Navara mhanje books and stories free download online pdf in Marathi

नवरा म्हणजे......!

नवरा म्हणजे ....!

(विनोदी कथा )

ले- अरुण वि. देशपांडे

नवरा म्हणजे ...या वाक्याची पूर्ती करणे कोणत्याही बायकोसाठी अगदी सोप्पा वाटणारा आणि आवडता प्रश्न असतो असा प्रश्न , जो तिला तिच्या मनाप्रमाणे सोडविता येत असतो.आता माझ्या बाबतीत नवरा म्हणजे ... अर्थात आमच्या सौभाग्यवतीचं हे मनोगत वाचकांच्या (म्हणजे - पत्नीरूपी वाचकांच्या ) मनोगताशी जुळतं असू शकतं , कारण "नवरा म्हणजे ..पळसाला पानं तीनच " सगळीकडे अगदी सारखा या म्हणी प्रमाणे असते तिच्या दुर्दैवाने (असे ती म्हणते) माझ्यासारखं बावळट ध्यान तिच्या आई-बाबांच्या नजरेस पडलं ,त्यादिवशी त्या दोघांना नक्कीच "दृष्टी-भ्रम " झाला असावा अशी जबरदस्त शंका तिच्या मनात पक्की आहे , किंवा "पोटची पोरगी जड झाली म्हणून " त्यांनी माझ्यासारखा नग " - त्यांच्या अद्वितीय कन्येसाठी नवरा म्हणून निवडला ..दुसरं काय म्हणव यापुढे ? असे तिचे मत आहे.पण म्हणतात ना , "ब्रह्मदेवाने विचार करून जोड्या जमवलेल्या असतात. अशाच कुठल्या तरी एका जन्मात आम्हा त्यावेळच्या नवरा-बायकोच्या जोडीतल्या -माझ्या बायकोशी ब्रम्हदेवाचे तीव्र मतभेद झाले असावेत -खटके उडाले असावेत असे मला राहून राहून वाटत असते .कारण त्या भांडणाचा बदला म्हणून "नेमक्या या जन्मात पुन्हा तिचा जोडीदार "म्हणून माझीच निवड करण्याचा "खोडी- उद्योग "या देवाने करून ठेवला असावा असे माझे नम्र चिंतनशील भाव-उद्गार आहेत.तिच्या मते हा नवरा म्हणजे ... नुसता दंड माणूस आहे" , अक्कल वाटण्याच्या दैवी कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा हा आळशी आणि झोपाळू ईसम कुठे तरी ढाराढूर झोप काढीत घोरत पडलेला असणार ..आता या निष्कर्षामुळे "तहहयात माझ्या अक्कल खात्यात ..अक्कल असण्याची कुठलीही नोंद होण्याची बिलकुल शक्यता नाहीये. "आहे त्यात आनंद मानणे " हे सुद्धा मला लाभलेली अक्कल असावे " पण हे माझ्या बायकोला पटतच नाही ..तिच्या मते तर ..तिचा नवरा म्हणजे ..."वरून दिसतो भोळा- आतून आहे पक्का गाभोळा ".वरून बावळट - दिसणारे माझे "रुपडे " किती फसवे आहे ", हे ती कितीदातरी खुद्द तिच्या आईसमोर .म्हणजे माझ्या आदरणीय -सासुबाईंच्या समोर मलाच ऐकवत असते ..अशा कसोटीच्या प्रसंगी माझे माननीय -सासरेबुवा मला -मदत करण्याऐवजी - त्यांच्या योग-साधनेतील एक सिद्ध असे आसन "बक-ध्यान "करण्यात मग्न असतात.आणि इकडे सासुबाईंना आपल्या लेकीच्या जळजळीत विधानाची -प्रतिक्रियेची दखल घ्यावी लागते . कारण त्यांच्या लेकीच्या या नवर्याची निवड करण्याची त्यांनी केलेली "घोडचूक " आता त्यांना निस्तरता येणे शक्य नाही " या चुकीची जाणीव आणि त्याची टोचणी त्यांच्या मनाला अधिक जखमी करून टाकीत असते.माझ्या सासुबाईंच्या "अफाट अनुभवांचे वास्तव-वाक्य दर्शन ठायी ठायी घडत असते .. आपल्या लेकीला त्या आपले अनुभव -सिद्ध विचारधन नियमित देत लेकी बौद्धिक घेत असतात. " काही चमकदार सुविचार तुमच्यासाठी

त्या म्हणतात ... नवरा म्हणजे संसाराच्या गाडीचं तुटकं चाक असतं ..ते निखळून पडू नये म्हणून आवरावं लागतं .."करता काय ..पदरी पडलं आणि चुपचाप बसावं "..शेवटी नवरा म्हणजे....,जाऊ दे, त्यांना इतका संताप आलेला असतो की काय बोलावे हे सुद्धा सुधरत नाही म्हणून नुसते हातवारे करीत त्या गप्प बसतात.

"आपण गोड गळ्याच्या गायिका आहोत " या (गैर) -समजुतीत वावरणार्या माझ्या बायकोच्या आत्म्विस्वासाचा (?),मला खूप हेवा वाटत असायचा. " चार माणसांना पांगवण्यासाठी "-लागणारी ताकद तिच्या गळ्यात आहे "हे आता सपष्ट सिध्द कण्याची गरज नव्हती ", असे माझे मत , कारण कोणत्याही उत्सव- प्रसंगी तिच्या सुश्राव्य " (तिच्या मते ), अनवट ..(दुसर्या अर्थाने -दुर्बोध आणि अगम्य ), रागदारी ऐकण्यासाठी प्रमुख गायिका (आमच्या सौभाग्यवती ), बळेच आणलेले साथीदार आणि धरून आणलेले रसिक श्रोते "( जे नंतर हळूच नाहीसे होत असत ),शेवटी यातले श्रोते सोडून बाकीचे रहात ..त्यात निष्टावंत म्हणता येईल असा एकमेव श्रोता " गायिकेचा "नवरा -म्हणजे मीच बसून असे..त्यात माझ्याकडे आभार-प्रदर्शन हा भार असायचा.अशा अनेक गाजलेल्या (?) ,आणि (वाजलेल्या) मैफिलींच्या जोरावरती आमच्या सौभाग्यवतींची गायन -क्षेत्रातली घुसखोरी " बिनधास्त चालू असते . तिच्या मते .."गायन हा तिचा ध्यास आहे ", गायन हा तिचा श्वास आहे ",या साठी तिच्या समोर कुणी असावेच अशी तिची अपेक्षा पण नसते ..ती एकचित्त होऊन.डोळे मिटून तिची गान-समाधी लावते " मग समोर कुणी आहे की नाही " या किरकोळ प्रश्नाने ती विचलित होऊन जात नाही..किती नम्रता आणि संतोष -वृत्ती आहे या गायिकेच्या मनात .आणि आपण उगीच म्हणतो..कलावंत संतुष्ट नसतो "' मला तर हे बिलकुल पटत नाही.तिच्या नित्य रियाज-समयी " मी सुरक्षित अंतर ठेवून भोवती वावरत असतो, त्यामुळे "कर्णबधीर "हून्या पासून मी अजून मुक्त आहे ..इतके चांगले वागून .तिचे टोमणे -चालूच असतात. ती म्हणते ..माझा हा नवरा म्हणजे.."सूर नसलेला तंबोरा "आहे नुसता ."या सगळ्या दैनदिन झमेल्यात माझ्या पाठीशी भक्कम आधारासाठी उभे असतात ते माझे परमस्नेही - गजाभाऊ ",त्यांना माहिती आहे की - "माझ्या घरात मला (काडीची ही किंमत नाहीये ), माझी बायको गजाभाऊ समोर म्हणते ..गजाभाऊ काय सांगू तुम्हाला - माझा हा नवरा म्हणजे..गळ्याला झालेलं गळू आहे ",निघत ही नाही आणि -सुटत ही नाही "...मी गजाभाऊ कडे पाहतो .ते गालातल्या गालात हसत असतात....वास्तविक हे गजाभाऊ माझे ओल्ड -फ्रेंड असले तरी..एक वेगळीच गम्मत आहे ..आमच्या बायकोच्या माहेराचे ते प्रथितयश सोयरे आहेत. त्यांच्या या माना मुळे कठीण प्रसंगी अनेकदा मी गजाभाऊ यांना सपशेल शरण जातो .आणि उदार मनाचे आणि (कंजूष खिशाचे ) गजाभाऊ दरवेळी मला मदत करतात.एकदा आमच्या बायकोने दस्तुरखुद्द- गजाभाऊ यांच्या पत्नीला -आमच्या वहिनींना त्या बेसावध असतांना विचारले ..काय हो वाहिनी ..हे गजाभाऊ ..तुम्हाला ..तुमचा नवरा म्हणून कसे वाटतात ? सांगा बरं आज ..झालं ...आपल्या दुर्दैवाची महा-कहाणी आम्हाला ऐकवण्याचा मोह वहिनींना आवरता आला नाही ..त्या क्षणी ..मी पाहिल्यान्न्दा आमच्या मित्राला -गजाभाऊला एवढे हताश होऊन बसलेले पाहिले.गदगदल्या -आवजात वहिनींना कंठ फुटला ..त्या बोलू लागल्या ...काय सांगू ग तुला .. माझा हा नवरा म्हणजे..जाऊ दे .. माझी अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्या सारखी झाली आहे.",तुला खूप वाटत असेल .गजाभाऊ .म्हणजे तुझ्या माहेरचा माणूस..तुला काय काय सांगू या माणसाबद्दल ..? ज्याचं जळतं त्यालाच कळतं बरं बाई ...! कशात काय नि फाटक्यात पाय .अशी झाली आहे मी ..आणि त्यांनी डोळे पुसत कहाणी कंटिन्यू केली...माझा हा नवरा ..गजाभाऊ .."मला पहा नि फुलं वाहा " असा आहे" नुसता बोलाचा भात -नि बोलाचीच कढी ".

अगं " बायकोचं मन ओळखण्याची रीतच नाहीये यांच्या खानदानात . माझ्यासारखी मरमर राबणारी "घरवाली मिळाली "मग काय, हे गावभर हिंडायला मोकळे . तुम्हाला म्हणून सांगते आज ..सकाळी बाहेर पडलेले गजाभाऊ ,घरी कवा येतील " भरवसा नसतो. माझा नवरा म्हणजे..बारा पिंपळावरचा मुंजा ".शोभतो.आमच्या वहिनींची हे दर्दभरी कैफियत आम्हाला अमान्य होण्या सारखी नव्हती . उलट गजाभाऊच्या हटवादी स्वभावाला कोणतेच औषध लागू पडत नसे म्हणून मोठ्या मनाच्या वाहिनी गप्प राहून संसार गदा चालवत होत्या .असो.रविवार हा किती आनंदाचा वार ..मौजमजेचा पण,माझ्या दृष्टीने "माझा घातवार ", मनातली कोणती ही गोष्ट हवेत उडवून लावणे, ही गोष्ट मनापसून करणारया बाईला - बायको, सौभाग्यवती , मंडळी, घरवाली "अशा अनेक नावाने संबोधले जाते. "नवरा निवांत असेल "- त्या क्षणी त्याच्यामागे काहीतरी शुक्ल-काष्ठ" लावून देणे हे "बायकोचे " आद्य-कर्तव्य असते. तिच्या मते ..नवरा म्हणजे..."देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने मिळवलेला हकाचा घरगडी असतो" ,जो हरघडी "- आपल्यामागे भुंग्या सारखा फ्हीर्त असतो. अशा नवर्याचे ..आपल्या प्रेमात भिर -भिरे " होऊ द्यावे.".आपापल्या संसारात स्वतःच्या हुशारीने (?) घर चालविणाऱ्या मैत्रिणींचे उपदेश ऐकणे ,बायकोचा आवडता छंद असतो .प्रत्येकीच्ने तिच्या -तिच्या नवर्या वर केलेले यशस्वी प्रयोग मग माझी बायको लगेच माझ्यावर करीत असते.तिची एक अनुभवी मैत्रीण म्हणते ..अगं - हा नवरा म्हणजे ..आवडता होयबा असतो " , त्याने आपल्याच मना प्रमाणे व्गावे असे तुला वाटत असेल तर.त्यासाठी "आपल्या सौंदर्याच्या मोहिनी अस्त्राचा वापर करून त्याला कायमच बेहोष ठेवायचं ", या बेहोशीत मिठीच्या ऐवजी मुठीत असला तरी तो खुश होतो. उलट या पद्धतीत आपला फायदाच फायदा आहे ", या होयबा -नवर्याच्या तोंडून कधी "नाही "हा शब्दच येत नाही." आहे कि नाही जादूचा प्रयोग..?

मैत्रिणीचा हा (प्रेमळ ) सल्ला दुर्दैवाने माझ्या बायकोला पटला नाहीच. आणि कसा पटेल ? तिच्या नजरे समोर तिच्या "जेलर -आईच्या शिस्तीचे कडक उदाहरण असतांना.. मैत्रिणीच्या प्रेमळ उपचाराची पद्धत आमच्या घरात येणे शक्य नव्हते .इथं तर .."मुठीतला नवरा , तो कायम समोरच्या स्टुलावर असायला हवा.अशा सध्या-सरळ पद्धतीवर भर होता ..आमच्या घरतला सुविचार .. नवरा म्हणजे ..बायकोच्या शब्दावर फक्त मान डोलावणारा..आणि नाही न म्हणणारा.."त्यामुळे झालयं काय..की ..माझ्या समोरच्या अनेक सुखी-आनंदी दिसणाऱ्या नवर्यांच्या अनेक वास्तव कहाण्या "माझ्या कानावरती येतच असतात. त्यामुळे आता मी एकच ठरवलंय ..आपण आनंदी आहोत ..असे मानायचे.कारण..नवरा म्हणजे ..बायकोचा आनंद असतो..मग उगाच तिला आपण का दुखवायचे ?

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED