घराच घरपण जपून ठेवण आपल्याच हातात.. Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घराच घरपण जपून ठेवण आपल्याच हातात..

घराच घरपण जपून ठेवण आपल्याच हातात..

"माझे कपडे कुठे ठेवले आहेत ग.."

सकाळी सकाळी अहोंचा नाराजीचा सूर कानी पडला कि त्यावर बायकोची चीड चीड साहजिकच... "इतकी वर्ष झाली तुम्हाला तुमचे कपडे जागेवर ठेवता येत नाहीत का? काय सारखी तुमची कटकट? मोलकरणीचा दर्जा दिला आहे तम्ही मला..बायको म्हणून कधी वागलात का?"

"ठीके..शोधतो मी! तुझ वागण बदलाल आहे हल्ली. सदा वैतागलेली असतेस..तुझ्याशी लग्न उगाच केल अस सारख वाटत राहत...तरी मला आई सारखी बजावत होती... परत एकदा विचार कर.. पण माझाच चुकल..जाऊदेत! आता इतकी मोठी चूक घडून गेली..माझ नशीब म्हणायचं आणि जगात राहायचं! दुसर काय करणार?"

अशी किरकोळ भांडण बऱ्याच वेळा घरो घरी चालू असतात पण कधी कधी ह्या भांडणांचा आवाज खूप मोठा असतो. कधी नवरा बायको तर कधी सासू सून..भांडण होत नाही अस घर सापडण अवघडच. दिवसाची सुरवातच कधीकधी कुरुबुरीनी चालू होते. आदला दिवस चांगला गेला नाही किंवा अजून काही कारणांनी घरातल्यांच्या बोलण्यात कटुता येते. आणि साहजिकच त्याचा पूर्ण परिणाम घरावर होतो.. त्यामुळे होणारा आरडा ओरडा घरातलं वातावरण गढूळ करून टाकतात. ह्यात एकमेकांची मन दुखावली जातात आणि कधी कधी तर वाद इतका वाढतो कि त्याचा भांडणाच रूप येत. आवाज घराबाहेर जायला लागतो आणि त्याच सुद्धा भान राहत नाही. समोर लहान मोठ कोण आहे ह्याच भान सुद्धा राहत नाही. आणि चालू होतो "ब्लेम गेम.." एकमेकांना दुखावण...बोलण्यातून बोलण इतक वाढत कि ते बोलण जिव्हारीच लागून राहत! साहजिकच त्याचे पडसाद घरातल्या सगळ्यांवर होतात. शांत बसा हे सांगून सुद्धा भांडण थांबत नाही आणि हळू हळू घरातले सगळेच नकळतपणे दुखावले जातात. मग चालू होतो अबोला! आणि अश्या भांडणं नंतर घर कोलमडायला फार वेळ लागत नाही. नात्यात नकळत दुरावा यायला लागला कि गेली कि नाती परत नीट व्हायला किती वेळ लागेल याची खात्री देता येत नाही. घर कोमेजायला लागत. ते कोणालाही नको असत पण कळत नकळत घरातले एकमेकांमुळेच दुखावले जातातच! पण आपल्या जवळच्या लोकांना दुखावून कस चालेल? घरातली लोकं हिच तर आपल आयुष्य पूर्ण करतात.. घरातली लोकं आपल्या बरोबर नेहमीच असणार हे विसरून कस चालेल? बाहेरचे कितीही जवळचे असले तरी सगळ्यात पाहिली मदत येते ती घरातल्या लोकांकडूनच.. त्यामुळे घरातल्या प्रत्येकालाच किंमत देऊन त्यांचा मान ठेवण गरजेच असत. त्यानी घरातला एकोपा हरवत नाही.

घरातलं वातावरण नेहेमी आनंदी ठेवायचं असेल तर त्यावर पर्याय नक्कीच असतो.. उत्तर शोधायची इच्छा असेल तर उत्तर समोरच आहेत हे जाणवत. इच्छा शक्ती असली कि प्रश्न कितीही मोठा असला तरी उत्तर मिळत ते घरातल्यांच्या जवळ असल्यानी. म्हणजेच काय, उत्तर आपोआप मिळतात पण त्यासाठी प्रश्न सोडवण्याची इच्छा मात्र असावी लागते. अश्या नकळत होणाऱ्या वादांना थांबवण्यासाठी गरज असते ती एकमेकांना समजून घेण्याची. कधी एकत्र कोड सोडून त्यातला आनद घ्यायचा. कधी गच्चीवर जाऊन किंवा बाल्कनी मध्ये गप्पा मारत बसायचं. पण ह्यासाठी गारच असते ती स्वतःच्या कोशातून बाहेर पडून थोडासा विचार दुसऱ्यासाठी पण करायचा. आपल्या घरासाठी, घरातल्यांसाठी जागून पाहिलं तर नाती कधी दूर जाणर नाहीत. एखादा प्रश्न आला तर तो आपली मत मांडून लवकरच सुटू शकतो अस लक्षात येईल. आणि अस केल केला तर कोणतेही प्रश्न उरणार नाही. कधी थोडी कुरबुर हि होणारच पण जी छोटी कुरबुर रोजच्या ताणाच कारण होत नाही ना हे नक्की तपासण गरजेच असत. कधी आपली चूक नसतांना एक पायरी खाली आलो तर समोरचा सुद्धा नरमतोच आणि वादाला तोंड फुटत नाही. आणि वादातून बऱ्याच वेळा काहीही सध्या होत नाही. फक्त घरातल्यांनी मन मात्र दुखावली जातात. आणि अहंकार मात्र दुणावला जातो. पण घरातल्यांशी कसला अहंकार? अहंकारामुळे सुंदर नाती नकोशी वाटायला लागतात. घर आपलच, घरातली माणस सुद्धा आपलीच हि गोष्ट घरातल्या प्रतेकानीच लक्षात ठेवलं तर घरातली शांती कायम राहील आणि त्याचा नात्यांवरही सकारात्मक परिणाम होईल हे नक्की! आणि कोणीही दुखवल जाणार नाही. घरातली लोकं हि तर आपला खरा आधारस्तंभ असतो ते विसरून कस चालेल? एकमेकांची आपुलकीनी केलेली चौकशी नाती उलगडण्यास बहुमोलाची असतात. घरात कोणी आजारी असेल तर त्यांना जाणीव करून देण गरजेच असत कि घरातल्या सगळ्यांनाच त्यांची काळजी आहे. मोठ्यांची काळजी आणि लहानांना प्रेम दिल कि आपोआप घर फुलात राहायला मदत होईल. एकमेकांना न दुखावता खेळीमेळी च वातावरण असल कि साहजिकच नसते वाद होणार नाहीत आणि घरातली शांतता टिकवून ठेवण्यात यश येईल हे नक्की. घर एकसंध असेल तर कोणत्याही संकटामुळे नात्यांना तडा जाणार नाही. आणि आयुष्य हसत खेळत जगण्याची मजा घेता येईल. घर घरातल्या प्रतेकानीच बनत आणि त्यांनीच घराला घरपण येत हे नक्की. चार शब्दांची हि कविता समजून जगलो तर घरच घरपण कधीच हरवणार नाही..

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंतीइथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नातीत्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणीसूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणीत्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणीअश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणीया घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनि शक्तीआकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती...

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com