प्रलय-०१                      उपोद्घात  " विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील , अर्धे आकाश काळेकुट्ट  आणि अर्धे आकाश लाल रंगाचे  असेल ; त्यावेळी जे मूल जन्माला येईल ते तुझ्या वंशाचा निर्वंश करेल . राजेन तुझा निर्वंश फार दूर नाही ....!ती  तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे.......!  " महर्षी , कोण ' ती '....?  तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात....?  आणि हे कधी , कधी होणार आहे ?   मला फार चिंता वाटत आहे ...?   " फार दूर नाही राजन .  तुझा मृत्यू , लवकरच तुझा

Full Novel

1

प्रलय - १

प्रलय-०१ उपोद्घात " विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील , अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जे मूल जन्माला येईल ते तुझ्या वंशाचा निर्वंश करेल . राजेन तुझा निर्वंश फार दूर नाही ....!ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे.......! " महर्षी , कोण ' ती '....? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात....? आणि हे कधी , कधी होणार आहे ? मला फार चिंता वाटत आहे ...? " फार दूर नाही राजन . तुझा मृत्यू , लवकरच तुझा ...अजून वाचा

2

प्रलय - २

प्रलय-०२ भिल्लवाच्या भोवती वर्तुळाकार करून ते सैनिक भाला घेऊन उभे होते . भिल्लव आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होता . त्या सैनिक पथकाचा प्रमुख , अधीरत होता , तो म्हणाला " भिल्वावा आता तुझा खेळ संपला , उद्या सूर्योदयाबरोबर प्रधानजी सोबत तुलाही फाशी दिली जाईल......" काय प्रधानजीला फाशी दिली जाणार आहे.....?" होय आणि त्यांच्याबरोबर तुलाही तुम्ही दोघांनी देशद्रोहाचा मोठा गुन्हा केला आहे....." अरे अधिरथ तुझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधली आहे का...? तुला माहित नाही का काळी भिंत पडली तर काय होईल ....? अरे प्रधानजी खरच राज्याचे सेवक आहेत आणि तू ही हो....." राज्याचे सेवक राजाच्या आज्ञेबाहेर नसतात . राजाच्या ...अजून वाचा

3

प्रलय - ३

प्रलय -०३ जलधि राज्याचे अधिपती राज्यांची निर्मिती झाल्यापासून कैरव राजे होते . सध्या अकरावे कैरव महाराज राज्य करत महाराज वृद्ध होते . शुभ्र पांढऱ्या केसांवरती सोनेरी मुकुट होता. वृद्धत्व आलेलं असूनही चेहऱ्यावरती एकही सुरकुती नव्हती . राज्याला दोन बाजूंनी समुद्राच्या सीमा असल्यामुळे त्याचं नाव जलधि पडलं होतं. जलधि हे राज्य इतर सर्व राज्यांपेक्षा भरभराटीचे राज्य होतं . असं म्हणतात जलधि मधील भिकारी हे बाकीच्या जगातील श्रीमंतपेक्षा श्रीमंत असतात. त्याच जलधि राज्याच्या राजमहालात आज ही राज्य सभा भरली होती . राजमहाल किती आलिशान होता . त्या ठिकाणी सिंहासने नव्हती तर कमलासने होते . शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेल्या कमळाच्या ...अजून वाचा

4

प्रलय - ४

प्रलय-०४ ते चार घोडेस्वार होते . त्यांच्या पोषाखावरून ते योद्धा असावेत असे वाटत होते . काळ्या भिंतीकडे होते ." चैत्या तुला वाटत नाही का आपला आयुष्यमान जेव्हापासून त्या मुलीकडून या बिया घेऊन आलाय तेव्हापासून जरा शांत शांतच आहे ..... " भरत हा आयुष्यमानचा मित्र आणि साथीदार होता . चैतन्य , कनिष्क , भरत आणि आयुष्यमान या चौघांनी शपथ घेतली होती . आणि या चौघांची निवड झाली होती ." होय रे लगा भरत्या , मला पण तसंच वाटतंय , कन्या तुला काय वाटतंय रे ....? आयुष्मान आपला शांत शांत झालाय जणू हरवलाय कुणाच्या तरी आठवणीत......" आयुष्मान आहेत ते ...अजून वाचा

5

प्रलय - ५

प्रलय-०५ " आता काय करायचं भिल्लवा , " सरोज वैतागून भिल्लवाला म्हणाली . त्यांच्यासमोर वीस सैनिक व मागच्या बाजूला सैनिक , असं त्यांच्या भोवती पंचवीस सैनिकांचा गराडा पडला होता . महाराज विक्रम त्यांना देशद्रोही ठरवून फाशी द्यायला कमी करणार नव्हते . कसेही करून त्यांना प्रधानजींना घेऊन थेट तिथून जायलाच हवे होते . चौघेही लढायला सिद्ध झाले . सैनिक त्यांच्यावर चाल करून येणार त्या अगोदरच त्यातील काही सैनिकांनी इतर सैनिकांना मारायला सुरुवात केली . सैनिका सैनिकांमध्ये लढाई सुरू झाली होती . या चौघांना काहीच कळेना हे काय चाललं होतं . मागून आलेल्या सहा सैनिकांना या चौघांनी मिळून जागीच ठार केलं। ...अजून वाचा

6

प्रलय - ६

प्रलय-०६ " तू इथे काय करतेस ....? आयुष्यमानने तिला विचारलं ...... आयुष्यमान व भरत तिला त्या पाहून आश्चर्यचकीत झाले होते . ती त्याठिकाणी कशासाठी आली असावी याचा विचार करत आयुष्यमान मनोमन आनंदित होत होता . त्याला वाटत होतं कि ती त्याच्यासाठीच तिथे आली असावी ." मी कसं सांगू हे मला कळत नाही , खरंच.....तिला काहीतरी सांगायचं होतं , पण ती संकोचत होती . आयुष्यमानच्या मनात लाडू फुटत होते ." तुम्हाला काही सांगायचं असेल तर निसंकोच बोला , तुम्हाला मदत करायला आम्ही केव्हाही तयार आहोत ......" आयुष्यमानच्या मनातले वाक्य भरत बोलला , त्यामुळे आयुष्यमान मनात चरफडला .हळूच ...अजून वाचा

7

प्रलय - ७

प्रलय-०७ त्या गोल वर्तुळाकार नकाशा भोवती सर्व जण जमले होते . जलधि राज्यात आज कितीतरी वर्षांनी त्या कक्षात ही तात्काळ बैठक बोलावली होती . काही विशेष मंत्रीगण , हेर पथकाचे प्रमुख , सेनाप्रमुख प्रमुख सल्लागार आणि स्वतः महाराज कैरव त्या ठिकाणी उपस्थित होते . महाराज कैरव बोलत होते ," आपल्या राज्यसभेत आणि संशोधन शाळेत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्ही पाहिल्या . तो माणूस आणि त्याचे ते विचित्र शब्द , हे आपण सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं आहे . तो काय करू शकतो हे ही आपल्याला ज्ञात आहे . आपला शत्रू त्या काळ्याभिंतीपलीकडे आहे आणि त्यांची संख्या जरी ...अजून वाचा

8

प्रलय - ८

प्रलय-०८ रक्षक राज्याची राज्यसभा आज बर्‍याच दिवसांनी भरली होती . महाराज राजसिंहासनावरती आपल्या हातात सुवर्णपात्र घेऊन मदिरापान करत होते . प्रधानजींना कारागृहात टाकल्यापासून प्रधान पदाचा भार सेनापतीकडे सोपवण्यात आला होता . सेनापती अंबरीश बोलत होते..." महाराज आपल्या सैन्याची जी पहिली तुकडी आपण काळ्या भिंतीपलीकडे पाठवली होती त्याबाबत एक बातमी आहे....." कोणती बातमी आहे अंबरीश.... अलीकडे महाराज थोरामोठ्यांचा मान ठेवायचा विसरत होते. ते सर्रास सर्वांना एकेरी नावाने संबोधत होते . बऱ्याच जणांची फरफट होत होती पण महाराज पुढे कोणी काही बोलत नसे . जेव्हा सेनापती अंबरीशजींना महाराजांनी अंबरीश असे संबोधले तेव्हा त्यांना राग अनावर झाला , कारण जेव्हा ...अजून वाचा

9

प्रलय - ९

प्रलय-०९ संसाधन राज्ये . पृथ्वीतलावरती सर्वात मोठ्या प्रमाणात खनिजाचा साठा असलेली ही पाच राज्ये एकमेकाला लागून प्रदेशावर पसरलेली होती . सुवर्ण नगर हे सोन्यासाठी प्रसिद्ध होत . लोहगड हे राज्य लोह नि त्यासदृश्य धातूंसाठी व रत्न पंचक हे राज्य रत्नासाठी प्रसिद्ध होते . अग्नी व ज्वाला ही राज्ये खनिज तेल व कोळशासारख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध होती.......... पृथ्वीतलावरील इतर भागातही खनिज संपत्ती विपुल प्रमाणात सापडत होती . पण ज्या त्या राज्यात सापडणाऱ्या साधनसंपत्तीवर ज्या त्या राज्याचा अधिकार होता . पण या पाच राज्यातील संपत्तीवरती संपूर्ण पृथ्वीतलाचा अधिकार होता . प्रत्येक राज्याचा हिस्सा ज्या त्या राज्याला पुरवला ...अजून वाचा

10

प्रलय - १०

प्रलय-१० आज जलधि राज्याची राज्य सभा भरली होती . महाराज विक्रम , त्यांची काळी भिंत पाडण्याची आज्ञा अंधभक्त , या साऱ्यांवर ती आज निर्णय होणार होता . राज्यसभेत सर्व मंत्रीगण , राज्यातील काही प्रतिष्ठित लोक , महाराज विश्वकर्मा म्हणजे रक्षक राज्याचे प्रधान , त्यांची मुलगी अन्वी , युवराज देवव्रत असे सर्व जण जमले होते . प्रधानजी जलधि राज्यात पोहोचल्यानंतर कळालेल्या गोष्टींमुळे फारच आश्चर्य चकीत झाले . अंधभक्तांची गोष्ट त्यांना भयकारक वाटली . अंधभक्तांना काळी भिंत अडवू शकत नाही म्हटल्या नंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला . संशोधन शाळेत झालेला किस्सा व त्यामागे असलेला मारूत राजाचा हात ऐकून ...अजून वाचा

11

प्रलय - ११

प्रलय-११ कितीतरी शतके अगोदर , काळी भिंत सुद्धा बांधण्याच्या अगोदर , संपूर्ण पृथ्वीवरती फक्त एकच राजा राज्य होता . संपूर्ण पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदत होती . पृथ्वीवरचा तो पहिला राजा होता ज्या राजानं देवाच्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीवरती आपले आधिपत्य आणून सगळीकडे सुख शांती व समृद्धी पसरवली होती.... असं म्हणतात राजा साक्षात ईश्वर होता आणि राणी साक्षात देवी . त्या राणीकडून राजाला तिळं झालं . एकाच वेळी तीन राजपुत्र राजमहालात रांगू लागले .एकाचं नाव होतं कैरव , दुसऱ्याचं सोचिकेशा आणि तिसऱ्याच मारुत .तिन्ही राजपुत्र एकत्र शिकू लागले . सर्व काही समजून घेऊ लागले , युद्ध ...अजून वाचा

12

प्रलय - १२

प्रलय-१२ ज्यावेळी भिंत बांधली नव्हती आणि भिंतीपलीकडील सम्राट जागृत झाला होता . त्यावेळी त्याने तीन प्रकारच्या सैना बनवल्या . एक म्हणजे त्रिशूळाची सेना दुसरी म्हणजे तलवारीची सेना व तिसरी म्हणजे धनुष्यबाणाची सेना...... त्यावेळी भिंतीपलीकडे जे काही लोक होते ते , त्या सर्वांना त्यांने सैनिक बनवून पृथ्वीतलावरील प्रत्येक राज्य जिंकायला पाठवलं होतं . प्रत्येक सैन्यात जरी सामान्य लोक असले तरी त्यांच्याकडे असणारी हत्यारे म्हणजेच , तलवार सैन्यात असलेल्या तलवारी , धनुष्यबाण सैन्यात असलेले धनुष्यबाण व त्रिशूळ सैन्यात असलेले त्रिशूळ हे चमत्कारिक होते..... त्रिशूळ सैन्याकडे असलेला त्रिशूळ जर एखाद्या व्यक्तीला , प्राण्याला किंवा सजीवला मारला असता त्या व्यक्तीचे ...अजून वाचा

13

प्रलय - १३

प्रलय-१३ मोहिनी त्या गरुडावरती बसून हवेत उंच उडत होती . वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच तिचे केसही हवेत उडत होते ती कुठे चालली होती .....? तिलाही माहित नव्हतं . तिची संवेदना जणू नष्ट झाली होती . पूर्वीची मोहिनी आता राहिली नव्हती . जणू तिचा नुकताच जन्म झाला होता . बऱ्याच नवीन गोष्टी तिला आठवत होत्या . ज्या गोष्टी तिने कधीच अनुभवल्या नव्हत्या , त्या गोष्टी तिला आठवत होत्या. आठवणी नव्याने लिहिल्या जात होत्या . कोऱ्या पुसलेल्या पाटीवरती कोणीतरी अक्षरे लिहावीत त्या प्रमाणे तिच्या संपूर्ण रिकाम्या झालेल्या मेंदू वरती आठवणीच्या आठवणी कोरल्या जात होत्या . तिला काहीच माहित नव्हते , पण ...अजून वाचा

14

प्रलय - १४

प्रलय-१४ " मी कोण आहे......?मोहिनी विचारत होती ." तू प्रलयकारिका आहेस.....?आरुषी तिला सांगत म्हणाली.." पण मला इतक्या दिवस सारं आठवत नव्हतं ......आणि अचानक आठवायला का सुरुवात झाली.....?" तुला संधी दिलेली होती , आतापर्यंत तुला तुझं जीवन जगण्यासाठी दिलं होतं । तू आतापर्यंत यासारखी बरीच आयुष्य जगली आहे . ती आयुष्य तुझ्या खऱ्या जीवनाचा भाग नाहीत . तुझे खरे जीवन आहे मारुत राज्याची सेवा . मारूतांची सेवा .....त्यासाठीच तुला इथं बोलावले आहे . आता तू आमच्या बरोबर येशील . माझ्या आदेशाचे पालन करणे तुला बंधनकारक असेल आणि तू ते न सांगता करशीलच .तुझ्या रक्तातच आहे ते ." पण माझे ...अजून वाचा

15

प्रलय - १५

प्रलय-१५ आरुषी व मोहिनी जंगलात पोहोचल्या होत्या . काही अंतर चालल्यानंतर जंगली लोकांसारखी वेशभूषा केलेला माणूस त्यांच्याकडे लागला . मोहिनी घाबरली पण आरुषी मात्र तिच्या जागी ठामपणे उभी होती . कारण त्या मनुष्याने जरी जंगली लोकांसारखी वेशभूषा केली असली तरीही तो मारुतांचा एक विशेष हेर होता . त्याला आरुषीनेच जंगली सैन्यात सहभागी व्हायला सांगितलं होतं . त्याप्रमाणे तो सहभागी झाला होता आणि आता तोच त्यांना जंगली सैन्याच्या ठिकाण्यावर ती घेऊन जाणार होता . " आरुषी मला नाही वाटत तू हे योग्य करतेयस..... तुम्ही दोघी त्याठिकाणी जाऊन काय करणार आहात ........?तो माणूस जवळ येत बोलला......" रुद्र हे ...अजून वाचा

16

प्रलय - १६

प्रलय-१६ उत्तरेचा सैनिक तळ हा सैनिक तळ कमी आणि देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून जास्त ओळखला जायचा . ज्यावेळी महाराज वानप्रस्थ आश्रम स्वीकारला . त्यावेळी महाराज विश्वकर्मानी राज्याची सूत्रे सांभाळली . त्यावेळी महाराज विश्वकर्माचे बरेच समर्थक होते . पण ज्यावेळी दुसरा राजपुत्र जन्मला व त्याच्या नावे राज्याभिषेक करण्याचा प्रश्न आला , त्यावेळी महाराज विश्वकर्मा महाराज पदावरून बाजूला झाले . मात्र त्यांचे समर्थक अडून राहीले .. त्यामुळे त्या सर्वांना शिक्षा देण्याचे ठरले . मात्र ते समर्थक पलायन करण्यात यशस्वी झाले व उत्तरेचा जंगलात स्थायी झाले . सैनिकांबरोबर बरेच सामान्य नागरिक ही त्याठिकाणी स्थायिक झाले होते...... त्याच सैनिकाच्या तळावरती आज ...अजून वाचा

17

प्रलय - १७

प्रलय-१७ ज्यावेळी आयुष्यमान हवेत उलटा लटकला . त्याच्या मानेवरती काहीतरी टोचल्या सारखे . हळूहळू त्याच्या सर्व जाणीवा व संवेदना बधीर होत गेल्या . शेवटी डोळ्यापुढे संपूर्ण अंधार पसरला . तो बेशुद्ध झाला . ज्या वेळी त्याला जाग आली तो जमिनीवरती पालथा झोपला होता . हात वरच्या बाजूला केले होते व लोखंडी हात बेड्या ज्या जमिनीत रुतलेल्या होत्या त्याच्यात अडकवले होते . पायांच्या बाबतीतही तसंच होतं . त्याचे हात व पाय दोन्ही गुंतवले होते . जमिनीला असलेल्या त्या बेड्या मध्ये त्याचा हात व पाय गुंतवले होते . त्याच्यातून निसटणे अशक्य होते . त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल ...अजून वाचा

18

प्रलय - १८

प्रलय-१८ भिती म्हणजे काय याचा खरा अर्थ आयुष्यमानला आता समजला होता . तो बुटका नक्कीच नरभक्षी होता त्यांनं जेवढे म्हणून सुटायचे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते , पण त्या बेड्यामधून सुटणे अशक्य होतं . तो बुटका आता मोठ्या चाकुला धार लावत होता . नक्कीच त्याचा मृत्यू त्याला जवळ दिसत होता . त्यावेळीच आजूबाजूने चित्रविचित्र आवाज येऊ लागले . कोणतातरी प्राणीही जोरजोरात ओरडत असल्यासारखे वाटत होते . पण असा आवाज आयुष्यमान यापूर्वी कधीच ऐकला नव्हता . मात्र तो आवाज ऐकून ते बुटका व बुटकी जरा जरा घाबरल्यासारखे वाटले दोघेही पटकन तळघरातून वर निघाले . ...अजून वाचा

19

प्रलय - १९

प्रलय-१९ जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला वाटत होती . त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला....." तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील सार्‍या प्रश्नांची उत्तरे तुला आता मिळणार नाहीत . पण काही प्रश्नांची उत्तरे मी तुला सांगेन . ती म्हणजे तुझी सुरुकुने निवड केली आहे ......ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी , किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची ...अजून वाचा

20

प्रलय - २०

प्रलय-२० महाराणी शकुंतलेपासून भक्तांनी राजकुमारास घेतले . तो राजकुमार त्यांनी ' त्याच्या ' ताब्यात दिला . तो होता . संपूर्ण शरीराभोवती काळे वस्त्र परिधान केलेला , विचित्र काळ्या पक्षावरती बसलेला . त्याच्याभोवती सदैव काळ्या ढगांचे विचित्र आवरण असायचे . बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना त्याचा चेहरा माहीत होता . त्यामध्ये महाराणी शंकूतलेचाही समावेश होता . ज्यावेळी राजकुमार त्याच्या ताब्यात दिला . त्यावेळी भक्त त्याच्या मागोमाग निघाले . मात्र त्या भक्तांमध्ये मिसळून उत्तरेच्या सैनिक तळ्यावरती उपस्थित असलेला अभिजीत अद्वैतही निघाला . हा तोच अद्वैत होता , जो तीनशेजनांच्या तुकडीचा प्रमुख होता . ज्या तुकडीला भक्तांनी काही दिवसांपूर्वी नष्ट केले होते ...अजून वाचा

21

प्रलय - २१

प्रलय-२१ काळोख होता . घन काळा कातळ काळोख . स्पर्श रूप रस काहीच नव्हते . फक्त शब्द होते . तेही मनात . मन तरी होतं का...? काहीच जाणीव नव्हती. कोण होता तो ? काय होता तो ? फक्त शब्द होते . नि प्रश्न होते . बाकी काहीच नव्हतं . किती वेळ ..? वेळ तरी होती का..? असेल तर कशाला सापेक्ष धरून मोजणार..? निर्विकार अवस्था म्हणतात ती हीच का...? हळू हळू जाणीव आली . त्याला स्पर्श जाणवला . प्रकाशाला जणू त्याने स्पर्श केला होता . नंतर दिसू लागला तो दिव्य सोनेरी प्रकाश , आणि येऊ लागला सुमधुर सुगंध ...अजून वाचा

22

प्रलय - २२

प्रलय-२२ महाराज विश्वकर्मा जलधि राज्याकडून जी पाच हजारांची सैन्य तुकडी घेऊन आले होते त्या तळावरती स्मशान शांतता पसरली होती . काही वेळापूर्वी एक जळता तीर येऊन जमिनीत घुसला . त्याच्यावरती असलेल्या संदेशपत्रांमध्ये एक मजकूर लिहिला होता . " गपचूप , जिथून आला तिकडे माघारी जा , अन्यथा तुमच्या महाराज विश्वकर्मासहीत इतर सातही जणांच्या बलिदानासाठी तयार राहा..... "विक्रमाने रितिरिवाज व परंपरा बाजूला सारत बोलण्यासाठी , संधी करण्यासाठी आलेल्यांवरती पाठीमागून वार केला होता . त्याच्यांबरोबर आलेले सैनिक मारून टाकत उरलेल्यांना कैद करून आणलं होतं . ज्या लोकांना त्याने कैद केलं होतं ते सामान्य सैनिक ...अजून वाचा

23

प्रलय - २३

प्रलय-२३ " मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार , म्हणूनच हे बुटके पाठवली होते तुझ्यासोबत त्यांनाही त्याचं काम पूर्ण करून दिलेलं नाहीस . अरे तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी संपूर्ण जगाचा विनाश केलास की तू...." तो म्हातारा वैतागून आयुष्यमानला बोलत होता ... " आता आत्मबलिदानाचा विधी पूर्ण झाला म्हटल्यावर , ती संपूर्ण शक्तिशाली झाली . तिला आडवणे आता सर्वथैव अशक्य आहे . ... आता तो म्हातारा पुढे आयुष्यमान आहे हेही विसरला व स्वतःशीच बडबडत सुटला.... " आता काही खरं नाही . तिला कोण थांबवणार...? विनाश कोण रोखणार ....? याचे उत्तर कोणाला माहित आहे.....? कोण ..? कोण ..? कोण...? तो ...अजून वाचा

24

प्रलय - २४

प्रलय-२४ ज्यावेळी भगीरथ जलधि राज्याच्या सैनिक तळावरती पोहोचला त्यावेळी सर्वत्र शांतता होती . कौशिका कडे त्याने महाराज व मंत्रीगणाला बोलवण्याची विनंती केली . सारे जमल्यावरती तो बोलू लागल " रक्षक राज्याच्या सैनिकांनी विक्रमाचा वध करून त्याला भिंतीपलीकडे फेकून दिले आहे . महाराज विश्वकर्माच्या नियंत्रणाखाली जलधि आणि रक्षक राज्याची सैना बाटी जमातीच्या टोळी मागे त्यांच्या जुन्या महालाकडे गेली आहे . तंत्रज्ञ मंदारचा मुलगा , शौनकचा या सार्‍यात फार मोठा वाटा आहे . त्यानेच उघड केले की विक्रम हा मारुतांच्या अंमलाखाली होता . आता भिंत तर पडणार नाही , त्यामुळे त्रिशुळ सैनिकांना माणसात आणण्यासाठी आपल्याला बराच वेळ मिळेल .... ...अजून वाचा

25

प्रलय - २५

प्रलय-२५ सुवर्णनगर , लोहगड , रत्नागिरी अग्नी आणि ज्वाला ही पाच संसाधनं राज्य होती . राज्यात नावाप्रमाणेच विविध खनिजे व संपत्ती होती . त्या पाच राज्यांवर ती इतर सर्व राज्यांची मिळून सत्ता होती . स्थानिक लोकांना म्हणजेच मातील्या लोकांना तिथे बळजबरीने कामाला लावले जात होते . मात्र त्या लोकांनी उठाव करून पाचही राज्य ताब्यात घेतली होती . मातीतल्या लोकांचा नेता अंकित होता . पाच राज्यांमध्ये आता त्याच्या नेतृत्वाखाली बरेच बदल झाले होते . त्यांच्याकडून जनावरासारखे काम करून घेतले जायचे आणि पुरेसे अन्नही नाही दिले जायचे . पूर्वी इतर राज्यांची सत्ता असल्याने व्यापार नावाची गोष्टच नव्हती. जे ते राज्य ...अजून वाचा

26

प्रलय - २६

प्रलय-२६ देवव्रत त्रिशूळ घेऊन जलधि सैन्य तळावरती आला होता . आल्या आल्या महाराज कैरवांनी त्याला . " युवराज असं मुर्खासारखं काळा महालातील त्रिशुळ आणायला जाणं तुम्हाला शोभत का ...? जलधि राज्याचे बारावे महाराज आहात तुम्ही , आणि तुम्हीच असे मूर्खपणाचे निर्णय घ्यायला लागल्यावर ती संपूर्ण राज्यानं काय करावं ......." " पण बाबा मी जर गेलो नसतो तर आपलं म्हणायला राज्याच राहिलं नसतं . सारी जनता त्रिशुळ सैनिक बनून आपल्यापुढे उभा होती . काळी भिंत पडणार नव्हती त्यामुळे मला हातावरती हात ठेवून बसणे नको वाटलं . म्हणूनच मी त्रिशूळ आणायला निघालो . तुम्हाला विचारलं असतं तर ...अजून वाचा

27

प्रलय - २७

प्रलय-२७ त्या तीन माया होत्या . म्हटल्यातर तीन होत्या . म्हटल्यातर एक होत्या . माया तीन प्रकारची किंवा तीन माया एक प्रकारच्या . एकाच वेळी तिघींचा जन्म झाला होता . तीन बहिणी भलत्याच प्रसिद्ध होत्या . त्यांची माया कोणालाही मोहित करणारी होती . ते सुंदर रूप . तो महाल . महालातील प्रत्येक गोष्टीला त्यांचा मायावी स्पर्श होता . साक्षात भगवंताला ही त्यांच्या मायेचा हेवा वाटतो असे म्हणतात . त्या तिघींचा संवाद चालला होता . पहिली माया" प्रत्येक राजाकडून बीज आलेलं आवश्यक होतं प्रत्येकीने आणलंय ना....."" हो मी मारूत राजाकडून . मारुतांचा राजा खरा प्रमुख आहे जंगली लोकांचा . एका ...अजून वाचा

28

प्रलय - २८

प्रलय-२८" मी म्हटलं होतं माझी गरज पडेल तुम्हाला , पडली की नाही......." वेडा आबाजी म्हणजेच विश्वनाथ म्हणाला भेटीच्या संरक्षणासाठी वारसदारांची सभा होती कधीकाळी वेडा आबाजी आयुष्यमान प्रमाणेच सभा प्रमुख होता . पण त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्याला सभेतून काढून टाकलं होतं . त्याने भैरव बरोबर हात मिळवणी केली होती . काळी भिंत पाडून देण्यासाठी. काळी भिंत पाडण्याचा अधिकार फक्त रक्षक राज्यातील राजाला , त्याच्या सैन्याला किंवा वारसदारांच्या सभेला होता . इतर कोणीही त्या भिंतीला पडायला गेले तर त्याचा मृत्यू नक्की असायचा . म्हणूनच भैरवने (मारुतांचा पुजारी ) विक्रमा सोबत लांब पल्ल्याची चाल खेळली होती . मात्र ...अजून वाचा

29

प्रलय - २९

क्यमःश-२९ विश्वनाथ भैरव आणि पार्थव काळ्या भिंतीपाशी आले . " लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत . लवकर सुरू कर..." भैरव म्हणाला " चिंता नको काही क्षणात ही भिंत कोसळलेली असेल ...." विश्वनाथ म्हणाला . नंतर त्यांनी आणलेल्या गोष्टी मांडायला सुरुवात केली . विचित्र भाषेत कसलेतरी मंत्र तो उच्चारत होता . मधुमोध पेटवलेल्या अग्निकुंडात एकापाठोपाठ एक आहुती देत होता . त्यातूनही चित्रविचित्र आवाज निघत होते . पण भिंत अजून हलली सुद्धा नव्हती . " काही होत नाही वाटतं . किती वेळ झाला ....." भैरव म्हणाला . " विक्रमासाठी तुम्ही इतकी वर्षे वाट बघितली , अजून काही क्षण वाट पाहू शकत नाही का ...अजून वाचा

30

प्रलय - ३० - Last Part

प्रलय-३० आयुष्यमान जेव्हा दुसऱ्यांदा प्रलयकारीके चा सामना करण्यासाठी मारूतांच्या जुन्या मंदिरात सामोरा गेला , त्यावेळी प्रलयकारिकेच्या आत्मबलीदानाचा विधी पूर्ण झाला होता . प्रलयकारिका संपूर्ण शक्तिशाली झाली होती . तिच्या त्या काळ्या डोळ्यात पाहत असतानाच तो तिच्या नियंत्रणाखाली आला होता . ज्यावेळी ती पेटी आयुष्यमानला दिसली त्यावेळी प्रलयकारिकेचा सेवक जागृत झाला . आयुष्यमानने ती पेटी चोरली व सुरुकु सोबत प्रलयकारीके कडे निघाला . इकडे तीन बहिणींच्या किमीयेमुळे प्रथम मानवांचा प्रमुख अंकितला प्रलयकारिकेला लढण्याची शक्ती प्राप्त झाली होती . प्रलयकारिकेचा मृत्यू निश्चित असतानाच , सुरूकू व आयुष्यमान त्या ठिकाणी आले . त्या दोघांबरोबर प्रलयकारीका तिथून निघाली . पेटी पाहिल्यानंतर तिने ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय