एक बार आजा आजा आजा आजा आजा…. एक बार आजा आजा आजा आजा आजा.... "ओ फोन वाजतोय तुमचा" अनिल च्या श्रीमती म्हणजे सविता अनिल गोरे चपात्या लाटता लाटताच केकाळल्या. पोटावरची गोधडी तोंडावर ओढत "कोण हे बघ" अनिल झोपेतच बोलला. “सकाळी उठून मर मर मरा, पोरंबाळं बघा, यांना गिळायला बनवा आणि यांचा फोन पण बघा, आणि काय मेली ती कॉलर टून ठेवलीय एक बार आजा... जस काय आयकून कॉलनीतल्या सगळ्या पोरी यांच्याकडंच पळत सुटणारयेत... आहो शार्दूल हे” "जाऊदे कट कर अन सायलेंट वर टाक त्याला" "कोणाला? "अग माझ्या आई फोनला अन जमलं तर तुझ्या तोंडालापण" "मला काय हौस नाही आली

नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday

1

आजारांचं फॅशन - 1

एक बार आजा आजा आजा आजा आजा…. एक बार आजा आजा आजा आजा आजा.... "ओ फोन वाजतोय तुमचा" च्या श्रीमती म्हणजे सविता अनिल गोरे चपात्या लाटता लाटताच केकाळल्या. पोटावरची गोधडी तोंडावर ओढत "कोण हे बघ" अनिल झोपेतच बोलला. “सकाळी उठून मर मर मरा, पोरंबाळं बघा, यांना गिळायला बनवा आणि यांचा फोन पण बघा, आणि काय मेली ती कॉलर टून ठेवलीय एक बार आजा... जस काय आयकून कॉलनीतल्या सगळ्या पोरी यांच्याकडंच पळत सुटणारयेत... आहो शार्दूल हे” "जाऊदे कट कर अन सायलेंट वर टाक त्याला" "कोणाला? "अग माझ्या आई फोनला अन जमलं तर तुझ्या तोंडालापण" "मला काय हौस नाही आली ...अजून वाचा

2

आजारांचं फॅशन - 2

अनिलच्या घरापासून मनोज कापडणेचे घर फार फार तर २०० ते ३०० मीटर अंतरावर आणि मधे नाका, जिथे मित्र मंडळी चहाच्या टपरीवर स्वतःच्या घरातल्या तेल मिठा पासून ते डोनाल्ड ट्रम्प च्या घराच्या विटापर्यँत जेवढ्या शक्य तेवढ्या गप्पा मारत बसायचे. अनिल नाक्याजवळ पोहोचला आणि पहिली गोष्ट त्याच्या नजरेला पडली ती म्हणजे १० बाय १५ फुटाचा एक मोठा मनोज कापडणेचा हसरा फोटो लावलेला श्रद्धांजलीचा बॅनर, 'भावा सारखा मित्र हरपला, असा कसा हसता हसता सोडून गेलास, भावा तू परत ये' 'मनोज कापडणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली' बॅनर वरचा मनोजचा हसरा चेहरा आणि लिहिलेले काळे अक्षर वाचून अनिलचा चेहरा पांढरा ठप्प पडला. "ये आन्या" अनिल ...अजून वाचा

3

आजारांचं फॅशन - 3

अनिल देखील मित्रां सोबत बाहेर पडला, बाकीचे सगळे काही ना काही एकमेकां सोबत बोलत होते पण अनिल मात्र शांत चालत होता. "गोरे साहेब काही तरी करा आता, डोकं पकडलंय, थोडी थोडी मारली पाहिजेल" घोरणे पप्या अनिलच्या खांद्यावर हात टाकत अनिलला बोलला. "मी का करू, लग्नाला आलायस का माझ्या" अनिल ने पप्याचा हात खांद्यावरून झटकत तिखट टोला मारला. "एक काम करा सगळे काढा ना थोडे थोडे पैसे, ये निक्या तुझ्या कड किती आहेत" शार्दूल ने निखिल बहिरे कडे बघत जगातला सगळ्यात अवघड प्रश्न निखिलला विचारला. "अरे मयताला काय पैसे घेऊन येत का कोण?" निखिल बहिरे कडे पैसे न काढण्यासाठी प्रत्येक ...अजून वाचा

4

आजारांचं फॅशन - 4

दोन दोन म्हणता म्हणता सहा सात पेग झाले पण मन अजून काय भरेना, चार वाजेला सुरु केलेला कार्यक्रम आठ तरी संपेना. “ये झालो हँग आता, मी चाललो घरी” अनिल ने शेवटचा घोट घेत आपला विचार किंबहुना निर्णय जाहीर केला. “अरे थांब आम्ही पण येतोय, आम्ही काय इथं राहायला आलोय का” घोरणे पप्या अनिलच्या खांद्यावर हात टाकत बोलला. “ये हे घे माझे पाचशे, तुम्ही इथं राहा, झोपा नाही तर खड्ड्यात जा मी चाललो” एवढं बोलून अनिल उठला आणि दात कोरत बाहेर येऊन रिक्षा थांबवली आणि सरळ घराकडे निघून गेला. पुढील दहा बारा मिनिटात रिक्षा अनिलच्या घराजवळ येऊन थांबली, अनिलने रिक्षाचे ...अजून वाचा

5

आजारांचं फॅशन - 5

सकाळी साडे नऊ दहाच्या सुमारास अनिलचे डोळे उघडले, अनिल छातीला हात लावूनच उठला, आता ही नुसती दुखण्याची भीती किंवा कदाचित छातीत दुखतही असेल, रात्रीची दारू आणि अबरचबर खाणं ह्या मुळे ऍसिडिटी तर होणारच ना, पण अनिलला साधी ऍसिडिटी देखील सिरीयस हार्ट अटॅक आहे असे वाटणे म्हणजे त्याच्या स्वभावाचा एक अविभाज्य घटक, अनिल बेड वरून उठला सरळ बाथरूम मध्ये गेला आणि दहा बारा मिनिटांमध्येच अंघोळ वैगेरे आटपून बाहेर आला, देव्हाऱ्या समोर जाऊन पूजा केली, आपल्या विशिष्ट शैलीत देवाच्या पाया पडला आणि सरळ पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेला, अनिलने असे कुठे तरी ऐकले होते की अंघोळ केल्या नंतर पाणी पिल्याने ब्लड ...अजून वाचा

6

आजारांचं फॅशन - 6

अनिल गॅरेज वर पोहोचत नाही तर त्याचा एक कस्टमर जयराम पाटील आणि त्याचे कामगार त्याची वाट बघत होते. “अरे किती वेळ, कधीपासून वाट बघतोय” “काय झालं राव परत काय झालं का? “अरे गियर टाकायला प्रॉब्लेम होतोय, गियर अटकतायत” अनिल गाडीत बसला आणि चेक करायला लागला आणि गाडीत बसूनच बोलला. “साहेब क्लच प्लेट गेलीय” “नक्की? जयराम पाटलाने विचारले. “हजार टक्के, आत्ताच बदलून घ्या नाहीतर कुठे तरी रस्त्यात फसाल” अनिल गाडीतून उतरत उतरत बोलला. अनिल आपल्या कामात खूप तरबेज होता, त्याला सगळे लोक गाड्यांचा डॉक्टर बोलत, नुसतं एक वेळा बघून गाडीचा त्रास अचूक सांगणं आणि हात लावला की गाडी नीट केल्याशिवाय ...अजून वाचा

7

आजारांचं फॅशन - 7

“ओ जेवायला वाढू का” सविताने किचन मधून आवाज दिला. अनिलचे लक्षच नव्हते, त्याला सविताचा आवाज किंबहुना ऎकायला आलेला नसावा. सविता स्वतःच्या ओढणीला हात पुसत बाहेर आली आणि अनिलला बघून समजून चुकली कि काय सुरु आहे ते. “काय झालं ओ, आता तर नीट होते” सविताने अनिलच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवून विचारले. अनिलने मान सविताकडे फिरवली आणि दबक्या आवाजात बोलला. “छातीत दुखतंय डाव्या बाजूला” “काही नाही ऍसिडिटी असल, ऍसिडिटीची गोळी खा अन जेवून घ्या” सविताने खूप प्रेमाने आणि आपुलकीने सांगितले. “दे एक गोळी त्या डब्यातून” अनिलच्या औषधांचा एक वेगळा डबाच होता, त्यात खोकल्याच्या, सर्दीच्या, ऍसिडिटीचा, बी पी च्या, पोट दुखण्याच्या, जेवण ...अजून वाचा

8

आजारांचं फॅशन - 8

अनिलच्या जीवात जीव आला, त्याने लगेच फोन काढून सविताला सगळं नॉर्मल आहे सांगत बाईक काढली आणि औषध घेऊन सरळ गेला. सविता बिचारी जागीच होती आणि अनिलची वाट बघत होती, दार वाजलं रात्रीचे दिड वाजले होते, तिला माहित होते अनिलच असणार तरी ती आतून बोलली, “कोण हे? “अग मीच आहे, एवढ्या रात्रीच कोण असणार हे? सविताने दरवाजा उघडून पहिला प्रश्न विचारला “काय बोलले डॉक्टर? ऍसिडिटी? “हं” अनिल कपडे काढता काढता तोंडातल्या तोंडात बोलला “मी सांगत होते काही नसल तरी स्वतःची पण अन दुसऱ्यांची पण झोप खराब केली, झोपा आता शांत” सविता बेडवर आडवी होत बोलली अनिलने देखील गोळ्या खाल्ल्या आणि ...अजून वाचा

9

आजारांचं फॅशन - 9

अनिल जायला निघाला तेवढ्यात डॉक्टरने अनिलला आवाज देऊन कागदावर एक गोळी लिहली आणि ही गोळी जरा दहा दिवस झोपताना जरा डोकं शांत राहायला मदत होईल असे सांगितले. अनिलने बाहेरजाऊन औषधiच्या दुकानातून गोळी घेतली आणि थोडे पाणी मागून अडवाणी डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांचा पहिला डोस तिथेच घेतला आणि गाडीला किक मारून गॅरेजकडे जाण्यास निघाला. नॉर्मल इ सी जि आणि अडवाणी डॉक्टरच्या बोलण्यामुळे अनिल कालपेक्षा आज खूपच चांगल्या मनःस्थितीत होता, रस्त्यातून जाताना चहाच्या टपरीवर नजर मारली तर शार्दूल आणि निखिल बहिरे उभे होते, निखिलने अनिलला आवाज दिला, “ओ गोरे साहेब” अनिल असाही थांबणारच होता आणि थांबला देखील, बाईक साईड स्टॅण्डवर उभी करून ...अजून वाचा

10

आजारांचं फॅशन - 10

अंघोळ वैगेरे आणि नाश्ता पाणी आटपून अनिल खोकत शिंकत गॅरेजवर गेला, एखादा तास भर थांबला आणि छोटूला बोलला, खूप खोकला झालाय डॉक्टर कडे जाऊन आलो, छोटूसाठी देखील अनिलच आजारपण आणि डॉक्टरच्या वाऱ्या नवीन नव्हत्या. “आज काय झालं अनिल? डॉक्टर अडवाणी खुर्चीवर डुलत डुलत बोलले “खूप सर्दी आणि खूप खोकला आहे सकाळपासून” “अच्छा अजून काही? डॉक्टरांनी नेहमीच्या शैलीत विचारलं “नाही अजून काही नाही” अनिलने हळूच उत्तर दिले डॉक्टरांनी स्वतःजवळची काही औषधें दिली आणि दोन औषधें बाहेरची लिहून दिली आणि कशी घायची ते समजावले. अनिल औषधें घेऊन सरळ घरी गेला. “अरे आज तुम्ही दुपारीच घरी, तब्येत ठीक आहे ना” सविता ने ...अजून वाचा

11

आजारांचं फॅशन - 11

डॉक्टरने एक्सरेची चिट्ठी अनिलच्या हातात देत अनिलला यायला आणि फी बाहेर द्यायला सांगितले. अनिल क्लीनिकच्या बाहेर येऊन केमिस्ट शॉप औषध घेण्यासाठी गेला, औषध घेता घेता तो कसला तरी विचार करत होता, कोण जाणे त्याच्या मनात काय आले आणि अचानक त्याने औषध देणाऱ्या मुलाला एक्सरे ची चिट्ठी दाखवत ते एक्सरे सेंटर कुठे आहे ते विचारलं “ते काय समोरच्या बिल्डिंग मध्ये” अनिलने मागचा पुढचा विचार न करता सरळ एक्सरे सेंटर वर गेला, डॉक्टरने जरी त्याला दोन दिवस खोकला कसा आहे हे बघायला सांगितले होते तरी एवढा धीर धरेल तर ते अनिलच डोकंच कसलं. “एक्सरे काढायचंय” अनिल हातातली चिट्ठी रिसेप्शन वर बसलेल्या ...अजून वाचा

12

आजारांचं फॅशन - 12

रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान अनिल घरी पोहचला, मुले झोपली होती आणि सविता टी व्ही वर काही तरी कार्यक्रम होती, अनिलने दार वाजवले, दरवाजा उघडला, अनिल आत जाण्या आधी दारूच्या वासाने गृहप्रवेश केला, सविताचा चेहरा सरस्वती पासून चंडिके मध्ये क्षणात परिवर्तित झाला. एखादी गाडी कशी पहिल्या गियर पासून दुसरा, मग तिसरा आणि मग चौथ्या गियर मध्ये हळू हळू वेग वाढवते, तसा सविताचा पहिला गियर पडला. "आलेना पिऊन? खोकला झालाय ना, दहा वेळा डॉक्टरचा उंबरा झिजविला, दारू घश्यात वत्तांना नई आला का खोकला, काय मेल नशीब माझं, दोन दिवस हा माणूस सुखानी जगून देत नई, एक दोन दिवस नई पीलिका ...अजून वाचा

13

आजारांचं फॅशन - 13

"बसा गोरे साहेब बसा" निखिल बहिरेने अनिल साठी बाजूने खुर्ची ओढत बोलला. " नई नई तुम्ही चालू द्या, मी घेणार, बाळ्याला भेटतो अन जातो मी" "अरे एक पेग मार अन जा भेटून त्याला, त्याला किती वाईट वाटल तू नई पिला तर" घोरणे पप्या शेंगदाण्याचे दाणे तोंडात टाकत बोलला "त्याला काही नई वाईट बिट वाटत, तू राहूदे" अनिल ने खुर्चीवर बसत उत्तर दिले "अरे आता बसलायस तर घे एक पेग, काय नई कळत घरी एक पेग नि' शार्दूल ग्लास भरत भरत बोलला. आता मैफिल रंगलेली होती, सगळे मित्र जमा झालेले होते, बाजूला डि जे वर गाणे वाजत होते आणि महत्वाचं ...अजून वाचा

14

आजारांचं फॅशन - 14

सविता निघून गेल्यानंतर अनिल पाच मिनिटे बेडवर शांत बसून स्वतःशीच पुटपुटत होता “बर झाली गेली कटकट, सुटलो एकदाचा, आता घासत जरी आली ना तरी दारात पाय पण नई ठेवू देणार, अन येऊद्या त्या तिच्या आईला मला काय विचारायला दाखवतोच तिला बरोबर, म्हातारिणीच फुगवलंय हिला म्हणून एवढी भुकतीय” अनिल ताडकन उठून उभा राहिला, पॅन्टच्या खिश्यात हात घालून पैसे काढून मोजले, पैसे परत खिशात ठेवून पॅन्ट घातली, शर्ट अंगावर चढवून शर्टचे बटन लावत लावतच घरा बाहेर पडला आणि मागे पुढे न बघता तडक वाईन शॉपला जाऊन स्वारी थांबली आणि क्षण भर पण वाया न घालवता खिश्यातुन दोनशे रुपय काढत काउंटर वर ...अजून वाचा

15

आजारांचं फॅशन - 15

गॅरेज जवळच्या हॉटेल मध्ये जाऊन त्याने मिळेल ते खाऊन पोट भरले आणि कामाला लागला. दिवसभर काम करता करता त्याने वेळा फोन खिशातून काढला आणि परत ठेवला, जणू काही तो सविताच्या फोनची वाट बघत होता. रात्री थकून भागून घरी गेला, दार वाजवले, आणि क्षणात लक्षात आले घरात कोणी नाही, कुलूप उघडून घरात गेला, स्वतःच्या हाताने पाणी घेतले, सोफ्यावर बसला आणि पाणी पिता पिता संपूर्ण घर नेहाळायला लागला, खाली घर आ वासून खायला उठत होत, दोन घटका देखील घरात थांबूशी वाटत नव्हतं, थोडा वेळ तसाच एखाद्या पुतळ्या सारखा बसला आणि मग डोक्यात जेवणाचा विचार आला, तो सकाळी खाल्लेल्या एका मिसळ आणि ...अजून वाचा

16

आजारांचं फॅशन - 16

“तुम्हाला असं का वाटतं मनोचिकित्सक डॉक्टर हे वेड्यांचे डॉक्टर असतात, आपण ज्या जगात जगतो आणि आपली सध्याची जी जीवन आहे त्या मुळे स्ट्रेस, डिप्रेशन, निद्रानाश, वैगेरे, वैगेरे असे खूप मानसिक आजार होणे स्वाभाविकच आहे, म्हणून आपण वेडे झालो असा समजच मुळात चुकीचा आहे, माझे ऐक मी तुला एक चांगल्या डॉक्टरांची चिट्ठी देतो त्यांना जाऊन भेट, डॉक्टर खूप चांगल्या आहेत, तुझा त्रास पूर्णपणे ठीक करतील” डॉक्टरांनी बोलता बोलता एका प्रिस्क्रिप्शन पेपर वर डॉक्टर सिंधू माधव यांचे नाव आणि नंबर लिहून अनिलकडे दिले आणि त्यांना उद्याच भेट असे त्याला बजावून सांगितले. आधीच सविताच सोडून जाण अनिलला आतून पोखरत होतं ...अजून वाचा

17

आजारांचं फॅशन - 17

डॉक्टरांना अनिलच्या त्रास लक्षात आला आणि अनिल ला सहानुभूतीच्या स्वरात विचारले “हा तुमचा स्वभाव असा का आहे तुम्हाला माहित का? डॉक्टरच्या प्रश्नाला अनिलने मान हलवूनच नकार दिला. “तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते? “नाही अजिबात नाही, आहो लई इंजेक्शन मारून घेतलेत मी” अनिलने अभिमानाने चटकन उत्तर दिले. “पण मला किती तरी लहान मोठे असे लोक माहित आहे कि ज्यांना इंजेक्शनची खूप भीती वाटते, किंबहुना इंजेक्शनच्या नावानेच त्यांना रडू येते” डॉक्टर आपले बोलणे संपवतच होत्या त्या आधीच अनिल मधेच बोलला “त्यात काय घाबरायचं अन रडायचं इंजेक्शननि काय मरतंय व्हय कोण” “एकदम बरोबर अशीच काही प्रतिक्रिया तुमच्या बद्दल हि कुणाची असू शकते, खोकला ...अजून वाचा

18

आजारांचं फॅशन - 18

डॉक्टरांनी पेपरवर काही औषधें देखील लिहली आणि ती कसे घायचे ते अनिलला समजावून सांगितले, अनिलने डॉक्टरांची फी विचारून पैसे आणि क्लीनिकच्या बाहेर पडला. ह्या वेळेस अनिलने मनाशी एकदम पक्क केलं की डॉक्टरने जे काही सांगितलं ते आचरणात आणायचे आणि सगळे औषधें वेळेवर आणि पूर्णपणे घायचे. औषध बाजूच्या फार्मसी मधून विकत घेऊन अनिल बाईक जवळ आला, औषधांची पिशवी खिशात खोचली आणि बाईक वर टांग टाकून एका किक मधेच बाईक सुरु करून क्षणात तिकडून निघाला, बाईक रस्त्यावरून आज जरा धीम्या गतीनेच चालत होती, अनिल आजूबाजूंच्या झाडा झुडपांना, दुकानांना, रस्त्यावरून चाललेल्या बस, कार, बाईक खूप न्याहाळून पाहत होता, त्याच्या डोक्यात वेगळेच विचार ...अजून वाचा

19

आजारांचं फॅशन - 19

त्या दिवशी अनिलने मनाशी पक्कं ठरवलं की आता दारूचा सहारा घ्यायचा नाही आणि खरंच हे डोक्याचं बिघडलेलं इंजिन आता करायचं, ह्या सगळ्या पाठी त्याचा वैयक्तिक वैद्यकीय फायदा तर होताच पण त्याला सविताला परत आणायचं होत, आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट बसवायची होती, त्याला मना पासून मुलांची आणि सविताची गरज होती, ते हि लगेच, कारण सायकोलॉजिकल औषध लगेच काम करत नाही त्याला थोडा वेळ किंबहुना दिवस लागतात आपला प्रभाव जाणवण्यात, आणि त्यात दारू बंद केल्या मुळे, अचानक सोडलेल्या कारणाने जाणवणारे नकारत्मक लक्षणं, ह्या सगळ्यात कुणी तरी आपलंस आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आणि अनिवार्य असत, पण अनिलने हे ...अजून वाचा

20

आजारांचं फॅशन - 20

व्हाईट कोट सिन्ड्रोम एक नवीन नाव, एक नवीन आजार अनिलला माहित पडला, हायपोकॉन्ड्रियाक माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य असत त्यांना आजाराच्या तळा गळाशी जाऊन त्याची माहिती घेण्याची सवयी असते आणि आज कालच्या इंटरनेट युगात हि माहिती इंटरनेटवर खूप सहज आणि मोफत उपलब्ध असते, आणि अश्या माहिती शोधण्याच्या सवयीचा त्यांना फायद्या पेक्षा तोटाच जास्त असतो, कारण इंटरनेट वर जी माहिती असते ती बहुतांशी वेळा खूप वाढवून चढवून आणि आजाराला खूप मोठं करून लिहलेली असते आणि त्या मुळे डोक्यामध्ये माहिती पेक्षा भीतीच खूप भरली जाते, म्हणून अश्या पेशन्टने इंटरनेट वरील माहिती वाचणं टाळणं आणि काहीही प्रश्न असतील तर त्यांची उत्तर आपल्या डॉक्टरला ...अजून वाचा

21

आजारांचं फॅशन - 21

काही दिवसा नंतर अनिल पुन्हा एकदा डॉक्टरांला भेटायला गेला. "कसे आहात आत्ता, काही फरक जाणवतोय का? डॉक्टरने स्मित हास्य विचारले "ठीक आहे डॉक्टर पण पूर्ण पणे नाही, काही आजारा बद्दल ऐकलं, किंवा कुणी मेल की त्या आजारांची किंवा मरणाची भीती परत जागी होते, हो पहिल्या पेक्षा खूप कमी आहे, पण आहे" "हे बघा तुमचा आजार काही साधा सर्दी खोकला नाही की लगेच ठीक होईल, याच्या साठी थोडा वेळ, संयम आणि परिश्रम द्यावा लागेल". "तरी किती दिवस लागतील डॉक्टर? अनिलने बारीक स्वरात विचारल "माणसाला शर्ट घट्ट झालं म्हणून दुकानात जाऊन शर्ट नाही बदलायचंय, इथे पूर्ण माणूसच बदलायचा आहे, वेळ तर ...अजून वाचा

22

आजारांचं फॅशन - 22

डॉक्टर खूप उत्स्फुर्त पणे अनिलला प्रोत्साहन देत होत्या, अनिलला देखील ही एक सोनेरी संधी वाटली, त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा एक रंग दिसत होता आणि तोच आनंद आणि रंग घेऊन अनिल क्लीनिक मधून निघाला आणि ह्या वेळेस पहिल्यांदा मेडिकल शॉप मध्ये नाही तर स्टेशनरीच्या दुकानात कलर आणि पेपर घेण्या साठी गेला. अनिल एक वेगळी ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊन घरी आला, औषधे आणि चित्रकलेचे सामान घरी ठेवले आणि गॅरेज कडे निघाला, त्याला काम, उपचार आणि छंद ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालायची होती आणि प्रत्येक गोष्टीला आवश्यक तो वेळ द्यायचा होता. एक वेळ अशी होती कि अनिलकडे खूप रिकामा वेळ आणि रिकामे विचार ...अजून वाचा

23

आजारांचं फॅशन - 23

अनिलने पेपर, ब्रश आणि रंग काढले आणि पुन्हा एकदा सराव करू लागला, आयुष्यातला प्रत्येक काळा पांढरा क्षण तो रंगाने टाकायला लागला, एक एक रंग त्याला नवी स्पुर्ती, नवी ऊर्जा देत होता, आयुष्य इतकं रंगीत देखील असू शकत ह्याची त्याला जाणीव झाली होती, त्याला ह्या गोष्टीची हि जाणीव झाली होती कि आपल्या आयुष्याचे रंग हे आपल्याच हातात असतात, आपणच ते रंगीत किंवा काळसर करतो, किती मोठा बदल होता हा अनिल मध्ये आणि त्याच्या विचारानं मध्ये, तो त्या रंगांच्या नगरीत एवढा रमून गेला कि त्याला वेळेचे भानच राहिले नाही. डॉक्टर माधवाचा फोन आला आणि अनिल भविष्यात परत आला, “हॅलो” अनिलने ब्रश खाली ...अजून वाचा

24

आजारांचं फॅशन - 24

स्पर्धेचे तीन क्रमांक जाहीर होणार होते, सुरवात तिसऱ्या क्रमांकाच्या घोषणेने झाली. समीक्षकांनी त्यांच्या हातातल्या पेपर वर नजर फिरवली आणि “तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत आर्थोपेडिक आणि स्पाईन फिल्डचे डॉक्टर बिपीन सोलंकी" टाळ्यांचा कडकडाट झाला, बिपीन सोलंकी ने झाडाचे खूप छान चित्र काढून त्याच्या खोडाच्या जागी पाठीच्या मणक्याची रचना करून मणक्याचे महत्त्व आणि त्याची निगा राखणे आणि त्यासाठी योग्य ते उपचार घेणे किती गरजेचे आहे हा संदेश त्यांच्या चित्रातून दिला होता. "दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत अनिल गोरे ज्यांनी सायकॅट्रिक क्षेत्राचे प्रभुत्व केले आहे" टाळ्या वाजल्या आणि सगळ्यात जोरात आणि खुश होऊन डॉक्टर माधव ने टाळ्या वाजवल्या "आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय