श्वास असेपर्यंत

(39)
  • 169.8k
  • 11
  • 72.1k

आज चंद्राचा प्रकाश इतर दिवसांपेक्षा जास्तचं तेज दिसत होता,कदाचीत तो पौर्णिमेच्या जवळपास चा दिवस असावा. बाहेरची सर्व पृथ्वी त्या दुधाळ रंगात न्याहाळून निघत होती. सगळीकडे चंद्राचा प्रकाश पसरला होता,जणू वाटत होते की आज या पृथ्वीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे की काय?? चंद्रासोबत त्याचे सखे , सोबती म्हणजे चांदण्या,तारका अजून जास्तच लुकलूकतांना दिसत होत्या. त्या तारकाही आपलं तेज पसरविण्याचा प्रयत्न करू पाहत होत्या. त्या शीतल प्रकाशातील तारका म्हणजे पृथ्वीने घातलेल्या त्या पांढऱ्या शुभ्र सफेद साडीवर चमचमणाऱ्या लुकलूकित टिकल्याचं. त्याचप्रमाणे काहीं चांदण्या साडीवर नक्षीकाम केल्यासारख्या शोभून दिसत होत्या, डिसेंबर महिन्याचा तो शेवटचा दिवस होता.जिकडे तिकडे गार - गार वारा अंगाला हळूच स्पर्श करून जात होता,जणू तो मला विचारत असावा,बघ तुझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रेयसीची आठवण येते की काय???मला वाटलं हा वारा माझी थट्टा करत असेल असं मी माझ्या मनाला समजावून सांगितलं.

Full Novel

1

श्वास असेपर्यंत - भाग १

दिन-रात मेहनत करून , कष्ट उपसून , आपल्या पिलांना वाढविणाऱ्या त्या आई -बाबांना, आयुष्यभर साथ देऊन मैत्रीत जीव लावणाऱ्या, मित्रांस, प्रेम हे पवित्र नातं आहे ,हे मानून, तिच्या / त्याच्या आठवणीत संपूर्ण आयुष्य एकटे वेचणाऱ्या, प्रत्येकचं प्रियकर,प्रेयशीस, आयुष्यात सुख दुःखाचे डोंगर चढतांना, डगमगून न जाता ते दुःख आपलं मानून, आयुष्याची वहिवाट चढणाऱ्या योध्यांसाठी, “श्वास असेपर्यंत ” हे पुष्प, सर्वांसाठी समर्पित...... ️ सुरज मुकिंदराव कांबळे आज चंद्राचा प्रकाश इतर दिवसांपेक्षा जास्तचं तेज दिसत होता,कदाचीत तो पौर्णिमेच्या जवळपास चा दिवस असावा. बाहेरची सर्व पृथ्वी त्या दुधाळ रंगात न्याहाळून निघत होती. सगळीकडे चंद्राचा प्रकाश पसरला होता,जणू वाटत होते की आज ...अजून वाचा

2

श्वास असेपर्यंत - भाग २

मी अमर , माझा जन्म अगदी स्वातंत्र चळवळीच्या नंतरचा असावा. एक छोटंसं आमचं गावं. खूप काही लोकसंख्या नसणार चार- पाचशे लोकं त्या गावात राहत असत. सर्वच धर्माची लोकं तिथे राहत असायचे. त्यात एक आमचं छोटंसं कुटुंब.आईच्या पोटी तशी चार - पाच जन्माला आली पण काही जन्मताच मेली तर काही एक वर्ष असताना दगावली. तो काळच तसा होता. वेळेवर औषध नाही किव्हा मग दवाखाना नसल्याने,साथीचे रोग,महामारी असल्याने जास्त मुले वाचत नसायची,त्यात मी आणि बहिण चित्रा ...अजून वाचा

3

श्वास असेपर्यंत - भाग ३

रस्त्याने आम्ही तीन - चार मित्र चाललो होतो. सर्वांची घरे एकाचं भागाला असल्याने आम्ही सोबत सोबत नेहमी जात असायचो परत सोबतचं येत सुद्धा असायचो.पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, कुठे जाण्यायेण्यामुळे चिकचिक झाली होती. वावरातून येणाऱ्या मजुरांच्या पायाला वावरातील माती लागून ती रस्त्यावर दिसत होती. काही ते मातीचे पेंड जमिनीवर घासून काढत होते.आमच्या मित्रांमध्ये खोडकर म्हणजे कैलास पण सर्व गावात त्याला कैलू म्हणत असायचे. त्याने रमश्या वर ते रस्त्यावर झालेल्या डोबऱ्यातील पाणी उडवले. त्यात रमश्या चा शर्ट आणि गांडीकडून छिद्र लागलेला त्याचा पॅन्ट भरला. ...अजून वाचा

4

श्वास असेपर्यंत - भाग ४

सर्वांना ते नाटक आवडलं. विशेषतः माझा अभिनय सर्वांना आवडला होता. त्या नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा मिळालं होतं. काहींनी त्याला पैसे स्वरुपात बक्षिसे दिली होती.सरांनी सुद्धा आमच्या अभिनयाला दाद दिली होती. पण मला काही बर वाटत नव्हतं. सारखा मार खाल्ल्याने तो ही आज खरा वाला त्यामुळे पोटात दुखायला लागलं होतं. पण अभिनयाला मिळालेल्या शाबासकी मुळे त्या वेदना कुठेतरी लपून बसल्या होत्या. मला गावातील सरपंचाकडून एक वैयक्तिक बक्षीस मिळालं होतं. बक्षीस देतांना जामुनकर सरपंच म्हणाले होते की, अमर बेटा , " तू खूप छान अभिनय केला. त्या नाटकाची ...अजून वाचा

5

श्वास असेपर्यंत - भाग ५

यंदा च वर्ष म्हणजे मॅट्रिक च वर्ष होतं.अभ्यास कसा करायचा,इतरांशी कसं बोलायचं,नीटनेटकी ठेवण कशी ठेवायची इत्यादी चांगल्या सवयी वसतिगृहात होत्या. शहरी मित्र,गावातील मित्र,शाळेतील सरांशी पण चांगलं जमत असायचं. वसतिगृहात सुद्धा मोठ्यांशी,छोट्यांशी मैत्री जमली होती. सर्व काही एकदम व्यवस्थित चाललं होतं. पावसाळा लागला,या वर्षीच्या अभ्यासाचा तडाका वाढवावा लागेल म्हणून सुरुवातीला अभ्यास जोरदार करायचा,असं मनात ठरवलं होतं.शाळा नियमित सुरू झाली. वसतिगृह सुद्धा नेमकेच सुरू झालेले होते. काही विद्यार्थी अजून वसतिगृहात आलेले नव्हते,तर काही आले होते. काही नवीन विध्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी येत होते, तर काही पालक आपल्या पाल्याला प्रवेश मिळतो ...अजून वाचा

6

श्वास असेपर्यंत - भाग ६

चित्राच्या बिमारीची बातमी ऐकून मी रडायला लागलो. तेव्हा बबन म्हणाला, " अमर ,ही रडण्याची वेळ नाही. चित्रा तुझी आठवण असल्याने तू लगेच माझ्यासोबत चल, असा तुझ्या आईने मला निरोप घेऊन पाठवला आहे." " सोबतच गावात साथीच्या रोगाची लागण झाल्याने ,गावांत प्रत्येकाच्या घरची परिस्थिती जवळपास सारखीच आहे !!!" आपल्या गावचा नामदेव त्याचा म्हातारा बाप हगवण लागल्याने पार कसातरी झाला होता, आणि मग काही दिवसांनी मरण पावला, बऱ्याच लोकांची प्रकृती जागेवर आली नाही.सरकारी डॉक्टर येऊन तपासणी करतात , काही गोळ्या ,इंजेक्शन देतात आणि चालली जातात. बबन च्या या वाक्याने मनात अजून धास्ती भरली होती. शेवटी मी सरांना हकीकत ...अजून वाचा

7

श्वास असेपर्यंत - भाग ७

चित्राच्या जाण्याने एक फार मोठा बदल आमच्या आयुष्यात झाला होता. आईच्या तब्येती मध्ये घसरण होत होती . बाबा वरून खंबीर वाटत असले तरी, आतून पूर्णत: तुटून गेले होते. का नाही तुटणार हो ???? स्वतःच्या हातांनी वाढविलेला तो पोटचा गोळा , या नियतीच्या चक्रात अडकून पडला आणि त्यांच्यापासून हिरावून घेतला गेला . त्यातच भर म्हणून बायकोही , त्या लेकीच्या दुःखात खंगत चालली होती . सोबत भरीला भर म्हणून पावसाची सारखी हजेरी. जिकडे - तिकडे हाहाकार... आता जगावं कसं या सर्व गोष्टींचा विचार घरातील कर्त्या ...अजून वाचा

8

श्वास असेपर्यंत - भाग ८

सुट्टीच्या दिवसात मग नेमकं काय करायचं त्यात काही गावातील मित्र मला चिडवत असायचे. त्यातील रमेश, बाबाराव यांच्याशी गट्टी असल्याने ते नेहमी म्हणायचे , " अमर आता शहरात जाऊन मोठा साहेब होईल. मोठं घर बनवणार. नवीन - नवीन कपडे घालणार, अशा गोष्टी करून मला चीडवत असायचे . पण मला त्यांचा स्वभाव माहिती होता. ते नेहमी गंमत करत असायचे. घरच्या बकऱ्या झिंगरी,बिजली आता म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांच्यापासून बराचं मोठा वृक्ष तयार झालेला होता. तिचा पिल्लांपासून बरेचदा आम्हांला आर्थिक मदतही झाली होती . मी सुट्टीच्या दिवसांत बकऱ्या चारावयास रानात घेऊन जात असायचो. इकडे- तिकडे हिंडायचं. ...अजून वाचा

9

श्वास असेपर्यंत - भाग ९

अरे अमर, " आता नोकरी लागेल ना रे तुला ????" असा खोचक सवाल आईने मला विचारला. का गं आई,मला अशी का विचारणा करत आहे??? पुन्हा शिक्षण घ्यायचं म्हणतो मी. शिक्षण झाले की लागेलचं नोकरी !!!! मग तेच नोकरी करणार, आणि तुमचा सांभाळ.... एवढं तर काम आहे माझ्याकडे. तसं नाही रे , " बघ ना, बाबांच्या पायाला जखम झाली!!! शेतात आता त्यांना जास्त काम होत नाही, चालताना त्रास होतो . बरेचं दिवस झाले हा त्रास होत आहे , पण काही आराम अजून त्यांना झालेला नाही... बाबा आणि ...अजून वाचा

10

श्वास असेपर्यंत - भाग १०

अरे अमर , " मित्रांमध्ये चर्चा करतांना हा आवाज माझ्या कानी पडला. आवाज तर ओळखीचा वाटत होता. पण तो मुलीचा असल्याने मी दुर्लक्ष केलं. असेल म्हटलं दुसरा कुणी तरी अमर." परत जवळ आल्यावर अरे अमर , " मी लक्ष्मी तुझ्या गावची . ओळखलं नाही का मला ?????" ती जवळ आल्यावर मी तिला ओळखलं, की ही तर आमच्या गावच्या पाटलांची लक्ष्मी होती. बाबा ज्यांच्याकडे नेहमी कामाला असायचे त्याचं पाटलांची ती कन्या होती लक्ष्मी. बहुतेक चार - पाच वर्षे झाली असतील तिला न पाहून. गावात दहावीच्या निकालाच्या वेळी पेपर चाळत असतांना तिच्याशी तोंडओळख आणि अधून - मधून नजरभेट व्हायची. " आजही ...अजून वाचा

11

श्वास असेपर्यंत - भाग ११

पावसाळा सुरू झाला होता. एक-दोन पाऊस सुरुवातीला चांगले झाले होते. पहिल्या पावसाने सर्व बाजूला मातीचा सुगंध होता. पक्षी चिवचिव करत होते , कुणी पक्षी आपली घरटी बांधण्यात गुंतून पडले होते , मध्येचं सुर्यासमोर ढग येऊ तो सूर्य ढगांमध्ये लपून जायचा. मग सर्व बाजूला अंधार व्हायचा. त्यामुळे काळीभोर जमीन अधिक काळी दिसत असायची. उन्हाळ्यात शेतीची मशागत नांगरणी, वखरणी झाल्याने फक्त आता पावसाची वाट होती. ती वाट या पावसाने संपली होती . काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता . जिकडे तिकडे कालवाकालव सुरू झाली . शेती शेतीसाठी बियाणे आणण्याची शेतकरी तयारी करत होतो . कुणी आपल्या घरावर ...अजून वाचा

12

श्वास असेपर्यंत - भाग १२

आई मला पाहताच तिला गहिवरून आलं. पण तिने आपले अश्रू लपवत, अरे अमर , " अचानक कसं काय तू केलं ????" बाबा भिंतीला टेकून चिंतातुर विचारात मग्न होते. " सहज आलो आई. तुमची आठवण जास्त येऊ लागली, म्हणून मी आलो !" असं मी उत्तर दिलं. शेवटी जन्मदात्री असल्याने तिने सर्व ओळखुन घेतलं . पण सध्या बोलणे योग्य नाही , म्हणून ती म्हणाली " ठीक आहे " . बाबांच्या पायाची, जखमेची थोडी विचारपूस करुन आईने गुळाचा चहा केला होता तो पिऊ लागलो . मग आई लगेचं स्वयंपाक करायला बसली.आम्ही म्हणजे बाबा व मी बसलो इकडच्या तिकडच्या गोष्टी ...अजून वाचा

13

श्वास असेपर्यंत - भाग १३

पुढील एक - दोन महिने कसे गेले काही माहितचं पडले नाही. मग या कालावधीत कधी आनंद आणि बरेच लक्ष्मी च्या गोष्टी सांगत असायचो. जेंव्हा ही लक्ष्मीचे नाव निघताचं तिचा हसमुख चेहरा नजरेसमोर येत असायचा. मग ती एखाद्या दिवशी कॉलेज ला नाही आली की, मग तिच्या आठवणीत पूर्ण दिवस जात जायला ही जड वाटत असायचा. एक दिवस जरी ती आली नाही किंवा ती दिसली नाही तरी , मन चलबिचल व्हायचं. ही गोष्ट आनंद चांगलीचं ओळखून घेत असायचा. मग कधी कधी तो माझी चेष्टा सुद्धा करत असायचा... म्हणायचा, " होणाऱ्या आमच्या वहिनी ची आठवण येत असावी, आमच्या मित्राला!!!" मग मी ...अजून वाचा

14

श्वास असेपर्यंत - भाग १४

घरी आलो. तेंव्हा सर्व बायका तोंडाला पदर लावून माझ्याकडे पाहत होत्या. काही आप्तस्वकीय बायांचा आतून रडण्याचा आवाज होता. बाहेर माणसांची गर्दी जमलेली होती. कुणी एक तिरडी बांधण्यात व्यस्त होते, तर काही लाकडांची जमवाजमव करीत होते. मी आईला दिसताच तिने हंबरडा फोडला. आणि ती रडायला लागली . मी ही आता डोळ्यांतून अश्रू गाळू लागलो. बाबांचं पार्थिव शरीर जमिनीवर पडून एक निद्रा घेत होते. मी आज बाप या शब्दाला कायमचा मुकलो होतो. अमर म्हणून आवाज देणारे माझे बाबा, सावित्री ...अजून वाचा

15

श्वास असेपर्यंत - भाग १५

अरे अमर , " तू कसल्या विचारात मग्न आहेस ???? कमी बोलतो , कॉलेज मध्ये ही लक्ष नसतं "असा खोचक प्रश्न आनंद ने मला विचारला... अरे काही नाही आनंद , " आईचीआठवण येत आहे. ती कशी जगत असणार !!! कशी राहत असणार!!! हा प्रश्न सतत मनाला भेडसावत असतो . त्यावर एक उपाय म्हणून मी कॉलेजच्या वेळे व्यतिरिक्त काही काम करण्याचा विचार करतोय."मी सावकाशपणे उत्तर दिले. " काही पैसे कमावले तर, तेच आईला पाठवता येईल. आई एकटी तरी काय काय करणार!!!"" बरोबर आहे तुझ अमर . ...अजून वाचा

16

श्वास असेपर्यंत - भाग १६

यंदाचं एम. ए.मराठी चं वर्ष होतं. मी आणि आनंद सोबतच होतो. आईला मी मिळालेल्या कामातून नियमित पैसे असायचो. कधी आईसाठी काही घेऊन जायचो. तेव्हा आई मात्र भलतीच खुश असायची. पण बाबांची आठवण आली की , तिचा चेहरा पार उतरून जात असे. मी एम. ए. मराठी हा विषय घेतला असल्याने एम. ए. झालं की, कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्वांवर वा जमेल तर पूर्णवेळ नोकरी करायची असं स्वप्न पाहत बसायचो. कारण आतापर्यंतची सर्व शिक्षणाची कागदपत्रे म्हणण्यापेक्षा सर्टिफिकेट सर्वांच्या नजरेत येईल अशीचं होती . त्यामुळे आपण नक्कीचं ...अजून वाचा

17

श्वास असेपर्यंत - भाग १७

" अगदी खरं आहे लक्ष्मी तुझं. एखाद्याच्या आवडी-निवडी जपणं. त्याच्या किंवा तिच्या मनासारखं वागणं किंवा ती सांगते राहणं, तिच्या आठवणीत जगणं, ती दिसताच चेहऱ्यावर हास्य उमटणं, ती नाही दिसली की मन कासावीस होऊन जाणं, कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं आणि हे सर्व माझ्या बाबतीत होत असायचं. आपण तर कित्येक वर्ष झाले एवढे चांगले मित्र आहोत , मग या मैत्रीमध्ये प्रेम होणे स्वाभाविक आहे . त्यात तुझा माझा काही एक दोष नाही. " " मलाही तू आवडतं . माझं ही प्रेम तुझ्यावर आहे. तू कदाचित माझ्यापेक्षा जास्त करत असणार पण माझं ही प्रेम काही कमी नाही. पण ...अजून वाचा

18

श्वास असेपर्यंत - भाग १८

वसतिगृहात परत आल्यावर मी आनंदला झालेला प्रकार सांगितला. तू म्हणत होता तसंच झालं. लक्ष्मीने प्रेमाचा प्रस्ताव माझ्यासमोर माझ्या छातीत धड धड आणि कालवाकालव वाढली होती. काय बोलावं?? काय उत्तर द्यावं ?? सुचत नव्हतं. " मग तू काय उत्तर दिलं ???"आनंद उत्स्फूर्तपणे विचारणा केली. " काय उत्तर देणार !!! तुला तर माहीतच होतं ना की, लक्ष्मी मला आवडते. मग अधिक विचार न करता मी तिला सांगितलं कि, माझं ही तुझ्यावर प्रेम आहे. फक्त मी सांगण्यासाठी भीत असायचो. ...अजून वाचा

19

श्वास असेपर्यंत - भाग १९

एके दिवशी मी आणि आनंद कॉलेज मधून घरी जायला निघालो. सायंकाळ झाली होती. जवळपास पाच साडेपाच वाजले असावे. पाच मिनिटे अंतरावर असतांना मला आणि आनंद ला लक्ष्मी आणि एक बाई सोबत बाहेर रस्त्याने जातांना दिसली. लक्ष्मी सोबत एक स्त्री असल्याने तिला आवाज कसा द्यायचा हा ही प्रश्न होता. लक्ष्मी च्या चेहऱ्यावर असणारे हास्य दिसत नव्हते. चेहरा पडलेला होता. पण आमची दोघांची लक्ष्मीला आवाज देऊन बोलण्याची हिंमत होत नव्हती. पण प्रेमाचा विषय असल्याने, आणि महिना झाला लक्ष्मीच्या आठवणीत सारखा झुरत असल्याने आज ही हिंमत करावीचं लागेल???? महिना भरापासून मनात उठणाऱ्या वादळाला लक्ष्मी कडून जाब घेऊन ...अजून वाचा

20

श्वास असेपर्यंत - भाग २०

लक्ष्मीच्या अचानक जाण्याने आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. माझीचं नाही तर आनंदची स्थिती सुद्धा तशीचं होती. कारण आनंद ने सुद्धा त्याची जवळची मैत्रीण गमावली होती आणि लक्ष्मी ला गमावल्याने मित्राच्या चेहऱ्यावरचे हास्य कुठेतरी लपून बसले होते. याचं ही दुःख आनंद ला झालं होतं. लक्ष्मीच्या जाण्याने आयुष्याचं गणित थोडं विस्कटलेल्या संसारासारखं झालं होतं . घड्याळाचे काटे थांबले की वेळ बरोबर दाखवत नाही, तसंच आता आयुष्याचं झालं होतं. ती गेली तेव्हांच आयुष्य थांबल असंच वाटत असायचं. ...अजून वाचा

21

श्वास असेपर्यंत - भाग २१

अभिनंदन !!!! अमर सर.. छाया मॅडम जवळ येताचं त्यांनी माझ्याशी शेकहॅन्ड करत माझं अभिनंदन केलं. छाया मॅडम आमच्या कॉलेजमध्ये इतिहास विषय शिकवित असायच्या. पाहायला सुंदर, थोड्या शरीराने जाड जुड म्हणजे भरल्या होत्या. पण साडी वर अगदी उठावदार आणि कुणालाही आपल्या अदाने घायाळ करतील अश्याचं छाया मॅडम होत्या. मी तासिका तत्त्वांवर लागलो त्यापुर्वी पासून या महाविद्यालयात तासिका तत्वांवर प्राध्यापिका म्हणून होत्या. एका अर्थाने त्या माझ्या सिनियर होत्या, असंच म्हणावं लागेल. लग्न न झालेल्या म्हणजे अविवाहित असल्याने सर्वांच्या लाडक्या होत्या, असं म्हटलं तरी चालेल. " कशासाठी अभिनंदन करता मॅडम???? "मी छाया मॅडम ...अजून वाचा

22

श्वास असेपर्यंत - भाग २२

एवढ्यात छाया मॅडम आल्या . " अहो अमर सर , आले तुम्ही!!!! " खूप छान दिसतं आहात तुम्ही छाया मॅडम लाजत म्हणाल्या. छाया मॅडम सुद्धा आज इतर दिवसांपेक्षा अधिक उठावदार आणि मोहक दिसत होत्या . अंगावर निळ्या रंगाची साडी आणि त्यांवर कोरीव काम केले होते. गळ्यात मोत्यांची माळ घातलेली होती. आणि केसांची वेणी घालन्यापेक्षा ते सैल मागे सोडले होते. केस सुद्धा अगदी लांब होते त्यामुळे आज त्या कुणाच्याही नजरेत भरेल अश्याचं दिसत होत्या. त्यांनीही मी म्हणालो," तुम्ही पण खूप छान ...अजून वाचा

23

श्वास असेपर्यंत - भाग २३

" उद्या तुम्हांला न्यायालयात हजर करणार आहे !!! गुन्हा सिद्ध झाल्यास उरलेले आयुष्य इथेचं काढावे लागेल. "अशी शिपायांनी तंबी दिली. मी मात्र आता काय करावे ??? काय होईल उद्याला??? या विचारात बुडालो होतो . चुकी नसतांना , माझ्यावर हा आरोप का लावावा या विचारानेचं माझी झोप उडाली होती !!! समोर दिसणारा नोकरीचा भविष्यकाळ, पूर्णवेळ नोकरी , आईला सर्व सुख देणार , सर्व व्यवस्थित होईल , या आशेने मी जगत होतो. पण आता ते स्वप्नही धूसर झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या आयुष्यांला तुरुंगात काढावे लागेल, ...अजून वाचा

24

श्वास असेपर्यंत - भाग २४

पोलिस स्टेशन वरून पायी निघालो. डोक्यांत विचारांचे तांडव मांडले होते. पुढे काय होईल???परत आपल्याला दुःखाचे दिवस येतील???आईला काय वाटेल या विचाराने मन रडकुंडीला आलं होतं. विचारां - विचारांत घरी पोहोचलो . येताचं आईने प्रश्न केला , " कुठे होता अमर रात्रीला तू ???" आता खरं सांगावं की खोटं हाचं पेच मनात निर्माण झाला होता . घडलेला प्रकार सांगितला तर , आईला धक्का पोहोचेल. आईने पाहिलेले स्वप्न की, आपल्याला चांगले दिवस येतील, चांगलं घर होईल , आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं फळ मिळेल, इत्यादी म्हणून मी आईसोबत खोटं बोललो आणि म्हणालो , " काही नाही ग आई!!! काल कार्यक्रमातून ...अजून वाचा

25

श्वास असेपर्यंत - अंतिम भाग

चल राहुल (कहानी ऐकणारा _भाग पहिल्यावरून ) , बघ दिवस उजाडला . पाऊसही थांबलाय !! घरी जाऊन तू कर ! रात्रभर झोपला नाही , ऐकत होता माझी करून कहाणी. माझा हा नित्यक्रम झालेला आहे. म्हातारा झालोय मी. कुठे चालायला गेलो की धापा लागतात. म्हातारे बाबा ( अमर) बोलत होते. आयुष्य संपलं आहे माझं आता. आयुष्यभर दुःख झेलली . आता म्हातारपणी सुद्धा दुःखाची सवय झाली आहे. " बाबा बोलत होते. आता माझ्या डोळ्यांत फक्त अश्रू होते. तुम्ही सांगताय ते स्वतः अनुभवलं . एवढे दुःख असून , मनाचा मोठेपणा करून त्या मुलीला ( छाया ) केले. जिच्या एका चुकीने ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय