सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का? किती झाले तरी आई ती आई. सरला आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे? आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते? बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो? बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात? काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे.

Full Novel

1

रामाचा शेला.. - 1

सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का? किती झाले तरी आई ती आई. सरला आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे? आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते? बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो? बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात? काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे. ...अजून वाचा

2

रामाचा शेला.. - 2

आईचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्याकडे पाहून ती दिवस काढीत होती. बाळ मोठा होईल व आपले कष्ट संपतील आशा ती माऊली मनात खेळवीत होती. बाळाकडे पाहून ती सारे अपमान गिळी, सारे दु:ख विसरे. सार्‍या हालअपेष्टा सहन करी. त्याच्यावर तिचे किती प्रेम ! आईच्या प्रेमाला आधीच सीमा नसते. त्यातून एकुलता एक मुलगा असावा, आई विधवा असावी, दरिद्री असावी, आणि मग त्या मुलाविषयी तिला जे वाटत असेल, त्याची कल्पना कोण करू शकेल? ...अजून वाचा

3

रामाचा शेला.. - 3

झिमझिम पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. सायंकाळची वेळ होती. फिरायला जाणारे बाहेर पडले होते. कोणाजवळ छत्री होती. कोणाजवळ विशेषत: तरुण मंडळी छत्री न घेताच जाताना दिसत होती. तोंडावरचे पाणी हातरूमालाने पुशीत होती. उदयही मधूनमधून तोंड पुशीत, केसांवरून रुमाल फिरवी. पर्वतीच्या पायथ्याच्या रस्त्याने तो जात होता. कालव्याकडे तो वळला. त्याच्या काठाने तो जाऊ लागला. तो दोनतीनदा त्या बाजूला येऊन गेला होता. परंतु इष्टदर्शन झाले नव्हते. “आज तरी सरला दिसेल का? या अशा हवेत ती फिरायला पडेल का बाहेर? ...अजून वाचा

4

रामाचा शेला.. - 4

आई मुलाची वाट पाहात होती. दिवाळीत आला नाही, नाताळात आला नाही. परीक्षा आहे, अभ्यास असेल, होऊ दे एकदाची परीक्षा द्वारकाबाई म्हणत असत. परंतु त्यांच्याच्याने आता काम होईना. त्या आजारी पडल्या. आपल्या खोलीत त्या आता पडून असत. स्वत:च थोडी भाकरी करून खात. परंतु दिवसेंदिवस त्यांना अधिक अशक्त वाटू लागले. तापही येई. ग्लानी येई. त्यांनी भावाला बोलावून घेतले. भाऊ आला होता. पोलिस खात्यातील भाऊ. ...अजून वाचा

5

रामाचा शेला.. - 5

सरला सचिंत होती. उदयचे गेल्यापासून पत्र नाही. ती रोज वाट पाही. आज येईल, उद्या येईल. परंतु महिना झाला तरी पत्ता नाही. मे महिना संपत आला आणि जून उजाडला. मृग नक्षत्र सुरू झाले. पावसाळा आला. परंतु उदय आला नाही. कोठे आहे उदय? काय झाले त्याचे? त्याची आई का बरी नाही? त्याची व आईची भेट नसेल का झाली? परंतु तो कोठे आहे? त्याचा पत्ताही माझ्याजवळ नाही. इतके दिवस आम्ही एकत्र होतो. भेटत होतो. बोलत होतो. परंतु त्याचा पत्ता नाही घेऊन ठेवला. कोठे त्याला पत्र लिहू? कोठे त्याला पाहू? कोठे शोधायला जाऊ? ...अजून वाचा

6

रामाचा शेला.. - 6

सरला त्या अनाथालयातून बाहेर पडली. ती चंद्रभागेच्या तीरी गेली. तिने स्नान केले. तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि शेवटी स्टेशनवर ती अत्यंत दु:खी होती. कृश झाली होती. जीवनाचा तिला वीट आला होता. परंतु तिला जीवनाचा नाश करवत नव्हता. तुझा उदय तुला भेटेल, असे कोणीतरी तिला मनात म्हणत होते. ...अजून वाचा

7

रामाचा शेला.. - 7

सरले, कोठे ग आता जाणार? ती पुन्हा स्टेशनवर आली. मुंबईकडच्या गाडीत बसली. शून्य मनाने जात होती. मुंबईच्या समुद्रात जीव द्यावा तिच्या मनात येई, नलूकडे जावे व तिला सारे सांगावे असेही तिला वाटे. परंतु उदयने खरोखरच जीव दिला असेल तर? मी का जगू? नको का जगायला? बाळासाठी नको का जगू? बाळाला मी आणीन, वाढवीन. परंतु बाळाला जग वाढवील. उदय माझी वरती वाट बघत असेल, काय करू मी? ...अजून वाचा

8

रामाचा शेला.. - 8

उदयची हकीगत सांगायची राहिलीच. ती सारी नीट सांगतो, ऐका. स्मृतिहीन उदयला सरलेचा फोटो दिसताच एकदम स्मृती आली. तो एकदम उभा राहिला. त्याच्या दुबळया शरीरात बळ आले. सरलेचे जीवन त्याच्या डोळयांसमोर आले. तिचे दिवस भरत आले होते. ती कोठे असेल, तिने काय केले असेल, सारे विजेप्रमाणे त्याच्या मनासमोर आले. आणि तो एकदम मामांकडून निघून गेला. त्याला चिंता वाटत होती. सरलेची काय स्थिती झाली असेल असे मनात येऊन तो दु:खी होई. कावराबावरा होई. उदयने आपल्याला फसविले असे का तिला वाटले असेल? ...अजून वाचा

9

रामाचा शेला.. - 9

“हे पहा गब्बूशेट, तुम्हीच अध्यक्ष झाले पाहिजे. तुम्ही नाही म्हणू नका. मुंबई शहरातील वर्णाश्रम स्वराज्य-संघाचे तुम्ही अध्यक्ष. आज धर्म आहे. सबगोलंकार होऊ पाहात आहे. आपला थोर धर्म का रसातळाला जाणार? सनातन धर्म जगायला पाहिजे. तुम्ही ऐका. धर्माला आज तुमच्यासारख्यांची अत्यंत आवश्यकता आहे.” ...अजून वाचा

10

रामाचा शेला.. - 10

सरलेचा पत्ता नव्हता. तिने खरोखरीच जीव दिला की काय? आणि तिचा उदय, त्यानेही जीव दिला असेल का? विश्वासराव बसले म्हणजे त्यांच्या मनात हे विचार सारखे येत. एके दिवशी रात्री ते उठले. त्यांना अलीकडे झोप फारशी येत नसेच. ते गच्चीत बसले होते. विचार करीत होते. त्यांना तेथे समोर कोणी दिसत का होते? ते टक लावून पाहात होते. कोण होते तेथे? त्यांना तेथे सरलेची आई दिसत होती. सरलेला तिने पोटाशी घेतले होते. ...अजून वाचा

11

रामाचा शेला.. - 11

येत्या रामनवमीस अस्पृश्य बंधुभगिनी नाशिकला सत्याग्रह करणार अशी वार्ता सर्वत्र पसरली होती. वर्तमानपत्रांतून ती आली होती. आणि ती गोष्ट नव्हती. अस्पृश्यांचे पुढारी नाशिक जिल्हयातील खेडयापाडयांतून हिंडत होते. सत्याग्रहाचा ते प्रचार करीत होते. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतूनही त्यांचा प्रचार सुरू झाला होता. शेकडो अस्पृश्य स्वयंसेवक येणार. सत्याग्रह करणार. ...अजून वाचा

12

रामाचा शेला.. - 12

वर्णाश्रम-स्वराज्य-संघांची ती प्रांतिक परिषद सकाळी समाप्त झाली. त्या परिषदेतील गोष्टी सर्व शहरभर गेल्या. घरोघर त्यांची चर्चा चालली होती. घाटांवर, शाळांतून, कोर्टकचेरीतून एकच विषय बोलला जात होता. सनातनींच्या परिषदेची अशी फलश्रुती झाली. तिकडे अस्पृश्यांच्या परिषदेची काय होणार? ...अजून वाचा

13

रामाचा शेला.. - 13 - Last part

“मावशी ! मावशी !” “सारे बोलतो हो नलू.” सायंभोजने झाली. सायंप्रार्थना झाली. आणि सरला, उदय, नलू तिघे बोलत बसली होती. प्रकाश होता. खेळत होता. शेवटी तो आईच्या जवळ तेथे निजला. सरलेने नलूला सारी वार्ता सांगितली. उदय सद्गदित होऊन म्हणाला, “नलू, माझी सरला अशा दिव्यातून गेली !” “उदय, तुझ्यावर मी एक गोष्ट लिहिणार होते.” ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय