मला असं एकाएकी हलकं- हलकं का वाटू लागलं ? एकदम हलकं….. अगदी कापससारखं, शांत आणि शुभ्र, सर्व बंधंनातून मुक्त झाल्यासारखं... मला काही झालेले तर नाही ना? म्हणजे मला आठवतय की, मला साधारणतः एका आठवड्यापूर्वी थकवा जाणवू लागला होता. आई म्हणाली होती, “अरे, दिवसभर हॉस्पिटलमध्ये असतो ना, काय तो तुमचा नवीन आजार आला आहे, कोरोना की काय त्यासाठी, मग काम करून थकून जात असशील.” मी पण विचार केला, खरच तेव्हा हॉस्पिटलमध्ये खूप काम असायचे, डॉक्टर घोलप सरांनी त्या दिवशी मेन मीटिंग हॉल मध्ये तातडीची मीटिंग बोलावली होती. सर्व स्टाफ झाडून हजार होता. सर्वांच्या चेहर्यावर एक अनामिक चिंता स्पष्ट दिसत होती.
Full Novel
लॉकडाउन - मी अभिमन्यु - भाग १
मला असं एकाएकी हलकं- हलकं का वाटू लागलं ? एकदम हलकं….. अगदी कापससारखं, शांत आणि शुभ्र, सर्व बंधंनातून मुक्त मला काही झालेले तर नाही ना? म्हणजे मला आठवतय की, मला साधारणतः एका आठवड्यापूर्वी थकवा जाणवू लागला होता. आई म्हणाली होती, “अरे, दिवसभर हॉस्पिटलमध्ये असतो ना, काय तो तुमचा नवीन आजार आला आहे, कोरोना की काय त्यासाठी, मग काम करून थकून जात असशील.” मी पण विचार केला, खरच तेव्हा हॉस्पिटलमध्ये खूप काम असायचे, डॉक्टर घोलप सरांनी त्या दिवशी मेन मीटिंग हॉल मध्ये तातडीची मीटिंग बोलावली होती. सर्व स्टाफ झाडून हजार होता. सर्वांच्या चेहर्यावर एक अनामिक चिंता स्पष्ट दिसत होती. ...अजून वाचा
लॉकडाउन - मी अभिमन्यु - भाग २
सगळीकडे कोरोना, कोरोना आणि कोरोना. थैमान घातला होता राव या रोगाने. असेच एका दिवशी रात्री सहा-सहा फुट अंतर ठेऊन मारत बसलो होतो. आपल्याला पुर्वीसारखे मनसोक्त जगता येईल का? या विषयावर परिसंवाद चालला होता. कुणी म्हणत होतं की निसर्गाने मानवाला चांगला धडा शिकवला आहे, कुणी म्हणत होत की आता काही पूर्वीसारखं नाही जगता येणार, बंधांनातच राहावं लागेल वगैरे. इतक्यात डॉक्टर घोलप आले. ते आमच्यात बर्यापैकी सीनियर. त्यामुळे त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती सर्वांच्याच मनात असायची. त्यांचा व्यासंग फार मोठा. त्यामुळे बोलताना ते अशी काही उदाहरणं द्यायचे किंवा अशी अगम्य भाषा वापरायचे की समोरचा अगदी मंत्रमुग्ध होऊन जयचा. आज त्यांनी कोरोना विषयी ...अजून वाचा
लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ३
“आला कारे मेल?” “नाही अजून.” “आणि काही टेंशन नको घेऊस. निगेटिव्ह येईल.” “मी नाही घेत रे टेंशन, मी तरुण आहे. मला नाही काही होणार.” “मग कशाचा विचार करतोयस मघापासून?” “काही नाही, बाबांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे झालं. त्यांचंच टेंशन आहे.” “नको काळजी करू, होईल सर्व ठीक.” “पण मी काय म्हणतो, काही गरज नव्हती ना बाहेर जायची. त्या फळ विक्रेत्याकडे किती लोकं येत असतील दिवसभरातून. मी बघितले आहे त्याला. तसाच बसलेला असतो लोटगाडीवर. विनामास्कचा, सैनीटायझर तर हा प्रकार काय आहे हे त्याला ठाऊक आहे की नाही काय माहीत. इतके निष्काळजी कसे होऊ शकतात ...अजून वाचा
लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ४
सकाळी जाग आली तेव्हा बराच उशीर झाला होता. अविचे दोन कॉल्स सकाळी सात वाजताच येऊन गेले होते. मी या त्याला झालेला प्रकार कळवलाच नव्हता. त्यालादेखील खूप वाईट वाटले. तो लगेचच भेटायला येण्यासाठी निघत होता. पण मी त्याला आईला भेटून मग शक्य असल्यास इकडे यायला लावले. कारण आधार देणारा तो एकटाच होता. दुपारी जेवताना कळले की, बाबांच्या वार्ड मधील दोन गृहस्थांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचे शव शवागरात ठेवले होते. त्यांचा अंत्यविधी करायला देखील कुणीच नव्हते. कारण दोघांच्या घरातील सर्व जण क्वारांटाईन केले होते. मला त्यांच्याविषयी खूप वाईट वाटत होते. अंत्यविधी करण्यासाठी देखील कुणीच नसणे म्हणजे किती शोकांतीका होती. मग ...अजून वाचा
लॉकडाउन - हंपीकर नागेंद्र - भाग ५
एप्रिल महिन्याचे कडक ऊन अंगाची लाहीलाही करत होते. हंपी शहरातील, माफ करा विजयनगर साम्राज्याच्या राजधानीतील असंख्य पाषाण उन्हाने तप्त होते. त्यांना बघण्यासाठी म्हणून कुणी आले नव्हते. आता त्यांना त्याची सवय झाली होती. इकडे नागेंद्र देखील घरात चिंतेत बसून होता. नागेंद्र, अठ्ठावीस वर्षांचा तरुण. आई मदयंती आणि वडील मंजूनाथ यांच्यासह नागेंद्र हंपीत रहात होता. ते मूळ कुठचे? हे मंजूनाथला देखील माहिती नव्हते. पण पोटापाण्यासाठी ते हंपीत वास्तव्याला होते, नागेंद्रला एक लहान भाऊ देखील होता, केशव नावाचा. तिथेच गंगावतीला इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. हंपीपासून गंगावती काही जास्त दूर होते असे नाही, पण हंपीला पर्यटकांची जास्त वर्दळ असल्याने केशव गंगावतीलाच भाड्याच्या खोलीवर ...अजून वाचा
लॉकडाउन - क्वारंटाइन सॉफ्टवेअर इंजिनीअर - भाग ६
“रामराव, आहात का घरात?” पाटलांनी दारावर थाप मारत जोरात आरोळी मारली. “या... या पाटील. काय म्हणतात, आज सकाळीच चरणकमल घराला लावलेत. काय विशेष?” रमराव दार उघडत म्हणाले. “तुमचे कुलदीपक आले म्हणे पहाटे, त्यांनाच घ्यायला आलोय.” पाटील मिशीला ताव देत म्हणाले. पाटलांचे हे बोलणे ऐकून रामरावांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. रामराव पाटील, गावातील एक उमदा शेतकरी माणूस. स्वभावाने चांगला. सुयोग, रामरावांचा एकुलता एक मुलगा. सॉफ्टवेअर इंजिनीअर. नोकरीला अर्थातच पुण्याला. उच्चशिक्षण देखील पुण्यालाच. त्यामुळे गावाशी फारसा संबंध नाहीच. काल रात्री दुचाकीवर मित्रासोबत घरी येण्यासाठी निघाला. तसं गाव त्याला आवडायचं नाही. पण आता गावी जाणं म्हणजे काळाची गरज होती. सर्वत्र कडक लॉकडाउन सुरू ...अजून वाचा
लॉकडाउन - बदल - भाग ७
“है गह्यरं चांगलं व्हयन. आते कालदिन पास्थीन मी बी जासू के इकाले.” “कारे पोर्या, कोरोना चालू शे आनी तू काय इचार करी राह्यना.” “आपल्या के ले काय भाव भेटस आसा बी, आनी कोरोनानं कोनता व्यापारी ली राह्यना. त्यान्ह्यासाठे मी दारवर के इकाना इचार करी राह्यंथू .” “घरमा बठाले सांगेल शे तं घरमा बठ ना. कोठे चालना के इकाले.” “ओ आबा, तुम्हले कई समजत नई. मुगमुग बाठीसन खा. जे ताट म्हा ई राह्यनं ते.” “राह्यनं भो, माले काय करनं शे. ईक, के ईक का आम्हले इक.” शेतकर्यांचा माल हा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केला असून त्यांना ...अजून वाचा
लॉकडाउन - खंडोबा उवाच - भाग ८
सायंकाळची तिरपी किरणे गडावर पडली होती. वैशाख महिन्याचे उष्ण वारे मंद गतीने वहात होते. त्यामुळे झाडाच्या पानांची सळसळ ऐकू होती. पिकलेली पाने त्यामुळे गळून पडत होती. कधीच परत न येण्यासाठी. स्वतःहून झाडाशी आपला सबंध तोडत होती. आपण पिकलो, पिवळे झालो, आपला कार्यभाग संपला असे वाटताच ती गळून पडत होती. गडावरुन जवळची झाडे मोठी दिसत होती आणि दूरची झाडे त्या गळून पाडलेल्या पानांसारखी. दुरूनच कुठेतरी पक्ष्यांचा थवा उडत होता. दुसर्या दिवसाचे अन्न शोधण्यासाठी. आज एका झाडावर, उद्या दुसर्या मग परवा तिसर्या, अशी त्यांची भटकंती आयुष्यभर सुरूच असते. ते एका जागेशी मोह ठेवत नाहीत. त्यामुळेच कदाचित इतके स्वाच्छंदपणे उडू शकत असावेत ...अजून वाचा
लॉकडाउन - बेरोजगार -भाग ९
रात्रीचा एक वाजला होता. सायंकाळपासून रिमझिम बरसणारा पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. अधून – मधून विजा देखील चमकत विजांमुळे होणार्या लख्ख प्रकाशामुळे दोन सेकंद का होईना सभोवतालची सृष्टी दिसत होती. बाहेरील सुकलेली झाडे एखाद्या पिशाच्चासारखी दिसत होती आणि विजेचा प्रकाश जाताच लुप्त होत होती. वार्यामुळे पानांची प्रचंड सळसळ होत होती. प्रत्येक पानाचा आवाज हा त्याचे अस्तित्व जपण्यासाठी धडपडत होता. अस्तित्व म्हणजे तरी नक्की काय असत? आपले असणे. या असण्याने कुणाला फरक पडत असला तर ठीक. नाहीतर काही नाही. मधूनच मांजराचे डोळे चमकत होते. अचानक ढगांचा मोठा गडगडाट होत होता. मधून मधून येणारे बेडकांचे आवाज देखील बंद झाले होते. ...अजून वाचा
लॉकडाउन - चंदा - भाग १०
दुपारचे बारा वाजले होते. इतक्या दिवसाढवळ्या देखील रस्त्यावर शुकशूकाट होता. सरकारने लॉकडाउन घोषित करून आठवडा उलटला होता. एवढ्या तप्त देखील चंदा तशीच उभी होती. कुणीतरी येईल या आशेवर. कुणीच येणार नाही हे तिलादेखील माहिती होते पण तिला पर्याय नव्हता. सडपातळ बांध्याची चंदा केसांच्या सोडलेल्या एका बटेशी उगाचच चाळा करत होती. सकाळपासून केलेला शृंगार आता घामामुळे पुसला गेला होता. तिच्या पोटाच्या खळगीपेक्षा तिच्या आई आणि आजीचे पोट भरण्यसाठी ती जगत होती. तिची आई तिला कुंटणखाण्यात सोडून गेली तेव्हा ती अवघी वीस वर्षांची होती. तिचे मुळ गाव दूर महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर कुठेतरी होते. आईचे वय झाले म्हणून आईच्या बदली दिदीने ...अजून वाचा