मित्रांचे अनाथाश्रम

(27)
  • 187.3k
  • 2
  • 73k

मी समीर, विवेकचा अत्यंत जवळचा मित्र होतो, पण काय ठाऊक कुणास आमच्यातील दरी आता वाढत चालली होती, कारणही काहीसे तसेच होते. एके दिवशी अचानक रात्री नऊच्या सुमारास विवेक चा एक मेसेज आला, "भेटायचं आहे घरी ये, जसा आहे, तसाच ये, गरज आहे खुप तुझी" मी कसलाही विचार न करता त्याच्या घरी गेलो. त्याने एक बॅग घेतली आणि मला घेऊन बाहेर पडला. आम्ही काळोख्या रात्री रस्त्याने चाललो होतो, पण काहीच बोलत नव्हतो. शेवटी तो एक हॉस्पिटल मध्ये शिरला आणि अमर बद्दल चौकशी करू लागला. नाव कुठेतरी ऐकल्यासारख वाटत होत, वार्डबोय ने इशारा केला त्या दिशेने आम्ही गेलो. रूममध्ये गेलो तेव्हा आमच्याच वयाचा कुणीतरी तिथे एक मुलगा बेडवर पडला होता. नखशिखांत घाव होते त्याच्यावर, आतापर्यंत मी त्याला ओळखले होते, हो तो अमर होता. बाजूलाच त्याच्या एक मुलगा बसला होता, आम्हाला पाहून तो लगेच उठला. त्याच नाव होत संजय. संजय, "आणली का ? खुप थंडी आहे."

Full Novel

1

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १

मी समीर, विवेकचा अत्यंत जवळचा मित्र होतो, पण काय ठाऊक कुणास आमच्यातील दरी आता वाढत चालली होती, कारणही काहीसे होते. एके दिवशी अचानक रात्री नऊच्या सुमारास विवेक चा एक मेसेज आला,"भेटायचं आहे घरी ये,जसा आहे, तसाच ये,गरज आहे खुप तुझी"मी कसलाही विचार न करता त्याच्या घरी गेलो. त्याने एक बॅग घेतली आणि मला घेऊन बाहेर पडला. आम्ही काळोख्या रात्री रस्त्याने चाललो होतो, पण काहीच बोलत नव्हतो. शेवटी तो एक हॉस्पिटल मध्ये शिरला आणि अमर बद्दल चौकशी करू लागला. नाव कुठेतरी ऐकल्यासारख वाटत होत, वार्डबोय ने इशारा केला त्या दिशेने आम्ही गेलो. रूममध्ये गेलो तेव्हा आमच्याच वयाचा कुणीतरी तिथे एक ...अजून वाचा

2

मित्रांचे अनाथाश्रम - भाग २

मी बेशुद्ध झालो, डोळे उघडले ते सुध्दा दवाखान्यात आणि समोर बाबा, आई, काकू आणि रजनी होते. डॉक्टर बाबांना काहीतरी होते. डॉक्टर," रक्तपुरवठा करावा लागला, आमच्याकडे त्याचा साठा नव्हता म्हणून जो घेऊन आला त्यानेच रक्त दिले."बाबा," कोण आहेत ते ?"डॉक्टर," इतक्यात इथेच होता, नंतर कुठे गेला काय माहिती ?"माझ्याकडे पाहून बाबा," आता बरं वाटतं ना ?"मी मान हलवून होकार दाखवला. एक आठवडा मी दवाखान्यात होतो, पूर्ण बरा झालो तेव्हाच मला डॉक्टर ने घरी जाण्याची परवानगी दिली. मी जाण्यासाठी नुकताच बेडवरून उठलो, बॅग भारत होतो. काकू जवळच होत्या, बाबांना काम होते आणि बाकी पोरांची काळजी म्हणून आई घरीच होती. काकू बाहेर निघत ...अजून वाचा

3

मित्रांचे अनाथाश्रम - भाग 3

कुणीतरी धडक मारली, मी मागे वळून बघणार त्याच्या आधीच अम्या धावत आला आणि बोलला, " ये गाडी नाही येत फुटले काय तुझे"मी, "गप्प रे अम्या"पण तो एकदा सांगून कुठे ऐकणार होता, पुन्हा बोलला, " हे बघ गाडी तोडून मोडून एक कर, पण आपल्या दोस्ताला काही झाले ना तर तुझे दातच पडतो, आंधळी". तिने लाल रंगाचा स्कार्फ बांधला होता आणि काळया रंगाचा गॉगल त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. शरीराने बारीक अशी मुलगी आमच्या दोघांकडे पहात होती पण अम्याची कॅसेट सुरूच होती. त्याला कसेतरी गप्प केले आणि स्वतःहून मी माफी मागितली ते सुध्दा ती काही बोलेल याची जरा ही अपेक्षा न ...अजून वाचा

4

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ४

मी आम्याला बोललो, "शांतता घे आम्या, आपल्याला उशीर होतो आहे, कार्यक्रम आहे ना ?"ती मुलगी आजसुध्दा सॉरी नाही म्हणाली, बोललो आणि पुढे गेलो. आश्रमात आम्याने माझी त्याच्या बाबांबरोबर म्हणजे सुरेश सरपोतदार यांच्या बरोबर ओळख करून दिली. त्यांचं वय खुप होत, त्यांनी सांगितले तेव्हाच समजले की आम्याला आई नव्हती. त्या दिवशी मी खुप मजा केली, मुलांबरोबर खुप खेळलो. रात्री घरी जायला जरा उशिराच झाला होता. मी जात असतांना मला रस्त्यात एक मुलगी तिच्या गाडीच्या बाजूला उभी राहून फोन वर बोलत असताना दिसली. आधी मला काहीतरी गडबड असल्याचा भास झाला पण नंतर गाडी ओळखीची वाटली म्हणुन मी थांबलो तर ती मला धडकणारी ...अजून वाचा

5

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ५

कॉलेज संपल्यावर आम्ही दोघे आश्रमात गेलो त्यानंतर आम्या ने ती पिशवी उघडली. त्यात दोन कॅडबरी आणि एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. "माझ्या गाडीत काहीतरी खराबी होती म्हणुन मी दोन वेळा तुमच्या गाडीला येऊन धडकले म्हणुन माफी मागते. तरी तुम्ही माझी मदत केली म्हणुन खुप खुप धन्यवाद - संध्या सावंत"मी, "अच्छा ही सायन्स ब्रांच ची आहे"आम्या, "तुला कसं काय समजलं"मी, "ते बघ ना चिठ्ठी प्रॅक्टिकल च्या पेपर वर लिहिली आहे."आम्या, "हुशार आहे तु"मी, "संगतीचा प्रभाव"दोघंही हसायला लागलो. मागुन सुरेश काका धावत आले, "बंटी ने एक रुपयाचं नाण गिळून घेतलं, चल त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. बोलता पण येत नाही ...अजून वाचा

6

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ६

संजय ने पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.हो, तो विवेक होता. मी विवेकला घेऊन कॉलेज आलो. विवेक पार्किंगच्या बाहेरूनच थँक्यू निघून गेला. मी गाडी लावली आणि नोटीसबोर्ड जवळ आम्याला शोधायला जाणार होतो पण लेक्चरला जायला उशीर होत होता म्हणून सरळ वर्गात जाऊन बसलो. लेक्चर झाल्यावर आम्या भेटला, मी त्याला विचारले, "बंटीची तब्येत आता कशी आहे."माझ्या मागून आवाज आला, "कशी आहे तब्येत आता"मी मागे वळून पाहिले तो विवेक होता. आम्याने उत्तर दिले, "ठीक आहे आता"मी विचार करायला लागलो, हा विवेक कसा काय ओळखतो आम्याला. मी प्रश्न विचारणार तितक्यात विवेक बोलला, "ठीक आहे काळजी घे, मी जातो उशीर होतो आहे मला, बाय"मी काही ...अजून वाचा

7

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ७

"काय ?", असे बोलून मी उभाच राहिलो,सर्वजण माझ्याकडेच बघत होते. संजय, "मलाही असच धक्का त्या दिवशी बसला"दरवाजा वाजला, संजय आई आणि काकू जेवण घेऊन आल्या होत्या. काकू आम्या जवळ जाऊन बसल्या. त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागल्या. संजयच्या आई जेवणाची तयारी करत होत्या. मी आणि विवेक ने घरी जाण्याचं ठरवलं होत, आता आम्या सुध्दा ठीक झाला होता. दोन दिवस झाले घरी वेळ दिला नाही. सर्वांना सांगून मी आणि विवेक दोघेही बाहेर पडलो. मध्येच विवेक, "मला पण आत्ताच समजले"मी, "काय समजले"विवेक, "संजय संध्यावर प्रेम करतो ते"मी, "म्हणजे तुला नव्हतं माहिती"विवेक, "नाही, पण..."मला कुणीतरी मागून आवाज दिल्याचा भास झाला, मी वळून पाहिले तर कुणीच ...अजून वाचा

8

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ८

निशाने विवेकला सांगितलेली गोष्ट आता विवेकने मला सांगायला सुरुवात केली.पहिल्या दिवशी संध्या शाळेत आली नाही, त्याच्या आधीच्या संध्याकाळी शाळेतून घरी आली. तेव्हा आई कुठेतरी बाहेर चालली होती, "मी बाहेर जाते आहे बाजारात, बाबा जरा उशिरा येतील खुप काम आहे त्यांना आणि तुझ्यासाठी चहा ठेवला आहे."संध्या, "ठीक आहे लवकर ये"तयारी करून संध्या कामाला लागली. काम करत असताना तिला समजले नाही वेळ किती निघून गेला. तितक्यात दरवाजा वाजला, बाबा येण्याची वेळ झाली होती म्हणून ती दरवाजा उघडण्यासाठी धावत गेली. दरवाजा उघडला तर समोरचा दादा उभा होता. संध्या, "दादा, तु कसा इकडे कसा"दादा, "काही नाही सहज, काकू कुठे आहेत"संध्या, "आई बाहेर गेली आहे, ...अजून वाचा

9

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ९

मी, "संजय बद्दल काय सांगत होता ..."विवेक त्या दिवशी काय घडलं त्या बद्दल सांगायला लागला.आश्रमात आम्ही चौघे म्हणजे मी, आम्या आणि सुरेश काका गप्पा मारत बसलो होतो. मला संजय चे बाबा गेल्याच समजलं होत. पण मी बाहेर गावी होतो. आल्या आल्या मी संजयला भेटायचं ठरवलं म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही आश्रमात जमलो. घरी जाणार होतो पण संजय नाही बोलला, त्यांच्या घरी प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते त्याविषयी बोलायचं म्हणुन आम्ही बाहेर भेटायचं तर आश्रमात भेटलो. तो वाद काही मला प्रॉपर्टी पाहिजे असा नव्हता, तो वाद मला प्रॉपर्टी नको आहे यावरून होता. त्याच्या बाबांनी त्यांची निम्मी काकांच्या दोघं मुलांच्या नावावर तर, ...अजून वाचा

10

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १०

मी, "मग कुणी सांगितले ?"संजय, "निशा, संध्याची मैत्रीण"मी, "कधी ?"संजय ने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली,त्या दिवशी आपण चौघेही गेलो होतो. तेव्हा संध्याला सुरेशकाकांनी तिच्या बाबांबद्दल विचारले. त्यानंतर संध्या रडायला लागली. तेव्हाच तिला बोलता येत नाही हे कळाले. संध्याला पुन्हा त्रास नको म्हणून तो विषय पुन्हा कुणी घेतला नाही. त्या रात्री उशीर झाला होता आणि विवेक पण काहीतरी काम होत म्हणून लवकर निघून गेला. संध्याला हॉस्टेल ला सोडायला मी आणि आम्या दोघं गेलो. नेहमीप्रमाणे आम्या ने संध्याकडून गाडीची चावी मागून घेतली आणि मी संध्याला माझ्याबरोबर घेतले. रस्त्यात एका बाजूला एक छोटीशी दरी होती आणि त्यात खुप काटे होते म्हणून ...अजून वाचा

11

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ११

विवेक ने बाटली फिरवली.विवेक समोर बाटली येऊन थांबली, तो उभा राहिला आणि सर्वांवर एक नजर फिरवून बोलला, "विचारा काय ते ?"सुरेश काका, "याला मी विचारणार"विवेक, "विचारा"सुरेश काका, "संजयला संध्या आवडते तशी तुझी आवडती स्त्री कोण आहे ?"विवेक हसून, "आई"मी, "ओ साहेब, स्वामी विवेकानंद नको बनू, खर काय ते सांग"विवेक, "काकांनी प्रश्नच तसा विचारला"काका, "मग दुसरी सांग ?"विवेक हसत खाली बसतांना बोलला, "एकच प्रश्न विचारायची अट होती"विवेक ने पुन्हा बाटली फिरवली, यावेळी संजय वर वेळ आली. तो उभा झाला आणि म्हणाला, "कोण विचारणार"आम्या, "मी विचारतो"विवेक, "काहीतरी माहिती मिळेल असं विचार"आम्या, "संध्यासाठी काय सरप्राइज आहे ?"संजय, "अरे देवा, मला वाटल काय अवघड विचारतो ...अजून वाचा

12

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १२

सुरेश काकांनी सांगायला सुरुवात केली,पंचवीस वर्षापूर्वी,मी कामावर होतो, तेव्हा जास्त टीव्ही वैगरे नव्हतं. म्हणून जगात काय घडतं आहे ते तोंडून तीन चार दिवसांनी समजायचं. मी कामात असताना एक माणूस पळत आला आणि जोरात ओरडला, "बाहेर दंगल झाली आहे." कशामुळे घडलं, काय घडलं, काही माहिती नव्हतं पण जीव वाचवण्यासाठी लपून बसलो. त्या वेळी दंगल मुळे कित्येकांची घर उध्वस्त झाले. रात्री शांतता पसरली तेव्हा कुठूनतरी मार्ग काढत मी कामावरून घरी आलो. दरवाजा वाजवणार तेव्हा समजले की दरवाजा उघडा आहे. मी आत शिरलो तर सगळीकडे रक्त आणि फक्त रक्त होते. त्या रक्त्याचा पाठलाग करत मी पुढे पुढे जात होतो तसे माझ्या हृदयचे ...अजून वाचा

13

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १३

काल रात्रीचं मनात असुन सुद्धा सर्व मित्र काहीच नाही घडलं असा आव आणून काम करत होती.बाकीचे सर्व कामात असल्याने आई ने मला रजनीला घ्यायला घरी पाठवले. तिची आई सांगत होती की, "त्या महाराणी उशीरा उठतात आणि एकटी येणार नाही ती, कुणीतरी पाहिजे बरोबर..."मी संजयच्या घरी गेलो तेव्हा रजनी तयार होती. तिला घेऊन मी आश्रमात आलो. आतापर्यंत अकरा वाजले होते आणि पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. कार्यक्रमात प्रत्येकाच्या ओळखीचे कुणी ना कुणी होते. माझ्या ओळखीचे जास्त कुणी येणार नाही म्हणुन मी एका खुर्चीवर निवांत बसलो होतो.दोन मुली आल्या तेव्हा त्यांच्याकडे सर्व मुलं धावत गेले आणि त्यांचं स्वागत करत त्यांना माझ्या ...अजून वाचा

14

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १४

रजनी, "मी ठरवलं आहे, आता जगायचं तर तुमच्याबरोबर, नाहीतर नाही जगायचंसांगा, करणार ना माझ्याशी लग्न ?"आत्तापर्यंत आनंदात असणारा मी जे बोलली ते ऐकल्यावर घाबरलो होतो. मी जे ऐकलं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. ती बोलली त्यानंतर मला चक्कर यायला लागले. मी तसा विचार सुध्दा केला नव्हता आणि तिच्या भावाने तिच्यासाठी स्थळ पाहिलं आहे. तिचं लग्न तिच्या भावाच्या पसंतीने होणार आहे. मी त्याबद्दल तिला सांगू पण शकत नाही. कारण ती आत्ताच मरण्याच्या धमक्या देते आहे. ती शांत व्हायला तयार नव्हती.रजनी, "बोला तुमचं काय मत आहे. हो असेल तर मी माझ्या दादाबरोबर बोलते आणि हरी देशमुख यांच्या मुलाला कुणी नकार देणार ...अजून वाचा

15

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १५

विवेकने मला त्या दिवशी काय घडलं ते सांगायला सुरुवात केली. कार्यक्रम संपल्यावर तु घरी जाण्यासाठी निघाला आम्ही सर्व तुला बाहेर आलो होतो. तुला सोडल्यानंतर आम्ही सर्व समीरला शोधत होतो. त्याला फोन केला तर तो ही बंद येत होता. आम्हाला वाटलं काही कामात असेल म्हणुन जास्त लक्ष दिलं नाही.आम्ही आधीच ठरवलं होत की आ म्या चा वाढदिवस साजरा करायचा. आम्ही सर्व केक मंडपात घेवून आलो आणि समीरला शोधणार तितक्यात आश्रमात मोठा बॉम्ब फुटण्यासारखा आवाज आला. सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले, स्वयंपाक घराच्या जवळ तो आग लागलेली दिसत होती. मी आणि संजय ने तिकडे धाव घेतली आणि दुसरा स्फोट झाला. एका ...अजून वाचा

16

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १६

रजनी बोलायला लागली,जेव्हा समीरने तुझ्याकडे चिठ्ठी दिली, त्यानंतर समीर खोलीमध्ये त्याचे सामान एकत्र करून बॅग भरायला लागला. मी त्याच्या गेले, त्याची बॅग भरून झाल्यावर तो मागे वळला तेव्हा मी तिथेच उभी होती. समीर, "काय आहे ?" मी, "कुठे चालले तुम्ही" समीर, "मी चाललो माझ्या मार्गाने, मी तुझ्या बरोबर नाही राहू शकत, मला माफ कर" मी, "मग मी जगून काय करू" समीर, "माझ्या मागे पुढे कोणीच नाही, पण तुझ्यासाठी तुझा दादा आणि आई काकू सर्व जण आहेत, ते काय म्हणतील" मी, "काही नाही मी प्रेम केला आहे तुमच्यावर, बाकी मला काहीच माहिती नाही" समीर, "मी जातो मला जाऊदे" समीर जायला लागला, पण मी त्याचा हात पकडला आणि त्याला ...अजून वाचा

17

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १७ - शेवटचा भाग

ती चिठ्ठी मी उघडून वाचायला सुरुवात केली.प्रिय दुसरा मित्र,तुला मी माझ्या बरोबर घडलेली सर्व हकीकत सांगितली. पण एक सत्य बाकी आहे. ते तुला सांगणार होतो. पण रजनीच्या प्रेमामुळे आणि तिच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून या चिठ्ठीत तुला उरलेल्या गोष्टी सांगणार आहे. संजय आता मोठा राजकीय नेता झाला आहे. संध्याने एमएस्सी केले आणि ती निशा दोघी अजुनही बरोबरच आहेत आणि एका ठिकाणी काय काहीतरी काम करतात. विवेक चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे. आम्याला आता त्याचे स्वतःचे दुकान मिळाले. संजय आणि संध्या, विवेक आणि निशा, आम्या आणि त्याच दुकान, अशा तीन जोड्या मला खूप आवडल्या. पण चौथी जोडी रजनी आणि माझी ती मला काही ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय