प्रीतीची 'प्रेम'कथा

(57)
  • 137.5k
  • 20
  • 57k

१ सांगते ऐका! अर्थात मी : एक तपस्विनी! 'गुड मा‌ॅर्निंग! स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात!' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी मी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज!नुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणे! मला काय, मी झोपते! झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये

Full Novel

1

प्रीतीची 'प्रेम'कथा - 1

१ सांगते ऐका! अर्थात मी : एक तपस्विनी! 'गुड मा‌ॅर्निंग! स्वप्ने पहायला स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात!' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी मी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज!नुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणे! मला काय, मी झोपते! झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये ...अजून वाचा

2

प्रीतीची 'प्रेम'कथा - 2

2 सुरूवातीची सुरूवात! अर्थात प्रथम तुज पाहता अनंतराव घोरपडे म्हणजे तात्या.. म्हणजे वडील माझे. घोरपडे. रंगढंग प्रकाशनात तात्या सीनियर मॅनेजर आहेत. तात्यांचा मनुष्य संग्रह दांडगा. मनुष्य संग्रह हा शब्द तात्यांचाच! मला गंमत वाटते त्या शब्दाची. प्राणी संग्रहासारखा मनुष्य संग्रह! म्हणजे तात्या आॅफिसात न जाता कुठल्यातरी अशा जागेत जातात जिथे पिंजरेच पिंजरे आहेत.. नि एकेकात एकेक मनुष्यास ठेवण्यात आले आहे.. दोरीस बांधून! आई माझी घर चालवते. तात्यांचा संबंध पुस्तकांशी आहे तसा तिचा नाही. रोजचा पेपर एवढेच तिचे वाचन. आणि मी! पुस्तकांच्या पसाऱ्यात राहूनही चिखलातल्या कमळासारखी अलिप्त मी! अगदी बीए झाली मी पण वाचनाची काही आवड नाही मला. आमचे स्वामी ...अजून वाचा

3

प्रीतीची 'प्रेम'कथा - 3

३ पुढे काय? अर्थात वो कौन है? प्रेम म्हणतो शिक्षण आपल्याकडे जीवनाभिमुख नाही. जीवनाभिमुख काय कोणास ठाऊक. त्याला विचारले तर वर्ग घेतल्यासारखा लेक्चर देईल. त्यापेक्षा जाऊ देत. नसेल जीवनाभिमुख तर त्याला मी तरी काय करणार? पण एक आहे, तसे म्हणत ही त्याने घेतलेच ना ते शिक्षण तसे जीवनाभिमुख नसूनही. मग कशाला उगाच बडबडतो कोणाला ठाऊक. मी मात्र ते तसे नाही हे आधीच समजून उमजून जास्त शिक्षणाच्या वाटेलाच गेली नाही. उगाच जीवनाभिमुख की काय नसलेले शिक्षण कशाला? त्यापेक्षा मला व्यवहारी ज्ञान जास्त आहे. जगाच्या पाठीवर कुठेही ते उपयोगी पडेल.. हो की नाही? तर प्रेमला अशा खूप गोष्टी शिकायच्या ...अजून वाचा

4

प्रीतीची 'प्रेम'कथा - 4

४ तो सापडला? अर्थात तुंबाऱ्याची गोष्ट! सकारात्मक विचारांचा सकारात्मक फायदा लवकरच दिसला मला. त्या अजनबी राजकुमाराचे दर्शन वगैरे नाही, पण घरातच काही हिंट मिळाली मला. म्हणजे झाले असे की इतक्या दिवसात मला समोर असून दिसले कसे नाही कुणास ठाऊक! किंवा स्वामीजी म्हणतात तशी वेळ यावी लागते एखाद्या गोष्टीची! त्या दिवशी संध्याकाळी बसले होते बाहेरील झोपाळ्यावर झोके घेत. हवा सुटलेली जोराची. मनातही अर्थातच, तेच विचारांचे झोके! तात्या बाहेरून आले तेच घाईघाईत. घरात शिरले.. समोरच्या कपाटातून त्यांनी एक पुस्तक काढून बाहेर ठेवले आणि आईला म्हणाले, "अगं जातो मी लगेच. ते पुस्तक राहून गेलेय त्यादिवशी. ते देऊन येतो." माझ्या ...अजून वाचा

5

प्रीतीची 'प्रेम'कथा - 5

५ सकारात्मक! अर्थात प्रेमाकडे पहिले पाऊल! विचार केला तर वाटते आतापर्यंत झालेच काय माझ्या एकदा मी तो जो कुणी होता त्याला पाहिले अाणि आवडला मला तो. तो कोण कुठला.. कशाचा पत्ता नाही! यापेक्षा जास्त काहीच घडले नाही. पुढे तरी काही व्हावे की नाही? अर्थातच. काय आहे आपल्याकडे कधी आपण अशा अर्धवट गोष्टी सांगतो का? म्हणजे ज्यात काहीच घडले नाही अशा? अशा गोष्टी घडतातच, पण कुणी सांगत बसत नाही त्या. एखादी शोकांतिका असतेही पण तिच्यातही दु:खद का होईना, अंत असतोच. त्यामुळे मी सांगतेय ही गोष्ट म्हणजे तिला काही न काही शेवट असायचाच! 'दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर.' हा ...अजून वाचा

6

प्रीतीची 'प्रेम'कथा - 6

६ टर्निंग पाॅईंट !? अर्थात प्रेम की ओर? विचार केला मी तर वाटले प्रेमकथेतला हा सगळ्यात मोठा टर्निंग पाॅइंट म्हणावा! खरेतर इतके दिवस मी असेच घालवले. आता पुढे काहीतरी व्हायलाच हवे! तात्या त्याला भेटतील.. माझ्या मुलीला तुमचे पुस्तक इतके आवडले म्हणून सांगतील .. तो आपल्या या कदाचित एकुलत्या एक फॅनी ला भेटायची इच्छा व्यक्त करेल.. मी त्याला मग भेटेन.. इथवर तरी गोष्ट पुढे सरकायला हरकत नाही.. असा विचार करत मी 'प्रीती जगदाळे' अशी सही कशी करायची त्याची प्रॅक्टिस करायला लागले. ते कुठले गाणे आहे ना ते आठवत.. 'समझो हो ही गया!' आता तात्या काय खबर आणतात ते ...अजून वाचा

7

प्रीतीची 'प्रेम'कथा - 7

७ पहिली लढाई अर्थात प्रथम भेट! दोन दिवस गेले. भेटण्याची हुरहुर एकीकडे आणि होणार त्याचे टेन्शन दुसरीकडे. काय होणार पेक्षा सारे नीट होणार की नाही याचे टेन्शन! प्रेमने पुस्तकाबद्दल विचारले तर? मी त्याची फक्त प्रस्तावना वाचलेली तिच्या जोरावर काय काय बोलणार? अगदी परिसंवादात विचारल्यासारखे प्रश्न विचारले त्याने तर पुढे काय बोलणार मी? काय करावे नि कसे करावे? सकाळी स्वामीजींचे नाव घेतले नि म्हटले, आता होऊन जाऊ देत. आॅफिसात पोहोचली तर तिथे तात्या वाटच पाहात होते. मोठे टेबल. समोर दोन खुर्च्या. बाजूला फोन त्यांच्या. त्याच्याकडे पाहात बोलली मी, "तात्या, ते आलेत का?" अजून त्याला यायला एक तास ...अजून वाचा

8

प्रीतीची 'प्रेम'कथा - 8

८ काकुची मशाल अर्थात वन्ही तो चेतलाचि! हे सगळे झाले म्हणजे पुढे पटपट घडले असे वाटत असेल तर तसे नाही ते. तसा मला त्यादिवशी प्रेमचा नंबर, म्हणजे फोन नंबर मिळाला. माझा नंबर मी त्याला दिला. आमचे भेटून त्याच्या पुस्तकातील प्रकरणाबद्दल चर्चा करण्याचे ठरले. तात्यांच्या आॅफिसातून निघाले मी.. मला जणू गगनच ठेंगणे झाले. आता फक्त तीन चारदा भेटलो की काम तमाम! घरी आली मी ती तरंगतच. हवेतच उडत आली मी जणू.. आज मैं उपर .. आसमां नीचे गात! तात्या पण माझ्यावर खूश होते. .. पण आम्हा दोघांच्या खूश होण्याची कारणे मात्र वेगळी होती.. दोनचार दिवस गेले. मी ...अजून वाचा

9

प्रीतीची 'प्रेम'कथा - 9

९ प्रेमाचा शोध अर्थात प्रेप्रीप्रीबंस! आता पुढे काय करायचे यासाठी आमची 'प्रेमप्रीती समिती' स्थापन झाली! ही मूळ कल्पना माझीच. मागे काकुच्या वेळेस 'कांंकुजोजुस' म्हणजे 'कालिंदीकुंद जोडी जुळणी समिती' स्थापन केलेली मी. त्याची अध्यक्षा मीच होते! रीतसर बैठका घेऊन सारे घडवून आणलेले आम्ही. समिती तर स्थापन झाली परत. बातम्यांच्या भाषेत गठन झाली! बातम्यांची भाषा.. कारण मुकुंदा! तो'ज्वालाग्राही सर्वदा' चॅनेलमध्ये बातमीदार आहे. तर अशी बातम्यांची भाषा बोलतो तो. तो समितीचा अध्यक्ष आणि काकु कार्यवाह! ही समिती ही बाकी समित्यांसारखी! बैठका घेते नि निर्णय घेते.. मुकुंदाने सुरूवात केली, "आपल्या या 'प्रेप्रीप्रीबंस'च्या पहिल्या बैठकीत आपले स्वागत आहे. आज आपल्याकडे प्रीतीरंगाचा गहन ...अजून वाचा

10

प्रीतीची 'प्रेम'कथा - 10

१० भिंगारदिवे! अर्थात प्रेमानंदाचा अर्धा शोध! प्रकाशक भिंगारदिवे. साहित्य दिवे प्रकाशन! यांनी कसले लावलेले दिवे? आम्ही त्या अंधाऱ्या आॅफिसात पोहोचलो तेव्हा भिंगारदिवे बिझी होते म्हणे. म्हणजे बाहेर फक्त सांगितले आम्ही, "भिंगारदिवे साहेबांना भेटायचेय!" त्यावर उत्तर, "साहेब बिझी आहेत मिटींगीत. थांबावे लागेल." "आम्ही ज्वालाग्राही सर्वदाच्या रिपोर्टर.. मी मिस कालिंदी कुरतडकर आणि ही कॅमेरावुमन सुलताना पठाण. साइझवरून वाटत नसेल पठाण पण लग्नानंतर नाव बदलते त्यांच्यात पण.. होय की नाही गं." "सच कहा आपने मोहतरमा. पर लगता नहीं हमारा नसीब अच्छा है.. लगता नहीं साब हमें इंटरव्ह्यू देंगे." टीव्ही चॅनेल आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावर तो बाहेरचा तीन ताड उडाला. मी कॅमेरावरून ...अजून वाचा

11

प्रीतीची 'प्रेम'कथा - 11

११ परत भिंगारदिवे! अर्थात आॅपरेशन प्रेम! सकाळी मिलिंदा, काकु नि बुरख्यातली मी तिघेही त्या साहित्य दिवे प्रकाशनातल्या भिंगारदिव्याला भेटायला. आज भिंगारदिवेचा उशीरा येण्याचा बेत होता. बाहेरचा तो माणूस म्हणाला तसा नि माझ्याकडे पाहून म्हणाला, "बोलवून घेऊ ना त्यांना. सांगतो चॅनेलचे लोक आलेत." मिलिंदा म्हणाला, "ठीक. आम्ही थांबतो थोडा वेळ." तो फोन करायला आत गेला. कालिंदी म्हणाली, "हमे है बेसब्रीसे इंतजार की आएंगो वो.. पण इधर भटके उधर भटके.. वो देते हैं खो!" "आता खो खो हसते मी.." "सुलताना.. तमीजसे बात करो! पठाणसाहिबा!" मी चपापून गप्प झाली. न जाणो भिंगारदिवा उगवला अचानक तर. तो आतला माणूस येताना दिसताच ...अजून वाचा

12

प्रीतीची 'प्रेम'कथा - 12

१२ जगदाळे.. अर्थात कांदेपोहे! घरी आली तर आई वाटच बघितल्यासारखी उभी होती. म्हणाली, झाले बाई तू आलीस. तुझीच वाट पाहात होते." "जेवायला?" "नाही. तुझ्या तात्यांचा फोन होता. कुणीतरी येणार आहेत पाहुणे." "हुं.. परत कुणी लेखक असेल. खाईल श्रीखंड पुरी आणि होईल बेपत्ता!" मी प्रेमवरचा राग असा काढेन असे मलाही वाटले नव्हते! पण तो आपोआप निघाला! "पण आई येणार आहे कोण?" "अगं कुणी आहेत पाव्हणे. तुला बघायला येणार आहेत." "मला? आणि बघायला? मी काय शोकेसमधली बाहुली आहे?" "अगं, तुझ्या वयातल्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या आणि तुझा कशाचाच पत्ता नाही!" आहे! पत्ता आहे! आणि माझ्याजवळ त्याचा पत्ताही आहे! ...अजून वाचा

13

प्रीतीची 'प्रेम'कथा - 13

१३ शोधू कुठे तुला? अर्थात पुनश्च शोध! पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी मिठी सैल झाली.. मला जाग आली तेव्हा स्वप्नात हे गाणे सुरू होते! मी उठली तीच लाजत. आज आता लवकरच निघावयास हवे. प्रेमच्या शोधात आणि प्रेमाच्याही शोधात! लवकर घराबाहेर पडणे गरजेचे, नाहीतर नवीन काही काम काढले आईने तर अडकून पडेन मी. मी तयारीला लागली. पत्ता थोडा दूरचा होता. पण प्रेमासाठी कुणी सात समुद्रापार पण जाऊ शकतात तर हे अंतर तर काहीच नाही! परत आल्यावर म्हणण्याचे गाणे पण निवडून ठेवले मी.. 'इतना तो याद है मुझे की उनसे मुलाकात हुई..' 'सात समुंदर पार मैं तेरे ...अजून वाचा

14

प्रीतीची 'प्रेम'कथा - 14

१४ सापडला एकदाचा अर्थात दिवस मुलाखतीचा! मी निघाली. तोच काकुची मागून हाक आली. "प्री थांब!" मी थबकली तशी म्हणाली, "मी पण येतेय काकांकडे. तू त्यांना काय सांगशील? मीच बोलते." "ठीक. पण भिंदि आला तर तिकडे?" "तो काय संताजी धनाजी आहे इतिहासातला की तो राक्षस आहे खायला? मी बोलते काकांशी. बघू मग. आणि काय तो भिंदि सर्व संचारी ईश्वर आहे की काय?" "बरे चल." "आलेच. तयार होऊन." तात्यांच्या आॅफिसात आलो तर तात्या चकित झाले. त्यात कालिंदीला पाहून तर अजूनच! "काय इकडे कुठे स्वारी?" "स्वारी नाही, साॅरी तात्या.. हिचे काही काम होते. काल आलेली ना.. तिला म्हटले मी.. आॅफिसचे ...अजून वाचा

15

प्रीतीची 'प्रेम'कथा - 15

१५ मीठू मीठू अर्थात पहिला प्रेम संवाद घरी आले तोवर मनातले हिशेब करून होते. सारे काही सकारात्मक. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे. या विद्रोहीचा कशात विश्वास नाही म्हणे. आणि ते सीनियर जगदाळे .. बहुधा त्याच्यासाठीच शोधत बसलेत मुलगी! हे असेच असावे. बापाला आपल्या मुलाची ज्वालाग्राही मते ठाऊक असणार. म्हणूनच त्यांनी त्यादिवशी मुलाबद्दल काहीच सांगितले नसणार! किंवा भिंदि आणि तात्यांना ठाऊक असेल का? कोणास ठाऊक! आई म्हणाली, "तात्या भेटले? " "हुं" "काय म्हणाले?" "तात्या? कशाबद्दल?" "जगदाळेंबद्दल. ते स्थळ आलेले त्याबद्दल?" "मला? मला काहीच नाही बोलले." इतक्यात तात्याच आले घरी. उत्साहात होते. म्हटले काय झाले असावे? भिंदि.. जगदाळे .. चांगला मूड.. ...अजून वाचा

16

प्रीतीची 'प्रेम'कथा - 16

१६ प्रेम वि. पूर्णा अर्थात उज्ज्वल परवासाठी! आजचा दिवस महत्त्वाचा! संध्याकाळी कळेल, तो आहे की तो तो नव्हेच ते! असेल ते असो.. सकारात्मक की नकारात्मक विचार करण्याची प्रक्रिया सध्या बंद केलेली बरी! जे जे होईल ते ते पहावे आणि काय! पण सकाळी काकुचा फोन आला. म्हणाली, "कुठून तरी भिंदिला नंबर मिळाला माझा.." "मग?" "मग काय.. बोलली मी त्या चॅनेलला दिलेय रेकॉर्डिंग.." "संपला विषय मग!" "नाही. विषय संपतोय कुठे इथे.. इथेच तर सुरू होतोय.." "म्हणजे?" "तो विचारत होता.. जुळ्या बहिणीचे खरे नाव काय?" "मग तू काय सांगितलेस?" "काहीच नाही.. तू मालिनी ठेवलेलेस.. खोट्या बहिणीचे.. ते खोटे की ...अजून वाचा

17

प्रीतीची 'प्रेम'कथा - 17

१७ पूर्णानंदाशी भेट अर्थात एकच लक्ष्य: प्रेमचे प्रेम! उगवत्या दिवसाचा उगवता सूर्य कसल्या आयडिया येईल? मी रात्रभर विचार करायचा प्रयत्न केलेला. पूर्णानंदास कसे गाठावे? भिंदिच्या नकळत? नि कदाचित त्या जगदाळे काकांच्याही नकळत. माझे डोके चालेना. पण मिलिंदाने काही तरी डोके लढवले असेल रात्रीतून तर.. असेल नाही .. असायलाच हवे. सकाळी काकुला फोन लावला. ती म्हणाली, "भिऊ नकोस मुली मी तुझ्या पाठीशी आहे." म्हटले, "नुसती पाठीशी राहून काय फायदा.. मिलिंदाला काही तरकीब सुचली की नाही?" "अर्थातच .. तो माझा मिलिंदा आहे! तू ये. सांगते. हम करेंगे तुम्हारे आनेका इंतजार.. करो बहन हमपर तुम ऐतबार.. ये लवकर." मी ...अजून वाचा

18

प्रीतीची 'प्रेम'कथा - 18

१८ समोवार अर्थात भेट तुझी माझी! आता कामाला लागावे म्हणजे काय करावे? उपाय आहे.. प्रेमला फोन करणे. बोलण्यात गुंगवणे आणि त्याच्याशी भेट पदरात पाडून घेणे. त्याचे ते दुसरे पुस्तक हाच माझा पासपोर्ट! तो वापरून पुढच्या हालचाली करायला हव्यात. सकाळी फोन लावला त्याला. घेतला ही त्याने. रंगढंग प्रकाशनाचे रंग डायरेक्ट पुसत म्हणाली, "प्रीती बोलतेय. खूप दिवसात बोलणे नाही झाले." "ओह.. मला वाटते आपण दोन तीन दिवसांआधीच बोललोय.." अरसिक! इथे मी क्षण न क्षण मोजते नि हा दोन तीन दिवस असे म्हणतो जणू दोन तीन मिनिटच असावेत. निर्दयी दिसतोय. "हो ना. कुठवर आले लिखाण? तुम्हा लेखकांचे एक बरे ...अजून वाचा

19

प्रीतीची 'प्रेम'कथा - 19

१९ हवेत उडते मी अर्थात भेटी आणि गाठी! आज फिर मिलने का इरादा है.. फिर जीने की तमन्ना है.. गाफीलपणे मी गुणगुणत असतानाच आई आली मागून. "काय गं, आज पण जायचेय.. मुक्ताकडे?" "हुं.. कदाचित!" "असेच..?" "नाही गं. तिला कसली मदत हवीय अभ्यासात.." आई काहीच बोलली नाही. हे संध्याकाळी बाहेर जायचे प्रकरण सोडवायला हवे! हे म्हणायला नि कालिंदीचा फोन यायला एकच गाठ पडली. तिच्याशी बोलता बोलता एक आयडिया सुचली मला! आणि दुपारपर्यत मी मिलिंदाच्या आॅफिसात संध्याकाळी पाच ते नऊ अशा पार्ट टाइम जाॅबला लागले! असा कसा हा जाॅब? हा प्रश्न आताही पडतो, तेव्हाही इतरांना पडला पण प्रेमातुराणां मला ...अजून वाचा

20

प्रीतीची 'प्रेम'कथा - 20

२० घडणारे ना टळते अर्थात प्रेमचा धक्का! घरी आली मी. तात्या घरी आधीच काहीच बोलले नाहीत म्हणून जीव भांड्यात पडला. आता फक्त उद्याची चिंता! प्रेम काय सांगणार आहे? मुन्नाभाईच्या त्या सिनेमासारखे म्हणाली मी स्वतःलाच, काय सांगणार तू ते ठाऊक आहे मला.. पण कसे सांगणारेस तेच पहायचेय मला! आज रात्री झोप नाही यायची मला. रात्रीची झोप उडवणाऱ्या माझ्या प्रेमा.. किती रे छळशील तू.. जिवलगा? रात्रभर जागीच होती मी. पहाटे डोळा लागला. स्वप्न पहायची खोड माझी .. ते मी जागेपणीच पाहून घेतलेले. उठली तोवर उशीर झालेला. घरी शांतता होती. तात्या निघून गेलेले. आई कामात. कालिंदीला फोन केला, कालच्या स्ट्राॅबेरीबद्दल ...अजून वाचा

21

प्रीतीची 'प्रेम'कथा - 21

२१ जय मंचरजी अर्थात प्रेमला धक्का! पुढे दोन तीन का कितीतरी दिवस असेच असेच म्हणजे कसे विचारू नका. एकेक दिवस खायला उठायचा. संध्याकाळी उगाच बाहेर पडायलाच हवे. नाहीतर त्या जाॅबचे काय झाले विचारेल आई. मिलिंदा मेसेज पाठवायचा, 'समस्या हल करनेकी हमारी हर संभव कोशिशें जारी हैं. कृपया सहयोग करें.' एकतर त्याचा बाॅस बाहेर गेलेला म्हणे. तो येईतोवर काहीच करणे शक्य नाही. मग काही विरह गीते ऐकत पडून राहायची मी. संध्याकाळी कालिंदीकडे जाऊन वेळ घालवायचा. हे किती दिवस चालणार? न जाने क्यूं होता है ये जिंदगी के साथ.. अचानक ये मन.. लेकरके उसकी याद.. छोटी छोटीसी बात.. त्याच्या ...अजून वाचा

22

प्रीतीची 'प्रेम'कथा - 22

२२ असे झालेच कसे? अर्थात भिंदिची करामत! प्रेमचा निरोप घेत मी निघाली. नवीन पर्व सुरू आता आयुष्यात. त्यावर विश्वासच बसत नव्हता. यावेळी मात्र मी स्वतःला नाही काढला चिमटा. कितीही विचार केला तरी काय झाले, कसे झाले ते पचवणे कठीण होते! म्हणजे अगदी मनासारखे झाले तरी पण मनात शंका! स्वामीजी म्हणतात ते खरेय, मनाला शांती म्हणून मिळू देत नाही माणूस! आधी हवे ते मिळत नाही म्हणून आणि आता हवे ते मिळाले .. ते कसे काय मिळाले म्हणून! आज जे घडले, त्याच साठी केला होता अट्टाहास. आता मिळाले तर त्याबद्दल शंका! भिंदि आला, प्रेमला घेऊन आणि मध्येच स्वतःच गुल ...अजून वाचा

23

प्रीतीची 'प्रेम'कथा - 23

२३ सुरूवातीचा शेवट अर्थात घोड्याची गंगेत अंघोळ! 'गुड मा‌ॅर्निंग! स्वप्ने पहायला शिका. झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात!' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी मी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज!नुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणे! मला काय, मी झोपते! झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये म्हणून ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय