ? हा निर्णय सुद्धा तुम्ही घ्यायचा आहे. मी फक्त ऑर्डरवर सही करीन.

आणि हो. मि. नंदन आणखी एक महत्वाचे - मी उद्या दिवसभर इकडे येउ शकणार नाहीये. त्यामुळे काळजीवाहू अधिकारी तुम्ही असणार.

पण, सर,मी हे असे महत्वाचे निर्णय कसे घेऊ शकणार ?,आहो,मीच अजून कन्फर्म कुठाय ? आणि,तुम्ही हे असे कर म्हणून सांगताय. ?.

अहो.. नंदन साहेब.. इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवलीय म्हणजे. . तुम्ही कन्फर्म आहात” हे आता वेगळा सांगायची गरज आहे का ? कागदोपत्री. . थोड्याच वेळात “नोकरीत कायम-नेमणूक झाली आहे असे पत्र तुमच्या हाती देऊनच मी जाईन.. मग तर हैपी ? चला,कामाला लागा आता. . !

बॉस सर्वासमोर जे बोलून गेले त्या बोलण्याने मग, क्षणात किती फरक पडला.. ! बापरे, ट्रेनी नंदन, आता एकदम साहेब म्हणून खुर्चीत बसला. . सगळ्या ऑफिसची त्याच्याकडे पाहण्याची नजर बदलून गेली..

बॉसच्या चाणाक्ष नजरेने नंदन म्हणजे “काम का आदमी है “,असे ठरवून पुढील जबाबदारी टाकण्यास हा तरुण अगदी योग्य आहे “म्हणूनच आज त्यांनी त्यांचा निर्णय अंमलात आणून टाकला होता,नंदनच्या खांद्यावर ऑफिस –जबाबदारी टाकून ते निर्धास्त झाले होते,त्यांची ही निवड अर्थातच सर्वांना आवडली होती.

घरी जाण्याची वेळ झाली आणि त्या अगोदर नंदनने ऑफिस मध्ये एकवार नजर फिरवली.. इतर कर्मचारी निघून गेल्यावर प्यून ने नीट आवराआवर केली की नाही हे पाहून घेतले,त्याच्याकडून सर्व किल्ल्या त्याब्यात घेत बैगमध्ये ठेवून देत ऑफिस लॉक करून नंदन ऑफिस बाहेर पडला,साहेब झालेल्या नंदनने नवी जबाबदारी छान प्रकारे निभावली आहे असे बॉसला आठवणीने सांगेन असे प्यून ने हसत हसत सांगून नंदनला बाय केला

घरी आल्यावर त्याला पुन्हा आज आलेल्या पत्राची आठवण झाली, आता मूड खराब करून घेण्यात काहीच अर्थ नव्हता. भूक लागली होती.. कुठल्या तरी हॉटेल मध्ये जाऊन त्याच त्याच चवीचे जेवण करण्याचा त्याला कंटाळा आलेला होता.. म्हणून गेल्या काही दिवसांपासून जसा जमेल तसा. . ”दाल-रोटी –भाजी “ असा स्वंयपाक बनवून तो खात असे. आज ही त्याने असेच केले. दिवसभराच्या कामाने शरीर थकून गेलेले आणि मन मरगळून गेलेले होते, पलंगावर आडवे होताच त्याला गाढ झोप लागली.

उजाडलेल्या दिवसाची सकाळ नेहमी प्रमाणेच उगवलेली होती. काही नवे नाही, काही विशेष नाही,ऑफिस मध्ये तो आला तेंव्हा इतर स्टाफ एकेक करून येत होता,आणि,आपापल्या कामात गर्क आहे असे दाखवत होते. उगीच इतरांच्या गोष्टीत लक्ष देण्यात कुणाला वेळ नव्हता आणि इंटरेस्ट नव्हता “हे जाणवत असायचे.

नंदनच्या साहेब होण्याने. . त्याच्या कामात खूप भर पडली होती. . आणि साहेब बाहेर कामाच्या निमित्ताने बिनधास्त फिरण्यास मोकळे झाले होते हेच खरे “,नंदन कामात गढून गेला,वर मान करून पाहण्यास वेळ मिळणार नाहीये याची त्याला खात्री होती. कसून काम करण्याची त्याची सवय त्याला अशावेळी छान सवय वाटत होती.

समोर उभा रहात प्यूनने त्याला काम थांबवण्यास भाग पाडत म्हटले. . साहेब.. काल बॉसने ज्या उमेदवाराला इंटरव्ह्यू साठी बोलावले आहे. . तो आलाय. अगदी वेळेच्या आत हजर राहून तुमच्या बोलावण्याची वाट पहातो आहे. त्याचे बोलणे ऐकताच नंदनला साहेबंनी त्याच्यावर टाकलेल्या या नव्या जबाबदारीची आठवण झाली. त्याने भले ही शेकडो इंटरव्ह्यू दिले असतील. . आज पहिल्यांदा तो इंटरव्यू घेणार होता.. सोपे काम नव्हते. आणि जॉब साठी त्याची नेमणूक करायचा निर्णय त्यालाच घायचा होता. आलेला उमेदवार वशिल्याचा जरी नव्हता. . पण, एकदम अनोळखी नाहीये. . असे बॉसने सांगून ठेवलेले होते.

प्यूनने उमेदवाराची फाईल समोर ठेवली.. ती उघडल्यावर. त्याला लगेच नाव समजले होतेच,पण, आत आलेल्या उमेदवाराला खुर्चीत बसल्यावर त्याने विचारले. .

युवर नेम प्लीज. . !

उत्तर आले- मिस उर्मिला देशमुख

एक विचारतो. . राग मानू नका. .,

या नोकरीची तुम्हाला खरेच गरज आहे का ?, की पाकेटमनीसाठीची टाईमपास असणार आहे ही नोकरी ?

ऑफिस मालकाच्या रुबाबात त्याने मोठ्या स्टाईलने हा प्रश्न विचारला. खरा. . पण..

“हे पहा मिस्टर –टाईमपास, पाकीटमनी “ हे असला काही मला माहिती नाही. तुमच्या कामाच्या वेळा माझ्यासाठी सोयीच्या आहेत”असे मला सांगितले. आणि तुमच्या साहेबांनी सुचवले. अर्ज तर करून बघ. .

म्हणून मी आले. तुम्ही माझी फाईल पहा,आणि मग ठरवा. . तुम्हाला जॉब द्यायचा असेल तर त्या आधारे द्या,मला तशी गरज नाहीये.

इंटरव्यू देणाऱ्या उमेदवाराचा असा वरच्या पट्टीतला आवाज नंदनने पहिल्यांदाच ऐकला. बॉस इंटरव्यू न घेता या मुलीला नोकरी देऊ शकतात तर. हे इंटरव्यू ड्रामा कशासाठी ?,त्याला त्याचे नोकरीसाठी केलेले ताप-व्याप आठवून गेले. जुजबी प्रश्न विचारून. . त्याने उर्मिला देशमुखला व्यवस्थापक –सहायक म्हणून रुजू व्हावे अशा आशयाचे नेमणूक-पत्र देण्याची सूचना सेक्शनला दिली.

उद्यापासून उर्मिली तिचे कोलेज करून. . तिच्या सोयी प्रमाणे ड्युटी करणार होती. मिळणार्या पगारातून पुढे महत्वाचा कोर्स करण्यासाठी फीसचे पैसे जमले पाहिजेत हा तिचा हेतू होता. तिच्या घरची आर्थिक परिस्थती बेताची होती,पुढील शिक्षण करता आले तर तिच्या भविष्यातील दिवस अधिक चांगले असणे शक्य होणार होते. नंदनला ही सर्व माहिती नंतर प्यूनने हळूच सांगून टाकली. कदाचित अशा गरजू मुलीला मदत करणे हा हेतू त्याचा बॉसचा आहे हे नंदनच्या लक्षात आले,आणि म्हणूनच जॉब देतांना तो सहानुभूती म्हणून मिळाला आहे “असे उर्मिलेला वाटू नये याची काळजी बॉसने नक्कीच घेतली होती.

नंदनने लगेच बॉसला फोन करून मिस. उर्मिला देशमुखचा इंटरव्यू घेऊन तिला जॉब दिल्याचे दिल्याचे सांगितले. हे ऐकून बॉस म्हणाले. . व्हेरीगुड. फार चांगला काम केलेस. मी उद्या येईन त्यावेळी पाहीन मिस. उर्मिला कसे काम करते आहे ते.

रोजचे रुटीन दिवस सरत होते त्याला फार काही वेळ लागत नाही. उर्मिला तिच्या वेळेत येऊन अगदी दिलेले काम चोखपणे करून जात होती. नंदनने एक दोन वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून पाहिले. पण तिने सहजपणे त्याला झटकून टाकले होते. तो जितकी उत्सुकता दाखवत होता त्याच्या उलट उर्मिला त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे “हे नंदनला जाणवत होते.

खरं म्हणजे,ऑफिसमधल्या या नोकरीच्या निमिताने त्याच्या आयुष्यात इतक्या जवळून वावरणारी पहिली तरुणी –उर्मिला होती. त्याच्या केबिन मध्ये,त्याच्या समोर बसून काम करणाऱ्या उर्मिलेचा निशब्द सहवास त्याला खूप सुखद वाटत होता. याआधीच्या त्याच्या सारख्या सामान्य मुलाच्या वाट्याला मुलींची मैत्री, त्यांचा मैत्रीण म्हणूनच लाभणारा सहवास “अशा गोष्टी कधीच आलेल्या नव्हत्या,एका अर्थाने रंगहीन असेच आयुष्य नंदन जगत आलेला होता,

नोकरी लागल्यानंतर मात्र “ आपण एक सामान्य आहोत “ हा त्याचा न्यूनगंड कमी कमी होत चालला होता. पगाराच्या आर्थिक पाठबळावर त्याच्या मनाला चांगलीच उभारी आली होती,आणि आता तो आत्माविस्वसाने वावरत होता. आपण बरं आणि आपलं काम बरं “,असे वागणार्या नंदनच्या मनात अलीकडे पहिल्यांदाच उर्मिलेचे विचार मनात येत होते. हे मुलगी आपल्याला खूप आवडली आहे,तिचा स्वभाव,कामातली हुशारी,वागण्यातला सुस्पष्टपणा. . ”खरेच खूप गोड आणि गुणी आहे ही उर्मिला. . !

“आपण कुणावर तरी प्रेम करतोय “!,या भावनेनेच आपल्या मनाला झपाटून टाकले आहे,आपल्या भावविश्वात खूप नाजुकशी खळबळ उडाली आहे हेच खरे. हे सारे उर्मिलेला कसे सांगयचे. याची तालीम

त्याने कितीदा तरी करून पाहिली होती. . पण याचा प्रत्याक्ष्य प्रयोग करण्याचे त्याचे धाडस काही केल्या होत नव्हते. कारण ऑफिसमध्ये आलेल्या उर्मिलेला पाहिले की तिच्याकडे पाहून असे काही बोलण्याचा

त्याला धीर होत नसे, तिचे पाणीदार डोळे,त्यातली तिची तेज नजर पाहूनच आपल्या मनातले बोलायचे तो साफ विसरून जात असे,उर्मिलेच्या स्पष्ट बोलण्याची धार. बापरे. तिने सुनावले काही तर ?

कल्पनेने नंदन चुपचाप बसत असे.,ऑफिस मध्ये उर्मिला अतिशय अलिप्तपणाने वागत होती.,कुणाशी वावगे बोलणे नाही की वागणे नाही, दिलेले काम अचूकपणे पार पाडणे. अशा तिच्या वागण्याने नंदनच काय इतर सहकारी देखील अंतर राखूनच उर्मिलेशी रहात होते. नंदनला वाटायचे आपल्या समोर

असणारी ही मुलगी ओळखीची म्हणावी तर. आपल्याला अजून पूर्ण अनोळखी आहे.. !

एक दिवस मात्र अचानक आलेलें महत्वाचे काम लगेच पूर्ण करावे या आदेशामुळे उर्मिलेला रोजच्या पेक्षा जास्त वेळ थांबावे लागले होते. . . रात्रीची वेळ आहे. . मी येऊ का सोबत सोडायला ? नंदनने न रहावून विचारले. .

नाही हो,काही गरज नाही, माहितीचा रस्ता आहे रोजचा,मी जाईन एकटी. . उर्मिला शांतपणे म्हणाली.

अहो, मी घरापर्यंत येऊ का ?असे नाही विचारले, फक्त बस –स्टोप पर्यंत येऊ का ?असे विचारतोय,

त्याचा प्रश्न ऐकून ती काहीच बोलली नाही. हे पाहून. नंदन तिच्यासोबत निघाला. . चालता चालता त्याने

विचारलेच. .

का हो – तुम्ही नेहमीच इतक्या कडक आवाजात का बोलता हो ?,आम्ही तर घाबरून बोलत नाही तुमच्याशी.. .

त्याच्या या प्रश्नावर उर्मिला हसली. . तिचं छानसं हसणे नंदन आज प्रथमच पहात होता. तिचे हे असे मोहक हसणे पाहतच राहावे असे त्याला वाटत होते.

उर्मिला म्हणाली- त्याच काय आहे नंदन. . मी काय,आणि एखादी स्त्री,तरुण मुलगी. थोडसं मोकळेपणाने बोलली की. पाघळून जाऊन, लगट करणारे पुरुषच आम्ही नेहमी पहातो,त्यांना दूर दूर ठेवण्यासाठी म्हणून मी बाहेरच्या जगात वावरतांना. आणि ऑफिसमध्ये असतांना अशीच वागत असते,एक गोष्ट थोडी वेगळी आहे की. . ऑफिस मध्ये तुमच्या समोर, तुमच्या सोबत असतांना मला असे वागण्याची-बोलण्याची वेळच आलेली नाही. . कारण तुम्ही खूप वेगळे आहात. हे मला नेहमी जाणवते.

उर्मिला जे बोलते आहे ते नंदनला खरेच वाटत नव्हते. . तो आश्चर्याने तिच्याकडे पहात राहिला आणि ती त्याच्याकडे पहात स्मित करीत होती.

“अरे वा,उर्मिला –तुम्ही तर अगदी छान बोलताय की. . हे बघा तुम्ही आणि मी,तसे समवयस्क,बरोबरीचे आहोत. मग, मोकळं बोलायला काय हरकत आहे ? अहो, आपण कामाच्या निमित्ताने सोबत असतो तर,

सहवासाने थोडी जवळीक असावी असे वाटणे यात काही गैर असेल काय ?

त्याचे बोलणे ऐकत उर्मिला म्हणाली.. हे पहा नंदन,मनाने तुम्ही खूप चांगले आहात. पण,खरं सांगते,आम्ही थोडं मोकळेपणाने वागलो –बोललो की वातावरण बिघडून जाते. भावना कधी संपते आणि नको ते स्पर्श आणि लागट- सुरु होते, नको त्या गोष्टींची भीती वाटू लागते.. मग,मन रुक्ष्पानाने वागण्यास भाग पाडते “.. .

ती दोघे ही आज पहिल्यांदाच आणि एकमेकांना सोबत करीत चालत होती,ऑफिस पासून बस-थांबा दूर होता म्हणून तरी ही संधी आली होती.. त्यात येणारी बस.. उशीर लावत होती. नंदनला मात्र मनातून वाटत होते. बस लवकर येउच नये. . तेव्हढाच उर्मिलेलचा हवाहवास वाटणारा सहवास लाभेल.,पण,असे ही झाले नाहीच,

बस आली आणि उर्मिलेला घेऊन सुद्धा गेली.. गेलेल्या बसकडे त्याने एकवार पाहिले,त्याला जाणवले,पुरे झाले हे आपले. एकट्याने चालणे. . उर्मिला आपल्या सोबत असेल तर हे चालणे किती सुखद होईल.. . !

मध्येच एक टपरीवर तो थांबला. . चालू असलेले गाणे त्याच्या कानावरती पडले. .

“उनको ये शिकायत है के हम कुछ नही केहते,

अपनी तो ये आदत ही के हम कुछ नही केहते. . . ||

या ओळी ऐकून क्षणभर उर्मिला त्याच्या नजरेसमोर आली. आपल्या मनाशीच हसत तो पुढे निघाला,

हसून बोलणार्या उर्मिलेने त्याच्या मनात खास जागा पटकावली होती. . आजच्या तिच्या वागण्यातून –

बोलण्यातून ती आपल्याला “हो” जरी लगेच म्हणणार नाही,तरी पण तिच्या मनात “नाही” तर नक्कीच नाहीये.. तिच्या”होकाराची वाट पाहण्यास तो तर आनंदाने तयार होता. तिचा प्रतिसाद नकरात्मक वाटणारा नाहीये. ही जाणीव त्याला खुलवणारी होती.

या भेटीनंतर. . . . निदान त्याच्याशी वागताना –बोलतांना उर्मिला मोकळेपणाने बोलण्याचा हळू हळू प्रयत्न करते आहे हे नंदनला जाणवत होते. . प्रेमात पडल्यावर मनाची अवस्था कशी होऊन जाते. याचा अनुभव कसा वाटतोय ? या त्याच्या प्रश्नाचे उत्तर. उर्मिलेने तिच्या नजरेतून आणि अस्फुट अशा स्मितातून एक दिवशी दिले.. तो दिवस नंदन साठी खूप आनंदाचा होता.

नेहमीप्रमाणे त्याच्या घरचे पत्र आले. . या वेळी पैशांची मागणी नव्हती. ”आई खूप आजारी आहे “,लगेच निघून यावे “,असा मजकूर होता. नंदनने साहेबांना पत्र दाखवले आणि जाऊन येण्याची किती गरज आहे हे सांगून सुट्टी मंजूर करून घेतली.

संध्याकाळी उर्मिलेला पत्र दाखवत तो म्हणाला. . यावेळी घरी माझ्या लग्नाचा विषय निघाला तर मी काय सांगू ?

“तुमच्या मनात आहेत ते सांगा “ तिचे हे उत्तर अवखळ वाटले त्याला,

मी जे सांगेल घरी. ते तुला मान्य आहे तर.. !,नंदनचे बोलणे ऐकून उर्मिला म्हणाली..

अहो,आधी घरच्यांना तुमच्या लग्नाबद्दल विचारू तर द्या, मग, तुम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. न विचारताच सांगायची.,आत्तापासूनच काय घाई झालीय तुम्हाला ?

“म्हणजे ?,तुला काहीच वाटत नाहीये का उर्मिला ? नंदनने अधीर होऊन विचारले.,

“खरच. . तुम्ही म्हणजे न.. अगदीच. . . ”हे. आहात. . उतावळा. . . आणि.. बाशिंग. . !उर्मिला हसून त्याच्याकडे म्हणाली.

तिला निरोप देत तो म्हणाला -गावाहून आल्यावर भेटूया उर्मिला,मिस यु सो मच. . . !

गावाकडे जाणारी त्याची बस वेगाने निघाली.. त्याही पेक्षा वेगाने नंदनच्या मनातील विचार सुरु होते.

उद्या घरी गेल्यावर लग्नाचा विषय निघाल्यावर. आपण सांगू.. . आपल्या प्रेमाबद्दल. आवडलेल्या उर्मिलेबद्दल

तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले आहे”हे सुद्धा ठामपणे सांगायचे. हे पक्के ठरले.. आणि अशा वेळी. .

रस्त्यावर काहीतरी आडवे आले,त्याला टाळण्याच्या प्रयत्नात. ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली. पण भरधाव असलेली नंदनची गाडी. . रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला जाऊन धडकली आणि आडवी पडली. झोपेच्या अधीन झालेल्या प्रवाश्ना काय झाले,कसे झाले ते कळालेच नाही..

जखमी प्रवासी मदतीसाठी आवाज देऊ लागले. . त्यांचे आवाज रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या वस्तीतील लोकांच्या कानावर पडले. . हे नशीबच. अपघात झालेले ठिकाण मोठ्या रस्त्यावरचे होते,म्हणूनच

जाणारी अनेक वाहने. . त्यातील लोक धावत आल्यामुळे. मोठा अनर्थ टाळता आला “,नाही तर गाडीतल्या लोकांचे काही खरे नव्हते “,असे मदतीस आलेल्या लोकांनी बोलून दाखवले.

नंदनसहित,बसमधील इतर प्रवासी हॉस्पिटलमध्ये होते,अनेकांना जबर दुखापती झाल्या होत्या. या भीषण अपघातात कुणाच्या जीवावर बेतले नव्हते “हा मोठा दिलास होता.

हॉस्पिटल मधील लोकांनी प्रवाशांच्या घरी संपर्क साधले. . नंदनच्या घरी पण ही बातमी पोंचली. . त्याची आई स्वतःचा आजार विसरून गेली. . नंदनचे गाव अपघात झालेल्या ठिकाणापासून फार अंतरावर नव्हते.

नंदनचा शोध आई-बाबा घेत होते.. सगळेच प्रवासी. पलंगावर जखमी अवस्थेत पडून होते. . अंगावर बँडेज होते,चेहरे झाकलेले. कसे ओळखायचे आपल्या माणसाला. . ?.. पण मनाची नजर आपल्या माणसाला बरोब्बर हुडकून काढतेच. .

एक पलंगावर त्यांना त्यांचा नंदन दिसला. आणि हायसं वाटले त्यांना. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सगळी कल्पना देत म्हटले. .

जीवाचा धोका टळला.. पण..

काय झाल डॉक्टर ?,आई-बाबांनी अधिरतेने विचारले. .

नंदनच्या उजव्या पायाला इतक्या जखमा झाल्या होत्या की. तो गुडघ्यापासून पूर्ण निकामी झाला होता,त्यामुळे

तो काढावा लागला. हे नसते केले तर त्यांना त्रास झाला असता. काळजी म्हणून हे करणे गरजेचे होते.

अरे देवा. . ! हे काय होऊन बसल हो. . ! आई-बाबंना मोठाच धक्का बसला होता.

हळू हळू.. काही तासात नंदन शुद्धीवर आला, वास्तवात आला,काल येतांना काय झालं ?,कसा झालं ? आता त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिले. डॉक्टर,नर्स,आणि त्याचे आई-बाबा दिसत होते,. . सर्वांना आपल्याभोवती जमलेले पाहून. आपल्याला नक्कीच काहीतरी झालयं याची त्याला कल्पना येऊ लागली. तो उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला तोच, आपल्या पायाची अवस्था त्याला जाणवली. कल्पनेने त्याला भोवळ आली. नजरेसमोर फक्त अंधार पसरून गेला. दीड-पायाचा लंगडा नंदन “,“! त्याने डोळे मिटून घेतले होते.

वडिलांनी त्याला आधार दिला,आई त्याच्या चेहेर्यावरून हात फिरवत होती.. त्या दोघांच्या मायेच्या स्पर्शाने “आपण जिवंत आहोत “. याची त्याला जाणीव देत होती. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय त्याला इथून जाता येणार नव्हते. घडलेले सारे काही ऑफिसला कळवणे भाग होते,त्यानंतर नंदनला विश्रांती हवी म्हणून सगळे बाहेर थांबले,नंदन तंद्रीत होता. मनात मोठे वादळ उठले होते. . हे सर्व काय होऊन बसले आहे ?

उर्मिलेला हे समजल्यावर काय वाटेल ? तिला विसरून जाणे हाच मार्ग शिल्लक आहे आपल्याला,ही अशी लंगडी सोबत तिच्या काय कामाची ?,येतांना काय ठरवून आलो होतो,आणि हे काय भलताच होऊन बसलाय.. एका अर्थानं काही ठरण्यआधीच हे झालं. आणि.. उर्मिलेत आपण गुंतलो आहोत, तिने तसा स्पष्ट कुठ सांगितलाय कधी ?,तिची संमती आहे “असे आपणच गृहीत धरून आहोत. ” हे काही बरोबर नाही. आता आपण तिच्या उपयोगाचे नाही आहोत, आता पुन्हा त्या रस्त्याने जाणे नाही.. बस. नंदनने मनाशी निर्णय घेऊन टाकला होता.

नंतरच्या आठवड्यातील गोष्ट. . त्याच्या रुममध्ये आलेल्या नर्सने आवाज देत म्हटले, नंदन,तुम्हाला भेटण्यासाठी कुणी आले आहेत,

तुम्ही बोलू शकणार आहात का ?तरच मी त्यांना आत घेऊन येते. नंदनने हो म्हणत मान डोलावली.

नर्सच्या सोबत त्याचे प्रत्यक्ष साहेब आणि नंदनचे आई-वडील आत येत होते त्यांना पाहूनच नंदनचे मन भरून आले. त्याचा हात आपल्या हातात घेत साहेब त्याला धीर देत म्हणाले. . काळजी करू नको नंदन,काय झाले आहे,मला याची पूर्ण कल्पना आहे. . छान बरे व्हा,तुम्हला काय झाले याची लाज वाटू देऊ नका,तुमच्या व्यंगाकडे लक्ष देत बसायला या जगात वेळ कुणाला आहे हो ?,आम्ही आणि सारे ऑफिस तुमच्या बरे होण्याची वाट पाहत आहोत. गेट वेल सून.. . !

साहेबांच्या शब्दांनी नंदनच्या मनाला धीर दिला आपली हरवलेली उमेद साहेबांनी परत दिली आहे असे वाटत होते. त्याचा निरोप घेत साहेब त्याला म्हणाले. . हे बघ. नंदन,आम्ही आता बाहेर थांबतो आहोत. . तू आता यांना बोल,त्याने दरवाज्याकडे पाहिले. . आत उर्मिला येत होती. .

तिच्या नजरेत काय नव्हते ? नंदनला ते सारे समजले.

त्याच्या जवळ ती येऊन उभी राहिली. तिच्याकडे न पाहता. . नंदन बोलू लागला. . उर्मिला,बघ न,लंगडा झालोय मी,हा दीड –पायाचा नंदन तुला काय आधार देणार,काय सोबत करू शकणार ? माझ्या मनातले सांगण्या अगोदर हे सगळा घडलंय. . आई-बाबांना मनातला स्वप्न सांगायचं राहून गेलं तेच ठीक झालं.

मी तुला विसरून जाऊ शकत नाही. . पण हे कराव लागणार. तुझ्या भल्यासाठी.

उर्मिला म्हणाली.. नंदन ! काय हे ?,तुम्ही पेशंट आहात,जास्त बोलायचं नाही, त्रास होईल,हे मी सुद्धा नर्स सारखाच मोठ्या आवाजात दटावून सांगायचं का आता ?

एक फिकटसे हंसू त्याच्या चेहऱ्यावर उमटून गेले. . तो तिला बोलू लागला. .

उर्मिला –तुझा सहवास,तुझे प्रेम माझ्या नशिबातच नाहीये,तुला विसरणे हेच माझ्या हातात आहे आता,तुझ्या सुंदर अशा आयुष्यात तुला माझी अशी लंगडी सोबत शोभणार नाही. तुझ्या मनात काही असेल तर,त्याला महत्व देऊ नकोस. मला काय वाटेल याचा विचार करू नकोस.

त्याच्याकडे पहात. . उर्मिला म्हणाली- तुम्ही मला विचारून माझ्यावर प्रेम केलात का ? सगळ्या गोष्टीचा निर्णय तुम्ही स्वतःच घेत आहात, मला काय वाटत असेल, माझा विचार का आला नाही तुमच्या मनात ?

अहो, “प्रेम म्हणजे इतकी का हीन –भावना वाटते आहे तुम्हाला ?,मनाला वाटला तोपर्यंत प्रेम,नाही वाटला की दे सोडून प्रेम, हे इतका सहजपणे वागायला तुम्ही काही सिनेमातले हिरो नाहीत “हे लक्षात ठेवा.

आज मी स्वतःहून इथे आले. . तुमच्या विषयी वाटणार्या,असणार्या भावने मुळेच ना ! यातूनच तुम्ही या उर्मिलेला ओळखायला हवं.

नंदन. . मी तुमच्यावर प्रेम केलयं,तुमच्या पायावर नाही, तुमच्या मनावर प्रेम आहे माझं,या मनातील निर्मल भावना आणि शुद्ध विचार मला खूप भावले. आणि आज तुम्ही मात्र मनाच्या बाहेर घोटाळत आहात, तुमचे विचार असे इतके सामन्य निघावेत “ याच मला वाईट वाटतंय.

अहो, आपले प्रेम विसरून जाणे जसे तुम्हाला अशक्य आहे, मलाही ते विसरून जाणे तितकेच कठीण आहे “याचा विचार तुम्ही का केला नाही ?,एकदा तरी हा विचार तरी करून पहायचा.. ! नंदन, प्रेम हे शेवट पर्यंत प्रेमच असते “. ते असे हरघडी बदलत नसते.

तुम्हाला आत्ताच तर आधाराची,प्रेमाच्या सोबतीची खरी गरज आहे,अशावेळी मी तुमची साथ सोडून देऊ ? माझे मन मला असे कधीच करू देणार नाही.

उर्मिला –माफ कर मला,माझा तसा हेतू मुळीच नव्हता,पण,बघ न मी असा लंगडा होऊन बसलो,त्या भरात तुला बोलून बसलो. तुझी खरी ओळख आज झाली. तू सोबत नसतीस तर मी काय केलं असता सांगू शकत नाही.

नंदन. आहो, आता तर तुम्ही ठरवला तरी तुम्ही लंगडे राहणार नाही,आज इतक्या आधुनिक सोयी आहेत की, तुमच्या नसलेल्या पायाच्या जागी,अगदी तसाच कृत्रिम पाय,त्याचा आवश्यक भाग बसवत येतो,

आणि या गोष्टी लोकांना सांगायचा तरी कशाला,लोकांशी काय देणे-घेणे आपल्याला ?

तिचा हात हात हातात घेत नंदन तिला म्हणाला – उर्मिला तू सोबत नसतीस तर मी कुठे भरकटत गेलो असतो कुणास ठाऊक ?

त्याच्या हाताला हलकेच दाबत ती म्हणाली- बरे भरकटला असता तुम्ही ? मी आहे सोबत तुमच्या कायमची.

उर्मिलेचा तो आश्वासक स्पर्श खूप काही सांगत होता. अंधारून आलेल्या मनाला उर्मिलेच्या प्रेमाचा नंदादीप उजळून टाकीत होता. उर्मिला आणि नंदन साथ-साथ असेच राहणार होते. . नेहमीसाठी.. . . !

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED